पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2014

इंडो-पाक बँडच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचा गोंधळ

मुंबई- पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रमाची संधी दिल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारत-पाक संयुक्त बँडची घोषणा करणारी पत्रकार परिषद मंगळवारी प्रेस क्लबमध्ये उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
प्रचंड पोलिस बंदोबस्त असूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तानी कलाकारांनो चालते व्हा’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात संबंध सुधारण्यासाठी ‘मीकाल हसन बँड’ हा वाद्यवृंद प्रेस क्लबमध्ये भारतीय कलाकारांसोबत कार्यक्रम सादर करणार होते. या संदर्भात पाकिस्तानी कलाकारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.भारत व पाकिस्तान यांचे संबंध सुधारावेत यासाठी प्रेस क्लबने या संयुक्त बँडचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबिर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांना माहिती दिली होती. या कार्यक्रमाचा निषेध करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याची पूर्वसूचना पोलिसांना होती, त्यामुळे पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही याठिकाणी निषेध व्यक्त करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी प्रेल क्लबचा मुख्य दरवाचा बंद केल्याचे सिंग यांनी सांगितले.
मात्र यामुळे पाकिस्तानी टिव्ही कलाकार बेगम नवाईश अली, बीग बॉसमधील कलाकार वीणा मलिक आणि गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या सिंधी सुफी संगित महोत्सवात भाग घेतलेले काही कलावंत या परिषदेच्या निमित्ताने आले आहेत. ते सर्वजण सुखरुप असल्याचे सिंग यांनी सांगितले. पाकिस्तानी कलाकारांना व खेळाडूंना विरोध करण्याची शिवसेनेची ही जुनीच भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेली ही स्टंटबाजी असल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.

February 04, 2014 in रोजगार

स्पेक्ट्रम लिलावात ४० हजार कोटींची बोली

नवी दिल्ली- यापूर्वी दोनदा स्पेक्ट्रम लिलावाकडे पाठ फिरवणा-या कंपन्यांनी दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या सर्कलमधील स्पेक्ट्रम खरेदीसाठी लिलावाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे पहिल्याच दिवशी बोलीतून सरकारला ४० हजार कोटी रुपये मिळाल्याचे दूरसंपर्कमंत्री कपिल सिबल यांनी सांगितले.
लिलावात प्रथमच उतरलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने तगडे आव्हान उभे केल्याने ९०० मेगाहर्ट्झ बँडमधील ध्वनिलहरींचे हक्क राखण्यासाठी भारती एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्या झटताना दिसल्या. या अटीतटीत बोली ३९,३०० कोटी रुपयांवर गेल्याने वित्तीय तुटीने चिंतित असलेल्या सरकारला मात्र मोठा दिलासा मिळाला.
दिवसभरात बोलींच्या सात फे-या पार पडल्या. यामध्ये ३९,३०० कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. या भरघोस प्रतिसादामुळे या वर्षी अर्थसंकल्पी लक्ष्यापेक्षा स्पेक्ट्रम महसूल अधिक राहील, असा विश्वास दूरसंपर्क सचिव एम. एफ. फारूकी यांनी व्यक्त केला. २०१३-१४ या वर्षासाठी ५.१६ लाख कोटीपर्यंत वित्तीय तूट रोखण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मात्र पहिल्या नऊ महिन्यांतच ही तूट लक्ष्याच्या ९५ टक्क्यांवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर हा लिलाव दिलासा देणारा ठरला आहे.९०० मेगाहर्ट्झमधील ध्वनिलहरींसाठी १६,००० हून अधिक, तर १८०० मेगाहर्ट्झमध्ये २३,००० कोटी रुपयांची बोली लागली. दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रत्येकी १६ क्षेत्रांमध्ये, तर कोलकातामध्ये १४ क्षेत्रांत मागणीचा रेटा राहिला. तर १८०० मेगाहर्ट्झमध्ये गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल आणि यूपी पश्चिम या सर्कलमध्ये कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा लागली.गेल्या दोन लिलाव फे-यांमध्ये मुंबई सर्कलमधील स्पेक्ट्रम खरेदीत निरुत्साह दाखवणा-या कंपन्यांनी या वेळी ध्वनिलहरी खरेदीसाठी उड्या घेतल्या. यामुळे ध्वनिलहरींसाठीची बोली आधार किमतींपेक्षा ४४ टक्क्यांनी वाढून ४७३.२३ कोटी प्रति मेगाहर्ट्झवर जाऊन हे सर्कल सर्वात महागडे ठरले. या सर्कलसाठी ३२८ कोटी प्रति मेगाहर्ट्झ एवढी आधारभूत किंमत ठरवण्यात आली होती. कोलकातामध्ये आधार किमतीपेक्षा ३८.५२ टक्क्यांनी अधिक बोली लागून ही किंमत १७२.१६ कोटी प्रति मेगाहर्ट्झवर गेली. तर दिल्लीमध्ये १९.१४ टक्क्यांनी वाढून ४२८.९२ प्रति मेगाहर्ट्झची बोली लागली. या दोन्ही सर्कलसाठी अनुक्रमे १२५ कोटी प्रति मेगाहर्ट्झ आणि ३६० कोटी प्रति मेगाहर्ट्झची आधार किंमत निश्चित करण्यात आली होती.

February 04, 2014 in रोजगार

सचिन-सीएनआर राव यांना ‘भारतरत्न’ प्रदान

c-n-rao-225x300 Sachin-Tendulkar-000-300x230

नवी दिल्ली- भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि एच-इंडेक्स ऑफ १०० मध्ये पोहचणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांना मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनच्या दरबार हॉलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान मनमोहन सिंग, संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी, संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळयाला सचिनची पत्नी अंजली, त्याची दोन मुले अर्जून-सारा आणि नागेश रामचंद्र राव यांचे कुटुंबियही उपस्थित होते. कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देणारा सचिन हा सर्वोच्च नागरी पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय क्रीडापटू आहे.

February 04, 2014 in रोजगार

पोखरी येथे शेतकºयाचा खून

महागाव –  तालुक्यातील अतीदुर्गम भागातील बेडी पोखरी येथे जागलीसाठी गेलेल्या शेतकºयांचा खून केल्याची घटना घडली. दुधराम सखाराम चव्हाण (६५) रा. पोखरी असे मृतकाचे नाव आहे. त्याच्याकडे बेडी पोखरी शिवारात १० एकर शेती असून तुरीच्या जागलीसाठी गोकुळ नामक   मुलालासोबत घेऊन गेला होता. अशातच मध्यरात्री मुलगा व ते झोपून असतांना अज्ञात मारेकºयांनी संधी साधून दुधराम याचा गळा दाबून काठ्याने जबर मारहाण केली. यावेळी आवाजाने जागा झालेल्या मुलालाही मारहाण केल्याने त्याने तो रात्रभर अंधारात  एका झुडपात दबा धरून बसला. या मारहाणीमध्ये दुधराम याचा मृत्यू झाला असून हा प्रकार त्याचे मुलाने नातेवाईकांना सांगितली. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पुसदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी दिलीप राठोड याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकºयाविरूद्घ गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार रऊफ शेख,  पोलीस उपनिरीक्षक  चरडे, दुधाने, इंगोले, सुभाष राठोड, गणेश राठोड, धम्मानंद केवटे, प्रकाश चव्हाण करीत आहे.

February 03, 2014 in रोजगार

स्विटमार्ट गोडाऊनला आग, पाच लाखाचे नुकसान

यवतमाळ – शहरातील चापमनवाडी येथील सत्कार स्विटमार्टच्या गोडाऊनला आग लागल्याने संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून पाच लाखाचे नुकसान झाले.
सत्कार स्विटमार्टचे संचालक भगवानदास लोहाणा याचे चापमनवाडीत श्रीनाथ फु्रट प्रॉडक्टे गोडाऊन आहे. दरम्यान काल मध्यरात्री १२.४५ वाजता या गोडाऊनला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण करून आतमधील सर्व साहित्य कवेत घेतले. यामध्ये पॉलीथीन, पॅकींग रोल, कार्टुन बॉक्स, पॉकीट, मटेरीयल,  नमकीन पॉकीट, दरवाजे, खिडक्या, टेबल आदी पाच लाख रुपयाचे साहित्य जळुन खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशन दलाचे दिलावर खॉ, यशवंत पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा करून  ही आग आटोक्यात आणली. काही वेळातच ही आटोक्यात आल्याने शेजारी असलेल्या घराचे कुठलीही हानी झाली नाही.

February 03, 2014 in रोजगार

तोतया पोलिसाने महिलेला अडीच लाखाने गंडविले

यवतमाळ –  देवदर्शन घेऊन घराकडे पायी जाणाºया वृध्द  महिलेला दोन तोतया पोलिसांनी गंडविल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजता महादेव मंदिराजवळ घडली. या महिलेची पोत, पाटल्या, अंगठी आदी अडीच लाखाचे दागिने घेऊन तेथून पळ काढला. या घटनेने खळबळ उडाली असून महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसंतीदेवी भुत (७२) रा. राजेंद्र नगर ह्या महादेव मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी नातवंडाने दुचाकीने या महिलेला तेथे आणून सोडून तेथून परत गेला. दर्शन झाल्यानंतर तेथून परत घराकडे जाण्यासाठी पायी निघाल्या. अशातच सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोन युवकांनी सदर महिलेला अडविले. आम्ही पोलीस असून शहरात भानगडी चालू असल्याने एवढे मोठे सोने कशाला घालता असे म्हटले. याचवेळी दुचाकीने आलेल्या एका व्यक्तीला अडवून त्यालाही पोलीस असल्याची बतावणी करून सोनसाखळी घेतली. त्यामुळे या महिलेने ६० ग्रॅमची पोत, ४० ग्रॅमच्या बांगड्या, ८ ग्रॅम अंगठी अन्य दागिने (किंमत २ लाख ५० हजार )काढून दिलेले दागिने एका कागदाच्या पुडीत ठेऊन हातचखालीने उडविले. त्यानंतर त्यामध्ये टप्पराचे कडे, व रिंग आढळल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी महिलेने शहर पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी, डी.बी. पथकाने घटनास्थळी भेट देऊन आरोपीची शोधमोहीम राबविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला. गत दोन महिन्यापूर्वी पोस्टल मैदानाजवळ मॉर्निंग वॉक करणाºया महिलेचे दागिने अशाच प्रकारे चोरुन नेले होते. या घटनेने खळबळ उडाली असून महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्तवाढवावी अशी मागणी केली आहे.

February 03, 2014 in रोजगार

कमी खर्चात आणि कमी वेळात न्याय मिळावा- न्या.भुषण गवई

ठाणे : देशाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे असा घटनेत उल्लेख आहे. शहापूर तालुक्यातील खेड्या-पाड्यातून तसेच दुर्गम भागातील लोकांना कमी खर्चात आणि कमी वेळात न्याय मिळावा यासाठी न्यायालयाची इमारत प्रेरणादायी ठरावी, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भुषण गवई यांनी व्यक्त केली.
शहापूर येथील न्यायालयाच्या नवीन इमारत उदघाटन प्रसंगी न्या.गवई बोलत होते. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे समारंभाच्या अध्यक्ष स्थानी होते. न्या. प्रतिभा शेजवळ-काळे, ॲड.जगदीश घोरपडे, ॲड.प्रमोद पाटील, आमदार दौलत दरोडा यांची यावेळी उपस्थिती होती. शहापूर येथे सुंदर आणि सर्वसोईने अद्ययावत इमारत उभारण्याबद्दल त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही या न्यायालयात काही काळ काम केले असल्याने या न्यायालयास वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे. घटनेमुळे नागरिकांना अनेक अधिकार मिळाले आहेत. पत्रकार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी एकत्र आल्यामुळे एक सुंदर वास्तु निर्माण झाली असल्याचे न्या.गवई यांनी सांगितले. 30 वर्षाच्या अथक प्रयत्नामुळे न्यायालयाची इमारत पूर्ण झाली. त्यामुळे एक वेगळा आनंद सर्वांना मिळाला आहे, असे सांगून न्या.सोनवणे म्हणाले की, या ठिकाणी वरिष्ठस्तर न्यायालय सुरु करणे गरजेचे आहे. पत्रकारांचे हित आणि त्यांच्या सोईसाठी इमारत उभारली असून या ठिकाणी स्वच्छता राखावी. या इमारतीत पक्षकार, वकील, पोलीस यांच्यासाठी वेगवेगळे कक्ष असून संगणीकरणामुळे पक्षकारांना प्रवेशदारावर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. ॲड.प्रमोद पाटील आणि जेष्ठ पत्रकार अरविंद भानुशाली यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. दिप प्रज्वलीत करुन आणि फीत कापून इमारतीचे उदघाटन झाले. पाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत गीत सादर केले शेवटी न्या. प्रतिभा शेजवळ-काळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अधिक्षक अभियंता अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय सोळंकी, तहसीलदार शहापूर, ठाणे जिल्ह्यातील न्यायीक अधिकारी, वकील आणि कर्मचारी उपस्थित होते.

February 03, 2014 in रोजगार

हुक्का पार्लरवर छापा टाकून ३१ जणांना अटक

पुणे – आयटी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या हुक्का पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी ९ तरुणी आणि २२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. पिंपरी-चिंचवडमधील िपपळे सौदागर येथील हॉटेल लुकलुकवर पोलिसांनी शनिवारी रात्री हा छापा टाकला.
अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. तसेच काही जण आयटी इंजिनीअर्स आहेत. हॉटेलच्या तीन व्यवस्थापकांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला िपपळे सौदागर येथील हॉटेल ‘लुकलुक’मध्ये बेकायदा हुक्का आणि मद्याची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी नऊ युवती आणि २२ युवकांचा नशेमध्ये धिंगाणा सुरू होता. हे सर्व जण हडपसर, हिजवडी, तळवडे या आयटी पार्क भागातील कर्मचारी आणि विद्यार्थी आहेत.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ‘आम्ही जेवणासाठी इथे थांबलो होतो,’ असा कांगावा केला. मात्र, हे सर्व जण मद्याच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, या सर्वाची सकाळी अकराच्या सुमारास िपपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये हे सर्व युवक-युवतींनी नशा केल्याचे आढळून आले. पोलिस उपायुक्त उमाप यांच्यासह सहाय्यक निरीक्षक सुनील गाडे, फौजदार अनंत व्यवहारे, सुरेश माने, अर्जुन पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

February 03, 2014 in रोजगार

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे सरकारचे प्रयत्न

रत्नागिरी – देशाचा समतोल विकास करण्यासाठी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक असून, सरकारमार्फत याच उद्देशाने विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.
स्वा. सावरकर नाटय़गृह येथे अन्न सुरक्षा योजना प्रारंभ आणि राजीव गांधी जीवनदाय योजनेंतर्गत हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा जाधव, जिल्हाधिकारी राजीव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळमपाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे, रमेश कीर आदी उपस्थित होते.
पटेल म्हणाले की, सरकारी कृषीक्षेत्राच्या विकासासाठी आखलेल्या धोरणांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. देशातून तीन लाख कोटींचा कृषी माल निर्यात करण्यात येत आहे. भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा तांदूळ निर्यातक देश आहे. बासमती एवढीच कोकणातील हापूसला जगातून मागणी आहे. शेतक-यांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारले असून, त्याचे चांगले परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहेत.
शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कृषि कर्जमाफी योजना राबवली आहे. कर्जवाटपात लक्षणीय वाढ करून एकूण आठ लाख कोटीचे कृषि कर्ज वाटप करण्यात येत आहे. तांदूळाच्या हमीभावातही लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. या सर्व प्रगतीचा लाभ सामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, असे ते म्हणाले. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभही ग्रामीण तसेच शहरी भागातील सामान्य जनतेला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रेशन दुकानदार आणि ग्रामपंचायत स्तरावरून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला करून दिल्यास प्रगत भारताचे चित्र साकार होईल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या विकासाबाबत ते म्हणाले की, कोकणातील जिल्ह्यांच्या शेजारील जिल्ह्यांप्रमाणे विकास होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथल्या निसर्गसंपदेचा लाभ विकासाच्या दृष्टीने करून घेणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा विकास आणि स्थानिकांच्या गरजांचा विचार करताना पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने असलेल्या क्षमतेचाही विचार होणे गरजेचे आहे. अशा विविध क्षेत्रांतील विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठीदेखील विविध योजना राबविण्यात येत असल्याचे पटेल यांनी सांगितले. जिल्ह्यातील ११ लाख जनतेला अन्न सुरक्षा तर १४ लाख जनतेला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी सांगितले.

February 03, 2014 in रोजगार

हॉलिवूड अभिनेता हॉफमन यांचे निधन

न्यूयॉर्क – ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेता ‘फिलिप सिमोर हॉफमन’ यांचे रविवारी निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. औषधांच्या अतिसेवनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांकडून समजते.
न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या अपार्टमेंटमधील बाथरुममध्ये हॉफमन यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हॉफमन यांच्या घरातून हेरॉईन जप्त केले आहे.
हॉफमन यांना ‘कॅपोट’ या चित्रपटातील अभिनयासाठी २००६ मध्ये सर्वोत्तम अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. १९९२ मध्ये ‘सेंट ऑफ वुमन’ या चित्रपटात त्यांनी शाळकरी मुलाची भूमिका बजावली होती. हॉफमन यांच्या मृत्यूमुळे हॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे.

February 03, 2014 in रोजगार

सीएनजी प्रति किलो १५ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली- सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी देशातील गॅस प्रकल्पातील गॅसचा पुरवठा सीएनजी कंपन्यांना पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सीएनजीच्या भावात किलोमागे १५ रुपये तर पाइप गॅसच्या भावात पाच रुपयांनी घट होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी केली.
सध्या शहरातील घरगुती व वाहनांसाठी सध्या देशातील गॅस प्रकल्पातून निर्माण होणारा ८० टक्के गॅसचा पुरवठा केला जातो. आता या क्षेत्रासाठी १०० टक्के गॅस पुरवठा केला जाईल. या निर्णयाचा फायदा दिल्ली व अहमदाबादसारख्या शहरातील नागरिकांना मिळू शकेल. मात्र, पेट्रोकेमिकल्स, पोलाद आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांना लागणा-या गॅसच्या पुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे.
सध्या सीएनजी तयार करण्यासाठी महागडा एलएनजी गॅस वापरला जातो. देशाअंतर्गत गॅसचा पुरवठा केल्याने आपोआपच गॅसच्या किंमती कमी होऊ शकतील. सर्वसामान्य व्यक्तींना दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असेही मोईली म्हणाले.
देशाअंतर्गत गॅस प्रकल्पातून मुंबईला गॅसचा पुरवठा केला जात असल्याने तेथील भाव कमी होणार नाहीत. दिल्ली व अहमदाबादमध्ये सीएनजीसाठी महागडा एलएनजी वायू वापरला जातो. तेथे या निर्णयाचा फायदा होणार आहे.

February 03, 2014 in रोजगार

इटालियन खलाशी खटला: केंद्र सरकारला आठवड्याभराची मुदत

नवी दिल्ली – भारतीय मच्छिमारांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन इटालयिन खलाशांवर चाचेगिरीविरोधातील कायद्याअंतर्गत खटला चालवण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. यासाठी येत्या १० फेब्रुवारी पर्यंत केद्र सरकारला मुदत देण्यात आली आहे.
इटालिय खलाशांवरील खटल्यासंदर्भातील अडथळे दूर करुन १० फेब्रुवारीला केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश न्यायमूर्ती बी.एस.चौहान यांच्या खंडपीठाने सोमवारी दिले. अँटर्नी जनरल गुलाम ई वाहनवटी यांनी केंद्राने यासंदर्भातील जवळपास सर्व त्रुटी दूर केल्या असून पुढील सुनावणीमध्ये भूमिका स्पष्ट होईल असा विश्वास व्यक्त केला.
गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी दोन भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केल्याप्रकरणी इटलीच्या लटोर्रे मॅसिमिलियानो आणि सॅल्वाटोर गिरोन या दोन खलाशांना अटक झाली होती.  त्यांनी केलेल्या गोळीबारात अजेश बिंकी आणि जेलेस्टाईन हे दोन मच्छीमार मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणी दोन्ही खलाशांवर केरळ उच्च न्यायालयामध्ये हत्येचा खटला सुरू आहे.

February 03, 2014 in रोजगार

जनलोकपाल विधेयकाला दिल्ली मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली- दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने जनलोकपाल विधेयकाला मंजुरी दिली आहे. सोमवारी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक १६ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधासभेत सादर केले जाणार आहे.

February 03, 2014 in रोजगार

१५व्या लोकसभेचे अखेरचे अधिवेशन बुधवारपासून

नवी दिल्ली- १५ व्या लोकसभेचे अखेरचे अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. तेलंगण राज्यनिर्मितीसह विविध ३९ विधेयके या अधिवेशनात मांडली जाणार आहेत.
पाच ते २१ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या अधिवेशनात लेखानुदान आणि हंगामी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन केले आहे.या अधिवेशनात ३९ विधेयके सादर केली जाणार आहेत. यात जातीय हिंसाचार, तेलंगण राज्य निर्मिती विधेयक आदी महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे.

February 03, 2014 in रोजगार

वीज निर्मिती व वीज पुरवठ्यासाठी राज्य सक्षम -राजेंद्र मुळक

02022014(015)

वीज निर्मिती व वीज पुरवठ्यासाठी राज्य सक्षम -राजेंद्र मुळक
यवतमाळ दि. 02 : राज्याला साडे चौदा हजार मेगावॅट वीजेची आवश्यकता आहे. या तुलनेत चौदा हजार दोनशे पन्नास मेगावॅट वीज निर्मिती होत असल्यामुळे राज्य वीज निर्मिती व वीज पुरवठ्यासाठी सक्षम आहे असे प्रतिपादन वित्त, उर्जा व सिंचन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले.
आर्णी तालुक्यातील जवळा येथे आज सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत 132 के.व्ही. उपकेंद्राचे भुमीपूजन करण्यात आले यावेळी राज्यमंत्री मुळक बोलत होते. आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, पं.स.सभापती राजीव विरखेडे, उपसभापती सारनाथ खडसे, बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, जि.प.सदस्य देवानंद पवार, सोनबा मंगाम, विद्युत पारेषणचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत, वीज वितरणचे मुख्य अभियंता श्री. बोरकर, आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
राज्यात आता विज दर कमी झाले आहेत, असा उल्लेख करून राज्यमंत्री मुळक म्हणाले, वीजभार नियमन समस्या राहिली नाही, मात्र ज्या भागात वीज चोरीचे प्रमाण. वीज बिलाची रक्कम थकीत आहे तिथेच भारनियमन केले जाते. पेट्रोल, डिझेल, जसे ग्राहकाला रोखीने घ्यावे लागते तसेच विद्युत हे देखील इंधन आहे. वीजनिर्मितीसाठी कोळसा रोखीने घ्यावा लागतो म्हणून वीज निर्मिती करता यावी यासाठी वीज ग्राहकांनी बिलाची रक्कम नियमीतपणे भरावी तसेच वीज चोरीच्या अपप्रवृत्तीला आळा घालावा असेही आवाहन त्यांनी केले.
निम्न पैनगंगा प्रकल्प क्षेत्रातील पुर्नवसन व इतर बाबींसाठी 150 कोटीची तरतूद 2014-15 च्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. राज्य आर्थिकदृष्ट्याही सक्षम असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात औद्योगिक, कृषी व इतर क्षेत्रात राज्य देशात अग्रेसर आहे. त्यामुळेच विविध विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. जवळा येथे उभारण्यात येणाऱ्या 132 के.व्ही. उपकेंद्राचे काम दर्जेदार व मुदतीत पुर्ण करावे. तसेच या केंद्राच्या उभारणीसाठी लागणाऱ्या कालावधीत या परिसरातील वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी पर्याय व्यवस्था करावी अशा सूचनाही ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केल्या.
जवळा येथे उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्रामुळे याच भागातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या सुटतील असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केला. निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी वन कायद्यासह इतर येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्री व इतर जेष्ठ मंत्र्यांच्या पुढाकाराने सोडविण्यात आल्या असून या प्रकल्पाला अंतिम मंजूरी मिळाली आहे. या प्रकल्प क्षेत्रातील पुर्नवसनासाठी 150 कोटी रुपयाची निधी शासनाकडून उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा श्री. मोघे यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीज पारेषण कंपनीचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत यांनी केले. कार्यक्रमास सरपंच मुक्ता बेले, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष साजीद बेग, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, अधिक्षक अभियंता वासुदेव खाडे, श्री.जाधव, कार्यकारी अभियंता सुरेश पाठक, सुनील शेरेकर, रुपेश फरकाडे, श्री. तगलपल्लेवार, तहसिलदार नरेंद्र दुबे, प्रतिष्ठीत नागरिक भरत राठोड, बाळासाहेब शिंदे, डॉ. चव्हाण, नाना पाटील, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अधिक्षक अभियंता वंदन मेंढे यांनी मानले. सूत्र संचालन जयंत वाघमारे यांनी केले.

February 02, 2014 in रोजगार

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, १६ जण ठार

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, १६ जण ठार
माऊंट सिनाबंग – इंडोनेशियातील माऊंट सिनाबंग परिसरात शनिवारी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. या उद्रेकात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. तसेच रविवारी बचावकार्यादरम्यान जवांनांना घटनास्थळी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मृतदेह मिळाले.
मृत व्यक्तींमध्ये स्थानिक वाहिनीचे पत्रकार, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांचा समावेश आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात तप्त लाव्हारस, विषारी वायू आणि राख बाहेर पडत आहे. पुढील चार महिने हा ज्वालामुखीचा उद्रेक चालू राहणार आहे. त्यामुळे तेथील सुमारे चौदा हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे

February 02, 2014 in रोजगार

ठाण्यात कॉन्स्टेबलची आत्महत्त्या

ठाण्यात कॉन्स्टेबलची आत्महत्त्या
ठाणे – रेल्वे पोलिस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलने पोलिस ठाण्यातच पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाड़ून आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी घडली.
महिला कॉन्स्टेबल वैशाली पिंगट यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाड़ून आत्महत्त्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्त्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी पुढील तपास चालू आहे.

February 02, 2014 in रोजगार

हिजाबुल मुजाहिदीनच्या कमांडरला अटक

हिजाबुल मुजाहिदीनच्या कमांडरला अटक
श्रीनगर – हिजाबुल मुजाहिदीनच्या कमांडरला सुरक्षा रक्षकाच्या दलांनी रविवारी काश्मीरमधील अनंतनग जिल्ह्यातून अटक केली.
‘मिळालेल्या माहितीवरुन सुरक्षा रक्षकांनी टाकलेल्या छाप्यात मुबारक अहमद वाणी उर्फ मेजर सकिबला अटक करण्यात आल्याचे’ सैन्यदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तसेच छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणाहून एके रायफल, दोन पिस्तुल आणि काही युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मेजर सकिबचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.

February 02, 2014 in रोजगार

कूपनलिकेत पडलेल्या चिमुरडय़ाची सुटका

कूपनलिकेत पडलेल्या चिमुरडय़ाची सुटका
अहमदनगर : ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आला.. येथील खैरी निमगाव शिवारातील एका कूपनलिकेमध्ये अडकलेल्या चिमुरडय़ाला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. येथील पटारे यांच्या वस्तीवर ऊस तोडणी कामगार काम करत असताना विलास निकम या ऊस तोडणी कामगाराचा १८ महिन्यांचा चिमुकला शेजारीच शेतात असलेल्या
एका कूपनलिकेमध्ये पडला होता. या मुलाचा ३ वर्षाचा भाऊ बरोबर खेळत होता. त्याने आपला भाऊ खड्डय़ात पडल्याचे पाहून त्याने आईवडिलांना सांगितले. यानंतर तातडीनं या ठिकाणी मदत कार्य सुरू झाले.
दीडशे फूट खोल असलेल्या या कूपनलिकेमध्ये हा मुलगा तीस फुटांवर अडकला होता. गावकरी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने या ठिकाणी मदकार्य सुरू केले. मुलाला ऑक्सिजनचा पुरवठाही करण्यात आला. तीन डोझरच्या सहाय्याने मुलाची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर रात्री उशिरा या चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सध्या त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

February 02, 2014 in रोजगार

दूरसंपर्क स्पेक्ट्रमचा लिलाव सोमवारी

दूरसंपर्क स्पेक्ट्रमचा लिलाव सोमवारी
नवी दिल्ली – सरकारला तब्बल ११,३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ शकणारा बहुप्रतिक्षित स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेत भारती एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि इतर पाच कंपन्या सहभागी होणार असून हे हक्क मिळवण्यासाठी या कंपन्यांमध्ये मोठी चुरस आहे.
दूरसंपर्क विभागाने १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये ३८५ मेगाहर्ट्झ आणि ९०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये ४६ मेगाहर्ट्झ रेडिओवेव्हज उपलब्ध केल्या आहेत. दिल्ली, कोलकाता, मुंबई यासह एकूण १० क्षेत्रांमध्ये(सर्कल) विक्री करण्यात येणा-या या स्पेक्ट्रमच्या लहरींचे प्रमाण कमी केले आहे. यापूर्वी ४०३ मेगाहर्ट्झच्या लहरी उपलब्ध करण्याचे निर्धारित करण्यात आले होते.
या लिलावामध्ये सहभागी होणा-या अंतिम निविदादारांमध्ये आयडिया सेल्युलर, टेलिविंग्ज (युनिनॉर), रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम), टाटा टेलिसर्विसेस आणि एअरसेल यांचाही समावेश आहे.
दरम्यान काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये बोली लावण्यासाठी तीन कंपन्या पात्र नसल्याचे आढळले. व्होडाफोन इंडिया या कंपनीला सात क्षेत्रांमध्ये, आरकॉमला आठ आणि टाटा टेलिसर्विसेसला दिल्लीत बोली लावता येणार नाही.
फेब्रुवारी २०१२ मध्ये टू जी प्रकरणात १२२ परवाने रद्द केल्याने मोकळ्या झालेल्या रेडियोलहरींचा लिलाव करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सरकारला लिलावाची तिसरी फेरीही आयोजित करावी लागेल.
त्याशिवाय ९०० मेगाहर्ट्झ या स्पेक्ट्रम बँडअंतर्गत काही रेडियोलहरी जुन्या दूरसंपर्क परवान्याखाली असून त्यांची मुदत नोव्हेंबर २०१४ मध्ये संपत आहे. त्यामुळे या बँडचाही लिलाव करावा लागणार आहे. १८०० मेगाहर्ट्झच्या बँडच्या विक्रीसाठी सरकारने १७६५ कोटी रुपये प्रतिमेगाहर्ट्झची आधारभूत किंमत ठेवली आहे. मार्चमध्ये झालेल्या विक्रीपेक्षा ही किंमत २६ टक्क्य़ांनी कमी आहे.
९०० मेगाहर्ट्झ बँडची आधारभूत किंमत पूर्वीच्या लिलाव दरापेक्षा ५३ टक्क्य़ांनी कमी आहे. दिल्लीसाठी ३६० कोटी रुपये प्रतिमेगाहर्ट्झ, मुंबईसाठी ३२८ कोटी व कोलकात्यासाठी १२५ कोटी रुपये प्रतिमेगाहर्ट्झ किंमत आहे. या लिलावात सर्व स्पेक्ट्रम विकले जातील. हा लिलाव यशस्वी होईल, असा विश्वास दूरसंपर्क सचिव एम. एफ. फारुखी यांनी व्यक्त केला.

February 02, 2014 in रोजगार