
कणकवली -राजकारण हे उद्धव ठाकरे यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. शिवसेना सत्तेत सहभागी न झाल्यास त्यांचे आमदार फुटतील, अशी भीती त्यांच्या मनात आहे. म्हणूनच, बाळासाहेबांनी शिकवलेला स्वाभिमान सोडून शिवसेनेनं सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज केली आहे.
शिवसेनेला मंत्रिपदं हवी आहेत खरी, पण त्यांच्यापैकी कुणातही मंत्रिपदासाठी लागणारी गुणवत्ता नाही, अशी चपराकही राणेंनी लगावली आहे. शिवसेनेनं कोकणी जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कालपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा दौरा सुरू असतानाच, भाजप-शिवसेनेत पॅच-अप झाल्याचीही चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना महत्त्वाची खाती मिळणार असल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवरच, नारायण राणेंनी उद्धव यांच्यावर धारदार ‘प्रहार’ केला.
उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे पर्यटनच असल्याची खिल्ली उडवून राणे म्हणाले की, कोकणात येणाऱ्या उद्योगांना शिवसेनेचा विरोध आहे. कोकणी माणसानं सेनेला ताकद दिली, पण सेनेनं कोकणी माणसाची फसवणूकच केली आहे. स्वाभिमानाच्या गप्पा मारणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. ती कुणाचं काय भलं करणार? राज्यात विरोधात बसणारी शिवसेना केंद्रात भाजपसोबत सत्तेत आहे. कारण, राजकारण हे उद्धव ठाकरेंच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, अशी जळजळीत टिप्पणी त्यांनी केली. शिवसेनेचे आमदार फुटतील, या भीतीनेच ते सत्तेसाठी लाचार झाल्याचंही राणेंनी सुनावलं.त्यामुळे आता संध्याकाळी उद्धव ठाकरे कसा पलटवार करतात आणि ‘सामना’ जिंकतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
Archive for November, 2014
0
शिवसेना सत्तेसाठी लाचार!- राणे
0
चीनला भूकंपाचा जोरदार धक्का, चार ठार
बिजींग – चीनच्या सिचुआन प्रांताला रविवारी ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला यामध्ये चार जण ठार झाले तर ७९ हजार ५०० जणांना याचा फटका बसला आहे.
यामध्ये ५४ नागरिक जखमी झाले आहेत. तर सहा इतर जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान भूकंपामुळे फटका बसलेल्या प्रदेशांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुमारे ७९ हजार ५००हून अधिकांना याचा फटका बसला आहे. तर २५ हजाराहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
सहा हजार २०० नागरिकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यास आल्याचे अधिका-यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे. बचावपथकासोबतच सहा लष्करी विमाने, २० वैदयकीय अधिकारी आणि एक हजाराहून अधिक सैन्याला पाचारण करण्यात आले आहे.याआधी १२ मे २००८ रोजी चीनमधील वेंचुआन भागात ८.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. यामध्ये सुमारे ८० हजाराहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले होते. तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लुसानमध्ये झालेल्या ७.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात १९६ नागरिकांचा बळी गेला होता.
0
काळी (दौ.) पंचायत समिती गण पोटनिवडणूकीचा निकाल सोमवारी

यवतमाळ – महागाव तालुक्यातील काळी दौ. पंचायत समिती गणाच्या पंचायत समितीच्या सदस्यपदाची निवडणूक आज रविवारी पार पडली. उद्या सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
काळी दौ पंचायत समिती गण हा भाजप पक्षाचा बालेकिल्ला राहीला आहे. सुनिल टेमकर हे प्रचंड मताने निवडुन आले होते. त्यानंतर हा गण अनुसुचीत जातीच्या प्रर्वगासाठी सुटल्याने व पंचायत समिती सभापती पद महीलेसाठी राखीव झाल्यामुळे भाजपाच्या मालता झिंगरे ह्या विजयी झाल्या. त्याना आडीच वर्षाचा सभापतीचा कार्यकाळ पुर्ण करता आला नाही. वयाच्या कारनावरून पुसद जिल्हा सत्र न्यालयाने झिंगरे यांचे पद रद्द केले. त्यामुळे आज रविवारी पोटनिवडणूकीसाठी मतदान घेण्यात आले. सात गावातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे नथ्थु आढाव, भाजपचे संतोष झिंगरे या दोघात चुरशीची लडत झाली. सोमवारी सकाळी आठ वाजता पासुन तहसील कार्यलयात मतमोजणीला सुरूवात होणार असुन दोन तासात निकाल हाती येणार आहे.
0
बंदुकीच्या धाकावर माळेगाव येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

यवतमाळ – महागांव तालुक्यात मोठयाप्रमाणावर शेतकºयांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून बंजर जमिनीवर पिके काढुन शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेती वहीती करत आहेत. आज शनिवारी वनविभागाने वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वनविभाग व पोलिसांच्या सयुक्त कार्यवाहीत माळेगाव येथील वन जमिनीवर असलेले शेतकºयांचे अतिक्रमण बंदुकीच्या फैरी झाडून मोकळे करण्यात आले.
तालुक्यातील माळेगाव येथे सन १९७९ पासून वन जमिनीवर अमर मोतीराम राठोड व गोकुळ दरूसिंग राठोड या शेतकºयांनी जमिनीवर वहीती सुरू केली. दोन्ही शेतकºयांनी पाच-पाच एक्कर जमीन सुपीक केली होती. या जमिनीवर शेतकºयांनी वनविभागाने आकारलेला दंड भरला होता. आता आपण जमिनीचे खरे मालक झाले आहे. या अनंदात शेतकरी वावरत असतांना जवळ पास २०० च्यावर वन अधिकारी व कर्मचारी पोलीस यांनी शेतात जावून जमिन वहीती करता येत नाही, असे सांगून ताबडतोब शेतातून निघून जा अन्यथा आम्हाला जबरदस्ती ने काढावे लागेल, असे सांगत बंदुकीच्या फैरी आकाशात झाडून दहशत निर्माण केली. त्यामुळे भयभित होऊन शेतकºयांनी शेतातून परत जाने पसंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलानतंर वनविभागाच्या कर्मचाºयांनी उभ्यापिकात शेकडो जनावरे सोडून पीक उध्दस्त केले. त्यामुळे शेतºयात चितेंचे सावठ असून, जगावे की मरावे असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा टाकला आहे. लोकप्रतिनिधी नी शेतकºयांचे हित पाहता काही तरी करावे. असी आपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे. ही मोहीम यशस्वीकरण्यासाठी महागाव, उमरखेड, पुसद, काळी दौ, येथील वन अधिकारी कर्मचारी व पोलिसांना पाचारन करण्यात आले होते.
0
यवतमाळ जिल्हा परिषदेत पुन्हा पेपर फुटला; विस्तार अधिकारी पोलिसांच्या जाळ््यात

यवतमाळ – येथील जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पदभरतीचा परिक्षेपूर्वीच परिचरपदाच्या पेपर बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वडगाव रोड पोलिसांनी आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकाºयास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जिल्हा परिषदच्या ४५ परिचर पदाच्या लेखी परीक्षेसाठी १८ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. आज २२ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा दुपारच्या सत्रात घेण्यात आली. परीक्षेसाठी शहरातील जिल्हा परिषद शाळेत (काटेबाई) परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या केंद्रावर पेपर पोहताच तेथे कर्तव्यावर असलेल्या आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकाºयाने पेपरची प्रत एका कर्मचाºयाच्या हाताने बाहेर पाठविली. हा पेपर घेवून शहरातील एका कोचिंग क्लास संचालकाच्या हाती लागल्याने हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी विस्तार अधिकारी विक्रम राऊत यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. यापूर्वी विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री अशा चार संवर्गाच्या पदासाठी २ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. पेपरफुटीमुळे परीक्षार्थ्यांमध्ये संशयाचे वातावरण असताना दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
0
बालकाने रचला स्वत:च्या अपहरणाचा डाव

ठाणे : टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून औरंगाबादमधील एका ११ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणले. त्याच्यासह औरंगाबाद सोडणाऱ्या १३ वर्षीय साथीदाराचा शोध सुरू आहे.
गरीब कुटुंबातील प्रेम गुडे (११) आणि विठ्ठल कुबेर (१३) अशी या मुलांची नावे असून ते औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. प्रेम हा सहावीत तर विठ्ठल दहावीत शिकतो. दोघे मंगळवारी शाळेत जाण्याच्या वेळेस घरातून निघाले. पण शाळेत न जाता रेल्वेने ते नाशिकला आले. दोन दिवस नाशिकला राहिल्यानंतर गुरुवारी दोघेही मुंबईत आले. कुर्ला रेल्वे ट्रॅक वर फिरताना रेल्वे पोलिसांनी त्यांना हटकले. त्यामुळे दोघांची चुकामूक झाली. प्रेम हा अंबरनाथला आला. तेथे तो चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या छाया चोपडे यांना सापडला. त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला, चौघांनी आपले अपहरण करून मुंबईला आणले आणि त्यांची नजर चुकवून तेथून पळ काढल्याचे, सांगितले़ मात्र, अधिक विचारणा केल्यावर त्याने इंग्लिशच्या शिक्षिका मारतात, असे उत्तर दिले. त्यामुळे काहीतरी बनाव असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी समुपदेशनाचा मार्ग अवलंबून सत्य बाहेर काढले मित्रासोबत आपण पळून आलो असून कुठे हरवल्यास पुन्हा नाशिकला भेटू, असे त्याने मित्राला सांगितल्याची माहिती त्याने दिली. हा बनाव मालिकांमधील काही दृश्ये पाहून रचल्याची कबुली त्याने दिली.
0
सेना सत्तेच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली – भाजपा नेतृत्वाने शिवसेनेशी जुळवून घेत या सर्वांत जुन्या मित्रपक्षासोबत पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शिवसेना असो वा पंजाबमधील शिरोमणी अकाली दल, भाजपाने आपल्या सर्व मित्रपक्षांना एकत्र ठेवून रालोआला बळकट बनविण्याचे ठरविले आहे.
शिवसेनेला विनाविलंब महाराष्ट्र सरकारमध्ये सामील करून घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि वित्त व सूचना आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली या भाजपाच्या ‘त्रिमूर्ती’ने घेतला आहे. याशिवाय केंद्रातील रालोआ सरकारमध्ये शिवसेनेला आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सत्तावाटपाच्या या नव्या फॉर्म्युल्यावर आणि सरकारच्या किमान समान कार्यक्रमावर शेवटचा हात फिरविण्यात येत आहे. या नव्या व्यवस्थेचाच भाग म्हणून शिवसेनेनेही नरमाई दाखवीत राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून तडकाफडकी हटविले आहे.
महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांसोबत या नव्या व्यवस्थेवर चर्चा करण्यास खासकरून कौशल्य विकासमंत्री राजीवप्रताप रुडी यांना मुंबईला पाठविण्यात आले. तसेच मागील १० दिवस पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यावर असतानाच्या काळात अमित शहा आणि अरुण जेटली हे शिवसेना नेत्यांसोबत सतत फोनवर बोलत होते. या दोन्ही नेत्यांची गुरुवारी दिल्लीत मोदींसोबत चर्चा झाली. चर्चेत नव्या योजनेच्या अंमलबजावणीला अंतिम रूप देण्यात आले.
0
सेना-भाजपा नेत्यांचा राडा

उस्मानाबाद, दि. २२ – उस्मानाबाद येथे शिवसेनेचे रवी गायकवाड व भाजपाचे संजय निंबाळकर यांच्या दरम्यान जोरदार बाचाबाची झाल्याने कार्यकर्त्यांदरम्यानही राडा झाला. एवढचं नव्हे तर भाजपा कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा सत्कारही करू दिला नाही.
सध्या मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले एकनाथ खडसे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या घरी गेले असता खडसे यांचा सत्कार करण्यासाठी गायकवाड तेथे आले. मात्र भाजपा नेते संजय निंबाळकर यांनी त्यास आक्षेप नोंदवत. लोकसभा निवडणुकीदरम्यान सेने भाजपाचा प्रचार केला नाही, असे सांगत गायकवाड यांना खडसेंचा सत्कार करू दिला नाही. या सर्व प्रकारानंतर गायकवाड व भाजपा नेत्यांदरम्यान बाचाबाची व धक्काबुक्कीही झाली.
0
राऊत, देसार्इंसह चौघांना प्रवक्तेपदावरून हटविले

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी जवळीक असल्याचा आक्षेप असणा-या खा. संजय राऊत यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आले आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्या श्वेता परुळेकर यांचेही प्रवक्तेपद काढून घेण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाने पक्षात अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
पूर्वीच्या प्रवक्त्यांमध्ये आ. नीलम गोऱ्हे यांना कायम ठेवण्यात आले आहे. प्रवक्त्यांच्या नव्या पॅनलमध्ये खा. अरविंद सावंत, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, आमदार विजय शिवतरे, अरविंद भोसले आणि भाजपातून आलेल्या डॉ. मनीषा कायंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
खा. संजय राऊत यांची प्रवक्तेपदावरील उचलबांगडी चर्चेचा विषय बनली. मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत शरद पवार यांनी करताच खा. संजय राऊत यांनी भाजपाचे सरकार आम्ही पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचवेळी सेनेचे पक्षप्रमुख ठाकरे केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमात होते. तेथे त्यांनी आपण विरोधात बसू व हे सरकार टिकवण्याची जबाबदारी आपली नाही, असे सांगितले होते. याआधीदेखील निवडणुकीच्या तोंडावर गुजराती समाजावर अग्रलेखातून राऊत यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘सामना’तून सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे भाजपा नेते नाराज आहेत. या सगळ्याचा परिपाक होऊन खा. राऊत यांना प्रवक्तेपदावरून हटविण्यात आल्याचे समजते. मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभागही कमी झाला होता; तर सुभाष देसाई आणि परुळेकर हे प्रवक्ते असूनही माध्यमांमधील कोणत्याही चर्चेत फारसे कधीच सहभागी होत नव्हते.
0
लोकांची मनं जिंका – राज ठाकरे

पुणे – राजकारणात फक्त निवडणूक महत्वाची नसते लोकांच्या जवळ जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणेही महत्वाचे असते असं सांगत मतांच्या मागे पळण्यापेक्षा लोकांची मनं जिंका असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुण्यातील मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली. लोकं तुमच्यापासून दूर गेली नाही तर तुम्हीच त्यांच्यात मिसळला नाहीत असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण केले व कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना काही मोलाचे सल्लेही दिले.
पक्षाने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर गेलात तर पक्षाच्या बाहेर जाल असे सांगत पक्षात बेशिस्त अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक वेळेसआंदोलनं, मारहाणं करूनच कामं होत नाहीत, लोकांशी चांगले संबंद प्रस्थापित करू, माणुसकीने वागूनही कामं करून घेतात येताता असा सल्ला त्यांनी दिला.तसेच कार्यकर्त्यांच्या होर्डिंगबाजीवरही त्यांनी नाराजी वर्तवली. होर्डिंग लावून कोणीही मोठा अथवा महान होत नसतो. यापुढे महाराष्ट्रात एकाही पदाधिका-याच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग लागलेले दिसले तर दुस-या दिवसापासून तो पदावर राहिलेला दिसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. राजकारण म्हणजे समाजकारण असतते. फक्त रक्तदान शिबीरं, फळं आणि वह्या वाटप करत बसू नका तर लोकांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवा. त्यांना काय हवयं ते विचारा, असं काम करा की तुम्ही त्यांच्या कायम लक्षात रहाल.
0
गावोगावी संविधानाचा जागर!

मुंबई- ‘आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम! समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा’ असा स्वातंत्र्य, समता न्याय आणि बंधुतेचा संदेश देणा-या भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक शाळांत संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी ‘भारतीय संविधान दिना’चे औचित्य साधून प्रत्येक शाळांत संविधानाचा जागर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यासाठी पुढाकार घेऊन ‘संविधान दिनी’ साजरा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सर्व शाळांना दिले आहेत.
भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणार आहेत. ही तत्त्वे शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना देशाचे जागरूक बनवणे आवश्यक आहे. संविधानातील तत्त्वांचा प्रसार आणि प्रचार करण्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून संविधानाची पुरेशी ओळख व त्यातील तत्त्वांविषयी जागृती करून देण्यासाठी शिक्षण विभागाने संविधान दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे.
‘संविधान दिना’च्या निमित्त प्रत्येक शाळेत प्रास्ताविकचे वाचन झाल्यानंतर संविधान यात्रा काढण्यात यावी, संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, स्लोगन, पोस्टर्स, समूहगान स्पर्धाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच शाळांत संविधानातील अधिकार, कर्तव्य आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. शाळा व गावांत संविधान सभा भरवून विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनासंविधानाबाबत माहिती होईल, असे कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आदेश डावलणा-यांवर कारवाई
संविधान दिनाच्या दिवशी सर्व शाळांत परिपाठ अथवा प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन दररोज करण्यासाठी मागील आघाडी सरकारने परिपत्रक काढून आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित शाळांकडून सर्रास हे आदेश डावलले जात असून अशा शाळांवर यापुढे कारवाई करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आल्याची माहिती विभागातील अधिका-यांकडून देण्यात आली.
0
आमदारांच्या नातवाचे रुग्णालयातून अपहरण

मुझफ्फरपूर- दोन अज्ञान महिलांनी जनता दल आणि भाजपा आमदारांच्या नुकत्याच जन्मलेल्या नातवाचे रुग्णालयातून अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त जनता दलाचे आमदार दिनेश प्रसाद सिंह आणि भाजपाच्या आमदार वीणा देवी यांच्या नातवाचे बिहारमधल्या एका खासगी रुग्णालयातून अपहरण करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिक्षक रणजीत कुमार मिश्रा यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस कसून तपास करत आहेत.
अभिषेक उर्फ राजा बाबू आणि त्यांची पत्नी खुशी यांना शुक्रवारी मुलगा झाला. त्याला पहाण्यासाठी दोन चांगल्या वेशभूषा असलेल्या महिला पहायला आल्या होत्या. थोडावेळ त्या नवजात बालकाशी खेळत राहिल्या आणि खुशीला झोप लागताच त्यांनी मुल घेऊन तेथून पोबारा केला.याप्रकरणी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. तसेच प्रवेशद्वारावरील खासगी सुरक्षारक्षक अजयकुमार राय आणि कुमार राकेश या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच या दोन महिलांचे छायाचित्र संपूर्ण जिल्ह्यात लावणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0
दाऊद पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर

नवी दिल्ली- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तान आश्रय देत असून त्याचे वास्तव्य सध्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी दिली.
राजधानीत एका वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. सिंह म्हणाले की, दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान भारतात आले तेव्हाही ही बाब त्यांच्या कानावर घातली होती. आता त्याला पकडण्यासाठी पाकिस्तानावर राजनैतिक दबाव वाढवण्यात येत आहे.
दाऊदला पकडण्यासाठी काही कालावधी द्या. याबाबतच्या धोरणात्मक बाबी जाहीर करू शकत नाही. मात्र, दाऊदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही व्यापक प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले. भारतात थैमान घालणारे दहशतवादी संकट पूर्णपणे पाकिस्तान पुरस्कृत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ ही दहशतवाद्यांना मदत करत आहे. २००८ मध्ये मुंबई हल्ल्यातील सूत्रधारांना शिक्षा करण्याबाबत पाकिस्तान गंभीर नाही. त्यामुळेच याबाबतचा खटला अत्यंत संथगतीने सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. भारताला पाकिस्तानच नव्हे तर शेजारच्या प्रत्येक देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. भारताशी मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी पाकिस्तानकडूनही प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
0
शिवसेना दिल्लीची निवडणूक लढवणार

नवी दिल्ली -‘मराठी हा आत्मा’ असलेली शिवसेना आता महाराष्ट्राबाहेरील राजकीय अवकाशात ‘हिंदुत्वाचा श्वास’ घेण्यास सज्ज झाली आहे. त्याचाच भाग म्हणून दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
मराठी माणसाच्या न्याय्य-हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने नव्वदच्या दशकापासूनच हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेऊन व्यापक होण्याचा प्रयत्न सुरू केला होता. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल भूमिकांमुळे महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला मानणारा एक वर्ग आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली, जम्मू-काश्मीर व मध्य प्रदेशसारख्या राज्यांत शिवसेनेच्या शाखाही आहेत. याच शाखांचा विस्तार करून राष्ट्रीय राजकारणात पाय रोवण्याचा शिवसेनेचा विचार आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी याआधीच त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. आदित्य यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने राजस्थानातील काही महाविद्यालयांत निवडणुकाही लढवल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर अधिक वाव मिळावा, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच दिल्ली व काश्मीरच्या निवडणुका लढण्याची तयारी पक्ष करत असून उद्धव ठाकरे लवकरच याबाबतीत अधिकृत घोषणा करतील, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
शिवसेनेच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा सध्याचा तिढाही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेनेची कोंडी केली असून विरोधी पक्षात बसायला भाग पाडले आहे. ही कोंडी फोडण्याची संधी शिवसेना शोधत असून दिल्ली व जम्मू-काश्मिरच्या निवडणुकांनी ती दिली आहे. येथे शिवसेनेने निवडणुका लढल्यास हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू शकते. ते भाजपला परवडणारे नाही. याची जाणीव असलेल्या शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपचे नाक दाबून महाराष्ट्रात सत्तेचे दार उघडायचे अशी खेळी केली असावी, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
0
बाबा रामपालच्या आश्रमात , निरोधाची पाकिटे, छुपे कॅमेरे

हिसार – हरयाणात तब्बल ३३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी सतलोक आश्रमातून बाबा रामपाल याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर तात्काळ आश्रमात झडती घेण्यात आली. स्वयंघोषित संत असणाऱ्या बाबा रामपालच्या आश्रमात अनेक आक्षेपार्ह गोष्टी सापडल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. निरोधाची पाकिटे, महिला स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे, अमली पदार्थ, तसेच बेशुद्ध अवस्थेत पोहचविण्याचे गॅस आणि यासोबत अनेक अश्लील साहित्य आश्रमात आढळून आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, मागील काही दिवसापासून आश्रमात लैंगिक अत्याचार होत असल्याचाही आरोप अनेक महिलांनी केला. रामपालने पोलिसांना शरण जाण्यापूर्वी पोलिसांना काही अटीही घातल्या होत्या. त्यातील प्रमुख अट म्हणजे अटकेनंतर आश्रमाची झडती घेऊ नये. मात्र, पोलिसांनी त्याच्या या सगळ्या अटी नाकारल्या. पोलिसांच्या कारवाईमध्ये जवळजवळ २० हजार अनुयायींना बाहेर काढल्यानंतर नऊ वाजेच्या दरम्यान रामपालच्या मुसक्या आवळल्या. रामपालने अनुयायांना आश्रमात ओलीस ठेवले असल्याचे आश्रमातून बाहेर पडलेल्यांनी पोलिसांना माहिती दिली.
रामपालच्या अटकेनंतर पोलिसांनी आश्रमातील लोकांना तात्काळ बाहेर काढले. मात्र तरीही काहीजण आश्रमातून बाहेर येणास तयार नसल्याने पोलिसांनी आश्रमाची झडती सुरु केली. सर्वप्रथम पोलिसांनी मेन गेट जवळील महिला प्रसाधनगृहची झडती घेतली. त्यावेळेस पोलिसांना शौचालयात छुपे कॅमेरे आढळून आले. तसेच निरोध देखील सापडले. आश्रमात एका विशिष्ट गॅसचा दुर्गंध येत होता. हा वायू नायट्रोजन गॅस असल्याचे डॉक्टरांच्या अहवालातून समोर आले.
आश्रमातील महिलांनी बाहेर आल्यानंतर आश्रमातील कुकर्मांचा पाढाच वाढण्यास सुरुवात केली. महिलांनी केलेल्या आरोपानुसार, रामपालचे सरंक्षक देखील महिलांना डांबून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. एका महिलेला सात दिवसापासून आश्रमातून डांबून ठेवण्यात आले होते. तसेच वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.
पोलिसांनी रामपाल सोबत त्याच्या अनेक साथीदारांना अटक केली आहे. रामपालच्या आश्रमाचा संपूर्ण कारभार त्याचा भाऊ पुरुषोत्तम दास, जगदीश ढाका, प्रवक्ता राजकपूर आणि एक महिलेला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे रामपालाची काळी बाजू जगासमोर उघड झाली आहे.
0
विद्यार्थिनीचे ‘ऑनर किलिंग’

नवी दिल्ली – परजातीय मुलाशी विवाह करणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या श्री व्यंकटेश्वर कॉलेज या नामांकित कॉलेजातील विद्यार्थिनीची तिच्या आई-वडिलांनीच हत्या केली आहे. १५ नोव्हेंबरला घडलेला हा धक्कादायक प्रकार ‘ऑनर किलिंग’ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तिच्या चुलत्यावरही संशय व्यक्त केला आहे.
हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावर या कुटुंबाने मूळ गावी अंत्यसंस्कारही केले. या प्रकरणी मुलीची आई सावित्री व वडील जगमोहन यांना अटक करण्यात आली असून, वडील काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व प्रॉपर्टी डिलर आहेत. भावना यादव (वय २१) असे या तरुणीचे नाव आहे. तिने अभिषेक सेठ (वय २४) या तरुणाशी १२ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील आर्य समाज मंदिरात विवाह केला होता. भावना मूळची राजस्थानची, तर अभिषेक पंजाबी कुटुंबातील आहे.
विवाहानंतर ‘झाले गेले विसरून जा’ असे सांगून भावनाच्या कुटुंबीयांनी तिला घरी बोलावले. त्या दोघांचे पुन्हा पारंपरिक पद्धतीने लग्न लावून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. त्यानंतर भावना पुन्हा अभिषेकच्या घरी राहायला गेली. मात्र, आई-वडिलांनी तिला पुन्हा समजावल्याने काही दिवसांपूर्वीच ती माहेरी आली होती. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी भावनाचे काका लखन याने आम्हा दोघांनाही धमकी दिल्याचे अभिषेकचे म्हणणे आहे. त्याच रात्री (१५ नोव्हेंबर) भावनाच्या आई-वडिलांनी तिची हत्या केली. तशी कबुलीही त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. आम्ही तिचे लग्न आमच्या जातीतील एका मुलाशीच करण्याचे ठरवले होते. हा नियोजित साखरपुडा २२ नोव्हेंबर रोजी होता, अशी माहितीही त्यांनी दिल्याचे सहायक पोलिस आयुक्त तेजेंद्र लुथरा यांनी सांगितले. दिल्ली विद्यापीठातील श्री व्यंकटेश्वर कॉलेजमध्ये भावना तिसऱ्या वर्षाला होती, तर अभिषेक राष्ट्रपती भवनात कंत्राटी प्रोग्रॅमर आहे.
म्हणे, सर्पदंशाने मृत्यू
हत्येनंतर भावनाचे आई-वडील जगन्नाथ आणि सावित्री यांनी गाडीतून भावनाचा मृतदेह राजस्थानमधील अलवर येथे नेला. ‘भावनाला साप चावला आहे आणि आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी तिला मूळ गावी नेत आहोत,’ असे आई-वडिलांनी शेजाऱ्यांना सांगितले होते; मात्र, गावी गेल्यावर ‘रस्त्यातच भावनाचा मृत्यू झाला,’ असे त्यांनी गावातील नातेवाईकांना सांगितले.
0
हार्डवेअर दुकानाला भिषण आग, ४० लाखाचे नुकसान

यवतमाळ – आर्णी मार्गावर असलेल्या परफेक्टर हार्डवेअर दुकानाला लागलेल्या भिषण आगीत ४० लाखाचे नुकसान झाले. ही घटना काल बुधवारी रात्री दहा वाजता दरम्यान घडली. रवींद्र रतनलाल मुंधडा (४८) रा. वडगाव असे दुकान मालकाचे नाव आहे.
मुंधडा हे रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले होते. मात्र रात्री १० वाजता दुकानाला आग लागल्याची घटना उघडकीस येताच आर्णीरोड परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मुंधडा यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. बाजूच्या दुकानदारांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यावरून यवतमाळ नगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्यामुळे पाण्याचा मारा करण्यास अडचण जात होती. अखेर वडगाव रोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी व चार्ली कमांडोने गर्दी पांगविल्यानंतर रात्री २.३० वाजता आग नियंत्रणात आली. यासाठी १८ बंब पाणी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. परफेक्टर हार्डवेअर दुकानात असलेले साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. यात टरपेन टाईन, आॅईल पेंट, प्लास्टीक पाईक, नॉयलोन दोरी, फर्निचर, रेकॉर्ड आदी साहित्याचा समावेश आहे. अद्यापत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात न आल्यामुळे नुकसानीचा हा आकडा वाढण्याची शक्यात रवींद्र मुंधडा यांनी वर्तविली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. या घटनेची तक्रार वडगाव रोड पोलीस ठाण्यात देण्यात आली.
0
पहिल्या महिला डॉक्टरचा संघर्ष घराघरात पोहोचावा-डॉ. छाया महाले

यवतमाळ – एकोणविसाव्या शतकातील एक असामान्य स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. रखमा राऊत आहे. सौराष्टÑ आणि कच्छच्या पहिल्या भारतीय महाला डॉक्टरचा संघर्षमय प्रवास घराघरात पोहोचावा, यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. छाया महाले यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात पार पडणार असून, एका महिला डॉक्टरला डॉ. रखमा राऊत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कैसर-ए-हिंद, हिंदू लेडी असलेल्या डॉ. रखमा राऊत या कायम पडद्याआड राहिल्या. बालविवाह नाकरणारी पहिला महिला असून त्याविरुध्द न्यायालयीन लढाई लढली. पसंत नसलेल्या पतीकडे नांदण्यापेक्षा तुरुंगात जाण्याची शिक्षा पसंत करणारी कणखर महिला डॉक्टर होती. १८९० मध्ये त्यांनी लंडन स्कूल आॅफ मेडीसीन फॉर विमेन या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ केला. १८९४ मध्ये शेवटची परीक्षा पास केली. वैद्यकीय सेवा करीत असताना त्यांनी सामाजिक भान कायम बाळगले होते. सुरतमधील माळवी हॉस्पीटल रखमाबाई हॉस्पीटल म्हणूनच ओळखल्या जाते. या माऊलीची १५० वी जयंती शासन पातळीवरून साजरी होणे आवश्यक होते. मात्र पडद्यामागील महानायिका उपेक्षित राहिल्याबद्दल डॉ. छाया महाले यांनी खंत व्यक्त केली. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, योगेश धानोरकर, विद्या खडसे, राजश्री कुºहडकर, सुवर्णा ठाकरे, आशा काळे, संगीता होनाडे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
0
अशोक चव्हाणांना दणका, आदर्श घोटाळ्यातून नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई – आदर्श घोटाळ्यामुळे गोत्यात आलेले काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना बुधवारी मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला आहे. चव्हाण यांचे नाव आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून वगळण्यास हायकोर्टाने नकार दिल्याने चव्हाण यांना घोटाळा महागात पडण्याची चिन्हे आहेत.
आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून अशोक चव्हाण यांचे नाव वगळावे अशी याचिका सीबीआयने मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. तत्कालीन राज्यपालांनी चव्हाण यांची चौकशी करण्यास नकार दिल्याने आरोपपत्रातून चव्हाणांचे नाव वगळावे अशी सीबीआयची भूमिका होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने आरोपपत्रातून चव्हाण यांचे नाव वगळण्यात नकार दिला. मुंबईतील कुलाबा येथे कारगिल युद्धातील शहीदांच्या पत्नीसाठी आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे अधिकारी व राजकीय नेत्यांनी लाटल्याचे उघड झाले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला व त्यामुळेच चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चव्हाण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
0
पंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार – हायकोर्ट
पंढरपूर – आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणा-या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचे मत हायकोर्टाने मांडले आहे. हायकोर्टाने नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडले आहे.
वारीनंतर पंढरपूरमध्ये होणा-या अस्वस्छतेविरोधात मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल असून यासंदर्भात हायकोर्टाने दोन वकिलांची नियुक्ती करत अहवाल मागवला होता. या द्विसदस्यीय समितीने हायकोर्टासमोर अहवाल मांडल्याचे वृत्त आहे. या अहवालाच्या आधारे हायकोर्टाने अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. ‘वारकरी स्वच्छतागृह असतानाही त्याचा वापर करत नाही व त्यामुळेच शहर आणि नदीकाठी घाणीचे साम्राज्य पसरते. याबाबत विठ्ठल – रुक्मिणी मंदिर संस्थाना कोणतेही पाऊल उचलत नाही असे हायकोर्टाने नमूद केल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
पुढील सुनावणीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात निर्देश दिले जातील. या सुनावणीला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनाचे प्रतिनिधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.












