
मुंबई -मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट सरकारच्या वतीने सर्वेाच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (एसएलपी) दाखल करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरीम स्थगितीनंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेसंबंधात पुढील भूमिका ठरविण्यासाठी विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात मंत्रालयात त्यांच्या दालनात समितीची बैठक झाली होती, त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींचा विचार केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने सर्वेाच्च न्यायायलयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी, राज्याचे अॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर, ज्येष्ठ वकील दरियस खंबाटा आणि अॅड.पी.पी.राव हे राज्याच्या वतीने युक्तिवाद करणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली.
Archive for December 5th, 2014
0
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात
0
जम्मूत तीन दहशतवादी हल्ले, सात जवान शहीद

श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टर येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्याचे पाच जवान व पोलिसांचे दोन जवान असे सात जण शहीद झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून आणखी दोन दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. उरीपाठोपाठ सौरिया आणि शोपीया येथेही दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने जम्मू काश्मीरमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे.
उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपासून जवळ असलेल्या लष्करी तळावर शुक्रवारी सकाळी चौघा सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. या लष्करी कॅम्पमध्ये अन्य कॅम्पच्या तुलनेत फारशी सुरक्षा नसल्याने दहशतवाद्यांनी याच कॅम्पला टार्गेट केल्याचा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून पहिल्या दोन टप्प्यात मतदारांनी भरघोस मतदान केले असून मतदारांमध्ये भिती निर्माण करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचे दिसते. उरी येथे सैन्याचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. उरीतील सैन्याचे ऑपरेशन सुरु असताना सौरिया व शोपीया येथेही दहशतवादी हल्ला केला आहे.
श्रीनगरमधील सौरिया येथील हल्ला हा निवासी भागाजवळ झाल्याने सुरक्षा यंत्रणाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या हल्ल्यातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. तर शौरिया येथे दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्यावरच ग्रॅनेड हल्ला केला आहे.
0
रावते, देसाई, कदम, शिंदे कॅबिनेटमंत्रीपदी

मुंबई – विधानभवनाच्या प्रांगणात शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळयात शिवसेनेच्या ५ कॅबिनेट मंत्र्यांना राज्यपाल सी . विद्यासागर राव यांनी गोपनियतेची शपथ दिली. यावेळी भाजपाच्या ५ कॅबिनेट व सेना-भाजपाच्या प्रत्येकी ५-५ राज्यमंत्र्यांना सुध्दा शपथ देण्यात आली. शिवसेनेच्या १० तर भाजपाच्या १० मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले एकनाथ शिंदे आणि डॉ. दीपक सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली तर भाजपाकडून गिरीश बापट, जामनेरचे आमदार गिरीश महाजन, मराठवाडयातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावणकुळे आणि अर्जूनी मोरगावचे आमदार व नितिन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजकुमार बडोले यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
राज्यमंत्री – (शिवसेना )
संजय राठोड
दादा भुसे
विजय शिवतारे
दीपक केसरकर
रवींद्र वायकर
राज्यमंत्री – (भाजप )
राम शिंदे
विजयकुमार देशमुख
अंबरीश राजे आत्राम
रणजित पाटील
प्रविण पोटे
0
ट्रकची कारला धडक , काँग्रेस तालुकाध्यक्षासह सहा जण जखमी

पांढरकवडा – गोंदीयावरून पाटणबोरी येथे परत येणाºया कारला ट्रकने जोरदार धडक दिली. आज सकळी ११.३० वाजता झालेल्या अपघातात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर अण्णानालमवार याच्या परिवारातील सहा जण जखमी झाले आहे.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर अण्णा नालमवार, पत्नी लक्ष्मी नालमवार, मुलगा श्रीनिवास नालमवार, सुन मिनाक्ष नालमवार, अनुप नालमवार, युग श्रीनिवास नालमवार हे लग्न सोळ््यासाठी गोंदिया येथे गेले होते. तेथून आपल्या कारने एम.एच. २९ / एडी ६६८८ ने पाटणबोरीकडे परत येत होते. अशातच पांढरकवडा येथे चालक उतरला आणि तेथून श्रीनिवास नालमवार हा गाडी चालवित होता. अशातच नागपूर-हैद्राबाद राष्टÑीय महामार्गावरील हॉटेल गणेशच्या जवळ श्रीनिवास याने कार वेगात चालवून ट्रकला आोव्हरटेक केला. यावेळी वाहनावरील ताबा सुटल्याने कार उभ्या ट्रकवर आदळली. यामध्ये नालमवार परिवारातील सहाही जण जखमी झाले. त्याच्यावर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून यवतमाळ येथे हलविले.
0
विदर्भ राज्यासाठी पदयात्रा आजपासून

यवतमाळ – यवतमाळ जिल्हा वकील संघ, विदर्भ राज्य आंदोलन समिती, जनमंच, शेतकरी संघटना, नवराज्य निर्माण महासंघ, सर्व विदर्भवादी संघटनेच्या वतीने विदर्भ राज्य निर्मीतीसाठी ६डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीमध्ये यवतमाळ ते नागपूर पदयात्रा काढण्यात येणार आहे.
जिल्हा न्यायालयापासून ६ डिसेंबर रोजी सकाळी या पदयात्रेची सुरूवात होणार आहे. यावेळी माजी आमदार वामनराव चटप, अर्थशास्त्री श्रीनिवास खांदेवाले यांच्यासह जेष्ठ वकील या पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविणार आहे. त्यानंतर चिंतामणी देवस्थान कळंब येथे मुक्काम करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी कळंब ते भिडी, ८ डिसेंबर रोजी भिडी ते वर्धा, १० सेलु ते खडकी, ११ डिसेंबर रोजी खडकी ते बुट्टीबोरी आणि १२ डिसेंबर रोजी बुट्टीबोरी ते नागपूर मार्ग चिटणीस पार्क अधिवेशन पर्यंत ही पदयात्रा काढणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अॅड. अजय चमेडीया, अॅड.विरेंद्र दरणे, अॅड. अमोल बोरखडे, अॅड. रविशेखर बदनोरे, अॅड. हेमंत भुमरे, अॅड. शेळके, अॅड. कुचनकर, अॅड. लोणकर, अॅड. काझज्ञी, अॅड. पोपटीया, अॅड. किरण जैस्वाल, अॅड गोडे, अॅड. मुन्ना ठाकरे, विजय एंम्बडवार, कृ ष्णराव भोंगाडे, अरूण जोग, अशोक कपिले, नसीम पटेल, रूपेश घोसे, सुभाष पातालबंसी, विजय निवल, परसराम पारधी, राजेश श्रीवास, पाराचंद चिमुरकर, अॅड. राजेश चव्हाण, लकी लष्करी, विलास नवाडे, दिनेश चौधरी यांनी केले आहे.
0
इसमाचा खून; आरोपीस जन्मठेप

यवतमाळ – कळंब येथील एका इसमाचा खून करणाºया आरोपीस जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मुख्य सत्र न्यायाधिश सविता बारणे यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला. जावेद खा सुलतान खा (४४) रा. कळंब असे आरोपीचे नाव आहे.
जावेद खा सुलतान खा हा गावातीलच सुनिता विजय निशानदार या महिलेला काम असेल तेव्हा पैशाची मदत करीत होता. त्यामुळे तीला कुठेही भेटायला बोलावत होता. अशातच २८ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी ४.३० वाजताच्या सुमारास आरोपी जावेद खा हा सदर महिलेसोबत बोलत होता. हा प्रकार महिलेचा पती विजय यादव निशानदार याच्या निदर्शनास आला. त्यामुळे जावेद ने विजयसोबत वाद करून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला बांधून दुचाकीवरून शिगणापूर रोडवरील एमएसीबी पावर हाऊसजवळील खतीब याच्या शेतातील विहीरीत फेकुन दिले. त्यामुळे पाण्यात बुडून विजयचा मृत्यू झाला. ही बाब आरोपीने मृतकाच्या पत्नीला येऊन सांगितली व याबाबतची माहिती कोणाला सागितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची तक्रार सुनिता निशानदार या महिलीने कळंब पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी जावेद खा विरूद्घ भादंवि कलम ३०२, ५०६, २०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला. ठाणेदार बाळु गायगोले यानी आरोपीला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. मुख्य सत्र न्यायाधिश सविता बारणे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादीची साक्ष महत्वपूर्ण ठरली असून दोषी आढळून आल्याने आरोपी जावेद खा याला जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील निती दवे यांनी काम पाहीले.
0
गृहविभागाकडून पोलिसांची थट्टा, अधिकाºयांना गुलाब जामुन, शिपायाला वटाणे भात


नागपूर (विशेष प्रतिनिधी)- हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी वर्ध्या येथून नागपूरला आलेल्या पोलिस हवालदार-चालक सुधाकर गंथळे यांचा थंडीने गुरूवारी मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने सदर पोलिसांना सोई सुविधा पुरविण्याचे आदेश गृह विभागाला दिले आहे. त्यावरून बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना चारद व ब्लॅकेट वाटप केल्या. तसेच नास्त्याची व्यवस्थाही करण्यात आली. यामध्ये अधिकाºयांसाठी गुलाब जामुन, पोहे, समोसाची व्यवस्थ केली. तर पोलीस शिपायांना मसाला भात असा दुजाभाव करण्यात आला. चक्क गृहविभागाकडूनच पोलिसांचाची थट्टा केली आहे.
८ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरूवात होणार आहे. २६ डिसेंबर पर्यंत चालणाºया या अधिवेशनासाठी विदर्भातून पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. गुरूवारी वर्धा येथील सुधाकर गंथळे या पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने उपाययोजना करण्याचे आदेश गृह विभागाला दिले. त्यावरून नागपूर येथे तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना ब्लॅकेट व चादरचे वाटप केले. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसाठी नास्ता व भोजनाची व्यवस्था केली आहे. पोलीस अधिकाºयांसोबत शिपायी खांदाला खांदा लाऊन रात्र अन् दिवस कर्तव्य पार पाडत आहे. मात्र तेथे पोलीस अधिकाºयांसाठी गुलाब जामुन, चमचम, पोहे, समोसे आदी मेनु ठेवला. तर पोलीस शिपायांसाठी फक्त मसाले भात देण्यात आला. त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी असून गृह विभागनेच थट्टा चालविल्याचे बोलल्या जात आहे.









