पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2015

सिंगापूरचे पंतप्रधान ली कुआन यू यांचं निधन 0

सिंगापूरचे पंतप्रधान ली कुआन यू यांचं निधन

2015-03-23~4-01_ns
नवी दिल्ली, दि. २३ – सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांचं सोमवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्यावर फेब्रुवारी महिन्यापासून उपचार करण्यात येत होते परंतू सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सिंगापूर शहराला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करुन देण्यात आणि त्या शहराची जडणघडण करण्यात ली कुआन यांचा फार मोठा वाटा मानला जातोय. ली कुआन यू यांनी सिंगापूरचे पहिले व सलग ३१ वर्ष पंतप्रधानपद भूषविले आहे. ली कुआन यू यांचा मुलगा लि सिएन लूंग सध्या सिंगापूरचे पंतप्रधानपदावर विराजमान असून ली कुआन यांचं निधन झाल्याची माहिती पंतप्रधानांचे सचिव यांनी अधिकृत घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार, ली कुआन यू यांचे सिंगापूरमधील जनरल हॉस्पिटलमध्ये स्थानिक वेळेनुसार ३ वाजून १८ मिनिटांनी निधन झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे ली कुआन यांना श्रद्धांजली वाहिली.

March 23, 2015 in देश-विदेश
नेत्यांचा संधीसाधूपणाच दलीत राजकारणाच्या अद्य:पतनाचा कळस - स्वागताध्यक्ष कॉ. मनोज किर्तने यांची खंत 0

नेत्यांचा संधीसाधूपणाच दलीत राजकारणाच्या अद्य:पतनाचा कळस – स्वागताध्यक्ष कॉ. मनोज किर्तने यांची खंत

41
माहूर (नांदेड), दि. २३ – दलीत जनतेचे आर्थीक सक्ष्मीकरणासाठी जमीन सुधारणा गरजेचे आहे. दलीत मुस्लीमांना व्होट बँक म्हणून वापर करनारे भांडवली पक्ष, धर्म जातीच्या नावावर द्वेशाचे राजकारण करून अमानुष पद्घतीने विषमतेची बीजे पेरून एकमेकांना झुंजत ठेवले. वैचारीक स्त्रोत असलेले डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे सारख्या पुरोगामी व वैज्ञानिक दृष्टीकोणान ठेवणाºयाचा काटा काढण्यात आला. या वैचारीक लढाईत बहुजनांची, शोषीत वंचीतांचा अभेद्य एकजुट उभारने अत्यंत गरजेचे असतांना काही दलीत नेत्यांचा संधीसाधुपणाच दलीत राजकारणाºया अद्य:पतनाचा कळस ठरल्याची खंत स्वागताध्यक्ष कॉ. मनोज किर्तने यांनी व्यक्त केली.
बौद्घभूमि परीसर माहूर येथे आयोजीत बौद्घ धम्म परिषदेच्या समारोप प्रसंगी कॉ. किर्तने बोलत होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड म्हणाले की, माहूर येथे बौद्घस्तूप बांधण्यासाठी बौद्घभूमि परीसराचा पर्यटन बहृत आराखड्यात समावेश झाला आहे. शासनास माहुर गड विकास प्राधीकरणाकडून तीन कोटीचा आराखडा १४ मार्च २०१४ ला सादर केल्याचे ते म्हणाले. समारोपीय कार्यक्रमात ‘मला चिड येत नाही हा माझा गुन्हा, दोष देऊ कुणा’ या वामन दादा कर्डक यांनी लिहलेल्या गिता बरोबर वादळ वारा सारख्या भीम गिते सादर करून प्रसिद्घ कवी, गायक अनिरूद्घ वनकर यांनी श्रोत्यांना तीन तास खिळवून ठेवले. तसेच कविसंमेलनात मराठवाडा-विदर्भातील नामवंत कवीनी रचना सादर केल्यास. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.के.के. सावळे यांनी केले. संचालन कादर दोसानी यांनी, प्रा. विनोद कांबळे, आकाश कांबळे यांनी केले. यावेळी कवि व कलाकाराचे स्वागत निमंत्रक गोविंद मगरे यांनी केले. यावेळी संयोजन समितीचे सदस्य, माहूर तालुका संभाजी ब्रिगेड, डीवायएफचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

March 23, 2015 in मुख्य पान
शेतकºयाची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक 0

शेतकºयाची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक

darti
यवतमाळ , दि. २३ – ध्येय व चिकाटीच्या जोरावर पुसद तालुक्यातील शेतकºयाची पोलीस असलेली मुलीने पोलीस उपनिरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण केली असून तीची सदर पदासाठी निवड झाली आहे.
धरती प्रकाश काळे रा. पुसद असे निवड झालेल्या मुलीचे नाव आहे. प्राथमिक व पदवी पर्यतचे शिक्षण पुसद येथे घेतले. त्यानंतर यवतमाळ येथे राज्यशास्त्रात एम ए केले. सन २००५ मध्ये ती यवतमाळ पोलीस दलात महिला पोलीस शिपायी म्हणून रुजू झाली असून सध्या ती यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. महाराष्टÑ लोक सेवा आयोगाने सन २०१३ मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेत ती उत्तीर्ण झाली आहे. वडील प्रकाश काळे हे अल्पभूधारक शेतकरी असून आई गृहीणी आहे. सात बहिणी व एक भाऊ असा काळे याचा परिवार आहे.भाऊ यवतमाळ पोलीस दलात कार्यरत असून बहिणी शिक्षण घेत आहे. धरती काळे ही लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार असून तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

March 23, 2015 in विदर्भ
अपघातात दुचाकीस्वार ठार 0

अपघातात दुचाकीस्वार ठार

_ns
यवतमाळ : अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शेलू फाट्यानजीक घडली. शेख शम्मी शेख रा. यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. ते दुचाकीने आर्णीने येथे जात असताना, अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेख यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान इसमाचा मृत्यू झाला असून, याबाबत परवीन बानो शेख यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

March 23, 2015 in विदर्भ
पवना धरणात 4 विद्यार्थी बुडाले 0

पवना धरणात 4 विद्यार्थी बुडाले

download-112 (1)
मावळ – तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरायला गेलेल्या चार विद्यार्थी आज (रविवारी) दुपारी धरणात बुडाले. त्यापैकी एका विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे इथील जेएसपीएम महाविद्यालयातील चार विद्यार्थी लोणावळ्या जवळच्या पवना धरण परिसरात फिरायला गेले होते. पोहण्यासाठी ते चौघे धरणाच्या पाण्यात उतरले होते. पोहताना चौघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावकार्य होती घेतले. तसंच पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं असून, अन्य तीन विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

March 23, 2015 in मुख्य पान
गुंडाच्या धमक्यांना घाबरून स्वत:च्याच मुलीचं केलं मुंडन! 0

गुंडाच्या धमक्यांना घाबरून स्वत:च्याच मुलीचं केलं मुंडन!

images
ठाणे – आपली मुलगी सुंदर दिसावी, असं प्रत्येक आईला वाटत असतं. मात्र काही नराधमांच्या धमक्यांमुळे ठाण्यातील मातेवर आपल्याच मुलीचं मुंडन करण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील कळवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
कळवा इथे राहणार्‍या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यापूर्वी म्हणजेच 30 जुलै 2014ला सामूहिक बलात्कार झाला होता. मोहम्मद लियाकत अली उर्फ बाबू आणि त्याच्या 16 वर्षांच्या साथीदारानं पीडित मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी बाबूला अटकही झाली होती. मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आला आहे आणि जामिनावर बाहेर येताच त्याने पीडित मुलीला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. त्याची हिम्मत इतकी वाढली की तो मुलीच्या घरी जाऊन तिची छेड काढायचा आणि आता तर त्याने गुन्हा मागे घे नाहीतर पुन्हा बलात्कार करू अशी धमकीच दिली.
ही काही पहिली धमकी नाही. आरोपी बाबू तुरुंगात होता. तेव्हासुद्धा त्याच्या कुटुंबीयांनी आपल्यावर पाचवेळा हल्ले केले, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सर्व प्रकाराची या कुटुंबाने पोलिसांत तक्रारही केली. पण, पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. सततची धमकी, हल्ले, मुलीला होणारा त्रास आणि पोलिसांची कुचराई यामुळे धास्तावलेल्या या आईने अखेर आपल्या मुलीचं मुंडन करून तिला विद्रूप केलं. यामुळे तरी तिची छळातून सुटका होईल, असं या आईचं म्हणणं आहे.
दरम्यान, या धक्कादायक प्रकार समोर येऊनही कळवा पोलिसांनी आधी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस सहआयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर, मुलीच्या जबानीनुसार कळवा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ठाणे सहपोलीस आयुक्त व्ही .व्ही लक्ष्मीनारायण यांनी सबंधित आरोपींचे जामीन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. पण अजून आरोपीला अटक झालेली नाही आणि कळव्यातल्या झोपडपट्टीत राहणारं हे कुटुंब अजूनही भीतीच्या छायेखाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या गुन्हेगारांना राजकीय आश्रय असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

 

March 23, 2015 in मुख्य पान
सेझसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी’ची पदयात्रा 0

सेझसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी’ची पदयात्रा

KHED-SEZ
रखडलेल्या सेझच्या जमिनी शेतकर्‍यांना परत कराव्यात, तसंच शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर संपादनासाठी मारण्यात आलेले शेरे त्वरित कमी करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज (सोमवारी) राजगुरूनगर येथून बाधित शेतकर्‍यांची पदयात्रा काढण्यात आली आहे. राजगुरूनगर येथून ही पदयात्रा निघेल. तिचा पहिला मुक्काम आज आळंदीत असणार आहे. त्यानंतर पदयात्रा उद्या (मंगळवारी) पुण्यात येणार आहे.
तत्कालीन सरकारने 2013 मध्ये जो कायदा केला होता, तो सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून केला. मात्र, या सरकारने त्यामध्ये बदल केला. शेतकर्‍यांच्या जमिनी स्वस्तात घ्यायच्या आणि त्या उद्योगधंद्यांना जादा किमतीत द्यायच्या, असा काही लोकांचा नवीन धंदा तयार झाला आहे, असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
शहीद दिनाचे निमित्त साधून केंद्र सरकारच्या भूमी भूसंपदान कायद्याच्या विरोधात ‘शेती वाचवा, शेतकरी वाचवा’ या आंदोलनाची ही सुरुवात आहे. 8 वर्षांपूर्वी सेझच्या नावाखाली खेडमधल्या राजगुरूनगर इथल्या 17 गावांमधल्या जमिनींचं संपादन करण्यात आलं होतं. पण नियमाप्रमाणे 5 वर्षांमध्ये सेझचा प्रकल्प पूर्ण झाला नाही, त्यामुळे ती जमीन प्रकल्पबाधितांना परत मिळायला हवी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. ठाकरवाडी या गावातले शेतकरीही या प्रकल्पावर संतापले आहेत. या जमिनींच्या मोबदल्यात शेतकरी आणि आदिवासींना कोणतंही पॅकेज मिळालं नसल्याची तक्रार या प्रकल्पबाधितांनी केलीये. ठाकरवाडीतल्या जमिनी संपादित केल्यानंतर या शेतकरी आणि आदिवासींना घरं देण्यात आली होती. मात्र ती लहान आहेत आणि त्यांना तडे गेलेत. गावकर्‍यांना पाण्याची टाकी बांधून दिली पण आजही इथल्या महिलांना पाणी आणण्यासाठी दूर जावं लागतं. इथे बांधण्यात आलेले रस्ते दगडगोट्यांचे आहेत. इथे बसवलेले सोलरही थोड्याच दिवसांत बंद पडले.जमिनींसाठी शेतकर्‍यांना आकर्षक पॅकेजचं आश्वासन दिलं होतं. पण असं कोणतंही पॅकेजही मिळालेलं नाही. त्यामुळे आता या प्रश्नी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला आहे. या मोर्चात इथले गावकरीही खेड ते पुणे पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.
दरम्यान, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मनातील बात सांगितली. शेतकर्‍यांच्या मनातील नाही, अशा शब्दांत आज भाजपचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांवरच टीका केली. ‘मन की बात’मध्ये त्यांनी कळीचा मुद्दा बाजूलाच ठेवला. जमिनी हव्या आहेत तर शेतकर्‍यांशी थेट बोलण्यास का घाबरता, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

March 23, 2015 in महाराष्ट्र
सेल्फीच्या नादात सात तरुणांनी गमावला जीव 0

सेल्फीच्या नादात सात तरुणांनी गमावला जीव

download
नागपुर – जिल्ह्यातील वडदजवळच्या मंगरुळ तलावावर पिकनिकसाठी गेलेल्या सात तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. सेल्फी काढण्यासाठी तलावाच्या मध्यभागी स्वत:हून होडी घेऊन गेले आणि फोटो काढण्याच्या नादात होडी कलंडली. या दुर्घटनेत 10 पैकी 7जणांचा दुदैर्वी अंत झाला असून सुदैवाने तिघेजणं बचावले आहेत.
नागपूरच्या आशीर्वाद नगर भागात राहणार्‍या 10 कॉलेज तरुणांचा ग्रुप मंगरुळ तलावावर काल संध्याकाळी पिकनिकसाठी गेला होता. किनार्‍यावर लावलेली होडी हे तरुण स्वतःहून पाण्यात घेऊन गेले आणि त्यांचं हेच धाडस सात जणांच्या जीवावर बेतलं. तलावाच्या मध्यभागी गेल्यावर सेल्फी काढण्याच्या नादात, होडीत उभे राहिल्याने होडी एका बाजुला कलंडली. आणि यात सात जणांचा तलावात बुडून दुदैर्वी मृत्यू झाला. तर, तिघेजण या दुर्घटनेत बचावले आहेतय
तलावात बुडून मृत्यू झालेले सातही तरुण नागपूरच्या आशीर्वाद नगर भागात राहाणारे आहेत. हर्षल आदमने, चेतन आदमने, गोवर्धन थोटे, राहुल वाळोदे, राम शिवरकर, मकसूद शेख आणि अब्दुल सरफराज अशी या मृत मुलांची नावं आहेत.

March 23, 2015 in महाराष्ट्र
नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलीस शहीद 0

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलीस शहीद

gadchiroli-shahid
गडचिरोली – छत्तीसगड सीमेलगत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे दोन पोलीस जवान शहीद झाले. तर, एक जवान गंभीर जखमी झाला.
सी-60 पथकामध्ये हे जवान कार्यरत होते. काल छत्तसिगड सीमेलगतच्या एटापल्ली तालुक्यातील जंगलात सी-60 पथकाकडून नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कोम्बींग ऑपरेशन करण्यात येत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून अचानक गोळीबारास सुरूवात झाली. त्यात दोहे आत्राम आणि स्वरूप अमृतकर हे पोलीस कमांडो ठार झाले तर दिनेश हिचामी जखमी झाला होता. नक्षलवाद्यांचे लोकेशन असल्याने तसंच अंधार झाल्याने बचावकार्यासाठी हॅलीकॅप्टर जाऊ शकल नाही, आज सकाळी जवानांचे मृतदेह आणि जखमी जवानाला हॅलीकॅप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं.

March 23, 2015 in मुख्य पान
डी.के.रवीकुमार मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे 0

डी.के.रवीकुमार मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

ravi-1
बंगळूरु – धडाडीचे आयएएस अधिकारी डी.के.रवीकुमार यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कर्नाटक सरकारने सीबीआयकडे सोपवला आहे. डी.के.रवीकुमार यांचे कुटुंबिय आणि राज्यातल्या विरोधी पक्षांकडून रवीकुमार यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात येत होती.
मागच्या आठवडयात बंगळूरुतील रहात्या घरी डी.के.रवीकुमार यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रवीकुमार यांच्या पत्नीला पत्र लिहून निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले होते. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री सिध्दरमय्या यांच्याशी चर्चा करुन सीबीआयकडे तपास सोपवण्याचा सल्ला दिला होता.
प्रथमदर्शनी डी.के.रवी यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे तपास अधिका-यांचे मत आहे. मात्र रवी यांनी वाळू आणि जमीन माफियांवर कारवाई केली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा अनेकांना संशय आहे.
रवी यांनी मृत्यूपूर्वी सहकारी आयएएस महिलेला काही फोन केल्याचे समोर आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला रवी यांच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्यास मनाई केली आहे. भ्रष्टाचार खपवून न घेणारा अधिकारी अशी रवी यांची ओळख होती.

March 23, 2015 in मुख्य पान
महापौरांचा ‘लाल दिवा’ कायम ठेवा 0

महापौरांचा ‘लाल दिवा’ कायम ठेवा

red-beacon
मुंबई – देशातील फक्त नऊ अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनाच ‘लाल दिव्या’चा विशेषाधिकार देण्याच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रस्तावाचं शिवसेनेनं स्वागत केलं असलं, तरी हा मान काही प्रमुख शहरांच्या महापौरांनाही मिळायला हवा, अशी आग्रही सूचना त्यांनी केली आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकात्याच्या महापौरांचा ‘लाल दिवा’ कायम ठेवण्याची त्यांची मागणी आहे.
देशातील ‘व्हीआयपी कल्चर’ला चाप लावण्याच्या दृष्टीनं, केंद्रातील आणि राज्यांतील मंत्र्यांच्या गाडीवरचा प्रतिष्ठेचा लाल दिवाच काढून घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी तयार केलाय आणि आपल्या सहकाऱ्यांकडे अभिप्रायार्थ पाठवलाय. फक्त नऊ घटनात्मक पदांवरील व्यक्तींनाच लाल दिव्याची गाडी दिली जावी, असं ‘क्रांतिकारी’ मत त्यांनी मांडलं आहे. केंद्रात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश या पाच व्यक्तींना, तर राज्यांमध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्ष आणि हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती या चौघांच्या गाडीवर मानाचा लाल दिवा असावा, असं त्यांनी नमूद केलंय. या प्रस्तावाबाबत त्यांनी राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज या सहकारी मंत्र्यांकडून मतही मागवलं आहे. ते काय अभिप्राय देतात, यावरच अंतिम निर्णय अवलंबून असला तरी जनतेला हा प्रस्ताव पसंत पडलाय.
शिवसेनेनंही ‘लाल दिव्या’चा वापर मर्यादित करणाऱ्या या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रस्तावाचं स्वागत केलंय. परंतु, त्याचवेळी महापौरांच्या गाडीवरचा लाल दिवा कायम ठेवण्याचा आग्रहही धरला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या जागतिक ख्यातीच्या शहरांतील महापौरांना लाल दिव्याची गाडी मिळायला हवी. मुंबईच्या महापौरपदाला मोठी परंपरा आहे. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. त्यामुळे त्याला हा मान दिला गेला पाहिजे, असं मत त्यांनी मांडलंय. आता ही सूचना केंद्र सरकार विचारात घेतं का, हे पाहावं लागेल.

 

March 23, 2015 in महाराष्ट्र
शहीद भगत सिंग, सुखदेव, राजगुरूंना श्रद्धांजली 0

शहीद भगत सिंग, सुखदेव, राजगुरूंना श्रद्धांजली

Bhagat Singh's martyrdom
नवी दिल्ली, दि. २३ – देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली. ‘देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना माझे शत प्रणाम. या तिन्ही देशभक्तांना मी श्रद्धांजली वाहतो’, असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान आज ते पंजाबच्या दौ-यावरही जाणार असून भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावर ज्या हुसैनीवाला गावात अंत्यसंस्कार करण्यात आले त्या गावाला मोदी भेट देणार आहेत. तसेच सुवर्ण मंदिर व जालियानवाला बाग येथेही पंतप्रधान जाणार असून त्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अण्णा हजारेंनीही वाहिली भगतसिंगना श्रद्धांजली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही आज भगतसिंग, सुखदेव व राजगुरूंना श्रद्धांजली वाहिली, यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. खटरकला गावात जाऊन अण्णा भगत सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
दरम्यान यावेळी अण्णांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. सरकारने लोकांना दिलेले वचन पाळले नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी जनतेला काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सरकार सत्तेवर येऊन दहा महिने उलटून गेले तरी एक पैसाही परत आला नसल्याचे सांगत सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याची टीका अण्णांनी केली.

 

March 23, 2015 in मुख्य पान
पानसरेंच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी! 0

पानसरेंच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी!

2015-03-23~govindpansare_ns
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मिरज येथील एका सराईत फासेफारधी गुन्हेगाराने २५ लाखांची सुपारी घेतली होती. पानसरे दाम्पत्यावर हल्ला करून तो कर्नाटकात लपल्याची धक्कादायक माहिती मिरज येथील एका फासेपारधी दाम्पत्याने पोलिसांना रविवारी दिली. त्यानुसार या दाम्पत्याकडून अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे पथक दिवसभर माहिती घेत होते, असे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले.
फासेपारधी दाम्पत्याने दिलेली माहिती आणि आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासातील साम्य जुळत असल्याने पोलिसांची काही विशेष पथके रात्रीच कर्नाटकात रवाना झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मिरजेतील फासेपारधी दाम्पत्याला पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती असल्याचे पोलिसांना खबऱ्याकडून समजले. त्यांनी तातडीने या दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती पुढे आली. माहितीची खातरजमा करण्यासाठी संबंधितांना मिरज पोलिसांचे एक पथक रविवारी सकाळी कोल्हापुरात घेऊन आले. पोलीस मुख्यालयामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. मारेकरी कर्नाटकात लपला असून तो आम्हाला २५ हजार रुपये देणार होता, अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिली.

March 23, 2015 in मुख्य पान
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घातला कोट्यावधींचा गंडा 0

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घातला कोट्यावधींचा गंडा

40982-shilpa-shetty.jpg
कोलकाता, दि. २२ – कोलकाता येथील कंपनीस दहा पट पैशांचे आमीष दाखवत नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला लावणे अभिनेत्री शिल्पा शेट्टीला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी व रिपू सदन कुंद्रा यांच्याविरोधात कोलकाता पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व रिपू सदन कुंद्रा यांच्या इसेंशिअल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने कोलकाता येथील एम के मिडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीला दोन वर्षात १० पट परतावा मिळेल असे आमीष दाखवत त्यांना नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला सांगितले. यानुसार एम के मिडीयाने शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीत गुंतवणूकही केली. या व्यवहारानंतर शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीने इएसपीएलचे ३० लाख रुपयांचे इक्विटी शेअर्सही दिले होते. मात्र काही महिन्यांनी हा सर्व प्रकार बोगस असून इक्विटी शेअर्सही बोगस असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. याप्रकरणी एम के मिडीयाचे प्रतिनिधी देबाशीष गुहा यांनी कोलकाता येथील हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आर्थिक फसवणूक, कट रचणे अशा विविध कलमांखाली शिल्पा शेट्टींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मोदींच्या परदेश दौ-यावर ३१७ कोटींचा खर्च 0

मोदींच्या परदेश दौ-यावर ३१७ कोटींचा खर्च

images

दिल्ली, दि. २२ – नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान होऊन १० महिन्यांचा कालावधी लोटला असतानाच या कालावधीत मोदी सरकारच्या परदेश दौ-यावर सरकारी तिजोरीतून तब्बल ३१७ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे युपीए २ मधील मंत्रिमंडळाच्या परदेश दौ-यांपेक्षा मोदी सरकारच्या परदेश दौ-यावरील खर्चात ५८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यंच्या मंत्रिमंडळातील ६५ मंत्री यांच्या वेतन व अन्य भत्त्यांसाठी १४ कोटी रुपये खर्च झाले असून युपीएच्या ७५ सदस्यीय जंबो मंत्रिमंडळावरील खर्च व मोदी सरकारच्या मंत्रिमंडळावरील खर्च समान आहे. मोदी सरकारच्या कालावधीत मंत्री व अन्य अति महत्व्वाच्या व्यक्तींच्या ट्रॅव्हल खर्चही वाढल्याच समोर येते. यामध्ये केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्य मंत्री, माजी पंतप्रधानांच्या परदेश वारीसोबतच विद्यमान प्रधानमंत्री, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या दौ-यासाठी वापरलेल्या विमानांच्या देखभालीच्या खर्चाचा समावेश आहे. गेल्या वर्ष भऱात मोदी सरकारच्या परदेश दौ-यांवर ३१७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे मोदी सरकार या खर्चांना कात्री लावण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. २०१५ -१६ या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात मोदी सरकारने २६९ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. एकीकडे सरकारी खर्चांना कात्री लावण्याची घोषणा नरेंद्र मोदी करत असले तरी दुसरीकडे परदेश दौ-यांवरील खर्च वाढत असल्याचे दिसत आहे.

 

March 22, 2015 in मुख्य पान
संसद परिसरातील आग 0

संसद परिसरातील आग

fire-broke-out-at-parliment-copy
नवी दिल्ली – नवी दिल्लीतील संसद परिसरात रविवारी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले आहे.
एसी पॉवर युनिटमध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसत आहे. सुमारे दोनच्या सुमारास संसद परिसरात आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर लगेचच घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यात आल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, कोणतीही जिवित हानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोळ बाहेर पडत होते.

 

March 22, 2015 in मुख्य पान
बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या 0

बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या

2014-06-23~suicide11_ns
बीड- थकित वेतनासाठी धरणे आंदोलन करणा-या हिरामन साहेबराव भंडाने (३२) या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
संतापलेल्या आंदोलनकर्त्या शिक्षकांनी भंडाने यांचा मृतदेह जिल्हा परिषदेच्या दारात एक तास ठेवला होता. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शिक्षण विभागाची तत्काळ बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर भंडाने यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
हिरामन भंडाने हे चौसाळा केंद्रातील कोकणे वस्ती शाळेवर कार्यरत होते. शिक्षण विभागात मंजूर पदांपेक्षा शिक्षकांची संख्या अधिक झाल्याने अतिरिक्‍त ठरलेल्या शिक्षकांना ११ महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. यात हिरामण यांचाही समावेश आहे. प्रश्‍न न सुटल्याने या शिक्षकांनी १६ मार्चपासुन बीडमध्ये जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरु केले. याआंदोलनादरम्यान, गुरुवारी हिरामन भंडाने यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्यांनी गळफास लावुन आत्महत्या केली.
शिक्षक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर मागिल ११ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ते मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असून या प्रकरणी दोषी असलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

March 22, 2015 in मुख्य पान
मोदींनी मन की बात नव्हे विश्वासघात केला - खासदार अशोक चव्हाण 0

मोदींनी मन की बात नव्हे विश्वासघात केला – खासदार अशोक चव्हाण

images (1)
नवी दिल्ली/मुंबई- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात केली नसून शेतक-यांचा विश्वासघात केला आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. त्यामध्ये शेतक-यांना मदत आणि भूसंपादन विधेयकाबाबत देशभर गैरसमज पसरविले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
एकीकडे शेतक-यांचे हीत जोपासल्याची भूमिका बोलताय, शेतक-यांना मदत करु अशा घोषणा करताय आणि दुसरीकडे प्रत्यक्षात कोणतीही मदत केल्याचे दिसत नाही. गारपीट, अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. राज्यात ११०० पेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. असे असताना सत्ताधारी मात्र आम्ही अभ्यास करत आहोत, आमचे लोक जाऊन तेथे बघतील, परिस्थितीचा आढावा घेतील असे बोलतात. हा अभ्यास किती दिवस चालणार. शेतक-यांना आज तातडीने मदतीची खरी गरज आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे शेतक-यांचे कर्ज माफ केले नाही तर तो कसा परतफेड करेल, असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.
ज्यांना शेतक-यांबद्दल काही माहित नाही. शेतीबद्दल माहिती नाही. शेतकरी कशावर अवलंबून आहे, ते माहित नाही. अशा चिंताजनक परिस्थितीत तातडीने मदत करण्याऐवजी सरकारच्या पोकळ घोषणांचा काय उपयोग, अशी टिकाही चव्हाण यांनी केली आहे.
त्याबरोबर, भूसंपादन विधेयकाबाबत सरकार शेतक-यांची फसवणूक करत आहे. सरकारने जमीन संपादन करायला आमचा विरोध नाही, परंतू या कायद्यात अनेक जाचक अटी आहेत. शेतक-याला न्यायालयात दाद मागता येणार नाही, अशा अनेक अटी त्यात आहेत. यामुळे काँग्रेससह त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा या कायद्याला विरोध केला आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्या ४० टक्क्यांनी वाढत असताना पंतप्रधान मन की बात करत आहे, शेतक-यांना ज्ञान नको कृती हवी, अशी टिका आप नेते आशुतोष यांनी केली आहे.
आजही देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत, सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि भाजपा सरकार फक्त मन की बात नावाच्या पोकळ घोषणा करत आहे, असे काँग्रेसचे सचिव अहमद पटेल यांनी सांगितले. मोदी यांनी वर्षभरापूर्वी लोकसभा प्रचारादरम्यान हझिराबाग येथे लाल बहाद्दुर शास्त्री यांची जय जवान, जय किसान अशी दिलेली घोषणा आज मर जवान, मर किसान म्हणत बदलून टाकल्याचा आरोपही पटेल यांनी केला आहे. केवळ मते मिळवण्यासाठी मोदी यांनी खोटी आश्‍वासने दिली. प्रचारादरम्यान शेतक-यांना किमान आधारभूत किंमतीत पन्नास टक्के वाढ करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र संसदेतील एका प्रश्‍नाच्या उत्तरात किमान आधारभूत किंमतीचा प्रस्ताव सरकारने नाकारल्याचेही पटेल यांनी पुढे बोलताना सांगितले.

 

March 22, 2015 in मुख्य पान
भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच - नरेंद्र मोदी 0

भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच – नरेंद्र मोदी

modi-radio_295x200_61414907744
नवी दिल्ली, दि. २२ – भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच असून या विधेयकाविरोधात काँग्रेस शेतक-यांमध्ये गैरसमज पसरवत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीने ग्रासलेल्या शेतक-यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासनही मोदींनी दिले आहे.
रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. या संपूर्ण कार्यक्रमात मोदींचा भर भूसंपादन विधेयकावर होता. भूसंपादन कायदा १२० वर्ष जून असून जी लोकं आता शेतक-यांचे हितचिंतक म्हणून बोलत आहेत त्या लोकांनीही याच कायद्यानुसार राज्य केले असे सांगत मोदींनी काँग्रेसला चिमटा काढला. भूसंपादनासोबतच भारतात १३ असे कायदे आहेत ज्यात भूमी अधिग्रहण करता येते, यात रेल्वे, खाण व राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे असे मोदींनी निदर्शनास आणून दिले. भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करुन शेतक-यांचे हित साधण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मोदींंनी स्पष्ट केले.
नवीन विधेयकात भूसंपादनात शेतक-यांना चार पट नुकसान भरपाई मिळेल, याशिवाय तिथे औद्योगिक कॉरिडोर झाल्यास गावातील तरुणांना रोजगारही मिळू शकेल, प्रकल्पासाठी जागा देणा-यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळेल असे आश्वासन मोदींनी दिले आहे.

March 22, 2015 in मुख्य पान
नवविवाहीतेची आत्महत्या, खून केल्याचा आरोप 0

नवविवाहीतेची आत्महत्या, खून केल्याचा आरोप

61335793378_suicide_295_200
नेर , दि. २२ – तालुक्यातील पांढरी येथील नवविवाहीतेन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता घडली. या विवाहीतेच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुना असून ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करून नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले.
संगिता योगेश ढबाले (२२) रा पांढरी असे मृतक विवाहीतेचे नाव आहे. दोन महिन्यापूर्वीच योगेश ढबाले सोबत तीचा विवाह झाला होता. अशातच आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास तीने राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. संगिताच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुना असुन तीला मारून टाकल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला असून पोलिस ठाण्यात धडक दिली. वृत्त लिहेपर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.

 

March 22, 2015 in विदर्भ