पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2015

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वीची सुटका करण्याचा पाक कोर्टाचा आदेश 0

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वीची सुटका करण्याचा पाक कोर्टाचा आदेश

2015-03-13~lakhvi_ns
इस्लामाबाद, दि. १३ – मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याची तातडीने सुटका करण्याचा आदेश इस्लामाबाद कोर्टाने दिला आहे. लख्वी याने केलेल्या अर्जावरील सुनावणीदरम्यान न्या. नोरूल हक्क यांनी लख्वीचा याचिका मान्य करत त्याची तुरूंगातून सुटका करण्याचा आदेश दिला.
लख्वी हा फेब्रुवारी २००९ पासून तुरूंगात असून त्याच्यावर मुंबई हल्ल्याप्रकरणी खटला सुरू आहे. मात्र त्याच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने पाकिस्तानी न्यायालयाने गेल्या वर्षी त्याची सुटका केली होती. भारत सरकारने यावर नाराजी नोंदवत या निर्णयाचा निषेध केला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकारने लख्वीला दुस-या एका प्रकरणात पुन्हा ताब्यात घेतल्याने त्याचा तुरूंगातील मुक्काम कायम राहिला. मात्र आद पुन्हा इस्लामाबाद न्यायालायने त्याच्या सुटकेचा आदेश दिल्याने खळबळ माजली आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण मृत्युमखी पडले होते, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले होते.

March 13, 2015 in देश-विदेश
टिव्ही कार्यालयावर बॉम्बहल्ला 0

टिव्ही कार्यालयावर बॉम्बहल्ला

2015-03-12~01_ns
चेन्नई, दि. १२ – हिंदू संस्कृतीत मंगळसूत्राला विशेष असं स्थान असताना महिलांनी मंगळसूत्र घालायला हवं का? असा प्रश्न उपस्थित करीत या विषयी एका न्यूज चॅनेलने चर्चा (डिबेट )केल्यानं न्यूज चॅनेलच्या कार्यालयावर एका हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे.
चेन्नईतील तमीळ भाषेतील ‘पुथीया थालाईमरई’ असे न्यूज चॅनेलचे नाव असून या चॅनेलने जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिलांनी मंगळसूत्र घालावं का? याविषयी चर्चाचे आयोजन केले होते. मंगळसूत्र घालण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने संतापलेल्या आयगनार सेनेच्या चार कार्यकर्त्यांनी बुधवारी मोटारसायकलवर येवून टिफिन बॉक्सच्या साहाय्याने गावठी बॉम्बद्वारे ऑफिसवर हल्ला केला. या हल्याची जबाबदारी या कार्यकर्त्यांनी स्वीकारली असून त्यांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपणही केले आहे. पुथीया थालाईमरई या चॅनेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीयू शाम कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, साधारणत: ३.१५ वाजता दोन मोटारसायकलवर अज्ञात चार जण आले व त्यांनी बॉक्सेसमधून कार्यालयावर गावठी बॉम्ब फेकले. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. आमच्या टिव्हीवर ‘थाली’ आणि ‘मंगळसूत्र’ या दोन अशा चांगल्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. परंतू या विषयाला आक्षेप घेत काही हिंदूवादी संघटनांनी कार्यालयावर हल्ला चढवला. या हल्याची तीवृता कमी असली तरी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध नोंदवित असल्याचे शाम कुमार यांनी म्हटले आहे.

March 12, 2015 in मुख्य पान
विमा विधेयकास राज्यसभेत मंजुरी 0

विमा विधेयकास राज्यसभेत मंजुरी

INSURANCE
नवी दिल्ली – गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विमा विधेयक २०१५ला गुरुवारी अखेर राज्यसभेत मंजुरी मिळाली. या विधेयकास राज्यसभेतही मंजुरी मिळाल्याने विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीची मर्यादा २६ टक्क्यांवरुन ४९ टक्के होणार आहे.
सभागृहात अडीच तास या विधेयकावर वादविवाद सुरु होता. अखेर आवाजी मतदानाने विमा विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी जोरदार विरोध दर्शवला. तृणमूल, द्रमुक, सपा, बसपा आणि जदयू(संयुक्त)च्या सदस्यांनी सभात्याग केला.
याआधी चार मार्च रोजी विधेयकाला लोकसभेत सहजरित्या मंजुरी मिळाली होती. मात्र राज्यसभेत या भाजपाकडे सत्ताधारी आणि मित्रपक्षांकडे बहुमत नसल्याने या विधेयकाचा मार्ग सोपा नव्हता. अखेर अनेक वादविवादानंतर या विधेयकास मंजुरी मिळाली.

March 12, 2015 in मुख्य पान
द.आफ्रिकेचा १४६ धावांनी विजय 0

द.आफ्रिकेचा १४६ धावांनी विजय

AP3_12_2015_000009B
वेलिंग्टन -कर्णधार एबी डेविलियर्सच्या (९९), बेहरादीनच्या (६४) आणि मिलरच्या (४९) धावांच्या शानदार खेळीने दक्षिण आफ्रिकेला पुन्हा विजयपथावर आणले. वेलिंग्टनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यूएईवर १४६ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी ठेवलेले ३४२ धावांचे लक्ष्य गाठताना यूएईचा संघ १९५ धावांत गारद झाला.
भारताकडून दारुण पराभव स्वीकारल्यानंतर द. आफ्रिकेने वेस्ट इंडिज आणि आर्यंलडचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत द.आफ्रिकेला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत द.आफ्रिकेने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर साजेशी कामगिरी करत यूएईविरुद्ध विजय साकारला.
सामन्यात नाणेफेक जिंकून यूएईने द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. द. आफ्रिकेनेही प्रथम फलंदाजीचा फायदा उचलत ५० षटकात ३४१ धावा केल्या.
बेहरादीनच्या तुफान फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला डोंगराऐवढे लक्ष्य उभारता आले. बेहरादीन आणि फिललँण्डरने शेवटच्या तीन षटकात ४९ धावा कुटल्या. बेहरादिनने अवघ्या ३१ चेंडूत नाबाद (६४) धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार ए.बी.डेविलियर्सचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. (९९) धावांवर खेळत असताना कामरान शेहझादच्या गोलंदाजीवर डेविलियर्सने अमजद जावेदकडे झेल दिला.
आजच्या सामन्यात १७ धावांवर हाशिम आमलाच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला पहिला हादरा बसला. मोहोम्मद नावेदने त्याला अमजद अलीकरवी झेलबाद केले. त्यानंतर सलामीवीर क्विंटन डिकॉकने रोसाऊच्या साथीने डाव सावरला. डिकॉकने (२६), रोसाऊने (४३) धावा केल्या. त्यानंतर डेविलियर्स आणि मिलरमध्ये चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी झाली. मिलर अर्धशतकापासून एक धाव दूर असताना बाद झाला.
द. आफ्रिकेने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करणा-या यूएईच्या संघाला १९५ वर रोखण्यात आफ्रिकन गोलंदाजांना यश आले. यूएईच्या स्वप्नील पाटीलने ५७ धावांची झुंजार खेळी केली. तर शायमन अन्वरने ३९ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक ६३ धावांची भागीदारी रचली. या दोघा खेळांडूंव्यतिरिक्त बाकीचे फलंदाज साफ अपयशी ठरल्याने यूएईला पराभवाची नामुष्की टाळता आली नाही.

 

March 12, 2015 in क्रीडा
चिमुकलीला दुसर्‍या मजल्यावरुन फेकलं 0

चिमुकलीला दुसर्‍या मजल्यावरुन फेकलं

CRIME
डोंबिवली-पाच दिवसांच्या चिमुकलीला रुग्णालयाच्या दुसर्‍या माळ्यावरुन खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत आज सकाळी 8 वाजता च्या सुमरास घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील शुभदा नर्सिंग होममध्ये ही घटना घडली आहे.
सुजाता गायकवाड यांनी 5 दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. मुलीची आई सकाळी बाथरूम अज्ञाताने मुलीला पाळण्यातून उचललं आणि इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरुन फेकून दिले.या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही.

March 12, 2015 in मुख्य पान
मनमोहनसिंग यांच्या समर्थनात काँग्रेसची पदयात्रा 0

मनमोहनसिंग यांच्या समर्थनात काँग्रेसची पदयात्रा

sonia-gandhi-march
नवी दिल्ली – कोळसा घोटाळा (कोलगेट) प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव आल्याने, आज (गुरुवारी) त्यांच्या समर्थनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी पदयात्रा काढली.
सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी 24, अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयापासून मनमोहनसिंग यांच्या घरापर्यंत ही पदयात्रा काढली. या पदयात्रेपूर्वी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी समितीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे खासदार आणि सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. मनमोहनसिंग यांच्या बाजूने लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला मनमोहनसिंग उपस्थित नव्हते.
काँग्रेस पक्ष एकत्र येऊन पूर्णपणे मनमोहनसिंग यांच्यासोबत असल्याचं यावेळी पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या. ‘मनमोहनसिंग यांच्या प्रामाणिकपणावर कोणी प्रश्न उपस्थित करू शकत नाही. या प्रकरणाचा आम्ही कायदेशीररित्या लढाई लढणार आहोत. मला विश्वास आहे, की ते नक्की निर्दोष सिद्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर, अम्हाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला आहे.
कोलगेट प्रकरणी बुधवारी विशेष न्यायालयाने मनमोहनसिंग यांच्या विरोधात समन्स जारी केले. सिंग यांच्या बरोबर उद्योजक कुमार मंगलम बिर्ला, कोळसा मंत्रालयाचे तत्कालिन सचिव पी. सी. परख आणि हिंदाल्को समूहाच्या अन्य तीन अधिकार्‍यांविरोधातही समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात मनमोहनसिंग यांना आरोपी म्हणून 8 एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

March 12, 2015 in मुख्य पान
पोलिसांना ६२ घरे 0

पोलिसांना ६२ घरे

home
मुंबई – ताडदेव येथील शासकीय मालकीच्‍या भूखंडावरील झोपडपट्टीचा पुर्नविकास करताना पोलिस घरांसाठी या जागेवर आरक्षण असल्‍यामुळे या जागी पोलिसांसाठी ६२ सदनिका उपलब्‍ध करून देण्‍यात येतील, अशी ग्‍वाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी विधानसभेत दिली.
मुंबईतील ताडदेव येथील भूखंड क्र. ७२५ या शासकीय भूखंडावरील झोपडपट्टीचा पुर्नविकास करताना या जागी पोलिस वसाहतीचे आरक्षण असल्‍यामुळे त्‍या जागेवर पोलिसांसाठी घरे उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे काय, असा तारांकित प्रश्‍न आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता. त्‍यावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिलेल्‍या लेखी उत्‍तरात सांगितले की, विकास नियंत्रण नियमावली १९९१ (१०) नुसार आरक्षणाच्‍या २५ टक्‍के क्षेत्र पोलिस हौसिंगसाठी उपलब्‍ध होत असून त्‍यामध्‍ये पोलिसांसाठी स्‍वतंत्र इमारत बांधण्‍यात येणार आहे. या इमारतीमध्‍ये ४१.८८ चौ.मी. ची ६२ घरे उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत. हे बांधकाम पोलिस विभागाला मोफत करून देण्‍याचे विकास नियंत्रण नियमावलीमध्‍ये प्रस्‍तावित असून याबाबतचे आराखडे पोलिसांच्‍या गृहनिर्माण विभागाने मंजूर करण्‍याची प्रक्रिया सुरू असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

March 10, 2015 in मुख्य पान
गांधीजी इंग्रजांचे एजंट होते!: काटजू 0

गांधीजी इंग्रजांचे एजंट होते!: काटजू

images
नवी दिल्ली – वादग्रस्त वक्तव्यांबद्दल ख्याती असलेले माजी न्यायमूर्ती व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी आता थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना लक्ष्य करून खळबळ उडवून दिली आहे. ‘महात्मा गांधी हे इंग्रजांचे एजंट होते आणि त्यांच्यामुळं भारताचं प्रचंड नुकसान झालं,’ असा सनसनाटी आरोप काटजू यांनी केला आहे.
आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये काटजू यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या काही घटनांचे दाखले देत गांधीजींवर जोरदार टीका केली आहे. ‘भारत हा धर्म, जात, पंथ व भाषांचे प्रचंड वैविध्य असलेला देश आहे. हे जाणूनच इंग्रजांनी येथे ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली. गांधीजींनी राजकारणात धर्म घुसवून त्यांना एकप्रकारे मदतच केली,’ असं काटजूंनी म्हटलं आहे.
काटजू म्हणतात…
दक्षिण अफ्रिकेतून भारतात आल्यापासून ते मृत्यूपर्यंत गांधीजींनी आपल्या प्रत्येक भाषणांतून आणि लिखाणातून हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा प्रचार केला. रामराज्य, गोरक्षा, ब्रह्मचर्य, वर्माश्रम याच्या आधाराने विचार मांडण्यावरच त्यांचा भर होता. ‘मी सनातनी हिंदू आहे. वर्णव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. गायीची रक्षा करणं मला महत्त्वाचं वाटतं, असं गांधीजींनी स्वत: ‘यंग इंडिया’मध्ये लिहिलं होतं. गांधीजींच्या सभेत नेहमी ‘रघुपती राघव राजाराम…’ हे हिंदू भजन गायलं जायचं. हिंदूंविरोधात मुस्लिमांना चिथावण्यासाठी इंग्रजांना हे हवंच होतं.

एखाद्या साधूनं किंवा स्वामीनं आपल्या आश्रमात बसून शिष्यांना धर्माबद्दल सांगणं समजू शकतो. पण एखादा राजकीय नेता दिवसरात्र हिंदू प्रथा-परंपरा व विचारधारेचा प्रसार करत राहिला तर सनातनी मुस्लिमांवर त्याचा काय परिणाम होईल? त्यावेळी नेमकं तेच झालं. गांधीजींच्या सनातनी विचारांमुळं मुस्लिम समाज मुस्लिम लीगसारख्या पक्षांच्या बाजूनं झुकला.

इंग्रजांच्या विरोधात २०व्या शतकाच्या सुरुवातीलाच सूर्यसेन, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, अश्फाकउल्लाह, भगतसिंग, राजगुरू अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य चळवळ सुरू केली होती. मात्र, गांधीजींनी चळवळीचा क्रांतिकारक मार्ग बदलून तिला सत्याग्रहाचे निरर्थक वळण दिले. इंग्रजांना त्याचा फायदाच झाला.

नौखालीतील हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजी स्वत: धावून गेल्याबद्दल काही लोक त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गातात. पण या हिंसाचारास तेच जबाबदार होते. सार्वजनिक सभांमध्ये धार्मिक विचार मांडून त्यांनीच एकप्रकारे त्यासाठी मदत केली होती. म्हणजे आधी घराला आग लावायची आणि मग ती विझविण्याचे नाटक करायचे, असंच आहे.

‘गांधींनी मांडलेली स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना ही गावखेड्यातील जातीवादाला प्रोत्साहन देणारी होती. त्याकाळी गावातील बहुतेक समजाघटक जमीनदार आणि सावकरांच्या मुठीत असल्यामुळं ती पूर्णत्वास येणं शक्य नव्हतं. औद्योगिकीकरणाला विरोध करून गांधींनी चरख्यावरील हातमागासारख्या तद्दन प्रतिक्रियावादी गोष्टींचा प्रचार केला. संपत्तीसाठी ‘विश्वस्त’ नेमण्याची त्यांची संकल्पना म्हणजे लोकांना फसविण्याचाच प्रकार होता.

March 10, 2015 in मुख्य पान
शेतक-यांच्या प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक 0

शेतक-यांच्या प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक

vidhanbhavan
मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस शोकप्रस्तावाने पार पडल्यानंतर दुस-या दिवशी वादळी अधिवेशनाला सुरुवात होणार असे संकेत विरोधकांनी आधीच दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी विधिमंडळात गारपीट, अवकाळी पाऊस आणि शेतक-यांच्या मदतनिधीबाबत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. घोषणांनी विधानभवन दणाणून सोडले. यावेळी प्रचंड गदारोळ झाला. परिणामी विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
विधानसभेत विरोधकांनी मागणी लावून धरल्याने अखेरीस सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पूर्ण झाल्यानंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी सविस्तर वेळ देण्यात येईल, असे निर्देश दिले. परंतु, विरोधकांनी त्यांना जुमानले नाही.
मुळात आजच्या कामकाजपत्रिकेत सत्ताधारी पक्षातर्फे उपरोक्त विषयावरील प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृह सुरु होताच सर्व विषय बाजूला ठेवून स्थगन प्रस्तावाद्वारे शेतक-यांवर होणा-या अन्यायाबाबत चर्चा करण्याची मागणी सभागृहात केली. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच सहकारी पक्षांनी ही मागणी लावून धरली.
मात्र, सत्ताधारी पक्षातील राज पुरोहित यांनी सरकार चर्चेला तयार आहे. सभागृहाचे कामकाज नियमावलीप्रमाणे होऊ द्या, विषय आल्यानंतर याबाबत आपण सविस्तर चर्चा करु, असे सांगितले. त्यावर, जितेंद्र आव्हाड, नितेश राणे, वर्षा गायकवाड, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील आदींनी प्रस्ताव मांडणे हा विरोधी पक्षनेत्याचा अधिकार आहे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि राज्याच्या दृष्टीने तातडीचा विषय आहे. त्यामुळे कामकाज बाजूला सारून या मुद्दयावर चर्चा करण्यात यावी, या आग्रही मागणीसाठी विरोधक सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले.
विरोधकांनी नही चलेगी.. नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, शेतक-यांवर अन्याय करणा-या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या कामकाजामुळे राज्यातील शेतक-यांची ही दयनीय अवस्था झाली आहे. सत्तारुढ सरकारने शेतक-यांवर होणा-या अन्यायाबाबत प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे सरकारची याबाबत चर्चा करण्याची पूर्ण तयारी आहे. विरोधक ही चर्चा करण्यास धास्तावत आहे. कारण यामुळे सत्य बाहेर पडणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र, सभापतींनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.
राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपीठीने थैमान घातले आहे. आधीच दुष्काळाच्या छाया त्यातच अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यात १००० हून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या कारणास्तव प्रश्नोत्तराच्या तासापेक्षा संकटात असलेल्या शेतक-यांच्या समस्येवर चर्चा करणे यापेक्षा सभागृहात आणखी महत्त्वाचे दुसरे कोणतेच कामकाज असू शकत नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात सांगितले आणि निषेध व्यक्त करत अखेरीस विरोधकांनी सभात्याग केला.
विधान परिषदेतही अवकाळी पाऊस, गारपीठीवर चर्चा करण्याची सरकारने तयारी दर्शवली. मात्र, अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत सभात्याग केला. यानंतर, अध्यक्षांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याचे जाहीर केले

 

March 10, 2015 in मुख्य पान
 देशात १.३४ लाख तर महाराष्ट्रत १६ हजार ६२२ आत्महत्या 0

देशात १.३४ लाख तर महाराष्ट्रत १६ हजार ६२२ आत्महत्या

suicide
नवी दिल्ली- २०१३ मध्ये देशातील सुमारे १.३४ लाख लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य गृहमंत्री हरिभाई पराथीभाई चौधरी यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या असून त्याखालोखाल तामिळनाडूचा नंबर लागतो.
२०१३ मध्ये महाराष्ट्रात १६ हजार ६२२ आत्महत्येच्या प्रकरणाची नोंद झाली. तर तामिळनाडूमध्ये १६ हजार ६०१ प्रकरणांची नोंद झाल्याचे चौधरी यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
तसेच आंध्रप्रदेशमध्ये (१४ हजार ६०७), पश्चिम बंगाल (१३ हजार ५५), कर्नाटक (११ हजार २६६), मध्यप्रदेश (नऊ हजार ४४६) आत्महत्येच्या प्रकरणांची नोंद झाली.
२०१२ मध्ये देशात सुमारे एक लाख २५ हजार ४४५ आत्महत्येच्या प्रकरणांची नोंद झाली होती. २०११ मध्ये हेच प्रमाण एक लाख ३५ हजार ५८५ इतके होते.

March 10, 2015 in मुख्य पान
खून करून प्रेत नदीत फेकले, मृतक वर्धा जिल्ह्यातील 0

खून करून प्रेत नदीत फेकले, मृतक वर्धा जिल्ह्यातील

download (2)
यवतमाळ, दि. १० – वर्धा जिल्ह्यातील इसमाचा खून करून प्रेत वर्धानदीपात्रात फेकण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. हरिदास नारायण भोयर (४८) रा.अंदोरी जि.वर्धा, असे मृताचे नाव आहे.
कळंब तालुक्यातील चिंचोली गावाला लागून वर्धा नदी आहे. आज सकाळ दरम्यान एका इसमाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. या घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ उडाली. प्रभारी ठाणेदार सूर्यकांत राऊत यांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर मृतकाची ओळख पटली. मृतकाच्या डोक्यावर, कानावर व मानेवर शस्त्राने वार केल्याच्या खुना आहेत. अज्ञात आरोपीने शस्त्राने वार करून प्रेत नदीपात्रात फेकल्याचा कयास पोलिसांनी बांधला आहे. दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

March 10, 2015 in मुख्य पान
बैल चोरणाºयास वाहनासह अटक 0

बैल चोरणाºयास वाहनासह अटक

ukd
यवतमाळ ,दि. १० – पुसद तालुक्यातील पिपळगाव येथील शेतकºयांच्या घरासमोरील बांधून असलेलील ७० हजार रुपय किंमतीची बैलजोडी चोरून नेली होती. वाहनातून बैलजोडी भोकरकडे नेत असताना हा प्रकार रात्रीवर गस्तीवर असलेल्या उमरखेड पोलिसांच्या लक्षात आला. त्यावरून दोन चोरट्यास वाहन व बैल जोडी सह ताब्यात घेतले.
माहूर तालुक्यातील २० वर्षे वयोगटातील दोन युवक पिपळगाव (सुतगिरणी) येथून उमरखेड वरून भोकर मराठवाड्यात चोरीचे दोन बैल घेऊन जाणारे विना क्रमांकचे मालवाहू वाहन शहरातून सकाळी ४.३० च्या दरम्यान जात होते. यावेळी रात्री गस्तीवर असलेले पो.कॉ. दिगांबर कावळे यांनी वाहनाची पाहणी केली. यावेळी बैलाची मालकी कागदपत्रे विचारले असता चोरटे तेथून पळून जाण्याच्या बेतात असताना संशयावरून वाहन चालक आरोपी राहूल राठोड (२०) रा. शेकापूर आणि त्याचा सहकारी शे. समीर शे. मुसा रा. माहूर याला ताब्यात घेतले. बैलजोडी मालकाने पुसद पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तेव्हा ही घटना उमरखेड पोलीसांनी उघडकीस आल्याचे लक्षात आले. पोलीसांनी देविदास पवार रा. पिंपळगाव यांना बोलावून चोरीचे बैल त्यांचेच आहे का या बाबतची खात्री करून घेतली. अधिक तपास ठाणेदार शिवाजी बचाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बोंडे, राठोड, पवार करीत आहे.

 

March 10, 2015 in विदर्भ
शालेय पोषन आहार शिजविणाºया कामगारांचा लाठी मोर्चा 0

शालेय पोषन आहार शिजविणाºया कामगारांचा लाठी मोर्चा

100320153672
यवतमाळ,दि. १० – विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषन आहार शिजविणाºया कामगारांना मानधन देण्यात न दिल्यामुळे राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात स्वयंपाकी व मदतनिसांनी आज मंगळकवारी १० मार्च रोजी जिल्हा परिषदेवर लाठी मोर्चा काढून लक्ष वेधले.
पोषण आहार शिजविणारे स्वयंपाकी, मदतनिसांना दरमहा तुटपुंजे एक हजार रुपये मानधन मिळत आहे. कामगारांचे मानधन पंचायत समितीस्तरावरून अद्यापही वितरीत करण्यात आले नाही. त्यामुळे दिवाळी, दसरा यासारखे सण साजरे करता आले नाही. पैसे असून देखील मानधन मिळत नसल्यामुळे शिक्षणाधिकारी व अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. दोन वर्षापूर्वी खाते काढण्यात आले. मात्र मानधन मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा केल्या जाते. यापुढे कामगारांच्या खात्यातच मानधन जमा करण्यात यावे, मानधन वाटपात होणारी दिरंगाई टाळण्यात यावी, कामगारांना रजा मंजूर करण्यात यावी, शिक्षक कामगारांना अतिरिक्त काम करायला लावतात. हा प्रकार थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लाठी मोर्चात पी.पी. घाडगे, विजय ठाकरे, दिवाकर नागपूरे, संजय भालेराव, ज्योती रत्नपारखी, संगीता बागडे, शमा शेख, शमीम शहा, नसीम शहा, संगीता खंडाळकर, विशाखा ठोंबरे, शशिकला मस्के, शारदा तोटेवाड, सया पोलारकर, सुशिला मेडके, सागर जाधव, चेतना चव्हाण, लता कांबळे, मिरा कामळे, जयवंती डेहणकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 

March 10, 2015 in विदर्भ
भारताची आर्यंलडवर आठ गडी राखून विजय 0

भारताची आर्यंलडवर आठ गडी राखून विजय

Cricket World Cup
हॅमिल्टन -सलामीवीर शिखर धवनने साकारलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने आर्यंलडवर आठ विकेट राखून मात करत विश्वचषकातील सलग पाचव्या विजयाची नोंद केली.
‘जायंट किलर’ अशी ओळख असलेल्या आर्यंलडचे २६० धावांचे आव्हान भारताने आठ विकेट आणि ७९ चेंडू राखून पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करणा-या आर्यंलडने सर्व बाद २५९ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान सहज पूर्ण केले आणि विजयी अभियान कायम ठेवले.
सलामीवीर शिखर धवनने साकारलेले शतक, रोहित शर्माची अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताला हे आव्हान लीलया पेलता आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी रचत भक्कम पाया रचला. त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या जोडीने ७० धावांची भागीदारी करत विजयाचा कळस चढविला.
फलंदाजीस अनुकूल असलेल्या हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर आर्यंलडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर कर्णधार पोर्टरफिल्ड(६७) आणि पॉल स्टर्लिंगने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. आयर्लंडने दोनशे धावांची वेस ओलांडली तेव्हा त्यांचे फक्त तीन गडी बाद झाले होते. कर्णधार पोर्टरफिल्ड अर्धशतक झळकवून (६७) धावांवर बाद झाला. मोहित शर्माने त्याला उमेश यादवकरवी झेलबाद केले.
स्टर्लिंगला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवत (४२) धावांवर अजिंक्य रहाणेकडे झेल द्यायला भाग पाडले. जॉईसला अवघ्या (२) धावांवर रैनाने तंबूची वाट दाखवली. त्यानंतर बालर्बिनी आणि नियाल ओब्रायनची जोडी मैदानावर होती. हे दोघे फलंदाजी करत असताना आयर्लंड मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र होते. मात्र अश्विनने बालर्बिनीला बाद करुन ही जोडी फोडली आणि आयर्लंडचा डाव गडगडला. आयर्लंडचे शेवटचे सात फलंदाज ५९ धावांत तंबूत परतले. बालर्बिनी बाद झाल्यानंतर दोन धावांच्या फरकाने दमदार फलंदाजी करणारा नियाल ओब्रायन तंबूत परतला. त्याला मोहोम्मद शामीने उमेश यादवकरवी झेलबाद केले. त्यानंतर आयर्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरला नाही.
आर्यंलडने विजयासाठी ठेवलेले हे २६० धावांचे आव्हान घेऊन सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. या दोघांनी आयरिश गोलंदाजांची गोलंदाजी निष्प्रभ ठरवत दिमाखदार १७४ धावांची भागीदारी साकारली. धवनने विश्वचषकातील दुसरे आणि एकदिवसीय क्रिकेटमधील आठवे शतक साकारले तर रोहितने अर्धशतकी खेळी केली. धवनने ८५ चेंडूत १०० धावा केल्या. तर रोहितने ६६ चेंडूत ६४ धावा केल्या. शंभरहून अधिक धावांची भागीदारी करणारी रोहित -धवनची या भारतीय सलामीवीरांची ही पाचवी जोडी ठरली. रोहित आणि धवन बाद झाल्यानंतर विराट आणि अजिंक्यने मिळून ७० धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस 0

अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस

Drugs-new
सातारा – उर्से टोलनाका येथे एका एका स्विफ्ट कारवर, तसेच इस्लामपूर आणि सातार्‍याजवळच्या कारखान्यांवर छापा घालून महसूल गुप्तचर संचलनालय आणि पुणे कस्टम विभाग यांनी सोमवारी अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत 500 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 11 संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
तळेगावजवळ ‘एक्स्प्रेस वे’वरील उर्से टोलनाक्यावर इस्लामपूरहून मुंबईला एका स्विफ्ट कारमधून नेण्यात येत असलेले 50 किलो ‘मेफेड्रोन’ड्रग्ज जप्त केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एमडी ड्रग्जसह इतर अति उत्तेजक ड्रग्जची तस्करी करणार्‍या ओंकार इंडस्ट्रीजच्या नासिर सांगलीसह 5 जण ताब्यात घेतलं आहे. कारमधून 3 कोटी रुपये किमतीचे 50 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्यानंतर जिथे ड्रग बनवण्यात आले, त्या कंपनीवर छापा टाकून तब्बल साडेतीनशे किलो ड्रग जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मुंबई इथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सातार्‍याच्या खंडाळा तालुक्यातील कान्हेरी गावातून तब्बल 112 किलो मेफी ड्रोम हा अमलीपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या अमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 22 कोटी असून याप्रकरणी 2 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही राज्यातील मोठी कारवाई असून एवढ्या मोठ्या प्रमाणत एका छोट्याशा खेडेगावात हा साठा लपवण्यात आला होता. ही गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं संशयित आरोपींना अटक केली आहे. हा साठा 5 मोठ्या पिशव्यांमध्ये लपवण्यात आल्या होता. ही माहिती मिळाल्यानंतर मोठ्या शिताफीने सातारा लोकल क्राईम ब्रांचने छापा टाकून हा साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर 2 संशयितांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी पैकी 1 आरोपी हा मुंबई येथे पोलिस असल्याची माहिती समोर आली आहे मात्र सातारा पोलिसांनी या बाबत कमालीची गुप्तता पाळली आहे .हे ड्रग्ज कुणी आणले, कुठे घेऊन जात होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत. शिवाय ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे.

 

March 10, 2015 in मुख्य पान
बारावीच्या परीक्षेचा पेपर फिरला व्हॉट्सअ‍ॅपवर 0

बारावीच्या परीक्षेचा पेपर फिरला व्हॉट्सअ‍ॅपवर

2015-01-29~whatsapp_ns
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेतलेल्या बारावीच्या परीक्षाच्या वाणिज्य शाखामधील ‘अकाऊंट्स’ विषयाचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. त्यामुळे पेपर फुटल्याची अफवा पसरली होती.
मात्र, पेपर परीक्षा सुरू झाल्यावरदीड तासानंतर तो व्हॉट्सअ‍ॅपवर आल्याने त्याला पेपरफुटी म्हणता येणार नाही, असे बोर्डाच्या एका अधिका-याने सांगितले.सरकारच्या नियमानुसार पात्र ठरलेल्या शेकडो शाळांना पात्र ठरविल्यानंतर काही अधिका-यांच्या चुकीच्या शिफारशीमुळे त्या शाळांना अनुदान नाकारण्यात आले. या दोषी अधिका-यांवर कारवाई व्हावी आणि शाळांना अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात आले.
या वेळी दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समितीचे मुंबई अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी माहिती दिली. कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असणा-या शाळांना कायम शब्द वगळून अनुदान देण्याचे निर्णय सरकारकडून घेण्यात आले होते. मात्र काही अधिका-यांनी या शाळा बोगस असल्याचे सरकारला दाखविल्याने या शाळांना अनुदान देण्यास सरकारकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.
शाळांना बोगस ठरविणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत कृती समितीकडून मांडण्यात आले. पात्र शाळांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले नाही तर आम्ही दहावीचे पेपर तपासणार नसल्याची भूमिका कृती समितीच्यावतीने घेण्यात आली आहे.

March 10, 2015 in मुख्य पान
माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे निधन 0

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे निधन

sadashiv
मुंबई – कोल्हापूर जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते आणि माजी खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. मुंबईच्या बॉम्ब हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते (८०) वर्षांचे होते.
मागच्या काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या सदाशिवरावांवर कोल्हापूरमध्ये उपचार सुरु होते. सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. रात्री त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले अखेर एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सात ऑक्टोंबर १९३४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात मुरगड गावी त्यांचा जन्म झाला होता. कॉंग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्द सुरु करणारे सदाशिवराव मंडलिक यांनी लोकसभेमध्ये तीनवेळा खासदार म्हणून कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व केले. कागल विधानसभा मतदारसंघातून चारवेळा ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते.
जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार, काम करणारा, वेळेला धावून येणारा नेता अशी सदाशिवराव मंडलिकांची जिल्ह्यामध्ये ओळख होती. त्यामुळेच कोल्हापूरच्या जनतेने प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यावर विश्वास दाखवला. काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द सुरु करणारे सदाशिवराव मंडलिक नंतर शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.
२००९ मध्ये शरद पवारांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली. दांडगा जनसंपर्क आणि आपल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक जिंकली. सदाशिवरावांवर मुरगड या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक सध्या शिवसेनेत आहेत.

 

March 10, 2015 in महाराष्ट्र
लग्नाच्या गाडीला अपघात, आठ ठार 0

लग्नाच्या गाडीला अपघात, आठ ठार

accident-logo-red
चंबा – हिमाचलप्रदेशमध्ये मंगळवारी सकाळी विवाहसोहळयाच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जण ठार झाले असून, १४ जण जखमी झाले आहेत.
चंबा जिल्ह्यातील सलूनी तालुक्यातील बाकुरा जवळ हा अपघात झाला. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन २५० फूट खोल दरीत कोसळले. अपघाताचे ठिकाण दुर्गम भागात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. जखमींना चंबा जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून, जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्तांना सर्व प्रकारची मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

March 10, 2015 in देश-विदेश
 बोहल्यावर चढण्यापूर्वीच भूमिपुत्राची आत्महत्या 0

बोहल्यावर चढण्यापूर्वीच भूमिपुत्राची आत्महत्या

  • IMG-20150309-WA0051

     

     

     

     

     

     

     

     

    यवतमाळ, दि. ९ – बोहल्यावर चढण्यासाठी दोन दिवस शिल्लक असतानाच भूमिपुत्र असलेल्या नवरदेवाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आर्णी तालुक्यातील मुकिंदपूर येथे घडली. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर अंत्ययात्रेसाठी जाण्याची वेळ आली असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशांत जनार्धन इंगोले रा. मुकिंदपूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आईच्या नावाने ११ एकर शेती असून दोन वर्षापासून वडीलही आजारी आहे. त्यामुळे प्रशांत हा शेती करीत होता. यावर्षी निसर्गाच्या लहरिपणामुळे पिकाची नासाडी झाल्याने उत्पन्न कमी झाले होते. प्रशांतची उमरखेड तालुक्यातील कळमुला येथील युवतीसोबत साक्षगंधाही काही महिन्यापूर्वी पार पडले होते. ११ मार्च रोजी त्याचा विवाह होणार होता. दोन्ही बाजूने लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. दोन दिवसावर लग्न असल्याने बहिणी, जावाई याच्यासह अन्य नातेवाईकही त्याच्याकडे आले होते. अशातच ८ मार्च रोजी रात्री बहिणी व मुलींनी प्रशांतच्या हातावर मेहंदी काढून दिली होती. यावेळी आपल्याकडे सोसायटीचे १ लाख ५० हजार रुपये कर्ज, ट्रॅक्टरचे चार लाख आणि लग्नासाठी घेतलेले कर्ज असल्याचे बहिणींना सांगितले. सदर कर्ज कसे फेडावे या बाबतच चिंता वाटत असल्याचेही त्याने बोलुन दाखविले. अशातच आज सकाळी प्रशांतने गावालगत शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. सकाळी बराच वेळ होऊनही तो घरी न दिसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली मात्र थागपत्ता लागला नाही. अशातच प्रशांतचा गावालगत शेतात मृतदेह आढळून आल्याने शोककळा पसरली. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर अत्यसंस्काराला जाण्याची वेळ आली.

बांगलादेशचा १५ धावांनी विजय 0

बांगलादेशचा १५ धावांनी विजय

mahamudulla

अॅडलेड- इंग्लंडवर १५ धावांनी विजय मिळवत बांगलादेशने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बांगलादेशने अंतिम आठ संघांत स्थान पटकावले तरी गटवार साखळीच्या (अ गट) पाच लढतींमधील चौथ्या विजयाने इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले. मोहम्मद महमुदुल्लाहसह (१०३) मध्यमगती रुबेल होसेनने (४ विकेट) विजयात मोलाचा वाटा उचलला. २९ वर्षीय महमुदुल्ला हा विश्वचषक स्पर्धेत शतक ठोकणारा बांगलादेशचा पहिला क्रिकेटपटू ठरला. योगायोग म्हणजे त्याचे वनडेतीलही हे पहिलेच शतक आहे.
ही लढत इंग्लंडसाठी ‘करा किंवा मरा’ अशी होती. गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली तरी फलंदाजांनी निराशा केल्याने बांगलादेशचे २७६ धावांचे आव्हान गाठताना इंग्लंडचा डाव ४८.३ षटकांत २६० धावांत आटोपला. सलामीवीर इयन बेल (६३), मधल्या फळीतील जोस बटलर (६५) आणि ख्रिस वोक्सने (नाबाद ४२) मैदानावर तग धरताना विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले तरी रुबेल होसेनसह कर्णधार मश्रफे मोर्ताझा आणि तस्कीन अहमदच्या (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी मा-यामुळे रंगतदार लढतीत बांगलादेशने बाजी मारली.
इयन बेलने एक बाजू लावून धरली तरी अन्य सहका-यांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने ३०व्या षटकांत ५ बाद १३२ धावा अशी इंग्लंडची अवस्था होती. सामना एकतर्फी होणार, असे वाटत असतानाच बटलर आणि वोक्सने सातव्या विकेटसाठी १०.१ षटकांत ७५ धावा जोडताना लढतीत रंगत आणली. मात्र बटलरची विकेट पडल्यानंतर इंग्लंडच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. वोक्सने विकेट राखली तरी तळातील ख्रिस ब्रॉड आणि जेम्स अँडरसनला एकाच षटकात बाद करताना रुबेल होसेनने बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या खेपेसही गटवार साखळीत इंग्लंडला बांगलादेशने हरवले होते. शतकवीर महमुदुल्ला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, महमुदुल्ला (१३८ चेंडूंत १०३ धावा) आणि मुशफिकुर रहिमने (७७ चेंडूंत ८९ धावा) पाचव्या विकेटसाठी रचलेली १४१ धावांची विक्रमी भागीदारी बांगलादेशच्या डावाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा इंग्लंडचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अनुभवी जेम्स अँडरसनसह ख्रिस जॉर्डन (प्रत्येकी २ विकेट) तसेच स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अलीने (प्रत्येकी एक विकेट) ठराविक अंतराने विकेट घेतल्या तरी महमुदुल्ला आणि मुशफिकुर जोडीने जवळपास निम्मी षटके (२३.५) खेळून काढताना बांगलादेशला पावणेतीनशे धावांची मजल गाठून दिली. मात्र त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. अँडरसनने लागोपाठच्या षटकांत तमिम इक्बाल आणि इम्रुल कायेसला (प्रत्येकी २ धावा) झटपट माघारी धाडले. २ बाद ८ अशा अवस्थेतील बांगलादेशच्या मदतीला महमुदुल्ला धावला. त्याने सौम्य सरकारसह (४०) तिस-या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. त्यानंतर महमुदुल्ला आणि मुशफिकुरची पाचव्या विकेटसाठीची १४१ धावांची भागीदारी विक्रमी ठरली. विश्वचषकात बांगलादेशतर्फे कुठल्याही विकेटसाठीची ती सर्वाधिक भागीदारी आहे. महमुदुल्लाला विश्वचषकातील पहिले शतक ठोकण्याची संधी स्कॉटलंडविरुद्ध होती. मात्र त्यावेळी ९५ धावांवर तो बाद झाला. फलंदाजीत सातत्य राखताना इंग्लंडविरुद्ध महमुदुल्लाने स्वत:च्या नावे एक विक्रम केलाच. १३८ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह महमुदुल्लाने पहिले शतक साजरे केले.

March 09, 2015 in क्रीडा