
नवी दिल्ली, दि. ८ (प्रतिनिधी) मध्यप्रदेशच्या तुरुंगातून फरार झालेले पाच दहशतवादी पाकच्या ISI च्या मदतीने देशात हल्ले करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. हे पाचही दहशतवादी बंदी घातलेल्या सीमी संघटनेचे आहेत. हे दहशतवादी गेल्या वर्षी तुरुंगातून फरार झाले होते. एकूण सहा दहशतवादी तुरुंगातून फरार झाले होते. त्यापैकी एकाला पकडण्यात आलं आहे.
राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक हे या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ल्यांनी हादरलेल्या काश्मीरनंतर गुप्तचर यंत्रणेने आता देशाच्या इतर भागात दहशतवादी हल्ल्यांचा इशारा दिला आहे.
Archive for December 8th, 2014
0
दहशतवादी हल्ल्याची शक्यता
0
वडिलाकडून मुलीवर अत्याचार

ठाणे , दि. ८ (प्रतिनिधी) – दिवसा शाळेत झोपणाऱ्या सातवीतील विद्यार्थिनीला डॉक्टरांनी तपासणी करतांना त्याबाबत विचारणा केली असता, अखेर आपले वडील रात्री शारीरिक अत्याचार करत असल्याने झोपता येत नाही. त्यामुळे दिवसा झोप येते, अशी धक्कादायक कबुली तिने दिल्यावर डॉक्टर व शिक्षक सर्दच झाले. त्यानंतर तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता असे समजते.
मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात हे कुटुंब राहते. आरोपी एका शाळेत खिचडी बनवण्याचे काम करतो तर, त्याची पत्नी मोलमजुरी करते. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. त्यापैकी इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीवर तिचे वडीलच गेल्या वर्षभरापासून शारीरिक अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे.
सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर व एका खासगी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून हा प्रकार पोलिसांना समजला. त्यानंतर चिल्ड्रन प्रोटेक्शन युनिटच्या महिला कॉन्स्टेबल प्रतिभा मनोरे व नीलम वाकचौरे यांनी या मुलीसह तिच्या आईला धीर दिला. त्यानंतर पिडीत मुलीची आईने केलेल्या तक्रारीनंतर नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती सीनिअर इन्स्पेक्टर मदन बल्लाळ यांनी दिली. आरोपीला अटक केली आहे.
0
वाघाने पाडला गाय व गोºह्याचा फडशा

यवतमाळ , दि. ८ (प्रतिनिधी) – झरी तालुक्यातील कोडपाखिंडी येथे गाय व गोºह्याचा फडशा पाडल्याची घटना आज मंगळवारी घडली. या घटनेने शेतकºयासह गावकºयांमध्ये दहशत पसरली आहे.
मार्की येथील हरि भोंगळे यांच्या शेतात वाघाने बैलाची शिकार केल्यानंतर, शेकापूर, मुच्छी, मार्की गावात पशुधनाची शिकार केली होती. शुक्रवारी कोडपाखिंडी येथे नितीन मुत्यलवार यांच्या शेतात वाघाने रानडुकराचा फडसा पाडला. सोमवारी वाघाने एदलापूर शिवारात गंभीर रघूनाथ दिडसे यांच्या शेतात गाई व गोºह्याचा फडशा पाडला. प्रत्यक्षदर्शींनी शिकारीनंतर वाघ लिंगती गावाकडे पळून गेल्याची माहिती दिली. दुसरा गावातील नाल्याजवळ वाघाच्या पंजाचे ठसे दिसून आले. या घटनेमुळे लिंगती, धानोरा, एदलापूर, गाडेघाट परिसरात शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी, मजूर शेतावर जाण्याची हिंमत करताना दिसत नाही.
0
औरंगाबाद पोलीसांकडून जि.प.प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांची चौकशी , पेपर फूट प्रकरण

यवतमाळ , दि. ८ (विशेष प्रतिनिधी) -यवतमाळ जिल्हा परिषदचे पेपर फुट प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणाची चौकशी औरंगाबाद पोलीस करीत असून आज एक पथक शहरात दाखल झाले. त्यांनी आज मंगळवारी प्रभारी सीईओ शरद कुळकर्णी यांची कसुन चौकशी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, तारतंत्री, तंत्रज्ञ या चार संवर्गासाठी २ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका १ नोव्हेंबरच्या रात्री औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागली. पथकाने आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. यवतमाळ जिल्हा परिषद पदभरतीची उत्तरतालिका औरंगाबादमध्ये पोहोचल्याने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल संशयाच्या भोवºयात सापडले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाºयांची त्यांच्या निवासस्थानी कसून चौकशी केली होती. उत्तरतालिकेतील जवळपास ७०च्यावर प्रश्नांचे उत्तर मिळते जुळते असल्याने पेपर फुटीवर शिक्कामोर्तब झाले. औरंगाबाद पोलीस पथकाच्या हातात ठोस पुरावे लागल्याने पाळेमुळे खळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहे. जिल्’ातील आमदारांनी या गंभीर प्रश्नावर मौन धारण केले असले तरी विधानसभा व विधानपरिषदेतील आमदार पेपरफूट प्रकरणावर आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. औरंगाबाद पथक चौकशीच्या अंतिम टप्प्यात आहे. काही प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याच्या उद्देशाने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने प्रभारी सीईओंच्या कक्षात अचानक धडक देवून बंदद्वार चौकशी केली. पथकाने सीईओंना नऊ प्रश्नांची लिखित स्वरूपात उत्तरे मागितली आहे. दोन तास केलेल्या चौकशीबाबत कमालिची गुप्तता पाळण्यात आली होती. यात पथक प्रमुख पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह चार कर्मचाºयांचा समावेश होता.
0
बसची दुचाकीला धडक, दोन युवक ठार


यवतमाळ, दि. ८ (प्रतिनिधी) – भरधाव बसने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाल्याची घटना मोहदा-रामपूरनजीक आज दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. विशाल मधू चव्हाण (३५), निकेश कमल गोंधळे (२५) दोघेही रा. सेवानगर यवतमाळ अशी मृतांची नावे आहे. दोघेही दुचाकी क्रमांक एमएच २९/ एबी ४७१५ ने पांढरकवडा येथे जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने आलेली बस क्रमांक एमएच ४० वाय/ ५००३ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. ही बस गडचिरोलीवरून यवतमाळमार्गे नांदेडला जात होती. अपघात होताच बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुंझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचासाठी दाखल केले. मात्र दोघांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून जखमींना यवतमाळ येथे नेण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.आऊट पोस्ट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आरडीसीच्या वाहनाची हवा सोडली

यवतमाळ, दि. ८ (प्रतिनिधी) – राज्यावर दुष्काळाची गडद छाया असून, नापिकीमूळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्कारीत आहे. मात्र शासनाकडून अद्यापही ठोस उपययोजना करण्यात आलेल्या नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वात आज हवा सोडा आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या वाहनासह अन्य वाहनांची हवा सोडण्यात आली.
भाजप शिवसेना विरोधात असताना, शेतकºयांच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावर उतरत होती. आता सत्तेवर बसून, एक महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र शेतकºयांच्या समस्या, प्रश्न निकाली काढण्यात सत्ताधारी उदासीन धोरण अवलंबित आहे. सत्तेची हवा यांच्या डोक्यात महिन्यातच शिरली असून, शेतकºयांना न्याय देण्यासाठी व सरकारच्या डोक्यातील हवा काढण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्टÑवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले. यावेळी दुष्काळी भागातील शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई, सहा महिन्यापर्यंत वीज बिल वसूली थांबवावी, आत्महत्या व दुष्काळग्रस्त शेतकºयांना १० लाख रूपये शासकीय मदत द्यावी, रोहयोच्या कामावर भर देण्यात यावी, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात याव्या यासह अन्य मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवासी उपजिल्हाधिकाºयामार्फत पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, रायूकाँचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमूख, वसंत घुईखेडकर, पप्पू गांवडे, राहुल कानारकर, करीम खान, प्रशांत किर्दक, दिनेश गिरी, शाम सोळंकी, महेश गवई आदी उपस्थित होते.
0
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा बुधवारी दौरा

यवतमाळ, दि. ८ (प्रतिनिधी) – राज्यपाल सी. विद्यासागर राव यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पांढरवाणी (दुभटी पोळ) ता.झरीजामणी येथे हेलिपॅडवर आगमन. सकाळी 10.10 वाजता जिल्हा परिषद शाळा दुभटीपोळ येथे भेट व राखीव. सकाळी 10.30 वाजता वनहक्क कायद्या व पेसाच्या लाभधारकांसोबत चर्चा. सकाळी 11.25 वाजता आश्रमशाळा, शिबला येथे भेट व पाहणी. दुपारी 12.20 वाजता केळापूर तालुक्यातील आश्रमशाळा गोपाळपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 1.50 वाजता गोपाळपूर हेलिपॅडवरुन यवतमाळकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅडवर आगमन. दुपारी 2.25 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिष्टमंडळाला भेटी. दुपारी 3.30 वाजता जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी 4.30 वाजता हेलिपॅडकडे व तेथून नागपूरकडे प्रयाण.









