पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 9th, 2014

मंगळावर पाणी सापडले! 0

मंगळावर पाणी सापडले!

Gale-Crate-01-300x169
वॉशिंग्टन , दि. ९ (प्रतिनिधी)- मंगळ ग्रहावर पाणी असल्याचा नवा पुरावा अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाला आढळून आला. भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांच्या पथकास मंगळ ग्रहावर जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेले वातावरण दृष्टीस पडले.
नासाच्या मार्स क्युरिऑसिटी या सुप्रसिद्ध अवकाश यानाने यासंदर्भातील छायाचित्रे व अन्य स्वरुपातील माहिती संकलित केली आहेत.मार्स क्युरिऑसिटीने मंगळावरील गेल क्रेटर येथे एकेकाळी तळ अथवा अनेक तळाच्या रुपाने नदी वाहत होती. अवकाशातून मंगळ भूमीवर कोणत्यातरी वस्तूने टक्कर दिल्याने मंगळावर निर्माण झालेला मोठ्या खड्ड्याला गेल क्रेटर असे नाव देण्यात आले आहे. क्युरऑसिटीने पाठवलेल्या नव्या छायाचित्रामुळे गेल क्रेटर परिसरात असे वातावरण होते की ज्यामुळे या लाल गृहावर जीवसृष्टी निर्माण होऊ शकेल. लाखो वर्षे एका मोठ्या तळाच्या भूगर्भात झालेल्या हलचालीतून मंगळावर माऊंट शार्प (पर्वत)ची निर्मिती झाल्याचे नासाने म्हटले आहे. जर माऊंट शार्प संदर्भातील आमचा अंदाज बरोबर असेल तर  मंगळाच्या भुपृष्ठावर निर्माण होणारी उष्ण आणि थंड वातावण निर्मिती भूगर्भातूनच झाली असावी असे या मोहिमेत सहाय्यक शास्त्रज्ञ असलेले भारतीय वंशाचे संशोधक अश्विन वसावदा यांनी सांगितले.नासाला मिळालेल्या छायाचित्रावरून हे स्पष्ट होते की गेल क्रेटरच्या खोल १५४ किलो मीटरमध्ये लाखो वर्ष पाण्याचा साठा होता. तसेच तो सातत्याने अटत होता आणि पुन्हा भरत होता, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. मंगळावरील वातावणता असे काय बदल झाले ज्यामुळे तेथील वातावरण अति थंड झाले याचा शोधही घेतला जात आहे. माऊंट शार्पची निर्मिती कशी झाली याचा सध्या शोध घेतला जात आहे. या पर्वताची उंची पाच किलोमीटर इतकी आहे. तसेच त्याच्या खाली अनेक छोटी छोटी पर्वते आहेत.नासाने पाठवलेले मार्स क्युरिऑसिटी सध्या माऊंट शार्पच्या पायथ्याशी संशोधन करत आहे.

दुष्काळाच्या मुद्यावरुन विरोधकांनी धरले सरकारला धारेवर 0

दुष्काळाच्या मुद्यावरुन विरोधकांनी धरले सरकारला धारेवर

index.jpeg000
नागपूर , दि. ९ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस दुष्काळाच्या प्रश्नावरुन वादळी ठरला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने पॅकेज जाहीर करण्याची मागणी लावून धरली.
विरोधकांनी विधानसभेत हा मुद्दा लावून धरला. यावरुन गदारोळ सुरु राहिल्याने विधानसभेच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल आहे. सरकारने आधी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करावी नंतर चर्चा करावी अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. विधान परिषदेच कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आल.
सकाळी विधानसभेच कामकाज सुरु होताच विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम ५७ अंतर्गत प्रश्नोत्तराचा तास निलंबित करुन, दुष्काळाच्या विषयावर चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र सभापती हरीभाऊ बागडे यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.
त्यावर संतापलेल्या विरोधकांनी मोकळया जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. पुन्हा कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाची सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी सभापतींनी घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करुन, सभागृहाचे प्रश्नोत्तराचा तास सुरु केला.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना विरोधी पक्षात असताना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने विरोधी पक्ष नेत्यांना नेहमीच बोलण्याची संधी दिली आहे याची आठवण करुन दिली.

December 09, 2014 in मुख्य पान
काकासह दोन पुतण्यांना जलसमाधी 0

काकासह दोन पुतण्यांना जलसमाधी

anjarle1
चाळीसगाव , दि. ९ (प्रतिनिधी) – धोकादायक वळणावर कारवरील ताबा सुटून जामदा डाव्या कालव्याजवळील पाण्यात कार उलटल्याने पाचोरा तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू झाला. हे तिघेही उच्चशिक्षित असून, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील यांच्या कुटुंबातील होते. या तिघांवर मंगळवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आंबे वडगाव येथील खासगी पशू चिकित्सक भूषण पाटील व त्यांचे पुतणे निखील पाटील (२९) व उमेश पाटील (२८) हे तिघे सोमवारी जळगाव येथे कामानिमित्त गेले होते. निखील व उमेश हे दोघे वडिलांचा ठेकेदारी व्यवसाय सांभाळतात. या दोघांचे जेसीबी धरणगाव येथे कामावर देण्यात आले होते. त्या जेसीबीसाठी लागणारे ऑइल देण्यासाठी धरणगाव येथे हे तिघे गेले होते. आपले काम आटोपून रात्री ११ च्या सुमारास पाचोऱ्याकडे येत असताना पारोळा-धरणगाव दरम्यान नालबंदी गावाजवळील वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट जवळून वाहणाऱ्या जामदा डाव्या कालव्यात जाऊन उलटली, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तिघांशी रात्री संपर्क न झाल्याने नातेवाईकांसह पोलिसांनी रस्त्याने शोध घेतला असता त्यांचा अपघात झाल्याचे लक्षात आले. या तिघांवर त्यांचे मूळ गाव असलेल्या वाडी शेवाळी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघे उच्च शिक्षित असून निखिलला ११ महिन्यांचा मुलगा आहे आणि उमेशला ६ महिन्यांची मुलगी आहे. पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील यांचे भूषण पाटील हे चुलत भाऊ तर निखील आणि उमेश हे पुतणे होते.

December 09, 2014 in मुख्य पान
विवाहीतेची जुळ्या बाळांसह रेल्वेखाली झोकून आत्महत्त्या 0

विवाहीतेची जुळ्या बाळांसह रेल्वेखाली झोकून आत्महत्त्या

index
जळगाव , दि. ९ (प्रतिनिधी) – जळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील माहेर असलेल्या व तरसोद येथील सासर असलेल्या एका २२ वर्षीय विवाह‌ीतेने मंगळवारी दुपारी तरसोद येथील रेल्वेलाईनजवळ आपल्या पाच मह‌िन्यांच्या जुळ्या बाळांसह रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे जिल्हा रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवासी असलेल्या दीपमाला धनराज सोनवणे ( वय २१) हीचा ७ जून २०१३ ला तरसोद येथील रेल्वेत नोकरीस असलेले धनराज सुधाकर सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. लग्न झाले तेव्हा दीपमालाच्या आजोबांनी लग्नासाठी ५० हजार रुपये व दोन तोळे सोने हुंडा म्हणून दिले होते. दरम्यान दीपमालाचा दीर आनंदा सोनवणे याला ठेका घ्यायचा असल्याने सातत्याने दीपमालाकडून त‌िचा नवरा धनराज, सासरा व सासू पैशांची मागणी करीत होते. दीपमालाची माहेरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने व त‌िचे वडील भंगार गोळा करण्याचे काम करीत असल्याने ती माहेरून पैसे आणू शकत नव्हती. त्यातच त‌िला दोन जुळी मुले झाली. दीपमालाला होणारा त्रास वाढत असल्याने त‌िने वड‌िलांकडे तक्रार केली होती. त्यावरून दीपमालाचे वडील मंगळवारी सकाळीच तरसोद येथे जाऊन त‌िच्या सासरच्या मंडळींची समजूत काढून आले होते. दरम्यान त‌िचे वडील तिच्या सासरहून निघाल्यानंतरही तिला त्रास सुरूच राह‌िल्याने दीपमालाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपली मुले श्रेयस आणि श्रावण यांना कडेवर घेऊन धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. रेल्वे तीच्या अंगावरून चालून गेल्याने त‌िचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही बाळही रेल्वेचा फटका लागल्याने जागीच गतप्राण झाली.
ही घटना समजताच दीपमालाच्या नातेवाईकांनी तरसोदकडे धाव घेतली. यावेळी तिची सासू घराच्या शौचालयात लपून बसली होती, तर नवरा आणि दीर हे दोघे घरून पसार झाले होते. मातेसह दोघा चिमुकल्यांचे मृतदेह घेऊन नातेवाईक जिल्हा रूग्णालयात आल्यानंतर सासरा सुधाकर सोनवणे, दीर आनंदा सोनवणे सासू व जेठाणी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान दीपमालाचा दीर आनंदा याच्या पहिल्या पत्नीने देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे आत्महत्या केली होती. तर दुसऱ्या पत्नीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे उपस्थितांनी सांगितले.

December 09, 2014 in मुख्य पान
 डॉ. आंबेडकर ग्रंथ प्रकाशनासाठी ३ कोटींचा निधी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे 0

डॉ. आंबेडकर ग्रंथ प्रकाशनासाठी ३ कोटींचा निधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे

index.jpeg 1
नागपूर  , दि. ९ (प्रतिनिधी) – उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रकाशनाचे काम सुरू झाले असून दहा ग्रंथ ‘रिप्रिंट’ साठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. याबाबत प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न विचारला होता.‘या कामासाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी २२ लाख खर्च करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १९ लाख रुपये खर्च झाले असून त्याद्वारे काम सुरू आहे असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत विरोधकांनी दुष्काळाच्या विषयावर गदारोळ सुरु केला असतानाच या गदारोळामध्ये प्रश्नोत्तरे पुकारण्यात आली, पण यावेळी गदारोळ सुरु राहिल्यामुळे प्रश्नोत्तराचा तास उरकला गेला, त्यानंतर तावडे यांनी सभागृह तहकूब झाल्यानंतर विधान परिषदेत पटलावर ठेवण्यात आलेल्या प्रश्नांसदर्भात पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी सांगितले की,काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात निधी असूनही तो पुरेसा वापरण्यात येत नव्हता.त्यावेळच्या समितीने यासाठी पाठपुरावा करायला हवा होता. मात्र माजी मंत्री राजेश टोपेंच्या नेतृत्वाखालील जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत, जनार्दन चांदूरकर यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. मात्र विरोधकांच्या खूर्चीवर बसण्याची वेळ आल्यानंतर मात्र त्यांनी हा निधी मिळत नसल्याची तक्रार केली, हा अजब प्रकार म्हणायला हवा, असा टोलाही तावडे यांनी विधान भवनाच्या दालनात पत्रकारांशी बोलताना मारला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रकाशन समितीचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणेदेखील सरकारच्या विचाराधिन आहे’, असे विनोद तावडे यांनी उत्तरात सांगितले.
अंजिठा लेण्याच्या संवर्धनात खंड पडणार नाही
औरंगाबादची जग प्रसिध्द अजिंठा लेण्याची  पावसामुळे दुरावस्था हेात असली तरी केंद्र सरकारच्या वतीने व अमेरिकन कंपनीच्या मदतीने हानी टाळण्यासाठी उपायोजना केल्या जात असून संवर्धनात खंड पडणार नाही, अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत मंगळवारी  दिली.
सुनील तटकरे, धनंजय मुंडे इत्यादींनी  हा तारांकित प्रश्न उपसिथत केला होता. दुष्काळावरविरोधकांनी गोंधळ घातला असतानाही सभापतींनी प्रश्नोत्तरांच्या तासाची घोषणा केल्याने ते पटलावर आले. पावसाने अजिंठा लेण्याच्या डोंगरमाथ्याची  माती भूसभूशीत होत आहे. मात्र दगडकाम मजबूत राहण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ, आरंगाबाद यांच्याकडून लेण्यांचे संवर्धन केले जात आहे. यासाठी अमेरिकन कंपनीचीही मदत घेतली जाते. या कंपनीकडून दर तीन वर्षांनी लेण्यांची पाहणी करून त्यानुसार दुरूस्ती करण्यात येत आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.

व्यवस्थापनच्या प्रवेश प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणार
राज्यात असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्यामधून दिल्या जाणा-या प्रवेशात पारदर्शकता असली पाहिजे आणि गुणवत्तेच्या आधारावरच प्रवेश दिले गेले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी केले.
अभियात्रिकी महाविद्यालयात अल्पसंख्याक कोट्यातून होणा-या प्रवेशात गैरव्यवहार आणि अनियमितता होती.त्यामुळे या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अल्पसंख्याक कोटयातून भरल्या जाणा-या ५० टक्के जागा गुणवत्तेच्या आधारावरच भरल्या गेल्या पाहिजेत. नवी मुंबईतील फादर अँग्नेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या प्रवेश पध्दतीचा राज्यात अवलंब करण्याबाबचा प्रश्न नरेंद्र पाटील, धनंजय मुंडे, संदिप बाजोरिया आदी सदस्यांनी उपस्थित केला होता.

अकोला रूग्णालय शस्त्र क्रिया विभाग दुरूस्तीसाठी बंद
अकोला रूग्णालय शस्त्रिक्रया  विभाग दुरूस्तीसाठी सध्या बंदं आहे. मात्र शस्त्रक्रिया बंद झालेल्या नाहीत. अस्थिव्यंग शस्त्रक्रियागृहात शल्यशस्त्र  विभाग सुरू करण्यात आला असून तेथे शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.गोपी किशन बाजोरिया यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभाग बंद असून शस्र क्रियांसाठी दोन तीन महिन्यांच्या तारखा देण्यात येत असल्याचे बाजोरियांनी  नमूद केले होते. मात्र मुख्य शस्र क्रियांसह किरकोळ शस्र क्रियांकडेदुर्लक्ष झालेले नाही. यामुळे संबंधितांवर कारवाईचा प्रश्नच येत नाही. इमारतीचे बांधकाम  पूर्ण होताच नेहमीप्रमाणे शस्त्र क्रिया विभाग सुरू होईल, असे तावडे यांनी सांगितले.

तालुका क्रीडा संकुलाचा विषय प्राधान्यावर
‘राज्यात ३८० तालुका क्रीडा संकुले उभारण्याचे काम २००३ पासून सुरू आहे. यापैकी ६५ क्रीडा संकुलांना मार्च २०१४ अखेर निधी वितरीत झाला आहे. तर १७ संकुलांच्या अंदाजपत्रक आराखड्यांना राज्य क्रीडा विकास समितीची मान्यता मिळाली आहे. ३३ संकुलांचे अंदाजपत्रक आराखडे संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित १०४ क्रीडा संकुलांसाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, अशी माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित व धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

December 09, 2014 in मुख्य पान
लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक शोषण , प्रियकराविरूद्घ गुन्हा दाखल 0

लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक शोषण , प्रियकराविरूद्घ गुन्हा दाखल

index.jpeg 2
यवतमाळ , दि. ९ (प्रतिनिधी) -एका युवतीला प्रेमाच्या जाळयात ओढून तीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष लैगिंक शोषण केल्याचा  प्रकार सोमवारी रात्री उजेडात आला. वडगाव रोड पोलिसांनी याप्रकरणी प्रियकर आरोपीस अमरावती येथून अटक केली.
सचिन कृष्णराव माऊले (२५)  रा. हनुमान नगर अमरावती असे आरोपीचे नाव आहे. सन २०१२ मध्ये त्याने भ्रमणध्वनीवरून फोन लावला. सदर क्रमांक चुकल्याने फोन वणी तालुक्यातील चिखलगाव येथील २२ वर्षीय युवतीला लागला होता. त्यावेळी त्या दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. अशातच त्याच्यामध्ये संवाद वाढल्याने युवकाने सदर युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ््यात ओढळे. ती युवती शहरातील एका नर्सींग विद्यालयात प्रशिक्षण घेत असून जयभारत चौकातील महीलेच्या घरी भाड्याने राहत होती. याच ठिकाणी तो तीला भेटण्यासाठी येत होता. दरम्यान तीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक सबंध प्रस्तापित करून लैगिंक शोषण केले. दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असताना युवकाने लग्न करण्यास नकार दिला. तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे युवतीने वडगाव रोड पोलिस ठाणे गाठून सचिन माऊले याच्याविरूद्घ तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३७६, ३२३, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. वडगाव रोडचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पिदुरकर व पथकाने अमरावती येथे जाऊन आरोपी सचिनला अटक केली.

December 09, 2014 in मुख्य पान
आत्महत्या  चिमुकलीसह महीलेची 0

आत्महत्या चिमुकलीसह महीलेची

images2
यवतमाळ , दि. ९ (प्रतिनिधी) – शहरालगत भोसा येथे महीलेने आपल्या एक वर्षीय चिमुकलीसह  आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी उघडकीस आली. अर्चना शांताराम राऊत (२८), निधी शांताराम राऊत (१) रा. भोसा अशी मृत मायलेकीची नावे आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील अर्चनाचा विवाह दोन वर्षापूर्वी अकोला बाजार येथील शांताराम सोबत झाला होता. लग्नानंतर ते शहरालगत भोसा येथे भाड्याने खोली करून राहत होते. दरम्यान तीचा पती शांताराम हा काल सोमवारी भिसीचे पैसे आणण्यासाठी बाहेरगावी गेला होता. आज सकाळी तो भोसा येथे परत येताच पत्नी व मुलगी घरी दिसली नाही. त्यामुळे त्याने शोधाशोध सुरू केली असता त्याच भागातील विहीरीत अर्चना व निधीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, वडगाव रोड पोलिस स्टेशनचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग मिरासे, पोलीस उपनिरीक्षक उमेश नासरे यानी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या महीलेने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

December 09, 2014 in मुख्य पान
दुष्काळावरील चर्चेबाबत राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल! -आ.माणिकराव ठाकरे 0

दुष्काळावरील चर्चेबाबत राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल! -आ.माणिकराव ठाकरे

index.jpeg 3
नागपूर, दि. ९ (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या व दुष्काळासंदर्भात विधीमंडळातील चर्चेबाबत राज्य सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.
विधीमंडळ कामकाजाबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने दि. 8 डिसेंबर रोजी शेतक-यांच्या प्रश्नावर नियम 289 अन्वये दिवसभराचे सर्व कामकाज रोखून चर्चा करण्याची मागणी विधान परिषदेत मांडली. सन्माननीय सभापतींनी नियम 260 अन्वये विरोधी पक्षांच्या मागणीप्रमाणे चर्चा करण्याचे निर्देश दिले. विरोधी पक्षांच्या वतीने आ. माणिकराव ठाकरे चर्चेला प्रारंभ करतील, असेही त्यांनी नमूद केले.
परंतु, सत्तापक्षांनी दि. 8 डिसेंबर 2014 रोजीच्या सभापतींच्या निर्देशानुसार चर्चा करण्याऐवजी दि. 9 डिसेंबर 2014 रोजी एक नवीन प्रस्ताव कार्यक्रमपत्रिकेवर आणला. सत्तारूढ पक्षाचा हा प्रस्ताव शेतक-यांना तातडीने दिलासा देणारा नाही. त्यामध्ये प्रामुख्याने भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये, या अनुषंगाने उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत.
शेतक-यांची वर्तमान परिस्थिती अत्यंत विदारक असून, त्यांना तातडीने मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हतबलता सहनशीलतेपलिकडे गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शेतक-यांना धीर द्यायचा असेल आणि त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करायचे असेल तर राज्य सरकारने तातडीने मदत देणारे आर्थिक मदतीचे पॅकेज व कर्जमाफी जाहीर करण्याची नितांत गरज आहे. नेमका हाच आग्रह काँग्रेसने विधान परिषदेत लावून धरला. मात्र, राज्य सरकारने काँग्रेसच्या या भूमिकेचा विपर्यास करून काँग्रेसला चर्चा नको असल्याचा संभ्रम निर्माण केला, असा आरोप आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी केला.
विधानसभेतही साधारणत: हेच चित्र होते. काँग्रेसचे गटनेते आ.श्री राधाकृष्ण विखे पाटील व उपनेते आ.श्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडून चर्चेचा आग्रह धरला. या सभागृहात देखील सत्तापक्षाने विरोधी पक्षांच्या स्थगन प्रस्तावाऐवजी भविष्यातील उपाययोजनांवर भर देणा-या प्रस्तावावर चर्चा करण्याची भूमिका घेतली. त्यामुळेच शेतक-यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसला दोन्ही सभागृहांमध्ये आक्रमक भूमिका स्वीकारावी लागली. शेतक-यांना तातडीचा दिलासा अत्यंत आवश्यक असून, राज्य सरकार शेतक-यांना भरीव आर्थिक पॅकेज आणि कर्जमाफी देईस्तोवर काँग्रेस पक्षाची विधीमंडळातील आणि विधीमंडळाबाहेरील आक्रमक भूमिका अशीच कायम राहिल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ठामपणे सांगितले.

December 09, 2014 in मुख्य पान