पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2014

 लोकसभा निवडणुक   ७ एप्रिलपासून 0

लोकसभा निवडणुक ७ एप्रिलपासून

images.jpeg1

 नवी दिल्ली – दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना वेध लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले. ७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत नऊ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी महाराष्ट्रात मतदान होईल. ही देशाच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चालणारी निवडणूक ठरणार आहे.राजधानीतील विज्ञान भवन येथे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी सहकारी निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा आणि डॉ. नसीम झैदी यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन या तारखा जाहीर केल्या.

एकूण टप्पे : नऊ
 पहिला टप्पा: ७ एप्रिल, दोन राज्ये, ६ मतदारसंघ
आसाममध्ये ५ मतदारसंघ, त्रिपुरामध्ये १ मतदारसंघ
दुसरा टप्पा: ९ एप्रिल, पाच राज्ये, ७ मतदारसंघ
मिझोरोमध्ये १ मतदारसंघ, अरुणाचल प्रदेशात २ मतदारसंघ, मणिपूरमध्ये १ मतदारसंघ, मेघालयमध्ये २ मतदारसंघ, नागालँडमध्ये १ मतदारसंघ
 तिसरा टप्पा: १० एप्रिल, १४ राज्ये, ९२ मतदारसंघ
अंदमान निकोबारमध्ये १ मतदारसंघ, बिहारमध्ये ६ मतदारसंघ, छत्तीसगडमध्ये १ मतदारसंघ, चंदिगडमध्ये १ मतदारसंघ, हरयाणात १० मतदारसंघ, जम्मू-काश्मीरमध्ये १ मतदारसंघ, झारखंड ५ मतदारसंघ, केरळमध्ये २० मतदारसंघ, लक्षद्विपमध्ये १ मतदारसंघ, मध्य प्रदेशमध्ये ९ मतदारसंघ, महाराष्ट्रात १० मतदारसंघ, दिल्लीतील ७ मतदारसंघ, ओरिसातील १० मतदारसंघ, उत्तर प्रदेशात मतदारसंघ
 चौथा टप्पा: १२ एप्रिल, तीन राज्ये, ५ मतदारसंघ
आसामध्ये ३ मतदारसंघ, सिक्किममध्ये १ मतदारसंघ, त्रिपुरामध्ये १ मतदारसंघ
पाचवा टप्पा: १७ एप्रिल, १३ राज्ये, १२२ मतदारसंघ
बिहामध्ये ७ मतदारसंघ, छत्तीसगडमध्ये ३ मतदारसंघ, गोव्यात २ मतदारसंघ, जम्मू-काश्मीरमध्ये १ मतदारसंघ, झारखंडमध्ये ५ मतदारसंघ, कर्नाटकात २८ मतदारसंघ, मध्य प्रदेशात १० मतदारसंघ, महाराष्ट्रात १९ मतदारसंघ, मणिपूरमध्ये १ मतदारसंघ, ओरिसामध्ये ११ मतदारसंघ, राजस्थानमध्ये २० मतदारसंघ, उत्तरप्रदेशात ११ मतदारसंघ, प.बंगालमध्ये ४ मतदारसंघ.
 सहावा टप्पा: २४एप्रिल, १२ राज्ये, ११७ मतदारसंघ
आसाममध्ये ६ मतदारसंघ, बिहारमध्ये ७ मतदारसंघ, छत्तीसगडमध्ये ७ मतदारसंघ, जम्मू-काश्मीरमध्ये १ मतदारसंघ, झारखंडमध्ये ४ मतदारसंघ, मध्य प्रदेशात १० मतदारसंघ, महाराष्ट्रात १९ मतदारसंघ, पाँडेचरीत १ मतदारसंघ, राजस्थानमध्ये ५ मतदारसंघ, तामिळनाडूत ३९ मतदारसंघ, उत्तर प्रदेशात १२ मतदारसंघ, प. बंगालमध्ये ६ मतदारसंघ.
सातवा टप्पा: ३० एप्रिल, ९ राज्ये, ८९ मतदारसंघ
आंध्र प्रदेशात १७ मतदारसंघ, बिहारमध्ये ७ मतदारसंघ, दादरा-नगर हवेलीमध्ये १ मतदारसंघ, दीव-दमणमध्ये १ मतदारसंघ, गुजरातमध्ये २६ मतदारसंघ, जम्मू काश्मीरमध्ये १ मतदारसंघ, पंजाबमध्ये १३ मतदारसंघ, उत्तर प्रदेशात १४ मतदारसंघ, प. बंगालमध्ये ९ मतदारसंघ.
आठवा टप्पा: ७ मे, १२ राज्ये, ६४ मतदारसंघ
आंध्र प्रदेशमध्ये २५ मतदारसंघ, बिहारमध्ये ७ मतदारसंघ, हिमाचलमध्ये ४ मतदारसंघ, जम्मू-काश्मीरमध्ये २ मतदारसंघ, उत्तर प्रदेशमध्ये १५ मतदारसंघ, उत्तराखंडमध्ये ५ मतदारसंघ, प. बंगालमध्ये ६ मतदारसंघ.
नववा टप्पा: १२ मे, ३ राज्ये, ४१ मतदारसंघ
बिहारमध्ये ६ मतदारसंघ, उत्तर प्रदेशमध्ये १८ मतदारसंघ, प. बंगालमध्ये १७ मतदारसंघ

मतमोजणी : १६ मे रोजी
…………………………..

March 05, 2014 in देश-विदेश

AAP – BJP कार्यकर्ते भिडले

 

नवी दिल्ली – दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान दगडफेक झाली. यावेळी आपमधील अनेक मोठे नेतेही उपस्थित होते. गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांचा ताफा अडवल्याचा निषेध करत ‘आप’ च्या संतप्त कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.
रोड शोसाठी परवानगी न घेतल्याने निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं कारण देत अरविंद केजरीवाल यांना गुजरातमध्ये राधनपुर इथं आज दुपारी ताब्यात घेण्यात आलं. चौकशीनंतर केजरीवालांना सोडून देण्यात आलं. पण गुजरातमधील नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने प्रशासनाला हाताशी धरत केजरीवालांना ताब्यात घेतल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. गुजरातमधल्या घटनेनंतर दिल्लीत आपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. भाजपच्या कार्यालयावर दगडफेकही कऱण्यात आली. यावेळी आपचे मोठे नेतेही उपस्थित होते. आपच्या कार्यकर्त्यांच्या दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही तिथं दाखल झाले. आणि यावेळी दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक झाली. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. यावेळी भाजप कार्यालयातून कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली, असा आरोप आपच्या नेत्या शाजिया इल्मी यांनी केला आहे. तर हा दहशतवादी हल्ल्याचा प्रकार असल्याचं सांगत आपचे नेते राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जावू शकतात, असं प्रत्युत्तर भाजप नेत्यांनी दिलं.

March 05, 2014 in देश-विदेश

पतीनेच केला पत्नीचा खून, कमला आत्राम मृत्यू प्रकरण

पांढरकवडा – ११ दिवसापूर्वी ताडउमरी शिवारातील मृतदेह आढळलेल्या महिलेच्या खूनाचा उलगडा झाला. दारुपिऊन विवस्त्र नाचत असल्याने पतीनेच तीचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
रामदास आत्राम रा. शाम नगर असे आरोपीचे नाव आहे. ताडउमरी शिवारात पटेल यांच्या शेतात  कमला रामदास आत्राम या महिलेचा मृतदेह २१ फेबु्रवारी रोजी आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. महिलेचा मृत्यूबाबत शहरात उलट सुलट चर्चेला उधान आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. अशातच कमलाचा खून तीच्या पतीनेच केल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची शोधमोहीम सुरु केली. दरम्यान काल रात्री  रामदासला अटक केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. १६ फेबु्रवारी रोजी रामदासने घरी मटन आणून दिले व बाहेर गेला. काही तासानंतर घरी परत येताच पत्नी कमला ही दारुच्या नशेत विवस्त्र नाचत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राग अनावर झाल्याने लाथा बुक्कयाने मारहाण केल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच आरोपीने तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर दुसºया दिवशी मृतदेह खांद्यावर घेऊन ताडउमरी शिवारातील पटेल यांच्या शेतात फेकुन विल्हेवाट लावल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्या मागर्दशनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राखी गेडाम यांनी केली.

युवकावर प्राणघातक हल्ला

यवतमाळ  – शेतातून घराकडे परत येत असताना युवकावर कुºहाडीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी भांबराजा येथे घडली. सुरेश परसराम चव्हाण (२५) रा. भांबराजा असे जखमी युवकाचे नाव आहे. ३ मार्च रोजी तो गावातीलच एका शेतकºयांच्या शेतात तुºहाट्या आणण्यासाठी गेला होता.तुºहाट्या न मिळाल्याने तो घराकडे परत येत होता. अशातच आरोपी संतोष आडे (३०) याने दारुच्या नशेत कुºहाडीने सुरेशच्या डोक्यावर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आरोपी संतोषविरूद्घ भादंवि कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने करीत आहे.

जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वाढते मधुमेहाची शक्यता

अलिकडेच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ज्या स्थूल व्यक्तींमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो. स्थूलपणामुळे मधुमेहाची शक्यता वाढते ही बाब तर सर्वज्ञातच आहे. त्याचबरोबर जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण हे देखील मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास इंशुलिनचे प्रमाण असंतुलित करणाऱ्या या आजाराची शक्यता अधिक बळावते असे या नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.  डायबेटिस केअर या नियतकालिकामध्ये या अभ्यासातून प्राप्त झालेले निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहे.  इंशुलिनचे असंतुलन हे मधुमेहाची पूर्वसूचना देणारे महत्वाचे लक्षण आहे.
उपरोल्लेखित अभ्यासाकरिता वैज्ञानिकांनी जवळपास ६००० व्यक्तींच्या प्रकृतीविषयक माहितीचा अभ्यास केला. त्यामध्ये असे आढळले की ज्या व्यक्ती स्थूल आहेत मात्र त्यांच्या शरीरामध्ये जीवनसत्वाचे प्रमाण उत्तम आहे त्यांच्यात सर्वसाधारण प्रकृतीच्या व्यक्तींच्या तुलनेत इंशुलिन असंतुलनाची शक्यता वीसपटीने अधिक होती. मात्र स्थूलपणा आणि जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण ही दोन्ही लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये हीच शक्यता ३२ पटींनी अधिक असल्याचे दिसून आले.
पेनिसिल्व्हानिया येथील ड्रेक्सेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी याबाबत माहिती देताना सांगितले की जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण आणि स्थूलपणा ही इंशुलिनचे असंतुलन आणि मधुमेह या दोन्ही समस्यांची स्वतंत्र कारणे आहेत. मात्र आम्ही केलेल्या अभ्यासातून प्राप्त झालेल्या निष्कर्षांनुसार हे दोन घटक स्वतंत्रपणे इंशुलिनच्या असमतोलास ज्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतात त्यापेक्षा या दोन घटकांच्या एकत्र येण्याने ही शक्यता कितीतरी अधिक प्रमाणात वाढु शकते.
या क्षेत्रातील तज्ञांच्या मते जर या अभ्यासाचे निष्कर्ष स्वीकारण्यायोग्य असतील तर मधुमेहाचे बहुतांश रूग्ण हे  औषधांबरोबर किंवा औषधांशिवाय केवळ जीवनसत्वाचे वार्षिक इंजेक्शन घेऊन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकतील.
नोव्हा स्पेशालिटी सर्जरीचे वरिष्ठ बॅरिऐट्रिक सर्जन डॉ.रमन गोएल यांनी याविषयी बोलताना म्हंटले, आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आणि दूधदेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र तरीही आपल्या देशातील ६० ते ७० टक्के नागरिकांमध्ये जीवनसत्वाची कमतरता असल्याचे आढळते ही बाब देखील सर्वज्ञात आहे. मला असे वाटते की जीवनसत्वाची कमतरता हे मधुमेह होण्याचे कारण ठरण्यापेक्षा मधुमेहाचे प्रमाण वाढविणारा एक घटक ठरेल.  मधुमेहाच्या सुरूवातीच्या टप्प्यामध्ये किंवा ज्यांच्याकडे कुटुंबातील अन्य व्यक्तींना मधुमेह असेल अशा व्यक्तींसाठी जीवनसत्वाचे प्रमाण योग्य आहे याकडे लक्ष देणे आणि त्या अनुषंगाने उपाय करणे यासारख्या गोष्टींमुळे मधुमेहाचा आजार लांब ठेवता येईल किंवा हा आजार टाळता येऊ शकेल.
डॉ.गोएल यांनी पुढे सांगितले, आमच्याकडे बॅरिऐट्रिक सर्जरी करण्यासाठी आलेल्या रूग्णांपैकी ३५ टक्क्यांपेक्षा अधिक रूग्णांमध्ये टाईप २ या प्रकारचा मधुमेह आढळतो. जवळजवळ त्या सर्वांमध्येच जीवनसत्वाची कमतरता असल्याचेही दिसून येते. शस्त्रक्रिया केल्यानंतर आणि जीवनसत्वाची पूरक जोड दिल्यानंतर या शस्त्रक्रियेच्या पश्चात मधुमेहाचे प्रमाण कमी होण्यासाठी शस्त्रक्रिया आणि जीवनसत्वाच्या प्रमाणात झालेली सुधारणा यांचे परस्पर योगदान किती असेल हे पडताळून पाहणे ही निश्चितच एक कुतुहलाची बाब ठरेल.स्थूल व्यक्तींमध्ये इंशुलिनचे असंतुलन आणि मधुमेहाची शक्यता कमी होण्यासाठी पूरक औषधे उपयोगी ठरतील की नाही हे निश्चित करण्याकरिता याविषयी अजून संशोधन करण्याची गरज आहे असेही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.

March 04, 2014 in एनजीओ
लोकसभा निवडणुकीची घोषणा बुधवारी 0

लोकसभा निवडणुकीची घोषणा बुधवारी

images.jpeg1 images.jpeg2
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची घोषणा बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ पत्रकार परिषदेत करणार आहेत. या घोषणेनंतर आदर्श आचारसंहिता लागू होईल. मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन निवडणूक आयुक्त पत्रकार परिषदेत देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिलच्या दुस-या आठवड्यात मतदानाची प्रक्रिया सुरु होईल. तसेच सहा टप्प्यात संपूर्ण देशातील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीमध्ये तब्बल ८१ कोटी जनता मतदानाचा हक्क बजावू शकतील. याआधी २००९मध्ये सहा टप्प्यात १६ एप्रिल ते १३ मे या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या होत्या.सध्याच्या लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत असल्याने नवी लोकसभा एक जून रोजी अस्तित्वात येणे आवश्यक आहे.या लोकसभा निवडणूकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांची घोषाण केली जाईल. तसेच देशातील नक्षलग्रस्त असलेल्या ३५ जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीत प्रथमच मतदारांना मतदान केल्याची पावती मिळणार आहे. देशातील काही मतदान केंद्रामध्ये प्रायोगीक तत्त्वावर हा प्रयोग केला जाणार आहे.

March 04, 2014 in देश-विदेश
सुब्रतो रॉय तिहार तुरुंगात 0

सुब्रतो रॉय तिहार तुरुंगात

subrato-roy
नवी दिल्ली –  सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला यापुढे आदेशांचे पालन करण्याची खात्री देतानाच, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी आणखी मुदत वाढवून मागितली आहे.
सहारा आपली संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करेल. उद्यापासून संपतीच्या विक्रीला सुरुवात होईल असे सुब्रतो रॉय यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करण्यासाठी मला आणखी एक संधी द्या. यापुढे संधी मिळूनही मी अपयशी ठरलो तर, स्वत: न्यायालयासमोर शिक्षा भोगण्यासाठी हजर होईन असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.  मात्र न्यायालयाला सुब्रतो रॉय यांचा प्रस्ताव पटला नाही.  त्यांच्याकडून ठोस प्रस्ताव येईपर्यंत त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने  सहाराने गेल्या दीडवर्षात गुंतवणूकदारांचे पैसे परत का केले नाहीत ? सहारा प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे का देत आहे असे प्रश्न विचारले. सहारा समूहाच्या संपत्तीची विक्री ही कंपनीची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे त्याच्याशी देणेघेणे नाही. फक्त आदेशाचे पालन करुन घेणे ही आमची जबाबदारी आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.२६ फेब्रुवारीच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल सुब्रतो रॉय यांनी न्यायालयाची माफी मागितली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची माफी मंजूर केली. मात्र त्यांची सुटका केलेली नाही. पुढील सुनावणीपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयासमोर हजर करण्यासाठी नेत असताना, न्यायालयाच्या आवारात एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर काळी शाई फकेली. मनोज शर्मा असे शाई फेकणा-या व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  शाई फेकल्यानंतर सुब्रतो रॉय यांच्या समर्थकांनीत्याला बेदम मारहाण केली.

March 04, 2014 in देश-विदेश
बलात्काराच्या तपासणीसाठी नवी मार्गदर्शकतत्वे 0

बलात्काराच्या तपासणीसाठी नवी मार्गदर्शकतत्वे

index.jpeg1
नागपूर – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बलात्कार पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बलात्कारानंतर होणारी वैद्यकीय तपासणी हा पीडित महिलेसाठी एक धक्कादायक अनुभव असतो.
या बदलांनंतर वादग्रस्त टू फिंगर चाचणी बंद होणार आहे. बलात्कार पीडित महिलेच्या उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्वे आखली आहेत. या मार्गदर्शकतत्वानुसार आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक रुग्णालयाला बलात्कार पीडित महिलेच्या न्यायवैद्यक आणि वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.आरोग्य संशोधन विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आणि तज्ञांनी मिळून ही राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. पीडित महिलेला बलात्काराच्या आघातातून सावरण्यास मदत व्हावी यासाठीही आरोग्य संशोधन विभागाने मार्गदर्शकतत्वे आखली आहेत. यामध्ये समुपदेशनाचा समावेश आहे.

March 04, 2014 in महाराष्ट्र
जगातील धोकादायक देशात भारत तिस-या क्रमांकावर 0

जगातील धोकादायक देशात भारत तिस-या क्रमांकावर

index
नवी दिल्ली- जगभरात झालेल्या बॉम्बस्फोटांची आकडेवारी पाहिली असता भारत हा जगात तिस-या क्रमांकाचा सर्वात धोकादायक देश ठरला आहे. राष्ट्रीय बॉम्ब डेटा केंद्राच्या पाहणीत इराक पहिला तर पाकिस्तान दुस-या क्रमांकावर आहे.या अहवालात म्हटल्याप्रमाणे, जगभराचा विचार केल्यास जगातील ७५ टक्के बॉम्बस्फोट हे इराक, पाकिस्तान आणि भारतात झाले आहेत.
भारतात २०१३ मध्ये अफगाणिस्तानच्या दुप्पट म्हणजे २१२ बॉम्बस्फोट झाले. यात १३० जणांचा मृत्यू आणि ४६६ जण जखमी झाले. तर अधूनमधून चर्चेत असणा-या अफगाणिस्तानात मात्र वर्षभरात १०८ बॉम्बस्फोट झाले. तर अंतर्गत धूसफूस असणा-या बांगलादेशात ७५ आणि सिरीयात ३६ बॉम्बस्फोट झाले. तर २०१२ मध्ये भारतात २४१ बॉम्बस्फोट झाले होते. यात ११३ जणांचा मृत्यू आणि ४१९ जण जखमी झाले होते. मागिल २००४ पासून २०१३ पर्यंतचा रेकॉर्ड पाहिला असता भारतात दरवर्षी सरासरी २९८ वेळा बॉम्बस्फोट झाले. यात एक हजार ३३७ निरपरांधाना नाहक बळी गेला. मागच्या पाच वर्षाचा अफगाणिस्तानमधील बॉम्बस्फोटांचा अहवाल पाहता यातही भारताच सर्वाधिक बॉम्बस्फोट झाल्याचे दिसून येते. अफगाणिस्तानात मागच्या पाच वर्षात सरासरी २०९ बॉम्बस्फोट झाले.
भारतात आसाम आणि मणिपूरसह ईशान्य भारत तसेच बिहार, छत्तीसगढ आणि झारखंड येथे सर्वाधिक बॉम्बस्फोट झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. मागच्या वर्षभरात सुमारे ८० टक्के बॉम्बस्फोट या परिसरात झाले. तर २०१२ मध्ये सुमारे ५० टक्के बॉम्बस्फोट जम्मू- काश्मीरमध्ये झाले होते.जम्मू- काश्मीर, झारखंड, मेघालय, पश्चिम बंगाल, नागालँड आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बॉम्बस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. तर मणिपूर, बिहार, छत्तीसगढ, आसाम, तामिळनाडू, ओदिशासह अन्य १५ राज्यांमध्ये बॉम्बस्फोटांचे प्रमाण घटल्याचे या अहवालात म्हटले आहे.

March 04, 2014 in देश-विदेश
‘लोकशासन’ मोर्चा तहसीलवर धडकला 0

‘लोकशासन’ मोर्चा तहसीलवर धडकला

DSC08391

यवतमाळ –  केंद्र व राज्य शासनाने जाहर केलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व्हावी, भुमिहीन,शेतकरी, शेतमजुरांच्या विविध समस्या निकाली काढावी यासह विविध मागण्यासाठी ‘लोकशासन आंदोलन’ संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक दिली. न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले असून तहसील प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व विकासााची समान संधी मिळवून देणे हे केंद्र व राज्य शासनाच्या मुलभूत कर्तव्य आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करवून घेणे ही सत्ताधारी व विपक्षांची जबाबदारी होती. मात्र त्यांनी कल्याणकारी योजना राबवून घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. केंद्रसरकारने भूमिहीनांना जमिन देण्याचे मान्य केले होते. मात्र महाराष्टÑताील केंद्रीय मंत्री या योजनांना विरोध करीत होते. कल्याणकारी योजना राबविण्यात देश पातळीवर अत्यंत खालच्या क्रमांकावर आहे असा आरोप न्या. पाटील यांनी केला. शेतकरी, शेतमजुर, भूमिहीन, अल्पभूधारक, विधवा, परितक्त्या घटस्फोटीत, अपंग निराधा, वृद्घांना विविध समस्तेतून गरीबांची मुक्ता व्हावी यासाठी ‘लोकशासन आंदोलन’ संघटनेने येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी दारिद्रय रेषेच्या यादीतून वगळण्यात आले त्यांचा या यादीत समावेश करावा, अन्नसुरक्ष कायद्याप्रमाणे कुटूंबातील प्रत्ये व्यक्तीला पाच किलो धान्य मोफत द्यावे, ठरावीक मुदतीत दारिद्र रेषेच्या यादीत समावेश केला नाही तर सबंधिता अधिकाºयावर दप्तर दिरंगाई कायद्याने कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. या मोर्चाने तहसील प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांकडून पिवळे रेशन कार्डसाठी अर्ज भरून तहसीलदारांच्या स्वाधिन केले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकशाही दिनात ७४ तक्रारी

यवतमाळ- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांनी विविध विभागाशी संबंधित ७४ तक्रारी प्राप्त झाल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यकायर्कारी अधिकारी, तसेच अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. यावेळी मागील लोकशाही दिनातील ४० तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.आज लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी दाखल झालेल्या ७४ तक्रारीमध्ये महसुल विभागाच्या २३, जिल्हा परिषद २७, पाटबंधारे ६, भुमी अभिलेख ३, वनविभा्ग ३, महाराष्ट्र राज्य विज वितरण २, सहकार २, नगर परिषद १, सार्वजनिक बांधकाम १, जिवन प्राधिकरण १, व इतर विभागाच्या दोन तक्रारींचा समावेश होता. प्रलंबित तक्रारींचा तातडीने निपटारा करावा असे निर्देश लोकशाही दिनाच्या कामकाज प्रसंगी संबंधित खाते प्रमुखांना देण्यात आले. या लोकशाही दिनाच्या कामकाजास इतर विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.

आमदार पुत्राच्या वाहनाची दुचाकीला धडक , एक ठार

 

वणी (यवतमाळ)- तालुक्यातील विकास कामाच्या भूमी पूजनाकरीता घोन्सा या गांवाकडे जात असलेल्या आमदाराच्या ताफ्यातील आमदार पुत्राच्या वाहनाची दुचाकीला धडक लागून ३५ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना दि़३ मार्चला दुपारी ११ वाजताच्या दरम्यान घडली़.
आचार संहितेचा धसका घेवून विद्यमान आमदारांनी विकास कामाच्या भूमीपूजनाचा धडाका लावला आहे़ एकाच दिवशी अनेक गांवात भूमी पूजन असल्याने वेळेत पोहचण्याची घाई आमदारासह कार्यकर्त्यांना झाली आहे़ यामुळे भरधाव वेगाने वाहने चालविण्याची वेळ त्यांचावर येवून ठेपली़ यामुळेच रासा गांवाजवळ निष्पाप वेकोली कर्मचाºयाला आपला जीव गमवावा लागला़
येनक गांवातील युवक वेकोलीच्या कुंभारखाणी वसाहतीत वास्तव्यास आहे़ तो व त्याचा मित्र दुचाकी क्ऱएमएच ३४ एएच २३०१ या वाहनाने वणीकडे कामानिमित्त जात असतांना विरुध्द दिशेने भरधाव वेगात येत असलेले आमदार पुत्राचे बोलेरो वाहन क्ऱएमएच २९ एडी ५०५ हे रासा येथील वरारकर यांच्या शेताजवळील वळणावर अचानक पुढे आल्यामुळे दुचाकी चालक साईनाथ ठाकरे याने करकच्चून ब्रेक मारला़ मागे बसलेले गंगाधर रामू सोनटक्के उसळून चारचाकी वाहनापुढे पडल्याने ते चिरडल्या गेले़ गंभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले़ तर वाहन चालक प्रशांत वल्लपकर यांचेवर पोलीसांनी भादवी कलम २७९, ३०४ अ, अन्वये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली़
यावेळी ग्रामीण रुग्णालयासमोर वेकोली युनियनचे सदस्य व मृतकाच्या नातेवाईकांनी आर्थीक मोबदला मिळाल्याशिवाय शवविच्छेदन करु देणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही वेळ ग्रामीण रुग्णालयासमोर वातावरण संतत्प झाले होते़.

 

 

एप्रिलच्या दुस-या आठवडयात लोकसभेचा रणसंग्राम ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी कुठल्याही दिवशी अचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी विकासकामाच्या उदघाटनाचा धडाका लावला आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या दुस-या आठवडयापासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे.
७ ते १० एप्रिलदरम्यान पहिल्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकते. यंदा प्रथमच सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीची २००९ ची लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये झाली होती.निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, या आठवडयातच लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. संवेदनशील नक्षलग्रस्त भागांमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान होऊ शकते. आंध्रप्रदेश, नव्या अस्तित्वात आलेल्या तेलंगणमध्ये लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणूका होऊ शकतात. लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण देशभरात आठ लाख मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

March 03, 2014 in देश-विदेश

न्यायालयाच्या आवारात गोळीबार, ११ जणांचा मृत्यू

इस्लामाबाद – पाकिस्तानी लष्कराने वझरिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात मोहिम उघडल्यानंतर दहशतवाद्यांनीही पाकिस्तानात रक्तपातास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी एका दहशतवाद्याने इस्लामाबादमधील स्थानिक न्यायालयाच्या आवारात अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात न्यायाधीश रफाकत अवान यांच्यासह अकराजणांचा मृत्यू झाला आहे. २५ जण जखमी झाले आहेत.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा पथके पाठवण्यात आली आहेत. हा दहशतवादी अजूनही न्यायालयाच्या आवारात असून, पाकिस्तानी रेंजर्सनी न्यायालयाच्या परिसराला वेढा घातला असून, शोध मोहिम सुरु आहे. हल्लेखोराने दोन ग्रेनेडचाही वापर केला.

March 03, 2014 in देश-विदेश
इस्टरच्या मारेक-याला अटक 0

इस्टरच्या मारेक-याला अटक

Esther
मुंबई – टीसीएस कंपनीची कर्मचारी इस्टर अनुह्या (२३) हिच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये चंद्रभान सानप याला अटक केली आहे. मूळचा नाशिकचा असलेला चंद्रभान सानप याला याआधीही रेल्वे मार्गावर चो-या करणे, दरोडे घालणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे. सानपनेच इस्टरची हत्या करुन तिचा मृतदेह कांजूरमार्गच्या खाडीत तिवराच्या जंगलात टाकून दिला होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन पोलिस आणखी माहिती देणार असल्याचे समजते.
गोरेगाव येथील टीसीएसच्या ऑफिसमध्ये काम करणारी आणि मूळची हैदराबादची असलेली इस्टर ५ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता कुर्ला टर्मिनस येथे उतरली आणि १६ जानेवारी रोजी तिचा मृतदेह कांजूरमार्गच्या खाडीत कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तपासासाठी पोलिसांनी कुर्ला टर्मिनस स्टेशनचे सीसीटीव्ही फूटेज पाहून एका व्यक्तीचा शोध सुरू केला होता. अखेर ही व्यक्ती चंद्रभान सानप असल्याचे उघड झाले आणि सापळा रचून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.अनुह्या रेल्वे स्टेशानात उतरल्यानंतरचे विशिष्ट मोबाइल टॉवर लोकेशनवरील शेकडो कॉल्स, अनुह्याच्या मोबाइलमधून रिकव्हर केलेल्या डेटा, तिच्या मित्रमंडळींचे आणि संशयीतांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर), सासीटीव्ही अशी ब-याच तांत्रिक बाबी तपासल्यानंतर अखेर पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे सक्रीय केले आणि इस्टरच्या मारेक-याला शोधून काढले.

March 03, 2014 in महाराष्ट्र
माओवाद्यांचा पोलिस केंद्रावर हल्ला 0

माओवाद्यांचा पोलिस केंद्रावर हल्ला

images.jpeg2
गडचिरोली – एटापल्ली उपविभागातील पोमके हेडरी पोलिस मदत केंद्रावर शनिवारी रात्री १.३० वाजता सशस्त्र माओवाद्यांनी हल्ला चढविला. यात सुदैवाने पोलिस विभागाची कोणतीही हानी झाली नाही. मदत केंद्रावरील सतर्क पोलिसांनी माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी जवळपास अर्धा तास गोळीबार सुरू होता. अखेर पोलिसांचा वाढता दबाव पाहता हल्ला यशस्वी होत नसल्याचे दिसताच अंधाराचा फायदा घेऊन माओवादी पसार झाले. मदत केंद्रावरील पोलिसांना संपविण्याची माओवाद्यांची योजना होती. हा हल्ला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पाळत ठेवून करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी आक्रमक प्रत्युत्तर दिल्याने माओवाद्यांचे मनसुबे उधळले गेले. चकमकीनंतर पोलिसांनी परिसरातून २ क्लेमोरमाइन, २ हॅण्ड ग्रेनेड हस्तगत केले.

March 03, 2014 in मुख्य पान
वेगळ्या विदर्भासाठी आयोग हवा 0

वेगळ्या विदर्भासाठी आयोग हवा

vidarbha_map
नागपूर – व्हाट्स अॅप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमाने विदर्भवादी एकत्रित आले असून त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीचा मुद्दा पिल्लई समितीकडे द्यावा अशी मागणी केली आहे. विदर्भ कनेक्ट या ग्रुपची रविवारी अधिकृत बैठक झाली. त्या बैठकीत वेगळ्या विदर्भ राज्याच्या स्थापनेकरिता सामूहिक प्रयत्न करण्याचा ठराव मंजूर झाला.
‘आम्ही विदर्भाचे नागरिक केंद्र सरकारला विनंती करतो की, बोडोलॅन्ड राज्याच्या शिफारशीकरिता स्थापन केलेल्या माजी गृह सचिव जी.के. पिल्लई यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा मुद्दाही सादर करावा’, असे ठरावात नमूद केले आहे. त्या ठरावाची प्रत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सादर करण्यात येणार आहे. व्हाट्स अॅपवर शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी विदर्भ कनेक्ट ग्रुपवर आले आहेत. त्यात विदर्भ जनकल्याण परिषद (वेद), विदर्भ पर्यावरण कृती गट (व्हीईएजी), जनमंच, नागपूर श्रमिक पत्रकार संघ (एनयुडब्लूजे) युथ फॉर विदर्भ, विदर्भ राज्य संघर्ष समिती आणि विदर्भ संयुक्त कृती समिती यासारख्या संघटनांचा समावेश आहे. मुंबई हायकोर्टातील वरिष्ठ अधिवक्ता, विधिज्ञ आणि विदर्भवादी श्रीहरी अणे यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ कनेक्टची रविवारी बैठक झाली. त्यात वेदचे माजी अध्यक्ष विलास काळे, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, सहयोग ट्रस्टच्या संयोजिका अॅड. स्मिता सरोदे-सिंगलकर, सुधीर पालीवाल, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते आशिष देशमुख आणि विदर्भ टॅक्स पेअर्स असोसिएशनचे तेजंदरसिंग रेणू उपस्थित होते. विदर्भ कनेक्ट ग्रुपची व्याप्ती वाढवण्याकरिता त्याचे एक विशेष पेज फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंट सुरू करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. याशिवाय विदर्भ कनेक्ट नावाने एक वेबसाइट सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे ११ जिल्ह्यांमधील विदर्भवादी एकत्रित येणार आहेत. विदर्भ कनेक्टच्या ग्रुपमधील सदस्यांनी बैठकीपुर्वीच विदर्भवादी चळवळ सुरू केली आहे. इन्फोसिसच्या उद्घाटनासाठी नागपुरात आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकरिता स्वागत फलक लावून इन्फोसिस व मुख्यमंत्र्यांचे विदर्भ राज्यात स्वागत असल्याचा नारा देण्यात आला होता. या ग्रुपच्या वतीने लवकरच एक कार्यालय देखील सुरू करण्यात येणार आहे. या ग्रुपची पुढील बैठक १९ मार्चला होणार आहे

March 03, 2014 in मुख्य पान
  यवतमाळ येथे साकारणार २२  एकरात  उद्यान व म्युझियम 0

यवतमाळ येथे साकारणार २२ एकरात उद्यान व म्युझियम

20
केंद्रीय रेल्वे मंत्री खरगे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण
यवतमाळ : – वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी पुढील वर्षाच्या अथर्संकल्पात अधिक निधीची तरतूद करणार, असे केंद्रीय रेल्वे मंत्री मल्लीकार्जुन खरगे यांनी सांगितले.
यवतमाळ येथे रेल्वेच्या २२ एकर जागेवर रेल्वे विभाग भव्य उद्यान उभारणार असून त्या उद्यानाच्या नामफलकाचे अनावरण श्री.खरगे यांच्याहस्ते झाले. अनावरणानंतर दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, खा.विजय दर्डा, खा.भावना गवळी, आ.वामनराव कासावार, माजी खासदार हरीभाऊ राठोड, नगराध्यक्ष योगेश गढीया, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनिलकुमार सुद, सुबोध जैन, माजी आमदार कीर्ती गांधी आदी उपस्थित होते.
यवतमाळ रेल्वे प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहभागातून राबविण्यात येत आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी अधिक निधीची तरतूद करण्यासोबतच मनरेगाच्या माध्यमातून काही कामे केल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यादृष्टीनेही विचार सुरू असल्याचे श्री.खरगे म्हणाले. यवतमाळ येथे नॅरोगेज रेल्वे लाईन सुरू आहे. या रेल्वेलाईनची नियमीत देखभाल करण्यासोबतच यवतमाळ येथे कॉरीडॉरसाठी सर्व्हेक्षण केले जाणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्याला लागून असलेले पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे पोहरादेवी या ठिकाणाला या प्रस्तावित रेल्वेमार्गाला जोडण्यात येतील. यासाठी रेल्वेच्या अधिकाºयांनी कायर्वाही करावी, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. रेल्वे सेवा ही सवर्सामान्यांची सेवा आहे. अधिकाधिक जनतेला सदर सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. यवतमाळ येथे प्रस्तावित रेल्वे उद्यानात रेल्वेची ओळख करून देणारे साहित्य ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. रेल्वेचे इंजीन, डबे अशा वस्तु ठेवून चांगले म्युझीयम तयार करण्याच्या सुचना देखील त्यांनी केल्या. यावेळी खा.विजय दर्डा यांचेही भाषण झाले. यावेळी त्यांनी रेल्वे मार्गाला गती देण्याची विनंती केली. वेळेवर हा मार्ग पुर्ण करण्यासोबतच कॉरीडॉर आणि रेल्वेचे म्युझियम उभारण्याची मागणी त्यांनी केली. प्रास्ताविक मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनिलकुमार सुद यांनी केले. आभार रेल्वेचे अधिकारी महेशकुमार गुप्ता यांनी मानले. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्वच्छ  व्यवसायातील कामगारांच्या पुनर्वसनाला प्राधान्य  द्या -  डॉ.महातो 0

अस्वच्छ व्यवसायातील कामगारांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्या – डॉ.महातो

4x6=10 (1)
यवतमाळ – हातानेमैला साफ करणे, डोक्यावर वाहून नेणेही प्रथा घृणास्पद  आहे. त्यामुळे अशा व्यवसायात काम करणाºया कामगारांना इतर व्यवसायाकडे प्रवृत्त करून त्यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या पुनर्वसन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश राट्रीय सफाई कमर्चारी आयोगाच्या सदस्या डॉ.लता महातो यांनी दिले.
दिग्रस नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.मुश्ताक, नगरसेवक रामु पवार, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट, ओमप्रकाश महातो, शंकर पवार आदी उपस्थित होते. अस्वच्छ व्यवसायातील सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. तेव्हा जुन्या प्रचलीत पध्दतीनुसार काम करणारे कामगार आढळल्यास तसा अहवाल तत्पर पाठवावा. या समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. ही बाब विचारात घेऊन योजना राबविणाºया यंत्रणांनी अंमलबजावणी करावी. सफाई कामगार वा त्यांच्या पाल्यांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करावे व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना डॉ.महातो यांनी केल्या. कंत्राटी पध्दतीने काम देतांना सफाई कर्मचाºयांवर अन्याय होणार नाही तसेच सदर कर्मचाºयांचे वेतन नियमित देण्यात यावे. त्यांच्या सेवेचा लेखाजोगा व्यवस्थित ठेवावा. सफाई कमर्चाºयांच्या रिक्त जागा भरणे, त्यांना कालबद्द पदोन्नती, घरकुल देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. वैद्यकीय शिक्षण आरोग्य सेवेतील कर्मचाºयांना  क वर्ग कर्मचाºयांचा दर्जा देण्यासाठी कायर्वाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रास्ताविक दिग्रसचे मुख्याधिकारी प्यारेलाल यांनी केले. सफाई कर्मचाºयांचे वेतन व इतर लाभ देण्यासाठी पुर्णपणे निधी मिळणे आवश्यक आहे. तसेच श्रमसाफल्य ही योजना सफाई कामगारांसाठी राबविण्यात येते. या योजनेंतर्गत४००कोटी रूपयाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ट्रक अपघातात बालक ठार, एक जखमी

यवतमाळ –  मोहदा येथून जवळच असलेल्या अंतरगाव येथे भरधाव ट्रकने सायकलला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजता घडली. यामध्ये एक ल्बालक जागीच ठार झाला असून एक जण जखमी आहे.
वैभव गजानन सहस्त्रबुद्घे (१२) रा. अंतरगाव असे मृतकाचे तर मयुर सुभाष सहस्त्रबुद्घे (१५) असे जखमीचे नाव आहे. काल दुपारी ते सायकलने रस्ता ओलांडत होते. अशातच मेटीखेडा येथून राळेगावकडे जाणाºया ट्रकने (ए.पी. १६/ टी.ए.७५६७) सायकलला धडक दिली. यामध्ये वैभव व मयुर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्याना यवतमाळ   येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान वैभवचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी मेटीखेडा-राळेगाव मार्गावर रस्ता खोदून चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती होताच सायंकाळी वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त ट्रक जप्त केला. चारवर्षापूर्वी वैभवच्या वडीलांचाही मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आता वैभवचाही अपघाती मृत्यू झाल्याने त्याची आई नलुबाई सहस्त्रबुद्घे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.