पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2014

एमईसीबी कर्मचाºयास मारहाण

यवतमाळ : विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे काम करणाºया एमईसीबी कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना घोडखिंडी येथे मंगळवारी रात्री घडली. विवेक देवराव चौधरी (३६) रा. यवतमाळ हे येथील एमईसीबी मध्ये हेल्पर या पदावर कार्यरत आहे. काल सायंकाळी ते घोडखिंडी येथे विद्युत पुरवठा तोडण्यासाठी गेले होते. अशातच प्रभाकर फकीरा मडावी (२९) याने शिवीगाळ करून मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

February 19, 2014 in महाराष्ट्र

चाकुच्या धाकावर दाम्पत्याला लुटले

यवतमाळ :  येथून वर्धेकडे जाणाºया दाम्पत्याची दुचाकी अडवून चाकुच्या धाकावर एक लाख २५ हजाराचे दागिन्यासह रोख रक्कम लुटल्याची घटना आज जवाहर नगरजवळ घडली. अमोल मोहन पांडे (३२) रा. सेवाग्राम वर्धा हे पत्नी व मुलीला घेऊन बलवंत मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी आले होते. लग्न समारंभ आटोपून ते दुचाकीने वर्धेकडे जात होते. अशातच जवाहर नगरजवळ तोंडाला कापड बांधून आलेल्या तीन जणांनी पांडे यांना हात दाखवून दुचाकी थांबविली. त्यानंतर चाकुचा धाक दाखवून पांडेच्या पत्नीच्या गळ््यातील सोन्याचे दागिने अंगठी असे ४५ ग्रॅम सोने व १ हजार २०० रुपये रोख असा एकुण एक लाख २५ हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. पांडे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी तीन्ही चोरट्याविरूद्घ भादंवि कलम ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

February 19, 2014 in महाराष्ट्र

दोन अपघातात तीन ठार, एक जखमी

यवतमाळ :  आर्णीवरून लोणबेहळ येथे जाणाºया दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डॉक्टरसह एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता लोणबेहळ येथे घडली. डॉ. दिपक गोपाल डुकरे (४५) रा. लक्ष्मीनगर पुसद, राजू देवराव खापरकर (३०) रा. आर्णी असे मृतकाचे नाव आहे. तर गजानन देवसिंग आडे (३२) रा. लोणबेहळ हा जखमी झाला असून त्याच्यावर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. डुकरे कार्यरत होते. मंगळवारी रात्री आर्णीवरून लोहणबेहळ येथे एम.एच. २९ / एए २२३० क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. अशातच गावापासून काही अंतरावरच अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातामध्ये डॉ. डुकरे, खापरकर हे ठार तर आडे हा जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतकार्य केले. शांतीलाल जयस्वाल यांनी अपघाताची माहिती आर्णी पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. अज्ञात वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
तसेच भरधाव ट्रॅक्टरने ढिगाºयाला धडक दिल्याने चालक खाली पडून चक्क्यात दबुन ठार झाल्याची घटना काल रात्री झाडगाव येथे घडली. भास्कर दत्तु तराडे (३०) रा. खडकी सुकळी असे मृतकाचे नाव आहे. तराडे हा  ट्रॅक्टर घेऊन आपटी फाट्याकडून झाडगावकडे जात होता. अशातच स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची रेती ढिगाºयाला ठोस मारली. यावेळी चालक ट्रॅक्टरवरून खाली पडून मागील चाकात आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. रोशन चित्तरंजन कोल्हे (३२) रा. झाडगाव याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

February 19, 2014 in महाराष्ट्र

पाटणबोरी येथे इसमाचा मृतदेह आढळला

पांढरकवडा (यवतमाळ) : पाटणबोरी येथील बसस्थानकावर आज पहाटे पिंपरी बोरी येथील एका इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विश्वनाथ शामराव कदम (४५, रा. पिंपरी बोरी ) असे मृतकाचे नाव आहे. मुळ नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील तो रहिवासी असून पोटाची खळगी भरण्यासाठी चार वर्षापासून पिंपरी येथे आला होता. अशातच काही वर्षापूर्वी त्याने बाजीराव बाबाची दिक्षा घेतली व सत्संगामध्ये सहभाग घेत असल्याचे गावकºयांनी सांगितले. १८ फेबु्रवारी रोजी नंदिग्राम एक्सप्रेसने हिमायत नगरवरून पिंपरी येथे जाण्याकरीता पाटणबोरी बसस्थानकावर थांबला होता. दरम्यानान आज बुधवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हृदयविकाराचा झटका, थंडीने कुडकुडून, आत्महत्या किंवा घातपाताने त्याचा मृत्यू झाला या दिशेने पोलिस तपास करीत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृतकाच्या मागे पत्नी, मुलगा दशरथ, मुलगी वर्षा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

February 19, 2014 in महाराष्ट्र

चुकून गोळी लागली; जवानाचा मृत्यू

नागपूर : नागपूरमध्ये अजनी येथील लोहमार्ग मुख्यालयात चुकून गोळी लागल्याने हेडकॉन्सटेबल राजेश बांगडीकर (वय ५० वर्ष) यांचा मृत्यू झाला. तर शस्त्रात्र विभागातील एकनाथ लिहीतकर हे जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्याने काही वेळ मुख्यालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
लोहमार्ग मुख्यालयात कार्यरत असणारे राजेश बांगडीकर हे आज (बुधवार) नक्षलवादी भागातून गस्त घालून दुपारी बाराच्या दरम्यान मुख्यालयात बंदूक जमा करण्यासाठी आले होते. त्याचवेळी शस्त्रात्र निरिक्षक एकनाथ लिहीतकर यांना बंदूक रिकामी आहे असे वाटल्याने बंदूक हातावर घेतली. मात्र त्याचवेळी बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेली. गोळी एकनाथ लिहीतकरांच्या हातातून आरपार जात राजेश यांच्या पोटात लागली. जवानांना तात्काळ जवळच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र राजेश बांगडीकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुढील तपासणीसाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

February 19, 2014 in मुख्य पान

भारत-पाकिस्तानमध्ये २ मार्चला घमासान

मिरपूर : तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल, तर २ मार्च या तारखेवर आत्ताच फुल्ली मारून ठेवा… कारण, या दिवशी आशिया कप स्पर्धेत भारत – पाकिस्तान यांच्यात घमासान युद्ध रंगणार आहे. मिरपूरच्या मैदानावर हा महासंग्राम होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. परंतु, तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे या दोन संघांमधील तुंबळ युद्ध हल्ली फारसं बघायला मिळत नाही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा ही संधी येते, तेव्हा तिचं सोनं करण्याचा प्रत्येक क्रिकेटप्रेमी कसोशीनं प्रयत्न करतो. आता, येत्या २ मार्चला हा योग जुळून येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात भारत-पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका झाली होती. त्यात पाकिस्ताननं टीम इंडियाला २-१ नं पराभूत केलं होतं. त्यानंतर, वर्षभराच्या प्रतीक्षेनं आता हे दोन तुल्यबळ संघ आमने-सामने उभे ठाकणार आहेत. आशिया कप स्पर्धेत २ मार्चला टीम इंडियाचे वीर आणि पाकचं सैन्य विजयासाठी शर्थ करेल.
आशिया कपचं वेळापत्रक
२५ फेब्रुवारी – पाकिस्तान वि. श्रीलंका – फतुल्लाह , २६ फेब्रुवारी – बांगलादेश वि. भारत – फतुल्लाह , २७ फेब्रुवारी – अफगाणिस्तान वि. पाकिस्तान – फतुल्लाह , २८ फेब्रुवारी – भारत वि. श्रीलंका – फतुल्लाह , १ मार्च – बांगलादेश वि. अफगाणिस्तान – फतुल्लाह , २ मार्च – भारत वि. पाकिस्तान – मिरपूर , ३ मार्च – अफगाणिस्तान वि. श्रीलंका – मिरपूर , ४ मार्च – बांगलादेश वि. पाकिस्तान – मिरपूर , ५ मार्च – अफगाणिस्तान वि. भारत – मिरपूर , ६ मार्च – बांगलादेश वि. श्रीलंका – मिरपूर , ८ मार्च – अंतिम सामना – मिरपूर
(सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील.)

वसतीगृहातून १७ मुली फरार

नाशिक : नाशिकमधील सावकरनगर परिसरातील वात्सल या शासकीय वसतीगृहातून १७ मुली आज (बुधवार) पहाटे फरार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वसतीगृह प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. १७ मुलींपैंकी ८ मुली सापडल्या असून ९ मुली अद्यापही बेपत्ता असल्याचे समजते आहे.
महिलांच्या या शासकीय वसतीगृहातील असुविधांना कंटाळून १७ मुलींनीं आज अखेर येथून पळ काढला. पहाटेच्या वेळेस वसतीगृहाच्या गेटवरून उड्या मारुन या मुली पसार झाल्या. सकाळी ही गोष्ट उघड झाल्यानंतर मुलींचा शोध सुरु झाला. त्यानंतर ८ मुली सापडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. गेले अनेक दिवस वसतीगृहात असुविधा असल्याच्या तक्रारी वारंवार येथील मुलींकडून करण्यात येत होत्या. मात्र तरीही येथील प्रशासनाने या तक्ररांरीकडे कानाडोळा केल्यामुळे अखेर मुलींनी हा मार्ग पत्करला असल्याची चर्चा सुरु आहे.

पत्नी पळाल्याने पतीची आत्महत्या

ठाणे : पत्नीचे शेजारील तरुणासोबत असणारे अनैतिक संबंध तसेच त्याच्यासोबत पळून गेल्याने नालासोपारा येथे राहणाऱ्या श्रीधर शेट्टी याने आपल्या दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला वैतागून पतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
‘मेरी औरत साथ देती तो मैं ऐसा कदम नहीं उठाता.’ आत्महत्येपूर्वी श्रीधरने घरामधील भिंतीवर असे लिहल्याचे तपासात आढळून आले आहे. श्रीधरची पत्नी त्याला काही दिवसांपूर्वीच सोडून दुसऱ्या युवकासोबत पळून गेल्याने मानसिक तणावाखाली येऊन मुलींची हत्या करुन त्याने आपले स्वत:चे देखील आयुष्य संपवले.श्रीधर शेट्टी (वय, ४२) याची पत्नी सोनाली हि शेजारी राहणाऱ्या तेजस अनूप दोशी याच्यासोबत पळून गेली. मात्र १६ फेब्रुवारीला ती घरी परत आली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. ‘माझं तेजसवर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत राहणार आहे.’ असा हट्टच सोनालीने धरला. या भांडणानंतर श्रीधरने आपल्या मुलींना सोडून घरात निघून जाण्यास सोनालीला सांगितलं. त्यानंतर सोनाली तेजससोबत राहू लागली. मात्र या दरम्यान श्रीधर पूर्णपणे खचून गेला. पोलिसांच्या मते, मंगळवारी १८ फेब्रुवारीला सोनाली आणि तेजस पुन्हा कुठेतरी बाहेर निघून गेले. याने श्रीधर जास्तच अस्वस्थ झाला. त्यानंतर रात्री ८ ते ९ च्या दरम्यान त्याने आपल्या दोन्ही मुली श्रद्धा (वय, ९) साहिध्या (वय, ५) यांची उशीने दाबून हत्या केली त्यानंतर त्याने आत्महत्या केली.

अक्कु यादवची पुनरावृत्ती टळली , आरती इंगोलेच्या मारेकºयावर जमावाकडून हल्ला 0

अक्कु यादवची पुनरावृत्ती टळली , आरती इंगोलेच्या मारेकºयावर जमावाकडून हल्ला

 

यवतमाळ – दहा महिन्यापूर्वी झालेल्या आरती इंगोले हत्याकांडातील आरोपी देवा पवारवर जमावाने हल्ला चढवून त्याचा गेम करण्याचा प्रयत्न केला. खून व बलात्काराची केस मागे घेण्याची धमकी देऊ न तीच्या आईवर पिस्तुल रोखल्याने परिसरातील जमावाने त्याच्यावर हल्ला केला. आज दुपारी लोहारा परिसरातील वैभव नगरमध्ये ही घटना घडली. यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवून सदर आरोपीला व्हॅनमध्ये बसवून त्याची सुटका केली, नाही तर नागपूर येथील अक्कु यादवची पुनरावृत्ती झाली असती. 

आरती प्रल्हाद इंगोले ( वय २२ ) या युवतीचा ३० एप्रिल २०१३ रोजी एकतर्फी प्रेमातून दगडाने ठेचून खून केला होता. एक महिन्यानंतर ही घटनेचा छळा टोळी विरोधी पथकाने लावला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी मुख्यसुत्रधार देवा पवार, त्याचा साथीदार निकेश अक्कुलवार , शैलेश राठोड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. टोळी विरोधी पथकाने तीन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी केली होती. अशातच काही दिवसापूर्वी देवा पवारची जामीनावर सुटका झाली. दरम्यान आज दुपारी त्याने आरतीचे घर गाठून माझ्यावरील अतीप्रसंग व खूनाचा गुन्हा मागे घ्या अशी धमकी देऊन पिस्तुल रोखली. यावेळी आरतीच्या आईने आरडाओरड केलयाने परिसरातील जमानावाने हातात लोखंडी सलाख, लाकडची काठ्या, दगड घेऊन पाठलाग केल्याने देवाने तेथून काढता पाय घेऊन धुम ठोकली. यावेळी जमावाने दगडफेक सुरु केल्याने जीव वाचविण्यासाठी तो वैभव नगरातील मंगेश भदाने यांच्या घरात घुसला. यावेळी जमावाने या घरावर दगडफेक करून लोखंडी सळाखी फेकल्या. या प्रकाराने भदाने यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये दहशत पसरल्याने देवान तेथून डॉ. ओमप्रकाश पटवारी याच्या घरात आश्रय घेतला. ही बाब माहित होताच जमावाने डॉक्टरच्या घराकडे मोर्चा वळवून दगडफेक करून हल्ला केला. आमच्या माय बहिणीवर अत्याचार करून खून करणाºया आरोपीवर योग्य कार्यवाही न करता पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप जमावाने केला. त्यामुळे आता देवाला आमच्या ताब्यात द्या , आम्हीच त्याला धडा शिकवून खात्मा करतो असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे पोलिसांची भेंबेरी उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक जानकीराम डाखोरे, यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे, ग्रामीणचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांच्यासह शहरचे सहा. पोलीस निरीक्षक सतीश पाटील, सहा. पोलीस निरीक्षक अमोल माळवी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, डि.बी. पथकाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक गुलाब पंधरे, वडगाव रोडचे पोलीस उपनिरीक्षक नरेश पिंपळकर, मंगला वाकडे यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी रॅपीट अ‍ॅक्शन फोर्स, दंगलनियंत्रण पथक, चार्ली कमांडो पथक तैनात केले. यावेळी पोलिसांनी सतर्कता बाळगून देवाची सुखरुप सुटका करून ताब्यात घेतले. त्यामुळे नागपूर येथील अक्कु यादव खून प्रकरणाची पुनरावृत्ती टळली. यावेळी धामणगाव रोड ते लोहारा बायपासवरील वाहतुक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी देवा पवार याच्याविरूद्घ विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक केली.

February 17, 2014 in रोजगार

इमारत कोसळली, तीन जण ठार

Khed-building-300x225
खेड- शहरातील महाडनाका परिसरात बांधकाम सुरु असलेली तीन मजली इमारत दुपारी कोसळली. या दुर्घटनेत तीन कामगार ठार झाले आहेत. तर अद्याप काही कामगार ढिगा-याखाली अडकले आहेत.
खेड शहरातील जगबुडी नदीच्या जवळ असलेल्या गुलमोहर पार्कमध्ये तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. या इमारतीच्या पहिल्या आणि दुस-या मजल्याचे काम सुरु होते. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इमारतीचे चारही स्लॅब कोसळले. ढिगा-याखाली नऊ कामगार अडकले आहेत. त्यापैकी चार जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्याच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ढिगा-याखाली अडकलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या ठिकाणी १५ कामगार काम करत होते. त्यापैकी नऊ जण इमारतीमध्ये होते. तर अन्य इमारतीच्या परिसरात रेती उचलण्याचे काम करत होते. घटनास्थळी पोलिस, नागरीक आणि क्रेनच्या सहाय्याने मदत सुरु आहे

February 17, 2014 in रोजगार

विमान दुर्घटनेतील प्रवाशांचे मृतदेह सापडले

Nepal-Plane-Crash

काठमांडू- नेपाळमध्ये रविवारी भरकटलेल्या विमानाला अपघात झाला असून या विमान दुर्घटनेतील सर्व १८ प्रवाशांचे मृतदेह सोमवारी सापडले. नेपाळ एअरलाईन्सचे हे विमान खराव हवामानामुळे बर्फाच्छादीत पर्वताजवळ कोसळले होते. पोखरा विमानतळावरून दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी उड्डान घेतल्यानंतर ३५ मिनिटांतच हे विमान दिशा भरकटले होते. हे विमान जुमला विमानतळावर १.४५ वाजता पोहचणे अपेक्षित होते. मात्र ते भरकटले आणि काठमांडूपासून ५०० किलोमीटर अंतरावरील धिकुरा गावाजवळ हे विमान कोसळले.
या विमानात तीन कर्मचा-यांसह १५ प्रवासी होते. अर्गखांची जिल्ह्यातील धिकुरा गावाजवळच्या पर्वतीय भागातून सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून ते विमानाने काठमांडू येथे आणल्याचे नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते गणेश केसी यांनी सांगितले.वारंवार अपघात होत असल्याने मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात युरोपियन देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नेपाळ एअर लाईन्सला काळ्या यादीत टाकले होते.यापूर्वी २८ सप्टेंबर २०१२ रोजी काठमांडूजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत १९ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात सात ब्रिटीश व पाच चीनी पर्यटक आणि अन्य नेपाळी प्रवाशांचा समावेश होता. हे विमान सिता एअरचे होते आणि काठमांडूहून लूकलासाठी टेक ऑफ केले होते. पोलिस अधिकारी विनोद सिंग यांच्या म्हणण्यानुसार आग लागताच पायलटने विमान मनोहरा नदीकिनारी उतरवण्याचा प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही.तर मे २०१२ मध्ये पश्‍चिम नेपाळच्या एका टेकडीवर अग्नि हे छोटे विमान आदळून झालेल्या अपघातात १५ जण ठार झाले. त्यापैकी १३ भारतीय होते. तर वाचलेल्या सहा जणांपैकी तीन भारतीय होते. त्याआधी सात महिन्यांपूर्वीच नेपाळमधील एका विमान अपघातात दहा भारतीय पर्यटक ठार झाले होते.

February 17, 2014 in रोजगार

मोबाईल, फ्रिज आणि वाहने स्वस्त

नवी दिल्ली- सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. युपीए-दोन सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. चार महिन्यांसाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असताना तेलंगण समर्थक व विरोधकांचा गदारोळ सुरू होता. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ झालेली नाही. मात्र अबकारी करात घट केल्याने फ्रीज, टीव्ही, देशी बनावटीचे मोबाईल, छोट्या कार, सुगंधी तेल आणि साबण स्वस्त झाले आहे.

February 17, 2014 in रोजगार

तेजपाल यांच्यावर बलात्काराचा आरोप निश्चित

पणजी – सहकारी महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर गोवा पोलिसांनी सोमवारी आरोपपत्र दाखल केले . यामध्ये तेजपाल यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग आणि बलात्काराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपामध्ये तेजपाल दोषी आढळल्यास त्यांना सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
मुख्य न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. भारतीय दंड विधानानुसार कलम ३५४, ३५४ अ (लैंगिक शोषण) ३४१ आणि ३४२, ३७६ (बलात्कार), ३७६ (२) (एफ) आणि ३७६ (२) (के) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपपत्रात दाखल केलेले पुरावे तेजपाल यांना दोषी ठरविण्यात पुरेसे असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणणे आहे.गोव्यात थिंकफेस्ट या कार्यक्रमादरम्यान तरुण महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी तरुण तेजपालला ३० नोव्हेंबर २०१३ रोजी अटक केली होती. सध्या तेजपाल वास्को येथील साडा तुरुंगात आहेत.

February 17, 2014 in रोजगार

कर्तव्यदक्ष ठाणेदार हसबनीस यांना निरोप

DSC_6748    DSC_6768
यवतमाळ – आपल्या कर्तव्यातून  प्रत्येकाच्या मनात वेगळा ठसा निर्माण करणारे फार थोडे अधिकारी पोलीस दलात आढळून येतात. केलेला निर्धार न बदलता त्यानुसार काम करणे पोलीस दलात मोठे जिकरीचे काम, पण हे अवघड काम वडगाव रोडचे ठाणेदार विपीन हसबनिस यांनी पार पाडले. त्यामुळे आश या कर्तव्यदक्ष, निर्भीड  पोलीस अधिकार्याला निरोप देतांना अधिकारी व कर्मचाºयांनी मने हेलावली होती. यावेळी अधिकारी व कर्मचाºयांनी रथात बसवून वाहन दोरखंडाने ओढून  परिसरातून मिरवणूक काढून निरोप दिला.येथील वडगाव रोडचे ठाणेदार विपीन हसबनिस यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली. त्यानिमित्य अधिकारी व कर्मचाºयांच्या वतीने सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन आज सायंकाळी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल मदणे तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार पठाण, नगरसेवक दत्ता कुळकर्णी, सहा. पोलीस निरीक्षक विजय राठोड, संजय शिरभाते उपस्थित होते. यावेळी  ठाणेदार विपीन हसबनीस यांचे  जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचाचे अध्यक्ष तथा दै. पुण्य नगरीचे संपादकीय विभाग प्रमुख नितीन पखाले यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी स्वागत गेले. हसबनीस यांनी १७ फेबु्रवारी २०१३ रोजी वडगाव रोड ठाण्याचा पदभार घेतला असून एक वर्ष पूर्ण झाले. हसबनीस यांच्यासारखे अधिकारी अजून काळ राहाला पाहिजे होते. त्याच्यासोबत काम करण्याची स्फुर्ती मिळते. भाऊ – बहिण समजून त्यांनी प्रत्येकाची अडचण समजून घेत, सोडविली. शहरातील सर्वात जास्त गुन्हेगारी टोळ््या असून क्राईमरेटही मोठ्या प्रमाणात आहे. तरीही त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू न देता कम्युनिटी पोलिसींगचे कार्य करून जनसामान्यात वेगळी छाप निर्माण केल्याचे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.  यावेळी फुलांनी सजविलेल्या पोलीस वाहनामधून हसबनीस यांची परिसरातून मिरवणूक काढून दोरखंडाने वाहन ओढून नेत निरोप दिला. या कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक नरेश पिंपळकर यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नरेश रणधिर, पोलीस उपनिरीक्षक मंगला वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक भारती गुरनुले यांच्यासह सर्व अधिकारी,  कर्मचारी उपस्थित होते.

February 16, 2014 in रोजगार

चिमुकलीवर अत्याचार, दोघींचा विनयभंग

यवतमाळ – जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून पाच वर्षीय चिमुकलीवर अतीप्रसंग केल्याची घटना खापरी येथे घडली. तर अन्य दोन ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्या. खापरी येथील १४ वर्षीय मुलाने गावातील एका पाच वर्षीय मुलीला घरी नेऊन तीच्यावर जबरीने अतिप्रसंग केला. हा प्रकाराने भयभित झालेली चिमुकलीने आरडाओरड केल्याने हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी अल्पवयीन   मुलाविरूद्घ  गुन्हा दाखल केला. तर लाखडी येथील गजानन  चिंदुजी मांडवकर (३५) याने गावातीलच एका महिलेचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वडकी पोलिसांनी गुन्हा  दाखल केला. तसेच जोडमोहा येथेही शंकर केशव राठोड याने  एका युवतीच्या घरात घूसून विनयभंग केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

February 16, 2014 in रोजगार

२५ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या

यवतमाळ – जिल्हा पोलीस दलातील  १४ पोलीस निरीक्षक,११ पोलीस उपनिरीक्षकांच्या  बदल्याची यादी आज गृहविभागाने जाहिर केली. यामध्ये १८ ठाणेदारांचा समावेश असून कमाईचे ठाणे मिळविण्यासाठी पोलिस अधिकाºयाने धडपड सुरु केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीची आचार सहिता जाहिर होण्यापूर्वी १५ फेबु्रवारी पर्यंत पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्याने ह्या बदल्या करण्यात आल्या.
जिल्हयात २९ पोलीस ठाणे असून  १४ पोलिस निरीक्षक व ११ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्याची यादी आज जाहिर झाली. त्यामध्ये १८ ठाणेदारांचा समोवश असून कंसात बदलीचे ठिकाण नमुद केले आहे. राळेगावचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मलिकार्जुन इंगळे (चंद्रपूर), कळंबचे बाळु गायगोले (नागपूर ग्रामीण), वडगाव रोडचे बिपीन हसबनीस (सोलापूर ग्रामीण), नेरचे ज्ञानेश्वर कडू (अमरावती शहर), बाभुळगावचे प्रमोद डोंगरे (नागपूर शहर), घाटंजीचे ओमप्रकाश अंबाडकर (बुलढाणा), पुसद ग्रामीणचे वैजनाथ लटपटे (अमरावती शहर), पुसद शहरचे सुरेंद्र गंदम (बिड), मारेगावचे  दत्तात्रय नाळे (सातारा), मुकुटबनचे अनिल किनगे (अमरावती शहर), यवतमाळ ग्रामीणचे दिनकर ठोसरे (एसीबी), पांढरकवड्याचे अनिरुद्घ अढाव (अकोला), डिएसबीचे सुधाकर अंभोरे (चंद्रपुर), दिग्रसचे वाघु खिल्लारे (अकोला), वडगाव जंगलचे दिनेशचंद्र शुक्ला, लाडखेडचे ज्ञानेश्वर घुगे, बिटरगावचे सारंग नवलकर, पारवाचे पंजाब वंजारी (अमरावती परिक्षेत्रांतर्गत) यांचा बदलीमध्ये समावेश आहे. तसेच एटीएस पथकाचे प्रमुख दिलीप वडगाव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक  सतीश उपाध्याय, प्रकाश लवंगे, प्रेमप्रकाश माकोडे, सुनील वानखडे, शैलेश शेळके, प्रकाश डांबरे यांच्याही अमरावती परिक्षेत्रांतर्गत बदली झाली. राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीची आचार सहिता जाहिर होण्यापूर्वी १५ फेबु्रवारी पर्यंत पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्याने गृह विभागाने जिल्ह्यात एकाच ठिकाणी तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाºयांच्या बदल्या केल्या. जिल्हयातील बहुतांश पोलीस ठाण्यातील ठाणेदारांच्या बदल्या झाल्या असून ठाणेदार म्हणून नवीन चेहºयांना संधी मिळण्याची संधी आहे. तर दुसरीकडे काही पोलीस अधिकारी कमाईचे पोलीस ठाणे मिळविण्यासाठी राजकीय पक्षाच्या पुढाºयांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे.

February 16, 2014 in रोजगार

९६ टक्के यवतमाळकरांनी दिला वेगळ्या विदर्भालाच कौल

यवतमाळ – ‘वेगळा विदर्भ असावा की नसावा’ यासाठी यवतमाळमध्ये घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत ९६ टक्के यवतमाळकरांनी वेगळ्या विदर्भालाच कौल दिला. केवळ दोन टक्के मतदारांनी ‘वेगळे राज्य नको’ असे मत नोंदविले. या निकालाने विदर्भवाद्यांचा उत्साह दुणावला असून अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि आता यवतमाळकरांनीही आपला कौल विदर्भाच्या बाजूने दिला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी प्राचार्य रमाकांत कोलते यांच्या नेतृत्वात मत मोजणी प्रक्रिया पार पडली. या मत मोजणी प्रक्रियेत दोन टक्के मते अवैध ठरली. अवैध मतदानामध्ये अनेकांनी दोन्हीवर आपले मत नोंदवून तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला.
रविवारी सकाळी ९ वाजेपासून येथील टिम्बर भवच्या परिसरात मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीची यंत्रणा समाज कल्याण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली होती. जनमताचा कौल ऐकण्यासाठी शेकडो नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. वेगळ्या विदर्भाच्या बाजूने ९६ टक्के मतदारांनी कौल दिल्याचे जाहीर होताचा विदर्भ समर्थकांनी एकच जल्लोष केला.
विदर्भाच्या बाजूने मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल जांबुवंतराव धोटे यांनी आनंद व्यक्त केला. आता तरी शासनाने जनतेच्या मागणीचा विचार केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. विदर्भवादी जनतेचा अंत पाहू नये. तेलंगणा राज्याच्या आधिपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी आहे. आज तेलंगणा स्वतंत्र होत आहे तर दुसरीकडे विदर्भबाबत विचार करण्यास ही राज्यकर्ते तयार नाहीत हे चुकीचे असल्याची खंत धोटे यांनी व्यक्त केली. यावेळी विदर्भ जॉइन्ट अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष दीपक निलावार म्हणाले की, यवतमाळकरांनी विदर्भाच्याच बाजूने आपले मत नोंदवलेले आहे. यावरून जनतेमध्ये असणारा असंतोष दिसून येत आहे. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात ही जनमत चाचणी होणार असून आतापर्यंत नागपूर, अमरावती, चंद्रपूर व आज यवतमाळ या ठिकाणी जनमत चाचणी झाली. या जनमत चाचणीला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या जनमत चाचणीच्या यशस्वितेसाठी राजू पड्गीलवार, विजय निवल, क्रांती धोटे, अॅड. अजय चमेडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

February 16, 2014 in रोजगार

विमान अपघातात १८

काठमांडू –  नेपाळमध्ये एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावरून पर्यटकांना घेऊन येणारे छोटे विमान जंगलात कोसळल्याने विमानातील सर्वजण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात १५ प्रवासी आणि ३ क्रू मेंबर्सचा समावेश होता. नेपाळी एअरलाइन्सच्या मालकीचे १९ आसनी ट्विन ओट्टर या विमानाने आज दुपारी १२.४० वाजता पोखरा येथील विमानतळाहून उड्डाण केले होते. परंतु उड्डाणानंतर केवळ १५ मिनिटात हे विमान रडारवरून अदृष्य झाले. अर्घाखांची जिल्ह्यातील खिदीमच्या जंगलात हे विमान कोसळल्याचे सांगण्यात येते. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी मरण पावले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विमानत १४ नेपाळी नागरिक व एक डॅनिश नागरिकाचा समावेश होता.जंगलातील अपघात स्थळाचा शोध लागला असून बचावकार्य सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येते. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेच्या कारणावरून गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात युरोपियन युनियनने नेपाळमधील सर्व विमान कंपन्यांना काळ्या यादीत टाकले होते.

February 16, 2014 in रोजगार

लोकसभेसाठी आपचे २० उमेदवार जाहीर

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने रविवारी देशातील २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना उमेदवारी दिली आहे. मेधा पाटकर या ईशान्य मुंबईतून खासदार संजय पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.तसेच वायव्य मुंबईत गुरुदास कामत यांच्या विरोधात मयंक गांधी आणि दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांच्या विरोधात मीरा सन्याल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात अंजली दमानिया, नाशिकमध्ये समीर भुजबळ यांच्या विरोधात विजय पांढरे आणि पुण्यात सुभाष वारे निवडणूक लढवणार आहेत. अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात कुमार विश्वास, दिल्लीतील चांदनी चौकात कपिल सिब्बल यांच्या विरोधात आशुतोष, गुडगावमधून योगेंद्र यादव, पश्चिम दिल्लीमधून महाबल मिश्रा च्याविरोधात जरनेलसिंग, मैनपुरी येथून मुलायमसिंह यांच्या विरोधात बाबा हरदेव, मुरादाबाद येथून अजहरुद्दीन विरोधात खालिद परवेज, अजि‍त सिंह यांच्या विरोधात सोमेंद्र ढाका, लालगंज येथून जिया लाल, सहारनपुर येथून योगेश दहिया, खंडवा येथे आलोक अग्रवाल, फरुखाबाद येथून पत्रकार मुकुल त्रिपाठी आणि मनीष तिवारी यांच्या विरोधात लुधियाना येथून एच. एस. फुल्‍का यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे

February 16, 2014 in रोजगार

लष्कराच्या कारवाईत हिजबुलचा दहशतवादी ठार

सोपोर – जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये रविवारी सकाळी सुरक्षापथके आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. सुरक्षापथकांनी या दहशतवाद्याला कंठस्नान घातले.
हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा हा दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शफी शेख असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो या भागातील एका घरात लपून बसला होता. ठार झालेला दहशतवादी हिजबुलच्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी एक होता असे पोलिसांनी सांगितले.पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. सोपोरमधल्या एका गावात हा दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या गावात अजूनही एक दहशतवादी असावा असा सुरक्षापथकांचा कयास आहे. या दहशतवाद्याला शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु आहे.

February 16, 2014 in रोजगार