पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 17th, 2014

 तीन मुलांना टाकून मातेचे पलायन, पोलीस स्टेशन समोर घटना  0

तीन मुलांना टाकून मातेचे पलायन, पोलीस स्टेशन समोर घटना

images.jpeg 0
यवतमाळ , दि. १७ – तीन मुलांना वाºयावर सोडून मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार आज बुधवारी पुसद शहर पोलिस ठाण्यापुढे उघडकीस आला. ही बाब लक्षात येताच ठाणेदार व पोलीस कर्मचाºयांनी या तीनही मुलांना मायेची उब दाखवत न्यायालयात हजर करण्यापूर्वी महिला पोलिस शिपायाच्या अधिनस्त देखरेखीत ठेऊन मानवतेचा धर्म पाळला. या घटनेने शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
पुसद येथील तुकारामबापू वॉर्डातील अनुसया रमेश आडे या मातेचे हे कृत्य आहे. दोन दिवसांपूर्वी या महिलेने ६ वर्षाची एक मुलगी, ४ वर्षाचा आणि दिड वर्षाचा असे दोन मुले चक्क पुसद शहर पोलिस ठाण्यापुढे बेवारस टाकून पलायन केले. ९ महिन्यानंतर अत्यंत कष्टप्रद परिस्थितीत जन्मलेली ही बालके चक्क आईनेच उघड्यावर टाकली. पुसद शहर पोलिस ठाण्यापुढे तीनही पोटच्या गोळ्यांना वाºयावर सोडून मातेने पलायन केले. अन्न, निवारा आणि थंडीचा प्रकोप यामुळे मेटाकुटीस येवून रडवेल्या स्वरात मातेसाठी झिंगलेली ही कोमल बालके पुसद शहर ठाणेदाराच्या दृष्टीस पडली. त्यांनी तात्काळ संबधित कर्मचाºयांना पाठवून या तीनही भावंडांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्यासह थंडीपासून बचाव होण्याकरीता कपडेलत्ते घेतले. सध्या ही तीनही चिमुरडी पुसद शहर पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस शिपायाच्या देखरेखीत आहेत. यांच्या मातेने या तीनही मुलांना वाºयावर सोडून पलायन का केले  हे अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु  ‘खाकी’ ने या तीनही भावंडांना मायेची उब देवून दोन दिवसांपासून जोपासले. उद्या १८ रोजी या तीनही भावंडांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे मातेपासून दुरावलेल्या या तीनही भावंडांची बालसुधारगृहात रवानगी होण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून यवतमाळ जिल्ह्याचा आढावा 0

मुख्यमंत्र्यांकडून यवतमाळ जिल्ह्याचा आढावा

unnamed
यवतमाळ, दि. १७ :   शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंचनाच्या सोई उपलब्ध करुन देणे आवश्यक असून यवतमाळ जिल्ह्यातील ज्या-ज्या धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे, तेथील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर वाढविण्यासाठी वितरण व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधान भवनातील कॅबिनेट हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन, वीज, बांधकाम, पाणीपुरवठा यासह विविध विभागांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसुल राज्यमंत्री संजय राठोड, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे, माजी मंत्री आ.मनोहर नाईक,
आ.माणिकराव ठाकरे, आ.संदिप बाजोरिया, आ.हरिभाऊ राठोड, आ.ख्वाजा बेग, आ.मदन येरावार, आ.राजू नजरधने, आ.संजीव रेड्डी बोदकुरवार, डॉ.अशोक उईके, आ.राजू तोडसाम यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालीनी शंकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, रोहयो सचिव प्रभाकर देशमुख, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, प्रविण दराडे, लाभक्षेत्र विकास सचिव श्री.मेंढेगिरी, यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासोबतच विकास कामाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. अनेक प्रकल्पांमध्ये साठा उपलब्ध असतांनाही सिंचनासाठी हा साठा उपलब्ध होत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील ज्या-ज्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठी उपलब्ध आहे तेथे वितरण व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी वापर वाढला पाहिजे त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. निम्न पैनगंगा हा प्रकल्प जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्याबाबतीत त्वरीत निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. बेंबळा प्रकल्पाचे भुसंपादन व मोबदल्याची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. याबाबत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पैसे द्यावेच लागतात त्यामुळे विलंब न करता ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासोबतच बेंबळा प्रकल्प पुर्नवसनाच्या असलेल्या समस्यांची चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना बैठकीत केल्या. बेंबळा प्रकल्पावर डेहनी उपसा सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहे. निधीमुळे या प्रकल्पाचे काम थांबले आहे. काम तातडीने मार्गी लागावे म्हणून आठ कोटीचा निधी लवकरच दिला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्ह्यातील आमडापूर, अरुणावती, कोहळ या प्रकल्पांसह जिल्ह्यातील एकूणच सिंचन परिस्थितीची माहिती घेऊन सूचना केल्या. बैठकीत जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीवरही चर्चा झाली. विशेषत: वणी विभागात कोळशाच्या जड वाहतूकीमुळे अनेक रस्ते खराब झाले असल्याचे संबंधित विभागाने सांगितल्या नंतर ज्या-ज्या ठिकाणी जड वाहतूक होते अशा ठिकाणी काँक्रीटचे रस्ते घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. या रस्त्यांवर जड वाहनांवर टोल लावा आणि अशा रस्त्यांचे प्रस्ताव तयार करुन सादर करा, असे ते म्हणाले. नागपूर-हैद्राबाद या महामार्गवरील यवमाळ जिल्ह्यातील रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्याची देखभाल दुरुस्तीही होत नाही. तसेच करंजी-वणी-घुग्गुस या रस्त्याचे कामही अतिशय संथ गतीने सुरु आहे. या कामाचीही चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. बैठकीत कृषि पंपांना वीज जोडणी देण्याच्या विषयावरही सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या जोडण्या देण्यासोबतच ट्रान्सफार्मर बदलविण्‍याचे काम सुरु असून राहिलेले चाळीस ट्रान्सफार्मर त्वरीत बसविण्याच्या सूचना त्यांनी वीज विभागाला केल्या. बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा, जलयुक्त शिवार, जिल्ह्यातील पिक परिस्थिती, रब्बीतील पिके आदी विषयांवरही चर्चा झाली.

उसतोड न केल्याने शेतकºयांची आत्महत्या 0

उसतोड न केल्याने शेतकºयांची आत्महत्या

23
यवतमाळ , दि. १७ – डेक्कन शुगर कारखान्याने  उस तोड न केल्याने वादातून मारहाण झाल्याने लिंगी येथील शेतकºयाने आत्महत्या केली. मोतीलाल कुटे (४५) रा. लिंगी (सायखेडा) असे मृतक उस उत्पादक शेतकºयाचे नाव आहे.
डेक्कन शुगरन  गेटकेनच्या परिसरात शंभर उस तोड करणाºया टोळ््या  बसविल्या. त्यापैकी केवळ ५० टोळ््या या गेटमध्ये आहे. गेटकेनच्या बाहेरची उस तोड झपाट्याने सुरू असून परिसरातील उसावर दुर्लक्ष केल्या जात आहे.  आपल्या शिवाय या शेतकºयांना पर्याय नाही अश्या तोºयात डेक्कनचे व्यवस्थापन राहत आहे. त्याचे हे धोरण शेतकºयांच्या जिवाशी खेळ करीत आहे. नोव्हेबर-डिसेंबरचा उस शेतात उभा आहे. पण गेटकेवर मेहरबानी होत आहे. डेक्कन शुगरच्या या कार्यक्रमणालीच्या शेतकºयाला फटका बसतो  आहे. सायखेडा येथील रहिवासी असलेल्या आर्णी तालुक्याचे कृषी सहाय्यकाने फक्त याच शेतकºयांची उस तोड केली नाही. या बाबत जाब विचारण्या करीता  शेतकरी मोतीलाल कुटे गेल असता तेथे वाद झाला. त्यानंतर रात्री कृषी सहाय्यकाने आपल्या सहकाºयांसोबत कुटे याच्या घरी जाऊन मारहाण केली होती. या मारहाणीचा व उस वाळत असून तोड होत नसल्याने हताश होऊन १३ डिसेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार कुटुंबीयाच्या निदर्शनास येताच सदर शेतकºयाला प्रथम आर्णी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र  चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेतकºयाचा मृत्यू झाला. आज बुधवारी लिंगी येथे या शेतकºयांवर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार गांगुर्डे याच्यासह नागरिक उपस्थित होते. त्याच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

December 17, 2014 in विदर्भ
वृद्ध महिलेवर अत्याचार 0

वृद्ध महिलेवर अत्याचार

index.jpeg0
यवतमाळ , दि १७ – मनोरूग्ण असलेल्या वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना बाभुळगाव तालुक्यातील दिघी  येथे मंगळवारी घडली. गणेश फुंडे (३७) याने घरी कुणी नाही या संधीचा फायदा घेत सदर महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दिघी (क्र.२) येथील वृद्ध महिला घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याने घरी एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत घरात घुसून गणेशने  सदर महिलेवर अत्याचार केला. पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी बाभूळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरूद्घ  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुकाध्यक्ष वंदना होटे यांनी पिडीत महिला व तिच्या नातेवाईंना धीर देत मदत केली व आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

December 17, 2014 in विदर्भ
भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट 0

भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट

images
नवी दिल्ली, दि. १७ – मुंबईवर २६/११ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी (सीआयए ) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार हाफिज सईदच्या रडारवर दिल्लीतील दोन हॉटेल्स आणि नवी दिल्ली-आग्रा हायवे रोड आहे. तसेच मेट्रो सुध्दा त्याच्या निशाण्यावर असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच शहरातील शाळा आणि मॉल्सच्या परीसरातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे येत्या २६ जानेवारी स्वातंत्र्यदिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत. बराक ओबामा यांच्या आगमनाआधी दहशतवादी भारतात हल्ला करू शकतात यासाठी देशभरात कडक सुरक्षा ठेवण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत.

December 17, 2014 in देश-विदेश
अभिनेत्रीला किस करण्यासाठी बोली 0

अभिनेत्रीला किस करण्यासाठी बोली

2014-12-17~2-02_ns
नवी दिल्ली, दि. १७ – आपल्या आवडत्या व्यक्तीचा किस घेण्यासाठी एकाने तब्बल १५ लाख रुपये मोजले आहेत.
अमेरिकन टीव्ही अभिनेत्री डिएना अग्रोन ही एका सोशल नेटवर्किंग साईटच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. त्यावेळी डिएनाने एका चॅरिटेबल कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी अभिनेत्रीला किस करण्यासाठी बोली लावण्यात आली. १ हजार रुपयापासून सुरू झालेली ही बोली २३ हजार डॉलरपर्यंत (१४,६३,४९०)थांबली. एका व्यक्तीने एका किससाठी जवळपास १५ लाख रुपये मोजले. १५ लाख रुपये मोजलेल्या व्यक्तीस अभिनेत्री डिएना अग्रोनने आपला किस दिला. ‘किस’मधून मिळणारी रक्कम युध्दग्रस्त असलेल्या मुलांच्या सहायत्तासाठी खर्च करण्यात येणार आहे.

December 17, 2014 in मुख्य पान
तालिबान्यांना धडा शिकवण्यासाठी पाक सैन्यप्रमुख काबूलला रवाना 0

तालिबान्यांना धडा शिकवण्यासाठी पाक सैन्यप्रमुख काबूलला रवाना

2014-12-17~1-01_ns
इस्लामाबाद, दि. १७ – तालिबानी नेता मुल्ला फजुल्लाह याला धडा शिवविण्यासाठी पाकिस्तानी सैन्य प्रमुख जनरल राहिल शरीफ हे अफगाणिस्तानला रवाना झाले आहेत. तेहरीक ए तालिबानी पाकिस्तानी या दहशतवादी संघटनेने पेशावरमधील आर्मी शाळेवर दहशतवादी हल्ला केला यामध्ये निष्पाप १४१ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांमध्ये शाळकरी मुलांचा मोठा समावेश होता. दहशतवादी संघटनेने शाळकरी मुलांना टार्गेट केल्याने पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचाच भाग म्हणून जनरल राहिल शरीफ यांनी काबूलला भेट द्यायची ठरविले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गणी यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. राहिल हे अफगाणिस्तानच्या राजकीय नेत्यांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय सेक्यूरीटीज असिस्टंट फोर्स कंमाडर यांच्याशी चर्चा करणार आहेत अफगाणच्या सीमेवर लपून बसलेला तेहरीक ए तालिबान पाकिस्तान चा म्होरक्या फजुल्लाह याच्यावर अफगान व पाकिस्तान सैनिकांची संयुक्त कारवाई करण्यासाठी राहिल विनंती करणार आहेत.

December 17, 2014 in देश-विदेश
मनोरुग्ण पत्नीकडून पतीची हत्या 0

मनोरुग्ण पत्नीकडून पतीची हत्या

index
मुंबई : मनोरुग्ण पत्नीने पतीच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करीत त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी गोवंडी येथे घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी पत्नीवर हत्येचा गुन्हा दाखल करीत तिला अटक केली आहे.
गोवंडीच्या इंडियन ऑइल नगर येथे मृत देबासीस सेन (५६) हे त्यांच्या ४९ वर्षीय पत्नीसह राहतात. पत्नीला पाच वर्षांपासून स्क्रिझोफेनिया हा मानसिक आजार असल्याने त्यांनी तिच्यावर उपचार सुरू होते. अधूनमधून तिला झटके येत असल्याने देबासीस तिला एकटीला सोडून कुठेही बाहेर जात नव्हते. सोमवारी सकाळी देखील दोघेही झोपलेले असताना या महिलेला अचानक झटका आला. या वेळी तिने घरातील लोखंडी रॉडने पतीवर हल्ला केला. देबासीस यांच्या डोक्यावर, मानेवर आणि हातांवर गंभीर जखमा झाल्याने त्यांचा घरातच मृत्यू झाला. काही वेळानंतर याच परिसरात राहणारी त्यांची मोठी मुलगी घरी परतली. तिच्या हा प्रकार लक्षात येताच तिने देबासीस यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वी ते मृत झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले

December 17, 2014 in महाराष्ट्र
पाक शोकमग्न, भारताने पाळले मौन 0

पाक शोकमग्न, भारताने पाळले मौन

shok
नवी दिल्ली – पाकिस्तानात सैनिकी शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या निरपराधांना आज संपूर्ण भारतभर श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन मिनिटं मौन पाळून शाळा-शाळांमधून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, संसदेनेही या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला.
तालिबानी सैतानांनी निष्पाप मुलांचे निर्दयीपणे प्राण घेतल्याने जगभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध होत आहे. या संकटात भारतानेही पाकिस्तानसाठी आपली सहवेदना दर्शविली आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी रात्रीच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली व तीव्र शब्दांत शोक व्यक्त केला. त्यानंतर पंतप्रधानांनी देशभरातील शाळांमध्ये दोन मिनिटं मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आज बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मौन बाळगून या हल्ल्याचा निषेध केला. ‘या कठिण प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असा संदेश या माध्यमातून भारताने पाकिस्तानला दिला आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज पेशावरमधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दोन मिनिटं मौन पाळून सदस्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत शोकसंदेशही वाचून दाखवला.

December 17, 2014 in देश-विदेश