पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2014

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या

कुडुस – तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेने संपूर्ण वाडा परिसरात खळबळ उडाली आहे.
‘सेहनाज सहा’ असे या मुलीचे नाव आहे. सेहनाज सहा आणि आरोपी अतुल लोते याची सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. सोमवारी रात्री अतुलने सेहनाजला त्याच्या पोल्ट्रीफ़ॉर्मवर आणले आणि तेथून दीड किमीवर असलेल्या जंगलात नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या करुन जंगलात फेकून दिले.बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून सेहनाजच्या घरच्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी अतुलने तिला नेल्याचे सेहनाजच्या भावाकडून कळले. सेहनाजच्या घरच्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आपणच बलात्कार करुन खून केल्याची कबुली अतुलने दिली. आरोपीवर ३६४, ३६६, ३७६, ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय हजारे करीत आहेत.

February 25, 2014 in महाराष्ट्र

नक्षलग्रस्त भागात पहिल्या टप्प्यातच मतदान घ्या

नवी दिल्ली- देशातील ३३ नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान घेण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशातील नक्षलग्रस्त भागात पहिल्या टप्प्यात मतदाना घेतल्यास अधिक सुरक्षा देता येईल तसेच हिंसाचाराच्या घटना टाळता येतील असे गृहमंत्रालयाचे मत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंसाचार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळेच हिंसक घटना टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने ही सूचना केली आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाने झारखंड, छत्तीसगड, बिहार, ओदिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील ३३ जिल्ह्यातील निवडणुकीच्या काळातील हिंसाचाराच्या घटनांची आकडेवारी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. गृहमंत्रालयाने लोकसभा निवडणूक २००४, २००९ आणि विधानसभा निवडणूक २००८, २००९, २०१० आणि २०१३ या वर्षातील आकडेवारी सादर केली आहे.याशिवाय २०१३मध्ये झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी ३८३ हल्ले केले आहेत. त्यात १५० नागरीक आणि सुरक्षा जवान ठार झाले आहेत. अशाच प्रकारच्या ३५३ घटना छत्तीसगडमध्ये झाल्या असून त्यात ११० जणांचा मृत्यू झाला आहे.बिहारमध्ये नक्षलवाद्यांकडून हिंसाचाराच्या १७६ घटनांमध्ये ६९, ओदिशामधील १०१ घटनांमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. गृहमंत्रालयाने झारखंडमधील १३, छत्तीसगडमधील आठ, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी चार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदान घेण्याची सूचना केली आहे.तर महाराष्ट्रातील गडचिरोली आणि मध्य प्रदेशमधील दोन जिल्ह्यांचा यात समावेश आहे. एप्रिल-मे महिन्यात होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल एक कोटी २० लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात येणार आहेत.

February 25, 2014 in देश-विदेश

युवकावर प्राणघातक हल्ला

यवतमाळ – येथील गांधी चौकात अशोक नगरातील युवकावर चाकुने भोसकुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सोमवारी रात्री ७.३० वाजता घडली. रितेश विलास बाविस्कर (२४) रा. अशोक नगर असे जखमी युवकाचे नाव आहे. आज रात्री तो गांधी चौकात उभा असताना आशिष मुन रा. अंबिका नगर, सुमित वाघमारे रा. अशोक नगर या दोघाने चाकुने सपासप रितेशच्या पोटात, छातीवर वार करुन प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी काळ््या रंगाच्या एम.एच. २९ / १४ क्रमांक असलेल्या दुचाकीने तेथून पळ काढला. ही बाब तेथे  उभ्या असलेल्या युवकांच्या निदर्शनास येताच जखमीला वसंतराव नाईक रुग्णालयात दाखल केले.  शहरचे प्रभारी ठाणेदार अमोल माळवे,डी.बी. पथकाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक गुलाब पंधरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली. वृत्त लिहेपर्यंत पोलीस कार्यवाही सुरु होती.

February 24, 2014 in महाराष्ट्र

दिवसाढवळ््या एक लाखाची घरफोडी

उमरखेड – शहरातील सराफा लाईनमध्ये राहणाºया व्यक्तीचे घर फोडून एक लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. गोविंद कमलनाथ अग्रवाल यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे ते कामात मग्न असल्याचा डाव साधून दुपारी १२ वाजता चोरट्याने त्याच्या घरात प्रवेश केला. त्यामधून नगदी ५५ हजार रुपये व ७ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण ७६ हजार रुपययाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही बाब निदर्शनास येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. दिवसाढवळ््या ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली असून भितीचे वातावर निर्माण झाले आहे.

February 24, 2014 in महाराष्ट्र
ट्रॅक्टर अपघातात एक ठार 0

ट्रॅक्टर अपघातात एक ठार

Photo-0016
उमरखेड – भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने एक इसम ठार तर एक महिला जखमी झाल्याची घटना येथून १६ किमी अंतरावर साखरा  येथे घडली. यामध्ये दोन मुले सुखरुप बचावले. साखरा शिवारातून माल घेऊन ट्रॅक्टर गावाकडे येत होता. अशातच चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रोडच्याखाली उतरून पलटी झाला. यामध्ये दबुन केशव नारायण बर्वे (३८) रा. साखरा, शशिकलाबाई रंगराव गोरे (५५) जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक मानकर, जमादार नोळे यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य करून जखमींना नांदेड येथे उपचारासाठी हलविले. मात्र वाटेतच केशव बर्वे याचा मृत्यू झाला तर दोन मुले सुखरुप बचावले. या प्रकरणी चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.

February 24, 2014 in महाराष्ट्र

आॅटोसह दारु जप्त, दोघास अटक

यवतमाळ- शहरातून अवैधपने दारुची वाहतुक करणारा आॅटो पोलिसांनी जप्त करून दोन जणांना अटक केली. जिल्हा विशेष पथकाने  रविवारी रात्री अप्सरा टॉकीज परिसरात ही कार्यवाही केली.
सचिन शामलाल पाली,शेख शहिरा बानो  जाकीर शेख, मंगेश सोपान मुरार, अंकुश वाईनबारचा चालक हे एका आॅटोतून अवैधपने देशी दारु नेत असल्याची माहिती जिल्हा विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे यांना मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून  अप्सरा टॉकीज परिसरात आॅटो अडवून तपासणी केली असता त्यामध्ये सहा देशी दारुच्या पेटया आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी दारु व आॅटो जप्त करून सचिन पाली, शेख शहिराबानो यास अटक केली तर दोन जण पसार झाले. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

February 24, 2014 in महाराष्ट्र

‘नक्षल्यांसोबतची ‘ती’ चकमक बनावट’

वृत्तसंस्था, गडचिरोली – पोलिस आणि माओवाद्यांमध्ये १८ फेब्रुवारी रोजी गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात उडालेली चकमक बनावट होती, असा आरोप आंध्र प्रदेश सिव्हिल लिबर्टीज कमिटीने (एपीसीएलसी) केला आहे. या चकमकीत सहभागी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून खटला चालविण्याची मागणीही समितीने केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातील बितकाठीच्या जंगलात झालेल्या या चकमकीत दोन महिला माओवाद्यांसह सात माओवादी ठार झाले होते. हे सर्व जण लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होते, असा दावा पोलिसांनी केला होता. या चकमकीत माओवाद विरोधी मोहिमेवरील सी-६० कमांडो आणि स्थानिक पोलिसांच्या सहभाग होता. पोलिसांकडून गोळीबाराचे ८० ते ९० राऊंड तर माओवाद्यांच्या बाजूने ४० ते ५० राऊंड फायर करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले होते. या घटनेनंतर मानवाधिकारांसंदर्भात काम करणाऱ्या आंध्र प्रदेश सिव्हिल लिबर्टीज कमिटी आणि पीपल्स लॉयरच्या सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथे दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. पोलिसांनी चकमकीच्या घटनेची योग्य चौकशीही केलेली नाही. या घटनेबाबत स्थानिक प्रसार माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. मृतदेह थेट गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच आणण्यात आले होते, असा दावा ‘एपीसीएलसी’चे महासचिव सी. एच. चंद्रशेखर यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. पोलिसांनी दोन महिलांसह सात माओवाद्यांना कारमधून घटनास्थळी नेले आणि त्यांच्यावर अतिशय जवळून गोळ्या झाडल्या, असा आरोपही चंद्रशेखर यांनी केला.
या माओवाद्यांनी गुन्हेगारी कृत्य केले तर त्यांना न्यायालयात हजर करणे गरजेचे होते. त्यांच्यावर कायद्यानुसार खटला चालवायला हवा होता. परंतु पोलिसांनी थेट बनावट चकमक घडवून आणली. ही चकमक नसून थंड डोक्याने केलेली हत्याच होय. त्यात सहभागी पोलिसांचे राजीनामे घ्यावेत. त्यांच्यावर हत्येचा खटला चालवावा व या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही चंद्रशेखर यांनी केली आहे. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव झाली की, या चकमकीत सहभागी पोलिसांविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. तूर्त गडचिरोली जिल्ह्यातून माओवादविरोधी मोहिमेवरील सर्व पोलिस माघारी घेण्याची मागणीही चंद्रशेखर यांनी केली आहे.

February 24, 2014 in महाराष्ट्र

पगार दिला नाही म्हणून सिक्युरिटी गार्डने केले मुलाचे अपहरण

पुणे –  गेल्या १० महिन्यांपासून पगार दिला नाही म्हणून संतापलेल्या सिक्युरिटी गार्डने एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. सिंहगड रोडवरील सनसीटीजवळ एका हायप्रोफाइल सोसायटीत ही घटना घडल्यानंतर काही तासांच्या आतच त्या सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सिंहगड रोडवरील सनसीटीजवळ एका हायप्रोफाइल सोसायटीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम पाहणारा प्रविण लिंगप्पा याने त्याच सोसायटीमधील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे संध्याकाळच्या वेळात अपहरण केले. या मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी साताऱ्याकडे गेल्याची माहिती मिळताच पुण्याचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे-पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलिसांची पथके नेमली आणि साताऱ्यात महत्वाच्या ठिकाणी शोध घेतला असता सातारा एसटी स्टँडवर आरोपीला अटक करण्यात आणि मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.
सिक्युरिटी गार्ड पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांमुळे शहरात सिक्युरिटी गार्डकडून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे. प्रविण लिंगप्पा हा मुळचा कर्नाटकचा. नोकरीच्या शोधासाठी वर्षभरापूर्वीच पुण्यात आला होता. त्याला एका सिक्युरिटी गार्ड पुरवणाऱ्या कंपनीने चांगला पगार देतो असे सांगत एका सोसायटीत सिक्युरिटी गार्डची नोकरी देतो, असे सांगून या सोसायटी पाठवले. गेले आठ-नऊ महिने प्रविण तेथेच काम करत होता. कंपनीचे अधिकारी आल्यानंतर ते त्याला केवळ १००-२०० रुपये हातावर टेकवून म्हणायचे, दोनवेळचं जेवण मिळतना मग शांत राहा. नाहीतर चांगलाच चोप देऊ. अखेर प्रविणकडे पर्याय उरला नाही म्हणून त्याने संतापून व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण केसे. तसेच सोसायटीच्या जीन्यामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगितले. पगार मिळाला तर मुलाला लगेच सोडून देईन, असे या चिठ्ठीत लिहले होते, असे आरोपीने पोलीस चौकशीच्या वेळी सांगितले. कोणत्याही प्रकारचा तपास न करता, नियम न पाळता शहरात अनेक सिक्युरिटी गार्ड पुरवणाऱ्या कंपन्या वाढल्या आहेत. या कंपन्या सिक्युरिटी गार्डला पैसे देत नाही पण काम मात्र करून घेतात. अशामुळे शहरात गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, असे सांगितले जात आहे.

February 24, 2014 in महाराष्ट्र

शिवसेना खासदार वाकचौरे ग्रेसमध्ये

मुंबई – शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज, सोमवारी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. वाकचौरे यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे शिर्डीतील शिवसैनिक संपप्त झाले आहेत. वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसैनिकांनी गोंधळ करू नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. द्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी कॉंग्रेसमध्ये केला आहे.

February 24, 2014 in मुख्य पान

मोदींच्या सभेतील बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना अटक

नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथे झालेल्या प्रचार सभे दरम्यान बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी दोघांना अटक केली. या दोघांना उत्तर प्रदेशमधून अटक केल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे. ऑक्टोबर २०१३मध्ये मोदींच्या पाटणा येथील हुंकार रॉली दरम्यान सात स्फोट झाले होते. यात सहा जण ठार तर ८०हून अधिक जण जखमी झाले होते.

February 24, 2014 in मुख्य पान

विरोधकांची भूमिका लोकशाहीसाठी धोकादायक – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुंबई- विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्दयावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र ज्या पद्धतीने विरोधक धमकीची भाषा वापरत आहेत, ती संसदीय लोकशाहीला धोकादायक असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. मात्र त्यांच्या टीकेला उत्तर हवे असेल तर त्यांनी चर्चा करणे गरजेचे आहे. मात्र केवळ टीका करायची आणि चर्चेपासून पळ काढायचा हीच विरोधकांची भूमिका आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा विरोधकांनी कायम ठेवली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टोलचा मुद्दा, आदर्श घोटळा आणि एलबीटी या मुद्दय़ांवर राज्यपालांच्या अभिभाषणातून ठोस आश्वासन न मिळाल्यास त्यांचे अभिभाषण होऊ देणार नाही, असा इशारा खडसे यांनी दिला.अधिवेशन सुरळीत चालावे या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यासाठी विरोधकांनी येणे अपेक्षित होते. राज्याच्या राजकारणातील ही प्रथा विरोधक वेगळ्या दिशेने नेत असल्याबद्दल चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांकडे सध्या कोणतेही नवीन मुद्दे नाहीत.डोळ्यांसमोर ठेवून ते केवळ राजकारण करत आहेत. मात्र सरकार जनतेच्या हिताच्या दृष्टीने या अधिवेशनात निर्णय घेईल. राज्यपालांचे अभिभाषण हे महत्त्वाचे आहे. ते होऊ न देण्याची विरोधकांनी दिलेली धमकी दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊनच अधिवेशनाचा कालावधी चार दिवसांचा ठेवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

February 24, 2014 in मुख्य पान

अधिवेशन सुरु, विरोधकांचा गोंधळ

मुंबई- महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सकाळी ११ वाजता सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत.भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यांवर सरकारविरोधात निदर्शने केली. टोल बंद करा, आदर्श अहवालातील दोषी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करण्याच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. राज्यपालांचे अभिभाषण सुरु असतानाही विरोधकांनी गोंधळ घातला.
महत्त्वाची १२ विधेयके होणार सादर
या अधिवेशनात महत्त्वाची १२ विधेयके सादर केली जाणार आहेत. त्यात महाराष्ट्र सावकारी विधेयक, ग्रामपंचायत सुधारणा विधेयक, पोलिस बदल्या, अस्थापने मंडळे याबाबत तरतूद करणारे सुधारणा विधेयक, पुरवणी विनियोजन विधेयक (२०१४), विनियोजन लेखानुदान विधेयक सादर केली जाणार आहेत.

February 24, 2014 in मुख्य पान

आरजेडी’च्या १३ आमदारांचे राजीनामे

नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाच्या बिहारमधील १३ आमदारांनी सोमवारी राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आमदारांचा राजीनामा पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षातील या १३ आमदारांनी सोमवारी विधानसभेचे अध्यक्षांकडे राजीमाने सोपवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे आमदार ‘जेडीयू’मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र या राजीनामा नाट्यावर अद्याप कोणाही अधिकृत माहिती दिलेली नाही.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील १३ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. हे सर्वजण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयू’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. बिहार विधानसभेच्या २४३ सदस्यांमध्ये आरजेडीचे २२ आमदार आहेत. त्यामुळे १३ जणांनी राजीनामे दिल्यामुळे पक्षाकडे केवळ नऊच आमदार शिल्लक राहिले आहेत.

February 24, 2014 in देश-विदेश
 नाशिक अपर आयुक्त कार्यालयात 570 जागा 0

नाशिक अपर आयुक्त कार्यालयात 570 जागा

7

आदिवासी विकास विभागातील नाशिक अपर आयुक्त कार्यालयात 570 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक या कार्यालयाच्या आस्थापनेवर प्राथमिक शिक्षण सेवक –मराठी माध्यम (207 जागा), माध्यमिक शिक्षण सेवक (36 जागा), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (26 जागा), अधिक्षक –पुरुष (24 जागा), अधीक्षक- स्त्री (66 जागा), गृहपाल-पुरुष (10 जागा), गृहपाल-स्त्री (17 जागा), उपलेखापाल (7 जागा), वरिष्ठ लिपिक (13 जागा), कनिष्ठ लिपिक (140 जागा), वाहन चालक (4 जागा), आदिवासी विकास निरीक्षक (7 जागा), लघु टंकलेखक (2 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक-इंग्रजी माध्यम (3 जागा), ग्रंथपाल (7 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आदिवासी विकास विभागातील ठाणे अपर आयुक्त कार्यालयात 248 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे या कार्यालयाच्या आस्थापनेवर संशोधन सहायक (3 जागा), उपलेखापाल (16 जागा), आदिवासी विकास निरीक्षक (1 जागा), वरिष्ठ लिपिक (15 जागा), लिपिक टंकलेखक (94 जागा), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (3 जागा), माध्यमिक शिक्षण सेवक (18 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक –मराठी माध्यम (46 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक-इंग्रजी माध्यम (8 जागा), अधिक्षक –पुरुष (4 जागा), अधीक्षक- स्त्री (4 जागा), गृहपाल-पुरुष (1 जागा), गृहपाल-स्त्री (8 जागा), वाहन चालक (4 जागा), ग्रंथपाल (15 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आदिवासी विकास विभागातील अमरावती अपर आयुक्त कार्यालयात 216 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती या कार्यालयाच्या आस्थापनेवर संशोधन सहायक (3 जागा), उपलेखापाल (12 जागा), आदिवासी विकास निरीक्षक (5 जागा), वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक (27 जागा), कनिष्ठ लिपिक (100 जागा), अधिक्षक –पुरुष (3 जागा), अधीक्षक- स्त्री (3 जागा),लघुटंकलेखक (3 जागा), वाहन चालक (8 जागा), गृहपाल-पुरुष (3 जागा), गृहपाल-स्त्री (3 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक –मराठी माध्यम (20 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक-इंग्रजी माध्यम (7 जागा),कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सेवक (5 जागा), माध्यमिक शिक्षण सेवक (14 जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहायक आयुक्त-औषधे या पदाच्या 4 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन (4 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आदिवासी विकास विभागातील नागपूर अपर आयुक्त कार्यालयात 401 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयाच्या आस्थापनेवर प्राथमिक शिक्षण सेवक – मराठी माध्यम (77 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक-गणित व विज्ञान (एकूण 10 जागा), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक -मराठी/इंग्रजी/रसायन-भौतिक/इतिहास/गणित (एकूण 8 जागा), अधिक्षक – पुरुष (35 जागा), अधीक्षक- स्त्री (23 जागा), गृहपाल-पुरुष (11 जागा), गृहपाल-स्त्री (14 जागा), उपलेखापाल (13 जागा), आदिवासी विकास निरीक्षक (1 जागा), वरिष्ठ लिपिक (27 जागा), कनिष्ठ लिपिक (146 जागा), वाहन चालक (10 जागा), ग्रंथपाल (12 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (10 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), संशोधन सहायक (23 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 23 फेब्रुवारी 2014 या दिवसीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नांदेडमधील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात 9 जागा
नांदेडमधील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात माळी (1 जागा), धोबी (1 जागा), सहस्वयंपाकी (1 जागा), आया (1 जागा), शिपाई (1 जागा), कक्षसेवाक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 32 जागा
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत प्रकल्प संचालक –संशोधन (1 जागा), मुख्य प्रकल्प संचालक (1 जागा), प्रकल्प संचालक-स्पर्धा परीक्षा कोचिंग (1 जागा), प्रकल्प संचालक-जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (2 जागा), सहायक प्रकल्प संचालक – जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (3 जागा), मुख्य प्रकल्प संचालक-कौशल्य विकास (1 जागा), मुख्य विधी सल्लागार (1 जागा), वरिष्ठ संशोधन अधिकारी (2 जागा), संशोधन अधिकारी (6 जागा), संशोधन सहायक (6 जागा), प्रकल्प व्यवस्थापक- पडताळणी समिती (8 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 21 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 75 जागा
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत निबंधक (15 जागा), संशोधन अधिकारी (15 जागा), संशोधन सहायक (15 जागा), व्यवस्थापक (15 जागा), रेकॉर्ड किपर (15 जागा) ही पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत 79 जागा
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारितील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (23 जागा), वैज्ञानिक सहायक-मानसशास्त्र (2 जागा), वैज्ञानिक सहायक-सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण (5 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (8 जागा), वरिष्ठ लिपिक -भांडार (1 जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (7 जागा), लिपिक टंकलेखक (11 जागा), वाहनचालक (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (16 जागा), चपराशी (3 जागा), सहआचारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.formonline.net/fsl व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

February 24, 2014 in रोजगार

आ. खडसे यांच्या वाहनाला अपघात एक ठार, चार जखमी

Photo0008 Photo0781
यवतमाळ – भरधाव दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात आ. विजय खडसे यांच्या वाहनाला आज रविवारी सायंकाळी पाच वाजता वन तपासणी नाक्यासमोर अपघात झाला. यामध्ये माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जागीच ठार झाले असून आमदारासह चार जण जखमी झाले.
आ. विजय खडसे हे आपल्या कार्यकर्त्यांसह स्कार्पीओ वाहनाने (एम.एच. १४/ ४३०५ ) नांदेड येथे जात होते. अशातच शहरापासून दीड किमी अंतरावर वन तपासणी नाक्यासमोरून येणाºया दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक आहुटे यांचा गाडीवरून ताबा सुटला. त्यामुळे स्लीप झालेले वाहन पलट्या खावून १०० फूट फरफटत गेले. यामध्ये माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. दशरथ वानखेडे (४०) रा. सुकळी हे जागीच ठार झाले. तर उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आ. विजय खडसे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळे (३०), युवक काँग्रेसचे सचिव शिवाजी वानखेडे, त्यांची आई गोदावरी वानखेडे (७२) आदी चार जण जखमी झाले. त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या अपघातात एम. एच. २९ / ए.एफ. १६५४ क्रमांकाची मोटारसायकल चकनाचूर झाली असून, अन्य चार दुचाकी क्षतिग्रस्त झाल्या. या घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळ व रुग्णालयात गर्दी केली होती.

February 23, 2014 in मुख्य पान

यवतमाळ जिल्ह्यात गारपिट

1 2
१०० घराची पडझड, पिकाचेही नुकसान
यवतमाळ- गेल्या ुआठवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलाचा आज रविवारी जिल्ह्याला परिणाम भोगावा लागला. जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाºयासह झालेल्या गारपिटीने गहू, हरभºयाच्या पिकासह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले. आधीच जिल्ह्याची आणेवारी ५० पैशाच्या आत असताना उन्हाळी हंगामावर मदार उरलेल्या शेतकºयांची स्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे अर्धमेली झाली आहे.
आज दुपारी वादळीवाºयासह गारपीटीने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. आर्णी, दिग्रस, नेर, पुसद, कळंब, वणी, दारव्हा तालुक्यातील गहू, हरभरा, संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोसाट्यासह आलेल्या वादळासोबतच गारपीटीने हजारो हेक्टरवरील गहू, हरभºयांची धूळधाण लावली. मोजक्या प्रमाणात का होईना, कशाबश्या तग धरून असलेल्या संत्रा, मोसंबी, पपईच्या फळबागांचीही हानी झाली. आर्णी तालुक्यातील अनेक घरांवरील टिनपत्रे वादळात एखाद्या पृष्ठाप्रमाणे उडून गेली. अनेक गावातील विज पुरवठा खंडित झाला तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प पडली. शहरातील अनेक भागात गारांचे ढिग साचले होते. वादळात नगरपरिषदेचा लोखंडी दरवाजाही उन्मळून पडला. सेवानगर, पोलीस स्टेशन परिसर, मालाणीनगर, आमणी रोड, हैजरीवंगना परिसर आदी भागातील नागरिकांचा संसार काही वेळाच्या वादळामुळे उघड्यावर आला. तर तालुक्यातील पोडवण, देऊरवाडी(बुटले), टेंडुळी, अंतरगाव, चिखली, पाठोडा येथेही गारपीटीसह वादळी पावसाने नुकसान झाले. दिग्रस तालुक्यालाही गारपीटीचा त्रास भोगावा लागला. यात शहरासह, तुपटाकळी, वाईमेंढी, चिचपात्र, बेलोरा या गावात आवळ््याच्या आकाराच्या गारा पडल्या. ग्रामीण भागात सतत १५ मिनिटापर्यंत गारपिट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नेर तालुक्यामध्येही ११ गावातील पिके भूईसपाट झाली असून लाखोंरुपयाचा फटका शेतकºयांना बसला आहे. काही ठिकाणी जनावरांना इजा होवून घरांची पडझड झाली आहे. दुपारी ३.१३ ते ४.३० वाजेपर्यंत वादळी पावसाने तालुक्यात तांडव माजविले. वणी तालुक्यातील उकणी, भालर, लागी, निवासी, निलजई, पुनवट आदी गावात शेतीपिकांसह घरांचे नुकसान झाले. पुसद तालुक्यासह कळंब, दारव्हा तालुक्यालाही वादळाचा सामना करावा लागला.

February 23, 2014 in मुख्य पान

वीजेच्या धक्क्याने शेतकºयाचा मृत्यू

दारव्हा – शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकºयाला वीजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ७.३० वाजता बोदेगाव शिवारात घडली.
दिलीप विश्वनाथ लोखंडे (४२) रा. बोदेगाव असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी ते गेले होते. अशातच वीज प्रवाहाचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

February 23, 2014 in महाराष्ट्र

लुटमार करणारी टोळी सक्रीय, पाच जणांना लुटले

यवतमाळ – शहरात चोरी, घरफोडी व लुटमारीच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. काल लुटमार करणाºया टोळीने हैदोस घालून चाकुच्या धाकारवर पाच जणांना लुटल्याच्या घटना घडल्या. शहर ठाण्याच्या हद्दीत यवतमाळ नागपूर रोडवरच लागोपाट तीन जणांना आणि वडगाव रोड हद्दीत गोदणी रोडवर दर्गा आणि चापडोह येथे प्रत्येकी एकाला लुटले. नव्याने रुजु झालेल्या ठाणेदाराला चोरट्याने सलामी दिली आहे. या घटनेमुळे दुचाकी व कारने प्रवास करणाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून दहशत पसरली आहे.  सागर हरिदास अवधुतकर (२६) रा. सारस्वत ले आऊट हा युवका आपल्या दुचाकीने (एम.एच. २९/ एल ४५९५) अमलोकचंद महाविद्यालयात भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर तेथून रुपलानी बाबा दर्गाकडे तो जात असताना रोडवर संडासला बसलेल्या चोरट्याने चाकुचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर खिशातील नगदी १ हजार ९५० रुपये, मोबाईल व दुचाकी असा एकुण २१ हजार ९५० रुपयाचा माल जबरीने हिस्कावून नेला. तसेच उमेश भिमराव मडावी (२४) रा. करळगाव हे आपल्या दुचाकी वाहनाने (एम.एच. २९/ एल ४५९५) चापडोह येथून गावाकडे परत जात होते. अशातच चापडोह शिवारात दोन इसमानी दुचाकी थांबवून मडावी जवळील १ हजार ८०० रुपये रोख, दोन मोबाईल असा एकुण ५ हजार ८०० रुपये हिस्कावून नेले. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी दोन्ही घटनेतील चोरट्याविरूद्घ गुन्हे दाखल केले. पाटबंधारे विभागात कार्यरत कालवा चौकीदार दिवाकर लक्ष्मण पजगाडे (३६) हे राळेगाव येथून यवतमाळकडे आपल्या दुचाकी वाहनाने (एम.एच. २९/ ए.बी. ५१५३) येत होते. अशातच भारी येथील विमानतळाजवळ रात्री ७.३० वाजताच्या सुमारास तोंडाला काळे दुप्पटे बांधुन असलेल्या तीन जणांनी आपले दुचाकी वाहन आडवे केले. चाकुचा धाक दाखवून पैसे कहा है असे म्हणून जबरीने खिशात हात टाकून नगदी एक हजार रुपये, दोन एटीएम कार्ड हिस्कावून कळंबकडे पळून गेले. तसेच याच परिसरात नामदेव तिजारे रा. अयोध्या नगरी यालाही अडवून १५ हजार रुपये नगदी, मोबाइल असा एकुण १६ हजाराचा माल हिस्कावून नेला. तर नंदकिशोर पातालबंशी रा. बाजोरीया नगर यालाही विमानतळा जवळ अडवून दोन हजार रुपये नगदी, एक मोबाईल आदि माल जबरीने हिस्कावून नेला. या प्रकरणी शहर पोलिसांनी चोट्याविरूद्घ गुन्हे दाखल केले. वडगाव रोड पोलिस ठाण्यात अशोक बागुल हे आजच रुजु झाले असून चोरट्यानी त्यांना सलामी दिली आहे. या घटनांनी दुचाकी वाहनाने प्रवास करणाºया व्यक्तीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून दहशत पसरली आहे.

व्हॉट्स अ‍ॅपवर ‘लास्ट सीन’ चा पर्याय लपवता येणार

मुंबई – व्हॉट्स अ‍ॅपवरील युझर्सने व्हाट्स अ‍ॅप शेवटचे कधी पाहिले हे दाखवणारा ‘लास्ट सीन’ हा पर्याय आता युझर्सला इतरांपासून लपवता येणार आहे. फेसबुकने व्हाट्स अ‍ॅपला विकत घेतल्यानंतर व्हाट्स अँपच्या प्रायव्हसीला प्राधान्य देत दोन नवे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.गेल्या कित्येक दिवसांपासून युझर्सकडून या पर्यायांची मागणी केली जात होती. यामागणींची दखल घेतल फेसबुकने व्हॉट्स अ‍ॅपमध्ये हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.‘लास्ट सीन’ या पर्यायासोबतच आता युझर्स त्यांचे प्रोफाईल फोटो आणि स्टेटसही इतरांपासून हाईड करु शकता. आधी हा पर्याय ओएसवर उपलब्ध होते मात्र आता अँड्रॉईडवरही उपलब्ध करण्यात आले आहेत. सध्या गुगल प्ले स्टोरमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याने युझर्सना व्हाट्स अ‍ॅपच्या वेबसाईटवर जाऊन नव्याने अँप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.http://www.whatsapp.com/android/ / यावेबसाईटद्वारे तुम्ही हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करु शकता. तसेच अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या फोनमधील अँड्रॉईडचे व्हर्जन हे २.१ च्या पुढील असावयास हवे.दोन दिवसांपूर्वीच फेसबुकने सोशल मिडीयामधील आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून व्हॉट्स अ‍ॅपला विकत घेतले.

February 22, 2014 in मुख्य पान

ज्युनियर विश्वचषक- भारताचे आव्हान संपुष्ठात

दुबई- ज्युनियर(१९ वर्षाखालील) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत भारताचे आव्हान संपुष्ठात आले. शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत भारताने आठ बाद २२१ धावा केल्या होत्या. इंग्लंडने हे लक्ष्य अखेरच्या षटकात तीन गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले.स्पर्धेतील साखळी फेरीतील तिन्ही सामने भारतीय संघाने जिंकले होते. त्यामुळे उपांत्य फेरीसाठीची भारतीय संघाची दावेदारी प्रबळ मानली जात होती. मात्र इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्ठात आले आहे.

February 22, 2014 in विदर्भ