पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 26th, 2014

बॉम्बशोधक पथकाकडून अरूणावती नदीपात्राची पाहणी 0

बॉम्बशोधक पथकाकडून अरूणावती नदीपात्राची पाहणी

IMG-20141226-WA0028-1
यवतमाळ – सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पितापुत्राला अरूणावती नदी पात्रात एका पेटीत हॅँन्ड ग्रेनेड व काडतूस आढळून आल्याची खळबळजनक घटना काल दुपारी १.३० वाजता दरम्यान उघडकीस आली होती. आज बॉम्ब शोधक पथकाकडून अरुणावती नदीपात्राची पाहणी करण्यात आली. हे घातक साहित्य ४० वर्षापूर्वीचे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.
जिल्ह्यात खळबळ उडवून देणाºया या घटनेत स्फोटक साठा कुणाचा असावा असावा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या प्रकरणी अफसर खान इसाक खान रा. आर्णी याने पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी कलम २८६. भा,द,वी, नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे स्फोटक पदार्थ नदीच्या पात्रात कुणी आणि केव्हा फेकला असावा, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. ३ हॅँन्ड ग्रनेड व २३ जिवंत काडतूस यावर १९६२ सालीच्या खुना आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. तपासाणी करिता आर्णी पोलिसांनी न्यायालयाला परवानगी मागितली असून, त्यानंतर स्फोटक साहित्य कुठून आले आणि कुणी टाकले याची उकल होणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, ठाणेदार हनुमंत गायकवाड, तपासधिकारी पीएसआय राजकिरण मडावी, कैलास निबर्ते व बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. आर्णी तालुका नक्षलग्रस्त असल्याने पोलीस या प्रकरणाचा तपास बारकाईने करीत आहे.

December 26, 2014 in मुख्य पान
वीज पुरवठा खंडीत केल्याने शेतकºयाने घेतले विष 0

वीज पुरवठा खंडीत केल्याने शेतकºयाने घेतले विष

images
यवतमाळ – थकीत विज बिल वसुलीसाठी आलेल्या पथकाने विद्युत पुरवठा खंडीत करताच शेतकºयाने विष घेऊन पथकाच्या वाहनाचा पाठलाग केल्याची घटना आज शुक्रवारी दुपार दरम्यान घडली. कैलास नागोराव भोयर (२८) रा. सातेफळ असे विष प्राशन केलेल्या शेतकºयाचे नाव असून त्याच्याकडे वडीलोपार्जीत तीन एकर शेती आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी नापिकी झाली असून शेतकरी हतबल झाला आहे. खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर आता शेतकºयाची मदार रब्बी हंगामावर आहे. त्यातच विज वितरणच्या वतीने भारनियम व वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने पिकाला पाणी देणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकºयाना रात्रीच्यावेळी शेतात पिकाला पाणी द्यावे लागते. तर दुसरीकडे महाराष्टÑ राज्य विज वितरण कंपनीकडून शेतकºयासह नागरिकांकडील कृषी पंप व घरगुती विज बिलाची सक्तीने वसुली सुरू केली आहे. दरम्यान आज लोणी येथील विज वितरण कंपनीच्या अधिकाºयांचे पथक सातेफळ येथे आले होते. या पथकाने ज्या नागरिकांकडे थकीत बिल आहे. त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करणे सुरू केले. आज दुपारी सदर पथक कैलास भोयर या शेतकºयाच्या घरीही धडकले. थकबाकी जमा करा नाही तर विद्युत पुरवठा खंडीत करणार असा दम अधिकाºयांनी या शेतकºयाला दिला. यावेळी शेतकºयाने साहेब, यावर्षी नापिकी झाल्याने पैसे नसून काही वेळ देऊन हप्ता पाडून द्या, आर्त विनवणी केली. मात्र अधिकाºयाने काहीही न ऐकता बिलाचे पैसे न दिल्याने खांबावर चढून वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे अगतिक झालेल्या शेतकºयाने घरात जाऊन विषारी औषध प्राशन करून विज कंपनीच्या पथकाच्या वाहनामागे धावत सुटला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईक व नागरिकांनी या पथकाचे वाहन थांबवून सदर शेतकºयाला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याना यवतमाळ येथील कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेने गावकºयांनी विज वितरण कंपनीच्या अधिकाºयाप्रती रोष व्यक्त केला. विज वितरण कडून सुरू असलेली सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी सरपंच प्रमोद वाघ, उपसरपंच रविंद्र राऊत, वैभव ठाकरे यांच्यासह गावकºयांनी केली आहे.

 

December 26, 2014 in मुख्य पान
कापूस जिनिंगला आग, २५ लाखाचे नुकसान 0

कापूस जिनिंगला आग, २५ लाखाचे नुकसान

download
वणी, दि़२६ – येथील निळापूर मार्गावर असलेल्या वैभव कोटेक्स या कापूस जिनींगला आग लागल्याची घटना काल रात्री घडली. या आगीत २५ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
निळापूर मार्गावरील या जिनमध्ये सायंकाळच्या सुमारास जिनींग प्रेसींगचे काम सुरु असतांना अचानक रेचामधून आग लागली. यावेळी नगर परिषदच्या अग्निशमन दलाला पाचारण करून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये १५० गाठी जळाल्या असून २५ लाखाचे नुकसान झाले आहे.

December 26, 2014 in मुख्य पान
शेतकरी पुत्र सीनिअर व्हाइस प्रेसिडेंटपदी 0

शेतकरी पुत्र सीनिअर व्हाइस प्रेसिडेंटपदी

toyota
कोल्हापूर – कबनूर येथील राजू भाऊसो केटकाळे यांची टोयोटो किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेडच्या सीनिअर व्हाइस प्रेसिडेंटपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या जानेवारीपासून ते या पदाची सूत्रे स्वीकारतील. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या केटकाळे यांनी करिअरसाठी धडपडणाऱ्या युवकांसाठी एक प्रेरक उदाहरण यानिमित्ताने घालून दिले आहे.
कबनूर येथील भाऊसो केटकाळे हे अल्पभूधारक शेतकरी. ते साखर कारखान्यात काम करीत. त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी जात असताना तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजू केटकाळे यांना इंजीनिअर होण्याचा सल्ला देत. त्यातूनच केटकाळे यांच्यात शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली. ते गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिकले. शाळकरी वयात शेतीचे कामे करत कुटुंबाला हातभार लावणाऱ्या केटकाळे यांना जिद्दीमुळे दहावी परिक्षेत चांगले मार्क्स मिळाले. त्यांनी नंतर मित्रांच्या सल्ल्याने विवेकानंद कॉलेजमध्ये शास्त्र शाखेसाठी प्रवेश घेतला. यानंतर एमईपर्यंतचे शिक्षण कराड गर्व्हर्न्मेंट कॉलेजमधून झाले. शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज अनेकदा छोटीमोठी कामे करुन करत असताना काही नातेवाईकांनीही त्यांना हातभार लावला.
केटकाळे यांचे शिक्षण एमई (मशीन डिझाइन)पर्यंत झाले आहे. १९९२ साली त्यांनी एमईनंतर त्यांनी पुण्यातील किर्लोस्कर ऑईल इंजिनमधून नोकरीस सुरवात केली. कुठलेही काम अगदी मनापासून करण्याची सवय असणाऱ्या केटकाळे यांच्याकडे साहजिकच व्यवस्थापनाचे लक्ष गेले. कंपनीने १९९८ साली त्यांना असिस्टंट मॅनेंजर ऑफ प्लँट या पदावर संधी दिली. यानंतर कंपनीतील विविध पदे भूषवल्यानंतर त्यांच्यावर २००७ साली थायलंड येथील नवीन प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. थायलंडच्या प्रकल्पाची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या केटकाळे यांना भारतातील दुसऱ्या उत्पादन युनिटच्या निमित्ताने भारतात परत बोलवण्यात आले. २०१२ पासून त्यांच्यावर व्हाइस प्रेसिंडेंडपदाची जबाबदारी देण्यात आली. डिझायनिंग, कॉस्ट कटिंग आणि कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन यामध्ये केटकाळे यांचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर गाजले आहे. कंपनीने त्यांची आता सीनिअर व्हाइस प्रेसिडेंटपदावर निवड केली आहे.

 

December 26, 2014 in मुख्य पान
महानायक अमिताभ बच्चन यांना यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्कार 0

महानायक अमिताभ बच्चन यांना यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्कार

biggb
मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांना यंदाच्या यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत झालेल्या एका शानदार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी अमिताभ यांना हा पुरस्कार प्रदान केला.
दहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह व सुवर्ण कडे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्यावर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. अमिताभ यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर राज्यपालांनी मुक्तकंठाने बच्चन यांचे कौतुक केले. ‘केवळ उत्कृष्ट अभिनयाकरिता लोक अमिताभ बच्चन यांना मानत नाहीत; तर त्यासोबतच अमिताभ यांचे वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातील आचरण, लोकांप्रती त्यांच्या मनात असलेला आदरभाव, त्यांची सामाजिक बांधिलकी व नम्र स्वभाव या गुणांमुळेच ते लोकप्रिय आहेत. चारित्र्य, संस्कृती व गुणवत्तेमुळे अमिताभ बच्चन यांनी करोडो लोकांची मने जिंकली आहेत, असे उद्गार राज्यपालांनी काढले.
या सोहळ्याला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार वेणुगोपाल धूत, सुब्बरामी रेड्डी, जयाप्रदा, पामेला यश चोप्रा, सिमी गरेवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

December 26, 2014 in मुख्य पान
पालकमंत्र्यांची यादी जाहीर 0

पालकमंत्र्यांची यादी जाहीर

download (1)
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील जिल्हावार पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली.
मुंबई शहर – सुभाष देसाई , मुंबई उपनगर – विनोद तावडे, ठाणे – एकनाथ शिंदे, पालघर – विष्णू सवराm, रायगड – प्रकाश मेहता, रत्नागिरी – रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग – दीपक केसरकर, सांगली, कोल्हापूर – चंद्रकांत पाटील, जळगाव, बुलडाणा – एकनाथ खडसे, बीड,लातूर – पंकजा मुंडे-पालवे, औरंगाबाद – रामदास कदम , पुणे – गिरीष बापट, परभणी, नांदेड – दिवाकर रावते , अहमदनगर – राम शिंदे, धुळे – दादा भुसे, अकोला, वाशिम – रणजित पाटील , नाशिक, नंदूरबार – गिरीश महाजन , सातारा – विजय शिवतारे , सोलापूर – विजय देशमुख , अमरावती – प्रवीण पोटे, वर्धा – सुधीर मुनगंटीवार, गोंदिया – राजकुमार बडोले , यवतमाळ – संजय राठोड, नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा, उस्मानाबाद – दीपक सावंत, गडचिरोली – राजे अंबरिशराव अत्राम, जालना – बबन लोणीकर , हिंगोली – दिलीप कांबळे

December 26, 2014 in मुख्य पान
होय, मी प्रेमात पडली – कंगना 0

होय, मी प्रेमात पडली – कंगना

Kangna Ranaut at website launch
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या प्रेमात पडली आहे. स्वत: कंगनाने एका मुलाखतीमध्ये आपण प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.
प्रेमाचे नाते फार नाटयमय असते. तुम्ही त्यात हसता-रडता. पण चांगले नाते तुम्हाला अधिक सशक्त बनवते असे कंगना म्हणाली. प्रेमात पडल्यावर सर्वसामान्य प्रियकर-प्रेयसीची जी अवस्था होते तशीच अवस्था सध्या कंगनाची झाली आहे.
कंगनाला प्रियकराचे नाव विचारले असता ती म्हणाली की, सध्या मी प्रेमात आहे. जोडीदार मिळाल्याचा मला आनंद आहे. या नात्यातील भावनात्मकतेचा मी आनंद घेत आहे. माझ्यासाठी हे नाते खास आहे. या क्षणाला सर्व उघड करणे योग्य ठरणार नाही. तो समोरच्यावर अन्याय ठरेल. नातेसंबंध निभवणे असेही कठीण असते नाही का? असे उत्तर कंगनाने दिले.

पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ठार 0

पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ठार

peshawar-2
पेशावर – पाकिस्तानातील पेशावर येथील लष्करी शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सद्दाम पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत ठार झाला.
गुरुवारी पाकिस्तानी सैन्याने जमरूडमधील गुंडी भागात केलेल्या कारवाईत सद्दाम ठार झाला. यावेळी त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आल्याचे खैबर एजन्सीचे पेशावर राजकीय प्रतिनिधी शाहव अली शाह यांनी सांगितले.
तेहरीक ए-तालिबान संघनेच्या तारिक गेदार समूहाचा तो सदस्य होता. पेशावरमधील लष्करी शाळेतील हल्ल्यामागचा तो मुख्य सूत्रधार होता. १६ डिसेंबर रोजी पेशावरमधील शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १५० ठार झाले होते. यामध्ये अधिकतर लहान मुले समावेश होता.
याआधी गेल्यावर्षी खैबर पख्तुनवाला भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारही सद्दाम होता. या हल्ल्यात ११ सुरक्षा रक्षक ठार झाले होते.

December 26, 2014 in मुख्य पान
संजय दत्तला वारंवार मिळणा-या सुट्टीची चौकशी 0

संजय दत्तला वारंवार मिळणा-या सुट्टीची चौकशी

download (2)
मुंबई- बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता संजय दत्तला वारंवार मिळणा-या संचित रजेची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबईत १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झालेल्या संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणा-या संजय दत्तला प्रथम वैद्यकीय कारणामुळे ऑक्टोबर २०१३मध्ये २८ दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर पत्नी आजारी असल्याने त्याला डिसेंबर २००१३मध्ये पुन्हा २८ दिवसांची रजा मिळाली होती. त्यानंतर जानेवारी २०१४मध्ये त्याला २८ दिवसांची आणखी रजा वाढवून देण्यात आली.
त्यानंतर आता बुधवारी(२४ डिसेंबर) पुन्हा त्याला १४ दिवसांची रजा मंजूर झाली आहे. संजय दत्तला मिळणा-या वारंवार सुट्टीमुळे टीका होत आहे. विशेष म्हणजे याआधी या प्रकरणी खुद्द न्यायालयाने सरकारला जाब विचारला होता.

December 26, 2014 in मुख्य पान
3 लाखची देशी दारू जप्त 0

3 लाखची देशी दारू जप्त

unnamed
यवतमाळ –  राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुप्त माहितीवरून सावरगाव-चिंचोली रोडवर सापळा रचून टाकलेल्या धाडीत गोवा संत्रा ब्रॅंडच्या देशी दारूच्या 480 बॅाटल्स जप्त केल्या. जप्त मद्देमालाची एकून किंमत 3 लाख 15 हजार इतकी आहे. या कार्यवाहीत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून यवतमाळच्या भरारी पथकाने ही कार्यवाही केली. MH-32/C-342 या क्रमांकाच्या टाटा सुमोमध्ये सदर देशी दारू असल्याचे कळल्यानंतर सापळा रचून या वाहनासह 480 बॅाटल्स जप्त करण्यात आल्या. तसेच तीन आरोपी निलेश बाबाराव रूपवणे, अंबादास सुकानंद कांबळे, दिनेश भाऊराव शिवरकर यांना अटक करण्यात आली. ही कार्यवाही अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ भरारी पथकाचे दुय्यम निरिक्षक उमेश शिरभाते, एम.पी.चिटमटवार, एन.के.सुर्वे तसेच जवान शंकर घाटे, महेंद्र रामटेके, ए.ए.पठाण, एम.पी.शेंडे, एन.डी.दहेलकर, एस.एस.दुधे, निलेश मानकर, नितीन कुळसंगे, बी.सी.मेश्राम, सी.डी.चिद्दरवार, यांनी केली. नवीन वर्ष साजरे करतांना कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून 31 डिसेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत
असून त्याअंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे. पुढेही ही कार्यवाही सुरू राहणार आहे. अवैध मद्यविक्रीसह गैरकायदेशिर मार्गाने होणारी मद्यविक्रीवर विशेष भरारी पथकाचे लक्ष राहणार आहे. त्यासाठी विशेष पथखे नववर्षाचे स्वागत करतांना मोठ्या प्रमाणावर मद्यसेवेन केले जाते. त्याअनुषंगाने एकदिवशीय मद्यपरवाने
मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजार एकदिवशीय मद्य परवाने देण्यात आले आहे.

December 26, 2014 in विदर्भ
महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी - राहुल रंजन महिवाल 0

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी – राहुल रंजन महिवाल

images (1)
यवतमाळ –  महसूल विभागाच्यावतीने दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षीसुध्दा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु जिल्ह्यात दुष्काळीस्थिती असल्याने सदर स्पर्धांचे आयोजन न करता या स्पर्धांवर होणारा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले. यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिण्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे व फळ पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मान्सून शेतकऱ्यांच्या आशा पुर्ण करतील असे वाटत असतांना अपुऱ्या मान्सूनने सुध्दा शेतकऱ्यांना दगा दिला. गारपीट, अपुरा पाऊस आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या निराश झाले आहे. यावर्षी 250 शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्या झाल्या आहे. अशा परिस्थितीत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेणे उचीत ठरणार नाही शिवाय शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने सदर स्पर्धा घेण्यात येणार नाही. या स्पर्धासाठी जमा होणारा निधी जिल्ह्यात उद्भवलेल्या टंचाई व दुष्काळीस्थितीसाठी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येणार आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. अंदाजे पाच लाख रूपये निधी होण्याची शक्यता आहे. इतर नागरी, व्यावसाईकांनी सुध्दा मुख्यमंत्री सहायत निधीसाठी आपले योगदान द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 

December 26, 2014 in विदर्भ
लाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात 0

लाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात

kapus lalya
नागपूर – अस्मानी संकटामुळे यावर्षी शेतकरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला पावसाची झालेली दिरंगाई व त्यानंतर दुबार तिबार पेरणी करून शेतकरी कसाबसा सावरत असताना सोयाबीनवर आलेल्या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीन जाग्यावरच करपली. त्यामुळे शेतकºयांना शेतात राहिलेली थोडीफार सोयाबीन कापणे मजुरीस परवडणारे नव्हते. त्यामुळे ती तशीच शेतातच राहू द्यावी लागली. सोयाबीननंतर मिरचीवर गेलेल्या बोकड्या रोगानेही शेतकºयांना चिंतेत टाकले आहे. तर विदर्भात मोठ्या प्रमाणात घेत असलेल्या कपाशीवर लाल्या रोग गेल्याने होणारे उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. यामुळे महत्वाच्या सोयाबीन, मिरची व कपाशीवर रोग गेल्याने विदर्भातील शेतकरी संकटात सापडला आहे.
कपाशीवर नायट्रोजन, पोटॅशियम व मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे लाल्या जातो. तसेच दहिया (ग्रे मिल्ड्यू) या रोगामुळे कपाशीवर लाल्या गेला की कपाशीची वाढ खुंटते व त्यामुळे कपाशीच्या झाडावर असलेले बोंडे पक्व न होताच फुटत असल्याने शेतकºयांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांनी वेळीच लाल्या या रोगाचे नियंत्रण केल्यास अधिक उत्पादन मिळणे शक्य आहे. परंतु शेतकरी व कृषी विभागाची अद्याप नाळच जुळली नसल्याने शेतकºयांना कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन किंवा मदत मिळत नाही. त्यामुळे कृषी विभाग पांढरा हत्ती ठरला आहे. शेतकºयांपर्यंत आधुनिक माहिती व तंत्रज्ञान पोहोचविण्यात प्रशासकीय यंत्रणेचा अभाव असल्याचे सातत्याने दिसून येते. परंतु याकडे सत्ताधाºयांचे लक्ष नाही. सोयाबीन, मिरची व कपाशी तसेच धानावर कीटकनाशकांसोबत अ‍ॅप्सा-८० हे बहुउद्देशीय स्पे्र गुणवर्धक वापरल्याने चांगले परिणाम दिसून आले आहे. कीटकनाशकासोबत अ‍ॅप्साचा उपयोग केल्याने पिकांचे रोेगांपासून परिणामकारक संरक्षण मिळाले आहे. कारंजा घाडगे तालुक्यातील पारडी येथील राजेंद्र चरडे यांच्या शेतातील कपाशी ही अद्याप हिरवीगार असून बाजुच्याच लक्ष्मण टिपले यांच्या शेतातील कपाशीचे पाने लाल्याने सुकले आहेत.
राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे विदर्भातील शेतीवर निसर्गावर अवलंबून आहे. नेहमीच्या नापिकीने त्यांना शेतात अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करून आधुनिक शेतीचा ते विचारही करू शकत नाही. सिंचनाच्या सुविधा नसल्याने विदर्भातील शेतकºयांना नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे हतबल होत अनेकांना टोकाचा निर्णय घेत आत्महत्या करावी लागते. परंतु आता केंद्रातील व राज्यातील सरकार बदलल्याने विदर्भातील शेतकºयांना चांगले दिवस येण्याची आशा आहे. विदर्भातील शेतकरी सुखी व समृद्ध होण्यासाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्यासोबतच आधुनिकतेशी शेतीला जुळण्याची गरज आहे. विदर्भातील शेतकरी हजारो वर्षांपासून करीत असलेली शेतीच्या ज्ञानाचा उपयोग करीत अधिक उत्पादन घेण्याचा आटापिटा करीत आहे. पिकांमध्येही फेरफार करणे किंवा विविध प्रयोग करीत आधुनिक शेतीचा विचार करणारे फारच अल्प शेतकरी असल्याने दिवसेंदिवस रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वाढत असलेल्या किंमती व वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने तसेच तरुणाई शेतीत राबण्यास तयार नसल्याने विदर्भातील शेतीच संकटात सापडली आहे. युती सरकार धडक सिंचन कार्यक्रम राबवित असून विदर्भातील ८३,२०० विहिरींच्या बांधकामांचे उद्दिष्ट पार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जवाहर विहीर योजना राबविण्यात येत आहे. परंतु यासाठी प्रशासकीय यंत्रणा कितपत सक्रिय होते, हे बघावे लागणार आहे.

December 26, 2014 in मुख्य पान
शिवाजी महाराज-शाहू-फुले यांनाही भारतरत्न द्या! 0

शिवाजी महाराज-शाहू-फुले यांनाही भारतरत्न द्या!

download (3)
ठाणे- केंद्र सरकारने नुकताच ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे, मात्र अद्याप शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि फुले दाम्पत्याला या किताबाने सन्मानित करण्यात आलेले नाही. याची कारणे काय? असा सवाल करून शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संमेलनात या संदर्भात ठराव मांडून तो राष्ट्रपतींना पाठवण्यात येईल, अशी माहिती रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली.
देशातील पहिले सर्वसमावेशक राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आपल्या राजपदाचा वापर करणारे शाहू महाराज आणि देशात सर्वप्रथम मुलींसाठी शाळा सुरू करून सामाजिक समतेसाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे ख-या अर्थाने ‘भारतरत्न’ किताबासाठी योग्य आहेत, मात्र भाजपा सरकारने या चारही महनीय व्यक्तींकडे दुर्लक्ष केले आहे. ही बाब देशातील पुरोगामी चळवळीत काम करणा-यांना रुचलेली नाही. त्यामुळे या चारही महापुरुषांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी एका ठरावाद्वारे करण्यात येणार आहे, असे इंदिसे यांनी सांगितले.

 

December 26, 2014 in मुख्य पान
एक कप चहा २० हजारात 0

एक कप चहा २० हजारात

download (4)
नवी दिल्ली -पक्षनिधीसाठी वाढवण्यासाठी डिनर, लंच पार्टी सारखे नवनवे फंडे वापरणा-या आम आदमी पक्षाकडून आता चहा पार्टीचे आयोजन केले जात आहे.
‘टी विथ केजरीवाल’ नावाने हा आयोजित केला जाणार आहे. मात्र या कार्यक्रमातील ‘आप’चा चहा हा काही साधासुधा नसून या चहाच्या एका कपसाठी तुम्हाला तब्बल २० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनिधी गोळा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचा खर्च २० हजार रुपये इतका आहे असे भारती यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पक्षनिधी वाढवण्यासाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळूरू येथे आपकडून डिनर पार्टीचे आयोजन केले होते. केजरीवालांच्या डिनर पार्टीत जेवणाच्या एका प्लेटची किंमत २० हजार रुपये इतकी ठेवण्यात आली होती.

December 26, 2014 in रोजगार
इंडियन मुजाहिदीनची राजस्थानमध्ये बाँबस्फोट घडवण्याची धमकी 0

इंडियन मुजाहिदीनची राजस्थानमध्ये बाँबस्फोट घडवण्याची धमकी

download (5)
जयपूर, दि. २६ – राजस्थानमध्ये २६ जानेवारी रोजी बाँबस्फोट घडवण्याची धमकी राज्याच्या १६ मंत्र्यांच्या अधिकृत ई-मेलवर इंडियन मुजाहिदीनने दिल्याचे वृत्त आहे. राजस्थान सरकारने या वृत्तास दुजोरा दिला असून हा मेल कोणी पाठवला, ही खरीच धमकी आहे का कुणाची चेष्टा आहे आदी बाबींचा तपास करण्यात येत आहे. इंडियन मुजाहिदीन ही बंदी घातलेली व दहशतवादी घोषित केलेली संघटना असून पाकिस्तानच्या लष्कर ए तय्यब्बा या दहशतवादी संघटनेच्या इशा-यावर भारतात घातपाती कारवाया करते असे आढळले आहे. भारतात झालेल्या अनेक दहशवादी घटनांमध्ये मुजाहिदीनचा हात असल्याचे आढळले असल्याने या ई-मेलचा गंभीरपणे माग घेण्यात येत आहे.
अर्थात, राजस्थानमध्ये पोलीस व सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. बारतामध्ये इस्लामिक राजवट आणून शरीया कायदा लागू करण्याची इंडियन मुजाहिदीनची महत्त्वाकांक्षा असल्याचे सांगण्यात येते.

December 26, 2014 in मुख्य पान
रघुवर दास झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री 0

रघुवर दास झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री

download (6)
रांची, दि. २६ – झारखंडमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपाने रघुवर दास यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. थोडयाच वेळात यासंबंधी औपचारिक घोषणा करण्यात येईल.दास यांच्या रुपाने बिगर आदिवासी चेह-याला प्रथमच मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत आहे. शुक्रवारी भाजपा निरीक्षक जे.पी. नड्डा आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून दास यांच्या नावाला सहमती दर्शवली. येत्या सोमवारी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान झारखंडला आता भ्रष्टाचार मुक्त सरकार मिळेल, अशी प्रतिक्रिया दास यांनी व्यक्त केली. राज्यातील सर्व घटकांचा विकासात समावेश केला जाईल तसेच अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले रघुवर दास यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्रीपद भूषवले असून पक्षाचे उपाध्यक्षही होते. एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या दास यांचे वडील टाटा स्टीलमध्ये कामगार होते. १९८० साली दास यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १९९५ साली ते पहिल्यांदा आमदार बनले.

December 26, 2014 in मुख्य पान