पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 11th, 2014

शेतकऱ्यांना ७ हजार कोटीं पॅकेज 0

शेतकऱ्यांना ७ हजार कोटीं पॅकेज

images9453_farmer
नागपूर दि. ११  (विशेष प्रतिनिधी)- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७ हजार कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचवेळी ‘खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका, सरकार तुमच्या पाठिशी आहे’, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निकशानुसार मदत देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एकरी किमान ४ हजार ५०० रुपयांची मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पाच लाख शेतकऱ्यांची सावकारी कर्जाच्या पाशातून मुक्तता करण्याची तसेच मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना तीन महिन्यांची वीज बिल माफी देण्याची हमी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. कर्जमाफीने बँकांमधील कर्ज माफ झाले तरी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचे ओझे मात्र शेतकऱ्यांच्या डोक्यावर कायम राहत होते. त्या तणावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत होते. ही बाब लक्षात घेऊनच सरकारने पाच लाख शेतकऱ्यांचे सावकारांकडून घेतलेले कर्ज स्वत: फेडण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले. राज्यातील १९ हजार ५९ गावांमध्ये सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून केंद्राकडे यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. केंद्राचे पथक १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

December 11, 2014 in मुख्य पान
विधानसभेत भाजपा आमदार बघत होते प्रियांका गांधींचा फोटो 0

विधानसभेत भाजपा आमदार बघत होते प्रियांका गांधींचा फोटो

2014-12-11~bjpmlawatchingpriynakagandhipic_ns
बंगळुरू, दि. ११ (विशेष प्रतिनिधी)-  कर्नाटकमध्ये भाजपाला पुन्हा एकदा आपल्या आमदारांमुळे मान खाली घालावी लागली आहे. बुधवारी विधानसभेत उसाच्या प्रश्नासंबंधी  गंभीर चर्चा सुरू असताना भाजपाचे एक आमदार मात्र प्रियांका गांधी यांचा फोटो पाहताना पकडले गेले आहेत. एका स्थानिक वृत्तवाहिनीवर आमदारांच्या या कृत्याचा हा व्हिडीओ प्रसारित झाला आहे.
कर्नाटकमधील औराद भागातील भाजपाचे आमदार प्रभू चव्हाण बुधवारी आपल्या स्मार्टफोन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियांका गांधी-वड्रा यांचे फोटा पाहताना टीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. ज्यावेळी विधानसभेत उसाच्या दराच्या मुद्यावर गंभीर चर्चा सुरू होती तेव्हा चव्हाण यांचे लक्ष चर्चेकडे नव्हे तर त्यांच्या मोबाईलमध्ये होते. तर दुसरे एक आमदार यु. बी. बनकर हे मोबाईलवर कँडी क्रश हा गेम खेळण्यात व्यस्त होते. या व्हिडीओनंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. या संपूर्ण प्रकाराचा तपास करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. मात्र आपण फोटो बघत नव्हतो तर एक मेसेज वाचत होतो, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे. एक मेसेज वाचण्यासाटी मी माझा मोबाईल सुरू केला. त्यानंतर मी माझे कुटुंबिय, नरेंद्र मोदी व बाबा रामदेव यांचे फोटो बघत होतो. त्याचवेळी मला प्रियांका गांधी यांचा एक फोटो दिसला. त्याच्याखाली काहीतरी लिहीलेले दिसत होते, मात्र ते वाचता येत नसल्याने मी फोट झूम केला, सारवासरव चव्हाण यांनी केली.

December 11, 2014 in मुख्य पान
नथुराम गोडसे हा देशभक्त, भाजप खासदाराची मुक्ताफळे 0

नथुराम गोडसे हा देशभक्त, भाजप खासदाराची मुक्ताफळे

GANDHI-AND-GODSE-300x225
नवी दिल्ली , दि. ११ (विशेष प्रतिनिधी)-  महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी उधळताच संसदेत एकच गदारोळ झाला. कॉँग्रेसच्या खासदारांनी या विधानाला आक्षेप घेऊन त्यांच्यावर जोरदार टीका केली.
या विधानावर जोरदार आक्षेप घेताना कॉँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसैन दलवाई म्हणाले की, गोडसे यांना देशभक्त संबोधण्याचा प्रकार म्हणजे त्यांचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. त्यामुळे हे वक्तव्य करणा-या व्यक्तीस तात्काळ अटक झाली पाहिजे.
जगाला अहिंसेची शिकवण देणा-या राष्ट्रपिता गांधीजींची हत्या गोडसेने केली होती. अशी बेफाट वक्तव्ये करणा-या व्यक्तींच्या विरोधात सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. या प्रश्नावर सरकार गप्प का असा सवाल त्यांनी केला.

December 11, 2014 in मुख्य पान
‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ कार्यक्रम रविवारी 0

‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ कार्यक्रम रविवारी

43

यवतमाळ, दि ११ (प्रतिनिधी) – प्रयास-सेवांकुर संस्था अमरावती द्वारा संचालीत डॉ.अविनाश सावजी प्रेरीत आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना या कार्यक्रमाचे आयोजन स्थानीक नंदुरकर विद्यालय, श्री सत्यसाई क्रीडारंजन सभागृहामध्ये १४ डिसेंबर च रात्री ६.३० वाजता केला आहे. यावेळी मार्गदर्शन करण्याकरिता पंढरपूरच्या पालवीच्या संस्थापिका मंगल शाहला निमंत्रीत केले आहे.
२००३ पासुन सुरू झालेल्या या संस्थमध्ये फक्त २ मुले होती आता या संस्थेमध्ये १०० पेक्षाजास्त एचआयव्ही बाधित मुले आहे. येवढेच नव्हें तर या मुलांची वैद्यकीय आणि शिक्षणाची पूर्ण व्यवस्था या संस्थेने केली आहे. या मुलांना व्यवसायीक शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर कसे उभे रहावे ते शिकवले आहे.  या संस्थेला पहले चार वर्ष कोणीच भाड्याने जागा दिली नाही. त्यानंतर त्यांच्या या प्रयत्नाला हळू-हळू आज या संस्थेला ३ एक्कर जमीन मिळाली आहे. जिथे या मुलांचे अधिकारे घर बनविले आहे. आता १०० मुलांची संस्थे मध्ये ५०० मुलांनाची जोपसना करून त्यांना शिक्षण देवून   त्यांना पुढे आणण्याचे स्वप्न आहे. मंगलाचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाल्याने त्यांनी स्वत:ची संस्था आणि समाजसेवा जी त्यांच्या आई-वडीलांचे आणि मामा कडून मिळाली होती त्याचा उपयोग त्यांना लोकांकरिता केला. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी कुष्टरोगींच्या वसाहती मध्ये जावून त्यांच्या जखमेंवर मलम लावण्याचे व भोजन देण्याचे काम केले, बालक आश्रमांतील मुलांना हसविण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. आज त्यांच्या या उपक्रमाला त्यांची मुलगी, जावाई, मुलागा आणि सुन हे सुद्धा सक्रीय योगदान देवुन राहीले आहे.या कार्यक्रमाचे येथील नंदूरकर विद्यालय मध्ये १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून केली गेली आहे.

December 11, 2014 in विदर्भ
 शेतकºयांनी केली वचननाम्याची होळी 0

शेतकºयांनी केली वचननाम्याची होळी

pakej holi1
यवतमाळ , दि ११ (प्रतिनिधी) -महाराष्ट्राच्या युती सरकारने व केंद्रात सत्ता प्राप्तीसाठी पिक कर्ज माफी व वाढीव हमी भाव देऊ असे वचननाम्यात जाहिर केले होते. केंद्रात भाजपाची व राज्यातही युतीची सत्ता असून शेतकºयांच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही. त्यामुळे नापिकीचे प्रती हेक्टरी अनुदान, संपुर्ण पीक कर्जमाफी व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला, सोयाबीनला, तुर व धानाला द्या या मागणीसाठी १४ शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या दहेली येथे आज गुरूवारी युतीच्या वचननाम्याची होळी करून शासनाचे लक्ष वेधले.
विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी याच्या नेतृत्वात शेतकरी नेते प्रेम चव्हाण, मारेश्वर वातीले, अंकित नैताम,  शेखर जोशी, भीमराव नैताम, दहेलीचे जयकुमार चौधरी, सरपंच वासुदेव भोयर, नंदकिशोर मानकर, रामभाऊ एलादे, योगेश मानकर, अशोक बोंद्रे, संदीप चौधरी, बेबी मेश्राम, रेखा बोंद्रे, सुचिता ठाकरे, सतीश भोयर, अमर पांडे, दीपक येरावार यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात शामील झाले होते. यावेळी बोलतांना किशोर तिवारी म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकयार्ना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान, कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू केली नाही. सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू केली नाही. सर्व दुष्काळग्रस्त शेतकºयांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ द्यावे ह्या मागण्या यावेळी केली. मागील १२ वषार्पासून तेच अधिकारी पॅकेज तयार करीत असुन हजारो कोटी रुपये पाण्यात जात आहेत असे ते म्हणाले. कर्जावरील व्याजमाफी व कर्जाचे पुर्नवसन हे थोतांड असुन खाजगी सावकारांचे कर्जमाफी सरकार कोणत्या नोंदीवरून करणार कारण सध्या गावात कृषीकेंद्र मालक, शिक्षक, पोलिस व अन्ना कोणताही परवाना न घेता कर्ज देत आहे. हे सरकार जे करायेचे आहे ते करीत नसुन पॅकेज बाजार मांडून शेतकरी आत्महत्यांना आमंत्रण देत आहे असा आरोपही तिवारी यांनी केला. ज्योपर्यंत महाराष्ट्राच्या युती सरकारने केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्तीसाठी दिलेले वचन पुर्ण करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फार्मुल्याप्रमाणे लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला, सोयाबीनला, तुर व धानाला देणार शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. त्यामुळे  सरकारने शेतकºयांना वाचविण्यासाठी आपले वचन पुर्ण करावे अशी मागणीही तिवारी यांनी यावेळी केली.

December 11, 2014 in विदर्भ
बसच्या धडकेत विद्यार्थीनीचा मृत्यू 0

बसच्या धडकेत विद्यार्थीनीचा मृत्यू

IMG-20141211-WA0049
यवतमाळ, दि. ११ (प्रतिनिधी) – शेंबाळपिंप्री उमरखेड रस्त्यावर तिवरंग फाट्याजवळ उमरखेड आगाराच्या बसची धडक लागल्याने शुभांगी जामदाडे (१५) रा. तिवरंग या विद्यार्थीनीची जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १२ वाजता दरम्यान घडली.
शेंबाळपिंप्री कडून उमरखेड कडे एम. एच २९ डी ७८२१ क्रमांकाची बस येत होते. रस्त्याला एका कडेला उभी असलेली शुभांगी शाळेची बॅग आणण्यासाठी रस्त्याच्या दुसºया कडेला जात असताना भरधाव बसने तिला धडक दिली. बसचा मागील चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी बस चालक भीमराव तोरकड याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला असून पुढील तपास जमादार सुरेश निचत करीत आहे.

December 11, 2014 in मुख्य पान
लाच घेताना पोलीस नाईक  अटकेत 0

लाच घेताना पोलीस नाईक अटकेत

ssss
यवतमाळ, दि. ११ (प्रतिनिधी) – गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी सहा हजार रुपयाची लाच घेणाºया पोलीस नाईकास अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारी कळंब पोलीस ठाण्यात ही कार्यवाही केली.
संदीप केशव तिजारे असे पोलीस नाईकाचे नाव असून कळंब पोलीस ठाण्यात नेमणुक आहे. कळंब पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक करणार नाही. लॉकअपमध्ये टाकत नाही तसेच गुन्ह्याची चार्जशिट लवकर दाखल करतो असे म्हणून तक्रारदाराकडून सहा हजार लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून पथकाने आज सापळा रचुन कळंब पोलीस ठाण्यातच लाच घेताना तिजारे याना रंगेहात पकडले. या कार्यवाहीने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

December 11, 2014 in मुख्य पान