पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 24th, 2014

भाजप-सेना सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली! 0

भाजप-सेना सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली!

शेतक-यांसाठी हिवाळी अधिवेशन निष्फळ, काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्य सरकारवर घणाघाती टीका

Hiwali_1
नागपूर, – महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रातील जनता आणि शेतक-यांसाठी निष्फळ ठरले आहे. संपूर्ण राज्य दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीसारख्या असंख्य नैसर्गिक संकटांनी होरपळून निघाले असताना जनतेला नवीन सरकारकडून अनेक अपेक्षा होत्या. परंतु, भाजप-सेनेच्या नव्या सरकारने मोठा अपेक्षाभंग केला असून, शेतक-यांपासून दलित, अल्पसंख्यकांपर्यंत सर्वच घटकांच्या तोंडाला पाने पुसल्याची घणाघाती टीका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. हेमंत टकले, आ. अब्दुल सत्तार, आ. शरद रणपिसे, आ. विरेंद्र जगताप, आ. संजय दत्त, आ. राहुल बोंद्रे यांच्यासह अनेक विधीमंडळ सदस्य उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना विखे पाटील व मुंडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अतिशय चिंताजनक झाले आहे. त्यातच दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीटसारख्या अस्मानी संकटांनी शेतक-यांची परिस्थिती अधिकच विदारक केली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतक-यांना ठोस व थेट मदत देईल, अशी मागणी आणि सर्वसाधारण अपेक्षा होती. परंतु, राज्य सरकारने शेतीसंबंधीत जुन्याच काही योजना व त्यावर होणारा खर्च एकत्र करून शेतक-यांसाठी एक फसवे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजनुसार शेतक-यांना एकरी किती मदत मिळणार, हे देखील स्पष्ट होत नव्हते. या पॅकेजनंतरही दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या थांबलेल्या दिसत नाही. यावरून राज्य सरकारचे हे पॅकेज शेतक-यांसाठी निरुपयोगी ठरल्याचे स्पष्ट होते.
अधिवेशन सुरू असतानाच उत्तर महाराष्ट्राला जबर गारपिटीने तडाखा दिला. संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. शेतक-यांच्या हाताशी आलेली काही पिके उद्धवस्त झाली. तरीही राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील शेतक-यांना मदत करण्याची भूमिका घेतली नाही. खान्देशातील शेतक-यांना तुटपुंजी मदत करून उर्वरित राज्यातील शेतक-यांना वा-यावर सोडले. कोकणसारख्या विभागाचा तर या सरकारने साधा उल्लेख देखील केला नाही, असा आरोप उभय नेत्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्राला सावकारमुक्त करण्याची फसवी घोषणा सरकारने केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांनी सावकारांकडून घेतलेले 350 कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भातील निर्णय म्हणजे शेतक-यांची फसवणूक आहे. मुळात परवानाधारक सावकारांना शेतीसाठी कर्जच देता येत नाही, असे सांगून दोन्ही नेत्यांनी सावकारांच्या नावाखाली हे सरकार नेमके कोणाचे कर्ज माफ करणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मागील सरकारच्या तुलनेत नवीन सरकारच्या कार्यकाळात शेतीमालाचे भाव चांगलेच घसरले आहेत. शेतक-यांच्या मालाची खरेदी वेळेत करण्यासाठी पुरेशी व्यवस्था देखील राज्य सरकारला करता आली नाही. दूध उत्पादकांना हे सरकार न्याय देऊ शकले नाही. कापूस, सोयाबीन, धान, ऊस अशा कोणत्याही पिकाला भाजप-सेनेचे सरकार चांगला भाव मिळवून देऊ शकले नाही. कोणत्याही पिकाला चांगला बोनस त्यांनी दिला नाही. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट होते, असे विखे व मुंडे यांनी सांगितले.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही समाजांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका आहे. परंतु, आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाला न्यायलयात स्थगिती मिळाली. सध्याच्या सरकारने मुस्लिम आरक्षण बाजूला ठेवून फक्त मराठा आरक्षणाला पुढे रेटण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या सरकारचे हे धोरण राज्याचा सलोखा बिघडविणारे असल्याचा आरोप काँग्रेस व व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात नवीन राज्य सरकारच्या निर्णयामध्ये मुस्लिम आरक्षणाचाही समावेश असावा, यासाठी विधान परिषदेत काँग्रेस आमदारांनी दुरूस्ती सुचवली होती. परंतु, राज्य सरकारने त्याची दखलसुद्धा घेतली नाही, असे आ.श्री माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले.
केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. परंतु, राज्य सरकारला चर्चा करायची नसल्याने त्यांनी नेमका अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा अहवाल पटलावर ठेवला. केळकर समितीच्या शिफारसी लागू करायच्या असतील तर त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तशा तरतुदी करणे आवश्यक आहे. त्यामुळे या अहवालावर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच चर्चा करण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी उभय नेत्यांनी या पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्राचे शिल्पकार, देशाचे दिवंगत उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि स्वतंत्र भारताच्या शेती धोरणाला दिशा देणारे देशाचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रसंगी केली.

December 24, 2014 in मुख्य पान
विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्ष शिक्षा 0

विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्ष शिक्षा

2014-10-15~court_ns
यवतमाळ, दि. २४ – कळंब तालुक्यातील हिरडी येथील महिलेचा विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्षाची शिक्षा ठोठावली. पहिले तदर्थ सत्रन्यायाधिश एम.टी. असीम यांनी आज बुधवारी हा निकाल दिला.
महेश तुळशिराम नागपूरे (३५) रा. वाढोणा (खु.) असे आरोपीचे नाव आहे. गावालगत असलेल्या हिरडी येथे तो कामानिमित्य जात होता. अशातच त्याची नजर गावातील एका महिलेवर गेली होती. कळंब येथील बाजारात सदर महिलेला भेटून तीच्याकडे शारिरीक सुखाची मागणी केली. मात्र तीने विरोध केला होता. दरम्यान १९ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री पतीला जेवन देऊन ती लघुशंकेसाठी घराबाहेर गेली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेला पकडून विनयभंग करून ढकलुन दिले. त्यामुळे तीच्या डोक्यावर व डोळ््याला जबर मार लागला होता. यावेळी तीने आरडाओरड केल्याने आरोपीने घटनास्थळारवरून पळ काढला. २० सप्टेंबर रोजी पिडीत महिलेने कळंब पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ४४८, ३२४ व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. पांढरकवड्याचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांनी आरोपीस अटक प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील पहिले तदर्थ सत्र न्यायाधिश एम.टी. असीम याच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐंकुन घेतला. सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी, तीचा पती, डॉक्टर, तपास अधिकारी व अन्य दोन जणांच्या साक्ष तपासण्यात आल्या. यामध्ये दोषी आढळून आल्याने आरोपी महेश नागपूरे यास भादंवि कलम ३५४ अंतर्गत एक वर्ष व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुणावली. ३५४ (अ) अंतर्गत तीन महिने व ३०० रुपये दंड, ४४८ मध्ये १५ दिवस व ३०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता व सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. अरुण मोहोड यांनी काम बघीतले.

December 24, 2014 in मुख्य पान
शेतकºयाची पाच लाखाने फसवणूक 0

शेतकºयाची पाच लाखाने फसवणूक

2014-06-26~3-25yt-30koti_ns
यवतमाळ – दिग्रस व दारव्हा तालुक्यात बोगस बियाणे विक्रीचे प्रकरण उघड झाल्यानंतर औरंगाबाद कंपनीच्या जनरल मॅनेजरने पुसद तालुक्यातील शेतकºयाची पाच लाखाने फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.
औरंगाबादच्या व्हर्जीन सिड कंपनीने जिल्ह्यातील शेतकºयांना कपाशीचे बोगस बियाणे विक्री केल्यानंतर त्याची पेरणी केल्यावर बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकºयांनी तक्रारी केल्या होत्या. पूसद तालुक्यातील शेतकºयाने ४ लाख ९९ हजार २५९ रुपयांचे बियाणे खरेदी केले होते. ते न उगवल्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी सुभाष उलेमाले यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी जनरल मॅनेजर विष्णू जोशीविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

December 24, 2014 in मुख्य पान
अपघातात युवक ठार 0

अपघातात युवक ठार

download (1)
यवतमाळ – अपघातात युवक ठार झाल्याची घटना जवळा शिवारात घडली. संदीप पातोडे असे मृतकाचे नाव आहे. संदीप पायदळ जात असताना भरधाव वेगाने येणाºया एम. एच. २६ एमएन ४३६३ क्रमांकाच्या वाहनाने धडक दिली. या धडकेत युवक गंभिर जखमी झाला. दरम्यान त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. याबाबत मिना पातोडे (४५) रा. रामनगर हिंगनघाट यांनी आर्णी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी चालकाविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

December 24, 2014 in विदर्भ
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून 0

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून

crime_logo
यवतमाळ, दि. २४ – चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जाळून मारल्याची घटना आडद येथे घडली. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी पतीला अटक केली.
पदमा पांडुरंग कबले (२१) रा. आडद ता. उमरखेड असे मृतक महिलेचे नाव असून वर्षभरापूर्वी आडद येथील पांडुरंग साहेबराव कबले (२४) याच्यासोबत विवाह झाला होता. या दाम्पत्याला अडीच महिन्याचा मुलगा देखील आहे. सुरळीत संसार सुरू असताना पांडुरंग पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे तिला माहेरीही आणण्यात आले होते. दरम्यान बाळंतपणानिमित्त पद्मा रुपाळा येथेच होती. आठ दिवसापूर्वी पांडुरंगने तिला आडदला आणण्यास सांगितले. त्यानुसार वडिलांनी आडद येथे आणून दिले. पद्माने त्यानंतर पती त्रास देत असल्याचे मोबाईलवरून सांगितले, असे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान २२ डिसेंबर रोजी दुपारी झोपडीच्या आगीत पदमाचा जळून मृत्यू झाला. या प्रकरणी तिचे वडील प्रल्हाद दिगंबर बुरकुले (४०) रा. रुपाळा ता. उमरखेड यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पती पांडुरंग कबले याला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

December 24, 2014 in विदर्भ
डोर्ली शिवारात वाघाचे दर्शन 0

डोर्ली शिवारात वाघाचे दर्शन

tiger1
यवतमाळ , दि़२४ – मारेगांव तालुक्यातील डोर्ली शिवारामध्ये गुरुदेव कोटरंगे यांच्या शेताजवळ २४ डिसेंबरला दुपारच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभित झाले आहे़
वणी, मारेगांव व झरी तालुक्यात वाघाचे सातत्याने होत असलेले दर्शन तसेच पशूधनाचा पाडत असलेला फडशा लक्षात घेवून वनविभागाने ‘त्या वाघाला’ जेरबंद करावे अशी मागणी अनेकवेळा नागरिकांनी केली आहे़ परंतू शेतशिवारामध्ये वाघाच्या अचानक आगमनामुळे शेतकरी, शेतमजूर प्रचंड धास्तावले आहे़ वणी तालुक्यातील सावरगांव, रासा, घोन्सा तसेच झरी जामणी परिसरातील दुभाटी, माथार्जून, अडकोली तर मारेगांव तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरामध्ये वाघाचा होत असलेला वावर शेतकरी, शेतमजूरांना धडकी भरवितांना दिसत आहे़ तालुक्यातील डोर्ली परिसरात कोटरंगे या शेतकºयाला वाघाचे दर्शन झाले़ या बाबत त्यांनी वनविभागाला सुचना दिल्या असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे़

December 24, 2014 in मुख्य पान
संजय दत्त तुरुंगाबाहेर 0

संजय दत्त तुरुंगाबाहेर

images
पुणे – १९९३मधील मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला १४ दिवसांची संचित रजा मंजूर झाली असून संजय आज तुरुंगाबाहेर आला आहे. आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी संजय मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.
१९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट दरम्यान बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. संजय दत्तने चार डिसेंबर रोजी तुरुंग प्रशासनाकडे संचित रजेसाठी अर्ज दाखल केला होता. अखेर मंगळवारी त्याची रजा मंजूर करण्यात आली. याआधीही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी १४ दिवसांच्या रजेवर गेला होता. त्यानंतर त्याची रजा आणखी १४ दिवसांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे त्याला महिन्याभराची रजा मंजूर करण्यात आली होती.

December 24, 2014 in मुख्य पान
 विदेशातील नोकरीचे आम‌िष दाखवून २६ लाखांचा गंडा 0

विदेशातील नोकरीचे आम‌िष दाखवून २६ लाखांचा गंडा

internert
जळगाव – परदेशातील हॉटेलमध्ये मॅनेजरच्या पदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाचे ईमेल पाठवून कासोदा (ता. एरंडोल) येथील दोन तरूणांची २६ लाखांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी उघड झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासोदा येथील भूषण जाधव व मुकेश तायडे या दोघाही तरूणांनी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. दोघांनी इंटरनेटच्या माध्यमातून हॉटेल करीअर जॉब या साईटवर स्वतःचा बायोडाटा अपलोड केला होता. काही दिवसातच या दोघांच्या मेलवर लंडन येथील ब्रेन मार्ट शहरातून मेल आला. त्यात ‘आमच्याकडे मॅनेजर पदापासून ते वेटर पदापर्यंतच्या जागांसाठी व्हॅकेन्सी असल्याने आपण त्यासाठी अर्ज करावा.’ असा उल्लेख होता. त्यानंतर या जॉबसाठी २५ हजार ५०० रुपये इतकी नोंदणी फी आयसीआयसी बँकेच्या खात्यातून एका दुसऱ्या खात्यावर भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार या दोघांनी ५० हजार रुपये संबधीत खात्यात टाकले. फेब्रुवारी मह‌िन्यापासून या दोघा तरूणांना इंटरनेटवरून वेगवेगळे मेल गेले. त्यानंतर दोघा तरूणांनी ५७ हजार रुपये जमा केले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. ५ डिसेंबरपर्यंत या दोघा तरूणांनी तब्बल २६ लाख ८६ हजार रूपयांची रक्कम बँकेच्या खात्यात जमा केली. त्यानंतर या दोघांकडे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्यानंतर या दोघांनी आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे, असे सांग‌ितल्याने या दोघांना १६ डिसेंबरला दिल्ली येथे बोलाविण्यात आले. दिल्लीला हे दोघेही तरूण गेल्यानंतर त्यांना कोणीही भेटले नाही.
त्यामुळे दोघांनाही शंका आली. याच काळात अशीच एक तक्रार मुंबई पोलिसांकडे देखील दाखल करण्यात आली होती. मुंबई पोलिस आरोपींचा शोध घेत होते. आरोपींनी ज्या मोबाईल क्रमांकावरून या तरूणांशी संवाद साधला होता. त्या मोबाईल क्रमांकाचे डिटेल्स काढल्यानंतर पोलिसांना कासोद्याच्या दोघा तरूणांना नंबर मिळाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

 

December 24, 2014 in मुख्य पान
ख्रिश्चन कुटुंबाला चर्चमध्ये अपमानास्पद वागणूक 0

ख्रिश्चन कुटुंबाला चर्चमध्ये अपमानास्पद वागणूक

images (1)
मुंबई – देशात ‘घर वापसी’च्या कार्यक्रमावरून हिंदू संघटनांना लक्ष करण्यावरून गोंधळ सुरू असताना आता अजब प्रकार समोर आला आहे. गणपतीची पूजा करतात म्हणून एका ख्रिश्चन कुटुंबाला चर्चमध्ये अपमानास्पद वागणूक दिली जात असलेल्याची माहिती मिळते. या संदर्भातील तक्रार मुख्य फादरकडे करण्यात आली आहे.
टोनी फर्नांडिस हे फोर्ट परिसरातील मुर्शिला इमारतीत पत्नी आणि मुलांसह राहतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी रजिस्टर पद्धतीने आंतरजातीय विवाह केला. तसेच या परिसरात बालवीर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. टोनी या मंडळाचे सदस्य आहेत. त्यांचे वडिलदेखील या मंडळाचे सदस्य होते. टोनी यांची ही पार्श्वभूमी सेंट जॉन दी इबेंजलिस्ट चर्चमध्ये नवीन आलेल्या फादरना कळली. त्यांनी टोनी आणि त्यांच्या कुटुंबाला चर्चमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. असा विरोध होत असताना देखील या येशू भक्ताने हा विरोध डावलून प्रवेश मिळवलाच तर त्याला आणि त्याच्या परिवाराला येशूचा पवित्र मानला जाणारा प्रसाद न देताच बाहेर काढले जाते.
अखेर फादरांनी सुरू ठेवलेल्या या अरेरावीमुळे टोनी यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून यासंदर्भातील तक्रार त्यांनी ख्रिश्चन समाजाचे मुख्य फादर ओसवाल्ड कार्डिनल ग्रेसिस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तपत्रातून देण्यात आले आहे. मी आंतरजातीय विवाह केला म्हणून मला अशी वागूक दिली जाते. चर्चमध्ये आंतरजातीय विवाह लावले जातात त्याचे काय? सर्वधर्मसभाव म्हणायचे आणि चर्चमध्ये अशी वागणूक द्यायची, हा दुजाभाव कशाला, असा सवालही टोनी फर्नांडिस यांनी केला आहे.

December 24, 2014 in मुख्य पान
पाच विद्यार्थ्यांना अटक 0

पाच विद्यार्थ्यांना अटक

bike
कोल्हापूर – एक मोपेड व एक मोटारसायकल चोरल्याच्या आरोपावरून पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. चैनीसाठी व मुलींवर छाप पाडण्यासाठी गाड्या चोरल्याची कबुली संबंधित मुलांनी दिली आहे. यापैकी दोघे नववीमध्ये तर तिघे दहाव्या इयत्तेत शिक्षण घेत आहेत.
पाच शाळकरी विद्यार्थी दुपारी व रात्री हॉटेलमध्ये जेवतात. त्यांच्या अंगावर महागडे कपडे असतात, अशी माहिती एका खबऱ्याने राजारामपुरी पोलिसांना दिली होती. ही मुले मोटारसायकल चोरत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता गस्तीवरच्या पोलिसांनी राजारामपुरी जनता बझार चौकात नंबरप्लेट नसलेली मोपेड थांबवली. मोपेडवरील दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दोघांनी १७ डिसेंबर रोजी सकाळी राजारामपुरी सहाव्या गल्लीत मोपेड चोरल्याची कबुली दिली. प्रमोद बलवंत खाडिलकर (वय ५३, रा. अंबाई टँकजवळ) यांनी मोपेड चोरीची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. एका क्लासच्या बाहेर खाडिलकर यांच्या मुलाने मोपेड पार्क केली होती. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी तीन मित्रांची नावे सांगितली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडेही चोरलेली मोटारसायकल मिळाली. या मोटारसायकलची नंबरप्लेट पोलिसांना मोपेडच्या डिकीतच मिळाली. राजारामपुरीतील मिल्क कॉर्नर जवळून ती चोरीला गेली होती. मुलींवर इम्र्पेशन मारण्यासाठी गाड्या चोरल्याची कबुली मुलांनी दिली. चोरलेल्या मोपेड व मोटार सायकलची नंबरप्लेट काढून ते फिरवत होते. पाचही जण वेगवेगळ्या ठिकाणी रात्री आडोश्याला गाड्या पार्क करत होते. त्यांनी आणखी वाहने चोरली आहेत का याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी मोटार सायकल व मोपेड ताब्यात घेतली आहे. पाचपैकी दोघांचे वडील हयात नाहीत. एकाचे वडील कॅन्सरने आजारी आहेत, असे पोलिसांच्या चौकशीत आढळून आले आहे.

 

December 24, 2014 in महाराष्ट्र
मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ 0

मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’

bharatratna-app.jpg000
नवी दिल्ली – भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. हिंदू महासभेचे नेते, काँग्रेसचे माजी अध्यक्ष व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली. येत्या २६ जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत वाजपेयी व मालवीय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सरकारचा हा निर्णय राष्ट्रपती मुखर्जी यांना कळविण्यात आला. त्यानंतर ‘मालवीय व वाजपेयी यांना भारतरत्न जाहीर करताना मला आनंद होत आहे’ असे ट्वीट राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मदनमोहन मालवीय यांना ‘भारतरत्न’ देण्याचे आश्वासन खुद्द नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान दिले होते. त्यामुळे हे नाव निश्चितच मानले जात होते. मालवीय यांच्यासोबत वाजपेयी यांनाही सर्वोच्च पुरस्काराने गौरविले जावे, अशी मागणी होती होती. बहुतांश राजकीय पक्षांनीही वाजपेयी यांच्या नावास पाठिंबा दर्शवला होता. त्याची योग्य दखल मोदी सरकारने घेतली.वाजपेयी व मालवीय या दोघांचाही उद्या, २५ डिसेंबर रोजी जन्मदिवस आहे. हा दिवस ‘गुड गव्हर्नन्स डे’ म्हणून साजरा करण्याची घोषणा सरकारने याआधीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘भारतरत्न’ची झालेली घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आजवर देशातील ४३ महनीय व्यक्तींना ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आले आहे. आता वाजपेयी व मालवीय यांचे नावही या मानकऱ्यांच्या यादीत जोडले गेले आहे.

 

December 24, 2014 in मुख्य पान