पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for November, 2014

शेतकºयानी बंद पाडली कापूस खरेदी 0

शेतकºयानी बंद पाडली कापूस खरेदी

images
पांढरकवडा – कापूस खरेदी दरम्यान व्यापाºयांनी भाव पाडल्याने आक्रमक झालेल्या शेतकºयांनी कापूस खरेदी बंद पाडली. शेतकºयांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बाजार समितीच्या संचालकांसह पदाधिकारी न फिरकल्याने तीव्र शब्दात रोष व्यक्त करण्यात आला.
मार्केट यार्डवर आज ५० ते ६० च्या आसपास वाहन व तेवढ्याच बैलंबंडी कापूस खरेदीच्या प्रतिक्षेत उभ्या होत्या. सकाळी ११ वाजता कापूस खरेदीच्या हर्रासास सुरुवात झाली. परंतु वाहनातील कापूस ३९०० ते ३९५० भावाने खरेदी केला. तर बैलबंडी मधील कापूस ३८०० ते ३८५० असा भावाने खरेदी करणे सुरू केले. व्यापाºयांच्या दुजाभावाला शेतकºयांनी विरोध दर्शवित खरेदी बंद पाडली. आक्रमक झालेल्या शेतकºयांनी मार्केट यार्डचे प्रवेशद्वार बंद करून वाहनास बाहेर जिनिंगमध्ये जाण्यास मज्जाव केला. जोपर्यंत समाधानकारक भाव मिळणार नाही, तोपर्यंत खरेदी सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला. शेतकरी नेते मोहन मामीडवार यांनी शेतकºयांचे गाºहाणे ऐकूण व्यापाºयांशी चर्चा केली. यावेळी बाजार समितीचे एकही संचालक यावेळी उपस्थित नव्हते. सचिवाचे एकूण घेण्यास खासगी व्यापारी तयार नव्हते. मामीडवार यांनी सभापती प्रकाश मानकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते खासगी कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. व्यापाºयांनी कापूस खरेदीत अक्षरश: लूट चालविली असताना या प्रश्नावर बोलण्यास कुणीही तयार नाही. कापसाच्या उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात बाजारात व्यापाºयांकडून अशी लूट सुरू आहे. भेदभाव न करता कापूस खरेदी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र राजकीय पुढारी शेतकºयांच्या प्रश्नावर बोलत नसल्याने रोष व्यक्त करण्यात आला.

November 28, 2014 in मुख्य पान
झरी बाजार समिती सभापती पदी पावडे तर उपसभापतीपदी मांडवकर 0

झरी बाजार समिती सभापती पदी पावडे तर उपसभापतीपदी मांडवकर

bazar_samiti
झरी – झरीजामणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती विरुद्घ अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर समितीचे नवीन सभापती व उपसभापती पदाकरिता आज बैठक पार पडली. यामध्ये भाजपचे अनिल पावडे यांची सभापतीपदी तर उपसभापती पदी गजानन मांडवकर यांची निवड करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे १८ संचालक असुन नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर कांग्रेसचे प्रकाश मॅकलवार सभापती तर भाजपचे बंडखोर संचालक जानक नाकले हे उपसभापती पदावर आरुढ झाले होते. तीन वर्षानंतर भाजपचे ८ संचालक तर सत्ताधारी पक्षाचे ४ संचालकाने मिळुन सभापती व उपसभापती विरुद्घ अविश्वास ठराव मांडला. त्यामुळे सभापती मॅकलवार व उपसभापती नाकले यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यामुळे नवीन सभापती व उपसभापती ची निवड करण्याकरिता जिल्हा उपनिबंधकाच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला बाजार समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यात सवार्नुमते अनिल पावडे यांना सभापती तर गजानन मांडवकर यांना उपसभापतीपदी निवडण्यात आले. बैठकीत माजी सभापती व उपसभापती गैरहजर होते तर विरोधी पक्षातील ४ संचालक हजर होते. त्यातुन बाबाराव खडसे यांनी ऐनवेळेवर सभापती पदाकरिता फार्म दाखल केला. परंतु बाबाराव खडसे यांना फक्त ४ मते मिळाल्याने सभापती व उपसभापती पदावर भाजपचे संचालक निवडुन आले. समितीचे कार्यकाळ अजुन २ वर्ष असुन बाजार समितीशी निगडीत शेतकºयांचे हितार्थ तसेच बाजार समितीच्या हितासाठी कार्य करण्याचे आश्वासन नवनियुक्त सभापती व उपसभापती यांनी दिले. यावेळी भाजप कार्यकर्त्यानी गुलाल उधळुन जल्लोश साजरा केला. वणी विधानसभा मतदार संघातुन भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विजयानंतर झरी जामणी कृषी उत्पन्न बाजार समितीवरसुद्घा कमळ फुलविल्याने भाजप कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

November 28, 2014 in विदर्भ
 महाराष्ट्राचे कृषी संकट राष्ट्रीय आपत्ती घोषित करा 0

महाराष्ट्राचे कृषी संकट राष्ट्रीय आपत्ती घोषित करा

images.jpeg000
विदर्भ जनआंदोलन समितीची मागणी
यवतमाळ – महाराष्ट सरकारने २५ नोव्हेंबरला शासकीय परिपत्रक काढून  महाराष्ट्रातील सुमार २० हजार गावात दुष्काळ जाहीर केला आह. विदर्भातील सुमार १०  हजार खेड्यात दुष्काळ व नापिकी पहिल्यांदाच घोषित केली आहे. सरकारने या दुष्काळग्रस्तांसाठी जे सवलतीचे पॅकेज दिले, ते तुटपुंजे आहे.  पश्चिम विदर्भातील दुष्काळ व नैराश्यग्रस्त २० लाख शेतक?री संकटात आहे. नोव्हेंबर महिन्यातच सा?ºया प्रमुख नद्या, नाले व विहीरी आटल्या असून मार्च महिन्यापर्यंत पाणी, अन्न, चारा, ग्रामीण रोजगार या समस्यांचा डोंगराळ निर्माण होणार असून महाराष्ट सरकारने महाराष्टातील अभूतपूर्व कृषी संकट राष्टÑीय आपत्ती घोषित करून  दुष्काग्रस्तांना कमीत कमी ६० हजार कोटीची मदत करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने दिला आहे.
महाराष्ट्र सरकारला विदर्भ जनआंदोलन समिती कडून प्रमुख मागण्या- दुष्काळग्रस्त शेतक?र्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान. संपूर्ण शेतक?ºयाना कर्जमाफी व नव्याने पिककर्ज देण्याची योजना. सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करणे. सर्व शेतक?ºयांना रोजगार हमी योजनेमधून १००  दिवस प्रति एकरी अनुदान. सर्व दुष्काळग्रस्त शेतकºयाना  व शेत मजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान. दुष्काळग्रस्त पश्चिम  विदर्भातील जिल्ह्यात येत्या एका वर्षाकरिता देशी, विदेशी, गावठी दारू  व जुगारांना बंदी. या सर्व मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असून मात्र १५ वर्षापासून शेतक?ºयांच्या  आत्महत्येच्या नावावर कोट्यावधीची लुट करणारे अधिकारी या बैठकीपासून दूर राहतील याचा काटोकाट प्रयत्न करत आहे. जर  सरकारला शेतक?ºयांचे दु:ख जाणून घेण्यास गंभीरता नसेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांना आंदोलनाच्या द्वारे मागण्या समाजावून देऊ असा इशाराही किशोर तिवारी यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, समितीचे सचिव मोहन जाधव, अंकीत नैताम, नितीन कांबळे, प्रेम चव्हाण हे उपस्थित होते.

November 28, 2014 in मुख्य पान
'राजलक्ष्मी मल्टीस्टेट'ला विदर्भस्तरीय पुरस्कार 0

‘राजलक्ष्मी मल्टीस्टेट’ला विदर्भस्तरीय पुरस्कार

d315750-large
यवतमाळ – विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी फेडरेशन द्वारा स्व. गोपाळरावजी राजुरकर स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा विदर्भ स्तरीय प्रथम पुरस्कार येथील राजलक्ष्मी मल्टीस्टेटला मिळाला आहे. सलग तीन वेळा पुरस्कार जिंकणारी राजलक्ष्मी मल्टीस्टेट यवतमाळ ही एकमेव संस्था होय. हा पुरस्कार म्हणजे संस्थेप्रती विश्‍वास दाखविणार्‍या ठेवीधारकाचा, संस्थेच्या कर्तव्यदक्ष संचालक मंडळाचा, अधिकारी, कर्मचारीवृंदाचा, कर्ज घेऊन स्वत:चा विकास व पर्यायाने राष्ट्रीय कार्यात हातभार लावणार्‍या कर्जधारकांचा, मित्रमंडळींचा, हितचिंतकांचा सन्मान होय, सत्कार होय, गौरव होय, असे भाष्य अरविंद तायडे यांनी केले. सहकार क्षेत्रात अत्यंत भक्कमपणे उभी असलेल्या या संस्थेच्या अध्ययावत सुसज्ज वस्तुचा लोकार्पण सोहळा नजिकच्या काही दिवसात संपन्न होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गजानन बुरडकर सभागृह चंद्रपूर येथे हा पुरस्कार फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप राजुरकर, माजी आमदार हरिश्‍चंद्र वरखेडे, फेडरेशनचे उपाध्यक्ष वामनराव झाडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद तायडे, संचालिका संध्याताई तायडे, कार्यकारी संचालक क्षितीज तायडे, संचालक यु.डी. आगरे, बाबुसिंग कडेल, घनश्याम ढेंगळे, सल्लागार प्रताप पारसकर, ज्ञानेश्‍वर सुरजुसे, सुरेशसिंह जोई, उपसरव्यवस्थापक सुरेश अजमिरे, अधिकारी संजय इंगोले, नीलेश वाकोडे, संतोष गुल्हाणे, आनंद संगावार, मनोज येडे, वृषाली सुळे, पराग सुळे, रवी रहाणे, विजय मोडक, गीता शिंगोटे, संध्या इनामदार अमित ओक, आशिष तायडे, सलमानखान पठाण, संदीप महाजन, किशोर भागवत, स्वप्नील आठवले, दै. अभिकर्ता अनिल येरावार, विक्रम विठलानी, बिपीन मजेठीया, किशोर ठाकरे व कर्मचारी नितीन छपरवाल, विलास बन्सोड, भाग्यवान तेलंग, विलास सादे उपस्थित होते.
या पुरस्कारावर समारोपीय भाष्य करताना ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगण’! या ओळी प्रमाणे प्रबळ इच्छा शक्ती ही प्रगतीची जननी असून यशोशिखरावर नेणारा राजमार्ग आहे. संस्थेत असणारा तरूण वर्ग या पुरस्काराने प्रेरीत झाला असून जेष्ठांच्या मार्गदर्शनात नजिकच्या काळात असे अनेक मनाचे तुरे राजलक्ष्मीच्या मुकुटात पहायला मिळणार असा विश्‍वास या प्रसंगी संस्थेचे तरूण कार्यकारी संचालक क्षितीज तायडे यांनी व्यक्त केला.

November 27, 2014 in रोजगार
अघोरी प्रथांना पायबंद घालण्यासाठीच जादुटोणाविरोधी कायदा  - प्रा.शाम मानव 0

अघोरी प्रथांना पायबंद घालण्यासाठीच जादुटोणाविरोधी कायदा – प्रा.शाम मानव

unnamed

यवतमाळ : महाराष्ट्र शासनाने आणलेला जादुटोणाविरोधी कायदा हा सर्वसमावेश आणि सर्वच प्रकारच्या अघोरी प्रथा तसेच जादुटोण्यांवर प्रतिबंध घालणारा आहे. इतका व्यापक आणि मोठा कायदा देशात अन्य कोणत्याही राज्यात नाही. हा कायदा देव धर्माच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासोबतच वाईट चालीरितींना प्रतिबंध घालेल, असे प्रतिपादन शासनाच्या जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार-प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष तथा अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.शाम मानव यांनी केले. कायद्याच्या जनजागृतीसाठी प्रा.मानव यांचे आझाद मैदान येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.काशिनाथ लाहोरे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय साळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक पराग नवलकर, सुरेश जुरमुरे आदी उपस्थित होते.
जादुटोणाविरोधी कायद्यात देव, धर्माला विरोध नाही तसेच कोणत्याही धार्मीक कृत्याच्या आड कायदा येणार नाही. परंतु देव, धर्माच्या नावावर कुणी दुकानदारी थाटल्यास मात्र कायद्याने तो दोषी ठरेल. या कायद्याबाबत सुरूवातीस फार गैरसमज पसरविण्यात आला. कायदा संमत होण्यासाठी पुर्वीच त्याची जनजागृती आम्ही केली. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरीकांना वाईट प्रथांपासून सुटका देणारा हा कायदा असल्याने हा कायदा येऊ शकला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या कायद्यातील तरतुदी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहीजे, असे सांगितले. कुणी जादुटोणा, वाईट प्रथा-परंपरांच्या नावाखाली फसवणूक करीत असल्यास यातील तरतूदीनुसार आपण त्याविरूध्द पोलिसांकडे तक्रार नोंदविली पाहिजे. आजच्या आधुनिक युगातही जादुटोण्याच्यानावाखाली फसवणूक करीत आहे, ही सामाजिक न्यायाच्या प्रक्रीयेतील फार मोठा अडसर असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी बाबा-बूवा हातचलाखीने तसेच धर्म, देवाच्या नावाखाली कसे फसवितात याची प्रात्यक्षिकेही करून दाखविली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उद्घाटनिय भाषण केले. प्रा.काशिनाथ लाहोरे, विजय साळवे, सुरेश जुरमुरे यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन विलास काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.कमल राठोड, देविदास शंभरकर, वरिष्ठ समाजकल्याण निरिक्षक जी.बी.धोटे, डी.एम.चव्हाण, गौरव गावंडे आदींनी सहकार्य केले.

November 27, 2014 in मुख्य पान
लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ््यात 0

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ््यात

7652_corruption1902
यवतमाळ – सुधारीत सातबारा देण्यासाठी ९ हजाराची लाच स्विकारणाºया कोसारा येथील तलाठ्यास रंगेहात अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यवतमाळच्या पथकाने आज दुपारी मुकुटबन येथे ही कार्यवाही केली.
राजू बलवंत मोरे असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. झरी जामणी तहसील अंतर्गत येणाºया कोसारा येथे या तलाठ्याची नेमणूक आहे. त्याच गावातील शेतकºयाने वडीलोपार्जीत शेतीचे सातबाºयामधून इतर लोकांचे नाव कमी करून वडीलाचे नावे सुधारीत सातबाºयासाठी अर्ज केला होता. त्यासाठी तलाठ्याने ९ हजार रुपयाची लाच मागितली होती. शेतकºयाने याबाबतची तक्रार यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून आज मुकुटबन येथील तलाठ्याने भाड्याने घेतलेल्या घराजवळ सापळा रचला होता. शेतकºयाकडून लाच स्विकारताच तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, अमोल महल्ले, निलेश पखाले, गजानन राठोड, शैलेश ढोणे , नरेंद्र इंगोले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार, भारत चिरडे, किरण खेडकर, विशाल धलवार यांनी केली.

November 27, 2014 in विदर्भ
मराठा आरक्षणासाठी विरुगीरी 0

मराठा आरक्षणासाठी विरुगीरी

IMG-20141127-WA0046_resized
यवतमाळ  – मराठा आरक्षणाचा अध्यादेश जाहीर करा या मागणीसाठी मराठा समाज बांधवानी उमरखेड येथील उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टावरवर चढून विरूगीरी केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
उमरखेड व महागाव येथील समाजबांधवाचा सहभाग असलेल्या मोर्चाचे उपविभागीय कार्यालयासमोर सभेचे रुपांतर झाले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सुर्यवंशी, संदिप घाडगे, राम कदम, धर्मराज अमृते, पवन कदम व अन्य कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी कार्यालयातील बिएसएनएलच्या टॉवरवर चढले. त्यांनी तेथून मराठा आरक्षण घेतल्या शिवाय सोडणार नाही अशा घोषणा दिल्या. त्यामुळे तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी चितांगराव कदम  हे होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अनंत देवसरकर, प्रकाश पाटील देवसरकर, तातू देशमुख, राम देवसरकर, अ‍ॅड. माधव माने, जगदिश नरवाडे, सिताराम ठाकरे, विकास चव्हाण, भिमराव चंद्रवशी, श्विाजी माने, डॉ. वंदना मरसुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी सवनेकर, दत्तराव शिंदे, माजी आमदार विजय खडसे, संभाजी नरवाडे, वि.ना. कदम, ज्योती ठेंगे, शिला कदम, प्रा. नलीनी टकरेख् सरोज देशमुख, प्र.भा. काळे, अ‍ॅड. अनिल माने, संजय जाधव, रणजीत नलावडे, युवराज देवसरकर, विनायक कदम, अ‍ॅड. बीराम मुरकुळे, शाम सुरोशे, वसंत देशमुख, सुदर्शन कदम यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

November 27, 2014 in महाराष्ट्र
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर 0

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर

images
यवतमाळ –  एका तरूनाने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर अपलोड केल्याने महागाव तालुक्यातील काळी दौ येथे तणावाचे वातावरण निर्माण झााला. पुसद ग्रामीण पोलीससंनी आरोपीविस अटक करून न्यायालयात हजर केले.
सचीन ग्यानबा भोने (२१) रा. काळी दौ. असे आरोपीचे नावे आहे. या तरूणाने फेसबुकवर एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावन्याच्या हेतुने सदर मजकुर अपलोड केला होता. हा प्रकार उजेडात येताच   गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नागरिकांनी या आरोपीला अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. या बाबतची भनक लागताच आरोपीने गावातून काढता पाय घेतला होता. याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल करून जेरबंद केले. गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

November 27, 2014 in विदर्भ
आर्णी बालाजी जिनींग,  कापूस खरेदीतील काट्यात घोळ 0

आर्णी बालाजी जिनींग, कापूस खरेदीतील काट्यात घोळ

2014-11-17~cottonproduction_ns
यवतमाळ – आर्णी येथील बालाजी जिनींगमध्ये कापसाची खाजगी खरेदी सुरू  असून काट्यात घोळ असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संचालकाविरूद्घ फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे. हा प्रकार गंभीर असून शेतकºयामध्ये रोष व्यक्त होत आहे.
देऊरवाडी येथील शेतकरी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर डकरे यांनी एम.एच. २९ / ६३३७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये घरून कापूस भरला. त्यानी गायत्री काट्यावर वजन करून कापूस बालाजी जिनींगमध्ये विकण्यासाठी नेला. त्यावेळी ट्रॅक्टरसह ७०.३० क्विंट कापूस भरला. त्यामध्ये निव्वळ कापसाचे वजन ३५.७५ क्विटल भरले. गायत्री काट्यावर ट्रॉलीसह ७०.६५ व निव्वळ कापसाचे वजन ३५.९५ क्विंटल भरले. दोन्ही काट्यापैकी बालाजी जिनींगमध्ये २० किलो वजन कमी आढळून आले. यापूर्वीही याच शेतकºयाने सदर जिनींगमध्ये कापूस विक्री केली आहे. येथे वजनात घोळ असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र हा घोळ कुणीही पुढे आणत नव्हते. आज डकरे यानी हा प्रकार उजेडात आणला. यावेळी महादेव बुटले, रामचंद्र जाधव, पंजाब जाधव आदी शेतकरी उपस्थित होते. शेतकरी अगोदरच आस्मानी संकटाला तोंड देत आहे. कापूस पिकला नाही, शेतकºयाच्या कापसाला भाव नाही, जो माल हाती आला त्यातही व्यापारी शेतकºयाची फसवणूक करीत आहे. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी बालाजी जिनींग अ‍ॅन्ड प्रेसींगचे संचालक दिलीप चिंतावार, बाळासाहेब निलावार यांचे याचे विरुद्घ फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

November 27, 2014 in विदर्भ
शिवसेना-भाजप एकत्र येणार 0

शिवसेना-भाजप एकत्र येणार

index.jpeg00
मुंबई -शिवसेनेला सत्तेत सहभागी करून भाजपची मानसिकता असून हे दोन्ही पक्ष राज्यातील सरकारमध्ये लवकरच एकत्र दिसतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. मात्र, या मनोमीलनाआधी पुन्हा एकदा चर्चा करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला असून त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपने स्वबळावर लढली. मात्र, कुणालाही बहुमत न मिळाल्याने दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येईल, अशी चर्चा होती. मात्र, निवडणुकीतील जागा वाटपाप्रमाणेच सत्तेच्या वाटपावरून दोन्ही पक्षांची बोलणी फिसकटली आणि भाजपने शिवसेनेला विचारात न घेतला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. आवाजी मतदानाचा मार्ग स्वीकारून विश्वासमतही जिंकले. त्यामुळे शिवसेना सत्तेपासून दूरच राहणार असल्याचे दिसत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने मध्यावधीचे इशारे द्यायला सुरुवात केल्याने भाजपने पुन्हा शिवसेनेसाठी चर्चेची दारे किलकिली केली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या जुळवाजुळवीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘शिवसेना-भाजपनं पुन्हा एकत्र यावं असं साऱ्यांचंच मत आहे. भाजपने शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी केली आहे. त्याबाबतची चर्चा उद्यापासून होईल. भाजपतर्फे चंद्रकांत पाटील व धर्मेंद्र प्रधान शिवसेनेशी चर्चा करतील. मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो आहे. त्यामुळे लवकरच शिवसेना-भाजप एकत्र सरकार चालवेल, असा विश्वास आहे.

November 27, 2014 in मुख्य पान
 एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणी 0

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणी

images.jpeg 0
मुंबई- शिवसेनेने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे. अशा वेळी शेतक-यांना आधार देण्याची गरज होती. मात्र खडसे यांनी मोबाइल बिलाबाबतचे वादग्रस्त वक्तव्य करून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यात खडसेंकडेच कृषिमंत्रीपदाची जबाबदारीही आहे. अशा वेळी शेतक-यांचा अपमान करणा-या खडसेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात शिवसेने म्हटले आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने याबाबत गुरुवारी राजनभवनात राज्यपालांची भेट घेतली.
मोबाइलचे बिल भरायला शेतक-यांकडे पैसे आहेत, पण वीजबिल भरायला पैसे नाहीत, असे वक्तव्य खडसे यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना आणि खडसे यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू झाले. यात खडसे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष करत त्यांना शेतीतले काय समजते, असा प्रश्न केला होता. खडसेंचे हे वक्तव्य शिवसेनेच्या जास्तच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे काहीकरून खडसे यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रमच शिवसेनेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसनेने खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मराठवाडयात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे तिथे तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. खरे तर शिष्टमंडळ दुष्काळाबाबत समस्या मांडण्यासाठी गेले होते. पण, त्यांनी त्यात खडसेंच्या राजीनाम्याची मागणीही पुढे रेटली. त्यामुळे ही भेट खडसेंच्या राजीनाम्यासाठी होती की दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नासाठी होती, याची चर्चा राजभवनावर होती. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेसाठी पुन्हा चुचकारले आहे. त्यानंतर शिवसेने घेतलेली ही भूमिका जास्त काही पदरात पाडून घेण्यासाठी केलेले दबावाचे राजकारण आहे, असे काही राजकीय तज्ज्ञ सांगतात.

November 27, 2014 in मुख्य पान
जागतिक आरोग्य संघटनेच्या चार जणांची हत्या 0

जागतिक आरोग्य संघटनेच्या चार जणांची हत्या

index
इस्लामाबाद- जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानमध्ये सुरु असलेली पोलीओ लसीकरण मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील पोलीओ मोहीमेतील चार सदस्यांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून पोलीओ मोहीम सुरु होती. मोहीमेच्या अखेरच्या दिवशी क्वेट्टा येथे लसीकरण सुरु असताना काही दहशतवादी मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात चार जण ठार झाले.
या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील पोलीओ मोहीम बंद केली आहे. कार्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे संघटनेने म्हटले आहे. जोपर्यंत पाकिस्तान सरकारकडून कर्मचा-यांना सुरक्षा दिली जात नाही. तोपर्यंत ही मोहीम थांबवण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षात पाकिस्तानमध्ये पोलीओ मोहीमेसाठी काम करणा-या ६० जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.

November 27, 2014 in देश-विदेश
मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या 0

मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या

19_01_2014-nife
सोलापूर – पाचवी  मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी जिल्ह्यातील मंगळवेढयामध्ये घडली.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावामध्ये रहाणा-या बाजीराव वाघमारेने पाचवीही मुलगी झाली म्हणून पत्नीची विळयाने गळा चिरुन हत्या केली. बाजीरावला पहिल्या चार मुली आहेत पण वंशाला दिवा हवा हा त्याचा अट्टाहास कायम होता. पत्नी पाचव्यांदा गर्भवती राहिली तेव्हा त्याला मुलगा होईल अशी आशा होता. पण पत्नीने पाचव्यांदाही कन्यारत्नाला जन्म दिल्याने चिडलेल्या बाजीरावने पत्नीची विळयाने हत्या केली. बाजीराव हा मजुरीचे काम करतो. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

November 27, 2014 in मुख्य पान
हॉटस अॅपवर स्वत:ला श्रध्दांजली वाहून आत्महत्या 0

हॉटस अॅपवर स्वत:ला श्रध्दांजली वाहून आत्महत्या

323985_462685727083559_766208862_o
सांगली – इस्टंट मेसेंजिंगमधील सर्वाधिक लोकप्रिय अॅप असलेल्या व्हॉटस अॅपवर  तरुणाई चेष्टा-मस्करी करण्याबरोबरच आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणा-या महत्वाच्या घटनांची माहिती देते. मात्र सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने आपल्या व्हॉटस अॅपवरुन आपल्या मृत्यूची माहिती दिली. महादेव कुंभार असे या युवकाचे नाव आहे. महादेवने आधी व्हॉटस अॅपवर स्वत:चे छायाचित्र टाकून नावापुढे कैलासवासी असा मजकूर पोस्ट केला आणि नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महादेव २२ वर्षांचा होता. महादेवचे आई-वडिल शेतमजूर असून, वेगवेगळया गावांमध्ये शेतमजुरीची कामे मिळवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सध्या त्याचे कुटुंब सांगली जिल्ह्यातील वाळवा या गावी होते. स्वत: महादेव एका कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता. त्याचबरोबर त्याचे महाविद्यालयीन शिक्षणही सुरु होते. रविवारी रात्री महादेवने आपल्या व्हॉटस अॅपवर स्वत:चे छायाचित्र टाकले आणि त्याच्यापुढे कै. महादेव कुंभार यांना भावपूर्ण श्रध्दांजली असा मजकुर पोस्ट केला. सोमवारी आई-वडिल कामाला गेल्यानंतर घरात एकटया असलेल्या महादेवने गळफास घेऊन आत्महत्या केली.

November 27, 2014 in मुख्य पान
प्रियकराने प्रेयसीला केले मित्रांच्या स्वाधीन , रम पाजून सामुहीक अत्याचार, चौघांना अटक 0

प्रियकराने प्रेयसीला केले मित्रांच्या स्वाधीन , रम पाजून सामुहीक अत्याचार, चौघांना अटक

only-you-can-complete-my-heart
यवतमाळ – अमरवती तालुक्यातील  मुलीला प्रेमाच्या जाळ््यात अडकवून तीला  मित्रांच्या स्वाधीन केल्याची घटना आज उजेडात आली. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केले असून पाच आरोपी फरार आहे. या घटनेने यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करीत आहे.
अमरावती जिल्ह्यातील बोरगाव (धर्माळे) येथील मुलगी अरामवती येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती.  रहाटगाव येथील पंकज गवई (२५) हा अमरावती येथे महाविद्यालयात असल्याने एकाच बसमध्ये ते दोघेही ये-जा करीत होते. अशातच त्याच्यात मैत्री व नंतर प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर या युवकाने मुलीसोबत शारीरीक सबंध प्रस्तापित करून सतत अत्याचार करीत होते. २१ नोव्हेंबरला  पंकजने सदर मुलीला  बाहेरगावी फिरायला जाण्याच्या बहाण्याने अमरावतीला बोलाविले. पंकजने तिला देशमुख लॉन, लाठीनगर व नागपुर बायपासवरील नांदगावपेठ येथे पाठविले. त्याच्या तीन मित्रांनी तिला बियर पाजुन तिनदा सामुहीक अत्याचार केला. त्यानंतर पंकज २४ नोव्हेंबरला पिडीतेला यवतमाळ येथे घेऊन आला. पंकजने पिडीतेला मंगेश कुभांर व नितीन शेंडे यांच्या स्वाधीन केले. हे दोघेही मुळचे अमरावती येथील असून, कामासाठी ते यवतमाळात वास्तव्यास आहे. या दोघांनी पिडीतेवर बंदरबाबा बायपास जवळच्या जंगलात अत्याचार केला. त्यानंतर पंकज रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पिडीतेला बसस्थानकावर घेऊन आला. अमरावतीला जाण्यासाठी बस नसल्यामुळे पंकजने पिडीतेला एका बसमध्ये झोपण्यास सांगून तो बसस्थानकाच्या परीसरात उभा राहिला. दरम्यान बसस्थानकातील कर्मचाºयाने बसमध्ये झोपलेल्या मुलीची चौकशी केली तेव्हा तिच्या तोंडून दारूचा वास आला. काही तरी गडबड आहे म्हणून कर्मचाºयाने गस्तीवर असलेल्या पोलिसांनी बोलाविले. वडगावरोड पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता तिने आपल्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी  पंकज व त्या मुलीला ताब्यात घेतले. आज मुलीचे बयाण नोंदविल्यानंतर व पंकजची कसून चौकशी केल्यानंतर वैभव कळसकर, किशोर शेंदुरकर, विशाल देशमुख, धिरज गायकवाड, अकुंश वानखडे, पंकज, मंगेश कुभांर नितीन शेंडे (वयोगट २० ते २५) रा. सर्व जण अमरावती अशी नावे समोर आली. पोलिसांनी वैभव कळसकर, किशोर शेंदुरकर, विशाल देशमुख या चौघांना अटक केली. पाचजण फरार असून, दोन आरोपींची नावे उघड व्हायची आहे.पिडीतेला न्याय देण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे

November 26, 2014 in मुख्य पान
काळा पैसा- २५० जणांनी मान्य केले 0

काळा पैसा- २५० जणांनी मान्य केले

images.jpeg11
दिल्ली- परदेशातील बँकांमध्ये असलेल्या ४२७ खाताधारकांपैकी २५० जणांनी अशा प्रकारची खाती असल्याचे मान्य केल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी सांगितले. काळ्या पैशाच्या मुद्दावर राज्यासभेत सुरु असलेल्या चर्चे दरम्यान त्यांनी ही माहिती दिली. तसेच या प्रकरणी सरकार योग्य मार्गावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परदेशात असलेला काळा पैसा परत आणण्यासाठी काही वेळ लागेल. या प्रकरणी ४२७ खातेधारकांची यादी तयार असून त्याची चौकशी सुरु असल्याचे जेटली यांनी सांगितले.
लोकसभा निडवणुकीत भाजपने काळा पैसा १०० दिवसात परत आणण्याचे आश्वासन दिले होते. यावरून विरोधी पक्षांनी सभागृहात गदारोळ केला.   इतक नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान प्रत्येक भारतीय नागरिकाला १५ ते २० लाख रुपये मिळतील असे ही सांगितले होते. राज्यसभात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल संयुक्त, समाजवादी पक्ष, डावी आघाडी यांनी या मुद्दयावरुन गदारोळ केला आणि सभात्याग केला.  या प्रकरणी सरकारने आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल देशाची माफी मागावी असी मागणी विरोधकांनी केली.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ६२७ जणांची यादी दिली आहे. यापैकी ४२७ जणांची ओळख पटली असून त्यापैकी २५० जणांनी परदेशातील बँकांमध्ये खाती असल्याचे मान्य केल्याचे जेटली म्हणाले.
या प्रकरणी आधीच्या सरकारने जे केले आहे, त्यापेक्षा अधिक भाजप सरकारने १०० दिवसात केल्याचा दावा जेटली यांनी केला.

November 26, 2014 in मुख्य पान
लातूरमध्ये भीषण अपघात, सहा ठार 0

लातूरमध्ये भीषण अपघात, सहा ठार

index
लातूर – लातूर जिल्ह्यातील चापोली गावाजवळ बुधवारी ट्रक आणि अॅपे रिक्षादरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.
बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही.
दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून याबाबतचा पुढील तपास सुरु आहे.

November 26, 2014 in मुख्य पान
२६/११चा हल्ला विसरु शकत नाही – पंतप्रधान 0

२६/११चा हल्ला विसरु शकत नाही – पंतप्रधान

images.jpeg 1
काठमांडू – २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला भारत कधीच विसरु शकत नाही. या दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी सार्क परिषदेतील भाषणादरम्यान सांगितले. नेपाळमधील काठमांडू येथे १८ वी सार्क परिषद सुरु आहे. यावेळी सार्क नेत्यांना उद्देशून त्यांनी भाषण केले.
सार्कमधील देशांना एकमेकांशी जोडणे गरजेचे आहे. यासाठी सार्क देशांना तीन ते पाच वर्षांसाठी बिझनेस व्हिसा देण्यास भारत तयार असल्याचे ते म्हणाले. २००८ मध्ये आजच्याच दिवशी मुंबईवर तो भयानक दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात निरपराध लोकांना जीव गमवावा लागला होता. त्याचे दु:ख आम्ही कधीच विसरु शकत नाही. या दहशतवादाविरोधात सार्क देशांनी सयुंक्त लढा देण्याची गरज आहे असे मोदी म्हणाले.
चांगला शेजारी असणे हे प्रगतीसाठी नेहमीच प्रोत्साहनकारक असते. जर आपण एकमेकांबाबत संवेदनशील असू तर आपल्यामधील मैत्रीचे बंध अधिक दृढ होतील. याचा फायदा नक्कीच प्रगतीला प्रोत्साहन देणारा ठरेल. सार्क देशांतील परस्पर मतभेदांमुळे विकासात अडथळे निर्माण झाले आहेत,’असे मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणादरम्यान विकासाच्या अनेक मुद्दयावरही भर दिला.

November 26, 2014 in मुख्य पान
२०४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 0

२०४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

images
केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांची लेखी उत्तरात कबुली
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) –  सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात जानेवारी ते एप्रिल २०१४ या चार महिन्यात तब्बल २०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक कबुली, केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बलायन यांनी दिली आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला त्यांनी लिखित स्वरूपात हे उत्तर दिले आहे.
याच लेखी उत्तरात डॉ. बलायन यांनी देशातील इतर राज्यांमधील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची आकडेवारीसुद्धा सादर केली आहे. महाराष्ट्राची आकडेवारी एप्रिलपर्यंतची आहे. अन्य राज्यांतील आकडेवारी मात्र ऑक्टोबरपर्यंतची दिलीय. एप्रिलनंतर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून विदर्भासह मराठवाड्यातही शेतकरी आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहेत.
शेती आणि शेतीवरील कर्ज हा राज्य सरकारशी संबंधित विषय असला तरी या क्षेत्राच्या विकासासाठी शक्य ती सर्व मदत केंद्र सरकार करत असते. या मदतीत आर्थिक तसेच धोरणात्मक उपाययोजनांचा समावेश असतो, असे डॉ. बलायन यांनी सांगितले. तेलंगण राज्यात यंदाच्या ऑक्टोबरपर्यंत ६९, कर्नाटकमध्ये ऑक्टोबरपर्यंत १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गुजरात, केरळ आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी आहे. देशभर राबवण्यात येणाऱ्या कृषी विषयाशी निगडित योजना आणि कार्यक्रमांसाठी २२ हजार ३०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही डॉ. बलायन यांनी या उत्तरात सांगितले.

November 26, 2014 in मुख्य पान
भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना 0

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना

9788174829467

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ १९५०पासून राज्यघटना अमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा –

भाग १ – कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी
भाग २ – कलमे ५-११
भाग ३ – कलमे १२-३५ मूलभूत हक्क
कलमे १४-१८ समानतेचा हक्क,
कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,
कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,
कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,
कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,
कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.
भाग ४ – सरकारी कामकाजाविषयीकची सांविधानिक कलमे ३६ – ५१
कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन
कलम 41 – काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार
भाग ४(ऎ) कलम ५१ अ – प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.
भाग ५ –
प्रकरण १ – कलमे ५२-७८
कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,
कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक
कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,
कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत
प्रकरण २ – कलमे ७९-१२२ संसदेबाबत.
कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,
कलमे ८९-९८ संसदेच्या आधिकारांबाबत,
कलमे ९९-१००
कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे आधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,
कलमे १०७-१११ (law making process)
कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,
कलमे ११८-१२२
प्रकरण ३ – कलम १२३
कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत
प्रकरण ४ – कलमे १२४-१४७
कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत
प्रकरण ५ – कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.
कलमे १४८ – १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे आधिकार व कर्तव्ये यांबाबत
भाग ६ – राज्यांच्याच्या बाबतची कलमे.
प्रकरण १ – कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या
कलम १५२ – भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या – जम्मु आणि काश्मीर वगळून
प्रकरण २ – कलमे १५३-१६७ कार्यांबाबत
कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,
कलमे १६३-१६४ मंत्रीमंडळावर,
कलम १६५ राज्याच्या ऍड्व्होकेट-जनरल यांच्याबाबत.
कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.
प्रकरण ३ – कलमे १६८ – २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.
कलमे १६८ – १७७ सामान्य माहिती
कलमे १७८ – १८७ राराज्यांच्या शासनाचे आधिकार
कलमे १८८ – १८९ कार्यकलापाविषयी
कलमे १९० – १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
कलमे १९४ – १९५ विधीमंडळ सदस्यांचे आधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे
कलमे १९६ – २०१ कार्यकलापाविषयी
कलमे २०२ – २०७ अर्थिक विषयासंबधी
कलमे २०८ – २१२ इतर सामान्य विषयासंबधी
प्रकरण ४ – कलम २१३ राज्यपालच्या आधिकाराबाबत
कलम २१३ – राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.
प्रकरण ५ – कलमे २१४ – २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत.
कलमे २१४ – २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत.
प्रकरण ६ – कलमे २३३ – २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत.
कलमे २३३ – २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत
भाग ७ – राज्यांच्या बाबतील कलमे.
कलम २३८ –
भाग ८ – केंद्रशासित प्रदेशांशी निगडीत कलमे
कलमे २३९ – २४२ मंत्रीमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांच्या बाबत
भाग ९ – पंचायती पद्धतीबाबतची कलमे
कलमे २४३ – २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत
भाग ९ऎ – नगरपालिकांबाबतची कलमे.
कलमे २४३पी – २४३ झेड नगरपालिकांबाबत
भाग १० –
कलमे २४४ – २४४ऎ
भाग ११ – केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी
प्रकरण १ – कलमे २४५ – २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी
कलमे २४५ – २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी
प्रकरण २ – कलमे २५६ – २६३
कलमे २५६ – २६१ – सामान्य
कलमे २६२ – पाण्याचा विवादाबाबत.
कलमे २६३ – राज्यांचे परस्पर संबंध.
भाग १२ – संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत
प्रकरण १ – कलमे २६४ – २९१ संपत्तीच्या बाबत
कलमे २६४ – २६७ सामान्य
कलमे २६८ – २८१
कलमे २८२ – २९१ इतर
प्रकरण २ – कलमे २९२ – २९३
कलमे २९२ – २९३
प्रकरण ३ – कलमे २९४ – ३००
कलमे २९४ – ३००
प्रकरण ४ – कलम ३००ऎ मालमत्तेच्या आधिकाराविषयक
कलम ३००ऎ –
भाग १३ – भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे
कलमे ३०१ – ३०५
कलम ३०६ –
कलम ३०७ –
भाग १४ –
प्रकरण ५ – कलमे ३०८ – ३१४
कलमे ३०८ – ३१३
कलम ३१४ –
प्रकरण २ – कलमे ३१५ – ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
कलमे ३१५ – ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
भाग १४ऎ – आयोगगळ च्या बाबत कलमे
कलमे ३२३ऎ – ३२३बी
भाग १५ – निवडणूक विषयक कलमे
कलमे ३२४ – ३२९ निवडणूक विषयक कलमे
कलम ३२९ ऎ –
भाग १६ –
कलमे ३३० -३४२
भाग १७ – अधिकृत भाषॆबाबतची कलमे
प्रकरण १ – कलमे ३४३ – ३४४ केंद्र भाषॆबाबत
कलमे ३४३ – ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत
प्रकरण २ – कलमे ३४५ – ३४७ प्रांतीय भाषॆबाबत
कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषॆबाबत
प्रकरण ३ – कलमे ३४८ – ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी
कलमे ३४८ – ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादि
प्रकरण ४ – कलमे ३५० – ३५१ विशेष निर्देश
कलम ३५० –
कलम ३५० ऎ –
कलम ३५०बि – भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम
कलम ३५१ – हिंदी भाषॆविषयीक कलम
भाग १८ – आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे
कलमे ३५२ – ३५९ – आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे
कलम ३५९ऎ –
कलम ३६० – आर्थिक आणीबाणी
भाग १९ – इतर विषय
कलमे ३६१ – ३६१ऎ – इतर विषय
कलम ३६२ –
कलमे ३६३ – ३६७ – इतर
भाग २० –
कलम ३६८ –
भाग २१ –
कलमे ३६९ -३७८ऎ
कलमे ३७९ – ३९१ –
कलम ३९२ – आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क
भाग २२ –
कलमे ३९३ -३९५