पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2015

 दीक्षाभूमीवर लागणार सीसीटीव्ही 0

दीक्षाभूमीवर लागणार सीसीटीव्ही

download
नागपूर : नवनियुक्त अध्यक्ष रमेश शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची पहिली बैठक पार पडली. तीत दीक्षाभूमी येथे ५० लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची निविदा मंजूर करण्यात आली.
दीक्षाभूमी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित काम महापालिकेमार्फत केले जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या कामासाठी मे. टेक्नोकी सोल्युशन यांची १२.६ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. रिलायन्सने ४ जी साठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेची दखल घेत रिलायन्सचे सर्व खोदकाम थांबविण्याचे आदेश सिंगारे यांनी बैठकीत दिले. यापूर्वी करण्यात आलेले खोदकाम झोननिहाय बुजविण्यात यावे. सहाय्यक आयुक्तांची याची खातरजमा करावी व त्यानंतरच खोदकाम सुरू करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

 

March 17, 2015 in मुख्य पान
पत्ते खेळणे जुगार नव्हे, शारीरिक खेळ! 0

पत्ते खेळणे जुगार नव्हे, शारीरिक खेळ!

unknown-3
नवी दिल्ली: पत्ते खेळणे हे करमणुकीचे साधन किंवा जुगारी खेळ मानावे हे केंद्र सरकारचे म्हणणे अमान्य करून सर्वोच्च न्यायालयाने पत्ते खेळणे हा शारीरिक खेळ असल्याचे जाहीर केले आहे.
सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या खंडपीठाने म्हटले की, पत्ते खेळताना हातांचा वापर केला जातो, त्यामुळे ते शारीरिक खेळाच्या प्रकारातही मोडू शकते.
न्यायालयाने हा निकाल पत्त्यांचे जोड उत्पादित करणाऱ्या उत्पादकांवर किती दराने उत्पादन शुल्क आकारायचे या संबंधीच्या वादात न्यायालयाने अलीकडेच हा निकाल दिला. शारीरिक खेळांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांच्या उत्पादनावर पाच टक्के अशा सवलतीच्या दराने उत्पादन शुल्क आकारले जाते. शारीरिक श्रमाविना खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या क्रीडासाहित्यावर एक टक्का जास्त म्हणजे सहा टक्के दराने उत्पादन शुल्क आकारले जाते.
केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल रोहटगी यांचे असे म्हणणे होते की, पत्ते खेळणे हा काही शारीरिक श्रमाचा खेळ नाही. त्यामुळे हा खेळ खेळण्यासाठी वापरला जाणारा पत्त्यांचा जोड हा ‘क्रीडासाहित्य’ या प्रकारात गणला जाऊ शकत नाही. परिणामी त्याला उत्पादन शुल्काचा सवलतीचा दर लागू होऊ शकत नाही. गेमिंग पार्लरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिन टेबल्स, बिलियर्ड्स किंवा कसिनो यासारख्या करमणुकीच्या किंवा जुगारी खेळांप्रमाणे पत्ते हा खेळ आहे, असे रोहटगी यांचे म्हणणे होते. कंपनीचे वकील अ‍ॅड. व्ही. लक्ष्मी कुमारन यांचे म्हणण असे होते की, सरकारची ही व्याख्या मान्य केली तर बुद्धिबळालाही खेळ म्हणता येणार नाही. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले.

March 17, 2015 in मुख्य पान
जाट आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द 0

जाट आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

2015-03-17~SC-1_ns
नवी दिल्ली, दि. १७ – युपीए सरकारने गेल्या वर्षी जाट समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने मंगळवारी रद्द केले.जातिनिहाय आरक्षणाची आवश्यकता नाही असे परखड मतंही सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता केंद्र सरकारमधील नोकरी व शिक्षणात जाट आरक्षण लागू राहणार नाही.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी युपीए सरकारने जाट समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण दिले होते. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. राजकीय हितासाठी जातिनिहाय आरक्षण दिले जात असेल ते चुकीचेच आहे असे सांगत सुप्रीम कोर्टाने जाट आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने काढलेली अधिसूचना रद्द केली. जात ही आरक्षणाचा आधार ठरु शकत नाही. त्या जातीची विद्यमान सामाजिक व आर्थिक या बाबींचा अभ्यास करुनच आरक्षण द्यायला पाहिजे असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे केंद्रातील जाट आरक्षण रद्द झाले आहे. मात्र ज्या ९ राज्यांनी जाट समाजाला आरक्षण दिले आहे तेथील जाट आरक्षण कायम राहणार आहे. या राज्यांमधील जाट आरक्षणाविरोधातही स्थानिक हायकोर्टांमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. संविधानात जातीनुसार आरक्षण दिले जाते. सुप्रीम कोर्ट संविधानापेक्षा मोठे आहे का असा सवाल जाट समाजाचे नेते यशपाल मलिक यांनी उपस्थित केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करु व वेळ पडल्यास आंदोलन करु पण आमचा हक्क सोडणार नाही असे मलिक यांनी स्पष्ट केले.

March 17, 2015 in मुख्य पान
 अरुण गवळी नागपूर कारागृहात 0

अरुण गवळी नागपूर कारागृहात

pg_3_ARUN_GAWLI
नागपूर : नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईचा डॉन अरुण गवळी याला सोमवारी सकाळी ९ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. त्यामुळे या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात आली आहे.
मुंबईत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी गवळीसह ११ जणांना मोक्का विशेष न्यायालयाने २४ आॅगस्ट २०१२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्येची ही घटना २ मार्च २००७ ला घडली होती. जन्मठेप झाल्यापासून गवळीला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. खून, खंडणी वसुली, दंगल घडविणे, आदी गुन्हे त्याच्याविरुद्ध पोलिसात दाखल आहेत. गवळी हा तळोजा कारागृहात असताना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईच्या जे.जे. इस्पितळात दाखल करण्यात आले होते. अरुण गवळीच्या जीवनावर ‘डॅडी’ नावाचा चित्रपट बनत आहे. या चित्रपटात डॅडीची भूमिका वठविणारा अभिनेता अर्जुन रामपाल याने इस्पितळात गवळीची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीने वादळ उठले होते.

 

March 17, 2015 in मुख्य पान
गोर बंजारा समाजाचा उद्या मुंबई येथे महामोर्चा 0

गोर बंजारा समाजाचा उद्या मुंबई येथे महामोर्चा

IMG_20150317_120408
कल्याण : बंजारा समाजाला अनुसुचित जमातीत समावेश करण्यासाठी तसेच क्रिमिलीअरची अट रद्द करून मिळणे व बंजारा समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी बंजारा समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येवुन “गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती” गठीत केली असुन या समितीचे नेतॄत्व बंजारा समाजाचे धर्मगुरू तपस्वी संत रामरावजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनांचे अध्यक्ष करत असुन मोर्चाचे नेतॄत्व तपस्वी संत रामरावजी महाराज करणार आहेत.त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातुन किमान तीन ते चार लाख बंजारा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत.तरी सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की बंजारा समाजाला संविधानिक हक्क मिळवुन देण्यासाठी मोठया संखेने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे कल्याण तालुका अध्यक्ष सतिष राठोड यांनी केले आहे.

March 17, 2015 in महाराष्ट्र
 भूसंपादन विधेयकाला विरोध- दिल्लीत लाठीमार 0

भूसंपादन विधेयकाला विरोध- दिल्लीत लाठीमार

Youth Congress workers protest
नवी दिल्ली- भूसंपादन विधेयकाला विरोध करणा-या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सोमवारी दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला. तसेच जमावाला पांगविण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात आले.
केंद्र सरकारने लोकसभेत मंजूर केलेल्या भूसंपादन विधेयकाला काँग्रेससह अन्य सर्व विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. काँग्रेसने या विधेयकाविरोधात सोमवारी दिल्लीत निदर्शने केली. जयराम रमेश, राज बब्बर, रणदीप सुरजेवाला आणि युवक काँग्रेसचे अमरिंदरसिंह ब्रार यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्ग दरम्यान रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किसान विरोधी नरेंद्र मोदी, अशा सरकार विरोधात घोषणा दिल्या.
या रॅलीला दिल्ली पोलिसांनी पुढे जाण्यासाठी रोखून धरले. यामुळे कार्यकर्त्यांनी सुरक्षाकडे भेदण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार आणि नंतर पाण्याचे फवारे मारुन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यात अमरिंदरसिंह ब्रार यांच्यासह काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाब नबी आजाद, आनंद शर्मा, जयराम रमेश, अंबिका सोनी, अहमद पटेल यांनी जंतर मंतर येथे उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या घटनास्थळी पोहचल्या नाहीत, मात्र त्यांनी अहमद पटेल यांच्यामार्फत कार्यकर्त्यांना एकजूट राखण्यासाठी संदश पाठवला. यात त्यांनी भूसंपादन विधेयकाला काँग्रेसचा कायम विरोध राहिल आणि शेतक-यांसाठी आम्ही कायम साथ देण्याची हमी दिली. तसेच हे विधेयक मागे घेण्यासाठी आंदोलन सुरुच ठेवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.
तर याविरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नोयडातील भट्टा- परसौल गावापासून शुक्रवारी पायी निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा रविवारी रात्री राजघाट येथे पोहचला. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले असून, राज्यसभेत ते मंगळवारी सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.
तर जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी यांच्या १० लाखाच्या सुटावर सडकून टिका केली. एका साबरमतीच्या संताने आयुष्यभर साधे जीवन जगले आणि आजचे साबरमतीचे महंत १० लाखाचे सूट घालून फिरताहेत, अशी टिका त्यांनी केली. शेतक-यांसाठी जमीन म्हणजे त्यांची आई आहे. मातेसमान ही जमीन कोणीही त्याच्यापासून बळकावून घेऊ शकत नाही, केंद्र सरकारचे हे मनसुबे आम्ही उधळून लावू, असेही ते म्हणाले.

March 16, 2015 in मुख्य पान
विधान परिषदेचे सभापती देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर 0

विधान परिषदेचे सभापती देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

shivajirao-deshmukh

मुंबई- विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव ४५ विरूद्ध २२ असा मंजूर झाला. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात ४५ मते मिळाली तर विश्वासाच्या बाजूने २२ मते पडली. शिवसेनेने मतदानावेळी सभात्याग केला.
राष्ट्रवादीचे आमदार अमरजित पंडित यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाच्या बाजूने राष्ट्रवादीला भाजपाने उघड साथ दिली. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी हा अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य आहे व लोकशाहीचा गळा घोटणारा आहे असे विधान परिषदेत या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सांगितले.
सभापतींच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

March 16, 2015 in मुख्य पान
नितीशून्य व लोकशाहीतील संकेतांचे वस्त्रहरण करणारे राजकारण!- खा. अशोक चव्हाण 0

नितीशून्य व लोकशाहीतील संकेतांचे वस्त्रहरण करणारे राजकारण!- खा. अशोक चव्हाण

ashok-chavan
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भाजप व राष्ट्रवादीवर टीका
मुंबई – विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून चुकीचा पायंडा पाडण्यात आला आहे. हा प्रस्ताव म्हणजे केवळ खुर्चीच्या हव्यासापोटी नितीशून्य व लोकशाहीतील संकेतांचे वस्त्रहरण करणारे राजकारण असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
अविश्वास प्रस्तावानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शिवाजीराव देशमुखांसारख्या निष्कलंक, कर्तव्यदक्ष व ज्येष्ठ नेत्याबाबत झालेले राजकारण अत्यंत दुर्देवी आहे. विधान परिषदेचे सभागृह राजकारण करण्यासाठी नव्हे तर राजकीय चौकटीच्या पलिकडे जाऊन राज्याच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी स्थापन झाले आहे. त्यामुळेच 1999 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर देखील तत्कालीन सभापती श्री.ना.स. फरांदे यांनी 2004 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता, याचे स्मरणही खा. अशोक चव्हाण यांनी करून दिले.
राष्ट्रवादी सातत्याने संख्याबळाची भाषा करीत असल्याने काँग्रेसने त्यांना सभापती तर काँग्रेसला उपसभापती पद, असा प्रस्ताव दिला होता. परंतु, राष्ट्रवादीला भाजपसोबतच जायचे असल्याने त्यांनी हा प्रस्ताव अमान्य केला. यामुळे भाजप व राष्ट्रवादीची आघाडी पुन्हा एकदा उघड झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे पूर्ण निकाल जाहीर होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला विनाअट पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भविष्यात राष्ट्रवादीचे राजकारण कोणत्या दिशेने असेल आणि त्यांना काय साध्य करायचे आहे, ते या निमित्ताने जनतेसमोर उघड झाल्याची टीकाही त्यांनी केली. सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे अर्थात काँग्रेसच्या मित्रपक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी काँग्रेसने सहकार्याची भूमिका घेतली होती. त्याची आज राष्ट्रवादी काँग्रेसने ‘चांगली’ परतफेड केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

March 16, 2015 in विदर्भ
करिअर घडविण्यासाठी स्कील हस्तगत करा - राज जाधव, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एक्सप्लोर’चे उद्घाटन 0

करिअर घडविण्यासाठी स्कील हस्तगत करा – राज जाधव, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एक्सप्लोर’चे उद्घाटन

_DSC0258

यवतमाळ, १६- तुम्ही स्वत:चे करिअर घडविण्यासाठी सर्वप्रथम मल्टिटास्किंग व मल्टिलँग्वेज स्कील हस्तगत केले पाहिजे. मी ग्रामीण भागातला आहे, मी मुलगा किंवा मुलगी आहे ही मानसिकता बाळगू नये. सर्व जग तुमच्यासाठी खुले आहे. स्वत:वर विश्वास ठेवून स्वत:च्या कौशल्याचा वापर फक्त ग्रेड मिळविण्यासाठी न करता करिअर घडविण्यासाठी व समाजासाठी करावा. स्वत:च्या मेहनतीने व अनुभवाने सतत समोर जाण्याचा प्रयत्न करावा. आपल्या तर्कशास्त्राचा जास्तीत जास्त वापर करून स्वत: काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांची उत्कृष्ट प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन डी. लिंक मुंबई व गोवा विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट राज जाधव यांनी केले.
स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीयस्तरावरील ‘एक्सप्लोर-१५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दिपप्रज्वलन विजय ठाकरे (मॅनेजिंग डायरेक्टर सीम सॉफ्ट टेक्नॉलॉजी) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अजाबराव वातीले, सचिव डॉ. शीतल वातीले, संचालक पवन वातीले, प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर विभागप्रमुख प्रा. हेमंत बारडकर, प्रा. डॉ. मिलिंद सरोदे, प्रा. विजय नेवे, संयोजक प्रा. महेश नालमवार, आयोजक समिती सचिव प्रा. मिनल खंडारे व सहसचिव प्रा. डॉ. अमरदीप शेंडे उपस्थित होते.
पुढे बोलतांना राज जाधव म्हणाले की, येणाºया काळामध्ये जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ओपन सोर्स कम्युनिटीची स्थापना व त्याचा प्रसार करण्याकरिता सर्वतोपरी तांत्रिक सहकार्य करण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये स्मार्ट होम प्रणाली विकसित करण्याबदल सविस्तर मार्गदर्शन केले. जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कक्ष प्रस्थापित करण्यात आलेला असून त्या अंतर्गत विविध आॅपरेटिंग सिस्टिम, लिनक्स, फेडोरा व इतर यांचा विस्तृत प्रमाणामध्ये वापर करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी राज जाधव यांनी महाविद्यालयातील आयोजित सभेत सचिव डॉ. शीतल वातीले, प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर यांच्या सोबत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासंबंधी तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व महाविद्यालयाची प्रगती अशा विविध विषयांवर चर्चा केली. इजिनिअरिंग एज्युकेश व इंडस्ट्रीज यामध्ये इंटरअ‍ॅक्शन करून दुवा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. याप्रसंगी संस्था सचिव डॉ. शीतल वातीले म्हणाले की, जगदंबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था आपल्या कार्यात सदैव अग्रेसर राहिली आहे. एका छोट्याशा रोपट्यापासून संस्थेची झालेली सुरुवात ही मोठ्या वटवृक्षात रूपांतरीत झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चांत दर्जेदार शिक्षण देण्याचा घेतलेला ध्यास पूर्ण करण्याकरिता संस्था सदैव प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.
एक्सप्लोर-१५ या दोनदिवसीय टेक्निकल इव्हेंटमध्ये देशभरातील सुमारे १४०० विद्यार्थी सहभागी झाले असून त्यामध्ये प्रोजेक्ट प्रेझेंटेशन लॅन गेमिंग, पेपर पेझेंटेशन, वेब डिझाइनिंग, पोस्टर पेझेंटेशन, रोबोवार, रोबोरेस, मॉडेल मेकिंग, ब्लाइंड-सी सर्किट डिझाइनिंग, गुगलर अशा विविध तांत्रिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. संयोजक प्रा.महेश नालमवार एक्सप्लोर – १५ ची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे संचालन रूपा खंडारकर व विक्की बुंदीले तसेच आभार आयोजक समिती सचिव प्रा.मिनल खंडारे यांनी केले.

March 16, 2015 in विदर्भ
पांढरकवडा तालुक्यात तांडव, तहसीलचे छत उडाले 0

पांढरकवडा तालुक्यात तांडव, तहसीलचे छत उडाले

PKD
पांढरकवडा, दि. १६ – तालुक्यात रविवारी रात्री दरम्यान वादळी वाºयासह आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचा सफाया झाला. वादळाच्या तडाख्यात तहसील कार्यालयाचे छत उडून गेले. अवकाळी पावसाच्या तांडवामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक गावातील वृक्ष उन्मळून पडली. या तडाख्यात विजेचे पोल वाकून ताºया तुटल्याने वीज गुल झाली होती. संकटाच्या वेळी मदत करणाºया तहसील कार्यालयाचे छत उडून गेल्याने महत्वाचे कागदपत्र पावसाच्या पाण्याने ओली झाली. संगणकही खराब झाले. तहसीलचे सहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. आधीच कोरड्या दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे पार कंबरडेच मोडून गेले आहे. हाता तोंडाशी आलेला रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पीक मातीमोल झाले आहे. महसूल प्रशासनाने तत्काळ सव्हेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

March 16, 2015 in विदर्भ
मिनी ट्रकच्या धडकेत एक ठार 0

मिनी ट्रकच्या धडकेत एक ठार

1
आर्णी, दि. १६ – मिनी ट्रकने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना माहूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजारसमितीसमोर घडली. शेख मजीद शेख कट्टू (५०) असे मृताचे नाव आहे. ही घटना काल साायंकाळी ६ वाजता दरम्यान घडली. मिनी ट्रक क्र. एमएच २९ एम ३८५ बाजार समिती मधून बाहेर येत असताना शे. मजीद शे. कट्टू याला जबर धडक दिली. अपघात झाल्यानंतर लगेच सामाजिक कार्यकर्ते फयाज सय्यद यांनी जखमी शे. मजीदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाविरूद्घ गुप्हा दाखल केला.

 

March 16, 2015 in विदर्भ
प्रेमप्रकरणातून युवकाचा खून 0

प्रेमप्रकरणातून युवकाचा खून

images
पुसद (यवतमाळ), दि. १६ – शेतात गेलेल्या एका युवकाचा प्रेमप्रकरणातून खुन केल्याची घटना आज सोमवारी तालुक्यातील बेलगव्हाण येथे उजेडात आली.
नवनीत रामराव बाजगिरे (२५) रा. बेलगव्हाण असे मृतकाचे नाव आहे. १५ मार्च रोजी हा युवक स्वत:च्या शेतातच कामाला गेला होता. दरम्यान रात्रभर तो घरी न आल्याने आज सोमवारी त्याची आई कौसल्या बाजगिरे व नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी नवनीत रक्ताच्या थारोळ््यात मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पुसद ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्देदनासाठी पाठविला. प्रेमप्रकरणातून मुलाचा अज्ञात मारेकºयांनी खून केल्याची तक्रार कौसल्या बाजगिरे यांनी दिली. त्यावरून ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरूद्घ खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुरळकर, नाईक करीत आहे.

March 16, 2015 in विदर्भ
हल्ल्याला महिना पूर्ण मात्र पानसरेंचे मारेकरी मोकाट 0

हल्ल्याला महिना पूर्ण मात्र पानसरेंचे मारेकरी मोकाट

pansare
मुंबई – महाराष्ट्रातील विचारवंत आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला आज सोमवारी महिना पूर्ण झाला. हल्ल्याला महिना पूर्ण होऊनही अद्यापही पानसरेंचे मारेकरी पोलिसांना शोधता आलेले नाहीत.
अज्ञात बंदुकधा-यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पानसरेंनी चार दिवस मृत्यूशी झुंज दिली अखेर २० फेब्रुवारीला त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला हा महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेवरील हल्ला असून, पानसरेंच्या मारेक-यांना पकडण्यात कुठलीही कसूर ठेवणार नाही असे त्यावेळी सांगितले होते.
आता महिना होऊनही आरोपी सापडत नसल्याने सरकार नक्की करतय काय ?, सरकारचा हेतू प्रामाणिक आहे ना ? डॉ. नरेंद्र दाभोलकरांप्रमाणेच या प्रकरणाचे होणार नाही ना ? असे प्रश्न जनता विचारत आहे. गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना पकडण्यासाठी पोलिसांची २५ विशेष पथके तयार करण्यात आली. मात्र इतका मोठा पोलिस फौजफाटा कामाला लावूनही पानसरेंच्या हत्येसंदर्भातील ठोस धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
मारेक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी बक्षिसाची रक्कम पाच लाखावरुन पंचवीस लाखापर्यंत वाढवली पण त्याचाही काहीही फायदा झालेला नाही. १६ फेब्रुवारीला गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा नेहमीप्रमाणे शिवाजी विद्यापीठ परिसरातून मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना, दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर एकूण पाच गोळया झाडल्या.
त्यातील तीन गोळया गोविंद पानसरे यांना लागल्या. एक गोळी त्यांची पत्नी उमा यांना चाटून गेली. पानसरे यांना लगेचच कोल्हापूरच्या अँस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर चार दिवस उपचार सुरु होते. प्रकृती नाजूक असली तरी स्थिर होती. त्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांना एअर अॅॅम्ब्युलन्सने मुंबईच्या ब्रीच कँण्डी रुग्णालयात हलवण्यात आले त्याचदिवशी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
पानसरे यांचीही अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणेच हत्या झाली. दाभोलकर सकाळी मॉर्निंगवॉकला बाहेर पडले असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर जवळून गोळया झाडून निर्घुण हत्या केली होती. दाभोलकर यांच्या हत्येला दीडवर्षाहून अधिक झाली मात्र अद्यापही त्यांचेही मारेकरी सापडलेले नाहीत.

March 16, 2015 in मुख्य पान
 विरोधकांना घाबरवण्यासाठी हेरगिरी का 0

विरोधकांना घाबरवण्यासाठी हेरगिरी का

Rajya Sabha
नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची चौकशी करण्याच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सोमवारी संसदेमध्ये केंद्र सरकारला जाब विचारला.
सरकारचे हे पाऊल लोकशाही मूल्य आणि स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. हे या आधी देशात कधीही झाले नव्हते. बूटाचे माप, सवयी, कोण मित्र, सहाकारी त्यांचे दूरध्वनी क्रमांक याचा काय संबंध ? हे सर्व आकलनापलीकडचे आहे असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले.
सभागृहाच्या आत आणि बाहेर नेत्यांकडून जे मुद्दे उपस्थित केले जातात त्यासाठी त्यांना घाबरवण्याची सरकारची ही पध्दत आहे का? राजकीय पक्षांना घाबरवण्यासाठी अशा प्रकारची हेरगिरी केली जात आहे का? असे प्रश्न गुलाम नबी आझाद यांनी सरकारला विचारले.
सरकारकडून या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, काँग्रेस तीळा एवढीही जी गोष्ट नाही त्याचा डोंगर करत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव व्हीआयपी अतिमहत्वाच्या व्यक्तीची माहिती ठेवली जाते. ही हेरगिरी नसून, याआधीही अतिमहत्वाच्या व्यक्तीबद्दल जाऊन चौकशी केली आहे असे जेटलींनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी घरात नसताना त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली होती. मोदींच्या विरोधकांवर पाळत ठेवण्याच्या गुजरात मॉडेलवर काँग्रेसने जोरदार टीका करताना पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली होती.

 

March 16, 2015 in मुख्य पान
 महिला अत्याचारांत महाराष्ट्र पहिला 0

महिला अत्याचारांत महाराष्ट्र पहिला

Rape

नवी दिल्ली – पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्य अशी ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेनं खाली जाईल, अशी आणखी एक माहिती समोर आली आहे. ‘गेल्या वर्षभरात बलात्कार व महिलांवरील अत्याचारांच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत,’ असं केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी आज लोकसभेत सांगितलं.
महिलांवरील अत्याचाराची माहिती देताना त्या बोलत होत्या. ‘महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार दिवसागणिक वाढतच आहेत, अशी कबुली देतानाच, ‘महिलांच्या सुरक्षेला सरकारचे पहिले प्राधान्य आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी महिलांवरील अत्याचाराची आकडेवारीच दिली. त्यानुसार देशभरात गेल्या वर्षात बलात्कार व महिलांवरील हल्ल्यांच्या एकूण १,१७,०३५ घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक १३,८२७ तक्रारींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्या खालोखाल मध्य प्रदेश १३,३२३ तर, आंध्र प्रदेशात १३,२६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

 

March 16, 2015 in मुख्य पान
दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ 0

दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ

milk-collection
मुंबई – आरोग्यासाठी पोषक असलेल्या दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याबद्दल थेट सुप्रीम कोर्टानेही चिंता वाहिली असतानाच, मुंबईसह ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमध्ये तब्बल ४६ टक्के ग्राहकांच्या दुधात ‘काळेबेरे’ असल्याचे उघड झाले आहे.
‘शुद्ध दूध, आपला अधिकार’ या मोहिमेंतर्गत मुंबई ग्राहक पंचायतीने सहा महिन्यांत पाच जिल्ह्यांतील सुमारे ६५० नमुन्यांची प्रमाणित पद्धतींनी तपासणी केली. त्यात खुल्या बाजारातील सुट्या दुधाबरोबरच राज्यातील नामांकित दूध उत्पादकांच्या दुधाचेही नमुने होते. तपासणीअंती काही नामांकित ब्रँडच्या दुधाचा स्निग्धांश व इतर घनपदार्थ अपेक्षित मानकापेक्षा कमी आढळले.
‘शुद्ध दूध, आपला अधिकार’
मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे ‘शुद्ध दूध, आपला अधिकार’ या मोहिमेंतर्गत सहा महिने ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्याअंतर्गत डेअरी तज्ज्ञ डॉ. राजेंद्र कोकणे आणि डॉ. रवींद्र नाईक यांनी ५० कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांतील या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी दूध तपासणी आणि जागरुकता शिबिरे घेतली. त्यात ग्राहकांना दुधाचे नमुने तपासणीसाठी कसे घेऊन यायचे याविषयी स्पष्ट सूचना असणारे पत्रक दिले. त्यानुसार आलेल्या सुमारे ६५० नमुन्यांची ‘ब्रँडेड दुधाचे पाऊच काळजीपूर्वक बघणे’, ‘लॅक्टोमीटरद्वारे घनता मोजणे’, ‘एनडीडीबी किटच्या सहाय्याने भेसळ ओळखणे’ आणि ‘डीएसके मिल्कोट्रॉन अॅनलायझरच्या सहाय्याने दुधातील घटकांची माहिती घेणे’ अशा चार पद्धतींनी तपासणी करण्यात आली.

 

March 16, 2015 in महाराष्ट्र
लुटमार करणाºया चार चोरट्यांना मुद्देमालासह अटक 0

लुटमार करणाºया चार चोरट्यांना मुद्देमालासह अटक

IMG-20150315-WA0043
यवतमाळ, दि. १५ – डोळ््यात मिरचीपूड टाकून ५० हजाराची रोकड पळविणाºया चोरट्यांच्या टोळीला चोविस तासाच्या आत मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली. रोहित नरेश चव्हाण (२५) रा. भोसा रोड, देवानंद भिवनकर (२७) रा. कोळंबी, अर्जुन दुर्गे रा. यवतमाळ, लक्ष्मण लालसिंग राठोड (३२) रा. लोणीघाटाणा अशी चोरट्यांची नावे आहे.
पांढरी येथील कृषी केंद्र बंद करून विनोद रामराव लाखेकर (४३) रा. उमरसरा हे परत येत होते. दरम्यान चार चोरट्यांनी लाखेकर यांना रस्त्यात अडवून डोळ््यात मिरचीपूड फेकली. त्यांच्याजवळ असलेले मध्यवर्ती व स्टेट बँकेचे पासबुक, सातबारा, ५० हजार रुपये रोकड असलेली काळी बॅग असा ऐवज लुटला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेची पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे निर्देश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी तपासाची तक्रे फिरविली. लुटमार प्रकरणी रोहित चव्हाण, देवानंद भिवनकर, अर्जुन दुर्गे, लक्ष्मण राठोड या चार चोरट्यांनी ताब्यात घेवून विचारपूस केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर लुटमार केल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून काळ््या रंगाची बॅग, कागदपत्रे, रोख १८ हजार ४०० रुपये दोन मोटर सायकल असा एकूण ९८ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सपोनि कडू, विकास खडके, ओमप्रकाश यादव, सुनील खंडागळे, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाडे, बबलू चव्हाण, ममता देवतळे, प्रदीप तांबेकर आदींनी केली आहे.

March 15, 2015 in विदर्भ
इचोरी घाटात दुचाकी चालकाला लुटले, राकाँच्या पदाधिकाºयांनी चोरट्यांना पकडले 0

इचोरी घाटात दुचाकी चालकाला लुटले, राकाँच्या पदाधिकाºयांनी चोरट्यांना पकडले

download (2)
यवतमाळ, दि. १५ – यवतमाळवरून दारव्हा येथे जाणाºया दुचाकीचालकाला अडवून लुटल्याची घटना आज रविवारी इचोरी घाटात सायंकाळी ५ वाजता घडली. या बाबतची माहिती मिळताच राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकारी पप्पु उर्फ विवेक गावंडे यांनी पाठलाग करून लुटमार करणाºया तिन्ही आरोपींना पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.
आशीष नागेलवार (२६) रा. लोणबेहळ ता. आर्णी हा युवक आपल्या दुचाकीने (एम. एच. २९/ यू ५१५) यवतमाळवरून दारव्हा येथे जात होता. अशातच आज रविवारी सायंकाळी ५ वाजता इचोरी फाट्याजवळ घाटात एम. एच. ३१/ ३७०८ क्रमांकाच्या पल्सरने आलेल्या तीन युवकांनी आशीषची दुचाकी अडवून मोबाईल व एक हजार ५०० रुपये जबरीने हिसकावून घेतले. आशीषने हा प्रकार यवतमाळ येथील मित्र राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी विवेक गावंडे यांना दिली. त्यावरून गावंडे आपल्या सहकार्यासह दारव्हा मार्गाने निघाले. अशातच जांबवाडी येथील धाब्यावर पल्सर उभी दिसताच आरोपींना पकडून यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या ताब्यात दिले. नरेंद्र बाळकृष्ण सुखदेवे (३३), नरेंद्र वसंत रंगारी (२८) रा. इचोरी, सैय्यद अजमल सै. अमन (३५) रा. यवतमाळ अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

March 15, 2015 in विदर्भ
राज्यसरकारने घेतले दाभडीला दत्तक 0

राज्यसरकारने घेतले दाभडीला दत्तक

download (1)
ना. हंसराज अहीर यांची माहिती
आर्णी,दि. १५ – लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशातील शेतकºयांशी चर्चा केली होती. या घटनेला २० मार्च रोजी एक वर्षपूर्ण होत आहे. दाभडीत घडलेल्या शेतकरी आत्महत्येमुळे सरकार अस्वस्थ झाले आहे. गावचा व शेतकºयांचा सर्वांगिन विकास करण्यासाठी राज्य सरकारने दाभडीला दत्तक घेतले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभडीत ‘चाय पे चर्चा’ केली होती. त्याच गावात शेतकरी आत्महत्या करीत असल्याने सर्वांचे लक्ष दाभडीकडे वेधले आहे. २० मार्च रोजी काँग्रेसचे नेते दाभडी येथे येवून आंदोलन करणार आहे. याकडे ना. अहीर यांचे लक्ष वेधले असता म्हणाले की, काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यांना आताच हे का आठवले असा प्रश्न ना. अहीर यांनी उपस्थित केला. आंदोलन करणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. या गावचा विकास करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या वतीने दाभडी गाव दत्तक घेतल्याची घोषणा करीत असल्याचे सांगितले.
जुन्या भूमिअधिग्रहण कायद्यापेक्षा नवीन कायदा अधिक चांगला आहे. शेतकºयांच्या हितासाठी असलेला कायदा मंजूर व्हावा म्हणून जीवाचे रान करू असेही ना. अहीर म्हणाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ना. अहीर यांनी केली. आज दुपारी जवळा, शेलू, किन्ही या गावात जावून शेतीची पाहणी करून शेतकºयांशी संवाद साधला. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी सरकार कायमस्वरूपी उपाययोजना करीत असल्याचे सांगितले. यावेळी आ. प्रा. राजू तोडसाम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे आदी उपस्थित होते.

 

March 15, 2015 in मुख्य पान
ब्राझीलमध्ये बसला भीषण अपघात, ४२ ठार 0

ब्राझीलमध्ये बसला भीषण अपघात, ४२ ठार

brazil-bus-accident
रिओ दी जानेरो – दक्षिण ब्राझीलमध्ये रविवारी प्रवासी बस दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ४२ जण ठार झाले . घटनास्थळी बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे प्रवक्ते क्लाडिओ थॉमस यांनी सांगितले.
दोना फ्रान्सिस या प्रसिद्ध टूरिस्ट पॉईंटपासून काही अंतरावर हा भीषण अपघात घडला. या बसमधून सुमारे ५० प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अधिका-यांच्या माहितीनुसार यापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते.ही बस सुमारे ४०० मीटर खोल दरीत कोसळली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अद्याप याबाबतचा तपास सुरु आहे. गेल्या पाच वर्षात या मार्गावर झालेल्या अपघातात ६६ जणांचा मृत्यू झाला. याआधी २००७ मध्ये झालेल्या अपघातात २७ जण ठार झाले होते. १९९९ मध्ये झालेल्या अपघातात ३५ जण ठार झाले होते.

March 15, 2015 in देश-विदेश