
पुणे (अमीत इंगोले) – ‘रामानंद सागर प्रॉडक्शन’चा वारसा लाभलेल्या ‘मिनाक्षी सागर प्रॉडक्शन’ ने आगामी ‘मितवा’ चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. रामानंद सागर यांची नात, मोती सागर यांची मुलगी असलेल्या मिनाक्षी सागर यांनी याआधी अनेक हिंदी मालिकांचे लेखन केले असून प्रथमच त्या त्यांच्या निर्मिती संस्थेद्वारे मराठी चित्रपटाची निर्मिती करताहेत. ‘व्हिडिओ पॅलेस’ची प्रस्तुती असलेल्या ‘मितवा’ चित्रपटात लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असून दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी या दिग्दर्शन करणार आहेत.
‘रामानंद सागर यांच्या रामायणमधील ‘कुश’ ची आणि कृष्णामधील ‘कृष्णा’ची भूमिका स्वप्नील जोशीने साकारली होती. इतक्या वर्षांपासूनचा आमचा स्नेह असल्याने आमच्या पहिल्या मराठी चित्रपट देखील स्वप्नीलला घेऊन करायचे निश्चित केले. त्याने देखील या प्रस्तावाला तात्काळ होकार दिला, असे मिनाक्षी सागर यांनी सांगितले.‘मितवा’ ही म्युझिकल लव्हस्टोरी असून या चित्रपटाला शंकर, एहसान, लॉय या संगीतकारांचे संगीत लाभले आहे. सोबत मराठीतील सध्याचे आघाडीचे संगीतकार निलेश मोहरीर, अमित राह, पंकज पडघन हे देखील या चित्रपटासाठी संगीत देणार आहेत. या चित्रपटासाठी गीते अश्विनी शेंडे, मंदार केळकर, मंगेश कांगणे यांनी लिहिली आहेत. कथा स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी लिहिली असून अनेक लोकप्रिय मालिकांचे लेखक शिरीष लाटकर यांनी चित्रपटाची पटकथा- संवाद लिहिले आहेत. दुनियादारीचे सिनेमटोग्राफर प्रसाद भेंडे हे आगामी ‘मितवा’ ची सिनेमटोग्राफी करणार असून महेश साळगांवकर कला दिग्दर्शक आहेत, संजय डावरा हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत.
Archive for March, 2014
0
स्वप्नील-सोनालीचा ‘मितवा’
0
मानसी नाईकची दिलखेचक अदा

पुणे (अमीत इंगोले) – आपल्या नृत्याच्या अदाकारीने लक्ष वेधणारी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच वेगवेगळ्या नृत्यशैलीतून प्रेक्षकांसमोर येत असते. ‘अश्विनी राहुल इंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अश्विनी सिरसाट निर्मित आणि के. विलास दिग्दर्शित ‘एकता एक पॉवर’ या आगामी मराठी चित्रपटातून मानसी नाईक एका धमाकेदार आयटम सॉंगमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘पंधरा तो हो गया सोलवा लग गया, आयी जवानी पटरी पें’, असे बोल असणा-या या गाण्यावर मानसी नाईकने दिलखेचक नृत्य सादर केलंय. या गाण्याचे वेगळेपण म्हणजे ‘रिक्षावाला फेम’ रेश्मा सोनावणे यांनी गे गाणं गायलं असून यांचे नृत्यदिग्दर्शन ‘डीआयडी फेम’ सिद्धेश पै यांनी केलं आहे.
के. विलास यांनी लिहिलेल्या गीताला सलील अमृते यांचं संगीत लाभलं असून नुकतंच या आयटम सॉंगचे चित्रीकरण नायगांव येथील आर.डी.एल स्टुडिओत करण्यात आलं. ‘एकता एक पॉवर’ या चित्रपटातून एक सामाजिक एकात्मतेचं महत्व सांगणारी कथा रेखाटण्यात आली असून या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, स्मिता शेवाळे, मौसमी तोंडवळकर आणि विद्याधर जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘दिग्दर्शक के.विलास यांनी चित्रपटाचे लेखन केले असून संवाद ज्ञानेश्वर आंगणे यांनी लिहिलेत.
मानसीने यापूर्वी रेश्मा सोनावणे यांच्या आवाजातील ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर आपला जलवा दाखविला होता. रिक्षावालाप्रमाणे ‘एकता एक पॉवर’ मधील हे गाणं ही सर्वांना ठेका धरायला लावेल असा विश्वास मानसी नाईकने चित्रीकरणावेळी व्यक्त केला आहे. मानसी सोबत असलेल्या उत्तम ट्युनिंगमुळे हे आयटम सॉंग करताना खूप धम्माल आल्याचं मत नृत्यदिग्दर्शक सिद्धेश पै यांनी व्यक्त केलं
0
गारपिटीने जिल्हा गारद

यवतमाळ – जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस सुरू असून आज पुन्हा दारव्हा, नेर तालुक्यात गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतकºयांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
नेर तालुक्यात सायंकाळ दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सारंगपूर येथे गारपीट झाल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापूर्वी झालेल्या गारपीटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरबरा पिकांचे नुकसान झाले असताना झालेल्या गारपीटीमुळे या नुकसानीत वाढ झाली आहे. महामार्गावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे काही ठिकाणची वाहतूक खोळंबली होती. तर दारव्हा तालुक्यातील लाख (खी.), चाणी, कामठवाडा, शेलोडी, जांभोरा येथे गारपीट झाली. तसेच किन्ही वळगी, सायखेडा, खेड,आदी महागाव सर्कलमधील गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. हातणी येथे तिसºयांदा गारपीटीचा तडाखा बसला. बोरी अरब येथे वादळी वाºयामुळे झाडे उन्मळून पडली होती. तर अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रब्बी हंगामातील गहू, हरबरा या पिकासह संत्रा बागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाडखेडसह जांभोरा येथे गारपीट झाल्यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वीज खांब वाकल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. कळंब तालुक्यातील मार्कंडा येथे सतत १ तास झालेल्या गारपीटीमुळे शेतीपिकांसह घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाºयासह झालेल्या गारपीटीमुळे शेकडो नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली होती. जीव वाचविण्यासाठी नागरिकांनी मुलाबाळांसह बाजीच्या खाली आसरा घेतला होता. अनेक वृक्ष उन्मळून पडली तर वीज खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. गारपीटीमुळे काही महिला पुरुष जखमी झाल्याची माहिती आहे.
लाचखोर लिपीकास एक वर्ष शिक्षा
पांढरकवडा – पाणी पुरवठाचे बिल काढण्यासाठी लाच मागणाºया कनिष्ठ लिपीकाला एक वर्ष शिक्षा ठोठावली. येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायदंडाधिकारी पि.एम. हुणेदार यांनी आज हा निकाल दिला.
अरविंद झाडे असे शिक्षा झालेल्या कनिष्ठ लिपीकांचे नाव असून ते घाटंजी पंचायत समितीमध्ये कार्यरत होते. घाटंजी तालुक्यातील पंगडी येथील इंदुमती जैयस्वाल या महिलेच्या मालकीची विहीर २००३ मध्ये पाणी पुरवठा करण्याठी ग्रामपंचायतने अधिग्रहीत केली होती. विहीरीचे भाड्याचे १५ हजार रुपये बिल काढण्यासाठी जैयस्वाल यांना एक हजाराची लाच या लिपीकाने मांगितली होती. याप्रकरणाची तक्रार जैयस्वाल यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या विभागाच्या पथकाने सापळा रचुन घाटंजी येथील श्याम उपहारगृहात लाच घेताना झाडे याना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. पांढरकवडा येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायदंडाधिकारी पि.एम. हुणेदार यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये दोषी आढळल्याने झाडे यास एक वर्षाची शिक्षा ठोठावली. सरकारीपक्षाच्या वतीने अॅड. प्रशांत मानकर यांनी काम पाहिले.
0
अवैध सागवान वाहतुक करणारा ट्रक जप्त

घाटंजी – मौल्यवान सागवाणाची अवैधपने तस्करी करणारा ट्रक आज पारवा वनविभागाच्या पथकाने जप्त केला. वनविभागामार्फत १२० नग (९.४६१घनमिटर) परवानगी मिळवून प्रत्यक्षात १५२ नग (१२.९४६घ.मि.) सागवाण पांढरकवडा येथून आंध्रप्रदेशातील कश्मिरनगर येथे चोरट्या मार्गाने जात होते. याबाबतची गुप्त माहिती पारवा येथील वनविभागाच्या पथकाने पारवा चौफुलीवर एम.एच. २९ / ९९४९ क्रमांकाचा ट्रक अडवून पाहणी केली. यामध्ये परवानगी पेक्षा जास्त सागवाणाची लाकूड आढळून आले. त्यामुळे चालक रमेश श्रावण गेडाम, क्लिनर विनोद शंकर रोहवकर याना अटक करून ट्रक जप्त केला. सहा. वनसंरक्षक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल स्कॉडचे एस.ए. दरारे यांनी केली.
क्षतीग्रस्तांचे सर्वेक्षण करा; काँग्रेसची मागणी

यवतमाळ – जिल्ह्यात गारपिट व विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडला. त्यामुळे गहु, हरभरा, मका, संत्रासह अन्य पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे सर्वेक्षण करुन तातडीने मदत करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
जिल्ह्यात गारपिट होऊन पिकासह घराची पडझड, मृत जनावर, रस्ते, पुल, विद्युत पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासन आचार संहिता व निवडणूक प्रक्रीयेत व्यस्त आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील नैसर्गिक क्षतीग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीने केली आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतांनी आ. नंदिनी पारवेकर, जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेता देवानंद पवार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर, अॅड. सिमा तेलंगे, योगेश पारवेकर, सिमा देशभ्रतार, मिनाक्ष्ज्ञी राऊत, आर्णी पंचायत समितीचे सभापती राजू विरखेडे, सोनबा मंगाम, अर्चना कोडापे, वैयजंती उगलमुगले, गोदावरी वगारे, उषा दिवटे, मंगला नंदुरकर, विणा नागदिवे, कमल राऊत, मिना सरतापे, मोहीनी गौर, हरिभाऊ जिभकाटे उपस्थित होते.
0
खासदार-आमदाराचा गारांसह मोर्चा

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची मागणी
यवतमाळ – जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. शिवसेनेच्या खा. भावना गवळी, आ. संजय राठोड व शेतकºयांनी गारा, मृत प्राण्यांसह जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
जिल्ह्यात दहा-पंधरा दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपिट सुरु आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा यासह संत्रा, मोसंबी, लिंबु, पपई आदि फळबागाचे हाती आलेले पिक जमिनदोस्त झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.आज शिवसेनेच्या खा. भावना गवळी, आ. संजय राठोड आणि शेतकºयांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. अतीवृष्टीग्रस्त, गारपिटग्रस्त भागाची पाहणी करून शेतकºयांना सरसकट आर्थिक मदत करावी , ज्या भागातील पिकांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीच्या सर्व सोयी सवलती लागु कराव्या अशी मागणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगिनवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष गजानन बेजंकीवार, प्रविण पांडे, अरविंद गादेवार, हरिहर लिंगणवार, राजेंद्र गायकवाड, शैलेश ठाकुर, गजानन डोमाळे, प्रविण शिंदे, किशोर इंगळे, राजेंद्र गिरी, संजय रंगे, पराग पिंगळे, सचिन राठोड, अरुण वाकडे, गजानन पाटील, अनिल लांडगे, अतुल गुल्हाणे, राजू नागरगोजे, गजानन भोकरे, सदानंद कोंडेवार, रविंद्र भारती, सुभाष वारवड, विनोद काकेड, संतोष ठावरे, मनोज भोयर, गजनन कोळणकर, किशोर वाघ, हरिहर हरबडे, पृथ्वीराज आडे, विनायक भवरे आंदोलनात सहभागी झाले होते.
यवतमाळ जिल्ह्यात ढगफाटले, युवकाचा मृत्यू , महिला जखमी, घाटंजी टॉवरवर वीज कोसळली
यवतमाळ – जिल्ह्यात आठवड्यापासून वादळीवाºयासह गारपीटीने थैमान घातले आहे. आज रविवारी ढगफाटल्याने वादळी वाºयासह जोरदार पाऊस पडला. पुसद तालुक्यातील जामनाईक येथील एका युवकाचा मृत्यू झाला. वीज कोसळल्याने दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील महिला जखमी झाली, शेकडो कोंबड्या दगावल्या तर घाटंजी तहसीलच्या निर्माणाधिन टॉवरवर वीज कोसळून प्रचंड नुकसान झाले.
राळेगांव, बाभुळगाव, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, पुसद, नेर तालुक्यात सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळीवाºयासह जोरात पाऊस पडला. गारपीट सुरू होताच भितीपोटी पुसद तालुक्यातील जामनाईक येथील युवक गजानन तुळशीराम कुबडे (२४) हा घराकडे धावत जात होता. अशातच तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील शोभा क्षिरसागर (५०) ही महिलाही गारपीठीमध्ये जखमी झाली. तसेच शेकडो कोंबड्या गारपीटीने दगावल्या असून, घाटंजी येथील तहसील कार्यालयात टॉवर वीज कोसळली.
मनसेचा नरेंद्र मोदींना पाठिंबा
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्ष महायुतीत सहभागी झाली नसली तरी, आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने दिलेला मैत्रीचा प्रस्ताव मनसेने मान्य केला आहे.
मनसेच्या आठव्या वर्धापनदिन सोहळयाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची आपली भूमिका जाहीर केली. मनसेचे निवडून आलेले खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील असे राज यांनी सांगितले.या कार्यक्रमात राज यांनी मनसेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची मनसेवर आगपाखड सुरु आहे. मनसे प्रभावहीन झाली असून, आगामी निवडणूकीत मनसेचा निभाव लागणार नाही अशी बोचरी टीका शिवसेनेकडून सुरु आहे. त्यामुळे राज आपल्या भाषणात शिवसेनेचा समाचार घेतली अशी अपेक्षा होती.मात्र राज यांनी योग्यवेळी आपण सर्व विषयांवर भाष्य करु असे सांगत टीका करण्याचे टाळले. आगामी निवडणूकीत मनसे आपली ताकत दाखवून देईल. तुम्ही लोकसभा निवडणूकांच्या कामाला लागा असे राज यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.या कार्यक्रमात राज यांनी मनसेच्या मोबाईल अॅपचे लॉंन्च केले तसेच पुढच्या दोन ते तीन दिवसात ते राज्यातील गारपीटग्रस्त शेतक-यांची भेट घेणार आहेत. मनेसची दुसरी उमेदवार यादी पुढल्या दोन ते तीन दिवसात जाहीर होईल.
मनसेची उमेदवार यादी
दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई- आदित्य शिरोडकर
उत्तर-पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर
कल्याण-डोंबिवली -राजू पाटील
शिरुर – अशोक खंडेभराड
नाशिक – डॉ.प्रदीप पवार
पुणे – दीपक पायगुडे
रामदास कदम यांची मनसे भेट
मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मनसेवर आगपाखड सुरु असताना, मनसे मात्र शांत राहून शिवसेनेचा एक एक नाराज मोहोरा आपल्या गळाला लावत आहे. भारतीय विद्यार्थी सेना आणि शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे यांना मनसेमध्ये आणल्यानंतर शिवसेनेच दुसरे वरिष्ठ नेते रामदास कदम हे ही मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
रामदास कदम यांनी मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही कौटुंबिक भेट असल्याचे वैभव खेडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र येत्या काही दिवसात कोकणातील शिवसेनेच्या अंतर्गत राजकरणात मोठी उलथा-पालथ होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. रामदास कदम गेल्या काही काळापासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. रामदास कदम यांच्यासारखा वरिष्ठ नेत्यांने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली तर, तो सेना नेतृत्वाला एक झटका असेल. आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपशी मैत्रीचे नाते जपून शिवसेनेला झटका देण्याची मनसेची रणनिती आहे. त्यादृष्टीने मनसे मुंबई, ठाणे, कल्याण आणि नाशिकमध्ये शिवसेना उमदेवारांच्या विरोधात तगडे उमेदवार देणार आहे.
अण्विक पाणबुडीला अपघात एक ठार
विशाखापट्टणम – भारतीय नौदलाच्या पाणबुडया, युध्दनौकांना होणा-या अपघातांची मालिका कायम असून, शनिवारी संध्याकाळी विशाखापट्टणम येथील नौदलाच्या युध्दनौका बांधणी तळावर बांधकामवस्थेत असलेल्या एका अणवस्त्रपाणबुडीला अपघात झाला. या दुर्घटनेत एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला असून, दोन कामगार जखमी झाले आहेत.
आयएनएस अरिहंत वर्गातील ही अणवस्त्र पाणबुडी आहे. पाणबुडीची दाब चाचणी सुरु असताना, हायड्रायुलिस टाकीचे झाकण उडून कामगाराच्या अंगावर पडले. त्यात या कामगाराचा मृत्यू झाला अशी माहिती डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदर यांनी दिली. अमर असे या कामगाराचे नाव असून तो २४ वर्षांचा होता. अमजद खान आणि विष्णू हे दोन अन्य कंत्राटी कामगार अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत अण्विक पाणबुडीचे नुकसान झालेले नाही तसेच पाणबुडी विकसित करण्याच्या कार्यक्रमाला धक्का लागलेला नाही अशी माहिती चंदर यांनी दिली. डीआरडीओने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे.शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या माझगाव गोदीत आयएनएस कोलकाता श्रेणीतील ‘यार्ड-७०१’ विनाशिकेवर स्फोट होऊन एका अधिका-यांचा मृत्यू झाला होता. त्याआधी आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीच्या चाचण्या सुरु असताना, झालेल्या अपघातात दोन नौदल अधिका-यांचा मृत्यू झाला होता.
महिलांसाठी एसएमएस हेल्पलाइन
मुंबई – शहरात एकटय़ाने प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस व एमटीएनएलतर्फे एसएमएसद्वारे हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ टॅक्सी अथवा रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील प्रमुख रेल्वेस्थानकांबाहेर पोलिसांचे विशेष ‘डेस्क’ तयार केल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी शनिवारी दिली.
जागतिक महिलादिनी मुंबई पोलिस आणि ‘एमटीएनएल’च्या वतीने ‘ट्रॅव्हल सेफ, व्हेन अलोन’ ही नवीन योजना सुरू करण्यात आली असून, एकटीने प्रवास करणा-या महिलांसाठी एसएमएसद्वारे हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय एकटी प्रवास करणारी महिला व ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ टॅक्सी अथवा रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील प्रमुख रेल्वेस्थानकांबाहेर पोलिसांचे विशेष ‘डेस्क’ उपलब्ध असतील, अशी माहिती पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी शनिवारी दिली.मुंबईत नुकतेच इस्थर अनुह्या प्रकरणावरून महिलांच्या सुरक्षित प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही योजना सुरू केली आहे. रात्री-अपरात्री टॅक्सी किंवा रिक्षाने प्रवास करणा-या महिलेला असुरक्षित वाटल्यास ९९६९७७७८८८ या हेल्पलाइनवर ती प्रवास करत असलेल्या वाहनाचा क्रमांक एसएमएस केल्यानंतर महिला नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे, प्रवासी महिलेचा मोबाइल क्रमांक व महिलेने पाठवलेला एमएमएस सव्र्हवरवर साठवून ठेवला जाईल. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडल्यास आरोपींपर्यंत सहज पोहोचता येऊ शकेल. ही सेवा विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहे. हे एसएमएस सेव्ह करण्यासाठी अद्ययावत सव्र्हर वापरण्यात येणार असून, एका वर्षात एक कोटी एसएमएस सेव्ह करण्याची त्याची क्षमता आहे.याशिवाय नोकरीव्यवसायानिमित्त एकटय़ा प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षा व सुविधेसाठी दादर, वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस, बोरिवली, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी टर्मिनस या प्रमुख रेल्वेस्थानकांबाहेर वाहतूक पोलिस, विभागीय परिवहन विभागाचे अधिकारी (आरटीओ), रेल्वे सुरक्षा दल यांचे संयुक्त विशेष डेस्क उपलब्ध करण्यात येणार असून, या डेस्कच्या माध्यमातून महिलांना प्रवासासाठी तत्काळ टॅक्सी व रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या डेस्कच्या माध्यमातून महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मारिया यांनी स्पष्ट केले. या वेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात महिला सुरक्षा मार्गदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले. या मार्गदर्शिकेत महिलांचे अधिकार, त्यांच्या सुरक्षेबाबतची माहिती, महिलांविषयीचे कायदे, अदखलपात्र गुन्हा व गुन्ह्यांमधील फरक, लैंगिक अत्याचार, महिलांविरोधातील गुन्हे, अॅसिड हल्ला आदींची कायदेशीर माहिती देण्यात आली आहे.
पत्नीची काळजी न घेणारी व्यक्ती देशाची सेवा करणार काय ? – दिग्विजय सिंह
नवी दिल्ली- पत्नीची काळजी घेऊ न शकणारी तसेच महिलांचा आदर न करणारी व्यक्ती देशाची सेवा काय करणार, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी टीका केली.
मोदींच्या मनात स्त्रियांबद्दल थोडा जरी सन्मान असता तर त्यांनी निवडणूक अर्जामध्ये आपल्या पत्नीचे नाव दिले असते. मोदी यांनी विवाहासंदर्भातील माहिती का लिहिली नाही, ते अविवाहित आहेत किंवा त्यांनी आपल्या पत्नीला का सोडून दिले, याबाबतची माहिती त्यांनी का दिली नाही.जशोदाबेन असे त्यांच्या पत्नीचे नाव सांगितले जाते. त्या अजूनही एका भाडयाच्या घरात राहतात. त्यांच्या निवासासाठी मोठे घर का दिले गेले नाही, असा सवालही त्यांनी केला. ते एक मोठे व्यक्ती आहेत असे म्हणतात, तर त्यांनी आपल्या पत्नीसाठी सोयी का उपलब्ध करून दिल्या नाहीत. ज्यांच्या मनामध्ये महिलांसाठी आदर नाही, तो देशाची सेवा कशी करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मुंबई पोलिस महिलांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असून, त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येतील. महिलांचा वावर अधिक असणा-या ठिकाणांच्या सुरक्षेची मुंबई पोलिसांकडून विशेष पाहणी केली
केजरीवालांच्या घराबाहेर ‘आप’कार्यकर्त्यांची निदर्शने
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे असंतुष्ट कार्यकर्त्यांनी ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी निदर्शने केली. तिकीटवाटपात अनेकांना डावलल्याने ‘आप’च्या असंतुष्टांमध्ये भर पडत आहे.
एकीकडे ‘आप’कडून संपूर्ण स्वराज्यच्या गप्पा मारल्या जात आहेत तर दुसरीकडे पक्षामध्येच त्याची अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप ‘आप’च्या राष्ट्रीय परिषदेच्या सदस्य अश्विनी उपाध्याय यांनी केला. या गोष्टी केजरीवाल यांना लक्षात आणून देण्यासाठी येथे जमलो असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने केलेल्या तिकिटवाटपाबाबत आपण समाधानी नाही. मात्र केजरीवाल कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळही देत नसल्याचे त्या म्हणाल्या.
केजरीवालांचा शपथविधी १३.४१ लाखांत!
अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमाचा तसेच जाहिरातीचा खर्च १३ लाख ४१ हजार रुपये झाला असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले. रामलीला मैदानात झालेल्या शपथविधीसाठी ६.३३ लाख तर त्याच्या जाहिरातीसाठी ६.७ लाख रुपये खर्च झाल्याचे दिल्ली सरकारच्या प्रशासकीय विभागाने ही माहिती दिली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्तर दिल्ली महानगरपालिका, दिल्ली जलमंडळ, अग्निशमन विभाग आणि विद्युत विभाग या सर्व विभागांचा खर्चाचा समावेश आहे.
न्यायाधिशांचे घरी चोरी, दोन अटकेत
यवतमाळ – आर्णी येथील न्यायाधिशांचे घर फोडणाºया दोन चोरट्यास विशेष पथकाने अटक केली. न्यायालयात हजर करून दोन्ही आरोपींना १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळविली. शेख अनवर शेख मुख्त्यार (२४), शेख अखबर शेखर मुसा (२३) रा. तुकाराम बापू वार्ड पुसद अशी आरोपींची नावे आहे. १४ आॅक्टोंबर रोजी आर्णी येथील न्यायाधिश आगलावे याच्या घरी ४४ हजाराची चोरी झाली होती. दरम्यान चार महिन्यानंतर शनिवारी आरोपी शेख अनवर, शेख अखबर यास अटक करून १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळविली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी याच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे, जमा. भिमराव सिरसाठ, लिलाधर वानखेडे, गुड्डू शेख, नितीन वास्टर, आशिष गुल्हाणे, सतीश पांडे, चालक देवतळे यांनी केली.
एकाच दिवशी पाच ठिकाणी चोरी
यवतमाळ – जिल्ह्यात चोरट्याने थैमान घातला असून एकाच दिवशी पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. ढाणकी येथील गोविंद भावसिंग आडे (४६) याचे देशी दारुचे दुकानाची जाळी वाकवून गल्ल्यातून ६२ हजार ५५२ रुपये चोरुन नेले. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच पांढरकवडा तालुक्यातील झुंझरपूर शिवारातून मोबाईल टॉवरच्या ५३ बॅटºया (किंमत ५३ हजार) चोरट्याने चोरुन नेल्या. याप्रकरणी लखन प्रेमसिंग चव्हाण रा. अंतरगाव याच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मराठवाकडी येथील वसंता गंगाराम देशट्टीवार यांच्या शेतातून ९ झाडे आरोपी वासुदेव धोंडू टेकाम (३५) रा. गोंडवाकडी याने चोरुन नेले. सवना येथील गजानन रामराव देशमुख याची दुचाकी (एम.एच. २९/ एल ९७४५) चोरट्याने चोरुन नेली. या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर परसोडा येथील श्रीधर बालाजी मसे (६३) यांचे नवरगाव येथील गोदाम चोरट्याने फोडले. त्यामधून १८ क्विंटल सोयाबीन चोरुन नेले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
यवतमाळात ७० लाखांची घरफोडी
यवतमाळ – शहरातील धामणगाव बायपास पिंपळगाव येथील दालमिल व्यावसायिकांचे घर फोडून हिºयासह ७० लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. आज रविवारी सकाळी हा प्रकार कामगारांच्या निदर्शनास आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
विनोद भरतीया रा. धामणगाव बायपास पिंपळगाव रोड हे दोन दिवसापूर्वी आपल्या कुटुंबीयासह अंत्यसंस्कारासाठी गेले होते. अशातच काल रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून हिरे, सोन्याचे दागिने, चांदी, रोख आदी ७० लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, शहरचे ठाणेदार अरुण आगे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. अंगुली मुद्रा तज्ज्ञ सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र नक्षणे, अमित मेश्राम यांना पाचारण करून कपाटावरील चोरट्याचे ठसे घेतले.
विमान समुद्रात कोसळलं
क्वालालंपूर – क्वालालंपूरहून २२७ प्रवाशांना घेऊन बीजिंगला निघालेलं आणि १२ तासांपासून गायब असलेलं मलेशिया एअरलाइन्सचं विमान चीनच्या दक्षिणेकडील समुद्रात कोसळल् आहे.बोइंग विमानाचा हा वर्षातील दुसरा अपघात असून, १९ वर्षांमधील ही सगळ्यात मोठी दुर्घटना ठरली आहे. या विमानातील २२७ प्रवाशांमध्ये चेन्नईतील एका महिलेसह पाच भारतीय नागरीकही आहे.
एम एच ३७० या बोइंग विमानानं काल मध्यरात्री १२ वाजून २१ मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजता) क्वालालंपूर विमानतळावरून ‘टेक ऑफ’ केलं होतं. चीनची राजधानी, बीजिंगला ते सकाळी साडेसहाला पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु, उड्डाणानंतर दोन तासांनी या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्यानं एकच खळबळ उडाली होती. प्रदीर्घ शोधमोहिमेनंतर, हे विमान व्हिएतनामच्या एअर स्पेसमध्ये कुठेतरी हरवल्याचं लक्षात आलं होतं. ही संपूर्ण हद्द पिंजून काढतानाच, हे विमान दक्षिण चीन समुद्रात कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे.व्हिएतनामच्या नौसैनिकांना अॅडमिरल गो व्हॅन फॅट्ट यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिल्यानं विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोराच मिळाला आहे. या बातमीनंतर बीजिंग एअरपोर्टवर शोककळा पसरली आहे. मलेशिया एअरलाइन्सच्या या विमानात १४ देशांमधील २२७ प्रवासी होते, त्यात दोन चिमुरड्यांचाही समावेश होता. त्यापैकी सर्वाधिक १५२ प्रवासी चीनचे नागरिक होते. मलेशियाचे ३८, इंडोनेशियाचे १२, ऑस्ट्रेलियाचे सात आणि भारताचे पाच जण बीजिंगला निघाले होते. चंद्रिका शर्मा आणि सिरेगर फिर्मन चंद्रा यांच्यासोबतच क्रांती प्रल्हाद शिरसाट, चेतना कोळेकर आणि विनोद कोळेकर हे पाच जण अपघातात बेपत्ता झालेत.
कुमार विश्वास यांच्यावर गुन्हा दाखल
अमेठी- आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यासह २० जणांवर निवडणूक आचारसंहिता भंग केल्याची एफआयआर दाखल करण्यात आली.अमेठी येथील सरदार कोतवाली पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केल्याचे जिल्हा दंडाधिकारी प्रदीप कुमार यांनी सांगितले. स्थानिक प्रशासनाकडून परवानगी न घेता कुमार विश्वास यांनी वर्दळीच्या रस्त्यावर मिरवणूक काढली होती, असे यादव यांनी सांगितले. तर आपण फक्त एकच वाहन घेऊन गेलो होतो, त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला नाही, असा दावा विश्वास यांनी केला.
भाजपची दुसरी यादी जाहीर
नवी दिल्ली- भ्रष्टाचाराचे आरोप असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलेल्या बी.एस. येड्डीयुरप्पा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी ५२ जणांची यादी जाहीर केली.
भाजपने दुस-या यादीत कर्नाटक, ओदिशा, त्रिपूरा, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यातील उमेदवारांचा समावेश आहे. कर्नाटकमधून शिमोगा लोकसभा मतदारसंघातून येड्डीयुरप्पा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांना इशान्य बंगळूरूमधून, अनंत कुमार यांना दक्षिण बंगळूरूमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर पत्रकार आणि राजकारणी चंदन मित्रा यांना पश्चिम बंगालमधील हूगळी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.लोकायुक्तांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर येड्डीयुरप्पा यांनी एक ऑगस्ट २०११मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती. कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात निवडणूक लढवली होती.भाजपने २७ फेब्रुवारी रोजी ५४ जणांची यादी जाहीर केली होती. भाजपजी तिसरी यादी १३ मार्च रोजी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.









