पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2015

ना. धों. महानोर ‘महाराष्ट्रभूषण’ 0

ना. धों. महानोर ‘महाराष्ट्रभूषण’

mt02
मुंबई – ‘या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे’ अशा तजेलदार शब्दांत जगण्याचे सूत्र मांडणारे ज्येष्ठ निसर्गकवी व गीतकार ना. धों. महानोर यांना शनिवारी अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये रंगलेल्या दिमाखदार ‘कोहिनूर मटा सन्मान’ सोहळ्यात जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘हा सन्मान तमाम शेतकऱ्यांचा आहे’ अशी कृतज्ञ भावना महानोर यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्यांच्या दाहक प्रश्नावर ‘आपुलकी’ या संस्थेच्या माध्यमातून अव्याहत काम करणारे अभिजित फाळके यांना ‘महाराष्ट्राचा यूथ आयकॉन २०१५’ या पुरस्काराने गेल्या वर्षीच्या ‘यूथ आयकॉन’ विजेत्या ऋजुता दिवेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले; तर अत्यंत प्रतिकूल परिस्थ‌तिीशी झगडत आपली कला सातासमुद्रापार पोहोचवणारा तरुण प्रतिभावंत चित्रकार शश‌किांत धोत्रे याला ‘कोहिनूर समुहा’चे एमडी उन्मेश जोशी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राचा कोहिनूर’ या पुरस्काराने सन्मान‌ति करण्यात आले. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

 

March 15, 2015 in मनोरंजन
 बोट दुर्घटना; ३३ ठार, अनेक बेपत्ता 0

बोट दुर्घटना; ३३ ठार, अनेक बेपत्ता

2015-03-15~1-05_ns
यंगून : वायव्य म्यानमातील समुद्रात घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत ३३ जण ठार झाले असून जवळपास १२ जण बेपत्ता आहेत. लाटांच्या तडाख्याने ही दुमजली बोट (आंग तागुन-३) शुक्रवारी बुडाली. बचाव पथकाला १६७ लोकांना वाचविण्यात यश आले असून यापैकी बऱ्याच लोकांना त्यांच्या घरी रवाना करण्यात आल्याचे म्यानमा रेडक्रॉस आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख माऊंग खिन यांनी सांगितले. या दुर्घटनेत ३३ जण ठार झाले असून अनेक जण बेपत्ता आहेत. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेआठ वाजता ही बोट क्याऊक्फू येथून रवाना झाली होती. ८० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर लाटेच्या तडाख्याने ही दुर्घटना घडली. मृतांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे.

March 15, 2015 in देश-विदेश
3 कोटी 37 लाख रक्कमेची 184 भूसंपादन प्रकरणे निकाली 0

3 कोटी 37 लाख रक्कमेची 184 भूसंपादन प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालत
यवतमाळ, दि 15 : लोकअदालतींना दरवर्षी नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. हजारे प्रकरणे सहज या लोकअदालतीत निकाली निघत असल्याने वेळ व पैशाची बचत होत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाच्या सुचनेप्रमाणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्यावतीने काल जिल्हा न्यायालयासह संपुर्ण तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत भूसंपादन व महसूल तथा मनरेगाची मिळून तब्बल 638 प्रकरणे निकाली निघाली.
जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली भूसंपादन तसेच प्रलंबित व वादपूर्व असलेली महसूल तथा मनरेगाची प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीत भूसंपादनची एकून 292 प्रकरणे ठेवण्यात आली होती. आपसी तडजोडीने यापैकी 3 कोटी 37 लक्ष रक्कमेची 184 प्रकरणे निकाली निघाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही प्रकरणे निकाली निघाल्याने पक्षकारांना वेळ व पैसा वाचला आहे. सदर रक्कम पक्षकारांना त्यांचे प्रकरण दाखल झाल्यापासून व्याजासह देण्यात येणार आहे. नापिकीने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे काही अंशी दिलासा मिळणार आहे.
या लोकअदालतील महसूल विभाग तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रलंबित व वादपूर्व 346 प्रकरणेही ठेवण्यात आली होती. त्यापैकी 144 प्रकरणे निकाली निघाली आहे. भूसंपादन, महसूल व मनरेगाची मिळून एकून 638 इतकी प्रकरणे निकाली निघाली. सदर राष्ट्रीय लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे यांच्या मार्गदर्शनात प्राधिकरणाचे सचिव एस.एम.आगरकर यांनी यशस्वीरित्या आयोजित केले होते.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायाधीस, महसूल व भूसंपादन विभागाचे अधिकारी, बेंबळा व इतर प्रकल्पाचे अधिकारी, जिल्हा सरकारी वकील पी.व्ही.गाडबैलै, वकील संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, वकील सदस्य व पॅनलवरील सामाजिक कार्यकर्ते, प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी यांनी सहकार्य केले, असे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

March 15, 2015 in विदर्भ
घरकुल योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा, समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन 0

घरकुल योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा, समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन

01
यवतमाळ, दि. १४ – नगर परिषद क्षेत्रांतर्गत शासनाच्या विविध घरकुल योजनांची तात्काळ अंमलबजावणी करून बांधकामास सुरुवात करावी यासाठी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले.
नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नागा) या संघटनेचे प्रमुख आनंद गायकवाड यांनी विधान भवन मुंबई येथे समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन देऊन समस्त घरकुल योजनाच्या विलंबाची माहिती दिली. अशोकनगर, डोर्लीपुरा, पाटीपुरा, अंबिकानगर या भागात समाजकल्याण विभागाची रमाई आवास योजना २०११-१२ मध्ये लागू झाली मात्र ३१३ लाभार्थ्यांपैकी केवळ ५९ घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे तर २५४ घरकुलांची प्रकरणे अजुनही थंडबस्त्यात आहे. यवतमाळ नगर परिषदेकडून लाभार्थ्यांच्या जागेचे अजुनही मोजमाप करणेच सुरू आहे. याबाबतीत जिल्हाधिकारी रंजनकुमार महिलवार यांना निवेदन देऊन उपोषणाची सूचना दिली असता न. प. ने ताबडतोब कार्यवाही करण्याची लेखी हमी दिली परंतु न. प. अभियंत्यांकडे पूर्ण न. प. ची कामे असल्याने घरकुल योजनेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याचीही कल्पना मंत्र्यांना देण्यात आली. रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थी ठरवितांना अजुनही चालढकल सुरू आहे. अशोकनगर येथील योजना आराखड्यातील रस्ता वगळण्याची कारवाई तब्बल दोन वर्षांपासून सुरू आहे. वस्तुत: आवास योजनेला केवळ नगररचना संचालकाच्या मंजुरीचीच गरज असताना प्रकरण उगीचच वाढविण्यात येत असल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत संपूर्ण लाभार्थी पात्र ठरवून घरकुलाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

 

March 15, 2015 in विदर्भ
लाचखोर ठाणेदारासह मुख्याध्यापक ‘एसीबी’च्या जाळ््यात 0

लाचखोर ठाणेदारासह मुख्याध्यापक ‘एसीबी’च्या जाळ््यात

images-2
यवतमाळ, दि. १४ – जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून शनिवारी पाटणचे ठाणेदार व पोलीस नाईकाला तसेच पुसद येथील मुख्याध्यापकाला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.
पाटण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले ठाणेदार शिवाजी भद्दू अहिरे (४३) व पोलीस नाईक सुरेश निब्रड (४५) याने गुन्’ात पकडलेले ट्रॅक्टर सुर्पूतनाम्यावर सोडण्यासाठी तक्रारकर्त्याला १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांच्याकडे तक्रार केली. लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यांनतर एसीबीच्या पथकाने दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
पुसद येथील वसंतराव नाईक विद्यालयातील मुख्याध्यापक राम दिनकर बल्लाळ (५२) सहाय्यक शिक्षकाच्या वेतनातून दरमहा ३.५ टक्के रक्कम कपात करीत होते. सहा महिन्यापर्यंत रक्कम कपात केल्यानंतर सहाय्यक शिक्षकाने रक्कम कपात करण्यास नकार दिला. यावेळी मुख्याध्यापकाने शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस देऊन त्रास देण्यास सुरुवात केली. मुख्याध्यापकाच्या त्रासाला कटांळलेल्या शिक्षकाने त्यांची भेट घेऊन चौकशी केली. यावेळी मुख्याध्यापकाने १६ महिन्याच्या वेतनातील ३.५ टक्केनुसार रक्कम व १४ हजार रुपये लाचेची मागणी केली. कोणतेही कारण नसताना, पदाचा गैरवापर करून मुख्याध्यापक वेठीस धरत असल्यामुळे सहाय्यक शिक्षकाने एसीबी कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर ठरल्यानुसार १४ हजार रुपयाच्या रक्कमेतील पहिला सात हजार रुपयांचा टप्पा देण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापकाच्या कक्षात गेला. यावेळी सापळा रचून बसलेल्या पथकाने मुख्याध्यापकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जिल्’ात लाचखोरांची संख्या दिवसंदिवस वाढत असून, पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर असल्याचे आजच्या कारवाईने स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सतीष देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, नितीन लेव्हरकर, गजानन राठोड, अमोल महल्ले, अनिल राजकुमार, शैलेश ढोणे, नीलेश पखाले, प्रकाश शेंडे आदींनी केली.

 

March 14, 2015 in विदर्भ
 मोदी सरकार राजकीय हेरगिरी करतय – काँग्रेस 0

मोदी सरकार राजकीय हेरगिरी करतय – काँग्रेस

rahul-and-modi
नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केल्याबद्दल काँग्रेसने भाजपावर जोरदार टिका केली आहे.
काँग्रेसने यासाठी भाजपाला जबाबदार धरले असून, सरकारने विरोधकांच्या आयुष्यात हेरगिरी चालवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दिल्ली पोलिस राजकीय हेरगिरी करत असून, राजकीय विरोधकाच्या आयुष्यात अशा प्रकारची हेरगिरी, टेहळणी आणि अतिक्रमण हे गुजरात मॉडेल असू शकते पण हे भारतीय मॉडेल नक्कीच नाही अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपावर टिका केली.
दुस-या बाजूला दिल्ली पोलिसांनी आपल्या कृतीचे समर्थन करताना ही सुरक्षा तपासणी असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांना एसपीजीचे विशेष सुरक्षा कवच आहे हे नेहमीचे सुरक्षा ऑडिट होते.
कायदा-सुव्यवस्थेचा भाग म्हणून चौकशी करण्यात आली यात दुसरा कोणताही चुकीचा हेतू नव्हता असे दिल्ली पोलिस आयुक्त बी.एस.बासी यांनी पत्रकारांना सांगितले. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी राहुल गांधी यांच्या तुगलक रोडवरील निवासस्थानी जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी केली होती.

 

March 14, 2015 in मुख्य पान
 तासगावमधून आबांच्या पत्नीला उमेदवारी 0

तासगावमधून आबांच्या पत्नीला उमेदवारी

2440_ncp3
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहाकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने या पोटनिवडणुकीत आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सुरुवातीपासूनच या जागेसाठी आर.आर.पाटील यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा होती. येत्या १७ मार्चला त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाराष्ट्राला आबा म्हणून परिचित असणारे आर.आर.पाटील यांचे मागच्या महिन्यात कर्करोगाने निधन झाले. सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहाकाळ हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.
ही निवडणूक बिनविरोध करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपाने उमेदवार न देण्याचे आणि निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत.

March 14, 2015 in मुख्य पान
 राहुल गांधी दिसतात कसे 0

राहुल गांधी दिसतात कसे

images
नवी दिल्ली – तुमचा मुलगा कसा दिसतो?, उंची किती?, रंग?, कोणत्या रंगाचे कपडे घातले होते?, काही जन्मखूण वगैरे?, फोटो-बिटो आणलाय का?, असे प्रश्न पोलीस हरवलेल्या व्यक्तीविषयी विचारताना आपण बऱ्याच सिनेमांमध्ये पाहिलंय, काहींनी प्रत्यक्ष अनुभवलंही असेल. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत ही माहिती घेणं गरजेचंही आहे. पण, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते, अर्थात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबतही असेच प्रश्न विचारण्याचा ‘पराक्रम’ दिल्ली पोलिसांनी केलाय. त्यावरून काँग्रेस भलतीच खवळली आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांचं एक पथक राहुल गांधींच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकलं. ते नेमके कशासाठी आलेत, हे कुणालाच कळेना. ते काही सांगायलाही तयार नव्हते. उलट, राहुल गांधी कसे दिसतात?, त्यांच्या डोळ्यांचा रंग कसा आहे?, केस कसे आहेत? असे प्रश्न विचारायलाच त्यांनी सुरुवात केली. ते ऐकून सगळेच चक्रावले. आता, दिल्ली पोलिसांच्या या चौकशीची तक्रार काँग्रेसनं पोलीस आयुक्तांकडेच केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी काही आठवड्यांची रजा घेऊन ‘आत्मचिंतना’साठी अज्ञातवासात रवाना झाले आहेत. २३ फेब्रुवारीपासून त्यांचं दर्शन कुणालाच घडलेलं नाही. राहुलबाबा देशात आहेत, की विदेशात, हे काँग्रेस नेत्यांनाही ठाऊक नाही. तसंच, ते खरंच आत्मचिंतनासाठी गेलेत आणि कुणावर नाराज होऊन गेलेत, याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच, दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींच्या रंगरूपाची चौकशी करून सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडलंय.
राहुल गांधींची सगळी माहिती, फोटो इंटरनेटवर आहेत. ते खासदार असल्यानं संसदेतही त्यांच्याविषयीच्या सगळ्या नोंदी आहेत. असं असतानाही, दिल्ली पोलिसांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन नसती चौकशी करायची गरजच काय होती?, असा संतप्त सवाल काँग्रेसनं केला आहे. या चौकशीमागे काहीतरी कारस्थान किंवा खोडसाळपणा असावा, असं त्यांना वाटतंय. म्हणूनच, दिल्ली पोलीस आयुक्तांकडून त्यांनी याबाबतही माहिती मागितली आहे. याबाबत ‘टाइम्स’नं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे आता या प्रकरणाचं काय होतं, पोलिसांनी ही चौकशी का केली असावी, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

March 14, 2015 in मुख्य पान
भारताचा झिम्बाब्वेवर ६ गडी राखून विजय 0

भारताचा झिम्बाब्वेवर ६ गडी राखून विजय

AP6_24_2013_000002B
ऑकलंड, दि. १४ – सुरेश रैना (नाबाद ११०) आणि कर्णधार धोनी (नाबाद ८५) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेवर ६ गडी राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने दिलेले २८८ धावांचे आव्हान भारताने ४८.४ षटकांतच पूर्ण केले.
रोहित शर्मा(१६), शिखर धवन(४), विराट कोहली (३८), अजिंक्य रहाणे(१९) हे भरवशाचे फलंदाज पटापट तंबूत परतल्यानंतर रैना व धोनीने तूफान खेळी कपत विजय अक्षरश: खेचून आणला.
रोहित शर्मा व शिखर धवनने भारताला सुरूवात तर चांगली करून दिली, मात्र ६व्या षटकांत ते दोघेही एकापाठोपाठ बाद झाल्याने भारताला दोन मोठे धक्के बसले. त्यानंतर फलंदाजीस आलेला अजिंक्य रहाणेही अवघ्या १९ धावा काढून बाद तंबूत परतला. ३८ धावांची खेळी करणारा विराट कोहली तरी भारताला सावरेल आणि विजयाच्या समीप नेईल असे वाटत होते, मात्र सिकंदर रझाच्या गोलदांजीवर तोही बाद झाला आणि भारताने महत्वाचे चार गडी गमावले. त्यानंतर रैनाने धोनीच्या साथीने सावधपणे खेळून भारताला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेच्या पनयानगराने २ तर सिंकदर रझाने १ बळी टिपला.
तत्पूर्वी ब्रँडन टेलरच्या १३८ धावांच्या शानदार खेळीमुळे झिम्बाब्वेने भारतासमोर जिंकण्यासाठी २८८ धावांचे आव्हान ठेवले. नाणफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. झिम्बाब्वेची सुरूवात संथ झाली आणि त्यांचे सलामीचे फलंदाज पटापट तंबूत परतले. मात्र त्यानंतर ब्रँडन टेलरने भारतीय गोलंदाजी चोपून काढत १३८ धावा केल्या आणि झिम्बाब्वेने पावणेतीनशे धावांचा टप्पा पार केला. भारतातर्फे मोहम्मद शमी, मोहित शर्मा व उमेश यादवने प्रत्येकी ३ तर आर. अश्विनने १ बळी टिपला.

 

March 14, 2015 in क्रीडा
 अश्लील चित्रफीत फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर 0

अश्लील चित्रफीत फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर

Facebook & Whatsapp
पुणे : संगणक अभियंता तरुणीच्या मित्राने तिची अश्लील चित्रफीत तयार करून फेसबुक तसेच व्हॉट्स अ‍ॅपवर ती टाकली. तसेच तरुणीला बदनामीची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितली. तरुणीने यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सायबर शाखेच्या मदतीने आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
गिरीश श्याम सुगंध (वय ३५, रा. शांतीनगर, नागपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी वानवडी भागात राहण्यास आहे. ती मगरपट्टा येथील संगणक कंपनीत नोकरी करते. तिचे वानवडी भागात आईस्क्रीम पार्लर आहे. या आईस्क्रीम पार्लरमध्ये आरोपी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. या तरुणीशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिची अश्लील चित्रफीत काढली. दरम्यान, आरोपी एक दिवस दारू पिऊन दुकानावर आल्यामुळे तिने त्याच्या कानाखाली मारली होती. तसेच त्याला नोकरीवरून काढले होते.
त्यामुळे चिडलेल्या गिरीशने ही चित्रफीत मित्रांना व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवली. तसेच फेसबुकवरही टाकली. याबाबत तिने त्याला विचारणा केल्यावर त्याने ही चित्रफीत फेसबुकवरून काढली. ती पुन्हा फेसबुकवर टाकण्याची धमकी द्यायला त्याने सुरुवात केली होती. तिच्याकडे वारंवार दोन लाख रुपयांची मागणी तो करू लागल्यावर पीडित मुलीने पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनांनुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सायबर शाखेच्या सहायक निरीक्षक सीमा साठे यांनी आरोपीबाबत माहिती गोळा करायला सुरुवात केली. दरम्यान, तो पीडित मुलीला सारखे दिल्ली, मनमाड, लोणावळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे घेऊन बोलावीत होता. पीडित मुलीने त्याला आपल्याला लांब येणे शक्य नसल्याचे सांगून पुण्याला बोलावले. तो पुणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच निरीक्षक अनिल पाटील यांनी उपनिरीक्षक मारुती भुजबळ, प्रशांत पवार, संजय काळोखे, गणेश माळी, प्रमोद मगर, सचिन अहिवळे, रमेश गरुड, सिद्धार्थ लोखंडे, आनंद दळवी, हृषीकेश महल्ले यांनी सापळा लावला. स्टेशन परिसरात आलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.

 

March 14, 2015 in मुख्य पान
झोपडपट्टीदादांप्रमाणे वाळूमाफियांवर कारवाई 0

झोपडपट्टीदादांप्रमाणे वाळूमाफियांवर कारवाई

3a12img_112812_sand11_240x180
मुंबई : मुजोर वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील झोपडपट्टीदादांवर कारवाई करण्याकरिता केलेल्या महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्ट (एमपीडीए) खाली वाळूमाफियांवरही कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केली. राज्याचे वाळू धोरण येत्या महिनाभरात जाहीर करण्यात येईल, असेही खडसे यांनी सांगितले. शेकापच्या जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील विनापरवाना वाळू उपशाबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावर पाटील यांनी वाळू माफियांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. महसूलमंत्री खडसे म्हणाले की, या कारवाया रोखण्याकरिता झोपडपट्टीदादांवर कारवाई करण्याकरिता केलेल्या एमपीडीए कायद्याचा निश्चित वापर केला जाईल. त्याकरिता आवश्यकता वाटल्यास त्या कायद्यात सुधारणा करु. वाळू उपशावर बंदी घालण्याबाबत एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. राज्याने आपले नवे वाळू धोरण जाहीर करावे, अशी सूचना या याचिकांच्या सुनावणीत पुढे आली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, बिल्डर अशा सर्व संबंधितांशी चर्चा करून हे धोरण तयार केले जाईल, असे खडसेंनी सांगितले. कोकणातील जांबा दगड काढण्यावरील बंदीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकरांकडे झालेल्या बैठकीत मार्ग काढण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वाळू काढण्याबाबतही निर्णय घेण्याचे आश्वासन खडसे यांनी दिले.

 

March 14, 2015 in मुख्य पान
गुंगीचे औषध देऊन तरूणीला पळविले 0

गुंगीचे औषध देऊन तरूणीला पळविले

peg
यवतमाळ : गुंगीचे औषध देऊन तरूणीला पळविल्याची घटना वडकी येथे उघडकीस आली असून, प्रितम शंकर ढवळे (२६) व अन्य तीन रा. चंद्रपूर अशी तरूणीस पळविणाºयांची नावे आहे. चंद्रपूर येथील प्रितमने युवतीशी लग्न करण्यासाठी गळ घातली होती. यावेळी तरूणीने त्याला विरोध केला. त्याने दोन मित्रांच्या मदतीने वडकी येथे येऊ न मुलीला बोलायचे आहे, असा बहाणा करून गुंगीचे औषध दिले व तिला पळवून नेले. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

 

March 14, 2015 in विदर्भ
सचिनच्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली -मुख्यमंत्री 0

सचिनच्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली -मुख्यमंत्री

sachin 5 download
मुंबई – सचिन तेंडुलकर यांनी जे पत्र लिहलंय त्यात टोलबाबत समस्या सांगितल्या आहेत. त्याची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून संबंधीत विभागाला सुचना दिल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. टोलविरोधात आता खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात उतरलाय. सचिन तेंडुलकरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय. टोल वसुलीच्या धोरणाचा फेरविचार करा, अशी विनंती सचिननं मुख्यमंत्र्यांना केलीय. 20 फेब्रुवारीला त्यानं हे पत्र लिहिलंय.
सचिनच्या पत्राबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खुलासा केला. सचिन यांनी पत्र लिहले त्यात टोलच्या समस्येबद्दल माहिती देण्यात आलीये. या अगोदर आघाडी सरकारने हवे तिथे टोल उभारले. याबद्दल आम्ही विधानपरिषदेत माहिती दिली. सचिनने लिहलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधीत विभागाला सुचना करण्यात आलीये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर, गेल्या दोन महिन्यांपासून सचिनच्या पत्रातील समस्येबद्दल आम्ही तयारी करतोय. मोठी वाहनं आणि छोटी वाहनं मोजणीमध्ये वेळ जात असल्यामुळे ट्रफिक जामची समस्या उद्भवत आहे. यावर तोडगा काढला जाईल. सचिनच्या पत्राशी आम्ही सहमत आहोत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तर भाजपने सत्तेत आल्यावर टोलमुक्त महाराष्ट्र करणार अशी घोषणा केली होती, ती घोषणा अगोदर पूर्ण करावी असा टोला नितेश राणे यांनी लगावलाय.

भातसा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होणार ! 0

भातसा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होणार !

bhatsa44-300x217
ठाणे – गेल्या 47 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या भातसा धरण प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय मिळालाय. आता या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निर्णय महापालिकेनं घेतलाय.
भातसा धरण प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय मिळाला. गेली 47 वर्ष भातसा धरण प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झाले नव्हतं. त्यांचं आता मुंबई महापालिका पुनर्वसन करणार आहे. तसंच त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला मुंबई महापालिकेत नोकरीही देण्यात येणार आहे. येणार्‍या भरतीमध्ये भातसा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत आयुक्त आणि महापौर यांच्या सोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. बैठकीनंतर भातसा धरण प्रकल्पग्रस्तांनीही समाधान व्यक्त केलंय.

March 13, 2015 in मुख्य पान
शेतकरी सावकारांच्या कर्जातून मुक्त होणार 0

शेतकरी सावकारांच्या कर्जातून मुक्त होणार

images
मुंबई – दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील तब्बल दोन लाख २३ शेतकरी सावकारांच्या कर्जातून मुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक-यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले १५६ कोटींचे कर्ज आणि त्यावरील १५ कोटींचे व्याज, असे तब्बल १७१ कोटी रुपये राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून अनेक संकटांचा सामना करणा-या शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

March 13, 2015 in मुख्य पान
प्रेम केले म्हणून तरुणाची धिंड 0

प्रेम केले म्हणून तरुणाची धिंड

images (1)
अहमदनगर – गावातील मुलीवर प्रेम केले, म्हणून गावातीलच एका तरुणाची भर बाजारपेठेतून मारहाण करीत कपडे फाडून धिंड काढण्यात आली. ही घटना आज सकाळी वांबोरी (ता. राहुरी) येथे घडली. मुलीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हे कृत्य केले. ग्रामस्थांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली. शेवटी सरपंचाने हास्तक्षेप केल्याने त्या तरुणाची जमावाच्या तावडीतून सुटका झाली. या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे. पोलिस गावात दाखल झाले असून आरोपींची धरपकड सुरू झाली आहे.
गावात बाजारपेठेत राहणाऱ्या एका तरुणाचे त्याच गावात वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. काही दिवसांपूर्वी दोघेही पळून गेले होते. हा प्रकार तरुणाच्या घरच्यांना अजिबात रुचला नव्हता त्यामुळे त्यांनी शोध सुरू केला. काल सायंकाळी त्यांनी या दोघांना शोधून काढले. मुलीलाही मारहाण केली. रात्री वस्तीवर बैठक घेऊन प्रेम करणाऱ्या मुलाला धडा शिकविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पंधरा-वीस जणांचा जमाव तरुणाच्या घरी आला. त्यांनी कुटुंबातील सर्वांना मारहाण केली. तरुणाला घराबाहेर ओढत नेले. त्याच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले. त्याला चपलांचा हार घालून मारहाण करीत बाजारपेठेतून फिरविण्यात आले. हा प्रकार सुरू असताना बाजारपेठेतील नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेत होते, हे विशेष. काही वेळाने हा प्रकार समजल्यावर गावचे सरपंच उदसिंह पाटील तेथे आले. त्यांनी जमावाच्या तावडीतून तरुणाची सुटका केली. घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिस येईपर्यंत धिंड काढणारे पळून गेले होते. तरुण-तरुणी विभिन्न जातीचे असल्याने विरोध अधिक कडवा असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर गावात तीव्र पडसाद उमटले. मुलगा व्यापारी कुटुंबातील असल्याने व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन या घटनेचा निषेध केला. बाजारपेठही बंद ठेवण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर गावात जादा पोलिस पाठविण्यात आले. त्यांनी जमावाचा शोध सुरू केला आहे. तरुणासह त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य जखमी झाले आहेत. त्यांना राहुरी येथे हलविण्यात आले आहे.

 

March 13, 2015 in मुख्य पान
'नाईट लाइफ'वरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले 0

‘नाईट लाइफ’वरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

images (6)
मुंबई, दि. १३ – मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असतानाच न्यायालयाने त्याआधी सरकारला खडे बोल सुनावीत चांगलेच फटकारले आहे. नाईट लाइफ सुरु झाल्यास रात्रभर मद्याची दुकाने व पब सुरु ठेवणार आहात का ? जर रात्रभर दुकाने उघडी ठेवली तर महिलांच्या सुरक्षाच्या आढावा राज्य सरकारने घेतला आहे का? असा प्रश्न विचारीत आधी महिलांच्या सुरक्षेचा आढावा घ्या मग नाईट लाइफ सुरु करा असा सल्ला न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.
मुंबईतील गेल्या काही दिवसांतील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वत:हून खटला दाखल करुन घेत उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरु आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने डान्सबार बंदीमुळे महिलांवरील होणारे अत्याचार कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. पण मद्याची दुकाने आणि पब रात्रभर सुरु राहणार आहेत का? संख्य कमी असल्याने पोलिस यंत्रणेवर आधीच दबाव असल्याचे माध्यमांमधून समोर येत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा ‘नाइट लाइफ’ वेळी महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम आहेत का? आणि सरकारने असा निर्णय घेतला असेल तर रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे का? असे सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले. तीन आठवडयात प्रतिज्ञापत्र सादर करा व विविध तंज्ञामार्फत आढावा घ्यावा असे आदेश सरकारला दिले. जोपर्यंत उच्च न्यायालयाचे समाधान होत नाही तोपर्यंत सरकारने नाईट लाइफच्या निर्णयाची अंमलबजावणी करु नये असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे मुंबईतील नाईट लाइफ बारगळण्याची शक्यता अधिक आहे.

March 13, 2015 in मुख्य पान
ठोस उपाययोजनांसाठी शेतकर्‍यांचे सर्वेक्षण 0

ठोस उपाययोजनांसाठी शेतकर्‍यांचे सर्वेक्षण

9708_8
शेतकर्‍यांनो सर्वेक्षणात सहभागी व्हा – ना. संजय राठोड
यवतमाळ, दि. १३ – राज्यात सातत्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असल्याने या आत्महत्यांमागील कारणे शोधून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनातर्फे विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांत शेतकर्‍यांच्या सर्वेक्षणाचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. या सर्वेक्षणात शेतकर्‍यांची सविस्तर माहिती संकलित करून त्यातून निघणार्‍या निष्कर्षांमधून शेतकर्‍यांसाठी ठोस उपाय योजले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन संपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन महसूल राज्यमंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
महसूल मंत्रालयाच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक काढून यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकर्‍यांचे शंभर टक्के सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले. या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी इत्यादी तालुकापातळीवरील अधिकार्‍यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीकडे तालुक्यातील प्रत्येक गावाचे सर्वेक्षण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी देखरेख व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंडळस्तरावर मंडळ निरीक्षकाच्या अध्यक्षतेखाली गाव पातळीवरील कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आदी अधिकार्‍यांचा समावेश असलेली समिती गठीत करून, या समितीने त्यांच्या अखत्यारित सर्व गावांच्या शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सर्वेक्षणात शेतकर्‍याची संपूर्ण वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील, शेतीचा प्रकार, कौटुंबिक माहिती, पत्नी व मुलांची माहिती, शेतीशिवाय उत्पन्नाचे इतर साधन असल्यास त्याची माहिती, गुरे, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी आदी जनावरांचा तपशील, राष्ट्रीयकृत बँक, विविध कार्यकारी सोसायटी, सहकारी संस्था, नागरी पतसंस्था, खासगी बँकेच्या कर्जाची माहिती, नियमित परतफेड आहे किंवा नाही याचा तपशील, खासगी व्यक्ती, नातेवाईक यांच्याकडून घेतलेले कर्ज, उसनवारीची माहिती, मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास त्याचा तपशील, घरातील धार्मिक कार्य, विवाह आदींसाठी असलेले आर्थिक नियोजन, कुटुंबातील व्यक्तींचा विमा उतरविला असल्यास त्याची माहिती, घरात कमावती व्यक्ती असल्यास त्याची माहिती व अनुषंगाने मिळणारी इतर सर्व माहिती गोळा करून ती या सर्वेक्षणात संकलित केली जाणार आहे.
हे सर्वेक्षण दीड महिन्यात पूर्ण करून आयुक्तांमार्फत अहवाल शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करताना शेतकर्‍यांची वस्तुस्थिती समोर येईल याची अधिकार्‍यांनी दक्षात घेण्याची सूचना करून, शेतकर्‍यांनी आपल्या गावात हे सर्वेक्षण सुरू असताना परिपूर्ण माहिती सादर करावी, असे आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

 

March 13, 2015 in मुख्य पान
मुंबईकरांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर 0

मुंबईकरांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर

images (7)
मुंबई, दि. १३ – टोलप्रश्नामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर धावून आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सचिनने मुंबईकरांचा त्रास कमी करण्याची मागणी केली आहे. क्रिकेटच्या मैदानात तूफान बॅटिंग करणारा आणि खासदार असलेल्या सचिनने मुख्यमंत्र्यांना २० फेब्रुवारी रोजी लिहीलेल्या पत्रात टोलप्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना सचिन खारघर टोलनाक्याजवळील ट्रॅफिकमध्ये अडकून पडला होता. त्यामुळे त्याला मुंबईकरांना रोज सामो-या जाव्या लागणा-या समस्येची जाणीव झाली. मुंबईतील अनेक टोलनाक्यांवर रोज अशीच वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणही खूप वाढते, या सर्व समस्या लक्षात आल्यानेच सचिनने पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहीले.
शहरातील विविध टोलनाके, त्यामुळे उद्भवणा-या ट्रॅफिकच्या समस्येमुळे मुंबईकरांना मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागत आहे, असे सचिनने पत्रात म्हटले आहे. तसेच टोल वाढवूनही रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचेही सांगत त्याने नाराजी वर्तवली असून या प्रक्रियेचा फेरविचार करण्यात यावा आणि मुंबईकरांचा त्रास कमी करावा अशी अपेक्षा त्याने पत्रात व्यक्त केली आहे. तसेच सायन-पनवेल मार्गावरील नव्या टोलनाक्यासह एकूण नऊ टोलनाक्यांवरील बिकट परिस्थितीही त्याने पत्राद्वारे निद्रशनास आणून दिली आहे. हे टोलनाके कमी करण्याची गरज असल्याचे मतही त्याने मांडले आहे. टोलनाक्यांजवळ उद्भवणारी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल असा सल्लाही सचिनने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्याचा विषय राज्यभरात गाजत आहे. मनससेह विविध राजकीय पक्षांनी टोलप्रश्नी आंदोलने केली आहेत. आता खुद्द सचिन तेंडुकरनेच याप्रश्नी आवाज उठवल्यानंतर तरी सरकार याकडे गांभीर्याने बघेल का आणि नागरिकांचे प्रश्न सुटतील का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

March 13, 2015 in मुख्य पान
अर्थमंत्र्यांचा सभागृहातच मुक्काम 0

अर्थमंत्र्यांचा सभागृहातच मुक्काम

2015-03-13~kerala1_ns
कोची, दि. १३ – केरळमध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना सभागृहात अभूतपूर्व गोंधळ माजला. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालत अर्थमंत्री के. एम. मणी यांना धक्काबुक्की केल्याने देशातील सर्वात सुशिक्षितांचे राज्य अशी ओळख मिरवणा-या केरळची मान खाली गेली.
अर्थमंत्री मणी यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप असून त्यांना सभागृहात प्रवेश करू देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला होता.हा विरोध पाहून मणी यांच्यासह ७० हून अधिक आमदारांनी काल रात्रीपासून सभागृहातच मुक्काम केला. या सर्व गोंधळातच आज अर्थसंकल्प सादर करणे सुरू झाले असता विरोधकांनी निदर्शने करत गोंधळ माजवला, विधानसभा अध्यक्षांची खुर्चीही उखडून फेकून दिली तसेच मणी यांना धक्काबुक्कीही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना थोडा लाठीमारही करावा लागला. या सर्व गोंधळातच मणी यांनी त्यांचे भाषण कसेबसे पूर्ण केले.
केरळमध्ये बारच्या नुतनीकरण परवाने देण्यासाठी मणी यांनी एक कोटी रुपयांची लाच घेतली असा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर लावला आहे. केरळमध्ये छोटी व मध्यम हॉटेल्स व वाईन शॉपमध्ये दारू विक्रीवर बंदी असून थ्री, फोर व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दारू विक्री करता येते. त्यामुळे या हॉटेल्सच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी अर्थमंत्री मणी यांना लाच मागितली असा आरोप विरोधकांनी केला आहे.

March 13, 2015 in देश-विदेश