पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 2nd, 2014

ठाणेदाराचे जोडे चोरीला जातात तेव्हा... 0

ठाणेदाराचे जोडे चोरीला जातात तेव्हा…

cartoon
झरी – कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. चोरी, दरोडा, खून झाल्यास या घटनांचा छडा लावण्याची जबाबदारी पोलिसांची असते. मात्र ठाणेदाराचेच जोडे चोरीला गेल्यानंतर सर्वच कसे कामी लागतात, याचा प्रत्यक्ष अनुभव अडेगाववासीयांनी घेतला.
अडेगाव येथे पुतळा अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व नागरिक मंदीरातून बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ  ठाणेदार असलम खान बाहेर आले. त्यांनी सर्वत्र जोड्यांचा शोध घेतला. मात्र कुठेही दिसून आले नाही. सामान्य नागरिकांचे नाही तर थेट ठाणेदाराचे जोडे चोरीला गेल्याची वार्ता कर्नोपकर्नी झाली. यामुळे ग्रामस्थ व पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. शोध घेऊनही जोडे सापडले नाही. ‘तो’ चोर कोण असावा याबद्दल सर्वत्र चर्चा होऊ लागली. साहेबांच्या जोड्याचे ‘रक्षण’ करता न आल्याने पोलीस कर्मचाºयांना घाम फुटला होता. मद्याच्या नशेत एक इसम या ठिकाणी घुटमळत होता. त्यानेच जोडे लांबविल्याची शंका काही नागरिकांनी व्यक्त केली. त्यावरून दोन युवकांनी त्या व्यक्तीचे घर गाठून इसमास गाठण्याचा प्रयत्न केला. इसम घरी मिळाला  नाही. मात्र घरात ठाणेदारसाहेबांचे जोडे आढळून आल्याने युवकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जणू आपण एखाद्या मोठ्या घटनेचा छडा लावला या तोºयात युवक जोडे घेऊन ठाणेदार खान यांच्याकडे गेले. त्यांनी जोडे घातले आणि निघून गेले. या घटनेची गावात खमंग चर्चा आहे.

December 02, 2014 in मुख्य पान
शेतकºयांनो आत्महत्या करू नका! - विरोधी पक्षनेते आ. शिंदे 0

शेतकºयांनो आत्महत्या करू नका! – विरोधी पक्षनेते आ. शिंदे

DSCN0417
नेर – शेतकºयांचे व्यथित मन व पिकांची भिषण अवस्था विरोधी पक्षनेते आ. एकनाथ शिंदे यांनी आज अनुभवली. सत्तेत असो अथवा नसो,शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. धिर ठेवा आत्महत्या करू नका, अशा शब्दात दुष्काळग्रस्त शेतकºयांना आवाहन केले.
आज विरोधी पक्षनेते आ. शिंदे यांनी तालुक्यातील लोणी, नेर, कोलुरा या दुष्काळग्रस्त गावातील शेतीची पाहणी करून शेतकºयांशी संवाद साधला. शेतकºयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात शेतकºयांचे सात्वन केले. आ. शिंदे यांनी प्रफुल्ल कावरे यांच्या शेतीची पाहणी केली. त्यांनी चार एकरात पिकांची पेरणी केली होती. मात्र तूर व सोयाबीन वन्यप्राण्यांनी फस्त केली. वनविभागाच्या अधिकाºयांची भेट घेवून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. लोणी येथे मोहन आडे यांनी खरीप हंगामातील पिकांची कैफीयत मांडली. शासन शेतकºयांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असल्याचा आरोप केला. नेर येथे परमानंद अग्रवाल यांच्या निवास्थानी विरोधी पक्षनेते आ. शिंदे यांनी शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी रवींद्र राऊत, नरेंद्र खोब्रागडे, गजानन तंबाखे यांनी सततची नापिकी, पिकांना मिळत नसलेला हमीभाव, कर्ज, भारनियमन यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत असल्याचे सांगितले. कोलुरा येथे प्रभाकर शिरगवरे यांच्या कपाशीची पाहणी केली. सोनवाढोणा येथील केदारेश्वर हरडे या शेतकºयाने दहा दिवसापासून डिपी बंद असल्याचे सांगितले. सोयाबीनने दगा दिला. पत्नीचे दागिने गहान ठेवून गव्हाची पेरणी केली. मात्र डि.पी. बंद असल्याने पुन्हा ५० हजाराचे नुकसान झाले असे सांगून अश्रूंना मोकळी वाट करून दिली. यावेळी आ. शिंदे यांच्यासह उपस्थितांचे डोळे पाणावले होते. यावेळी आ. संजय राठोड, आ. प्रताप सरनाईक, आ. सुनील राऊत, आ. संजय रायमुलकर, आ. बाळू धानोरकर, , माजी आ. संजय बंड, माजी आ. श्रीकांत मुनगिनवार, माजी आ. विश्वास नांदेकर, नगराध्यक्ष पवन जयस्वाल,पं.स.सभापती भरत मसराम, बाबू पाटील जैत, परमानंद अग्रवाल, संजय दारव्हटकर, गजानन भोकरे, भाऊराव ढवळे, नामदेव खोब्रागडे, रेखा शेटे, मिना खांदवे, प्रशांत मासाळ, नितीन कराळे, प्रवीण राठोड, निखिल जैत, किशोर अरसोड, भास्कर तुपटकर, निलेश शेटे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार संदीप अपार, बीडीओ गौतम भगत, मनोहर झंझाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

December 02, 2014 in मुख्य पान
वाघाचा शेतमजूरावर हल्ला 0

वाघाचा शेतमजूरावर हल्ला

IMG-20141125-WA0026_resized
वणी – तालुक्यातील नवरगाव येथे शेतात कापूस वेचणाºया शेतमजूर युवकाावर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला चढविला मात्र युवकाने प्रतिकार केल्याने जीव वाचला असून पायाला दुखापत झाली आहे़ संतोष मोतीराम आत्राम  असे जखमी युवकाचे नाव आहे. वणी उपविभागात वाघाने चांगलीच दहशत निर्माण केली असून, झरी जामणी व वणी तालुक्यात व्याघ्रदर्शन सातत्याने होत असल्याने शेतकरी, शेतमजूर चांगलेच दहशतीत आहे़
वणी परिसरामध्ये सातत्याने व्यााघ्रदर्शन होतांना दिसत असून झरी जामणी तालुक्यासह वणी परिसरातील शेतकºयांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे़ शेतकºयांच्या पाळीव जणावरांचा फडशा वाघ पाडतांना दिसत असून वनविभाग कुठलिही उपाययोजना करताना दिसत नाही़ नामदेव राजूरकर यांच्या शेतात शेतमजूर कापूस वेचत असतांना दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने संतोष आत्राम या युवकावर झडप मारली़ अचानक घडलेल्या घटनेमुळे युवक काही काळ घाबरला मात्र प्रसंगावधान राखून त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता वाघाने युवकाचा पायाचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला़ संतोषने आराडाओरड केल्याने   शेतातील मजूरांनी वाघाला पिटाळून लावले़ तसेच वाघाला जेरबंद करण्याकरीता गावातील युवकांनी प्रयत्न केले असता शेतालगत असणाºया झुडपातून संजय जेनेकार या युवकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून त्याचा हाताला किरकोळ इजा झाली आहे़ या घटनेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचित करण्यात आले. जखमी संतोषला तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आह़े
वणी उपविभागात सुरु असलेल्या वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर प्रचंड धास्तावले असून काही महिन्यापूर्वी दुभाटी येथील महिलेला वाघाने ठार केले होते़ तसेच अनेकावर हल्ला चढविला़ नुकतेच काही दिवसापूर्वी सुकनेगांव परिसरात वाघाने रोहीची शिकार केल्याची घटना घडली आहे़ सातत्याने होत असलेले व्याघ्रदर्शन शेतकरी व शेतमजूरामध्ये दहशत निर्माण करीत असून वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

December 02, 2014 in मुख्य पान
शिक्षकाचे एक वर्षापासून विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे 0

शिक्षकाचे एक वर्षापासून विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे

images
नेर – तालुक्यातील दगडधानोरा येथील सहाय्यक शिक्षक एक वर्षापासून शाळेतील विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे करीत असल्याची घटना आज उघडकीस आली. विद्यार्थी व शिक्षकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाºया घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर महिलांनी शाळा गाठून शिक्षकाला जाब विचारला. त्यावर शिक्षकाने माफी मागून शाळेतून पळ काढला.
दगडधानोरा येथे जि.प. प्राथमिक शाळा असून १ ते ४ पर्यंत वर्ग आहे. लक्ष्मण पिलावन रा. अमरावती हा शिक्षक कार्यरत आहे. सदर शिक्षक १ वर्षापासून १३ विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे करीत होता. या बाबत कुणाला सांगितल्यास नापास करण्याची भिती मुलींना सतावत होती. हा त्रास वाढत गेल्याने अख्ोर मुलींनी सुरू असलेला प्रकार पालकांना सांगितला.  आज दुपारी २ वाजताच्या महिलांनी शाळेत धडक दिली. मुख्याध्यापकांनी मध्यस्थी करून घटनेबद्दल शिक्षकाला माफी मागण्यास सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पं.स.सभापती भरत मसराम, विस्तार अधिकारी एन.एन. तांबेकर, गणेश मेंढे यांनी शाळेला भेट दिली. तोपर्यंत शिक्षकाने शाळेतून पलायन केले होते. विस्तार अधिकारी एन.एन. तांबेकर यांनी ५ विद्यार्थीनींचे बयाण नोंदविल्याचे सांगितले. पालकांनी तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतली असून वृत्तलिहेस्तोवर गुन्हा करण्यात आला नव्हता. या घटनेमुळे पालकात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
शिक्षकावर कडक कारवाई- मसराम
या घटनेची तक्रार मिळताच शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना घेवून शाळा गाठली. मात्र तोपर्यंत शिक्षक पसार झाला होता. पीडित मुलींचे बयाण घेतले असून, शिक्षकावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पं.स.सभापती भरत मसराम यांनी दिली.

December 02, 2014 in मुख्य पान
शिवसेना - भाजपाचा दुरावा मिटला , शिवसेनेला १२ मंत्रिपद 0

शिवसेना – भाजपाचा दुरावा मिटला , शिवसेनेला १२ मंत्रिपद

index.jpeg00
मुंबई – शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर मनोमिलन झाल्याचे वृत्त असून आज संध्याकाळपर्यंत याची अधिकृत घोषणा होईल अशी चिन्हे आहेत. भाजपाने शिवसेनेला १२ मंत्रिपद द्यायची तयारी दर्शवली असून उद्योग, पर्यावरण, परिवहन, उत्पादन शुल्क ही खाती सेनेला मिळतील असे खात्रीलायक वृत्त आहे.
विधानसभेत आवाजी मतदानाद्वारे विश्वासदर्शक ठराव मंजूर करून भाजपाने चतुराईने सरकार तारले आहे. यासाठी राष्ट्रवादीनेही छुपा पाठिंबा दिला. मात्र शरद पवारांनी मध्यवधी निवडणुकांचे संकेत देताच भाजपानेही शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली. गेल्या तीन दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असून अखेर या चर्चेत तोडगा निघाल्याचे समजते. शनिवारी शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईत आलेले भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवर ‘उद्याच्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेला पाच कॅबिनेट मंत्रिपद ?’ अशा स्वरुपाचे ट्विट करत शिवसेनेसोबत मनोमिलनाचे संकेत दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिवसेनेसोबत ८० टक्के चर्चा पूर्ण झाली असून लवकरच तोडगा निघेल असे म्हटले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही भाजपा नेत्यांविरोधात जाहीर टीका करु नसा असा आदेश आमदार व पक्ष नेत्यांना पाठवला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तेत सहभागी झाल्यावर शिवसेनेला उद्योग, पर्यावरण, आरोग्य, रस्ते विकास, परिवहन आणि उत्पादन शुल्क ही खाती दिली जातील. तर अन्य महत्त्वाच्या खात्यांमधील राज्यमंत्रीपद सेनेला देण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे. उद्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यामध्ये शिवसेना नेते मंत्रिपदाची शपथ घेतील असे दिसते.

December 02, 2014 in मुख्य पान
सत्यपाल महाराजांना ‘आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार’प्रदान 0

सत्यपाल महाराजांना ‘आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार’प्रदान

10250200_744277838975247_8077564667489218126_n
चाळीस वर्षांच्या प्रबोधन यात्रेचा सन्मान
अमरावती – राष्ट्रसत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबांच्या प्रबोधनकारी विचार पंरपरेचे शिलेदार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना आम्ही सारे फाऊंडेशनचा ‘आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार’ अमरावती येथे एका अविस्मरणीय सोहळ्यात प्रदान करण्यात आला़ चाळीस वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या या प्रबोधन यात्रेचा गौरव बघण्यासाठी अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात अलोट गर्दी झाली होती़
आदर्श ग्राम हिवरे बाजारचे शिल्पकार, सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते सत्यपाल महाराजांना १ लाख रूपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले़ सत्यपाल महाराजांची वृद्ध आई सुशीलाबाई व वडिल विश्वनाथ चिंचोळकर प्रामुख्याने उपस्थित होते़ यावेळी व्यासपीठावर आ़ बच्चू कडू, आ़ हर्षवर्धन सपकाळ, आ़ ख्वाजा बेग, आ़ प्रा़ वीरेंद्र जगताप, चंद्रकांत वानखडे, आम्ही सारे फाऊंडेशनचे अध्यक्ष, ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक अविनाश दुधे व डॉ़ गजानन नारे उपस्थित होते़
सत्काराला उत्तर देताना सत्यपाल महाराज आपल्या खास वºहाडी शैलीत म्हणाले की, तुम्ही नेहमीच आयकता माझं, रात्रंदिवस पब्लिकमध्ये राह्यतो मी, पैशावर प्रेम केलं नाही बाबू नाहीतर सत्यपाललेबी रामपाल होता आलं असतं, मी वर्तमानपत्र वाचून कीर्तन करतो, पोथी वाचून नाही़ कारण आता पोथी वाचाचा टाईम नाही, आता ग्रामगीता, गाडगेबाबा, तुकाराम अन् डॉ़ आंबेडकर सांगायचा टाईम आहे़ सत्यपाल महाराज पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षण काळाची गरज आहे़ संततीसाठी संपत्ती जमवू नका, पण चांगल्या विचारांची संतती निर्माण करा, आपल्या आयाबहिणींनी गाडगेबाबा वाचले असते तर आज समाजात रामपाल जन्मला नसता़ तत्पूर्वी सत्यपाल महाराजांना कार्यकर्ता पुरस्कार देण्याची पार्श्वभूमी अविनाश दुधे यांनी प्रास्ताविकातून मांडली़ ते म्हणाले, समाज जागृतीचे सत्यपाल महाराजांचे कार्य हे कार्यकर्ता प्रवृत्तीतून आणि राष्ट्रसंत व गाडगे महाराजांना अभिप्रेत असलेल्या प्रबोधनकाराच्या वृत्तीतून झाले आहे़ बुलडाण्याचे आ़ हर्षवर्धन सपकाळ यांनी ग्रामस्वराज्य आणि सत्यपाल महाराजांच्या कार्याविषयी आपले विचार मांडले़ ते म्हणाले, गावातील सामान्य माणूस देश चालविण्यास उत्सुक आहे़ त्याचा सहभाग निश्चित झाला पाहिजे़ विकासाच्या प्रक्रियेत जन भागिदारी निर्माण व्हावी म्हणून राज्याच्या राजधान्यांमध्ये केंद्रीत झालेली सत्ता ग्रामसभांकडे कशी जाईल व ग्रामसभा ग्रामस्वराज्याकडे कशी जाईल, याचा विचार व्हायला हवा़ या दृष्टीने सत्यपाल महाराजांचे प्रबोधन समाजात आवश्यक आहे़ आ़ ख्वाजा बेग यांनीही सत्यपाल महाराजांच्या कार्याचा गौरव केला़ ‘सांगा कुणी त्यांना पेरू नका धर्मात्मे, शेतात इथल्या आता माणसे पिकावयास हवी’ असे म्हणत त्यांनी या देशात हिंदू, मुस्लिम, बौद्ध व सर्वधर्मिय बहुसंख्य झाले़ फक्त भारतीय तेवढा अल्पसंख्यांक राहीला़ सत्यपाल महाराजांनी या भारतीयाला बहूसंख्य करावे़ असे आ़ बेग म्हणाले़  तर सत्यापासून दूर जाणाºया समाजाला सत्याच्या जवळ नेणारे सत्यपाल महाराजांच्या वाणीने महाराष्ट्र ऊजळून निघाला आहे़ सत्यपालांच्या वाणीतून रोज गाडगेबाबा व तुकोबा भेटायला येतात, हे महाराष्ट्र सौभाग्य असल्याचे आ़ बच्चू कडू म्हणाले़ चंद्रकांत वानखडे यांनी सुद्धा आपल्या भाषणात सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनकारी वृत्तीचा गौरव केला़
कार्यक्रमाला सत्यपाल महाराजांची पत्नी नंदाताई, पुत्र डॉ़ धर्मपाल, सून व नातवंडासहीत सर्व कुटुंबीय उपस्थित होते़ या अविस्मरणीय सोहळ्याला आचार्य हरिभाऊ वेरूळकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके, सोमेश्वर पुसदकर, आशुतोष शेवाळकर, किशोर बोरकर, रविकांत तुपकर, डॉ़ अतुल यादगिरे, संजय वानखडे, अमर हबीब, डॉ़ संजय बाहेकर, रामेश्वर अभ्यंकर, विजय विल्हेकर, गजानन घोंगडे, शरद वानखडे, निरज आवंडेकर, नितीन पखाले, संजय पवार, ज्ञानेश्वर रक्षक, प्रदिप पाटील, नितीन चौधरी  यांच्यासह ‘आम्ही सारे’चे पदाधिकारी व शेकडो गुरूदेवभक्त व सत्यपाल महाराजांचे चाहते उपस्थित होते़
अखेरपर्यंत मी कार्यकर्ताच – सत्यपाल महाराज
कार्यकर्ता पुरस्कार देऊन आपण मला कार्यकर्ता ठरविले़ मी अखेरपर्यंतच कार्यकर्ता राहील़ असे सत्यपाल महाराजांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले़ पुरस्कारात मिळालेल्या एक लाख रूपयाच्या सहायाने एक रूग्णवाहिका विकत घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले़ ‘लहानपणी कितीही चांगलं गाणं म्हणलं तरी एक रूपया मिळत नव्हता, आज तुया लेकराले एक लाखाच पुरस्कार मिळाला’असे त्यांनी त्यांच्या वृद्ध आईकडे बघून म्हटले़ तेव्हा महाराजांचा कंठ दाटून आला व सभागृहसुद्धा गहिवरले़

December 02, 2014 in मुख्य पान
मोहोळ-मारणे टोळीयुद्धात दुसरा खून 0

मोहोळ-मारणे टोळीयुद्धात दुसरा खून

crime1
पुणे : कुख्यात गजा मारणे आणि निलेश घायवळ टोळीमध्ये टोळीयुद्ध पेटलेले असतानाच मुळशीमध्ये पुन्हा शरद मोहोळ आणि गणेश मारणे टोळीमधील वर्चस्वाच्या लढाईमधून दुसरा खून झाला. गणेश मारणे टोळीचा सक्रिय सदस्य असलेल्या एका इस्टेट एजंटचा मोहोळ टोळीकडून धारदार हत्यारांनी सपासप वार करुन निर्घृण खून केला.
एकनाथ बबन कुडले (वय २८, रा. खाटपेवाडी, भुकूम ता. मुळशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील भिलारे, अनिल छगन खाटपे, महेश दत्तात्रय वाघ, स्वप्नील खाटपे, वैभव शेलार, पप्पू उत्तेकर, राम केदारी, हेमंत गोडांबे, शुभम गोळे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कुडलेचा भाऊ काशिनाथ (वय ३०) याने फिर्याद दिली आहे. कुडले हा किशोर मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्या टोळीमध्ये होता. गणेश मारणे टोळीचे आर्थिक व्यवहार सांभाळणा-या किशोर मारणेचा कुडले जवळचा साथीदार होता. पाच वर्षांपुर्वी कुडलेने सराईत गुन्हेगार पिंट्या उर्फ संजय मारणेचा आंबडवेटजवळ खून केला होता. शरद मोहोळ याच्याशी सलगी वाढवल्यामुळेच गणेश मारणेने त्याचा खून करवला होता. दीड वर्षांपुर्वी कारागृहामधून बाहेर आलेल्या कुडलेने जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली होती.

December 02, 2014 in मुख्य पान
राज्यात वर्षभरात २२० आॅनर किलिंग 0

राज्यात वर्षभरात २२० आॅनर किलिंग

images.jpeg1

मुंबई – राज्यात अवघ्या एका वर्षात ‘आॅनर किलिंग’चे तब्बल २२० प्रकार घडल्याचे भीषण वास्तव समोर आहे आहे. राज्याच्या ग्रामीण भागांत आंतरजातीय प्रेम आणि विवाहाला तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. २०१२मध्ये राज्यात २ हजार ७१२ जीवे मारण्याच्या घटना घडल्या होत्या. २०१३मध्ये २ हजार ५१२ व्यक्तींचे खून झाले होते. त्यात २०१२च्या तुलनेत ७.३७ टक्क्यांनी घट झाली होती. परंतु, पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यांच्या वर्गीकरणातून सर्वाधिक बळी आॅनर किलिंगमधून गेल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्याखालोखाल वैयक्तिक वैरामुळे २०७, मालमत्तेच्या वादातून १६२, हुंडाबळी ठरलेल्या विवाहिता ८१, वैयक्तिक हितासाठी ६७ जणांच्या हत्या झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.खून झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या १ हजार ६९० तर महिलांची संख्या ८९५ आहे. वयोगटाच्या वर्गीकरणानुसार ३१ ते ५० वर्षे वयोगटातील पुरुषांची संख्या ६७३ आहे.१९ ते ३० या वयोगटातील महिला व मुलींची संख्या सर्वाधिक ४१२ इतकी नोंदविण्यात आली आहे.

December 02, 2014 in मुख्य पान
राजनाथ सिंह थकबाकीदार 0

राजनाथ सिंह थकबाकीदार

rajnath-singh
नवी दिल्ली -नैतिक स्वच्छतेसाठीही विशेष आग्रही असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दिग्गज गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव एमटीएनएल थकबाकीदारांच्या यादीत झळकले आहे. विशेष म्हणजे या यादीत भाजपच्याच काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे.
कृषक भारत संघाने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने एमटीएनएलकडे थकबाकीदारांची यादी मागवली होती. त्यानुसार एमटीएनएलनेच सादर केलेल्या माहितीत राजनाथ यांनी ४३ हजार ९०० रु.चे बिल थकवल्याचे नमूद केले आहे. या यादीत सिंह यांच्यासोबतच सात विद्यमान, १६ माजी मंत्री व २९३ माजी खासदारांचा समावेश आहे. १९९८ सालापासून सुरू असलेल्या या खटल्यादरम्यान कोर्टाने कठोर भूमिका घेत २०१२मध्ये ही थकबाकी खासदारांच्या वेतनातून वसूल करण्यात यावी, असा आदेश दिला होता. मात्र या बड्या नेत्यांवर कारवाई करण्यासही एमटीएनएल कचरत आहे. याविषयीचा प्रस्ताव लोकसभा व राज्यसभा सचिवांकडे अजूनही प्रलंबित आहे. अनेकदा कंपनीने या थकबाकीदारांना नोटीस बजावून बिले भरण्याबाबत कायदेशीर कार्यवाही केली आहे. मात्र तरीही त्याकडे या प्रभृतींनी दुर्लक्ष केले आहे.

December 02, 2014 in रोजगार
हिंजवडीतून तीन महिलांचे अपहरण 0

हिंजवडीतून तीन महिलांचे अपहरण

index
पिंपरी – दवाखान्यातून घरी परतणाऱ्या तीन सुरक्षारक्षक महिला शुक्रवारपासून बेपत्ता झाल्याचा प्रकार हिंजवडी भागात उघडकीस आला आहे. या तिघींचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करत तंत्रज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
प्रतिभा प्रकाश हजारे (वय २५, रा. ओझरकरवाडी, मूळ रा. नवलिहाळ, जि. बेळगाव), मंगला सिद्धार्थ इंगळे (वय २६, रा. ओझरकरवाडी, मूळ रा. वाशीम) या विवाहितांसह विद्या दशरथ खाडे (वय २४, रा. ओझरकरवाडी, मूळ रा. सातारा) अशी बेपत्ता झालेल्या तिघींची नावे आहेत. या प्रकरणी प्रतिभा हजारे यांचे पती प्रकाश बाबू हजारे (वय ३०, रा. ओझरकरवाडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

December 02, 2014 in मुख्य पान
 ४० लाखांसह एजंटचा पोबारा 0

४० लाखांसह एजंटचा पोबारा

7a5a5-property_crime
वाळूज – कुवेतमध्ये नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून ४० तरुणांची सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. वाळूज एमआयडीसी भागात उघडलेल्या एका कंसल्टन्सी चालकाने त्यांची फसवणूक करून पलायन केले आहे. दरम्यान फसवणूक झालेल्या तरूणांनी वाळूज एमआयडीसी पोलिसात धाव घेतली आहे.
आकाश शर्मा याने काही महिन्यांपूर्वी साई इंटरनॅशनल सर्व्हिस (कन्सल्टन्सी) या नावाने बजाजनगर परिसरात कार्यालय उघडले होते. या कार्यालयातून कुवेत येथील कुवैत अॅटोमोटीव्ह इम्पोर्ट कंपनीत टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, कॉम्युटर ऑपरेटर, वेल्डर, चालक, टुल अॅन्ड डाय मेकर, फर्निचअर, काच स्लाईडिंग, प्लंबर आदी पदासाठी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून ८० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली. विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट तयार करण्यासाठी रक्कम लागेल, असे त्याने सांगितले होते. त्याने तरुणांना व्हिसा, विमानाचे तिकीट, जॉब अॅग्रिमेंटची झेरॉक्स दाखवून स्वतःजवळच ठेवली.
दरम्यान त्याचा सुपरवायझर मोहम्मद अफरोज याने ४० जणांना शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) बोलावले होते. ही मंडळी तेथे पोहोचल्यानंतर शर्माने त्यांना भेटणे टाळून सुपरवायझरमार्फत सेंट्रल गेस्ट हाऊस या लॉजवर थांबावे असे कळविले होते. काही पासपोर्टवर सह्या व शिक्के आण्ण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्याला शनिवारी (२९ नोव्हेंबर) फोन केला, पण त्याने अर्ध्या तासात येतो असे नंतर फोन बंद केला. रात्री दहाच्या सुमाराला लॉज मालकाने तुमची बुकिंग रात्री बारापर्यंत असल्याचे सांगून बाहेर पडण्यास सांगितले.

December 02, 2014 in मुख्य पान
माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचे निधन 0

माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचे निधन

Antulay
मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांचे आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अंतुले यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अभ्यासू आणि प्रचंड निर्णयक्षमता असलेला ‘धडाकेबाज’ नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या अंतुले यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना ते प्रतिसाद देत नव्हते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. काही दिवसांपूर्वी ते पूर्णपणे बेशुद्धावस्थेत गेले होते. अखेर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अंतुले यांचे पार्थिव आज मुंबईतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून रायगड जिल्ह्यातील आंबेत या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी रायगड जिल्ह्यातील आंबेत गावी झाला. मुंबई विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेऊन त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली. पुढे ही पदवीच त्यांची ओळख बनली. १९६२ साली ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. तेव्हापासून १९७६ पर्यँत ते विधानसभेवर होते. त्या दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचे मंत्रिपदे सांभाळली. १९७६ ते १९८० या काळात ते राज्यसभेवर होते.

December 02, 2014 in मुख्य पान
ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे निधन 0

ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचे निधन

deven-verma पुणे – अचूक टायमिंग आणि सहज संवाद साधण्याच्या कौशल्यामुळं रसिकांना पोट धरून हसायला लावणारे आणि हसवता-हसवता नकळत भावूक करून टाकणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा (७७) यांचे आज सकाळी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. येरवडा येथील स्मशानभूमीत दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. २३ ऑक्टोबर १९३७ रोजी जन्म झालेल्या देवेन यांचे बालपण पुण्यात गेले. पुण्यातील नवरोजी वाडीया कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्समधून राज्यशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी रुपा गांगुली यांच्याशी देवेन त्यांचा विवाह झाला. ‘धर्मपुत्र’ चित्रपटातून १९६१ साली त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी बरोबरच मराठी आणि भोजपुरी सिनेमांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. बासु चॅटर्जी, ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांसारख्या दिग्गजांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील देवेन यांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या. अभिनयाबरोबरच त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले होते.

December 02, 2014 in मुख्य पान