

नागपूर दि. ६ (विशेष प्रतिनिधी) – नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी विदर्भातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना तैनात केले आहे. वर्धा येथील पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्यानंतर गृहविभागाने पोलीसांची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये पोलीस अधिकाºयांसाठी मिनरल वॉटरची व्यवस्था केली आहेत. तर पोलीस शिपायांना सेन्टेक्श टाकीतील पाणी ग्लासविना प्यावे लागते. नास्त्यामध्येही अधिकाºयांना गुलाब जामुन देण्यात आले तर शिपायांना मसाला भात दिला. गृह विभागाकडून पोलिसांवर अन्याय होत असल्याचे वास्तव दाखविणारे हे छायाचित्र.
Archive for December 6th, 2014
0
पोलीस अधिकाºयांसाठी मिनरल वॉटर
0
अयनुद्दीन सोलंकी कुर्लीच्या सरपंचपदी

घाटंजी दि. ६ (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुर्ली येथील अयनुद्दीन रामसुद्दीन सोलंकी यांची कुर्ली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार ए.बी. वीर हे होते. तर मंडळ अधिकारी व्ही. बी. रत्नपारखी, ग्रामसचिव रमेश गणवीर, तलाठी भारत लढे आदींनी सरपंच पदाच्या निवडणूकीत सहकार्य केले. यावेळी पारव्याचे ठाणेदार एल.डी. तावेर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सोलंक यांनी आपल्या निवडीचे श्रेय केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर आ. प्रा. राजू तोडसाम, भाजपाचे जेष्ठ नेते अशोक यमसनवार यांना दिले आहे. यापुर्वी घाटंजी तालुका रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष, जिल्हा स्तरीय अन्नधान्य दक्षता समितीचे सदस्य, कुर्लीचे सरपंचपदही त्यांनी भूषविले आहे. विकासात्मक व वैयक्ति कामावर अधिकाधिक भर देऊन गावाचा विकास करण्याचा निर्धार सोलंकी यांनी व्यक्त केला.
0
देशीदारूसह इंडीका जप्त ; दोघास अटक
यवतमाळ, दि. ६ ( प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथून अवैधपने देशीदारुची वाहतुक करणाºया दोन आरोपींना देशी दारू व इंडीका जप्त केली. आज दुपारी विशेष पथकाने ही कार्यवाही केली.
सुनील सदानंद तोडसाम (३४) रा. रुंझा ता. पांढरकवडा, चरणदास पुजाजी टेकाम (३५) रा. शिवणी ता. घाटंजी अशी आरोपींची नावे आहे. डोंगरखर्डा येथून एम.एच. ३०/ एल. ८५८७ क्रमांकाच्या इंडीकामध्ये पाच पेट्या देशी दारू घेऊन जात होते. या बाबतची माहीती मिळताच यवतमाळ येथील विशेष पथकाने सदर इंडीका अडवून झडती घेतली. त्यामध्ये पाच देशी दारु आढळून आल्याने दारुसह इंडीका किंमत १ लाख ५८ हजार रुपयाचा माल जप्त केला. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे याच्या मार्गदर्शनाखाली राहुल मनवर, इकबाल शेख, संतोष मडावी, प्रमोद मडावी यांनी केली. पुढील कार्यवाहीसाठी कळंब पोलिसांच्या स्वाधिन केले.
0
मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

मुंबई दि. ६ (विशेष प्रतिनिधी) – मोठ्या रस्सीखेचानंतर सत्तेत आलेल्या शिवसेनेच्या पदरात खातेवाटपातून फारसं काही पडलेलं दिसत नाही. भाजपने ऊर्जा, जलसंपदा आणि पाणी पुरवठासारखी महत्त्वाची खाती घेतली आहेत. तर शिवसेनेला सार्वजनिक बांधकाम खाते वगळता कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत.
भापजचे कॅबिनेट मंत्री :
गिरीश बापट : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन. संसदीय कार्य
गिरीश महाजन : जलसंपदा
बबनराव लोणीकर : पाणी पुरवठा व स्वच्छता
चंद्रशेखर बावनकुळे : ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा
राजकुमार बडोले : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्रीः
दिवाकर रावते : परिवहन
सुभाष देसाई : उद्योग
रामदास कदम : पर्यावरण
एकनाथ शिंदे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
डॉ. दीपक सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
भाजपचे राज्यमंत्री:
प्रवीण पोटेः उद्योग-खणीकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम वगळून)
रणजीत पाटीलः विधी-न्याय
विजय देशमुख : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग
राम शिंदे : गृह, पणन, सार्वजिक आरोग्य, पर्यटन
राजे अंबरिश अत्राम : आदीवासी विकास
शिवसेनेचे राज्यमंत्री
संजय राठोड : महसूल
दादा भुसे : सहकार
विजय शिवतारे : जलसंपदा, जलसंधारण
दीपक केसरकर : वित्त, ग्रामविकास
रवींद्र वायकर : गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमीपूजन १४ एप्रिलला

मुंबई दि. ६ (विशेष प्रतिनिधी) -भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमीपूजन येत्या १४ एप्रिलला करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे हे स्मारक उभारणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५८ व्या महापरिवनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, रिपाइं नेते रामदास आठवले आणि मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी देखील महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर हजेरी लावली. राज्यातून लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात पोहोचलेत.
0
हुंडाबळी प्रकरणी सासू, नणंदेला जन्मठेप

अहमदनगर दि. ६ (विशेष प्रतिनिधी) – पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने सुनेला जाळून मारल्याप्रकरणी सासू व नणंदेला जन्मठेप तर पती व सास-यास प्रत्येकी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ ए़ गायकवाड यांनी ठोठावली़
हुंड्यापोटी २५ हजार रुपये आणण्यासाठी सासू शीला चिखले, सासरा बाळासाहेब चिखले, नवरा पवन आणि नणंद सारिका हे कोपरगाव येथील रेणुका पवन चिखले हिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते़ ९ जून २००६ रोजी रेणुका स्वयंपाक घरात असताना शीला हिने तिच्या अंगावर रॉकेल ओतले व सारिकाने पेटवून दिले़ या गोष्टीस पवन व बाळासाहेब यांनी प्रोत्साहन दिले़ पेटत्या अवस्थेत रेणुकाला घरात सोडून सर्वजण निघून गेले़.
परिसरातील लोकांनी आग विझवून तिला रुग्णालयात दाखल केले. पण दुस-याच दिवशी तिचा मृत्यू झाला़ याप्रकरणी घरातील चौघांविरुद्ध हुंडाबळी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता़ या खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले़ रेणुकाचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरण्यात आला़
0
चैत्यभूमीवर लाखोंची रीघ : बाबासाहेबांना अभिवादन

मुंबई दि. ६ – डोक्यावर निळी टोपी, हातात झेंडा, काखेत सामानाची बॅग अडकवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेने लाखोंच्या संख्येने निळ्या लाटा दोन दिवस अगोदरपासूनच चैत्यभूमीच्या दिशेने धडकल्या आहेत.
‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी दादर परिसर दणाणून जात आहे.चैत्यभूमीच्या दिशेने येणारे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणा-या स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वेस्थानक ते चैत्यभूमी-शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करताना दिसत आहेत.
राज्याच्या बाहेरून येणा-यांची तीन दिवसांपासूनच गर्दी सुरू आहे. कुटुंबांसह चैत्यभूमी-शिवाजी पार्कवर मिळेल त्या जागेत मुक्काम करणा-या बाबांच्या अनुयायांवर थकव्याचा लवलेशही दिसत नाही. अनेक सामाजिक संस्थांकडून मोफत भोजनदान सुरू आहे.
नेत्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणा-या अभिवादन सभांबाबत चर्चा करताना त्यांच्या स्वार्थी राजकारणाबाबत अनेकांकडून खेद व्यक्त होताना दिसत होता. महापालिका व संस्था -संघटनांकडून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अनेकांमधून समाधान व्यक्त करण्यात येते होते. बाबासाहेबांना अभिवादन क रण्यासाठी लोटणारा जनसमुदाय दरवर्षी वाढतो आहे.
चैत्यभूमी परिसरात प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिरे, क्रांतीगीतांच्या कॅसेटस आणि ध्वनीफिती, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्यांचे स्टॉल, महामानवाच्या प्रतिमा आणि पुतळे विकत घेण्यासाठी स्टॉलवर गर्दी उसळली आहे. ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले माझे भीमराव’ या गीताने अनेकांचा उर भरुन येत होता.
लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर बाबांचा क्रांतीचा मळा फुलला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी वर्षानुवर्षे अनुयायी येत आहेत. छोटय़ा लेकरांसह ८० वर्षाच्या वृद्धांपर्यंत सा-यांनीच अभिवादनासाठी रांगा लावल्या आहेत.
0
कराडमध्ये कंटेनरची बसला धडक, पाच ठार

मुंबई दि. ६ – पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीकच्या बेलवडे गावाजवळ शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. इंचलकरजीहून शिर्डीला निघालेल्या भाविकांच्या खासगी बसला कंटेनरने जोरदार धडक दिली.
या अपघातात बसमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. आठ प्रवासी जखमी झाले आहेत. काही जखमींना कराडच्या सरकारी रुग्णालयात तर, काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेलवडे गावाजवळ बस रस्त्याच्या कडेला थांबली असताना, मागून वेगात आलेल्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीवेळासाठी विस्कळीत झाली होती. अपघातानंतर कंटेनरचा चालक कंटेनर तिथेच सोडून फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
0
मेहुणीनं भर मांडवात किस केलं आणि लग्न मोडलं


अलीगड (उत्तर प्रदेश), दि. ६ – ऐन लग्नाच्या दिवशी उत्साहाच्या भरात मेहुणीने नववर असलेल्या दीराला किस केलं आणि त्याच्यासोबत तिथंच नाच केला म्हणून ते लग्नंच मोडण्याची घटना इथे घडली आहे. उच्चशिक्षित घरात शहरातल्या प्रतिष्ठित व्यक्तिंसह महापौरांनीही हजेरी लावलेल्या लग्नसमारंभात हा प्रकार घडला आहे.
बॉलीवूडमधल्या एखाद्या चित्रपटात शोभाव असाच हा प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख झाल्यानंतर भेटीगाठी झाल्या, दोघांच्या घरच्यांनी पसंती दिली आणि लग्नाचा बार उडवण्यात आला. आता लग्न लागणार अशी वेळ आली असताना अत्यंत खुशीत आलेल्या वधुच्या बहिणीने नववराला किस केलं आणि त्याच्यासोबत नृत्याच्या चार स्टेप्सही केल्या. घरच्यांसह सगळे पाहुणे हे दृष्य बघून अवाक झाले आणि त्यांच्या नापसंतीची मोहरदेखील चेह-यावर उमटली. परंतु, उत्साहाच्या अतिरेकात मेहुणीच्या काही ध्यानात आलं नाही आणि अखेर रणकंदन माजलेल्या अवस्थेत हे लग्नंच मोडलं. हा प्रकार घडल्यावर दोन तट पडले आणि काही कळायच्या आत एकमेकांवर शिव्याशापांचा हल्ला करत लग्नमंडपाला युद्धभूमीचं स्वरूप प्राप्त झालं. मुलीच्या घरच्यांनी केवळ नववराला ताब्यात घेतलं नाही, तर त्याच्या नातेवाईकांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अलीगडच्या महापौर शकुंतला भारती यांनी वाद सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. हा सगळा त्यांचा वैयक्तिक मामला होता, परंतु वाद सोडवण्याचा आपण प्रयत्न केल्याचे भारती यांनी सांगितले. नंतर थंड झालेल्या दोन्हीकडच्या लोकांनी एकमेकांविरोधात पोलीस केस करण्याचे मात्र टाळले आणि प्रकरणावर पडदा टाकला. अर्थात, मेहुणीचा एक किस असा भारी पडला आणि तूर्तास तरी ते लग्न मात्र मोडले.










