
यवतमाळ , दि. १४ (प्रतिनिधी) – दोन दिवसाच्या ढगाळी वातावरणानंतर आज रविवारी सायंकाळी ८ वाजता दरम्यान शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पाऊस राज्याच्या विविध भागात हजेरी लावत आहे.अवकाळी पाऊस व काही ठिकाणी झालेल्या गारपीटीमुळे वातावरणात गारवा पसरला होता. ढगाळी वातावरणानंतर सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते.
Archive for December 14th, 2014
0
यवतमाळात पावसाच्या सरी
0
विद्यार्थ्यांच्या पैशावर शिक्षकांची मौजमस्ती, सहलीच्या नावावर विद्यार्थ्यांची पिळवणूक

यवतमाळ , दि. १४ (राहुल वासनिक )- शैक्षणिक सहल हा सहशालेय उपक्रमाचा महत्वपूर्ण भाग असून प्रत्येक शैक्षणिक वर्षात शैक्षणिक सहल आयोजित करणे गरजेचे आहे. हि शैक्षणिक सल नेतांना मामंडळाची बस, रक्त गट व शिक्षणाधिकाºयाचा परवाणा आवश्यक आहे. असे असताना खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षाणाधिकाºयाचा परवाना न घेतना शैक्षणिक सहलीचे आयोजन करून चक्क खाजगी वाहनामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना कोंबून नेण्याचा प्रकार चालविला असून सहलीत विद्यार्थ्यांच्या पैशावर मजा मारणाºया मुख्याध्यापक व शिक्षकांवर करडी नरज ठेवावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
मागील शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण विभागातून एकाही सहलीची परवानगी घेतली नसून आयोजन केले नाही. परंतु जिल्हा परिषदच्या प्राथमिक विभागाकडून जवळपासचया स्थळांना खाजगी गाड्यांनी विद्यार्थी कोंबून नेऊन शैक्षणिक सहलीचा आनंद लुटल्या गेला आहे. माध्यमिक विभागात सहल परवाना मागच्या सत्रात १४ शाळांनी घेतला. परंतू जवळपास शंभर शाळांनी खाजगी वाहनांनी शैक्षणिक सहली आटोल्या. विद्यार्थ्यांच्या पैशावर शिक्षकांनी मौजमजा केली आहे. बºयाच सहलीच्या विद्यार्थ्यांयाी संपर्क साधल्यावर तीनशे े चारशे किमीचे अंतर असतांना अक्षरक्ष: कोंबुन वाहनातून प्रवास करावा लागला. तर खाजगी होटलात थांबने, रात्रीच्यावेळी बिअरबार शोधने व असुरक्षित ठिकाणी ठेवणे असा प्रकारही झाल्याचे बोलल्या जात आहे.
गतवर्षी खाजगी गाड्याचे सहलीचे अपघात १६ झाले असून त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्राणही गमावले आहे. एक रायगड जिल्ह्यातील ही घटना तर अंगावर शहारे आणणारी होती. परंतू शासनाचा परवाणा नसल्याने त्याना कोणतीही सुरक्षा पुरविण्यात आली नाही. उलट मुख्याध्यापकांनीही हात वर केले. सध्या खाजगी गाड्याचा सिझन हा स्लॅक असून खाजगी वाहन चालकांनी भाड्यांसाठी शैक्षणिक सहलीचा नवा मार्ग अवलंबवीला आहे. तरी या प्रकारात पालक भरडल्या जात असून या खाजगी शैक्षणिक सहलीला आळा बसावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
0
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये साडेसहा हजार प्रकरणांचा निपटारा

यवतमाळ, दि. १४ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विविध विभागाशी संबंधीत ६४३९ प्रकरणे निकाली निघाली.
सदर लोकअदालत जिल्हा न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कामगार व औद्यागिक न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतमध्ये एकूण २२,१६८ प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये आपसी समझोत्याने भुसंपादन प्रकरणे, नगर परिषदेची कर अपिलाची प्रकरणे निगोशिएबल इस्टयुमेंट अॅक्टच्या कलम १३८ नुसार असलेले प्रकरणे, मोटार अपघात वाहन कायद्याची प्रकरणे, वैवाहिक वादांची प्रकरणे, बँकाची प्रकरणे, कामगार विवाद प्रकरणे, ग्राहक तक्रारी व दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे.
या लोकअदालतीत अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी अनेक पक्षकारांनी उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता. सदर लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यासाधिश, न्यायालीन कर्मचारी, वकील, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकअदालतीच्या पॅनलवरील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. अग्रवाल यांनी दिली.
0
टीईटी : नऊ हजार उमेदवारांनी दिली परीक्षा

यवतमाळ, दि. १४ (प्रतिनिधी)-प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकपदासाठी आवश्यक टीईटी पात्रता परीक्षा आज रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रावरून घेण्यात आली. यामध्ये नऊ हजार उमेदवारांनी ही परिक्षा दिली.
शिक्षण विभागात शिक्षकांची पदे रिक्त असून, यापुढे टीईटीच्या अग्निदिव्यातून जाणाºया उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी मागील वर्षी ही परीक्षा घेण्यात आली. त्यात अपेक्षेप्रमाणे खूप कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र रिक्त जागा भरण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी चक्क सहा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाही. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टसाठी प्रथम आणि दुसºया पेपरसाठी १०हजार १४३ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. पहिला-दुसरा पेपर रविवारी सकाळ आणि दुपार दोन सत्रात घेण्यात आला. सकाळच्या सत्रात ४६६ तर दुपारच्या सत्रात ३०१ उमेदवार गैरहजर होते. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाप्रशासनाने कडोकोड बंदोबस्त ठेवून भरारी पथक नियुक्त केले होते.
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार

यवतमाळ, दि. १४ (प्रतिनिधी) – अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घाटंजी तालुक्यातील गांधीनगर फाटा व बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथे घडली.
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सुरेश नैताम (३५) रा. झटाळा असे मृतकाचे नाव आहे. तो एमएच२९ /ई ४४९१ क्रमांकाच्या दुचाकीने सासूरवाडीला गेला होता. अज्ञात वाहनाने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. सुरेशला उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरेश यवतमाळात गॅरेजमध्ये मेकॅमिकम्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत गजानन टेकाम गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मृत्यू झाला. या घटनेची तक्रार संजय राणे यांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून वाहनधारकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0
नवजात बालकाला फेकले

यवतमाळ , दि. १४ (प्रतिनिधी)- नवजात बालकाला अज्ञात व्यक्तीने फेकून दिल्याची घटना सावरगड येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूला बाळ आढळल्याने अनैतिक संबधातील हे बाळ असल्याची शंका उपस्थित केल्या जात आहे.
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया सावरगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे नवजात बाळ पडून असल्याचे ग्रामस्थांना माहित झाले. याबाबतची माहिती चाईल्ड विभागाला देण्यात आल्यानंतर चाईल्डच्या कर्मचाºयांनी बाळ ताब्यात घेवून त्याला येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती केले. बाळ आठ दिवसाचे असून, त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे. प्राथमिक केंद्राच्या मागे आढळलेले बाळ अनैतिक संबधातील असल्याची चर्चा गावात आहे. अज्ञात आरोपीने बाळाला फे कून दिल्याबाबतची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन तपास सुरू केला आहे.
0
ड्रग्ज विरोधात मोदींचा एल्गार

नवी दिल्ली दि. १४ (प्रतिनिधी)- अमलीपदार्थांची नशा (ड्रग्ज) ही चिंतेची बाब बनली असून भारतातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर याला बळी पडलेली पाहायला मिळते. मात्र तुमची ही नशा सैनिकांच्या जीवावर बेतते याचा विचार कधी केला आहे का?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना केला. ड्रग्जला आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदींनी जनतेला आकाशवाणीवरून आवाहन केलं.
ड्रग्ज ही भयंकर समस्या असून यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे आवश्यक आहे. नशेच्या आहारी गेलेल्या अनेकांना हे माहीत आहे का की, त्यांनी नशेसाठी खर्च केलेला पैसा हा दहशतवाद्यांकडे जातो. दहशतवादी संघटना यातून आपलं जाळं पसरवत आहेत आणि त्या पैशातून शस्त्रास्त्र जमवून हल्ले करतात. दहशतवाद्यांशी दोन हात करताना जेव्हा सैनिकांचा बळी जातो त्यामागे नशेबाजांचा पैसा असतो. तेव्हा नशेच्या आहारी जाऊन दहशतवाद्यांना मदत करू नका, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
ड्रग्जच्या आहारी जाण्यामागे ‘D-डिस्ट्रक्शन, डेवस्टेशन आणि डार्कनेस (3D) ‘ ही कारणे आहेत. मात्र या सगळ्यात पालकांची भूमिका महत्वाची आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्याविरोधात नाही तर त्याच्या सवयी विरोधात, ड्रग्ज विरोधात लढले पाहिजे. त्याला समजून घेतले पाहिजे आणि समजावून सांगितले पाहिजे. त्यांनी आपल्याला पाल्याला ध्येय दिले पाहिजे तर तो या मार्गाला वळणार नाही, असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारतर्फे आपण या संदर्भात एक हेल्पलाइन सुरू करण्याचा विचार करतो आहोत. जेणेकरून तरुणांना या व्यसनातून बाहेर येण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. ड्रग्ज मुक्त भारत करण्यासाठी सोशिअल मीडियावरील लोकांनाही त्यांनी आवाहन केले की, यासंदर्भात जागृतता पसरावी म्हणून ‘#drugfreeindia’ असा हॅश टॅग वापरावा. असे केल्यास तो एक लोकशिक्षणाचा भाग ठरेल, असेही मोदी म्हणाले. तसेच सेलिब्रेटी, सामाजिक कार्यकर्ते, नेते, धार्मिक-अध्यात्मिक क्षेत्रात मोठे कार्य करणाऱ्या व्यक्ती या साऱ्यांनी देखील आपल्या संवादातून ड्रग्जचे गंभीर परिणाम आणि त्याच्या विरोधात लढा देण्यासाठी शक्य तेव्हा विचार द्यावेत, असे आवाहन केले.
0
उसाच्या ट्रॉलीवर व्हॅन धडकून ५ ठार

नगर दि. १४ (प्रतिनिधी) – रस्त्याच्या कडेल्या उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला ओम्नी व्हॅन धडकून झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील पाच जण ठार झाले. हे सर्व जण नातेवाईकाच्या लग्नासाठी चाळीसगावला जात असताना रविवारी सकाळी ११ वाजता नगर-औरंगाबाद हायवेवर माळी चिंचोरा फाट्याजवळ (ता. नेवासा) हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले.
रमेश शंकर सोनार (६२), विमल रमेश सोनार (५०), रमेश एकनाथ सोनवणे (६२), शालिनी रमेश सोनवणे (५५), अजय दत्तात्रय घोडके (५०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अश्विनी अजय घोडके (५०) गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्वजण पुण्यातील हडपसर व पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत.
0
गॅस टँकरच्या स्फोटात १० ठार

जयपूर, दि. १४ (प्रतिनिधी) – राजस्थानमध्ये जयपूरजवळ एका गॅस टँकरने पेट घेतल्याने झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून १२ जण ठार झाले आहेत. बीलपूर गावापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या महामार्गावर शनिवारी रात्री एका गॅसच्या टॅंकरने पेट घेतला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यावेळी महार्गावरून इतर वाहनेही जात होती. त्यातील काही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला तर १२ जण जखमी झाले आहेत.अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती, मात्र आता पूर्ववत झाली आहे.
0
झारखंडमध्ये ६१ तर काश्मीरमध्ये ४९ टक्के मतदान

रांची/ श्रीनगर, दि. १४ – झारखंडमध्ये चौथ्या टप्प्यात ६१ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये ४९ टक्के मतदान झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी तर झारखंडमध्ये १५ जागांसाठी सकाळी सातपासून मदतान सुरू झाले.
काश्मीरमध्ये १८ जागांसाठी १८२ उमेदवार रिगणात होते ७.०५ लाख महिलांसह सुमारे १४ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीनगर, अनंतनाग, शोपियन व सांबा जिल्ह्यातील १ हजार ८९० मतदान केंद्रांवर मतदान झाले. दहशतवादी हल्ला तसेच खराब वातावरण असतानाही मतदारांनी मोठ्या संख्यने मतदानाचा हक्क बजावला.झारखंडमध्ये १५ जागांसाठी २१७ उमेदवार असून सुमार ४३ लाख नागरिकांनी मतदान करून त्यांचे भविष्य मतपेटीत बंद केले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.









