पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January, 2015

मारहाणप्रकरणी आरोपीस सहा महिन्याची शिक्षा 0

मारहाणप्रकरणी आरोपीस सहा महिन्याची शिक्षा

download
पांढरकवडा (यवतमाळ)-पूर्ववैमनस्यातून मारहाण करून तरुणीला जखमी करणाºया आरोपीला सहा महिन्याची शिक्षा व दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला. ही शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली. विलास संभाजी पाटील (४४) रा. धारण असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
विलास पाटील व गौतम जगताप यांच्यात वाद होता. २७ जानेवारी २०१२ रोजी त्यांची मुलगी व पत्नी रात्री ८ वाजता दरम्यान बोलत होत्या. दरम्यान विलास याने पूर्ववैमनस्यातून वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी राग अनावर झाल्याने आरोपीने दगड भिरकावला. हा दगड गौतम जगताप यांच्या मुलीला लागून ती जखमी झाली. या घटनेची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी चौकशी करून प्रकरण न्यायप्रविस्ट केले. सरकारी वकीलांनी पाच जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हितेंद्र वाणी यांनी आरोपीला सहा महिन्याची शिक्षा व दहा हजाराचा दंड सुनावला. दंडापैकी पाच हजाराची रक्कम फिर्यादी तरुणीला देण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षाच्यावतीने राजकुमार गुप्ता यांनी काम बघितले.

January 02, 2015 in विदर्भ
शिवीगाळ करणाºया आरोपीला शिक्षा 0

शिवीगाळ करणाºया आरोपीला शिक्षा

images (1)
यवतमाळ – अश्लिल शिवीगाळ देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपीस न्यायालयाने शिक्षा ठोठावली. प्रथम श्रेणी न्यायदंडा धिकारी (पाचवे) एन.के. पाटील यांनी हा निकाल दिला.
अरविंद चंद्रकात भरणे (३९) असे आरोपीचे नाव आहे. पारस अपार्टमेंट कोल्हे ले आऊट यवतमाळ येथे भरणे चौकीदार म्हणून काम करीत होता. २७ सप्टेंबर २०१३ रोजी विकास विक्रम ढबाले (३९) रा. पारस अपार्टमेंट कोल्हे ले आऊट याच्यासोबत वाद करून अश्लिल शिवीगाळ केली. तसेच आरोपीने तेथील नळाची तोडफोड केली होती. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला होता. तपास अधिकारी जमादार किशोर वाटकर यानी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (पाचवे) एन.के. पाटील याच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये ५०४, ४२७ कलमान्वये कोर्ट सुटेपर्यंत उभे राहणे व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील सि.व्ही. उके यांनी काम पाहीले.

January 02, 2015 in विदर्भ
शेतकºयाची आत्महत्या 0

शेतकºयाची आत्महत्या

images
यवतमाळ – नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी रुंझा येथे घडली. मधुकर भीमराव पेंदोर (४१) रा. रुंझा असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. त्याच्याकडे ९ एकर शेती असून ग्रामविविध कार्यकारी सोसायटी सायखेडा (धरण) चे १ लाख ८८ हजार रुपये कर्ज होते. यावर्षीही अतिवृष्टी व नापिकी झाल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत राहत होता. दरम्यान आज सकाळी स्वत:च्या शेतातच विष घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रुंझा आऊट पोस्टचे जमादार गोपाल उठाणे, होमदेव कन्नाके यानी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेत शवविच्छेदनासाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

January 02, 2015 in विदर्भ
अर्धा एकरात 60 हजाराचे भेंडीचे उत्पादन 0

अर्धा एकरात 60 हजाराचे भेंडीचे उत्पादन

Chaparda-Atma
चापर्डातील शेतकऱ्याची भाजीपाल्यातून प्रगती
यवतमाळ – कळंबपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चापर्डा या गावात बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबिन, तुर यासारखी पारंपारिक पीके घेतात. ओलीताची साधणे नसल्याने शेतकऱ्यांना जेमतेमच उत्पन्न मिळते. मात्र गावातीलच स्वप्निल नागपूरे या शेतकऱ्याने पारंपारिक शेतीसोबतच भाजीपाला उत्पादनाचा प्रयोग आत्माच्या सहकार्याने राबविल्याने केवळ अर्धा एकर क्षेत्रात 60 हजार रुपयाचे भेंडीचे उत्पन्न मिळविले आहे.
पारंपारिक पीकांना खर्च अधिक व तुलनेत उत्पन्न कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे कमी खर्चाच्या भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळावे म्हणून आत्माच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. अनेक शेतकरी आत्मविश्वासाने भाजीपाला उत्पादनातुन स्वयंपुर्ण झाले आहे. चापर्डा येथे स्वप्निल नागपूरे हे सुध्दा पारंपारिकच शेती करायचे. आत्मा योजनेमुळे त्यांना भाजीपाला पिकांची माहिती झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या अर्धा एकर शेतात भेंडी हे पीक घेण्याचे ठरविले. 15 जूलै 2014 रोजी त्यांनी भेंडीची लागवड केली. मात्र अपुऱ्या पावसामुळे भेंडीला फटका बसणार असतांनाच त्यांनी शेतात परिश्रमाने भेंडीची पीक उभे केले. आत्मा योजनेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेले खत, औषधी आणि तुषार सिंचनाच्या प्रभावामुळे शेतात भेंडीचे पीक बहरले. त्यानंतर दर दोन दिवसांनी 50 ते 60 किलो भेंडीचे उत्पादन निघत होते. अद्यापही भेंडीचे पीक घेतले जात आहे. यवतमाळ येथील बाजारपेठेत प्रती किलो 30 ते 40 रुपये भाव मिळाल्याने केवळ अर्धा एकरात 60 हजार रुपयाचे भेंडीचे उत्पादन झाले. खरीब हंगामात पीक प्रात्यक्षिक या बाबीतुन भेंडी पीकाची निवड केल्यानंतर त्यांना बियाणे, रासायनिक खते, जैविक कल्चर, औषधी आदींचा पुरवठा करण्यात आला. अर्धा एकरात 12 हजार रुपये खर्च जाता 48 हजार रुपयाचे निव्वळ उत्पन्न त्यांना शिल्लक राहिले आहे. श्री.नागपूरे यांना भाजीपाला पीकासाठी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि.के. गायकवाड यांनी प्रोत्साहित केले. त्यानंतर नागपूरे यांनी 8 एकरात भेंडी, पालक, वांगे, चवळी, कारले, कोबी, मिरची, वाल, दोडका, ढेमस, मेथी या भाजीपाला पीकांची लागवड केली आहे. पुर्वी पारंपरीक पिकांना रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर केल्यानंतरही पदरी निराशाच येत होती. भाजीपाला पिकांना सुरुवात केल्यानंतर विशेषत:हा भेंडी उत्पादनासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केल्याने चांगली उत्पन्न हाती येत आहे. शेतात रसायनांचे प्रमाण कमी केल्याने आरोग्यासाठी चांगल्या शेतमालाची निर्मिती माज्या हातुन होत असल्याचे स्वप्निल नागपूरे या शेतकऱ्यांनी सांगितले.

January 02, 2015 in विदर्भ
विना-अनुदानित गॅस स्वस्त 0

विना-अनुदानित गॅस स्वस्त

LPG
नवी दिल्ली – घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना नव्या वर्षांचं गिफ्ट देत सरकारने विना-अनुदानित सिलिंडर आणखी स्वस्त केलं आहे. विना-अनुदानित सिलिंडर ४३ रुपये ५० पैशांनी स्वस्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने सिलिंडरचे दरही कमी झालेत. आता बाजारात १४.२ किलोचं विना-अनुदानित सिलिंडर ७०८ रूपये ५० पैशांना मिळेल. आधी याची किंमत ७५२ रुपये होती. ऑगस्ट २०१४ पासून विना-अनुदानित सिलिंडरच्या दरात ही पाचव्यांदा कपात करण्यात आली आहे. विना-अनुदानित सिलिंडरचे दर गेल्या १ डिसेंबरमध्ये ११३ रुपयांनी कमी करण्यात आले होते.
अनुदानित सिलिंडरच्या दरात कुठलिही कपात करण्यात आलेली नाही. त्याचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आजपासून गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने अनुदानित सिलिंडरही ग्राहकांना बाजार भावानेच घ्यावा लागणार आहे. तर रेशन दुकानांवरुन दिल्या जाणाऱ्या रॉकेल आणि गॅस सिलिंडरच्या विक्रीतून होत असलेला तोटाही कमी झाला असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. २०१४-१५ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीतील तोटा हा ५१ हजार ११० कोटी रुपये झाला. तर २०१३-१४ मध्ये आर्थिक वर्षात हा तोटा १ लाख ३९ हजार ८६९ रूपये होता, अशी आकडेवारी पेट्रोलियम मंत्रालयाने दिली आहे.

 

January 01, 2015 in रोजगार
शीतपेयांमधील सोडा वाढवतोय लठ्ठपणा 0

शीतपेयांमधील सोडा वाढवतोय लठ्ठपणा

images
नागपूर- बाजारात मिळणारे लिंबू पाणी, उसाचा रस, विविध फळांचे रस यांचे सर्वसामान्य ग्राहकांच्या लेखी असलेले महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. अशा अस्सल भारतीय पेयांची जागा आता शीतपेयांनी घेतली आहे. शीतपेयांमध्येही पूर्वी केवळ पेप्सी, थम्स आणि कोका कोला हेच ब्रॅण्ड्स बाजारात होते. आता मात्र या बाजारात अस्सल सोडा व काहीसा गोडपणा असलेल्या ड्यू, स्प्राइडसारखी शीतपेयेदेखील दाखल झाली आहेत. आधी केवळ महानगरापुरता मर्यादीत असलेला शीतपेयांचा हा बाजार आता नागपूरसारख्या द्वितीय श्रेणी एवढेच नाही, तर ग्रामीण भागातही जलदगतीने वाढतो आहे. एकीकडे या विदेशी शीतपेयांच्या वाढत असलेल्या बाजाराची भीती भारतीय उत्पादनांना आहेच. मात्र, त्याहून महत्त्वाचे म्हणजे या शीतपेयांमधील अत्यंत गोड असलेला सोडा. हा सोडा लठ्ठपणा व पर्यायाने मधुमेह वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याने यापासून सावधान राहण्याची गरज आहे.
भारतातील मधुमेह रुग्ण व लठ्ठपणाच्या तक्रारी झपाट्याने वाढत आहेत. याच्या नेमक्या कारणांचा आढावा ‘ग्राहकदृष्टी’ या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या मासिकाने घेतला. त्यांनी घेतलेल्‍या आढाव्यानुसार शीतपेयांमधील सोड्यात असलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे लठ्ठपणा वाढवत असल्याचे दिसून आले आहे. यानुसार संघटनेच्या चमूने अन्न व औषधे प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर सोड्यातील साखरेच्या अतिरिक्त प्रमाणाची केंद्र सरकारनेदेखील गंभीर दखल घेतली आहे.
पेप्सीको कंपनीच्या अध्यक्ष इंद्रा नुयी यांनी अलीकडेच केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांची भेट घेतली. त्यामध्ये पेप्सी कंपनी भारतात आरोग्यवर्धक पेय आणत असल्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, देशातील ग्राहकरुपी नागरिकांच्या आरोग्याची काळजी असल्याने पेप्सी कंपनीने आधी सोड्यातील साखरेचे प्रमाण कमी करावे. त्यादृष्टीने हालचाल सुरू करावी, अशी स्पष्ट सुचना बादल यांच्याकडून नुयी यांना देण्यात आली.
आज मुंबईसारखी महानगरे असो वा पुणे-नागपूरसारखी द्वितीय श्रेणी शहरे. भारतातील बहुतांश कुटुंबांचे आठवड्यातील एक जेवण हे बाहेर हॉटेलमध्ये असते. यासोबत अन्य दिवशीदेखील ते फास्ट फूडलाच जवळ करतात. कॉलेजमधील तरुणाई जवळपास रोजच फास्ट फूडचा आधार घेते. या प्रत्येक फास्ट फूडसोबत सहजच शीतपेयांचे सेवन केले जाते. मात्र, शीतपेय पोटात ढकलताना त्यामधील सोड्यातील भरमसाठ साखरेचा विचार केला जात नाही. यातून लठ्ठपणा व परिणामी मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांनी वेळीच सजग होऊन पारंपरिक भारतीय रस व ‌ज्युसला जवळ करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

January 01, 2015 in रोजगार
बिबट्या जेरबंद 0

बिबट्या जेरबंद

tiger1

कोल्हापूर – शहरातील रुईकर कॉलनी परिसरात आलेल्या बिबट्यामुळे सकाळीच नागरिकांची तारांबळ उडाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या बंगल्यासमोरील रिकाम्या प्लॉटमध्ये वाढलेल्या झाडीत हा बिबट्या लपून बसला होता. नागरिकांनी बिबट्याला पहाण्यासाठी गर्दी केल्यामुळे आणि गोंधळ सुरू झाल्याने रिकाम्या जागेत इकडून तिकडे तो सतत पळत होता. त्याला पकडण्यासाठी वनविभाग, पोलिस आणि प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे ४ तास हे थरार नाट्य सुरू होते. त्यानंतर स्थानिक नागरिक, वनविभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

January 01, 2015 in रोजगार