पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January, 2015

 बोट बुडून २१ ठार 0

बोट बुडून २१ ठार

china-boat-accident
बीजिंग- पूर्व चीनमधील जियांग्सु प्रांतातील यांगत्से नदीत एक बोट बुडाल्याने २१ जणांचा मृत्यू झाला.
या बोटीवरील एकूण २५ प्रवाशांपैकी तीन जण सुरक्षित आहेत. तर एकजण अद्यापही बेपत्ता असून त्याचे राष्ट्रीयत्व जाहीर करण्यात आलेले नाही.
या बोटीत आठजण विदेशी होते. यात चार सिंगापूर, एक भारतीय, एक इंडोनेशियन, एक मलेशियन आणि एका जपानी नागरिकाचा समावेश आहे. यात समावेश असलेला भारतीय हा सिंगापूरचा रहिवासी आहे.

January 17, 2015 in देश-विदेश
थंडीमुळे दिल्ली, काश्मीरचे जनजीवन विस्कळीत 0

थंडीमुळे दिल्ली, काश्मीरचे जनजीवन विस्कळीत

cold-300x188
नवी दिल्ली/श्रीनगर- कडाक्याच्या थंडीमुळे नवी दिल्लीत सर्वत्र दाट धुके पसरले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. शनिवारी नवी दिल्लीतील तापमान ८.४ अंश नोदवले गेले. कारगिलमध्ये तर अक्षरश: हुडहुडी असून, तेथील तापमान उणे १५.८ नोंदवले गेले आहे.
खराब हवामानामुळे नवी दिल्लीतील विमाने आणि रेल्वे सेवेचे वेळापत्रक कोलमडले असून, ३० विमाने व ५५ रेल्वे गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा काही तास उशिराने धावत आहेत.
जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरोंतो एक्स्प्रेस, पंजाब मेल, ब्रह्मपुत्र मेल, ओदिशा संपर्क क्रांति एक्स्प्रेस या गाडयांना याचा फटका बसला आहे.
दरम्यान, काश्मीर खो-यात लडाख भागातही कडाक्याच्या थंडीची लाट आहे. २० जानेवारीपर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा फटका जम्मू आणि काश्मीरला बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या प्रवक्त्याने दिली. शनिवारी श्रीनगरमध्ये उणे ३.३ अंश, काश्मीर खो-यातील काझिगुंड येथे उणे ४.४, तर अंबरनाथ यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाव येथे उणे ६.२ तापमान नोंदवले गेले आहे.

January 17, 2015 in मुख्य पान
बँकेची कॅश व्हॅन लुटणारे चार जण अटकेत 0

बँकेची कॅश व्हॅन लुटणारे चार जण अटकेत

cash-delivery-van
मुंबई- पश्चिम दृतगती महामार्गावर मिलन सब वेजवळ बँकेच्या कॅश व्हॅनमधून सुमारे दोन कोटी रुपये चोरणा-या चार संशयिताना विले पार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडे काही रक्कम सापडली असून त्याची मोजदाद सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पश्चिम दृतगती महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोअर परळ येथील सुरक्षा कंपनीची बँकेची कॅश व्हॅन पश्चिम उपनगरातील एटाएम सेंटरमध्ये रोकड जमा करण्यासाठी निघाली तेव्हा गाडीत दोन कोटीहून अधिक रक्कम होती. या व्हॅनमध्ये सद्रे अलम याच्यासह अन्य तीन सुरक्षा रक्षक होते.
त्यानंतर अलम याने वरळीत गाडी थांबवून त्यातील अन्य तीन सुरक्षारक्षक आणि गाडी चालकाला चहा पिण्यासाठी उतरले होते. त्यावेळी अलमने त्यांना चहामधून गुंगीच औषध दिले. त्यानंतर गाडी मिलन सबवेजवळ येईपर्यंत त्या सर्वांना गुंगी येत होती.
चालकालाही गाडी चालवताना अवघड झाले होते. त्यातच पाठीमागून आलेल्या तीन जणांनी त्यांच्या व्हॅनसमोर गाडी उभी केल्याने व्हॅन थांबवावी लागली. त्या गाडीतील तीन चोरट्यांनी अलमच्या मदतीने व्हॅनचे लॉकर उघडून दोन कोटी चोरुन पळ काढला. याप्रकरणी पोलिसांना अलमचा संशय आला. त्याची कसून चौकशी करुन त्याच्या अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

January 17, 2015 in मुख्य पान
पोलीस शिपायाचा महिलेवर बलात्कार 0

पोलीस शिपायाचा महिलेवर बलात्कार

download (1)
पालघर- पालघर जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने एका विधवा महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी रत्नाकर उगलमुगले या पोलीस शिपायावर तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारापूर येथे वास्तव्यास असलेली ही विधवा महिला उदरनिर्वाहासाठी स्वयंपाक आणि जेवणाचे डबे बनवून देते. यातून तारापूर येथे राहणारा पोलीस शिपाई रत्नाकर याच्याशी तिची ओळख झाली. रत्नाकरने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते.
ही महिला एकटी रहात असल्याचा गैरफायदा घेऊन रत्नाकरने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला. तसेच या प्रकाराची कोठेही वाच्यता केल्यास तो स्वत: पोलीस असल्याने आपले कोणी काही वाकडे करु शकत नाही, अशी बोलून मारण्याची धमकीही दिली होती.
त्यानंतर मागिल २० ते २५ दिवस त्याने तिच्यावर सतत अत्याचार केल्यामुळे तिची प्रकृती ढासळली. त्यामुळे तिला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रत्नाकर विरोधात तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले.

January 17, 2015 in मुख्य पान
केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस 0

केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस

images
नवी दिल्ली- आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे.
आयोगाने बजावलेल्या नोटीसीवर केजरीवाल यांना २० जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा शहरात जातीय दंगली घडवण्याासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता.
केजरीवार यांच्या या आरोपानंतर दिल्ली भाजपाचे प्रमुख सतीश उपाध्याय यांनी आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने ही नोटीस बजावली आहे.
दिल्लीतील त्रिलोकपूरी आणि नंदनगरी येथे झालेल्या दंगलीमध्ये भाजपाचा हात होता असा आरोप केजरीवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच अशा प्रकारच्या दंगली अन्य भागातही घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता. प्रथम दर्शनी केजरीवाल दोषी आढळल्याचे आयोगाने म्हटले आहे.

January 17, 2015 in मुख्य पान
भारतीयांची जीवनसंस्कृती म्हणजे भारतीय संविधान - प्रा. डॉ. निलकंथक 0

भारतीयांची जीवनसंस्कृती म्हणजे भारतीय संविधान – प्रा. डॉ. निलकंथक

21
यवतमाळ, दि. १७ – ‘आम्ही भारतीय लोक’ या वाक्याने भारतीयांना समर्पीत असलेले भारतीय संविधान. भारतीयांना सामाजिक, आर्थीक आणि राजकीय न्याय प्राप्त करून देणारी एक विचारधारा आहे. स्वतंत्रता, समानता व बंधूता याचाच खºया राष्टÑवादीची मांडणी करणारे संविधान प्रत्येक माणसाला सन्मानासह प्रत्येकाला जगण्याचा हक्क प्रदान करते. खाजगीकर, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आज जिवघेण्या स्पर्धे ही सर्वासामान्य न्भारतीयांच्या आशाआकांक्षांना प्रज्वलीत करणारा भारतीयांचा एकमेव धर्मगं्रथ म्हणजे भारतीय संविधान होय. संविधान हे केवळ पुस्तक नसून भारतीयांची जीवन जगण्याची संस्कृती आहे असे प्रतिपादन संविधान विश्लेषक प्रा. डॉ. निलकंथक यांनी केले.
कोरेगाव दिनाचे औचित्या साधून ‘बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिवेषात परिवेषात भारतीय संविधान’ या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘स्वरधारा’ ह्या कार्यक्रमात यशवंत पाटील, जया तेलंग, निलश्वज कांबळे, धनराज गायकवाड, महादेव कांबळे, उदय कांबळे, सोनवणे, दिनेश डोंगरे, उत्तर थुल, युवराज डोमे, वावरे आदी कलावंतानी जगदिश भगत यांच्या निवेदनात आपली क्रांतीगीत सादर केलीत. कार्यक्रमाच्या आयोजनामधील भूमिका संजय गुजर यांनी विषद केली. कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे तर आभार सुनिल मालके यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सिध्दार्थ भगत, धम्मा कांबळे, नामदेव थूल, प्रा. शैलेश तेलंग, केशव भागवत, वनमाला राऊत, आनंद उमरे, सुर्यवंशी, सुरेश मेश्राम, हरिदास, राऊत, सातपूते, उके, संतोष गुजर, यु.पी. बन्सोडे, इंगोले, प्रकाश दातार, डॉ. किशोर बन्सोड, अशोक ताकसांडे, अश्विन खरतडे, तथा समता सैनिक दल, कास्ट्राईब कर्मचारी वैद्यकीय संघटना, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ या सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्या नागरिकांची उपस्थिती होती.

January 17, 2015 in महाराष्ट्र

शिवकालीन शस्त्रांनी उलगडली शौर्यगाथा

यवतमाळ, दि. १७ – शिवकाळामध्ये शस्त्रांना महत्त्व अनन्यसाधारण होते. शिवाजी महाराजांनी दारुगोळा आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते अफझलखान विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत, बिचवा यांचा प्रभावी वापर, शंभूकाळात झालेला धनुष्य बानाचा वापर, यात शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे.येथील गुरुदेव मंगल कार्यालयात शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास गाजविलेल्या शस्त्रांचे दर्शन यवतमाळांनी घेतले.
शिवरायांच्या कतृत्वाने संपूर्ण महाराष्टÑात स्वराज्य स्थापन झाले. ज्या शस्त्रांच्या भरवशावर बुद्धीचातुर्याने शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला. तेच राजांचा स्पर्श लाभलेले ऐतिहासिक साक्ष देणारे दूर्मिळ शस्त्रास्त्र यवतमाळकरांना बुधवारपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत बघता येणार आहे. या प्रदर्शनात २२५ प्रकारच्या शस्त्रांचा खजिना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. मराठा धोप, पट्टा, दांडपट्यासह तलवारी, ढाली, गुप्ती, कट्यार, खंजीर, जंबिया, बिचव्यापासून ते अंगरख्यापर्यंत असलेल्या सर्व शस्त्रांचे दर्शन यवतमाळकरांना घडले. शिवकालीन शस्त्रप्रदर्शन बघण्यासाठी शाळकरी विद्यार्थी, शिवसैनिक, शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या प्रदर्शनीत शिवाजी महाराज यांच्या तलवारीच्या चित्रासह मावळ््यांनी वापरलेली विविध प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. मराठा तलवारीसोबतच राजस्थानी, मुघल, नायर तलवार, गर्ज, भाले, कुºहाड, धातूच्या चर्मढाली, गुप्त्याचे विविध प्रकार, ठासणीचे पिस्तूल, धनुष्यबान, संगीन आदी शस्त्रास्त्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. शस्त्रांची बारकाईने पाहणी करण्याबरोबरच विद्यार्थी व आबालवृद्धांनी माहिती देखील जाणून घेतली.

January 17, 2015 in विदर्भ
बाजार समितीमधील अडत्यांची ८० लाखाने फसवणूक 0

बाजार समितीमधील अडत्यांची ८० लाखाने फसवणूक

download (2)
बाभूळगाव, दि. १७ – येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांची तब्बल ८० लाख ६३ हजार ५१७ रूपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाजार समितीचे प्रशासक कैलास खटारे यांनी बाभूळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी व्यापारी ईसराईल बेग सरदार बेग मिर्झा (४५), रा.चांदोरेनगर, यवतमाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर सदर व्यापारी फरार झाल्याचे सांगण्यात आले आहे. येथील सात अडत्यांनी शेतकºयापासून ६ जानेवारीच्या पूर्वी सोयाबीन विकत घेतले होते. या अडत्यांनी ईसराईलबेग व्यापाºयाला तेव्हाच सोयाबीन माल विकला होता. मात्र अडत्यांचे पैशे देण्यास व्यापारी टाळाटाळ करीत होता. अडत्यांनी पैशाचा तगादा लावल्याने या व्यापाºयाने त्यांना स्टेट बँकेचे चेक दिले. मात्र ते चेक बाऊन्स (अनादरित) झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे अडत्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी प्रशासक कैलास खटारे यांना माहिती दिली. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

January 17, 2015 in विदर्भ
दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या तोडगा नव्हे - संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव 0

दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या तोडगा नव्हे – संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव

IMG_20150117_142024
जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेला सुरूवात
उमरखेड (यवतमाळ), दि. १७ – देशाचा पोशिंदा शेतकरी सध्या नैसर्गिक दृष्ट चक्राच्या सावटात अडकला आहे. ज्या बाजूने फिरकुन पाहतो तर दररोज आत्महत्या होत असल्याच्या बातम्या ठळक बघाव्यास मिळतात.या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्याचाच स्विकार करणे म्हणजे जिवनातील चढउताराचा तोडगा नव्हे असे प्रतिपादन साहित्यीक इंद्रजित भालेराव यांनी केले.
कै. विठ्ठलराव पाटील (देवसरकर) साहित्य नगरी स्थानिक माहेश्वरी खुले नाट्यगृह ह्या ठिकाणी ग्रामीण भागातील पहिले १० वे मराठा सेवा संघ प्रणित, जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे आयोजन १६ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान केले आहे. या संमेजनाच्या उद्घाटन प्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन प्रा. शेषराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर संमेलनाध्यक्ष लोककवि इंद्रजित भालेराव तर स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार प्रकाश पाटील हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलतांना भालेराव म्हणाले की, शेतकरी जीवनचरित्र्यावर ५०० च्या वर कविता लिहील्या आहे. ईयत्ता पहिली ते बारावीमध्ये सहा पुस्तकात माझ्या कविता आहे. पुस्तके बदलण्यात आली पण कविता नाही. साहित्य परिषदेची सुरूवात डॉ. एस.एस. भोसले यांनी केली. विदर्भ कन्या तिन पिढ्याच्या स्त्री एकमेव वारसदार मॉ जिजाऊ यांचा जिवनपट कवितातून मांडला होतो असे ते म्हणाले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, डॉ. निर्मला पाटील, नगराध्यक्षा उषा आलट, माजी आमदार विजय खडसे, जिल्हाध्यक्ष दिलीप महाल्ले, माजी बांधकाम सभापती तातू देशमुख, बाबा भांड, डॉ. अशोक राणा, सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, संमेलन कार्याध्यक्ष प्रा. प्र. भा. काळे, कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, पप्पू भोयर पाटील उपस्थित होते. संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. प्र. आर. काळे यांनी केले. यावेळी विदर्भ, मराठवाड्यातील नागरिक उपस्थित होते.

January 17, 2015 in महाराष्ट्र
जिल्ह्यात पल्स पोलिओ लसिकरण मोहिम , 2 लाख 66 हजार बालकांना लस पाजणार 0

जिल्ह्यात पल्स पोलिओ लसिकरण मोहिम , 2 लाख 66 हजार बालकांना लस पाजणार

download
यवतमाळ,दि.17: पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा पहिला टप्पा उद्या दि. 18 जानेवारी रोजी जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड
यांच्याहस्ते सकाळी 9.30 वाजता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात होईल.
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांच्याहस्ते ग्रामीण भागात पुसद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बेलुरा तर जिल्हा परिषद सभापतींच्याहस्ते ठिकठिकाणी शुभारंभ होणार आहे.
पहिल्या टप्यात शहरी व ग्रामिण भागात एकूण 2 लाख 66 हजार बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात 2343, शहरी भागात 275 असे 2618 बुथ राहणार आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागात 519 ट्रांझीट टिम तसेच 114 मोबाईल पथके नेमण्यात आली आहे. मोहिमेसाठी पुरेसे मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. त्यात जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी याशिवाय 126 वैद्यकीय अधिकारी, 154 आरोग्य सहाय्यक, 795 आरोग्य सेवक, 2295 आशा कार्यकर्ती, 2255 अंगणवाडी सेविका यासह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांचे लसिकरण होण्याच्यादृष्टीने पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील तसेच नव्याने जन्मास आलेल्या सर्व बालकांना पोलिओ बुथवर आणून लसिकरण करुन घ्यावे व पोलिओ मुक्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड व जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमानंद निखाडे यांनी केले आहे.

January 17, 2015 in विदर्भ
विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्ष कारावास 0

विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्ष कारावास

2014-10-15~court_ns
नेर, दि. १५  – मुलाला मारहाण करून महीलेचा विनयभंग करणाºया वटफळी येथील आरोपीस एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या. एस. डी. सरोदे यांनी आज गुरुवारी हा निकाल दिला.
भगवान परसराम चव्हाण (४०) रा. वटफळी असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. ३ जुलै २०१३ रोजी दुपारी गावातीलच एका मुलाला मारहाण करून महीलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी नेर पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३२३, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. जमादार शंकर आडे यांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या. एस.डी. सरोदे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुणावनी पार पडली. फिर्यादी महीलेसह अन्य साक्षदारांच्या साक्ष नोंदविल्यानंतर दोष सिद्घ झाल्याने आरोपी भगवान चव्हाण यास भादंवि कलम ३२३ अंतर्गत एक महीना शिक्षा व ३४५ मध्ये एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. आर.बि. भेंडे यांनी काम पाहीले.

January 15, 2015 in विदर्भ
 बाळासाहेब ठाकरे जयंती शिवसेना राबविणार विविध उपक्रम 0

बाळासाहेब ठाकरे जयंती शिवसेना राबविणार विविध उपक्रम

10f4img_186732_balasahebthakary_240x180
यवतमाळ ,दि. १५  – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त १७ ते २५ जानेवारी पर्यंत शिवसेना जिल्हाभर विविध उपक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री तथा महसुलमंत्री संजय राठोड,  खा. भावना गवळी उपस्थित होते.
सामाजिक उपक्रमामध्ये रुग्णांमध्ये रुग्णांकरिता शिबिरे, रक्तदान शिबिरे, थोर पुरूष पुतळे स्वच्छता, आदी कार्यक्रम जिल्हाभर होणार आहे. १७ ते २२ जानेवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांनी युध्दात वापरलेला विविध  शस्त्र, अस्त्रांची प्रदर्शनी स्थानिक गुरूदेव मंगल कार्यलय दारव्हा रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चिलखते, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, दांडपट्टे, वाघनखे, भाले, शिरस्त्राणे आदींचे माहितीपूर्ण प्रदर्शन होणार आहे.
२३ जानेवारील अस्सल मराठमोळ््या संस्कृतीचे प्रदर्शन घडविणारा ‘मी मराठी’ हा कार्यक्रम सायंकाळी ६ वा. अभ्यंकर कन्या शाळाच्या प्रांगणावर होणार आहे. विठ्ठल उमप थिएटर्स मुंबई प्रस्तूत हा कार्यक्रम सुमारे २५० कलाकारांच्या संचासह लोकहीत बहु. संस्था यांच्या सहकार्याने होत असून, विविध सिने व टिव्ही कलावंतांचा या कार्यक्रमात समावेश राहणार आहे. याकरिता प्रवेशीका शिवसेनेच्या निवड शाखांवर उपलब्ध राहणार आहे. हाय कार्यक्रम २२ जानेवारी सायंकाळी ६ वा. शिवाजी स्टेडीयम, दारव्हा येथे २४ जानेवारी ला ६ वा. स्व. चंद्रशेखर पाटील जिनचे मैदान,  दिग्रस व २५ जानेवारीला काळे स्टेडीयम मैदान अजंती रोड, नेर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच २३ जानेवारीवा ‘हिदुत्व रॅली’ हा पे्रक्षणीय तसेच शिवसेना व हिंदूत्वाचे प्रदर्शन करणारा सोळा होणार आहे. २३ जानेवारीला दुपारी १२ वा. पोस्टल मैदान येथे १० हजार शिवसैनिक शिस्तबध्द रितीने ड्रेसकोड मध्ये जमणार आहेत. पांढरा शर्ट, पांढरा पँट व भगवा शेला ह्या वेशात जिल्हा भरातील शाखांमधील शिवसैनिक हिंदुत्व रॅलीचा बिगुल यवतमाळ शहरात फुंकणार आहे. या रॅलीमध्ये भगव्य साडीमध्ये महिला रणरागिणीचाही सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आ. श्रीकांत मुनगिनवार, निवासी उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, शहरप्रमुख पराग पिंगळे यांनी केले आहे.

January 15, 2015 in विदर्भ
टीव्ही पाहू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या 0

टीव्ही पाहू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

download
जळगाव : टीव्ही बघताना वडील रागावल्याने बहिणाबाई कॉलनी भागातील एका अल्पवयीन लेकीने बुधवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. चार दिवसातील ही चौथी घटना आहे. आसोदा रस्ता भागात मजूर कुटुंबातील मुलगी टीव्ही पाहात बसली होती. वडील रागावल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतप्त मुलीने मागच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार काही वेळानंतर लक्षात आला. सोमवारी मोहाडी येथील विद्यार्थिनीने, तर नवृत्तीनगरातील तरुणाने आत्महत्या, मंगळवारी दीक्षितवाडीतील आठवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

January 15, 2015 in मुख्य पान
 एव्हरेस्ट सर करणा-या राहुलला गावक-यांनी टाकले वाळीत 0

एव्हरेस्ट सर करणा-या राहुलला गावक-यांनी टाकले वाळीत

rahul
पोलादपूर – परजातीतील मुलीशी विवाह केल्याच्या रागातून तालुक्याच्या येलंगे गावातील राहुल येलंगे या एव्हरेस्ट शिखर सर करणा-या तरुणाला गावक-यांनी वाळीत टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची पत्नी कुंकू लावत नाही. जीन्स पँट घालते, अशी कारणे पुढे करत येथील गावकरी व राहुलच्या नातेवाईकांनी त्याला मागील वर्षभरापासून वाळीत ठेवल्याची माहिती त्याने उघड केली आहे.
वाळीत प्रकरण समन्वय समितीतर्फे आयोजित बैठकीत स्थानिक पत्रकार बबन शेलार यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. राहुलवर मागील वर्षभरापासून गावकरी कशाप्रकारे अन्याय करत आहेत, याची व्यथा शेलार यांनी यावेळी मांडली. तहसीलदार काशीनाथ नाडेकर, पोलीस निरीक्षक सुरेश अंधारे यांच्या उपस्थितीत तांबडभुवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, सरपंच उमेश पवार, लोहारेचे सरपंच प्रदीप नरे, कापडे बुद्रुकचे सरपंच अजय सलागरे, देवळेचे सरपंच प्रकाश कदम, उद्योजक रामचंद्र कदम शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टीम इंडियाच्या नव्या पोषाखाचे अनावरण 0

टीम इंडियाच्या नव्या पोषाखाचे अनावरण

team-india-1
मेलबर्न – भारतीय क्रिकेट संघाला पोषाख पुरस्कृत करणा-या नाईकेने गुरुवारी टीम इंडियाच्या एकदिवसीय सामन्यांच्या नव्या गणवेशाचे अनावरण केले.
नाईकेने खास पूर्नप्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून टी-शर्ट आणि पायजम्याचा प्रत्येक संच बनवला आहे. प्रत्येक संच बनवण्यासाठी सरासरी ३३ प्लास्टिक बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे.
खेळाडूंना मैदानावर जास्तीत जास्त मदत होईल अशा पध्दतीने टीम इंडियाचा नवा पोषाख तयार करण्यात आला आहे. टीम इंडियाचा नवा गणवेश वजनाने हलका, आरामदायक आणि मैदानावर खेळाडूंचे कमीत कमी लक्ष विचलित होईल अशा पध्दतीने बनवण्यात आला आहे असे भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.
२०१५ हे टीम इंडियासाठी महत्वाचे वर्ष आहे. क्रिकेटमधील सर्वोच्च शिखर समजल्या जाणा-या विश्वचषकाचे जेतेपद मिळवण्यासाठी जगातले सर्वोत्तम संघ परस्परा विरुध्द मैदानात उभे ठाकणार आहेत. टीम इंडियाचा गणवेश हा नुसता पोषाख नाही त्यापेक्षा भरपूर काही आहे.
या पोषाखामध्ये कोटयावधी लोकांच्या इच्छा, अपेक्षा सामावल्या आहेत. हा रंग संपूर्ण देशाला एकासूत्रात बांधतो असे बीसीसीआयचे सचिव संजय़ पटेल म्हणाले. टीम इंडियाची गरज लक्षात घेऊन नाईकेने हा पोषाख बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जो वापर केला त्याने आम्ही समाधानी आहोत असे पटेल म्हणाले.

January 15, 2015 in क्रीडा
गुजरातमध्ये दंगल, तीन ठार 0

गुजरातमध्ये दंगल, तीन ठार

muzffarnagar-riot
सूरत/भरूच- गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडवताना झालेल्या वादाचे पर्यावसन दंगलीत झाले. या दंगलीत तीन जणांचा मृत्यू झाला. तर अन्य ३० जण जखमी झाले आहेत. यात पोलिस अधिक्षकांसह दोन पोलीसही जखमी झाले आहेत. यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त असून संपूर्ण हांसोट तालुक्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
भरुच जिल्ह्यातील हांसोट तालुक्यातील अंभेठा गावात दोन समुदायांमध्ये पतंग उडवण्यावरुन बुधवारी वाद झाला. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त काहीजण पतंग उडवत असताना यातील पतंग पकडण्यावरुन एका मुलाने अल्पसंख्यांक समाजातील मुलाला मारहाण केली. त्याचा राग मनात ठेऊन पुन्हा हल्ला केल्याने हा वाद पेटला. हा संघर्ष संपूर्ण तालुक्यात पसरला असून येथील धार्मिक स्थळे आणि दुकानांवर हल्ला करणा-या समुदायाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला हवेत गोळीबार केला. मात्र कोणीही जुमानत नसल्याने अखेर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
या संघर्षात जखमी झालेल्या ३० जणांना उपचारासाठी हांसोट, भरुच आणि सुरत येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या सशस्त्र जवानांना हांसोट येथे तैनात केले आहे.
या भागात लोकांनी दगडफेक केली. तर काही ठिकाणी दुकाने जाळण्यात आल्याचीही माहिती आम्हाला मिळाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वाढीव सुरक्षा मागवण्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भरुचचे पोलीस अधिक्षक बिपिन अहिरे यांनी सांगितले.

 

January 15, 2015 in देश-विदेश
 पाकिस्तान दहशतवादी संघटनांवर बंदी घालणार 0

पाकिस्तान दहशतवादी संघटनांवर बंदी घालणार

Jamaat-ud-Dawa-Haqqani-Network
इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या जमात उद दावा आणि हक्कानी नेटवर्कसह १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानवर दबाव आणल्याने पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे समजते.
लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. तर २००८ मध्ये काबूल येथील भारतीय दुतावासावरील हल्ल्यामागे जलालुद्दीन हक्कानी नेटवर्कचा हात होता. या हल्ल्यात ५८ जणांचा मृत्यू झाला. २०११ मध्ये काबूलमधील अमेरिकेच्या दुतावासावरील हल्ला आणि अफगाणमधील बाँबस्फोटांमध्येही हक्कानी नेटवर्कचा सहभाग होता. सप्टेंबर २०१२ मध्ये अमेरिकेने हक्कानी नेटवर्कवर बंदी घातली होती.
Jamaat-ud-Dawaकेरी यांनी शरीफ यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पाकिस्तानला दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी खडे बोल सुनावल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचा दबाव आणि नुकताच झालेला पेशावर हल्ला यामुळेच पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलून तेथील १२ दहशतवादी संघटनांवर बंदी लादण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये बंदीची अधिकृत घोषणा होईल, असे पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी म्हटले आहे.

 

January 15, 2015 in देश-विदेश
किरण बेदी भाजपमध्ये 0

किरण बेदी भाजपमध्ये

images
नवी दिल्ली -माजी आयपीएस अधिकारी आणि अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील एक बिनीच्या शिलेदार किरण बेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. बेदी या आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
भाजपच्या ऑनलाइन सदस्य नोंदणी प्रक्रियेनुसार फोनवरून ‘मिस्ड कॉल’ दिल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बेदींना पक्षात औपचारिक प्रवेश दिला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हेही यावेळी उपस्थित होते. किरण बेदी या दिल्ली विधानसभेची निवडणूक निश्चितच लढतील, असे अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, त्यांचा मतदारसंघ कोणता असेल हे सांगण्याचे शहा यांनी टाळले.
दिल्ली भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल असे विचारले असता, ‘भाजपमध्ये मुख्यमंत्री बनण्याच्या क्षमतेचे अनेक नेते आहेत. पण सध्या आम्ही निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा निर्णय पक्षाचे संसदीय बोर्ड करेल,’ असे शहा म्हणाले.
भाजपच्या केजरीविरोधी प्रचाराला बळ
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात किरण बेदी व केजरीवाल यांनी एकत्र काम केले होते. केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढल्यानंतर बेदी त्यांच्यापासून दूर झाल्या होत्या. केजरीवालांची कामाची पद्धत कशी आहे? त्यांचे कच्चे दुवे कोणते आहेत? याची बेदी यांना पूर्ण माहिती आहे. बेदी यांच्या प्रवेशामुळं भाजपच्या केजरीविरोधी प्रचाराला मोठे बळ मिळणार आहे.

January 15, 2015 in मुख्य पान
प्रजासत्ताकदिनी हल्ल्याची शक्यता 0

प्रजासत्ताकदिनी हल्ल्याची शक्यता

Singh
नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान येत्या प्रजासत्ताकदिनी भारतात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असून शाळा, लष्करी छावण्या, हायवे आणि नागरी वस्त्या हे दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य असू शकते,’ असा गंभीर इशारा लष्कराने दिला आहे.
लष्कराच्या १६ कॉर्प्स विभागाचे लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीची माहिती दिली. ‘पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांचा वावर आणि प्रशिक्षण अद्याप सुरूच असल्याचे हे लष्करप्रमुखांनी सांगितलेच आहे. आता तर तब्बल २०० दहशतवादी पीर पंजालच्या डोंगर भागातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, पाकिस्तानी घुसखोरी हाणून पाडण्यासाठी लष्कर पूर्ण तयार असून असा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल,’ असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.
ओबामा यांच्या भेटीदरम्यान भारतीय सीमेवर व देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट ठेवण्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, काश्‍मीरमध्ये घुसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन आत्मघाती दहशतवाद्यांचा गुप्तचर संस्थांकडून शोध सुरू आहे.

January 15, 2015 in मुख्य पान
 मोदी सरकार हुकूमशहा प्रवृत्तीचे - सोनिया गांधी 0

मोदी सरकार हुकूमशहा प्रवृत्तीचे – सोनिया गांधी

images

नवी दिल्ली – केंद्रातील आणि अनेक राज्यांतील सत्ता गमावलेल्या काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकार हुकूमशहासारखे वागत असल्याचा आरोप सोनियांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी तसेच पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्यादृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत बोलताना सोनियां म्हणाल्या, ‘मोदींचे सरकारमधील सहकारी तसेच भाजपचे नेते प्रक्षोभक विधाने करत असताना मोदींनी त्याकडे दुर्लक्ष करण्याची सोयीस्कर अशी भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी यांची जी रणनीती होती त्याचाच हा पुढचा अंक आहे. यामागे दोन समाजांमध्ये दुही निर्माण करण्याचा उद्देश स्पष्टपणे दिसत आहे.’ केंद्र सरकार आपल्या कर्तव्यापासून दूर जात आहे. जनहिताच्या कामांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असेही सोनिया यावेळी म्हणाल्या. भाजपचे सरकार शेतकरीविरोधी असून त्याविरोधात देशभरात आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सोनियांनी यावेळी दिला.