मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.गेल्या काही दिवासांपासून ‘आप’ने राज्यातील वीज खात्यातील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांना लक्ष्य करत आहेत. यावरून अंधेरी येथील चकाला परिसरात असणा-या ‘आप’च्या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला बोल केला. या हल्ल्यात ‘आप’च्या कार्यालयातील सामानाची तोडफोड करण्यात आली. तसेच कार्यालयातील पक्षाचे नेते आणि दिल्लीचा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे छायाचित्र फाडण्यात आली आहेत.दुपारी अडीचच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘आप’च्या कार्यालयावर हल्ला केला. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असून पुरावा म्हणून सीसीटीव्हीचे फुटेज देणार असल्याचे आपचे नेते परितोष यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे.या हल्ल्यानंतर ‘आप’चे नेते मयांक गांधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे आंदोलनासाठी जाताना त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. ‘आप’च्या राज्यातील प्रभारी अंजली दमानिया यांनी महावितरण आणि महाजनकोमध्ये २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते.
Archive for February, 2014
‘खैरलांजीच्या माथ्यावर’ चित्रपटाला बोर्डने दिलेले प्रमाणपत्र रद्द
नागपूर – खैरलांजी हत्याकांडावर बेतलेल्या ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने दिलेले प्रमाणपत्र शुक्रवारी रद्दबादल ठरवीत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने या चित्रपटावरील बंदी कायम ठेवली आहे. आक्षेपार्ह दृश्य वगळून नव्याने सेन्सॉरचे प्रमाणपत्र घ्यावे असे आदेश दिले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगनादेश देण्याची विनंती करणारी याचिका भय्यालाल भोतमांगे आणि अखिल भारतीय धम्मसेनेचे संयोजक रवी शेंडे यांनी दाखल केली होती.
भोतमांगे यांनी केलेल्या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड. ए. हक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिलेले प्रमाणपत्र कायम ठेवणे अशक्य आहे, चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यात यावी, चित्रपटाला नव्याने प्रमाणपत्र बहाल करीत असताना भय्यालाल भोतमांगे यांना बाजू मांडण्याची संधी द्यावी, यावर त्यांच्याकडून सत्य परिस्थिती जाणून घ्यावी आणि त्यानंतरच चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने प्रमाणित करावे, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. भोतमांगे यांना या चित्रपटात ‘दारूडा’ तसेच भेकड चित्रित करण्यात आले आहे. हे व्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचा दावा करीत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. कोणतीही विचारणा न करता निर्मात्यांनी मुंबईत चित्रपट दाखवला. चित्रपटातून चारित्र्यहनन होत असून, मुलीचीही प्रतिमा मलिन होत आहे. काही दृश्ये अवास्तव दाखवण्यात आली आहेत. मुलीवर झालेल्या अन्यायासाठी जणू आम्हीच कारणीभूत असल्याचा भास चित्रपटातून होत आहे. संपूर्ण चित्रपटावर आक्षेप नाही, मात्र काही दृश्ये वगळावी. कारण खैरलांजी हत्याकांड काल्पनिक नसून ते सत्य असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील जयदेव शामकुवर, अॅड. मिलिंद खोब्रागडे यांनी केला.
होळीच्या दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा, राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध
नागपूर – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा १६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. परंतु याच दिवशी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या होळीचा सण असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
होळीच्या दिवशी परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांना या सणाच्या उत्साहाला मुकावे लागेल. शिवाय, काही अनुचित प्रकारही होऊ शकतील. या सणाची धामधूम ही ग्रामीण भागात जास्त असते. एरवीसुद्धा या दिवशी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर परिणाम होतो. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बाहेरगावी असल्यामुळे होळीचा सण लक्षात घेता बहुसंख्य विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलून दुसऱ्या तारखेला घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष सुरेश पाबळे यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन देखील परीक्षा परिषदेला देण्यात आले आहे.
कार दरीत कोसळून अपघात; तीन ठार
पुणे – नाशिक रस्त्यावर वाकीमध्ये वॅगन आर आज (शनिवार) सकाळी गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले. या अपघातात पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांचा मुलगा प्रीतम बोऱ्हाडे याच्यादेखील मृतांमध्ये समावेश आहे. प्रीतम बोऱ्हाडेसह त्याच्या दोन मित्रांचा देखील अपघातात मृत्यू झाला असल्याचे समजते. नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.
0
साहित्याने युवकांमधील नकारात्मकता काढण्याचे काम करावे - संजय देवतळे, 63 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन
यवतमाळ दि.21: अलिकडे युवकांमध्ये नकारात्मकता वाढत चालली आहे. युवा पिढी अशा विचारांमध्ये लोटल्या गेल्यास प्रगतीला खिळ बसेल. कोणत्याही क्षेत्रात चांगली प्रगती साधण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. त्यामुळे युवकांमधील नकारात्मकता काढण्याचे काम साहित्याने करावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आर्णी येथे आयोजित 63 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन देवतळे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर सुप्रसिध्द वऱ्हाडी कवी तथा 63 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर बडे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, संपादक तथा जेष्ठ साहित्यिक सुरेश व्दादशिवार, जेष्ठ कवी विठ्ठल वाघ, 62 व्या संमेलनाचे
अध्यक्ष किशोर सानप, श्रीपाद भालचंद्र जोशी, रमाकांत कोलते, रवींद्र शोभणे, दिलीप एडकर, कलीम खान, शंकरराव सांगळे, डॉ.संजय भारती आदी उपस्थित होते. राज्यात यशवंतराव चव्हाणांनी सांस्कृतिक चळवळ सुरु केली. नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी ती वाढविली. शासन साहित्य चळवळीला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. साहित्य प्रेरणा देणारे आहे. साहित्यिकांनी ज्ञान, विज्ञान तसेच इतर महत्वांच्या बाबींमध्ये होणाऱ्या बदलांची दखल घेणे आवश्यक आहे. साहित्याच्या प्रकाशातूनच कौशल्य वाढीस लागते. त्यामुळे युवकांच्या हातात साहित्य देतांना त्यांची मानसिकता बदलविणारे साहित्य असले पाहिजे. परिश्रमाशिवाय पर्याय नाही, ही बाब साहित्याने युवकांच्या लक्षात आणुन दिली पाहिजे. प्रयत्नानेच यशस्वी होवू शकतो, ही बाब पटवून देण्यासोबतच साहित्याने युवकांमध्ये स्वप्नांची बिजे रोवली पाहिजे, असे .देवतळे साहित्य तसेच नाटकांमध्ये सामाजिक परिवर्तनाची ताकद आहे. महाराष्ट्र साहित्य, कलावंतांची खाण आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन दुर्मिळ ग्रंथांची जपवणूक करण्यासाठी अशा सर्व ग्रंथांचे डिजीटायझेशन करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आपले स्वागतपर मनोगत व्यक्त करतांना सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी साहित्यात परिवर्तन घडविण्याची शक्ती आहे, असे सांगितले. लेखनीत प्रचंड ताकद आहे. साहित्यिकांनी प्रभावी साहित्य केल्यास व्यसनमुक्ती होवू शकते. मानव कल्यानाचे काम साहित्य करीत असते, असे ते म्हणाले. संमेलनाचे अध्यक्ष शंकर बडे यांनी यावेळी विविध विषयांवर आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रकाश टाकला. जगण्याशी प्रामाणिक असले तरच साहित्यिक, कवींच्या शब्दामध्ये जोर येतो. आपण आयुष्यभर मानसे वाचण्याचेच काम केले. त्यामुळे माझ्या कवितेत वास्तविकता आहे. आयुष्यासोबत कविता होत गेली. जगण्याचेखरेपण कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केल्याचेअध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले. जेष्ठ साहित्यिक सुरेश व्दादशिवार, 62 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष किशोर सानप यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी काही पुस्तकांचे प्रकाशनही झाले. त्यात प्राचार्य प्रभाकर कामतकर लिखीत जटायु हा कथासंग्रह, सुमन मनवर लिखीत संदेश हा व्यसंग्रह, विशेष पवार लिखीत गितांजलीचे बंजारी भाषेत अनुवाद झालेले विशेष गितांजली या पुस्तकासोबतचे सुनिल जयस्वाल यांच्या पाऊलखुना या व्हिडिओ सीडीच्या प्रकाशनाचा समावेश होता. उद्घाटन समारंभाला साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत तसेच साहित्य क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
सहाय्यक फौजदारासह पोलीस शिपायास लाच घेतांना रंगेहात पकडले
यवतमाळ : वणी तालूक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार दिलीप उपासराव कांबळे व नायक पोलीस शिपाई रामदास गंगाधर धोंगळे यांना पंचा समक्ष पाच हजार रुपयाची लाच स्विकारतांना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने 21 फेब्रुवारीला रंगेहात पकडले.
या संदर्भात वणी तालूक्यातील तरोडा येथील ट्रॉन्सपोर्ट व्यावसायीक दिनकर नथ्थूजी भोयर यांना त्यांच्या मालकीच्या जप्त केलेल्या अपघात ग्रस्त मेटॉडोर (407) वाहनाला सोडण्यासाठी सहाय्यक फौजदार कांबळे व पोलीस शिपाई धोंगळे यांनी पाच हजार रुपये रकमेची मागणी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने 20 फेब्रुवारी 2014 रोजी पडताळणी दरम्यान पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. व एक हजार रुपये त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी अमरावती परीक्षेत्र विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सहाय्यक फौजदार दिलीप उपासराव कांबळे व नायक पोलीस शिपाई रामदास गंगाधर धोंगळे यांना पाच हजार रुपयाची पंचा समक्ष पोलीस स्टेशनमध्ये लाच स्विकारतांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुध्द कलम 7,12,13 (1)(ड) सह 13(2) लाच-लुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव, पोलीस हवालदार अरूण गिरी, सुशिल झोडगेकर, प्रकाश शेंडे, पो. नायक सुधाकर मेश्राम, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, गजानन राठोड, निलेश पखाले, अनील राजकुमार, अमित जोशी तसेच वाशीम येथील ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस हवालदार रमेश ताजने, कॉन्स्टेबल आकेश काळमुंदळे, चालक सुधाकर कोकेवार,यांनी सदर कामगीरी पार पाडली.
0
बेरोजगार अभियंत्यांसाठी काम वाटप बैठकीचे आयोजन
यवतमाळ : सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यांना काम वाटप करण्याचा दृष्टीने दिनांक 26 फेब्रुवारी 2014 रोजी दुपारी 3 वाजता काम वाटप बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठक सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या सभागृहात होत असून या बैठकीला आवश्यक दस्ताऐवजासह संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यवतमाळ यांनी केले आहे.
विदर्भासाठी रिपाई (ए)चे धरणे आंदोलन
यवतमाळ- वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागणीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपाई (ए)च्या वतीने २४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. मात्र विदर्भाची मागणी जुणी असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रिपाईचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गोविंद मेश्राम, नवनित महाजन, महेंद्र मानकर, अॅड.रवींद्र अलोणे, वसूर्केत पाटील, सदाशिव मनवर, रामदास बनकर, अॅड.भारती मेश्राम, जि.प.सदस्या सुलोचना भोयर, वनिता मिसळे यांनी केले आहे.
वेडसीच्या ‘त्या’युवकाचा खून, चार जणाविरूद्घ गुन्हे
यवतमाळ – वेडसी येथील बेपत्ता युवकाचा एक म हिन्यापूर्वी मृतदेह आढळ ला होता. या युवकाचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून वडकी पोलिसांनी चार जणाविरूद्घ खूनाचा गुन्हा दाखल केला. संजय पांडूरंग चिवाने रा. वेडशी असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने १६ जानेवारी रोजी अश्लिल शिवीगाळ केल्याची तक्रार मुक्ता सुनिल लेनगुडे या महिलेने वडकी पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान १९ जानेवारीपासून संजय हा घरून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी पोलिसात दिली. अशातच त्याची शोधमोहीम सुरु असतानाच २१ जानेवारी रोजी गावातीलच नाल्यात सदर युवकाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान वडील पांडूरंग झुलाराम चिवाने (५५) यांनी मुलगा संजयचा खून केल्याचा आरोप करुन वडकी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये आरोपी नाना सदाशिव लेनगुरे (५५) रा. कुंभा, मनोहर सदाशिव लेनगुरे, सुनिल सदाशिव लेनगुरे, मुक्ता सुनिल लेनगुरे यानी खून केल्याचे नमुद केले. त्यावरुन पोलिसांनी चारही आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार एम.एस. राजपूत करीत आहे.
राजीव नगरात धाडसी चोरी, चार लाखाचा ऐंवज लंपास
यवतमाळ – राजीव नगरमधील घर फोडून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यासह ४ लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजता घडली. प्रकाश नंदराव मिसाळ रा. राजीव नगर मोठे वडगाव हे आपल्या कुटुंबीयासह बुधवारी रात्री ८.३० वाजता मित्राकडे जेवन करण्यासाठी गेले होते. अशातच चोरट्याने त्याच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून २ लाख ४ हजार रोख , ५० ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, १२ ग्रॅमचे कानातले, १५ ग्रॅमची अंगठी, ५ ग्रॅमची अंगठी, प्रत्येकी ५ ग्रॅमच्या दोन चैन, तीन सोन्याचे सिक्के असा एकुण ४ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला. रात्री ११.३० वाजता मिसाळ कुटुंबीय घरी परत येताच दाराचे कुलुप तुटल्याचे दिसले. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातून रोख व सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोडचे प्रभारी ठाणेदार दिलीप मसराम, पोलीस उपनिरीक्षक नरेश पिंपळकर, पोलीस उपनिरीक्षक शिल्पा निमकर व पोलीस कर्मचाºयांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी प्रकाश मिसाळ यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी चोरट्याविरुद्घ भादंवि कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
जुगार अड्डयावर धाड, सात अटकेत
यवतमाळ – शहरातील राऊत नगरमध्ये घरात सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकुन सात जणांना अटक केली. जिल्हा विशेष पथकाने बुधवारी रात्री ८.१५ वाजता ही कारवाई केली असून ४५ हजार रुपयाचा मुुद्देमाल जप्त केला.
किशोर मधुकर गुल्हाणे रा. राऊत नगर याच्या घरी ५२ पत्ते जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती जिल्हा विशेष पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने रात्री राऊत नगरात धाड टाकली. यावेळी किशोर गुल्हाणे, स्वप्नील फुलमाळी, अजय राणे, सर्व रा. राऊत नगर, विलास किनवटकर रा. महाविर नगर, विवेक नंदुरकर ,पुरुषोत्तम पावडे रा. लोहारा , गिरीधर मांगुळकर रा. टाकळी याना अटक केली. त्याच्याकडून ४५ हजार ७०० रुपये रोख व जुगार साहित्य जप्त केले. ही कारवाई राजू वटाणे, जमा. विजय डबले, जमा. ऋषी ठाकुर, गजानन डोंगरे,विशाल भगत, रितुराज मेंढवे, प्रविण गौरखेडे, भोजराज करपते, मयुरी मांगुळकर, रेवण जागृत यांनी केली.
नेर नबाबपूर न.प. पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर , २३ मार्च रोजी मतदान
यवतमाळ – राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नेर नबाबपूर नगरपरिषदच्या प्रभाग क्रमांक 3 क च्या रिक्त पदासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
दिनांक २१ ते २८ फेब्रुवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. सुट्टीच्या दिवशी मात्र नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाही तसेच ते स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्राची छाणनी १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाणनी नंतर नामनिर्देशन पत्र १० मार्च पर्यंत मागे घेता येईल. २३ मार्च रोजी मतदान घेण्यात येईल तर २४ मार्च रोजी मतमोजणी होईल. ही पोटनिवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लघू सिंचन कामे क्रमांक २ यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तसेच नगरपरिषद नेर नबाबपूरचे मुख्याधिकारी यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाºयांनी नियुक्ती केली आहे.
काँग्रेसनेच देशाचा विकास केला – आ़ ठाकरे

दारव्हा – धर्म हा प्रत्येकाच्या वैयक्तीक श्रध्देचा भाग असून, राजकर्त्यांनी जाती, पंथ, धर्म, भाषा न पाहता देशातील प्रत्येक समूहाच्या विकासाकडे लक्ष देणे अभिप्रेत असते़ स्वातंत्र्यापासून आजपर्यंत या देशाचा सर्व समावेशक विकास कॉंग्रेसनेच केला असून, कॉंग्रेस पक्ष विकासाच्या नावावर लोकांना मतदान मागते तर विरोधक जाती-पातीच्या नावावर मते मागतात अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ़ माणिकराव ठाकरे यांनी केली़ आज गुरुवारी दारव्हा येथील कविता मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते़
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावे घेतले जात आहे़ आज गुरुवारी दिग्रस विधानसभा क्षेत्रीय कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ या मेळाव्याचे उद्घाटक राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तर अध्यक्ष म्हणून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ़ माणिकराव ठाकरे होते़ प्रमुख अतिथी म्हणून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. वामनराव कासावार, माजी खा़ हरिभाऊ राठोड, शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, जीवन पाटील, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अॅड़ सीमा तेलंगे, डॉ़ टी़सी़ राठोड, जि़प़ सदस्य राहुल ठाकरे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, राजेंद्र माहुरे, वसंतराव निरपासे, नगराध्यक्ष अशोक चिरडे, सैय्यद फारुख, वजाहत मिर्झा, माधुरी गडपायले, विजया सांगळे, ज्योती उपलेंचवार आदी उपस्थित होते़ पुढे बोलताना आ़ ठाकरे म्हणाले की, कॉंग्रेसने कुठलाही जातीभेद न पाळता देशातील प्रत्येक वंचित घटकाच्या विकासासाठी प्रयत्न केले़ ज्या काळात ग्रामीण भागात मुलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या काळात रस्ते, पूल, शाळा, आरोग्याच्या सुविधा पोहचविण्याचे काम कॉंग्रेसने केले़ विरोधी पक्षांकडे विकासाची कुठलीही दृष्टी नसून, देशाची अखंडता संकटात घालण्याचे काम ते करताहेत, असा घणाघात त्यांनी केला़ आ़ माणिकराव ठाकरे यांच्याहस्ते मुख्यमंत्री विकास निधी अंतर्गत मंजूर ३ कोटी ५४ लाख रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन गोळीबार चौक व बसस्थानक चौकात करण्यात आले़ यावेळी ना़ शिवाजीराव मोघे, आ़ वामनराव कासावार, माजी़ खा़ हरिभाऊ राठोड आदींची भाषणे झाली़
आरती इंगोलेच्या कुटूंबीयांना पोलीस संरक्षण द्या – युवा सेनेनेची मागणी
यवतमाळ – बहुचर्चीत आरती इंगोले खुन प्रकरणातील मुख्य आरोपी देवा पवार यांने तीच्या आई-वडीलांना तक्रार मागे घेण्यासाठी घरी जाऊन पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने इंगोले कुटुंब भयभित झाले असून त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी युवा सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाºयांना दिले.
देवा पवारने एक वर्षापूर्वी आरती इंगोलेची निर्घूण हत्या करून मृतदेह जाळून टाकला होता. दरम्यान देवाची जामिनावर सुटका झाली असून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहे. त्यातूनच त्याने तीन दिवसानपूर्वी पिस्तुल रोखली होती. त्यामुळे इंगोले कुटुबीयाच्या जिवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतेवेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य मोटके, शहर प्रमुख निखील वाघ, खुशाल संकट, मनोज झाडे, मनोज कांबळे, मुलीचे वडील प्रल्हाद इंगोले, आई मंदा इंगोले, सपना खरतडे, शुभम दाणी, बबलू, मसराम, शुभम घोडे, राज अदलाखे, चंद्रशेखर मोहानुर, मंगेश हसतबांधे, आकाश जयस्वाल, हार्दिक दावडा, सौरभ अलसिंगकर, संतोष भारती उपस्थित होते.
तेलंगण विधेयक राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली – प्रचंड गदारोळ आणि आरडाओरड सुरु असताना स्वतंत्र तेलंगण राज्याचे विधेयक आज, गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यासोबत तेलंगण हे देशातले २९ वे नवे राज्य अस्तित्वात आले असून महाराष्ट्राला एक नवा शेजारी मिळाला आहे.
तेलंगण राज्याच्या निर्मितीचे विधेयक राज्यसभेत मंजूर होताच दिल्लीत आंध्रभवनसमोर जल्लोष व्यक्त करण्यात आला. तर आंध्रप्रदेशातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आज, गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक मांडले गेल्यानंतर याविषयावर अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपापली मते मांडली. कॉंग्रेसचे आंध्र प्रदेशातील खासदार, पर्यटन मंत्री चिरंजीवी यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध जाऊन या विधेयकाला विरोध दर्शवला. पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात बोलताना दुःख होत असल्याचे ते आपल्या भाषणात म्हणाले. भाजपने या विधेयकाला पाठिंबा जाहीर केला. स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीली भाजपचा नेहमी पाठिंबा होता, असं राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी सांगितले. केंद्रातील यूपीए सरकारने अत्यंत घिसाडघाईने ही प्रक्रिया केली असल्याचा आरोप जेटली यांनी केला. बसप नेत्या मायावती यांनी यावेळी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची विभागणी करावी अशी मागणी केली. लोकजनशक्ती पार्टीचे खासदार रामविलास पासवान यांनी महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा वेगळा करण्याची मागणी केली. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांसमोर जाऊन पेपर फाडून निषेध व्यक्त केला. सीमांध्रचे खासदार पंतप्रधानांच्या भाषणात व्यत्यय आणताना दिसत होते. स्वतंत्र तेलंगणच्या विधेयकावर मतदान सुरु होताच डावे पक्ष आणि एआयएडीएमचेच्या खासदारांनी मात्र सभात्याग केला होता.
नातेवाईकाकडून तीन चिमुकल्यांची क्रूर हत्या
हैदराबाद – घरातील नातेवाईकानेच तीन मुलींना पळवून त्यांना पेटवून दिल्याची क्रूर घटना आंध्र प्रदेशमधील निझामाबाद जिल्ह्यात घडली. गुरुवारी सकाळी निझामाबाद येथील एक कॉलेजजवळ या तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नरेंदर रेड्डी असे या आरोपीचे नाव असून त्याने बुधवारी रात्री त्याने सिरी(नऊ), अक्षया(सात) आणि खुशी(पाच) या तिघांना कारमधून पळवून नेले. त्यानंतर निझामाबाद शहराबाहेर या तिघींवर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.याआधी बुधवारी तिनही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या घरच्यांनी केली होती. यानंतर पोलिसांनी तपास केला असता या चिमुकल्यांचे मृतदेह निझामाबाद येथे आढळून आले. लग्न होत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यने हे कृत्य केले असावे असे समजते. पोलिस यासंबधी पुढील तपास करत आहेत.
पासधारकांना स्मार्ट कार्ड
मुंबई- वर्षभरात पेपरलेस कारभाराची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा संकल्प राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) घेतला असून, एसटीच्या विविध पासधारकांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळातर्फे देण्यात येणारे विद्यार्थी पास, आहिल्याबाई होळकर पास, आवडेल तेथे प्रवास योजनेचा पास, ४ व ७ दिवसांचे पास तसेच मासिक, त्रमासिक पास आता स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्यात येणार आहेत.
राज्यात एसटीचे सुमारे ३० हजारांहून अधिक पासधारक प्रवासी असून, त्यांना या स्मार्ट कार्डचा लाभ होणार आहे. सध्या सर्व विभागीय मुख्यालयातील आगारांत स्मार्ट कार्डचा वापर सुरू झाला असून, या महिन्याच्या अखेरीस राज्यातील सर्व आगारांत स्मार्ट कार्ड उपलब्ध होणार आहेत. पासची रक्कम स्वीकारल्यावर आवश्यक माहिती नोंदवून स्मार्ट कार्ड व ओळखपत्र देण्यात येईल. प्रवास करताना वाहकाजवळील ईटीआयएम मशिनद्वारे स्मार्ट कार्डची माहिती नोंदवली जाईल. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणालीवर हे स्मार्ट कार्ड काम करेल.
त्यामध्ये ‘सिक्युरिटी की’ असल्याने या कार्डाचा गैरवापर करता येणार नाही. मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत या स्मार्ट कार्डचे नूतनीकरण करणे आवश्यक असेल. स्मार्ट कार्डचा वापर ५ वर्षापर्यंत करता येणार आहे. त्यासाठी पासधारकांना स्मार्ट कार्डचे ३० तर ओळखपत्रासाठी ५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे वेळेची बचत होईल आणि वाहकांच्या कामात सुलभता येईल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दिड लाखाने गंडविले
नेर : शहरातील सावला नगरमध्ये राहणाºया एका महिलेला सोन्याचे पॉलिस लावुन देण्याची बतावणी करून दिड लाखाचे दागिने लांबविल्याची घटना आज सकाळी घडली. विद्या देविदास मात्रे रा. सावला नगर ह्या महिलेच्या घरी दोन अज्ञात इसम आले. त्यांनी सोन्याच्या पाटल्याला पॉलिश लावुन देतो अशी बतावणी केली. यावेळी महिलेकडून दिड लाखाच्या पाटल्या घेऊन भांड्यात टाकून हातचलाखीने काढून त्यामध्ये नकली पाटल्या ठेऊन तेथून पोबारा केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दारुसह दोन अटकेत
यवतमाळ : अवैधपने दुचाकीवरून दारुची वाहतुक करणाºया एका हॉटेल मालकास आर्थीक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. तर विशेष पथकाने धाड टाकून दारु विक्री करणाºया एका विक्रेत्यास अटक केली.
मनिष दिवाकर वाघमारे रा. अंबिका नगर याने दत्त चौकातील जे के वाईन बारमधून विदेशी दारू विकत घेतली. सदर दारुच्या बाटल्या पिशवीत भरून एम.एच. २९ / डब्ल्यू ४१४ क्रमांकाच्या दुचाकीने हॉटेल व्हेरीटेजमध्ये घेवून जात होता. अशातच शारदा चौकात स्थानिक गुन्हे शाखा अधिनिस्थ आर्थीक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीसह विदेशी दारु असे एकुण २७ हजार ८१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाघमारे याच्याविरूद्घ गुन्हा दाखल करून अटक केली. ही कार्यवाही पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक के.एम. मसराम, जमा. प्रेमदास आडे, रावसाहेब शेंडे, किरण श्रीरामे, विजय पवार, राजू झाडे यांनी केली. तसेच अंबानगर रेल्वेस्टेशन परिसरात घरीच दारु विक्री करणाºया जाजूसिंग संतोषसिंग बावरी (२१) यास अटक करून १ हजार ४८८ रुपयाची दारु जप्त केली. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू वटाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.











