
मुंबई- राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी प्रसिद्धपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात बीडमध्ये मतदान होणार आहे. १७ एप्रिल रोजी होणा-या मतदानाच्या एक दिवस आधी राज यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मुंडे यांनी निवडूण देण्याचे आदेश दिले आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रसने सुरेश धस आणि आम आदमी पक्षाने नंदू माधव यांना उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याआधीही राज यांनी भाजपशी जवळीक केली होती. प्रथम नितीन गडकरी सोबत एकाच व्यासपीठावर असलेल्या राज ठाकरे यांनी भाजपचे नेत्यांची भेट घेतली होती. इतकच नाही तर राज यांनी राज्यातील भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार उभा केला नाही. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर मनसेचे खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील असे अनेक जाहीर सभांमधून सांगितले होते. दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी येथील जाहीर सभेतही राज यांनी मुंडे यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले. मुंडे यांनी सकाळी आपल्याला फोन केला होता. त्यांनी केलेल्या विनंतीमुळे आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे राज यांनी सांगितले.
Archive for April, 2014
0
राज ठाकरे यांचा गोपीनाथ मुंडेंना पाठिंबा
0
पेट्रोल ७० पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली- डॉलरच्या तुलनेत रुपया स्वस्त झाल्याने सर्वाजनिक क्षेत्रातील तेल पुरवठा करणा-या कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ७० पैशांची कपात केली आहे. महिन्याभरातील पेट्रोलच्या किमतीमधील ही दुसरी कपात आहे. नवे दर मंगळवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
या कपातीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर मागे ७१.४१ रुपये, मुंबईतील दर ८० रुपये इतके होणार आहेत. पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली असली तरी डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. केंद्र सरकराने जून २०१०मध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील सरकारी नियंत्रण हटवले होते. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एक आणि १६ तारखेला पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केले जातात. जानेवारी २०१३पासून डिझेरच्या किमतीमध्ये ८.३३ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतरही डिझेलच्या प्रतिलिटर विक्रीमागे ५.४९रुपयांचा तोटा होत असल्याचे इंडियन ऑइलच्या अधिका-याने सांगितले.
0
लोकसभा निवडणूक ही कौटुंबिक समारंभ नव्हे – प्रियंका गांधी

अमेठी – लोकसभा निवडणूक ही दोन विचारसरणीदरम्यानची लढाई असून कौटुंबिक समारंभ नाही, या शब्दात प्रियंका गांधी यांनी त्यांचे चुलत भाऊ वरुण गांधी यांना मंगळवारी फटकारले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी त्या अमेठीत आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वरुण गांधी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्याचा संदर्भ देत प्रियंका म्हणाल्या की, हा लढा दोन विचारसरणीचा असून माझा मुलगा असा वागला असता तरीही मी त्याला माफ केले नसते. वरुण गांधी हे आपला रस्ता भरकटले आहेत, त्यांना योग्य मार्ग तुम्हीच दाखवा. असे वक्तव्य प्रियंका गांधी यांनी एका प्रचारसभेदरम्यान केले होते. या वक्तव्याचा व्हीडिओ उघड झाल्याबद्दल आपण निराश झालो नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
0
मोदी पंतप्रधान होणार हे केवळ स्वप्न – ममता बॅनर्जी

कोलकाता- नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे एक स्वप्न असल्याचे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीनंतर देशात तिस-या आघाडीचे सरकार येईल असा विश्वासही त्यांनी केला.
मोदींचे पंतप्रधानपद ही केवळ एक स्वप्न असल्याने अशा कल्पित प्रश्नांची उत्तरे देण्याची मला गरज वाटत नसल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले. एखाद्या श्रींमत घरात वाढलेल्या आणि विशेष काळजी घेतलेल्या मुलाशी आणि कुपोषित, दुर्लक्षित मुलाची ज्याप्रमाणे तुलना होऊ शकत नाही तसेच पश्चिम बंगाल आणि गुजरात यांची तुलना होऊ शकत नाही असेही त्या म्हणाल्या. लोकसभा निडणुकीच्या प्रचार सभेतही अनेक वेळा ममता बॅनर्जी यांनी मोदींसह गुजरातच्या विकासावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. गुजरातच्या विकासाशी आपल्याला तुलना करायची नाही. मात्र सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आधीच गुजरातचा विकास झाला होता. उलट मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर विकास घटल्याचे ममता यांनी सांगितले. मोदींच्या गुजरात मॉडेलवर टीका करताना त्यांनी गुजरातच्या जनतेवर आपले प्रेम असल्याचे स्पष्ट केले. लोकसंख्या आणि संधी याचा विचार करता गुजरातककडे १९ बंदरे आहेत. तर पश्चिम बंगालकडे केवळ दोन आहेत. याचा विचार करता पश्चिम बंगालचे मॉडल अधिक चांगले असल्याचे त्या म्हणाल्या.
0
तृतीयपंथीयांना सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

नवी दिल्ली- तृतीयपंथीयांना ‘थर्ड जेंडर’ म्हणून मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
केंद्र व राज्य सरकारला तृतीयपंथीयांचा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांत समावेश करून घेण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच त्यांना आर्थिक मागास समाज म्हणून विशेष वागणूक द्यावी, असेही सांगितले आहे. यापुढे तृतीयपंथीयांना इतरमागासवर्गीयात समावेश करून त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचे आदेशही दिले आहेत. तृतीयपंथीयांबद्दल समाजात चांगले विचार रुजवण्यासाठी सरकारने जनजागृती करावी, त्यांच्यासाठी विशेष समाज विकास योजना राबवाव्या, असेही सांगितले आहे. त्याचबरोबर तृतीयपंथीयांसाठी प्रत्येक राज्य सरकारने विशेष शौचालये बांधावी आणि त्यांच्या आरोग्यासंबंधी काळजी घेण्यासाठी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याचे निर्देशही दिले आहेत
0
सिलिंडरचा स्फोट युवक ठार

नागपूर – फुग्यात गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने युवक ठार झाला. हा स्फोट एवढा जोरदार होता की युवकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. सिलिंडर टिन फाडून दुसऱ्या घरात घुसले. यात तीन मुली थोडक्यात बचावल्या. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या या स्फोटाने संपूर्ण टिमकी परिसर हादरला. नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. दुर्गपाल महिपाल चव्हाण (२८, मूळ रा.उत्तर प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे.
गत काही दिवसांपासून दुर्गपाल व त्याचे तीन साथीदार पाटील यांच्या वाड्यात भाड्याने राहात होते. दुर्गपाल घरासमोर फुग्यात गॅस भरत होता. तर अन्य तिघे घरात होते. गॅस भरत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. दुर्गपालचे अर्धे डोके धडावेगळे झाले. तर सिलिंडर जवळपास ८० फूट वर उडून बाजूला असलेल्या मनोज हटवार यांच्या घराचे टिन छेदून आत पडले. जोरदार आवाज झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. सिलिंडर हवेत उडाल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळू लागले. उडालेले सिलिंडर घरात पडले त्यावेळी मनोज यांच्या दोन मुली आस्था व तपस्या व पुतणी तन्नू घरात खेळत होत्या. त्या थोडक्यात बचावल्या. स्फोटानंतर अन्य तिघांनी पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकजण स्फोटात जखमी झाला आहे.
0
महाराष्ट्रदिन काळा दिवस पाळणार, विदर्भाचा झेंडा फडकवणार

नागपूर – विदर्भ राज्य निर्मितीकरिता स्थापन झालेल्या विदर्भ कनेक्ट या संघटनेने महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी विदर्भ राज्याच्या झेंडा फडकावण्याचे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भात पहिल्यांदाच अकराही जिल्ह्यांत संघटितपणे हे आंदोलन होत असून, ‘विदर्भ कनेक्ट’ने त्यात सुसूत्रता आणली आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे.
विदर्भवादी व ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे आणि विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात अॅक्शन ग्रुप स्थापन करण्यात येत आहे. त्या अॅक्शन ग्रुपच्या माध्यमाने महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात ‘मटा’शी बोलताना अॅड. मुकेश समर्थ म्हणाले, ‘विदर्भातील जनतेकरिता महाराष्ट्र दिन हा सदैव काळा दिवस राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भावर सातत्याने अन्याय व भेदभाव होत आहे. विदर्भातील विकास ठप्प पडला असून त्यामागे पश्चिम महाराष्ट्र धर्जिणे धोरण कारणीभूत ठरले आहे. महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतरही विदर्भाचा विकास झालेला नाही. त्यामुळेच आता विदर्भ राज्याच्या निर्मितीकरिता विविध संघटना व व्यक्ती एकत्रित येत आहेत. त्या आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणजे महाराष्ट्र दिनी प्रत्येक जिल्ह्यात प्रतीकात्मक विदर्भाचा झेंडा फडकावण्यात येत आहे.’
व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमाने विदर्भवादी व्यक्ती व संघटना एकत्रित आल्या आहेत. आता ‘विदर्भ कनेक्ट’ नावाने स्वतंत्र वेबसाइटदेखील सुरू करण्यात येत आहे. त्यासोबतच कॉलेजमधील युवकांनाही या आंदोलनाशी जोडण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याकरिता चर्चासत्रे व इतर उपक्रमदेखील आयोजित होणार आहेत. महाराष्ट्र दिनी होणारे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने होईल. नागपुरात विष्णूजी की रसोई येथील लॉनवर विदर्भ राज्याचा झेंडा रोवण्यात येणार आहे. त्यासोबतच अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, वाशीम, बुलडाणा, अकोला, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येथेही काळा दिन पाळण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघटनांनी विदर्भ कनेक्टच्या माटे चौकातील कार्यालयात संपर्क साधावा अथवा vidarbhaconnect.gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन अॅड. मुकेश समर्थ यांनी केले आहे.
0
जय भीम’च्या गर्जनेने शहर दुमदुमले

यवतमाळ – गळ्यात निळे शेले, डोक्यावर टोपी, डि.जे.च्या तालावर नाचत आणि जय भीमचा गजर करीत शहराच्या विविध भागातून निघालेल्या रॅलीने आज शहर जय भीममय झाले होते. बसस्थानक चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््याला अभिवादन करण्यासाठी निळ््या पाखरांचा कारवा लोटला होता. ही गर्दी रात्री उशीरापर्यंत कायम असल्याने वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली होती.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. अभिवादनसाठी रांबच रांब रांग लागली होती. शहरातील चारही भागात सकाळी व्याख्यानासह सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी ५ वाजतानंतर शहरातील पाटीपुरा, तलाव फैल, अंबिकानगर, अशोकनगर, जामनकरनगर, भोसा, वडगावरोड, आशीर्वानगर, लोहारा, नेताजीनगर, पिंपळगाव, उमरसरा, वाघापूर आदी भागातून ही रॅली काढण्यात आली होती. यात युवक, युवती, लहान मोठ्यांसह डि.जे, बॅन्डच्या तालावर ताल धरीत होते. सर्व रॅलीचे बसस्थानक चौकात आगमण झाल्यानंतर जितके-तिकडे निळ्या पाखरांचाच कारवा दिसत होता. तर जय भीम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सकाळी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसह, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत पदाधिकाºयांनी महामानवाला अभिवादन केले. कुठलिही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस दलाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0
संघाच्या तालावर भाजप नाचतोय -सोनिया गांधी

मोरादाबाद- यंदाची लोकसभा निवडणूक ही संपूर्ण दोन विचारसरणीदरम्यान लढली जात आहे. भाजप हा पक्ष संकुचित विचारसरणीच्या आणि जहालमतवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तालावर नाचत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. येथील प्रचारसभेत त्या सोमवारी बोलत होत्या.
आपल्या जहालमतवादाने आणि संकुचित विचारसरणीच्या सहाय्याने समाजामध्ये फुटीचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे. अनेक वर्षापासून जपून ठेवलेली देशाची मूल्ये आणि रीतीरिवाज तोडण्याचे काम ते करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता जनता त्यांना नक्कीच पराभूत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपची विचारसरणी देशासाठी घातक असून काँग्रेसच फक्त देशाला एक स्थिर आणि भक्कम सरकार देईल, असे त्या म्हणाल्या. देशातील अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेसने सरकारने वेगळ्या मंत्रालयाची तसेच राष्ट्रीय वक्फ विकास महामंडळाची स्थापना करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले. महात्मा गांधी, मौलाना आझाद आणि त्यांच्यासारख्या अनेक त्याग केलेल्या नेत्यांमुळे काँग्रेस पक्ष आतापर्यंत खंबीरपणे उभा आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, काँग्रेसच देशाला कणखर आणि स्थिर सरकार देऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.
0
हेमामालिनी यांच्याविरोधात एफआयआर दाखल

मथुरा – निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकऱणी बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपच्या मथुरा येथील उमेदवार हेमामालिनी यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.
हेमामालिनी यांनी श्री जी बाबा सरस्वती विद्यामंदिर शाळेत शनिवारी सभा घेतली होती. या सभेत विद्यार्थ्यांचाही समावेश होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे निवडणूक धिरेंद्र सचन यांनी सांगितले. निवडणूक आय़ोगाच्या नियमानुसार शाळा सुरु असताना तेथे सभा घेणे आचारसंहिता उल्लंघन केल्यासारखे आहे असेही सचन यावेळी म्हणाले.लोकसभा निवडणुकीत भाजपकडून हेमामालिनी यांना मथुरा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
0
बिहारमध्ये ‘आप’च्या उमेदवारावर हल्ला

पाटणा – आम आदमी पक्षाचे नालंदा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रणब प्रकाश रविवारी रात्री निवडणूक प्रचार करत असताना, त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. बिंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत उतरफु गावामध्ये निवडणूक प्रचारासाठी जात असताना, त्यांच्यावर हल्ला झाला.
२५ जणांचा जमाव अचानक माझ्या गाडीसमोर आला. त्यांनी गाडीतून खेचून मला बाहेर काढले आणि मला लाठीकाठीने मारहाण केली असे प्रणब प्रकाश यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक आणि जिल्हा न्यायदंडाधिका-यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली.आपने या हल्ल्यासाठी सत्ताधारी जदयूला जबाबदार धरले आहे. नालंदा लोकसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिलला मतदान होणार आहे. येथून कौशलेंन्द्र कुमार जदयूचे उमेदवार आहेत. राज्याचे माजी पोलिस प्रमुख रंजन सिन्हा काँग्रेस-राजद आघाडीचे उमेदवार आहेत. सत्येंद्र शर्मा भाजप-लोकजनशक्ती पक्षाचे उमेदवार आहेत.
0
कट्टर माओवादी कमांडर पूर्णा हुल्का ठार

कोरापूट – कट्टर माओवादी कमांडर पूर्णा हुल्का सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. ओडिसाच्या कोरापूट जिल्ह्यातील नारायणपटणा भागात रविवारी मध्यरात्री माओवादी आणि रक्षापथकांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत पूर्णा हुल्का ठार झाला.
आंध्रप्रदेश-ओडिसामधील अनेक नक्षलवादी कारवायांचा तो सूत्रधार होता. श्रीकाकुल्लम-कोरापटू डिव्हीजनचा तो कमांडर होता. ओडिसा सरकारने त्याच्यावर एक लाख रुपयाचे बक्षीस ठेवले होते. हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर होती. नारायणपटना भागात पूर्णा त्याच्या साथीदारांच्या मदतीने घातपाती कारवाया करणार असल्याची पोलिसांना गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्यामुळे सुरक्षापथकांनी पूर्णा जेथे येणार होता तेथे आधीपासूनच सापळा रचून ठेवला होता. पूर्णा आणि त्याचे साथीदार तेथे आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी उलट सुरक्षापथकांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. सुरक्षारक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पूर्णा ठार झाला. अंधाराचा फायदा घेऊन त्याच्याबरोबर असणारे सहकारी तेथून पसार झाले. घटनास्थळावरुन पोलिसांनी दोन देशी बनावटीच्या पिस्तुल, बंदुका आणि अन्य माओवादी साहित्य जप्त केले आहे.
0
भीम सा नर पैदा हो
पैदा हो तो भीम सा नर पैदा हो
एक नया आंबेडकर पैदा हो !!
सर झुकानेवाले तेरा सर क्या है
सर मे तेरे भीम का सर पैदा हो !!
झोपडो मे रहनेवाले लोगो की
उंचे उंचे नये नगर पैदा हो !!
दिल से मिले दिल वतन के लोगो के
ऐसे नये नर के असर पैदा हो !!
मारनेवालो के हात रोक सके
हो तो ऐसा यानी जिगर पैदा हो !!
शेर हो तो वामन तेरे शेरोसे
एक ही संसार का घर पैदा हो !!
वामनदादा कर्डक
[ मोहोळ ]
0
स्वाभिमानी जिनं
घरा घरामध्ये नेलं स्वाभिमानी जिनं
हेच काम केलं इथं भीमजयंतीनं !!
कामगिरी केली अशी कामगिरी केली
लाचारी बिचारी सारी दूर दूर गेली
गेलं जुनं काम गेलं पाटलाला भिनं !!
आला नावे जाग आला आली नावे जागं
ठाई – ठाई फुलारली भिमाईची बाग
डोलतात फुलं इथं नव्या टवटवीनं !!
भाकरीची आस होती भाकरीची आस
भाकरीचा घास दिला त्याच घरी खास
जीवनाचं सोनं केलं ह्याच भाकरीनं !!
समाजाचं देणं त्याला समाजात येणं
विचाराचं देणं घेणं करी नम्रतेनं
वामनाचं गीत आलं ह्याच तयारीनं !!
वामनदादा कर्डक
[ मोहोळ ]
0
अपघातात एक ठार, चार जखमी

यवतमाळ – भरधाव ट्रकने अलटो या वाहनाला धडक दिल्याने एक जण ठार व चार जण जखमी झाल्याची घटना आज रविवारी सायंकाळी कळंब – राळेगाव मार्गावर घडली.
चंद्रपुर येथील लांडगे कुटुंबीय कळंब येथून लग्न समारंभ आटोपून एम. एच. ३४ / के ५२३८ क्रमांकाच्या अलटो या वाहनाने राळेगाव कडे जात होते. अशातच राळेगाववरुन कळंबकडे येणाºया एम. एच. ०४ / बि जी ८१० क्रमांकाच्या ट्रकने सदर वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये मोहुर्ले(३०) नामक युवकाचा मृत्यू झाला. तर सतीश लांडगे(४५), मनिषा सतीश लांडगे (४०), निवेदीता लांडगे (२२), पायल लांडगे (१०) सर्व रा. चंद्रपुर हे जखमी झाले. त्याच्यावर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदत कार्य केले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
0
त्या’ युवकांच्या मृत्यूचे गुढ कायम, घातपाताचा संशय

यवतमाळ – दोन दिवसापूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या दोन युवकांचे मृतदेह शनिवारी सायंकाळी निळोणा धरणात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोनही युवकांना पोहता येत नसल्याने त्यांच्या मृत्यूचे गुढ कायम असून घातपात झाल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. आज रविवारी दुपारी इन कॅमेरा दोन्ही युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.
अश्वजीत हर्षवर्धन ठमके (२१), पंकज भीमराव राजगडकर (१८) रा. बांगरनगर अशी मृतांची नावे असून अश्वजीत हा वादाफळे महाविद्यालयात बीएसएसी (कृषी) भाग दोन तर पंकज हा जगदंबा विज्ञान महाविद्यालय इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अश्वजीत हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी तर पंकज हा चप्पल घेण्यासाठी जात असून अर्ध्या तासात परत येतो असे सांगून घरून निघाले होते. दुपार होऊनही घरी न परतल्याने कुटुंबियांनी दोघांच्याही मोबाईलवर संपर्क साधला. मात्र त्याच्यासोबत संपर्क झाला नाही. त्यानंतर मित्र मंडळीकडे चौकशी केली. मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने शहर पोलिस ठाणे गाठून बेपत्ता असल्याची रितसर तक्रार नोंदविली होती. अशातच काल शनिवारी सायंकाळी निळोणा धरणात दोन युवकांचे मृतदेह तरंगतांना आढळले़ या बाबतची माहिती मिळताच शहर, वडगाव रोड व ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढले. शहर पोलिसात दोन युवक बेपत्ता असल्याची नोंद असल्याने त्यांनी ठमके व राजगडकर कुटुंबियांना ओळख पटविण्यासाठी म्हणून घटनास्थळी बोलावून घेतले. दोन्ही मृतदेह अश्वजीत व पंकजचे असल्याची खात्री पटताच वडीलांनी टाहो फोडला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्रीच कै.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. आज दुपारी शवविच्छेदन इन कॅमेरा करावे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईकांची झालेली गर्दी व घटनेचे गांभीर्य ओळखून इन कॅमेरा शवविच्छेदन केले. आज दुसºया दिवशीही या घटनेचे गुढ कायम असून प्रेमप्रकरणातून दोन्ही युवकाचा खून झाल्याची चर्चा सुरू बांगरनगर परिसरात सुरू होती. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी परिसर काढला पिंजून
यवतमाळ ग्रामीण, शहर व वडगाव रोड या तीन्ही ठाण्याचे पोलीस अधिकारी व ३० पोलिस कर्मचाºयांच्या पथकाने सकाळी निळोणा धरण गाठले. युवकांचे कपडे व साहित्य शोधण्यासाठी पथकाने तब्बल तीन तास परिसर पिंजून काढला. मात्र या ठिकाणी त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागले.
अश्वजीतला पोहता येत नव्हते: हर्षवर्धन ठमके
अश्वजीत व पंकज या दोघांना पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघेही पोहण्यासाठी धरणावर जाणे शक्य नाही. त्यांचा मृत्यू पोहताना झाला नसून घातपात झाल्याचा संशय अश्वजीतचे वडील हर्षवर्धन ठमके यांनी दै.‘पुण्यनगरी’शी बोलताना व्यक्त केला. दोघांच्याही मृतदेहावर जखमा दिसून आल्या. बेपत्ता असल्यापासून अश्वजीतचा मोबाईल बंद आहे. मात्र काल सकाळी ११ वाजता दरम्यान नातेवाईकाने मोबाईलवर संपर्क केला असता ३० सेकंद बेल वाजली. त्यानंतर मोबाईल पुन्हा बंद करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेणार असल्याचे ठमके यांनी सांगितले.
0
चौथ्या टप्प्यात विक्रमी मतदान

नवी दिल्ली – नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून आले. देशातील चार राज्यातील सात लोकसभा मतदारसंघात शनिवारी मतदान पार पडले.
गोव्यातील दोन जागांसाठी ७५ टक्के, आसाममधील तीन जागांसाठी ७५ टक्के, त्रिपुरामधील एका जागेसाठी ८१.८ टक्के, सिक्कीममधील लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या ३२ जागांसाठी ७६ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पहिल्या तीन टप्प्यांप्रमाणे चौथ्या टप्प्यातही मतदारांमध्ये मतदानाचा प्रचंड उत्साह पहायला मिळाला. सकाळी सातवाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासून सर्वच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. गोव्यात लोकसभेच्या दोनच जागा असून या ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान झाले. या ठिकाणी काँग्रेस, भाजप, सीपीआय आणि अन्य प्रादेशीक पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्या विरोधात काँग्रेसकडून रवी नाईक तर आपने दत्ताराम देसाई हे प्रमुख उमेदवार आहेत. दक्षिण गोव्यात काँग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या ऐवजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड याने उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात भाजपकडून नरेंद्र सवाईकर आणि आपचे स्वाती केरकर हे प्रमुख उमेदवार आहेत. चौथ्या टप्प्यात सात जागांवर एकूण ७४ उमेदवार रिंगणात आहेत.

















