
यवतमाळ – यावर्षी दुष्काळामुळे शेतकर्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत.एकीकडे सरकार हजारो कोटीचे पैकेज व पैकेज देत आहे तर दुसरीकडे उपासमारीला तोंड देत असलेले दररोज दोन दुष्काळग्रस्त शेतकरी चालु अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यात आपली जीवन यात्रा आत्महत्या करून संपविली आहे अशा ४० शेतकऱ्यांची नावे विदर्भ जनांदोलन समितीने दिली असुन आज पर्यंत सत्ताधारी वा विरोधकांचा एकही नेता यांच्या दारावर गेला नसुन मात्र हे सारे नेते या दरम्यान विदर्भ दर्शन व भोजनावळीत मग्न असल्याचा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे .
विदर्भात दररोज दोन मराठवाड्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असताना दिल्लीचे सरकार मात्र महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या कमी झाल्या असा दावा करीत आहे हा प्रकार तर शेतकऱ्यांना अधिक निराश करणारा आहे एकीकडे सरकारने कर्ज वसुली रोखली असल्याचा दावा केला आहे तर याउलट बँकांचे कर्मचारी गावांगावात मध्ये नोटीस घेऊन फिरत आहे. कर्मचार्यांनाही शेतकर्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. परंतु त्यांचाही नाईलाज आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
शेतकर्यांना दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. सुरूवातीला अतवृदष्टी. गारपिट आणि नंतर यावर्षीखरिपात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांच्या हातात काहीच लागले नाही. त्यातच जे पीक आले त्यांना भावच मिळत नाही. दुबार-तिबार पेरणी करूनही अपुरा पाऊस आल्याने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. गतवर्षी ज्यांना १०० पोते सोयाबीन झाले त्यांना यंदा दोन क्विंटलही सोयाबीन झाले नाही. महागडे बियाणे, निंदण, खुरपण करून पीक शेतात बहरले होते. मात्र किडी आणि दुष्काळी परिस्थितीने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आहे. आता या शेतकर्यांना बँका त्रस्त करून सोडत आहे. अनेकांनी पेरणीसाठी पीक कर्ज घेतले होते. काहींनी ट्रॅक्टर तर काहींनी मोटरसायकलसाठी कर्ज घेतले होते. परंतु दुष्काळी परिस्थितीने कर्ज फेडू शकले नाही. बँकांनी आता वसुली मोहीम सुरू केली आहे.
Archive for December 22nd, 2014
0
दुष्काळाने मरण स्वस्त, नेते मात्र भोजनावळीत मस्त
0
पत्रकार विवेक राऊत याचे निधन

राळेगाव, दि. २२ – येथील पत्रकार विवेक अशोक राऊत याचे २२ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता यवतमाळ येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ते ४१ वर्षाचे होते. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. यावेळी अत्ययात्रेदरम्यान माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रविण देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील याच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नातेवाईकांनी श्रध्दांजली अर्पण केली.
0
कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ््यात
यवतमाळ, दि. २२ – गणवेश अनूदानाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागणारा कनिष्ठ साहाय्यक लिपीक एसीबीच्या जाळ््यात अडकल्याची घटना आज सोमवारी आर्णी पंचायत समितीमध्ये घडली. राजेश मधूकर बुटले (४४) रा. आर्णी असे लाचखोराचे नाव आहे.
आर्णी पंचायत समितीमध्ये कनिष्ठ साहाय्यक वर्ग ३ पदावर कार्यरत असलेल्या राजेश बुटले या लोकसेवकाने तक्रारकर्त्याला गणवेश अनूदानाचे बिल मंजूर करण्यासाठी ६०० रुपयांची लाच मागितली होती. बिल मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. कागदपत्रामध्ये कुठलिही त्रुटी नसताना, कनिष्ठ साहाय्यक बिल मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी करीत होता. लोकसेवकाच्या या प्रकाराची तक्रार त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार आज एसीबीच्या पथकाने सापळा रचून राजेश बुटले यास ६०० रुपयांची लाख स्विकारताना पंचायत समितीच्या चहा कॅटीनमध्ये रंगेहात पकडले. ही कारवाई उपअधिक्षक सतिष देशमूख, पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात पथकाने केली. या कारवाईमुळे कर्मचाºयात एकच खळबळ उडाली आहे.
महिला सरपंचास पायउतार होण्याचे आदेश, मुलाला नोकरीवर ठेवणे भोवले
नेर, दि. २२ – सरपंच पदाचा दुरपयोग करून ग्रामपंचायतमध्ये मुलाला नोकरीवर लावणाºया मंगरुळ येथील महिला सरपंचास पायउतार होण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.
प्रेमिला चव्हाण असे महिला सरपंचाचे नाव आहे. तालुक्यातील मंगरुळ ग्रामपंचायत मध्ये त्या सरपंचपदावर विराजमान होत्या. या ग्रामपंचायतमध्ये सतत सदस्याचे वाद होत असल्याने चार सदस्यांनी राजीनामे दिले आहे. याच संधीचा फायदा घेत चव्हाण यानी पदाचा दुरपयोग घेऊन बापुराव मेश्राम, सदानंद मेश्राम हे ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असताना मुलगा रामचंद्र हरिदास चव्हाण यास रोजंदारी कर्मचारी म्हणून कामावर घेतले. या बाबत त्याने दरमहा १ हजार २०० रुपये पगाराची उचल केली आहे. यावरुन सरपंचाने आपल्या पदाचा फायदा घेऊन आर्थीक लाभ घेतल्याचे दिसून येते असा आरोप ग्रामपंचायत सदस्य गिरीष चव्हाडे यानी केला आहे. ग्रामपंचायतमध्ये कर्मचाºयाची आवश्यकता असल्यास गावात दवंडी देऊन किमी जाहीरात देऊन पदे भरण्यात येते. मात्र सरपंच चव्हाण यानी सर्व नियमाची पायमल्ली करून मुलाला कामावर ठेवले होते. या प्रकरणाची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकुण चव्हाण यांना पदावरून पायउतार व्हावे असे आदेश अप्पर जिल्हाधिकाºयांनी दिले. या आदेशाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
0
काँग्रेसचे आंदोलन, लाठीचार्ज

नागपूर – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत नागपूर विधान भवनासमोर आंदोलन केले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी थेट बॅरिकेड्स तोडत विधान भवनाकडे धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्त्वाखालील हा मोर्चा काढण्यात आला. युवक काँग्रेसचे पदाधिकारी विधानसभा आवारातील बॅरिकेडस तोडून विधानसभेकडे पुढे सरकले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक झालेले कार्यकर्ते पोलिसांच्या विनंतीला न जुमानता विधान भवनाच्या दिशेने धावत सुटले. अखेर कायदा-सुवस्थेसाठी पोलिसांना लाठीमार करणे भाग पडले.मात्र, लोकशाही मार्गाने काढलेल्या मोर्चावर पोलिसांना लाठीमार करायला भाग पाडून भाजप सरकारने आपल्या ताकदीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप विश्वजित कदम यांनी केला आहे.
0
विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बेळगाव – जमखाना धुण्यासाठी तळ्याकडे गेलेल्या दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मार्कंडेय नगर येथे घडली आहे. तळ्यात बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे यल्लाप्पा शटाप्पा नाईक(१५) आणि शानूर लगमाप्पा दंडावर (१६) अशी आहेत. उशिरापर्यंत तळ्यात त्यांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरु होते. रात्र झाल्यावर शोध कार्य थांबविण्यात आले. आता मंगळवारी सकाळी तलाव फोडून त्यातील पाणी काढून मृतदेह शोधण्यात येणार आहेत.सरकारी हायस्कूलमधील विद्यार्थी सहलीहून परतले होते. सहलीहून आल्यावर आठ विद्यार्थी सोमवारी जमखाना धुण्यासाठी तळ्याकडे गेले होते. जमखाना धूत असताना चार विद्यार्थी तळ्यात पडले त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना वाचविण्यात आले. दोन विद्यार्थी मात्र तळ्यात बुडले. सदर घटनेची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे.
0
अंतराळात भारताची गगनभरारी

चेन्नई – २०१४ हे वर्षे भारताच्या अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत चमकदार वर्ष ठरले. भारताची पहिलीच मंगळयान मोहीम यंदा यशस्वी झाली. पहिल्याच प्रयत्नात ही मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. त्यामुळे जगभरातून भारताचे कौतुक झाले. केवळ या मोहिमेवरच न थांबता भारताने रॉकेट, उपग्रह अंतराळात सोडण्याबरोबरच तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत मोठी बाजी मारली.
भारत हा यापूर्वी अंतराळ मोहिमांसाठी अमेरिका, रशिया, फ्रान्सवर अवलंबून होता. त्यामुळे भारताने या मोहिमांसाठी स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रारंभ केला. या संशोधनाला २०१४ मध्ये मोठे यश मिळाले. आंतरध्रुवीय मोहीम, क्रायोजनिक इंजिनची चाचणी, अवजड रॉकेटची चाचणी आदी तांत्रिक आघाड्यांवर इस्रेने कमाल केली. भविष्यात भारतातर्फे मानवी मोहीम राबवण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी दिली.
भारताने भावी अंतराळ मोहिमांसाठी मानवी कुपी तयार केली आहे. या कुपीमध्ये दोन ते तीन अंतराळवीरांची राहण्याची सोय आहे. या कुपीच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. तसेच क्रायोजेनिक इंजिनविरहित रॉकेटची चाचणीही झाली.
0
केरळमध्ये ३० ख्रिश्चन नागरिकांचे धर्मांतर

अलापुझा – देशात धर्मांतराच्या मुद्यावरुन कलह सुरु असताना विश्व हिंदू परिषदेकडून मात्र ‘घर वापसी’ मोहिम सुरुच आहे. विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित कार्यक्रमात केरळमधील चेनगन्नूर येथे आठ कुंटुंबातील ३० ख्रिश्चन नागरिकांनी रविवारी धर्मांतर केले. चेप्पाडमधील कनिचनल्लोर येथील देवळात हा सोहळा पार पडला.
ज्या कुटुंबातील नागरिकांचे धर्मांतर करण्यात आले ते या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जबरदस्तीने अथवा आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन त्यांचे धर्मांतर केले नसल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेचे चेनगन्नू भागाचे अध्यक्ष प्रताप जी. पडिकल यांनी केला आहे.
तसेच या भागातील १५० कुटुंबांना हिंदू धर्मात समाविष्ट व्हायचे आहे. येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागांत ‘घर वापसी’ चा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे पड्डीकल म्हणाले.
0
आयसीसी २०१५ विश्वचषक अॅम्बेसिडरपदी सचिन तेंडुलकर

दुबई – भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची आयसीसी २०१५ विश्वचषकासाठी अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी ही घोषणा केली. आयसीसीच्या सर्वात मोठ्या स्पर्धेचा अॅम्बेसिडर होण्याची सचिनची ही दुसरी वेळ आहे. याआधी २०११ मध्ये झालेल्या विश्वचषकातही तो आयसीसीचा अॅम्बेसिडर होता. मात्र त्यावेळी तो क्रिकेटमध्ये सक्रिय होता. यावेळी सचिन माजी क्रिकेटपटू म्हणून ही भूमिका बजावणार आहे.
अॅम्बेसिडरपदी निवड झालेला सचिन आयसीसीने हाती घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा प्रचार करणार आहे. येत्या १४ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्चचषक स्पर्धा होणार आहे.
आयसीसीने विश्वचषकाच्या अॅम्बेसिडरपदी दुस-यांदा निवड केल्याबद्दल मी खूप आनंदित आहे. सहा वेळा विश्चचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर यावेळची स्पर्धा काही वेगळीच असणार आहे. कारण यावेळी मैदानाच्या बाहेर राहून मी या स्पर्धेचा आनंद घेणार आहे. विश्वचषक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. २०११ मध्ये सुमारे २२ वर्षानंतर विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले,असे सचिनने यावेळी सांगितले.२०१३ मध्ये सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने २०० कसोटी, ४३६ एकदिवसीय आणि एका टी२०मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये ३४ हजार ३५७ धावा केल्या आणि १०० शतके साकारली.
0
बोगस विद्यापीठाचा पर्दाफाश

नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नता असल्याचे भासवत योग नॅचरोपॅथीचे दुकान मांडणाऱ्या बोगस विद्यापीठाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दशकभरापासून नाशिकरोडला बेमालूमपणे सुरू असणाऱ्या या विद्यापीठाच्या कारभाऱ्यांनी हजारो स्वप्नाळू तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून इंडियन युनिव्हर्सिटी ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स अन्ड रिसर्च सेंटर या विद्यापीठाच्या नावाने योगा आणि नॅचरोपॅथीचे अभ्यासक्रम चालविले जात आहेत. नाशिकरोड येथील त्र्यंबक कॉम्प्लेक्समध्ये या विद्यापीठाचे कार्यालय होते. येथील अभ्याक्रमांना शासनाची तसेच, आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता असल्याचे सांगून, विद्यार्थ्याचा विश्वास संपादन केला जात होता. त्यामुळे विद्यार्थीही तेथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत होते. विद्यापीठ तसेच, भारतीय पारंपरिक चिकित्सा योग नॅचरोपॅथी कॉलेजकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतरही गुपचिळी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे या विद्यापीठाचे कारनामे आजवर उघडकीस आले नव्हते. मात्र, ही फसवणूक काही जणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोग्य विद्यापीठाशी पत्रव्यहार करून संबंधित महाविद्यालयाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला होता. या संस्थेशी आमचा कोणताही संबंध नसल्याची भूमिका आरोग्य विद्यापीठाने संबंधित पत्रव्यवहारकर्ते यांच्याकडे स्पष्ट केली. या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. या संस्थेविषयी विद्यापीठाने घेतलेल्या अलिप्तपणाच्या भूमिकेनंतर पोलिसांनी संबंधित बोगस विद्यापीठ आणि महाविद्यालयाची माहिती घेतली. मान्यता नसतानाही योग अभ्यासाचे शिक्षण देणारे महाविद्यालय आठ ते दहा वर्षांपासून चालविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
बालसुधारगृहातून मुले पळाली

येरवडा – येरवडा येथील जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून (बालसुधारगृह) २ डिसेंबर रोजी पाच मुले पळून जाण्याची घटना ताजी असतानाच शनिवारी (२०डिसेंबर) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास व्यायाम खोलीतून पुन्हा एकदा पाच मुले पळून गेली. त्यातील एकाला केअर टेकरने पाठलाग करून पकडले; तर चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. बालसुधारगृहातून मुले पळून जाण्याची चालू वर्षातील ही चौथी घटना आहे.
विविध गुन्ह्यातील अल्पयवीन मुले सातत्याने पळून जाण्याच्या घटना घडूनही केंद्र सरकारकडून सुरक्षेसाठी कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. केंद्रातून पळून गेलेल्या मुलांपैकी तीन मुले ही पुण्यातील असून एक जण पनवेलचा आहे. मुले पळून गेली ती त्या दिवशी शनिवारी केंद्रावर नऊ केअर टेकर, तीन परीविक्षा अधिकारी, एक समुपदेशक आणि २७ मुले केंद्रात होती. डिसेंबर महिन्याच्या दोन तारखेला पाणी भरण्याचे निमित्त साधून रात्री साडे अकरा वाजच्या सुमारास सहा मुले सीमा भिंतीवरून उडी मारून पळून गेली होते. एकाच्या पायाला उडी मारल्यामुळे दुखापत झाल्याने त्याला केंद्रातील केअर टेकरने पकडले होते. पाच दिवसानंतर त्यातील तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिखली येथे पकडले; तर पंधरा दिवसांनी एकाला सोलापूर जिल्ह्यात पकडले होते. पळून गेलेल्यांपैकी अजूनही एक मुलगा पोलिसांना शोधता आलेला नाही.
शनिवारीही नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता ड्युटीवर असणारे केअरटेकर केंद्रातील काही मुलांना व्यायाम करण्यासाठी व्यायाम खोलीत घेऊन गेले. मुले खोलीत गेल्यावर केअर टेकरने दरवाजाला कडी लावून ते खोलीच्या मागे अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गेले. काही वेळातच पाच मुले व्यायाम खोलीच्या मुख्य प्रवेश दराने पळू लागली. हे पाहून तेथील महिलांनी आरडाओरडा केला असता एका मुलाला पाठलाग करून पकडले; मात्र त्यातील चार जण पळून गेले. चार मुलांची विविध ठिकाणी आणि त्यांच्या घरी शोध घेऊन सुद्धा सापडली नसल्याने रात्री पोलिसांकडे मुले हरविल्याची तक्रार दिली.
0
मोबाइलने घेतला तरुणाचा बळी

बुंदी (राजस्थान) – चार्जिंगला लावलेला मोबाइल तुम्ही तसाच उचलून कधी कानाला लावलाय? कधी-ना-कधी किंवा अनेकवेळा तुम्ही तो लावला असेल… यापैकी काहीही करत असाल तर सावधान! कारण त्यात तुमचा जीवही जाऊ शकतो.
चार्जिंगला लावलेल्या अशाच एका मोबाइलने राजस्थानमधील एका गावात २४ वर्षीय तरुणाचा बळी घेतलाय. राजूलाल गुर्जर असं या तरुणाचं नाव आहे. मोबाइल चार्जिंगला लावलेला असतानाच त्याला एक कॉल आला. कॉल येताच राजूलालने चार्जिंग सुरू असतानाच तो कानाला लावला. मोबाइलवर त्याचं बोलणं चालू असतानाच अचानक मोबाइलमधील बॅटरीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की राजूलाल छाती आणि हात भाजून निघाले. तो तिथेच बेशुद्ध झाला. त्याच अवस्थेत त्याला जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विजेचा तीव्र धक्का आणि भाजल्यामुळं राजूलालचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे.
0
१० वर्षाच्या मुलाची आत्महत्या

पुणे – जर्किनचा हट्ट न पुरवल्याने एका १० वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. घरात कुणीही नसताना या मुलाने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत स्वत:चे जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.
आदित्य पिसाळ असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. धनकवडी परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक सुनील पिसाळ यांचा तो मुलगा होता. सुनील यांच्या बहिणीचा रविवारी वाढदिवस होता. त्यासाठी हॉटेलमध्ये ठेवलेल्या पार्टीला घरातील सगळेच जाणार होते. यावेळी आदित्यने आईकडे जर्किनसाठी हट्ट धरला. मला आत्ताच्या आत्ता जर्किन हवे नाहीतर मी तुमच्यासोबत येणार नाही, असे त्याने सांगितले. त्यावर आता तुला स्वेटर घेऊ, असे सांगून आईने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदित्यने जर्किनचा हट्ट काही सोडला नाही. आईवर तो रागावलाही. आदित्य काही केल्या ऐकत नसल्याने शेवटी त्याला एकटेच घरी ठेऊन बाकी सगळेजण हॉटेलमध्ये गेले. त्याचवेळी आदित्यने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. रात्री सव्वा दहाच्या सुमारास कॉम्प्युटरच्या टेबलवर उभे राहून त्याने पंख्याला ओढणी बांधली आणि ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अवघ्या १० वर्षाच्या मुलाने आत्महत्या करण्याची ही घटना सर्वांनाच धक्का दोणारी असून मुलांच्या हट्टीपणाचा मुद्दा अधिकच गडद बनला आहे.










