पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for November, 2014

ऑक्टोबर निकालात औरंगाबादची बाजी 0

ऑक्टोबर निकालात औरंगाबादची बाजी

images (1)

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकालात औरंगाबाद विभागाने बाजी मारली.

दहावीचा निकाल 29.25 टक्के तर बारावीचा 26.77 टक्के लागला. मार्च परीक्षेप्रमाणोच ऑक्टोबर परीक्षेच्या निकालाची टक्केवारीही वाढली आहे. शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेला राज्यात 1 लाख 35 हजार 916 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 39 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीला 93 हजार 510 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 25 हजार 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई विभागीय मंडळातून दहावी परीक्षेला 25 हजार 142 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 6,508 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई विभागीय मंडळाचा निकाल 25.88 टक्के लागला.

बारावी परीक्षेत 26 हजार

524 विद्याथ्र्यापैकी 7,413 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 27.95 आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा:या दहावी-बारावी परीक्षेत कोकण मंडळ निकालाच्या टक्केवारीत आघाडीवर असते. परंतु ऑक्टोबर परीक्षेत या मंडळाचा निकाल

सर्वात कमी लागला. कोकण मंडळाचा दहावीचा निकाल

22.48 तर बारावीचा 22.34 टक्के लागला.

शस्त्रसज्जतेअभावी गेला पोलिसांचा बळी 0

शस्त्रसज्जतेअभावी गेला पोलिसांचा बळी

hindu-martyrs-of-26-11-mumbai

मुंबई : शस्त्रसज्जतेअभावी  26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात पोलिसांचा बळी गेला, असे निरीक्षण मंगळवारी उच्च न्यायालयाने नोंदवल़े त्यामुळे पोलिसांच्या शस्त्रंवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े

न्यायालय म्हणाले, शस्त्रची दर 3 वर्षानी पुनर्रचना करण्याचे आदेश दिले होत़े मात्र अद्याप पुनर्रचना झालेली नाही हे गैर आहे. पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही अनेकवेळा शासनाचे कान उपटले. मात्र त्याची दखल शासन घेत नाही़ निदान महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार शासनाने करावा. अश्विनी राणो यांच्या याचिकेवरील सुनावणीत न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने हे मतप्रदर्शन केल़े

  नंदकुमार बुटे उपाध्यक्षपदी बिनविरोध 0

नंदकुमार बुटे उपाध्यक्षपदी बिनविरोध

Untitled-1

राज्यात 3 हजार हवामान केंद्र उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 0

राज्यात 3 हजार हवामान केंद्र उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

DSC_4824
सर्व ग्रामपंचायतींच्या ठिकाणी हवामान केंद्र
यवतमाळ : पारंपारिक पध्दतीने दरवर्षी ठराविक वेळी शेतकरी पेरणी करतात. निसर्गाने साथ न दिल्यास दुबार, तिबार पेरणी करावी लागते. यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. हवामानाचा अचूक अंदाज असल्यास हे नुकसान टाळता येवू शकते. त्यामुळेच हवामानाच्या अचूक अंदाजासाठी राज्यात 3 हजार छोटी हवामान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
स्वातंत्र्य सेनानी तथा राज्याच्या मंत्रिमंडळात विविध विभागाचे मंत्री पद भूषविलेले स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित स्मृती समारोह प्रसंगी ‘व्हिजन महाराष्ट्र’ या विषयावर विचार व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी खा.विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली. सुरुवातीस जवाहरलालजी दर्डा यांच्याशी फडणवीस कुटुंबियांच्या असलेल्या कौटुंबिक संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. बाबुजींच्या आठवणी आणि त्यांचे कार्य आम्हासाठी प्रेरणादायी आहे़, असे ते महाराष्ट्र राज्यास परिवर्तनासाठी फार मोठी संधी आहे. चांगले धोरण आणि जनतेच्या विश्वासाने राज्याला पुढे न्यायचे आहे. तरुणांचा देश म्हणून आपली ओळख आहे. या तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देवून रोजगारक्षम मानव संसाधन बनविणे आवश्यक आहे. राज्यातील मानव संसाधन विकसित केल्यास राज्य विकासाच्या गाथेत देशात अव्वलस्थानी राहिल. व्यवसाय, कला तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवित असतांना युवाशक्ती श्रमशक्ती तसेच राष्ट्रशक्तीत कशी परिवर्तीत होईल, यावर आपला भर राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग विकसित झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पुर्ण होवू शकणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई तसेच सुरक्षा दिली पाहिजे. सिंचनाच्या सोई उपलब्ध झाल्यानंतर विज पुरवठा मुबलक नसल्यास शेती व्‍यवसायावर विपरीत परिणाम होईल. भविष्यात विज वितरणाचे चांगले नियोजन करून राज्याला विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. राज्यातील ऊर्जाप्रकल्प त्यांच्या पूर्ण क्षमतेने सुरु राहिल्यास टंचाई भासणार नाही. त्यामुळे अशा प्रकल्पांना गती दिली जात आहे. पुर्वी राज्यातील विज प्रकल्पांना लांबून कोळश्याचा पुरवठा व्हायचा. केंद्र शासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राज्याला आजूबाजूंच्या खाणींमधून कोळसा उपलब्ध होणार असल्याने विज उत्पादन वाढीसह विजेचे दर कमी करण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या एका विजपंपासाठी दिड लाखापर्यंत खर्च येतो. हा खर्च परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर असे सौरपंप दिल्यास शाश्वत विजेसोबतच हे पंप त्यांना उत्पादन वाढीसाठी मोलाचे ठरेल. त्यामुळे असे पंप शेतकऱ्यांना द्यावयाचे नियोजन आहे. कापसाच्या भावाबाबत दरवर्षी अडचण होते. राज्यात सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरु केले आहे. पणन महासंघही सीसीआयच्यावतीने कापूस खरेदी करत आहे. मुळात जोपर्यंत कापसावर प्रक्रीया करणारे उद्योग येथे सुरु होणार नाही, तोपर्यंत चांगला भाव मिळणार नाही. त्यामुळे प्रक्रीया उद्योग सुरु करण्यावर भर राहिल, असे ते म्हणाले. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. नजर आणेवारी नुकतीच आली. आणेवारीनंतर वैयक्तिक पंचनामे करावे लागतात. अशा पंचनाम्यातून सुट मिळावी म्हणून आम्ही केंद्र शासनास विनंती केली. केंद्राने पहिल्यांदाच वैयक्तिक पंचनाम्याच्या सुटची मागणी मान्य केली. केंद्राचे पथक राज्यात येवून दुष्काळाची पाहणी करतील. त्यानंतर या दुष्काळी स्थितीवर निर्णय होणार आहे. काही गावे वारंवार दुष्काळात जातात. या गावांना दुष्काळातून कायमस्वरूपी काढण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने काम हाती घेण्यात येणार आहे. दुबार, तिबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान थांबविण्यासाठीच 3 हजार छोटी हवामान केंद्र सुरु करण्यात येत असून पुढे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी अशी केंद्रे उभी करण्यात येतील. राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग यावे यासाठी उद्योगांना लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यासोबतच त्यांना कमीतकमी वेळात परवानग्या देण्यासाठी नवीन विंडो सिस्टम लवकरच अंमलात येईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकतो. त्यासाठी चांगले धोरण आणि त्याच्या मलबजावणीची तसेच जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे. राज्याला विकासाच्याबाबतीत अग्रेसर करण्यासाठी आम्ही काम सुरु केले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सुरुवातीस खा.विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी विदर्भाच्या विकासाच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वे मार्गाला गती देण्यासोबतच यवतमाळसारख्या ठिकाणी ऑटोहब सारखे प्रकल्प कसे येतील यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. स्व.जवाहरलालजी दर्डा यांनी विविध खात्याचे मंत्री असतांना विदर्भावर विशेष लक्ष दिले होते, असे सांगुन बाबुजींच्या आठवणींवर प्रकाश टाकला. कार्यक्रमास आ.राजू तोडसाम, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, हरिष मानधना, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, स्वातंत्र सैनिक प्राणजीवन जानी, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, विशेष पोलीस महानिरिक्षक सी.एस.उगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, जेष्ठ संपादक मधुकर भावे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

November 25, 2014 in महाराष्ट्र
वनविभागाच्या कॅमेºयात वाघिण कैद 0

वनविभागाच्या कॅमेºयात वाघिण कैद

IMG-20141125-WA0026_resized
झरी जामणी तालुक्यात हैदोस, शेतकरी व मजुरात दहशत
फोटो आहे……
यवतमाळ – जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून नोंद असलेल्या झरी जामणी तालुक्यात वाघिणने हैदोस घातला आहे. वनविभागाने बसविलेल्या कॅमेºयात सदर वाघिण कैद झाली असून शेतकºयांसह नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
झरी तालुक्यातील मार्की, पांढरकवडा (ल.), मुच्छी, शेकापूर व खरबडा शिवारात मागील १५ दिवसापासून वाघिणीने आपल्या दोन बछड्यांसह ठाण मांडल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वाघिणीच्या दहशतीमुळे त्रस्त शेतकºयांनी यांची तक्रार वनविभागाकडे केली. पांढरकवडाचे उपवनसंरक्षक ए.पी.गिºहीपुंजे, टिपेश्वर अभयारण्य चे प्रमुख चंद्रशेखर बाला, वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.बी.नागुलवार, वाईल्ड लाईफ सोसाएटी नागपूरचे मिलिंद पारीवाकम आणि वनकर्मचारी मार्की येथील हरी भोंगडे यांच्या शेतावर पोहोचले. येथील शेतकरी वासुदेव विधाते, अनिल विधाते, तुकाराम जुमनाके, प्रकाश विधाते, बंडु पारखी, देवनाथ भोंगडे आणि अन्य शेतकºयांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची, वाघाच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पाळीव प्राण्यांचा मोबदला आणि शेतमालाच्या नुकसानीचा मोबदला देण्याची मागणी केली. शेतशिवारात फिरत असलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी बेहोश करण्याºया ट्रॅँक्युलायझर बंदूकीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपवनसंरक्षक गिºहीपुंजे यांनी वरिष्ठ अधिकाºयांकडून याची परवाणगी मागीतली. प्रत्यक्षदर्शी शेतकºयानुसार ही वाघीण कधी एकटी, कधी आपल्या दोन बछड्यांसोबत तर कधी फक्त एकाच बछड्यासोबत वावरताना दिसते. मार्की ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.

November 25, 2014 in मुख्य पान
आठ कामगारांना विषबाधा 0

आठ कामगारांना विषबाधा

IMG-20141125-WA0028_resized
झरी – तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील मे.बी.एस.इस्पात लि. च्या खासगी कोळसा खाणीत काम करणाºया आठ कामगारांना दूषित पाणी पिल्याने विषबाधा झाली. विषबाधा झाल्यानंतर कामगारांना उलट्या होने सुरू होताच त्यांना मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने आता सर्वच कामगारांची प्रकृती चांगली असून त्यांना सुट्टी देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार कोळसा खाणीतील कामगार जिथे पाणी पितात त्या पाण्याच्या टाकीत पाल पडली होती. ते पाणी पिताच कामगारांना उलट्या सुरू झाल्या. विषबाधा झालेल्या कामगारांमध्ये प्रफुल चौधरी, मुकेश बोरकुटे, सुमित गोंडे, विनोद   गोंडे, चंद्रकांत डवरे, प्रदीप खडसे, गणेश मडकाम, संतोष राजूरकर यांचा समावेश आहे. कामगारांना सामाजिक कार्यकर्ता अनिल पावडे, सुरेश चामाटे, दीपक चांदेकर, कोळसा खाणीचे व्यवस्थापक आकाशदीप, मोरेश्वर कस्तुरे यांनी मुकुटबनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉक्टर जोगदंड यांनी कामगारांवर वेळेवर उपचार केल्याने मोठा अनर्थ टाळता आला.

November 25, 2014 in मुख्य पान
अन्... ती महिला झाली जिवंत! 0

अन्… ती महिला झाली जिवंत!

medical college yavatmal
जिल्हा शासकीय रुग्णालयात भोंगळ कारभार, नातेवाईक संतप्त
यवतमाळ  – येथील वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती करण्यात आलेल्या महिलेवर उपचार करणाºया डॉक्टरांना महिला जिवंत आहे की मृत्यू पावली, याचा अंदाज लावता आला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तिने श्वास सोडला म्हणून ‘डेथ सर्टीफीकेट’ बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र महिलेचे पल्स पुन्हा सुरू झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा आहे.
आरोग्य विभागाकडून दरवर्षी जिल्हावासींयाच्या सदृढ आरोग्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्ची घातल्या जात आहे. मात्र आजही उपजिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार मिळत नाही. प्रसुतीसाठी सुविधा असतानाही रुग्णांना यवतमाळ रेफर केल्या जात असून, खासगी रुग्णालयात सिझर साठी ३० ते ४० हजार रूपये खर्च येते. त्यामुळे रुग्ण कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मोठ्या अपेक्षेने येत आहे. नेर येथील निखत परवीन महम्मद शफीक या महिलेला प्रसुतीसाठी २३ नोव्हेंबरला शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. काल सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास तिची प्रसुती झाल्यानंतर जन्म झालेल्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची प्रकृती गंभिर झाल्याने तिच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी सुरुवात केली. प्रकृतीत कुठलिही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी तिला व्हेटेंलेटरवर ठेवले. दरम्यान काल सोमवार ते आज मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत चारदा तिच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. त्यापैकी तीनदा त्या महिलेचे ठोके सुरू झाले. आज सकाळी ठोके बंद झाल्यानंतर डॉक्टरांनी प्रयत्न करूनही तिचा श्वास सुरू झाला नाही. डॉक्टरांनी मात्र महिलेचा मृत्यू झाला अशी अधिकृत घोषणा करण्याऐवजी महिलेच्या नातेवाईकांकडून कोºया अर्जावर सह्या घेऊन हळूहळू आपली प्रोसेस सुरू केली. नातेवाईकही डॉक्टर काहीच सांगत नसल्यामुळे संभ्रमात होते. डॉक्टरांच्या चुप्पीमुळे नातेवाईकांना आपला रुग्ण मृत पावल्याची शंका आली. त्यांनी तिला घरी घेवून जाण्याची तयारी सुरू केली. दरम्यान महिलेला व्हेटेंलेटरवरून काढण्यासाठी  गेलेल्या डॉक्टरांना पल्स सुरू दिसले. क्षणभर तेही अचंबित झाले. त्यांनी लगेच तिच्यावर उपचार सुरू केला आणि डेथ सटीफिकेट बनविण्याची प्रक्रीया थांबविण्यात आली.
महिलेचा मृत्यू झाला म्हणून तब्बल दीड तास रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप नातेवाईक करीत असून,सध्या महिलेवर उपचार सुरू आहे.  या प्रकरणाबद्दल माहिती सांगण्यास अधिकाºयांनी टाळाटाळ केली. महिला जिवंत असल्याचे लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेमुळे कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाचा कारभार किती बेजबाबदारपणे सुरू आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

November 25, 2014 in महाराष्ट्र
ट्रकची दुचाकीला धडक; दोन युवक ठार 0

ट्रकची दुचाकीला धडक; दोन युवक ठार

18ISL06-685x320
नेर – चांदूररेल्वे येथून नेर येथे येणाºया दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन युवक ठार झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ४.३० वाजता खरबी या गावाजळ घडली. आकाश चंद्रशेखर वानखेडे  (२५) रा. शिवाजी नगर नेर,  शुभम धोटे  (२३) रा. मडकोना ता. कळंब अशी मृतकाची नावे आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथून औषधी घेऊन ते दुचाकीने ( एम.एच. २७ / ३५५८) नेर येथे येत होते.  अशातच औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील खरबी या गावाजवळ ट्रकने (ओ.डी. १५/ बि ५११४) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये आकाश हा जागीच ठार झाला. तर शुभमचा अमरावती येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालक सुशांत बियाणी (२५) रा. ओडीसा  याच्याविरोध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

November 25, 2014 in मुख्य पान
२६/११ हाच पोलीस दिवस जाहिर करण्याची मागणी 0

२६/११ हाच पोलीस दिवस जाहिर करण्याची मागणी

23-7-A1831
२६/११ ह्या दिवसाचे स्मरण होताच हृदयचे ठोक वाढायला लागतात. त्या कर्तुत्वावार पोलीसांना माझा सलाम! महाराष्टÑ पोलीस भारतात नं. १ ची पोलीस आहे. त्या कर्तुत्ववार विरांगना अखंड स्मरणात ठेवता यावे हा दिवस अश्रु न ढाळत बसता पोलीसांना उत्साहीत करण्याकरिता हा माझा प्रयत्न सगळे दिवस मोठ्या उत्साहाने साजरे होता. महाराष्ट्र पोलीस दिवस का होत नाही असा प्रश्नही पोलिस दलातील हवालदाराच्या मुलींनी उपस्थित केला आहे.
महाराष्टÑ पोलीसांचा रुबाब खरचं अविस्मरणीय आहे. उदा. पोलीस धिकारी दयानायक सारख्या धाकाने अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीम ज्यांच्या पाठीशी विदेशी शक्ती असताना सुध्दा तो देश सोडून राहात आहे. तसेच २६/११ आतंकवादी हमल्याच्या वेळी आपल्या नजरेसमार आतंकवाद्यासोबत लढण्यासाठी प्रथम उतरणारे  नागरे पाटील (आयपीएस) अधिकारी आपल्या अंगरक्षका सोबत फक्त ९ एमएम पिस्टलचा जोरावर हॉटेल ताज मध्ये आंतकवाद्यांसोबत झूंज देण्यासाठी प्रवेश केला आणि त्याच दिवशी जीवाची पर्वा न करता आतंकवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, विजय सावळकर, अशोक कामठे शहीद झाले. पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे सारख्यांनी फक्त लाठीच्या भरवश्यावर एके ४७ धारी पाक व्यप्त अजमल कसाब सारख्या आतकवाद्याला जेरबंद केली. स्वत:शहीद झाले. त्यामुळे उज्वल निकम सारख्या हूशार वकीलाने त्याला फासा पर्यंत पोचविण्यात यश मिळविले असे महाराष्टÑ पोलीसांच्या यशाच्या कतुत्वाचे अनेक उदाहरणे आहेत.
गडचिरोली सारख्या दर्गम भगाात नेहमी नक्षलवाद्यांसोबत चकमक होते. त्या अगणित पोलीस शहीद सुध्दा होतात. हे सारे संसाराचा गाडा चालावा म्हणूनच नव्हे तर आपल्या लोकांना सुरक्षीतता मिळावी या करीता सतत लढत असतात. आपल्या सारख्या सामान्यांना गगनात झोपावता यावे म्हणून ही वाटचाल पुढे चालली आहे. दिवाळी, दसरा अथवा कुठलेही कार्यप्रसंग असो पोलीसांना माय रक्षणांच्या बाजूत समाधान मानावे लागते. शासन दरबारी काही मागता येत देखील नाही. कारण त्यातही   कायद्याच्या चौकशीत असते. ना सतत प्राणांची बाजी लाविणाºयासाठी ज्या दिवशी पोलीस खात्यांतील कर्तुत्ववान उच्चत्वाला नाठनारे पोलीस अधिकारी शहीद झाल आणि अजमल कसा सारख्या दृष्टास फासीला लअकविले म्हणजेच हा दिवस महाराष्टÑ पोलीसांसाठी विजय दिवस आहे.
शहिदांच्या आठवणीचे नेहमीच स्मरण रहावे म्हणून २६/११ हा विजय दिवस महाराष्टÑ पोलीसांकरिता पोलीस दिवस म्हणून शासनाने घोषित करावा. तसेच या दिवसी पोलीस दलात उत्तम काम करणाºया पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाºयांना तसेच पोलीस पाटील अथवा गुन्हे उघडकीस करण्यास मदत करणाºयांचा सन्मान करावा. सामान्यास सन्मानित करून पोलीसांना मदतीचा हात वाढेल. पोलीस स्वत: करीता काही मागू शकत नाही. आपण त्यांच्या कार्याला उंची देऊया अन २६ नोव्हेंबर २०१४ पासून हा दिवस पोलीस दिवस पाळावा एवढीच अपेक्षा.
कु. विणा शेखर वांढरे
रा. पळसवाडी, पोलीस लाईन, यवतमाळ

November 25, 2014 in मुख्य पान
रिपाइं (ए) जिल्हा बैठक संपन्न 0

रिपाइं (ए) जिल्हा बैठक संपन्न

3740_rpi-logo
यवतमाळ – रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) ची २४ नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन येथे जिल्हा कार्यकारीणीची सभा घेण्यात आली.  राष्टÑीय अध्यक्ष   मा. खा. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वात  जवखेडा हत्याकांडाचा निषेध मोर्चाचे आयोजन २८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे केले आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जाण्या संबंधी नियोजन केले असून मोर्चात कार्यकर्त्यांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांनी केले. या बैठकीमध्ये स्व. शाहू चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली. पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला रामदास बनकर, अ‍ॅड. रवींद्र अलोणे, अ‍ॅड. धनंजय मानकर, नवनीत महाजन, धम्मपाल माने, सुरेश जाधव, महादेव घरडे, बन्सोड, वसुर्केत पाटील, कविता पाटील, सुलोचना भोयर, शुभांगी घरडे, राज ढवळे, गोविंद मेश्राम, विलास कांबळे, संभाजी लोणारे, निलकंठ मेश्राम, प्रफुल्ल इंगोले आदी उपस्थित होते.

November 25, 2014 in मुख्य पान
फुले-आंबेडकर स्मृतीपर्व २८ नोव्हेंबर पासून 0

फुले-आंबेडकर स्मृतीपर्व २८ नोव्हेंबर पासून

41
यवतमाळ – महात्मा ज्योतीबा फुले – डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत स्मृती पर्व – २०१४ चे आयोजन करण्यात आले आहे. आझाद मैदान येथील क्रांतीज्योती सावित्रीआई फुले समता परिसर येथे होणाºया कार्यक्रमात विविध संस्था आणि संगटनांचा सहभाग राहणार आहे. नऊ दिवस चालणाºया स्मृतीपर्वात विविध समाज घटकातील विचारवंत विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्टÑ उभारणीसाठी समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा पाया भक्कमपणे रचला. महात्मा ज्योतीबा फुले यांनी समाज क्रांती करून बहुजन समाजाच्या वैचारिक जडणघडणीत सर्वोच्च योगदान केले. या दोन्ही महामानवांचा स्मृतीदिन साजरा करीत असताना बहुजनांचे प्रबोधन व्हावे या हेतुने तमाम बहुजनांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. जमातवाद विकासाच्या मार्गातील धोंड, भारतीय समाजात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक परिवर्तनामध्ये मराठा सेवा संघाचे योगदान, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि इस्लाम, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी म.फुलेंची विचारधारा हाच एकमेव पर्याय, ओबीसी समाज व फुले-शाहु-आंबेडकर विचारधारा, तसेच सम्राट अशोकची शासन प्रणाली आणि भारतीय संविधान आदि विषय स्मृतीपर्वाच चर्चिले जाणार आहेत.
स्मृतीपर्वात आदिवासी मुक्तीदल व भटक्या विमुक्त जमाती, स्मृतीपर्व महिला समीती, मराठा सेवासंघ, ख्रिस्त भक्तमंडळी, जमात ए इस्लामी (हिंद), ओबीसी सेवासंघ, तेली समाज महासंघ, गुरु रविदास विचारमंच,  लोकशाहीर अन्नाभाऊ साठे स्मारक समीती तथा आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यवतमाल यांचा सहभार राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानेश्वर गोबरे, विलास काळे, मंसूर एजाज जोश, देवानंद पवार, मनोज रणखाम, आनंद गायकवाड, डॉ.दिलीप महाले, प्रा.सुनंदा वालदे, कवडू नगराळे, राजेश मुके, संजय तरवरे, विनोद फुलमाळी, पी.पी.पवार, डॉ.सुभाष जमदाळे, कुंदा तोडकर, माधव सरकुंडे, सुनिता काळे, माया गोबरे, रियज सिद्दीकी, संजय बोरकर आदिंनी केले.

November 25, 2014 in मुख्य पान
 औरंगाबादमध्ये बेधुंद पार्टी उधळली 0

औरंगाबादमध्ये बेधुंद पार्टी उधळली

2014-11-24~policered_ns
औरंगाबाद – येथील सातारा बीड बायपासवर रविवारी भरदुपारी हॉटेल ‘एमएच-२०’मध्ये पोलिसांनी बेधुंद पार्टी उधळून लावली. संगीत कला प्रदर्शनाच्या नावाखाली नशेत तर्र असलेल्या १०० तरुण-तरुणींचा पाश्चात्त्य संगीतावर नाच सुरू असतानाच पोलिसांनी धाड टाकली. चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
दुपारी १२ वाजता सुरू झालेली पार्टी रंगात आली. नशेत तर्र असलेल्या तरुणांनी गाण्यांचा आवाजही वाढविला. हॉटेलच्या बाजूलाच रुग्णालय आणि वसाहत असल्याने नागरिकांना या धांगडधिंग्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे काही नागरिकांनी सातारा पोलिसांना फोन करून पार्टीची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एम.बी. टाक, के.डी. महांडुळे, पोलीस न्स्टेबल कल्याण चाबूकस्वार यांच्यासह पोलिसांचे पथक हॉटेलवर धडकले.
आमच्याकडे रीतसर परवानगी आहे, आम्ही नियमाचा भंग करीत नाही, असे सांगत संयोजक सनी चहल याने पोलिसांना अडविले. संगीत कला प्रदर्शनासाठी दुपारी १२ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत परवानगी असल्याचे पाहताच पोलिसांनी पाश्चात्त्य संगीत आणि दारू पिऊन थिरकण्याची परवानगी आहे का, असा सवाल केला. काही वेळ दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. संगीत बंद केल्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी सनी चहल याच्यासह इतर चौघांविरुद्ध कलम ११०/११७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली. हे हॉटेल लघाने पाटील यांचे असून, त्यांनी मुंबई येथील किशोर कोटियान यांना चालविण्यासाठी दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली.
फेसबुकवर पेज
‘आफ्टरनून म्युझिकल हँगआऊट’ या नावाने फेसबुकवर पेज करून या पार्टीची जाहिरात करण्यात आली. त्यासाठी तीन मोबाईल नंबर देण्यात आले. या तिन्ही नंबरवर लोकमतच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता यातील सुरुवातीचे दोन नंबर नॉट रिचेबल आले. शेवटच्या नंबरवरून कॉल घेण्यात आला. मात्र, त्याने नाव सांगितले नाही. आमची चूक झाली. पोलिसांनी सांगताच आम्ही पार्टी बंद केली. यामुळे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी बोलाविल्यानंतर आम्ही ठाण्यातही जाऊन आलो, अशी माहिती या नंबरवरून देण्यात आली. पुन्हा हा नंबरदेखील स्वीच आॅफ झाला.

November 24, 2014 in मुख्य पान
रेडिओच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार 0

रेडिओच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार

fm 63181
श्रीनगर – निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सोशल मिडीयाचा वाढता वापर पाहता सध्या निवडणुकीदरम्यान सोशल मिडीयावरुन प्रचार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र त्यासोबतच रेडिओदेखील निवडणुकीत प्रचाराचे महत्त्वाचे माध्यम बनत आहे. जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी राज्यातील काँग्रेस, भाजपा यांसारख्या बड्या पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर रेडिओचा वापर केला जात आहे.
भाजपाकडून रेडिओवरील चॅनेल्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल येथे केलेले भाषण प्रसारित केले जात आहे. जम्मू-काश्मीर देशासाठी एक विकास मॉडेल बनले पाहिजे असे मोदींनी या भाषणात म्हटले होते. तसेच वृत्तपत्रातूनही मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात आहे. भाजपासोबतच काँग्रेसनेही रेडिओच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षासोबतच्या युतीसोबत गेल्या सहा वर्षांत केलेल्या कामांचा प्रसार काँग्रेस रेडिओच्या माध्यमातून करत आहे.
लखनपूर ते लडाख हा चौपदरी रस्ता कोणी बांधला? काँग्रेसने. राज्याला रस्तेमार्गाने जोडण्यासाठी चेनानी आणि झोजिला येथे भुयारी मार्ग कोणी बांधले? काँग्रेसने. माझे मत फक्त काँग्रेसला अशा प्रकारची जाहिरात रेडिओद्वारे केली जात आहे. त्यासोबतच जम्मू-काश्मीरमधील शहरी भागातील उमेदवारही रेडिओच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार करत आहेत.

November 24, 2014 in मुख्य पान
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित 0

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित

parliment
नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य मुरली देवरा यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. मुरली देवरा यांच्यासह निधन झालेल्या इतर सदस्यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
अधिवेशनाच्या सुरुवातीस नव्या खासदारांनी यावेळी शपथ घेतली. बीड लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रितम मुंडे यांनीही मराठीत शपथ घेतली. त्यानंतर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याचे जाहीर केले. महिनाभर चालाणा-या या अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. वस्तू आणि सेवा कर विधेयक, जमिन अधिग्रहण विधेयक तसेच जीएसटी कर विधेयक मांडली जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाध्ये मांडल्या जाणा-या विमा विधेयक तसेच काळ्या पैशाच्या मुद्दयावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत. दरम्यान, संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पडेल. विरोधकांचेही सरकारला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्यक्त केली. २३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे.

November 24, 2014 in मुख्य पान
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे निधन 0

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे निधन

images
मुंबई – माजी पेट्रोलियम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
मुरली देवरा यांचे पार्थिव आज दुपारी १२ ते दोन वाजेपर्यंत मुंबई काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर चार वाजता गिरगावमधील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे गांधी कुटुंबाशी तसेच उद्योगपती मुकेश अंबानीसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती. १९६८ पासून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.  त्यानंतर १९७७ ते १९७८ दरम्यान ते मुंबईचे महापौर होते. दक्षिण मुंबईतून ते चार वेळा ते संसदेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यामुळेच दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. २००४ मध्ये राज्यसभेत खासदार होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात देवरा यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रिपद भूषवले होते. तसेच जुलै २०११ मध्ये त्यांनी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला होता. दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते.मुरली देवरा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुरली देवरा हे त्यांच्या शांत स्वभावामुळे पक्षात लोकप्रिय होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. कालच मी देवरा यांच्या कुटुंबीयांकडे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आज या बातमीमुळे खूप दु:ख होत आहे. असे मोदी म्हणाले.

November 24, 2014 in मुख्य पान
अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला 0

अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला

images.jpeg333
काबूल – तालिबानी दहशतवादाने पोळलेल्या अफगाणिस्तानला रविवारी आणखी एक जबरदस्त हादरा बसला. व्हॉलीबॉल सामना सुरू असताना दहशतवाद्यांनी एका स्टेडियममध्ये घुसून केलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात तब्बल ४५ लोक ठार झाले आहेत. तर ५०हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पकतिका प्रांतातील एका स्टेडियममध्ये हा हल्ला झाला. व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी शेकडो व्हॉलीबॉल रसिकांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेऊन एक आत्मघाती बॉम्बर प्रेक्षकांमध्ये घुसला आणि त्याने स्वत:जवळच्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. मृतांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

November 23, 2014 in देश-विदेश
'ताज'वर शिया मुसलमानांचा दावा 0

‘ताज’वर शिया मुसलमानांचा दावा

images.jpeg11
आग्रा – बादशहा शहाजहानने जिच्यासाठी ताज महाल बांधला ती मुमताज शिया मुसलमान होती, असे सांगत उत्तर प्रदेशातील शिया पंथाच्या मुसलमानांनी ताज महालावर आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशचे औकाफ मंत्री आझम खान यांच्या वक्तव्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. ‘केंद्र सरकारने ताज महालाचा ताबा सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला द्यावा, अशी मागणी खान यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिया वक्फ बोर्डही सरसावले असून मुमताज महल ही शिया मुसलमान होती. त्यामुळे ताज ही शिया इमारत असल्याचा दावा शिया बोर्डाने केला आहे. शियांच्या मागणीच्या समर्थनार्थ लखनऊ येथील इमाम-ए-रझा कमिटीचे अध्यक्ष फय्यर हैदर यांनी काही मुद्दे मांडले आहेत.
हैदर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, यूपीचे मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांना पत्र लिहिले आहे. शिया धर्मगुरूंनीही कमिटीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ‘मुमताजचा पती बादशहा शहाजहाँ सुन्नी होता. त्याची कबर ताजमध्येच आहे, याचीही आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे किमान ताजचा अर्धा हिस्सा तरी शियांना मिळावा, असा मध्यममार्गही शिया धर्मगुरूंनी सुचविला आहे. ताजची जबाबदारी सध्या केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे.

November 23, 2014 in देश-विदेश
 स्वतंत्र विदर्भावर ठाम!: गडकरी 0

स्वतंत्र विदर्भावर ठाम!: गडकरी

vidarbha_flagnitin-gadkari1
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगळ्या विदर्भाला कधीही विरोध केलेला नाही. विदर्भाविषयी भाजपची भूमिका ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीनं विदर्भ वेगळा करण्याचा प्रयत्न करू,’ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
‘विकासाचं राजकारण’ या विषयावरील चर्चासत्रात गडकरी बोलत होते. ‘स्वतंत्र विदर्भाविषयी भाजपने आपली भूमिका कधीही बदललेली नाही. आमची भूमिका कालही तीच होती आणि आजही तीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही तीच भूमिका आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मोदी यांनी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, हे विधान मुंबईच्या संदर्भात केलं होतं. विदर्भाशी त्या वक्तव्याचा काहीही संबंध नव्हतं. मोदींशी याबाबत माझं बोलणंही झालं आहे,’ असंही गडकरी यावेळी म्हणाले. स्वतंत्र विदर्भाप्रतीची बांधिलकी व्यक्त करतानाच महाराष्ट्रात शिवसेना व भाजपमधली मैत्री कायम राहावी अशी इच्छाही गडकरी यांनी बोलून दाखवली. तसंच एलबीटी महिन्याभरात बंद करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

November 23, 2014 in मुख्य पान
काँग्रेसचा नागपूर विधानभवनावर 8 डिसेंबरला मोर्चा - प्रदेशाध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे 0

काँग्रेसचा नागपूर विधानभवनावर 8 डिसेंबरला मोर्चा – प्रदेशाध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे

index53bbebcbc9b52.jpg000
नागपूर – अवकाळी पाऊस, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी व इतर आस्मानी संकटांमुळे राज्याच्या सर्वच भागातील शेतकरी भरडून निघाला आहे. पिकांचे मोठे नुकसान त्याला सोसावे लागले आहे. प्रचंड अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. शेतक-यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 8 डिसेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.
रविवारी, दि. 23 नोव्हेंबर 2014 रोजी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  नितीन राऊत, आ. विजय वडेट्टीवार, आ. राजेंद्र मुळक, आ. अब्दुल सत्तार, आ. विरेंद्र जगताप, आ. राहुल बोंद्रे, आ. अमर काळे यांच्यासह प्रदेश काँग्रेस व नागपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आ. माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले की, भाजप सरकारचे केवळ शेतक-यांकडेच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे घडलेल्या दलित समाजातील तिहेरी हत्याकांडाकडेही दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे. जवखेडा येथील हत्याकांडाचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रत्येक जिल्ह्यात निदर्शने होत आहेत. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अद्याप जवखेडा येथील पीडित दलित कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळालेला नाही.
भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी घटनेतील तरतुदींचा भंग केल्याचा आरोपही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. परंतु, भाजपने ज्या पद्धतीने विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यातून त्यांचे बहुमत असल्याचे अजिबात स्पष्ट होत नाही. नवनियुक्त सरकारचा विश्वासदर्शक ठराव मतविभाजन न करता ध्वनीमताने मंजूर करणे असंयुक्तिक असल्याचे ते म्हणाले. या घटनेकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर आले असता त्यांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप करून विधानसभेतील 5 आमदारांना निलंबित करण्यात आले. परंतु, हे आमदार निर्दोष असून, काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराने हा प्रकार केलेला नाही. चौकशीत काँग्रेस आमदारांचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वासही आ. माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.

November 23, 2014 in मुख्य पान
जिल्हा परिषदची परीक्षा रद्द, विस्तार अधिकारी निलंबित 0

जिल्हा परिषदची परीक्षा रद्द, विस्तार अधिकारी निलंबित

54663-ssc
यवतमाळ  (सूरज एम.पी.)- यवतमाळ जिल्हा परिषदेच्या परिचर पदाची भरती घेण्यात आली. परिक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकारी विक्रम रापत याना अटक केली. दरम्यान आज जिल्हा परिषद प्रशासनाने सदर विस्तार अधिकाºयाला निलंबीत केले आहे.
जिल्हा परिषदच्या वतीने शनिवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सत्रात परिचर पदाच्या लेखी परीक्षेचा पेपर आयोजित करण्यात आला होता. काटेबाई जि.प.शाळेच्या परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या विस्तार अधिकारी विक्रम राऊत याने पेपर सुरू होण्यापूर्वीच दुपारी २ वाजता पेपर एका युवकाच्या मार्फत कोचिंग क्लास संचालकाकडे सोडविण्यासाठी पाठविला. जगदिश पांडे हे विक्रीकर अधिकारी असून , पूर्वी कोचिंग क्लास चालवित होते. त्यामुळे राऊत याची त्यांच्यासोबत ओळख असल्याचे बोलल्या जात आहे. १ नोव्हेंबर रोजी यवतमाळ जि.प.च्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका औरंगाबादमध्ये जप्त करण्यात आली होती. विक्रीकर अधिकारी, कोचिंगक्लास संचालकासह अकरा जणांना अटक करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच परीक्षेचा पेपर बाहेर आल्याने पांडेही चकीत झाले. त्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून लगेच पेपर घेवूनच वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून काटेबाई परीक्षा केंद्र गाठले  व विस्तार अधिकाºयास चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती उमेदवारांना मिळताच सर्वत्र खळबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी विस्तार अधिकाºयाची चौकशी केली. काटेबाई परीक्षा केंद्रावर विस्तार अधिकाºयाचा भाऊ परीक्षा देत होता. तो उत्तीर्ण झाला पाहिजे, या उद्देशाने हा पेपर बाहेर पाठविल्याची कबुली विक्रम राऊत याने पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. जिल्हा परिषद प्रशासनाने सदर परिक्षा रद्द केली असून विस्तार अधिकाºयावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. या पेपटफुटीमध्ये आणखी कीती मासे गळाला लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.