यवतमाळ – आर्णी येथून येणारी कार अडवून चालकास बेदम मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी ४.३० वाजता भांबराजा – हिवरी मार्गावर घडली. दुर्गेश आनंद ठाकरे (४२) रा. शिवाजी नगर यवतमाळ हे इंडीगो कारने आर्णीवरून यवतमाळकडे येत होते. अशातच भांबराजा ते हिवरी रस्त्यात अचानक पाच जणांनी कार अडवली. यावेळी ठाकरे याच्यासह एकाला चाकुचा धाक दाखवून लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न केला. ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिस पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम १४७, १४९, ३४१, २९४, ५०६, ४२७, ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदिश मंडलवार करीत आहे.
Archive for March, 2014
0
यवतमाळात सात लाखाची घरफोडी

यवतमाळ – शहरातील टिळकवाडी येथील फोटो ग्राफरचे घर फोडून सात लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना गुरुवारी रात्री उजेडात आली. अश्विन आनंद वगारे रा. टिळकवाडी हे आपल्या कुटुंबीयासह कापड खरेदी करण्यासाठी गुरुवारी अमरावती येथे गेले होते. अशातच चोरट्याने घरफोडून कपाटातील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, अंगठी, पोत, चांदीचे दागिने, नगदी १० हजार रुपये असा एकुण सात लाख ५०० रुपयाचा माल चोरुन नेला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घरी परत आल्यानंतर ही घटना उजेडात आली. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी, वडगाव रोडचे ठाणेदार सुर्यकांत राऊत, डी.बी. पथकाने भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वान पथक व अंगुली मुद्रा तज्ञांना पाचारण केले होते. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्घ गुन्हा दाखल केला.
‘ड’ जीवनसत्त्वामुळे कर्करोगावर करता येते मात
शरीराला जीवनसत्त्वे अत्यावश्यक आहेत. त्यामुळे रुग्णाची प्रकृती सुदृढ राहण्याबरोबरच विविध आजारांचा सामना करता येतो. कर्करोगावर मात करण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषत: स्तनांचा कर्करोग झालेल्या रुग्णांना ‘ड’ जीवनसत्त्व दिल्यास त्यांना ते फायदेशीर ठरू शकते, असे नव्या संशोधनात आढळले आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील कुटुंब आणि प्रतिबंधात्मक औषधे विभागाचे प्राध्यापक सेड्रिक गारलॅँड यांनी या विषयावर व्यापक संशोधन केले. ज्या स्त्रियांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असते त्यांना स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असते. शरीरातील ‘हायड्रोक्सीव्हिटॅमिन डी’ हे जीवनसत्त्व शरीरात निर्माण होते. त्याचा आणि स्तनांच्या कर्करोगाचा जवळचा संबंध आहे.गारलॅँड आणि त्यांच्या सहका-यांनी ‘२५ ‘हायड्रोक्सीव्हिटॅमिन डी’ वर तब्बल नऊ वर्षे व्यापक संशोधन केले. यासाठी त्यांनी स्तनांचा कर्करोग झालेल्या ४४४३ महिलांचा अभ्यास केला. ‘ड’ जीवनसत्त्वातील घटकांमुळे कर्करोगाची वाढ पूर्णपणे थांबते. त्यामुळे ‘डी’ जीवनसत्त्व असणारे रुग्ण कर्करोगाचा सामना अधिक चांगल्या रीतीने करू शकतात. महिलांच्या रक्तात प्रति मिलीलिटर ३० नॅनोग्रॅम्स ‘हायड्रोक्सीव्हिटॅमिन डी’ आढळते. तर स्तनांचा कर्करोग असलेल्या महिला रुग्णांच्या रक्तात या जीवनसत्त्वाचे प्रमाण १७ नॅनोग्रॅम्स मिलीलिटर आढळते.स्तनांच्या कर्करोगावर पारंपरिक पद्धतीने उपचार केल्यास तो फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी ‘डी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, असे मत यूसी डिएगोमधील असोसिएट प्राध्यापक हिथर हॉफिक यांनी व्यक्त केले.औषधांसोबतच ‘ड’ जीवनसत्त्वांचा डोस दिल्यास कर्करोगावर निश्चितपणे मात करता येते. हे संशोधन अँटी कॅन्सर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
0
अमरावतीत सापडले ७६ लाख

अमरावती- निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना शहरात ७६ लाख रुपये रोख सापडल्याने महापालिकेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळीही असेच एक कोटी रुपये अमरावतीत एका वाहनातून जप्त करण्यात आलेले होते. तथापि, ही रक्कम कोणत्या उमेदवाराची, हीच चर्चा आज सर्वत्र होती. वृत्त लिहीपर्यंत या रकमेचा उद्देश व ती कुणासाठी अमरावतीत आली, याचा उलगडा होऊ शकला नाही. अर्जुननगर सीलिंग पॉइंटवर पोलिसांनी एका कारमधून ७५ लाख ६४ हजार ६०० रुपये एवढी रोख जप्त केली. चालकासह रक्कम घेऊन येणा-या तिघांना पोलिसांनी पकडले. हे तिघेही नागपूरचे आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी अशाच स्वरूपात एक कोटी रुपयांची रोख पोलिसांनी पकडलेली होती. त्या रकमेवर आजपर्यंत कोणीही दावा केलेला नसल्याने ही रक्कम आधी अनेक महिने ट्रेझरीत व त्यानंतर बँकेत पडून आहे.
0
वादग्रस्त वक्तव्यावरुन केजरीवालांचे घुमजाव

नागपूर – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी प्रसारमाध्यमे विकली गेली आहेत या आपल्या वादग्रस्त विधानावरुन आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी घुमजाव केले आहे.
नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी प्रसारमाध्यमांनी पैसे घेतले आहेत. उद्या आपचे सरकार आले तर, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन, अशा विकाऊ पत्रकारांना तुरुंगात टाकू असे वादग्रस्त वक्तव्य केजरीवालांनी नागपूर येथील कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेस, भाजप आणि सीपीआयने जोरदार टीका केल्यानंतर त्यांनी आपल्या विधानावरुन घुमजाव केले. मी असे बोललोच नाही असे सांगत केजरीवालांनी पलटी मारली.गेल्या वर्षभरापासून प्रसारमाध्यमे नरेंद्र मोदींचा प्रचार करत आहेत. काही वृत्तवाहिन्यांचा तर, आता भ्रष्टाचार संपून रामराज्य येणार अशा पध्दतीने प्रचार सुरु आहे. वाहिन्या असे का दाखवत आहेत ? कारण त्यांना मोदींचा प्रचार करण्यासाठी पैसा देण्यात आला आहे. गेल्या दहावर्षात गुजरातमध्ये ८०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या मात्र कुठल्याही वृत्तवाहिन्या या बातम्या दाखवत नाही. हा एक मोठा कट आहे उद्या आपचे सरकार आले तर अशा पत्रकारांना तुरुंगात टाकू असे वादग्रस्त विधान केजरीवालांनी या कार्यक्रमात केले होते.
0
मुंबईत सात मजली इमारत कोसळली

मुंबई – सांताक्रूझ पूर्वेला वाकोला यशवंतनगरमधील शंकरलोक ही सात मजली इमारत शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत सुधा श्रीधरन या ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस, अग्निशमन दल आणि पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरु आहे. या इमारतीचा काही भाग शेजारच्या झोपडयांवरही कोसळला आहे. त्यामुळे जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगा-याखाली अजून चार ते पाच जण अडकल्याची भिती आहे. रोहिणी जगताप(४७), अक्षय केसरकर(१८) आणि सीता केसरकर(६०) ही जखमी व्यक्तींची नावे आहेत.मुंबई महापालिकेने आधीच ही इमारत धोकादायक इमारत म्हणून जाहीर केल्याने या इमारतीतील बहुतांश कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर केले होते. फक्त दोन कुटुंबे या इमारतीत रहात होती. डिसुझा कुटुंब आणि एका वकिलाचे कुटुंब इमारतीच्या तळमजल्यावर आणि दुस-या मजल्यावर रहात होते.आतापर्यंत चार जणांना ढिगा-याखालून बाहेर काढले असून, अजून सहाजण आत अडकल्याची भिती आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात डॉकयार्ड रोड येथील मुंबई महापालिका कर्मचा-यांची इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत ६१ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. त्याआधीही मुंबई-ठाण्यामध्ये अनेक धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
0
माझी फसवणूक झाली – हजारे

नवी दिल्ली – ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा काढून घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केेले.
लोकसभा निवडणुकीसाठी आपण कोणत्याच पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना १७ मुद्दे पाठवले होते. सत्तेत आल्यानंतर आम्ही सांगितलेल्या १७ गोष्टींची अमलबजावणी करण्याचे आश्वासन बॅनर्जींनी दिले होते. तसेच देशात स्थिर सरकार यावे यासाठी बॅनर्जींना पाठिंबा द्यायचे ठरवले होते. मात्र फसवणूक होत असल्याचे दिसल्यामुळे अण्णांनी अखेर पाठिंबा मागे घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.जेव्हा मी सभेसाठी दिल्लीत पोहोचलो तेव्हा दुपारचे १२ वाजून गेले तरी दोन हजार ते अडीच हजार लोकच तेथे उपस्थित होते. माझेही आंदोलन याच रामलीला मैदानावर झाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणातील जनसमुदायाने मला पाठिंबा दिला. मात्र बुधवारच्या सभेत चार हजार लोकही उपस्थित नव्हते. या सभेसाठी माझी दिशाभूल करण्यात आली. बॅनर्जी यांच्या सभेसाठी या असे निमंत्रण मला देण्यात आले तर ममता यांना अण्णा हजारे यांच्या सभेसाठी येण्यास सांगण्यात आले. ही तर संपू्र्णपणे फसवणूक आहे, असे अण्णा म्हणाले.
0
अपंग युवतीवर सामूहिक बलात्कार

रत्नागिरी- रत्नागिरी शहरानजीक फणसोप येथे अल्पवयीन अपंग युवतीवर सहा नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांना व भावाला ठार मारण्याची धमकी देत मागील वर्षभर हा प्रकार सुरू होता. पीडित युवती चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. शहर पोलिसांनी या प्रकरणातील सहाही संशयित आरोपींना अटक केली आहे.
या बलात्कार प्रकरणी शहर पोलिसांनी दीपक वासुदेव बोरकर (४४), सचिन वासुदेव बोरकर (३५), पप्या ऊर्फ प्रसाद बळवंत फडणवीस (३८), राजू ऊर्फ शशिकांत अनंत पवार (३३), चंदन वसंत शिंदे (२३) आणि योगेश संजय मुरकर (२७, सर्व राहणार मागलाड, फणसोप) या सहा संशयित आरोपींना मंगळवारी रात्री अटक केली आहे. या सहा जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडित तरुणीच्या आईचा मृत्यू झाला असून ती वडील आणि भावासह फणसोप येथे राहते. वरील सहा जणांनी वडील आणि भावाला ठार मारण्याची धमकी देत २०१२ पासून अनेक वेळा ठिकठिकाणी बलात्कार केला. वडिलांना व भावाला ठार मारण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन युवतीने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. मात्र युवती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याने ही बाब उजेडात आली. या प्रकरणी पीडित युवतीच्या नातेवाइकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
0
दिल्ली सामूहिक बलात्कार, दोषींची फाशीची शिक्षा कायम

नवी दिल्ली (दि. १३ मार्च) – संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती रेवा खेत्रपाल आणि न्यायमूर्ती प्रतिभा राणी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीतील एका धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी मिळून निर्भयावर अत्यंत क्रूर पध्दतीने सामूहिक बलात्कार केला होता. यावेळी निर्भयासोबत असणा-या तिच्या मित्रालाही या सहाजणांनी बेदम मारहाण करुन त्या दोघांना रस्त्यावर फेकून दिले होते. गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा २९ डिसेंबर २०१२ रोजी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालय़ात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
या सहापैकी एक अल्पवयीन आरोपी होता. त्याला तीनवर्षांची शिक्षा झाली. एकाने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्महत्या केली. सप्टेंबर २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने मुकेश (२६), आकाश ठाकूर (२८), पवन गुप्ता (१९), विनय शर्मा (२०) यांना फाशीची शिक्षा सुनावली. दिल्लीतील या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाचा एक आगडोंब उसळला होता. दिल्लीतील जनता रस्त्यावर उतरली होती. जन उद्रेक लक्षात घेऊन संसदेने बलात्कारा विरोधातील कायदा अधिक कठोर केला. दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपायोजना करण्यात आल्या.
0
नवनीत कौर-राणा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई (दि. १३ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नवनीत कौर – राणा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील मुलुंड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना अमरावती मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कौर यांनी बोगस प्रमाणपत्र तयार केल्याबाबत जयंत वंजारी यांनी मुलुंड न्यायदंडाधिका-यांपुढे तक्रार केली होती. त्यावर न्यायालयाने सहा मार्चला कौर यांच्याविरोधाच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी नवनीत यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार कलम ४२०, ४६८ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे नवनीत यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. कौर यांच्या उमेदवारीबाबतही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रमाणपत्राची वैधता रद्द झाल्यास नवनीत यांची उमेदवारीही रद्द होऊ शकते.
0
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, राज्यातील सात जणांचा समावेश

नवी दिल्ली (दि. १३ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी ७१ जणांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत राज्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने गाझियाबादमधून राज बब्बर यांना उमेदवारी दिली आहे. तर अभिनेत्री नगमा यांना मेरठमधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने याआधी १९४ जणांची पहिली यादी जाहीर केली होती.
काँग्रेसने जाहीर केलेल्या दुस-या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. जालन्यातून विलास औताडे यांना, हिंगोलीतून राजीव सातव यांना, भिवंडीतून विश्वनाथ पाटील, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी, हातकणंगलेमधून काल्लापा अवाडे, वर्ध्यातून सागर मेघे, अकोल्यातून हिदायत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राज्यातील पुणे, नांदेड आणि औरंगाबाद या जागांवरील उमेदवार काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाहीत.
0
…तर मराठी चित्रपट मोठा होईल – अभिनेत्री मृणाल कुळकर्णी

यवतमाळ (दि. १३ मार्च) – कोणतेही कथानक, सामाजिक संदेश नसताना अनेक हिंदी चित्रपट हिट होतात. मात्र चांगल्या कथानक असलेले मराठी चित्रपट हिट होत न होता पडतात. प्रेक्षकांनी ठरविले तरच मराठी चित्रपट मोठा होऊ शकतो असे, मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘विंग्ज’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी यवतमाळात आल्या असता, त्या पत्रकार परिषदेत बोलत
होत्या. मी कथा लिहिलेला ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’हा पहिला चित्रपट तर ‘राजा की आयेगी बारात’ हा नकारात्मक भूमिका असलेला एकमेव चित्रपट आहे. २२ हिंदी मालिकांत काम केल्याचे सांगून मराठी चित्रपट क्षेत्रातच पुष्कळ काम असल्याने हिंदी चित्रपट आणि मालिका यांना देण्यासाठी माझ्याकडे आता वेळ नसल्याचे त्या म्हणाल्या. खर्च परवडत नसल्याने मराठी चित्रपटाची जाहिरात हिंदीच्या तुलनेत नगण्य आहे. मराठीत चांगल्या कथा असल्यानेच गेल्या पाच वर्षांत तीन चित्रपट आॅस्करसाठी गेल्याचे सांगून आज मराठी चित्रपट तयार करताना कोणत्या विषयावर आणि कोणत्या वर्गावर बनवायचा, हा मोठा प्रश्न पडत असल्याची चिंता व्यक्त केली. मराठी चित्रपट चालावे यासाठी शासनाने प्रत्येक सिनेमागृहात एक शो प्राईम टाईममध्ये दाखवावा, अशी मागणी यावेळी कुळकर्णी यांनी केली.यावेळी पत्रकार परिषदेला जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव शीतल वातीले उपस्थित होते़.
युवतीची राजस्थान येथे विक्री, चार अटकेत
पांढरकवडा (दि. १३ मार्च )- तालुक्यातील वागदा येथील युवतीला पळवून राजस्थान येथे विक्री करणाºया चार आरोपींना अटक केली. सुंदराबाई माणिक गुंजेकार, आनंद रामाजी काकडे, सुनील रंजन सिंग ठाकुर, शोभा सुनील ठाकुर सर्व रा. रंगारीपूरा वणी अशी आरोपींची नावे आहे. आरोपी सुदराबाई वागद येथील एका व्यक्तीकडे पाहुणी म्हणून आली होती. ५ मार्च रोजी वागद येथील २० वर्षीय युवतीला पळवून नेले. आई-वडीलांनी मुलगी घरी नसल्याने तीची शोधमोहीम सुरु केली. मात्र तीचा कुठलाही थांगपत्ता न लागल्याने पांढरकवडा पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३६६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोबाईल लोकेशवरून सुंदरा हीला वर्धा येथे अटक करून चौकशी सुरु केली. तसेच आनंद, सुनील, शोभा या तीन आरोपींना अटक केली. पळवून नेलेल्या युवतीची राजस्थान येथे विक्री केल्याची माहिती समोर आली असून तीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
कारसह देशी दारु जप्त
यवतमाळ (दि. १३ मार्च) – धामणगाव मार्गावरील मोहा फाटा येथे जाणारी अवैध देशीदारु व कार उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने बुधवारी रात्री १०.३० वा. जप्त करून एका आरोपीला अटक केली. अक्षय रमेश जयस्वाल (३०) रा. मोहा फाटा पुनर्वसन असे आरोपीचे नाव आहे. अक्षयने अप्सरा टॉकीज जवळील मेट्रो वाईन्समधून १९ पेट्या देशी दारु विकत घेतल्या. त्यानंतर अवैधपने देशी दारुच्या पेट्या घेऊन कारने(एम.एच.२६ / सि ३८३९) मोह्याकडे जात होता. याबाबतची गुप्त माहिती यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने रात्री ११.३० वाजता लकडगंज जवळ सदर कार अडवून झडती घेतली. त्यामध्ये ३० हजार रुपयाची दारु आढळल्याने कार, देशी दारु जप्त करून अक्षयला अटक केली. तसेच मेट्रो वाईन्सच्या मालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, जमा. राहुल मनवर, इकबाल शेख, तुषार नेवारे, संतोष मडावी, प्रमोद मडावी, विजय जाधव, वसीम शेख यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
यवतमाळ (दि. १३ मार्च) – लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी निवडणूक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शंभर मीटर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
या आदेशान्वये परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही. मोबाईळ फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेऊन परिसरात प्रवेश करता येणार नाही. शांतता व सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य करता येणार नाही. अनधिकृत व्यक्ती व वाहनास प्रवेशास बंदी राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
0
केंद्रीय समितीकडून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
नुकसानीचा घेतला आढावा
यवतमाळ (दि.१३ मार्च)- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस व गारपीट होत आहे. या गारपीटीत जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आज जिल्ह्यात आलेल्या केंद्र शासनाच्या एक सदस्यीय समितीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच ठिकठिकाणी नुकसानग्रस्त शेतकºयांशी चर्चा करुन नुकसानीचा आढावा घेतला.
गेले काही दिवस सतत झालेला पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या समित्या विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरुन पाहणी करीत आहे. यामध्ये केंद्रीय जल आयोगाचे संचालक असलेले डॉ.डी.एम.रायपुरे यांच्या एक सदस्यीय समितीने आज जिल्ह्यात विविध भागांना भेटी देवून पाहणी केली. डॉ. रायपुरे यांनी विश्रामभवन येथे अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह उपविभागीय अधिकाºयांसोबत बैठक घेवून नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर आर्णी, दिग्रस, दारव्हा व नेर यातालुक्यातील काही गावांना भेटी देवून प्रत्यक्ष पाहणी केली. आर्णी तालुक्यातील काठोडा येथे दिगांबर एकघरे यांच्या शेतातील खराब झालेल्या हरभरा पिकाची पाहणी केली. दिग्रस तालुक्याती तुपटाकळी येथे विष्णू ठाकरे, दीपक आनंदवार या शेतºयांचे गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी पिकांची पाहणी करण्यासोबतच शेतकºयांसोबत चर्चा दारव्हा तालुक्यात पळशी येथे भेट दिल्यानंतर गारपीटीत जनावरे दगावलेल्या शेतकºयांशी त्यांनी संवाद साधला. लाख खिंड येथे अन्नाजी चौधरी यांच्या संत्रा पिकाच्या नुकसानीची पहाणी डॉ.रायपुरे यांनी केली. त्यानंतर नेर विश्रामभवन येथे तालुक्यातील नुकसानीची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर समिती अमरावती जिल्ह्याकडे रवाना झाली.
0
देशी पिस्टल जप्त

यवतमाळ – नेताजी मार्केटमध्ये देशी पिस्टल घेऊन फिरणाºया युवकाला मंगळवारी रात्री टोळी विरोधी पथकाने अटक केली. अतुल मारोतराव पानसे (२१) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी असे अटक केलेल्या युवकाने नाव आहे. आज रात्री तो नेताजी मार्केटमध्ये देशी बनावटीची पिस्टल घेऊन फिरत होता. या बाबतची गुप्त माहिती टोळी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून सापळा रचून अतुल याला अटक करून त्याच्याकडून तीन राऊंडचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले. तो पिस्टल घेऊन कसासाठी फिरत होता हे अजुनही उघड झाले नाही. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी विरोधी पथकाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक वसंत मडावी, सैय्यद साजीद, सुनिल खंडागळे, रुपेश पाली, बबलु चव्हाण, प्रशांत हेडाऊ, बबलु चंदन, सुरेंद्र वाकोडे, रवी आडे यांनी केली.
महादेव मंदिरात महिलेची आत्महत्या
यवतमाळ – शहरातील महादेव मंदिर परिसरात जलकुंभात उडी घेऊन एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. ४५ वर्षीय अनोळखी महिलेने विष प्राशन करून जलकुभात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून वृत्त लिहेपर्यंत ओळख पटली नव्हती.
तीन चोरट्यास अटक
यवतमाळ – शहरात झालेल्या घरफोडीप्रकरणात तीन आरोपींना जिल्हा विशेष पथकाने आज सायंकाळी अटक केली. दोन गुन्ह्याची आरोपींनी कबुली दिली.
योगेश रोढे (२३), जगदिश दांडगे (२१), विकास धुमाळ (१९) सर्व रा. संकटमोचन रोड अशी आरोपींची नावे आहे. काही महिन्या अगोदर उमरसरा परिसरात अनेक चोरीच्या घटना घडल्या. या प्रकरणात सदर आरोपींनी केल्याची गुप्त माहिती जिल्हा विशेष पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. त्याच्याकडून पाच सिलेंडर, एक मोबाईल आदि साहित्य जप्त केले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू वटाणे, जमा. विजय डबले, ऋषी ठाकुर, गजानन डोंगरे, विशाल भगत, भोजराज करपते, मंगेश आजने, अतुल इंगळे, मयुरी मांगुळकर यांनी केली.
घाटी येथे पाच लाखाची घरफोडी
घाटंजी – चोरटयाने बंद घर फोडून पाच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना सोमवारी रात्री घाटी (घाटंजी) येथे घडली. मोहम्मद आसिफ अब्दुल रसीद हे आपल्या कुटुंबीयासह मोठ्या वडीलाचा मृत्यू झाल्याने अत्यसंस्कारासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने मोहम्मद आसिफ याच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व एक लाख रुपये रोख असा एकुण पाच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. गावावरून परत आल्यानंतर हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला. अधिक तपास पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल पुरळकर करीत आहे.










