पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January, 2015

पालकमंत्र्याच्या इशाºयावर अतिक्रमण हटविले, जाबुवंतराव धोटे यांचा आरोप 0

पालकमंत्र्याच्या इशाºयावर अतिक्रमण हटविले, जाबुवंतराव धोटे यांचा आरोप

jambuvant dhote 1
यवतमाळ, दि. ११ – नेताजी भवन व व्यवसायीकांची दुकाने पालकमंत्री संजय राठोड यांच्या इशाºयावर प्रशासनाने हटविल्याचा आरोप विदर्भवीर जाबूवंतराव धोटे यांनी आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. ही कारवाई लोकशाहीचा खून करणारी असून, जशास तसे उत्तर देणार असल्याचे धोटे यांनी सांगितले.
शहरात ३ जानेवारीपासून नगर पालिका, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. रहदारी व वाहतुकीच्या दृष्टीने रस्ते मोकळे असणे आवश्यक आहे. मात्र अतिक्रमणधारकांचे पुर्नवसन करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने आधी उपाययोजना करून दुकानांवर बुलडोजर चालवायला हवा होता. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचेसह इतर अधिकाºयांनी अतिक्रमण हटविण्यात येणार नाही असे बैठकीत सांगितले होते. मात्र दुसºया दिवशी सकाळी ७ वाजताच बुलडोजर लावून दुकाने पाडण्यात आली. त्यामुळे ही कारवाई पालकमंत्री संजय राठोड यांच्या सांगण्यावरून झाली आहे. ७५० व्यवसायीकांचा रोजगार हिरावणाºया पालकमंत्र्यानी केवळ नेताजी भवन हटविण्याच्या हेतूने केलेला हा प्रकार असल्याचे जांबुवंतराव धोटे यांनी सांगितले. अतिक्रमण हटवितेवेळी नेताजी भवनातील महापुरूषांच्या प्रतिमांची विटंबना झाली असल्याचा आरोप करीत संजय राठोड यांचे मंत्रीपद काढून घेण्यात यावे अशी मागणी धोटे यांनी केली. या प्रकाराचे उत्तर आपण देणार असून, त्यासाठी १३ जानेवारीला जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले असून, त्या सभेतच आपण भुमिका स्पष्ट करणार असल्याचे जांबुवंतराव धोटे यांनी सांगितले. यावेळी विजया धोटे, क्रांती धोटे, लालजी राऊत, प्रभाकर काळे व व्यवसायीक उपस्थित होते.

January 11, 2015 in विदर्भ
बिबट्याचा संशयास्पद मृत्यू 0

बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

53390-bibtya
यवतमाळ , दि. ११ – दारव्हा तालुक्यातील ब्रम्हनाथ शिवारामध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी ११ जानेवारीला उघडकीस आली. या बिबट्याचा एक पंजा कापून नेला असून मृत्यू संशयास्पद झाला आहे.
दारव्हा तालुक्यातील ब्रम्हनाथ येथील जंगलात अरज बिबट्याचा मृतदेह आढळला. या बाबतची माहिती मिळताच दारव्ह्याचे क्षेत्र सहाय्यक धोत्रे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ दिग्रस वनपरिक्षेत्रात येत असल्याने त्यांनी दिग्रस वनविभागाला माहिती दिली. मात्र सहा तास कर्मचारी उशिरा आल्याने वन्यप्रेमींनी संताप व्यक्त केला. बिबट्याची दुर्गंधी सुटल्याने हा मृत्यू बºयाच दिवसापासून झाल्याचा अंदाज वनअधिकाºयांनी व्यक्त केला. या बिबट्याचा एक पंजा कापला आहे. गुप्तधन शोधण्याकरिता सुद्धा वाघाची नखे कामी पडत असून मृत्यू बाबत संशय व्यक्त होत आहे.

January 11, 2015 in विदर्भ

संयुक्त प्रयत्नाने देशाचा विकास शक्य – अरुणकुमार

यवतमाळ ,दि. ११ – देश आज विपरित परिस्थितीतून जात आहे. इतक्या वर्षानंतरही आपला देश परिपूर्ण होऊ शकलेला नाही. भ्रष्टाचाराने देशाला पोखरून सोडले आहे. देशाच्या वर्तमान स्थितीवर विचारमंथन करून संयुक्त प्रयत्नानेच देशाचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे अखील भारतीय सहसंपर्कप्रमुख अरुणकुमारजी यांनी केले. स्थानिक पोस्टल मैदानावर आयोजित रा.स्व.संघाच्या एकदिवसीय साधना सम्मेलनात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की संघाच कार्य देशवासियांना एकसंघ करने आहे. कार्यकर्त्यांच्या शक्तिवर समाजाला संघटित करणारी शक्ति निर्माण करायची आहे. एका महान व्यक्तिमुळे देश महान होत नसतो, देशाला महान बनविण्यासाठी सपूर्ण समाजाला महान बनने आवश्यक आहे. देशातील अंतर्गत मदभेद दूर होने गरजेचे आहे असेही ते म्हणाले. यावेळी व्यावपिठावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थीत होते.

January 11, 2015 in विदर्भ
 आरक्षणाला धक्का लावू नये, अन्यथा रस्तयावर उतरु - वसंतराव पुरके 0

आरक्षणाला धक्का लावू नये, अन्यथा रस्तयावर उतरु – वसंतराव पुरके

DSCF9354
यवतमाळ, दि. ११ – आदिवासींना घटनात्मक मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावू नये, घटनेने ७.५ टक्के आरक्षण आदिवासींना दिले असून कोणत्याही राजकारणकत्र्यांनी मतांसाठी लहरीपणाने वागून आदिवासीच्या आरक्षणात फेरबदल करु नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आज विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिला.
१ लाख ४५ हजार लोकांनी बोगस जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासी बनवून आदिवासींच्या नोकºयावर डल्ला मारला आहे. २००१ मध्ये कायदा बनला होता की, बोगस आदिवासीचे जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा घेणे यात दोन वर्षाची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा करण्यात आला होता. पण या कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला. यास शासनाने काढलेला जी.आर. कारणीभुत ठरला आहे. तो निघालेला जी.आर. रद्द करण्याची मागणी आहे. पुर्वी आदिवासी कॅटीगिरीमध्ये ४७ जातींचा समावेश होता. पण त्यापैकी दोन जाती काढून टाकण्यात आल्या. १५ वर्षे सत्तेत असूनसुध्दा हा बोगस जी.आर. आम्हाला रद्द करता आला नाही, त्याचे मोठे कारण म्हणजे पदावर बसलेले राजकर्ते आणि अधिकारी यास यांचा विरोध होता. कोणला कीतीही आरक्षण द्या, पण आमच्या आदिवासींच्या ७.५ टक्के आरक्षणाला हात लावू नये, असे वसंतराव पुरके यांनी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

 

January 11, 2015 in विदर्भ

कृषी साहित्याच्या दुकानाला आग, ५० लाखांचे नुकसान

यवतमाळ , दि. ११ – येथील दवाबाजारनजीक असलेल्या जलाराम ट्रेडर्सला आज रविवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत ५० लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले असून, दोन बंब पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली.
शहरातील दबाबाजारनजीक अमित गडेचा रा. अवधुतवाडी यांचे जलाराम ट्रेडर्स आहे. आज त्यांची दुकान बंद होती. दरम्यान दुपारच्या सुमारास दुकानातून परीसरातील लोकांना धुर निघताना दिसला. दुकानाला आग लागली असावी असा अंदाज नागरीकांनी बांधून गडेचा यांना फोनवर माहिती दिली. यावेळी अग्नीशामन दलाला पाचारण करण्यात आले. दोन बंब पाण्याचा मारा करण्यात आल्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तो पर्यंत शेतीउपयोगी औषध व खत आदी ५० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

 

January 11, 2015 in विदर्भ
रिलायन्स गुजरातमध्ये १ लाख कोटींची गुंतवणूक करणार 0

रिलायन्स गुजरातमध्ये १ लाख कोटींची गुंतवणूक करणार

images
गांधीनगर, दि. ११ – मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळे देशभरात एक नवीन उत्साह आल्याचे सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तर आदित्य बिर्ला समुह, सुझूकी या ख्यातनाम उद्योग समुहांनीही गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्योजकांची पावले आता मोदींच्या गुजरातकडे वळत असल्याच दिसत आहे.
गुजरातमध्ये उद्योजकांसाठी व्हायब्रंट गुजरात या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेमध्ये जगभरातील उद्योजक सहभागी झाले असून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी, संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून आदी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकासाच्या वाटेवर जाईल अशी आशा मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली. आदित्य बिर्ला समुहाचे कुमारमंगलम बिर्ला यांनीदेखील गुजरातमध्ये सिमेंट आणि अन्य उद्योगांच्या विस्तारासाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. सुझूक आणि अन्य उद्योजकांनीही गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मेक इन इंडिया या मोहिमेला चालना देण्यासाठी व्हायब्रंट गुजरात ही परिषद मोदींच्या मदतीला धावून आल्याचे दिसते.

बसची तेल टँकरला धडक, ५७ ठार 0

बसची तेल टँकरला धडक, ५७ ठार

images (1)
कराची – पाकिस्तानातील सिंध प्रांतात रविवारी एका प्रवासी बसची समोरुन येणा-या तेल टँकरला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सुमारे ५७ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत.
कराचीहून शिकारपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणा-या आणि प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसला महामार्गावर ऑईल टँकरची जोरदार ध़डक बसली यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये ५७ जण ठार झाले तर चार जण जखमी झाले. जखमींना जिन्नाह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात घडला त्यावेळी बसमध्ये सुमारे ६० ते ७० प्रवासी प्रवास करत होते. अपघात पिडीत व्यक्तीने जिओ न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, बस प्रवाशांनी खच्चून भरलेली होती आणि भरधाव वेगात होती. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही असाच भीषण अपघात घडला होता. प्रवाशांनी भरलेली बस एका ट्रकवर आदळल्याने सुमारे ५७ जण ठार झाले होते. तर मार्चमध्ये ऑईल टँकर आणि ट्रेलर ट्रक्टरमध्ये झालेल्या अपघातात ४३ जण ठार झाले होते.

January 11, 2015 in मुख्य पान
 राज्यात थंडीचा कडाका वाढणार 0

राज्यात थंडीचा कडाका वाढणार

cropRunTime
पुणेः राज्याचा काही भागात असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यभर जाणवत आहे. संपूर्ण राज्यात किमान तापमानात मोठी घट झाली असून पुण्यातील पारा ७.४ अंशांपर्यंत खाली आला आहे. पुढील दोन दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढणार असून पुण्यात पारा सहा अंशांपर्यंत घसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
विदर्भाच्या काही भागात तीव्र थंडीची लाट आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात थंडीची लाट आहे. शनिवारी राज्यातील सर्वात नीचांकी तापमान नागपूर येथे (५.३ अंश सेल्सियस) नोंदले गेले. विदर्भाबरोबरच मध्य प्रदेशाच्या काही भागात आणि तेलंगणाच्या काही भागातही थंडीची लाट कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशांनी कमी आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी कमी आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढला आहे.

January 11, 2015 in मुख्य पान
चीनमध्ये बुरख्यावर बंदी 0

चीनमध्ये बुरख्यावर बंदी

Burqa
बीजिंग – आयसिस, तालिबान, अल् कायदासारख्या दहशतवादी संघटनांनी इस्लामच्या नावावर जगभरात हिंसाचार चालवला असतानाच चीन सरकारने त्यांच्या देशातील मुस्लिमबहुल उरुम्की शहरात सार्वजनिक ठिकाणी बुरखा बंदी लागू केली आहे. चीनचा हा प्रांत मुस्लिम फुटिरतावाद्यांचा बालेकिल्ला असल्याने या निर्णयाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये शिनझियांग हा मुस्लिमबहुल प्रांत आहे. हिंसाचाराने खदखदणाऱ्या या प्रांताची राजधानी उरुम्की येथे चीनने बुरखाबंदी केली आहे. ही घोषणा करताना सरकारने फ्रान्स व बेल्जियममधील बुरखाबंदीचा हवाला दिला आहे. बुरखाबंदीच्या निर्णयाच्या एक दिवस आधीच कडव्या धार्मिक विचारांचा प्रसार करणाऱ्या वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. शिनझियांग उईगुर या स्वायत्त प्रांताच्या विधानसभेने या निर्णयाला मान्यता दिली. बुरखा हा उईगुर समाजाच्या महिलांचा पारंपरिक वेष नसल्याचे विधानसभेने म्हटले आहे.

January 11, 2015 in देश-विदेश
शौर्य दिन आज 0

शौर्य दिन आज

10297693_814051868651477_1705004449880373674_n
यवतमाळ , दि. १० – समता सैनिक दलाच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे आयोजन ११ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे श्रोतृगृहामध्ये केले आहे.
बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिवेधात भारतीय संविधान या विषयावर   विचारवंत प्रा. डॉ. नीलकंथक हे व्याख्यान करणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बा.ना. बांगडे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन कास्ट्राईक वैद्यकी कर्मचारी संघटना, प्रजासत्ताक शिक्षक, कर्मचारी संघाने केले आहे.

January 10, 2015 in विदर्भ
पालकमंत्र्याचे शुभेच्छा फलक फाडले 0

पालकमंत्र्याचे शुभेच्छा फलक फाडले

download (6)
यवतामळ , दि. १० – जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याचे शुभेच्छाचे फलक फाडल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी शेख जाकीर, शेख वखार युनूस, अमोल कानल्ले रा. अमराईपुरा यांच्या विरुद्घ गुन्हा नोंदविला आहे. शहरातील अनुश्री हॉटेलसमोर पालकमंत्री राठोड यांचे फोटो असलेले शुभेच्छा फलक लावलेले आहे. शुक्रवारी रात्री तीन जणांनी सदर फलक फाडले. या प्रकरणी शिवसेना पदाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगावरोड पोलीसात दिली. त्यावरून पोलिसांनी  आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

January 10, 2015 in विदर्भ
 पोलीस वाहनाच्या काचा फोडणाºयास अटक 0

पोलीस वाहनाच्या काचा फोडणाºयास अटक

090120153561
यवतमाळ, दि. १० –  पोलीस वाहनाच्या काचा फोडणाºया युवकास पोलिसांनी अटक केली आहे. विकास राजेश मंडके (२५) रा. बांगरनगर असे अटकेतील युवकाचे नाव आहे. शहरात काल शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहिम कडेकाट बंदोबस्तात राबविण्यात आली. नेताजी चौक ते बसस्थानक चौकापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात होता. अतिक्रमण हटविण्यावरून तणाव निर्माण झाला होता. दरम्यान बसस्थानक चौकातील अतिक्रमण हटविण्यात येत असताना, एका युवकाने पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. पोलिसांनी त्या युवकाचा शोध घेवून त्याला अटक केली आहे. याबाबत निलेश क रंदीकर यांनी वडगावरोड पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी युवकाविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

January 10, 2015 in विदर्भ
चिमूकलीसह मातेची आत्महत्या 0

चिमूकलीसह मातेची आत्महत्या

IMG-20150110-WA0032_resized

उमरखेड , दि. १० – पतीच्या त्रासाला कटांळून चिमूकलीसह मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उमरखेड येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ज्योती शिंदे (३२), वैष्णवी शिंदे (४) अशी मृतक मायलेकीची नावे असून, पोलिसांनी याप्रकरणी पती खंडू शिंदे यास अटक केली आहे.
येथील खंडू शिंदे सोबत ज्योतीचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच खंडूने आपला रंग दाखविण्यास सुरूवात केली होती. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करणारा खंडू ज्योतीला किरकोळ कारणावरून सुद्घा मारहाण करीत होता. दोन मुली व एक मुलगा असल्यामुळे ज्योती पतीचा मार सहन करीत जगत होती. काल खंडूने वाद घालून ज्योतीला मारहाण केली होती. सततच्या त्रासाला वैतागलेली ज्योती आपल्या चार वर्षीय वैष्णवीला घेऊन घरून निघून गेली. रात्री उशिरापर्यंत ज्योती घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोधाशोध सुरू केला. मात्र ज्योतीचा पत्ताच न लागला नाही. ज्योती वैष्णवीला घेवून निघून गेल्याबाबतची माहिती तिच्या चुलत बहिणीने ज्योतीच्या आईला फोनवर दिली. दरम्यान आज शनिवारी सकाळी उमरखेड – ढाणकी मार्गावरील लेंडीपुलानजिक असलेल्या एमआयडीसी परीसरातील विहिरीत लहान मुलीचा मृतदेह काही नागरीकांना तरंगताना दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली असता, विहिरीत महिलेचा देखील मृतदेह असल्याचे समोर आले. ज्योतीचा व वैष्णवीचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मुलीचा मृत्यू झाल्याचे कळताच ज्योतीची आई रुख्मा पानपट्टे व नातेवाईक आले. त्यांनी खंडूच्या त्रासाला कटांळूनच मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास एपीआय सदाशीव भडीकर करीत आहे.

January 10, 2015 in विदर्भ
 बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून एटीएममधुन पैसे काढले 0

बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून एटीएममधुन पैसे काढले

download
यवतमाळ , दि. १०  – शहरातील विमा अभिकर्त्यांच्या मोबाईलवर अज्ञात ठगाने फोन करुन बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून एटीएम क्रमांक घेऊन एटीएम खात्यातून १० हजार रुपये काढून फसवणूक केल्याचे आज उघडकीस आले.  ही घटना २० डिसेंबर २०१४ ते ९ जानेवारी २०१५ या दरम्यान घडली.
भाष्कर मिलमिले रा. यवतमाळ हा युवक विमा अभिकर्ता असून २० डिसेंबर २०१४ रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. बँकेचा कर्मचारी बोलत असून तुमचे डेबीड कार्ड तयार करायचे आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर तुम्हाला कोणतेही वस्तु खरेदी केली तर पाच टक्के सुट मिळणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या एटीएमचा १६ अंकी क्रमांक व एटीएमचा पासवर्ड विचारला.  बँकेतून फोन आल्याचे समजुन मिलमिले यानी सदर क्रमांक व पासवर्डही सदर व्यक्तीला सांगितला. दरम्यान ९ जानेवारी रोजी दुपारी या ठगाने पुन्हा फोन करुन तुमच्या खात्यातील पैसे संपले असून खाते बंद करण्यात येईल असे ठणकावले. त्यावेळी मिलमिले यानी माझ्या खात्यात पैसे असल्याची माहिती दिल्याबरोबल या ठगाने एटीएम खात्यातून ८ हजार रुपये काढून घेतले. याबाबतची शहानिशा करण्यासाठी बँकेतून स्टेटमेंट काढल्यानंतर खात्यातून १० हजार ७७६ रुपये काढल्याचे उघड झाले. या ठगाने एटीएम खात्यातून आॅननाईन मोबाईलचे रिचार्ज मारले असून अनेक वस्तुची खरेदी केली आणि हॉटेलमध्ये जेवणावरही ताव मारला. बेगलोर येथील एटीएम मधून सदर पैसे काढल्याचे स्टेटमेंटवरून उघड झाले आहे. या प्रकरणी भाष्कर मिलमिले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

January 10, 2015 in विदर्भ
संजय दत्त पुन्हा तुरुंगात 0

संजय दत्त पुन्हा तुरुंगात

images
मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने फर्लोनची रजा वाढवून मिळावी यासाठी केलेला अर्ज शनिवारी तुरुंग प्रशासनाने फेटाळून लावला. संजय दत्तला येरवडा कारागृहात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रजेचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर संजय दत्त पुन्हा तुरुंगात हजर झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शुक्रवारी दिलेल्या आश्वासनानंतर शनिवारी संजय दत्तचा वाढीव रजेसाठीचा फर्लोनचा अर्ज नामंजूर करण्यात आला. कायदा सर्वांसाठी समान असून, आपले सरकार कायद्याचे पालन करील. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही भेदभाव करणार नाही किंवा कोणा एकालाच लक्ष्य करणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
मुंबई १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगणा-या संजय दत्तला वारंवार मिळणा-य़ा सुट्टीमुळे सर्वसामान्य जनता आणि येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये संतापाची भावना आहे. संजय दत्त २४ डिसेंबरपासून फर्लोनच्या रजेवर बाहेर होता.
शुक्रवारी चौदा दिवसांच्या संचित रजेनंतर येरवडा कारागृहात जाण्यासाठी निघालेला अभिनेता संजय दत्त कारागृहात न जाता पुन्हा मुंबईत दाखल झाला. रजेचा अर्ज प्रलंबित असल्याचे कारण देऊन तो पुन्हा मुंबईला परतला होता. मे २०१३ ते मे २०१४ मध्ये संजय दत्तला वारंवार मिळालेल्या सुट्टीची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत.

January 10, 2015 in रोजगार
सोनाक्षी सिन्हा मराठी चित्रपटांच्या प्रेमात 0

सोनाक्षी सिन्हा मराठी चित्रपटांच्या प्रेमात

SONAKSHI-SINHA
मागच्या काही वर्षात मराठी सिनेमा आशय, विषय, मांडणीमध्ये कमालीचा बदलला आहे. हा बदल, सुधारलेला दर्जा बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांच्या नजरेतून सुटलेला नाही. त्यामुळेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर सातत्याने ठसा उमटवणा-या मराठी सिनेमाकडे बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार आकर्षित होऊ लागले आहेत.
आता यात हिंदीतली टॉपची हिरॉईन सोनाक्षी सिन्हाची भर पडली आहे. मराठी सिनेमाचा आशय दर्जेदार असतो त्यातून प्रेरणा मिळते. बॉलिवूडमध्येही काही चांगले सिनेमे बनत आहेत मात्र मराठीमध्ये दिग्दर्शक जे काम करत आहेत त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जातेय. त्यामुळेच बॉलिवूडचे कलाकार आणि दिग्दर्शक ज्या तळमळीने मराठी सिनेमा बनवतायत त्याचे मला आश्चर्य वाटत नाही खरोखरच ही कौतुकास्पद गोष्ट आहे असे सोनाक्षी म्हणाली.
चित्रपटाच्या आशयामुळे मराठी सिनेमाच्या प्रेमात असल्याची सोनाक्षीने कबुली दिली. रितेश देशमुखचा लय भारी आणि महेश मांजरेकरचा शिक्षणाचा आयचा घो हे दोन सिनेमे पाहिल्याचे सोनाक्षीने सांगितले. त्यामुळे उद्या सोनाक्षी एखाद्या मराठी सिनेमामध्ये दिसली तर, आश्चर्य वाटून घेऊ नका.

January 10, 2015 in मनोरंजन
भारताला कसोटी अनिर्णित राखण्यात यश 0

भारताला कसोटी अनिर्णित राखण्यात यश

AP1_10_2015_000028B
सिडनी – अजिंक्य रहाणे (८८ चेंडूत नाबाद ३८ धावा) आणि भुवनेश्वर कुमार (३० चेंडूंत नाबाद २० धावा) यांनी अखेरची १२ षटके खेळून काढली आणि भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि अंतिम कसोटी अनिर्णित राखता आली. याबरोबरच चार कसोटींच्या मालिकेत २-० मालिका विजयावरच ऑस्ट्रेलियाला समाधान मानावे लागले. कसोटीतील नवीन कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताची सुरुवात चांगली झाली.
मात्र चहापानानंतरचे अखेरचे सत्र खेळून काढणे भारतासाठी सोपे नव्हते. चहापानाला भारताच्या २ बाद १६० धावा होत्या. त्यावेळी मुरली विजय आणि विराट कोहली हे स्थिरावलेले फलंदाज मैदानावर होते. अर्थातच चहापानानंतर म्हणजे ३३ षटकांत विजयासाठी १८९ धावांची गरज होती. अर्थातच विजयला मिळालेल्या दोन जिवदानांचा येथे उल्लेख करायला हवा. तो ४२ धावांवर असताना रायन हॅरिसच्या गोलंदाजीवर शॉर्ट कव्हरला शॉन मार्शने त्याचा झेल सोडला. पाठोपाठ ४६ धावांवर खेळताना तो पायचीत असल्याचे टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. मात्र पंच रिचर्ड केटलबॉरो यांनी विजयला नाबाद दिले. त्याचा फायदा घेत विजयने आक्रमक फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी भारत विजयासाठी प्रयत्न करणार असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र चहापानानंतरच्या चौथ्याच षटकात वेगवान गोलंदाज हॅझेलवुडने धोकादायक मुरली विजयला (८०) बाद केले. विजय-कोहली यांची तिस-या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी होती. कोहलीच्या जोडीला आता फॉर्मात असलेला अजिंक्य रहाणे आला. मात्र कोहलीला स्टार्कने ४६ धावांवर बाद केले.
कोहली बाद झाल्यानंतर आता कसोटी वाचवण्याचेच आव्हान भारतासमोर होते. मात्र तो प्रवास सोपा नव्हता. कारण फॉर्मात आलेल्या स्टार्कने त्याच्या पुढच्याच षटकात सुरेश रैनाला (०) बाद केले. पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही रैना भोपळाही फोडू शकला नाही. ऑगस्ट २०१२ नंतर झालेल्या कसोटी पुनरागमनात तो सपशेल अपयशी ठरला. ५ बाद २०३ यास्थितीत पहिल्या अ‍ॅडलेड कसोटीच्याच आठवणी येऊ लागल्या. त्यावेळी देखील पाचव्या दिवशी चहापानानंतर अखेरच्या सत्रात भारताने विकेट गमावल्या आणि कसोटीही गमावली होती. त्यात भर पडली ती वृद्धिमान सहाची. नॅथन लियॉनने अप्रतिम ऑफस्पिनवर सहाला (०) पायचीत पकडले. मात्र एकाबाजूला उभ्या असलेल्या रहाणेला ‘टेलएंडर’ (शेवटच्या फलंदाजांकडून) रवीचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांची साथ मिळेल हीच आशा होता. मात्र अश्विन सात षटकेच मैदानावर टिकला. त्याला अवघ्या एका धावेवार हॅझेलवुडने तंबूचा रस्ता दाखवला. ७ बाद २१७ यास्थितीत अखेरची १२ षटके खेळून काढायची होती. मात्र रहाणेने जबाबदारीने खेळ करत भुवनेश्वरसह भारताला कसोटी अनिर्णित राखून दिली. दुसरीकडे रहाणे-भुवनेश्वर किल्ला लढवत असताना स्मिथ हार मानायला तयार नव्हता. लियॉनच्या फिरकीवर तर रहाणे-भुवनेश्वरच्या अवतीभोवती सात क्षेत्ररक्षक उभे होते. मात्र यजमानांना त्याचा फायदा झाला नाही.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने शुक्रवारच्याच धावसंख्येवर म्हणजे ६ बाद २५१ धावांवर डाव घोषित केला. याबरोबरच ९० षटकांत विजयासाठी ३४९ धावांचे लक्ष्य स्मिथ आणि सहका-यांनी भारतासमोर ठेवले होते. मात्र लोकेश राहुल आणि विजय यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या सात षटकांत अवघ्या ९ धावाच केल्या. तेव्हा भारत ही कसोटी अनिर्णित राखण्याच्यादिशेनेच खेळणार हे चित्र स्पष्ट झाले होते. त्यातच ऑफस्पिनर लियॉनलादेखील सहाव्याच षटकात गोलंदाजीसाठी आणण्यात आले. पहिल्या डावातील शतकवीर राहुल थोडाफार चाचपडत होता. अखेर १६ धावा केल्यावर लियॉनच्या गोलंदाजीवर तो बॅकवर्ड शॉर्ट लेगला वॉर्नरकडे झेल देऊन बाद झाला. पाठोपाठ आलेला रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद होताना वाचला.
मला पराभवाचा तिरस्कार वाटतो. आम्ही चुरस ही दिलीच पाहिजे तरच प्रतिस्पर्धी तुमचा मान राखतात. त्याप्रमाणे आम्ही ऑस्ट्रेलियाला या मालिकेत चांगलीच चुरस दिली. अ‍ॅडलेडमधील पहिल्या कसोटीप्रमाणे येथेदेखील विजयाची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने दडपणात आणले. फिल ह्युज घटनेनंतर ऑस्ट्रेलिया ज्याप्रकारे खेळली ते कौतुकास्पद आहे. चहापानानंतर विजयी लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करायचा की नाही याबाबत मला १०० टक्के खात्री नव्हती. मात्र भारताने दिलेली झुंज कौतुकास्पद आहे. लोकेश राहुलचे कौतुक करायला हवे. ऑस्ट्रेलियात त्याने पदार्पणानंतर दुसरीच कसोटी खेळताना शतक केले ही सोपी बाब नाही.     – विराट कोहली
सिडनी कसोटी जिंकता आली नसली तरी मालिका विजयाचा आनंद आहे. या कसोटीत पाचव्या दिवशी आम्हाला अपेक्षित बाउन्स मिळाला नाही. मात्र अनिर्णित राखण्यात यशस्वी झाल्याबद्दल भारताला श्रेय द्यायला हवे. त्यात मला देखील मालिकेत चार शतके करता आली. कर्णधारपदही भूषवता आले. – स्टीवन स्मिथ

January 10, 2015 in क्रीडा
दीक्षाभूमीवर अवतरणार बुद्ध कला व संस्कृती 0

दीक्षाभूमीवर अवतरणार बुद्ध कला व संस्कृती

Diksha-Bhumi-Nagpur
नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत येत्या १७ ते २५ जानेवारी या कालावधीत दीक्षाभूमीवर बुद्ध कला व प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. यंदाचे खास आकर्षण म्हणजे विश्वविख्यात सरोदवाद उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनाचा आनंद नागपूरकरांना अनुभवता येईल. तसेच गझल गायक भीमराव पांचाळे यांच्या गझलांचीही मेजवानी उपभोगता येईल.
त्रिरत्न बुद्ध महासंघाच्या नागपूर बुद्धिस्ट सेंटरच्यावतीने दीक्षाभूमीवर पाचवा बुद्ध महोत्सव येत्या १७ जानेवारीपासून आयोजित करण्यात आला आहे. यासंबंधात बुद्धिस्ट सेंटरचे अध्यक्ष रितायुष यांनी यासंबंधात आज दीक्षाभूमी येथे पत्रपरिषदेत माहिती दिली.
१७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. याप्रसंगी चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, डॉ. हर्षवर्धन कांबळे, धम्मचारी सुभूती (इंग्लंड) हे प्रमुख अतिथी राहतील. १८ जानेवारी रोजी सायंकाळी विश्वविख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांच्या संगीताची मेजवानी नागपूरकरांना घेता येईल. औरंगाबाद येथील शास्त्रीय गायक अंबरीश देगुळकर हे २३ ला तर सुप्रसिद्ध गझल गायक भीमराव पांचाळे यांचे मराठी गझल गायन २४ तारखेला सायंकाळी होईल.
रत्नावली या प्रवचन मालिकेंतर्गत १९ ते २२ जानेवारीदरम्यान बौद्ध धम्मातील मानवी रत्नांच्या जीवनावर विचारवंतांच्या प्रवचनातून बौद्ध धम्माचा प्राचीन इतिहास आणि वैभवशाली परंपरा यांचे पुन:स्मरण करण्यात येईल. त्रिरत्न बौद्ध महासंघाचे वरिष्ठ धम्मचारी आणि लेखक धम्मचारी सुभूती (इंग्लंड) यांचे प्रथम व्याख्यान भारतीय प्राचीन बौद्ध विद्वान असंग आणि वसूबंधू या दोन भावंडांवर १९ जानेवारीला होईल. धम्मचारी यशोसागर हे बौद्ध आचार्य पद्मसंभव यांच्या जीवन कार्यावर २० तारखेला प्रकाश टाकतील. तिबेटीयन उच्च अध्ययन संस्थान येथील डॉ. बॉगचूक दोरजे नेगी हे आचार्य शांतीदेव यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतील. तर अनागारिक धम्मपाल यांच्या जीवन कार्यावर भदंत रेवत हे प्रकाश टाकतील. यासोबतच जपान आणि अमेरिकेतून आलेले बौद्ध बांधव हे सुद्धा धम्मजीवनाचे अनुभव विशद करतील. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने धम्मचारी विमलसारा या मार्गदर्शन करतील. हेमंत सुटे आणि त्यांचे सहकारी करिअर गायडन्स यावर मार्गदर्शन करतील. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण हे नेहमीच येथील विचारपीठ राहिलेले आहे. यंदा पाच बुद्ध मंडलवर आधारित व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला धम्मचारी नागकेतू, डॉ. सुनील तलवारे, डॉ. त्रिलोक हजारे, सचिन हाडके आणि अमन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

January 10, 2015 in मुख्य पान
भाजपाला सरकार चालवता येत नाही - केजरीवाल 0

भाजपाला सरकार चालवता येत नाही – केजरीवाल

images (1)
नवी दिल्ली, दि. १० – भाजपाला सरकारही चालवता येत नाही आणि चांगले आंदोलनही करता येत नाही. पण आम्हाला दोन्ही जमते. आम्ही दिल्लीतील भ्रष्टाचारावर अवघ्या ४९ दिवसांमध्ये लगाम घातला होता असे सांगत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे.  मोदींनी आधी सत्तेत आल्यावर सहा महिन्यांमध्ये किती आश्वासनं पूर्ण केली याचे उत्तर द्यायला हवे असे आव्हानही त्यांनी मोदींना दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानात दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. या सभेत मोदींनी अत्यंत आक्रमकपद्धतीने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मोदींच्या सभेनंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींना चोख प्रत्युत्तर दिले. भाजपाने सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक प्रचारात अनेक आश्वासनं दिली होती. त्यापैकी किती आश्वासनं त्यांनी पूर्ण केली असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. दिल्लीत भाजपाकडे काही मुद्दे नसून आपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पक्षाचे नेते घाबरले आहेत. म्हणून माझ्यावर वैयक्तीक आरोप केले गेले. पण मी आरोपांवर उत्तर देणार नाही असेही त्यांनी नमूद केले. भाजपाने दिल्लीत वीज दरात ३० टक्क्यांची कपात करण्याचे सांगितले आहे. पण आम्ही वीजेचे दर ५० टक्क्यांनी कमी करु शकतो. हा फॉर्म्यूला फक्त आपकडेच आहे असे केजरीवाल यांनी सांगितले.
मोदी म्हणतात पंतप्रधान कार्यालय सात महिन्यांमध्ये साफ केले. मग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला त्यांना किती वेळ लागेल असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. आपने दिल्लीतील भ्रष्टाचार ४९ दिवसांत कमी केला असे त्यांनी सांगितले.

January 10, 2015 in मुख्य पान
केजरीवालांनी नक्षली व्हावं - मोदी 0

केजरीवालांनी नक्षली व्हावं – मोदी

arvind_modi-2.jpg-new
नवी दिल्ली, दि. १० – अरविंद केजरीवाल यांना अनार्किस्ट म्हणवून घेण्यात रस असेल तर त्यांनी नक्षलींमध्ये सहभागी व्हावी सभ्य दिल्लीत राहू नये असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पार्टीच दिल्ली निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी असल्याचे सूचित केले. आम आदमी पार्टीचं प्रभुत्व धरण्यांमध्ये, आंदोलनांमध्ये आणि विरोधामध्ये असल्याचे उपहासात्मक शैलीत सांगत ज्याला जे काम जमतं ते त्याला द्यावं असं आवाहन मोदींनी केलं. चांगला गाडी चालवतो त्याला गाडी चालवायला द्यावी त्याप्रमाणे चांगल्या आंदोलकांना विरोधात बसवा आणि आम्ही चांगलं सरकार चालवतो त्यामुळे आम्हाला दिल्लीत सत्ता द्या असं मोदी म्हणाले.
नवी दिल्लीमध्ये जनरेटरचं राज्य संपवणार आणि २४ तास वीज पुरवणार असं आश्वासन देतानाच वेगवेगळ्या वीज कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण करत मोबाईलप्रमाणे सेवा देणारी वीज कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाला असेल असं मोदी म्हणाले. दिल्लीमध्ये देशातला हा पहिला प्रयोग करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच सरकारी कर्मचा-यांच्या निवृत्तीचं वय ५८ करण्याचा आमचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान कार्यालयापासून भ्रष्टाचारमुक्तीचं कामआपण हाती घेतलं असून ते हळूहळू तळागाळापर्यंत उतरवण्याचा आपला निर्धार असल्याचंही मोदी म्हणाले.

January 10, 2015 in मुख्य पान