पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2014

अँब्युलन्स-बस अपघात, सहाजण ठार 0

अँब्युलन्स-बस अपघात, सहाजण ठार

accident
नागपूर – नागपूर-अमरावती रोडवर खुर्सापूर गावाजवळ कोंडाळीनजिक अँब्युलन्स (क्र.एम.एच. १९९९९८) आणि बाबा ट्रॅव्हल्सच्या बसची (क्र.एम.एच.३१ सी.क्यू.६९००) समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात सहाजण ठार आणि दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
बस ड्रायव्हरने जेवणासाठी ढाब्यावर जाताना लेन (मार्गिका) चुकवली आणि अपघात झाला. अपघातात अँब्युलन्समधील सहाजणांचा मृत्यू झाला. ज्यांना अँब्युलन्समधून उपचारासाठी नेत होते त्या अजय यादव यांच्यासह यादव कुटुंबातील पाचजणांचा तसेच अँब्युलन्सच्या ड्रायव्हरचा अपघातात मृत्यू झाला.अँब्युलन्स भुसावळहून नागपूरच्या दिशेने येत होती तर बस नागपूरहून लग्नाची वरात घेऊन धुळ्याला जात होती.मृतांची नावेः अजय यादव (५८), विजय यादव (३८), नलिनी यादव (३६), अंकित यादव (३६), मंगेश यादव (३४) आणि पितांबर पाटील (२५), जखमींची नावेः रुपेश यादव आणि प्रमिला यादव

February 27, 2014 in मुख्य पान
‘सिंधुरत्न’: 'त्या' अधिकाऱ्यांचा मृत्यू 0

‘सिंधुरत्न’: ‘त्या’ अधिकाऱ्यांचा मृत्यू

मुंबई – मुंबई बंदरापासून साधारण ५० सागरी मैलांवर काल (बुधवारी) भारतीय नौदलाच्या सिंधुरत्न पाणबुडीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत लेफ्टनंट कमांडर कपिष मुवल आणि लेफ्टनंट मनोरंजनकुमार या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सात जखमी नौसैनिकांना वाचविण्यात यश आले असून त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने नौदलाच्या आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी डागडुजी-दुरुस्ती करून पाण्यावर स्वार झालेल्या आयएनएस सिंधुरत्न या रशियन बनावटीच्या किलो श्रेणीतील पाणबुडीचे परीक्षण सुरू असतानाच बुधवारी पहाटे सहा वाजता नौसैनिकांच्या कक्षातून धूर येऊ लागला. आग शमवण्याच्या प्रयत्नात नाकातोंडात धूर जाऊन नौसैनिकांचा श्वास कोंडला गेला. या अपघातानंतर लेफ्टनन्ट-कमांडर हुद्द्याचे डेप्युटी इलेक्ट्रिकल ऑफिसर आणि लेफ्टनन्ट दर्जाचे वॉचकिपिंग ऑफिसर हे दोन अधिकारी बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध सुरू होता. मात्र, अपघातग्रस्त पाणबुडी आज (गुरुवारी) मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. दरम्यान, पाणबुडीची बारकाईने पाहणी करून अपघाताची कारणे शोधली जातील तसेच दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती नौदलाने दिली.

February 27, 2014 in मुख्य पान

राजीव हत्या: खुन्यांच्या सुटकेला स्टे

नवी दिल्ली – राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवा, अशी नोटीस न्यायालयाने जयललिता सरकारला बजावली आहे.
दया याचिकेवर निर्णयास विलंब झाल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राजीव हत्याकांडातील तीन दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. या निर्णयानंतर जयललिता सरकारने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तिघा मारेकऱ्यांसह आणखी एकाची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिले होते. मुख्य न्यायमूर्ती पी. सथासिवम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे आज (गुरुवारी) त्यावर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने तामिळनाडू सरकारला नोटीस बजावली. याप्रकरणी पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार आहे.

February 27, 2014 in देश-विदेश

भूमिअभिलेख उपसंचालक जाळ्यात

नागपूर – भूखंडाच्या नामांतरासंदर्भातील तक्रार निकाली काढण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख उपसंचालक दादासाहेब तळपे याला लाच लुचपत प‌‌्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. लाचेची रक्कम घरी ठेवण्यासाठी मध्यस्थी करणारा चपराशी भालचंद्र प्रल्हाद गलांडेही(२२ रा. गणेशपेठ) एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. एसीबीच्या पथकाने तळपे याच्या अमरावती मार्गावरील म्हाडा वसाहतीतील घर आणि पुण्यातील शास्‍त्रीनगर येथील घराची झडती सुरू केली आहे. लाच रुपात मोठी रक्कम स्वीकारण्याची अलीकडील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे भूमीअभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे.
उद्योजक एन.कुमार यांची कुमार हॉटेल लिमिटेड व लिंक हाऊस इण्डस्ट्रीज आहे. अॅड.अमरेंद्रसिंग वर्मा (३२ रा.मिरे-ले-आऊट) कंपनीचे लिगल अॅडव्हायझर आहेत. २००१मध्ये कुमार यांनी सोनोने यांच्याकडून सीताबर्डीतील १५ हजार चौरसफूट भूखंड एक कोटी रुपयांमध्ये तर २००४ मध्ये उर्वरित पाच हजार चौरसफूट भूखंड ५० लाखांत खरेदी केला. हा भूखंड एन.कुमार यांच्या नावे झाला. २०१०मध्ये सोनोने यांनी भूमी अभिलेख कार्यालयात सीताबर्डीतील भूखंड आपण एन. कुमार यांना विकलेला नसून, त्यांचे नाव रद्द करावे याबाबत लेखी अर्ज केला. २०१२पासून याप्रकरणाचा युक्तीवाद चालू झाला. १० डिसेंबर २०१३ ला प्रकरणाची तारीख होती. अॅड. वर्मा तेथे गेले. त्यावेळी पाच लाख रुपये दिल्यास निकाल तुमच्या पक्षकाराच्या बाजूने लावून देतो, असे तळपे याने सांगितले. त्यानंतर १८ फेब्रुवारीला पुन्हा वर्मा तारखेवर गेले. पाच लाख रुपये दिले नाही तर निकाल तुमच्या बाजूने लागणार नाही,अशी धमकीही त्याने दिली. वर्मा यांनी एन. कुमार यांना याबाबत सांगितले. त्यानंतर वर्मा यांनी एसीबीकडे तक्रार केली. अधीक्षक निशिथ मिश्रा ,अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक (वर्धा)अनिल लोखंडे, हेडकॉन्‍स्टेबल रमेश भोयर, शिपाई गिरीश कोरडे, नेरेंद्र पाराशर, निशिथ रंजन पांडे, मनीष घोडे, प्रदीपक कदम, रागिणी हिवाळे, प्रदीप देशमुख कोमल बिसेन यांनी बुधवारी सापळा रचला. वर्मा यांनी पैसे आणले. गलांडे यांच्यासोबत जा असे तळपे म्हणाला. वर्मा हे गलांडे याच्यासोबत म्हाडा वसाहतीत गेले. गलांडे याने रक्कम स्वीकारताच एसीबीने आधी त्याला व नंतर तळपे याला अटक केली.

February 27, 2014 in महाराष्ट्र
लोकसभा निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेसची १८ उमेदवारांची यादी जाहीर 0

लोकसभा निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेसची १८ उमेदवारांची यादी जाहीर

ncp
नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत रणशिंग फुंकलंय. टोलमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना पहिल्यांदाच लोकसभेची उमेदवारी देत पक्षाने राष्ट्रीय राजकारणाचे गाजर दाखवले आहे. त्याचवेळी कळीच्या ठरलेल्या हिंगोली, हातकणंगले, मावळ आणि बीड या चार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे पक्षाने अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहेत.
राष्ट्रवादीतील वजनदार नेते छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. अखेर भुजबळांना लोकसभेची उमेदवारी देत चर्चेला पूर्णविराम दिलाय. साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी मिळणार की नाही याचीही जोरदार चर्चा रंगली होती. पण राष्ट्रवादी आणि उदयनराजे भोसलेंना एकमेकांची गरज असल्याने अखेर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. त्याचबरोबर भंडारा-गोंदियातून प्रफुल्ल पटेल, बारामतीमधून सुप्रिया सुळे, ठाण्यातून संजीव नाईक, उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रिक्त झालेल्या आणि प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर सोलापूरमधील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोल्हापूरमधून अपेक्षेप्रमाणे धनंजय महाडीक यांना उमेदवारी दिली गेली आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या आनंद परांजपे यांनाही कल्याणमधील उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच उमेदवारी देण्यापूर्वीच जात प्रमाणपत्राच्या वादात अडकलेल्या नवनीत कौर राणा यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. नगरमधून राजीव राजळे, परभणीतून विजय भांबळे, रावेरमधून मनिष जैन, दिंडोरीतून भारती पवार, शिरूरमधून देवदत्त निकम, बुलढाण्यातून कृष्णराव इंगळे आणि जळगावमधून सतीश पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीसाठी आव्हानात्मक असलेल्या चार लोकसभेच्या जागांची उमेदवारी गुलदस्त्यात ठेवली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा गड असलेल्या बीडमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. तर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच चुरशीच्या ठरलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघाची उमेदवारीही राष्ट्रवादीने जाहीर केलेली नाही. हिंगोली आणि मावळ या शिवसेनेच्या गड असलेल्या मतदारसंघांमधील उमेदवारही राष्ट्रवादीने घोषित केलेले नाहीत.
बारामती – सुप्रिया सुळे नाशिक – छगन भुजबळ अमरावती – नवनीत राणा-कौर सातारा – उदयनराजे भोसले परभणी – विजय भांबळे जळगाव – सतीश पाटील कल्याण – आनंद परांजपे भंडारा – प्रफुल्ल पटेल माढा – विजयसिंह मोहिते पाटील शिरुर – देवदत्त निकम बुलढाणा – कृष्णराव इंगळे उस्मानाबाद – पद्मसिंह पाटील नगर – राजीव राजळे कोल्हापूर – धनंजय महाडिक दिंडोरी – भारती पवार ठाणे – संजीव नाईक रावेर – मनीष जैन ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील

February 27, 2014 in मुख्य पान
महागाव, पुसद तालुक्यात गारपीट 0

महागाव, पुसद तालुक्यात गारपीट

3
यवतमाळ  –  आठवड्यात पुन्हा तिसºयांदा वादळी पावसाने जिल्ह्यात तडाखा दिला असून आज पुसद, महागाव तालुक्यात गारपीट झाली. तर यवतमाळ, आर्णी, दिग्रस, घाटंजी, दारव्हा,कळंब तालुक्यात पाऊस कोसळला. गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल निर्माण झाला आहे. तीनदिवसापूर्वी जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपून काढले होते. आज पुन्हा काही तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके भूईसपाट झाली आहे. तर काही ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्याची माहिती आहे. यवतमाळात ढग दाटून आल्यानंतर ५ वाजता मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.
महागाव:  तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार गारपीट झाली. सेनद येथे पाच वाजता वादळ वाºयासह झालेल्या गारपीटीमुळे शेतमालाचे नुकसान झाले. तर काही घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने यात एक महिला जखमी झाली. दुपारी ३ वाजतापासून ढग दाटून आले होते. माळकिन्ही, गुंज, सवना, खडका, माळेगाव, वडद, खांबलवाडी, कापरवाडी, बोरी,शाहीइजार, काळी (दौ.)आदी ठिकाणी गारपीट झाली. वादळवाºयासह आलेल्या गारपीटीमुळे गहू, हरभरा पिक पूर्णत: उद्ध्वस्त झाले. काळी (दौ.)जिल्हा परिषद सर्कलमध्ये गारपीटीमुळे गहू, हरबरा पिकासंह संत्रापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. तर अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले.
पुसद : तालुक्यात दुपारी ४ वाजता वादळी वाºयासह आलेल्या गारपीटीमुळे शेतपिकांसह घरांचे नुकसान झाले. अचानक ढग दाटून आल्यानंतर वादळवाºयासह गारपीटीला सुरूवात झाली. शेतात असलेला गहू, हरबरापिक भूईसपाट झाले आहे. काही ठिकाणचा वीज पुरवठाही वादळीपावसामुळे खंडीत झाला. सोबतच पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, कळंब, दिग्रस, दारव्हा, बाभूळगाव तालुक्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. रब्बी हंगामात गहू, हरभरा पिक उभे असून या अवकाळी पावसामुळे तोंडात आलेला घास हिरावल्या जात असल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे.

दुचाकीची बसला धडक, दोन ठार

दारव्हा – दिग्रसवरून दारव्ह्याकडे येणाºया बसवर दुचाकी आदळल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पळशी येथील बसस्थानकावर घडली.
नांदेड – नागपूर बस (एम.एच.  ४० / ४५७० ) दिग्रस येथून प्रवाशी घेऊन दारव्ह्याकडे येत होती. अशातच पळशी या गावाजवळ विरुद्घ दिशेने भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने बसला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. याप्रकरणाची तक्रार बसचालकाने दारव्हा पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. वृत्त लिहेपर्यंत मृतकांची नावे कळु शकली नाही.

लिंगायत जातीला आरक्षण द्या – प्रा.मनोहर धोंडे

यवतमाळ – समाजात अनेक जाती उपजाती असून शासन जातीच्या आधारावर आरक्षण देते. राज्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असून जाती उपजातीमध्ये ओबीसी, एससी, एनटी व एसबीसी असे चार प्रवर्ग आहे.  महसुली व शैषणिक आधारावर सवलत देण्यात येत असल्यामुळे लिंगायत उल्लेख असलेल्या ओबीसी, एसबीसी जातीला  आरक्षण देण्यात आले नाही. या जातींना आरक्षण द्यावे. अशी मागणी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी आज विश्राम गृहात आयोजित पत्रकार परीषदेत केली. यावेळी अभय कल्लावार, उमाकांत शेटे, विकास मुलंगे, अनिल हमदापुरे उपस्थित होते.
घाटंजी तालुक्यातील राजेगाव टिटवी  येथे आज आयोजित ६ व्या लिंगायत आरक्षण परीषद मेळाव्या निमित्त ते यवतमाळात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात व परराज्यात लिंगायत समाजाचा मोठा विस्तार आहे. जाती उपजातीमुळे सवलतीचा लाभ त्यांना मिळत नाही. त्यामुळे  समाजाचा शैषणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, स्तर उंचाविण्यासाठी शिवा संघटना स्थापण करण्यात आली. लिंगायत,  लिंगेडर, माला, जंगम, बुडगा, तेली, वाणी अशा विविध उपजातीना लिंगायत शब्द जोडून असल्याचे कारण पुढे करून सवलत देण्याचे टाळले जात आहे. याकरीता शिवा संघटना आंदोलनाच्या माध्यमातुन समाजाला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. संघटनेच्या आंदोलनाला यश येत असल्याचे सांगत काही जातीचा समावेश शासनाने केला असल्याचे धोंडे यावेळी म्हणाले. आता ओबीसी व एसबीसी चा आरक्षणात सहभाग व्हावा याकरीता संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन उभारणार असल्याचे धोंडे यांनी सांगितले.

जगदंबा महाविद्यालयाला ‘शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार’

यवतमाळ – येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सन २०१४ चा ‘उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता ‘पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या सचिव शीतल वातिले, संचालक पवन वातीले आणि प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर यांना पद्मविभूषण डॉ.करणसिंग यांच्याहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अर्थ-रिसर्च आर्गनायझेशन व प्लॅनिंग कमिशन (भारत सरकार) यांच्या संयुक्त पुढाकारातून दिल्ली येथील पंचतारांकित हॉटेल शांगरीला इरॉस येथे हा पुरस्कार समारंभ पार पडला. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य, सदर-ऐ-रियासत व जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल, राज्यसभा सदस्य, पद्मविभूषण डॉ. करणसिंग या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्याच हस्ते ‘बेस्ट इंजिनीअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र’ या पुरस्काराने जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयास सन्मानित करण्यात आले. अभियांत्रिकीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयास संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीक प्राप्त झाला आहे. या यशात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व व्यवस्थापकीय मंडळ सहभागी असल्याचे मत शीतल वातीले यांनी व्यक्त केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर, विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले. पुरस्कार वितरण सोहळ्यास संस्थेच्या सचिव शीतल वातिले, संचालक पवन वातीले, प्राचार्य सुरेंद्र कळसपूरकर, विभागप्रमुख प्रा. हेमंत बारडकर, प्रा.महेश नालमवार व प्रा.राम सोळंकी, प्रा.राजेश हेडावू, डॉ. मिलींद सरोदे, प्रा. विजय नेवे आदि उपस्थित होते.

टाक्यात पडून मुलाचा मृत्यू

दिग्रस – तालुक्यातील सावंगा (खू.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याच्या टाक्यात बुडून  बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता उघडकीस आली.  ऋतीक नामदेव राऊत (७) रा. सावंगा (खू.) असे मृतकाचे नाव आहे. जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात तो शिक्षण घेत होता. २५ फेबु्रवारी रोजी  शाळेत गेला मात्र सायंकाळ होऊनही तो घरी परत आला नाही. म्हणून नातेवाईकांनी त्याची शोधमोहीम सुरु केली. अशातच रात्री ९.३० वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केद्रातील पाण्याच्या टाक्यात त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलीस पाटील अर्चना अरूण कोरडे यांनी दिग्रस पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली. आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरु असून ठेकेदाराने पाण्याच्या टाकीवर झाकण बसविले नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नामदेव राऊत यांनी केला आहे.

February 26, 2014 in महाराष्ट्र
पाणी, दुष्काळावर नासा-इस्त्रोचा एकत्रित अभ्यास 0

पाणी, दुष्काळावर नासा-इस्त्रोचा एकत्रित अभ्यास

3
वॉशिंग्टन – पाणी आणि दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो एकत्रितपणे उपग्रहांची मालिका प्रक्षेपित करणार आहे. नासाने ही माहिती दिली आहे.
पृथ्वीवरील पाणी आणि दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी पुढल्या सात वर्षात वेगवेगळे उपग्रह अवकाशात पाठविण्याची नासा आणि इस्त्रोची योजना आहे. पृथ्वीवर होणा-या महत्वाच्या बदलांवर नासाचे जमीन, हवा आणि अवकाशातून लक्ष असते. पृथ्वीवरील वातावरणात होणा-या बदलांचा अभ्यास करण्यासाठी नासाने काही नवीन पध्दती विकसित केल्या आहेत.वेगवेगळया प्रयोगातून उपग्रहांकडून जमा होणारी महत्वपूर्ण माहिती नासा नेहमीच जागतिक समुदाय तसेच विविध संस्थांना देत असते. जेणेकरुन पृथ्वीच्या सुरक्षिततेविषयी जागृती होईल आणि विविध उपायोजना करता येतील. पृथ्वी विज्ञान मोहिमेतंर्गत यावर्षी तीन उपग्रह प्रक्षेपित करण्याची नासाची योजना आहे. या उपग्रहांव्दारे पृथ्वीवरील पाण्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

February 26, 2014 in मुख्य पान

तर जगभरात वापरता येणार मोफत, अमर्याद इंटरनेट

अमेरिकी एनजीओचा ‘सॅटेलाइट’ उपक्रम
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन – जगभरातील प्रत्येकाला ‘वायफाय’ सेवेचा मोफत लाभ घेता यावा, यासाठी एक अमेरिकन कंपनी घनाकृती कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट डेटा प्रक्षेपित करण्याचे नियोजन करीत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास खंडांच्या, देशांच्या सीमा आड न येता प्रत्येकाला मोफत इंटरनेट वापराची संधी प्राप्त होणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत जगभरातील नागरिकांना त्यांचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन कोणत्याही सेन्सॉरशिपविना मोफत आणि अमर्याद इंटरनेट अॅक्सेस मिळविता येणार आहे, असा दावा न्यूयॉर्कमधील ‘मीडिया डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट फंड’ (एमडीआयएफ) या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. त्यासाठी ही संस्था घनाकृती कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून ‘आउटरनेट’ नामक विस्तृत जाळे विणणार आहे. त्याअंतर्गत इंटरनेट डेटा जगभर प्रक्षेपित करण्यात येईल. जेणेकरून कुणालाही स्मार्टफोन, टॅब्लेट अथवा कम्प्युटरच्या माध्यमातूनही मोफत इंटरनेट सेवा वापरण्याची संधी उपलब्ध होईल. ‘आउटरनेट’च्या माध्यमातून प्रक्षेपित होणारे डेटा सिग्नल ‘कॅच’ करण्यासाठी जगभरात शंभर ठिकाणी ग्राउंड स्टेशनची उभारणी करण्यात येईल. ‘एमडीआयएफ’च्या अहवालानुसार आजही जगभरातील चाळीस टक्के नागरिकांना इंटरनेटच्या सुविधेपासून वंचित आहेत. ‘आउटरनेट’च्या माध्यमातून सायबेरियापासून अमेरिकेच्या पश्चिमेकडील भाग, तसेच निर्मनुष्य बेटांपासून आफ्रिका खंडातील अतिदुर्गम भागांपर्यंत इंटरनेटचे विस्तृत जाळे विणणे सहज शक्य होणार आहे.
‘आउटरनेट’ची कार्यपद्धती काय?
‘आउटरनेट’च्या माध्यमातून एकाच दिशेने (वन वे) फीडर्सद्वारा कृत्रिम उपग्रहांकडे इंटरनेट डेटा सोडण्यात येईल. हे उपग्रह मिळालेला डेटा स्वीकारून जगभर उभारण्यात आलेल्या ग्राउंड स्टेशनकडे प्रक्षेपित करतील. जेथे पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होईल, तेथे अशा प्रकारची स्टेशन उभारण्यात येणार आहेत.जगभर मोफत ‘वायफाय सेवा’ देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या नेटवर्कसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. अवकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांच्या चलनवलनासाठी एक लाख ते तीन लाख डॉलरचा खर्च अपेक्षित आहे

February 26, 2014 in एनजीओ

नौदल प्रमुखांचा राजीनामा

2
नवी दिल्ली – मुंबई किनाऱ्यावर भारतीय नौदलाच्या ‘सिंधुरत्न’ या पाणबुडीला झालेल्या अपघातानंतर नौदल प्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सध्या नौदलाचे व्हाइस अॅडमिरल रॉबिन धवन यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. संरक्षण मंत्री ए. के. अँटनी हे सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘सिंधुरक्षक’ या नौदलाच्या पाणबुडीला झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच, पुन्हा एकदा मुंबईजवळ भारतीय नौदलाच्या ‘सिंधुरत्न’ या पाणबुडीला अपघात झाला आहे. या पाणबुडीवर एकूण ९४ जण होते. यातील ७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ६० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दोन नौदलच्या अधिका-यांचा अद्याप थांगपत्ता लागत नसल्याचे कळते. परंतु बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर याबद्दल ठोस माहिती मिळेल.सिंधुरत्न ही भारताची ३५ वर्ष जुनी पाणबुडी आहे. डागडुजी झाल्यानंतर तपासणीसाठी पाणबुडी समुद्रात नेली असतानाच हा अपघात झाला. याआधी रशियातून आधुनिकीरण करुन आणलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीला अपघात झाला होता. तसेच आयएनएस बेतवा युद्धनौकेलाही अपघात झाला होता.फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ऐरावत या युद्धनौकेला किरकोळ अपघात झाला होता. या घटनेनंतर ऐरावतच्या कमांडिंग ऑफिसरची बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने या अपघातांची गंभीर दखल घेतल्याने या घडामोडी घडल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

February 26, 2014 in मुख्य पान
सिंधुरत्न पाणबुडीला अपघात 0

सिंधुरत्न पाणबुडीला अपघात

1

मुंबई – ‘सिंधुरक्षक’ या नौदलाच्या पाणबुडीला झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच, पुन्हा एकदा मुंबईजवळ भारतीय नौदलाच्या ‘सिंधुरत्न’ या पाणबुडीला अपघात झाला आहे. दुरुस्तीनंतरच्या चाचण्यांदरम्यान या पाणबुडीमधून धूर येऊ लागला. बचावकार्य सुरू असून संध्याकाळपर्यंत ही पाणबुडी बाहेर निघेल, असे सांगण्यात येत आहे.
या पाणबुडीवर एकूण ९४ जण होते. यातील ७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ६० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दोन नौदलच्या अधिका-यांचा अद्याप थांगपत्ता लागत नसल्याचे कळते. परंतु बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर याबद्दल ठोस माहिती मिळेल. बंदरापासून ४० ते ५० किमी खोल समुद्रात ही दुर्घटना घडली. अचानक येऊ लागलेल्या धुरामुळे श्वसनास अडथळा येऊन सात नौसैनिक बेशुद्ध झाले. या नौसैनिकांना एअरलिफ्ट करुन नौदलाच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुर्घटना झाली त्यावेळी पाणबुडीत शस्त्रे, क्षेपणास्त्रे नव्हती.धूर येण्यामागील कारणे शोधून आवश्यक ती दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी घेण्याचे आदेश नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिले आहेत.याआधी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुरक्षक पाणबुडीला मुंबई बंदराजवळ मोठा अपघात झाला होता. मोहीमेवर निघण्याच्या तयारीत असताना झालेल्या स्फोटामुळे सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी मिळाली. या अपघातात १८ नौसैनिकांचा मृत्यू झाला होता.
अपघातांची मालिका
सिंधुरत्न ही भारताची ३५ वर्ष जुनी पाणबुडी आहे. अलिकडेच डागडुजीसाठी ही पाणबुडी गोदीत दाखल झाली होती. डागडुजी झाल्यानंतर तपासणीसाठी पाणबुडी समुद्रात नेली असतानाच हा अपघात झाला. याआधी रशियातून आधुनिकीरण करुन आणलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीला अपघात झाला होता. तसेच आयएनएस बेतवा युद्धनौकेलाही अपघात झाला होता.फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ऐरावत या युद्धनौकेला किरकोळ अपघात झाला होता. या घटनेनंतर ऐरावतच्या कमांडिंग ऑफिसरची बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्यामुळे नौदल मुख्यालयाने अपघातांची गंभीर दखल घेतली आहे. नौदलाच्या पश्चिम तळावर सातत्याने अपघात होण्यामागील कारणे जाणून घेण्यासाठी नौदल मुख्यालयाने पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल शेखर सिन्हा यांना बोलावले आहे.

February 26, 2014 in मुख्य पान

अपंग युवतीवर अतीप्रसंग; नराधमास सात वर्ष सक्तमजुरी

पुसद – महागाव तालुक्यातील घोन्सरा येथील अपंग युवतीवर अतीप्रसंग करणाºया नराधमास सातवर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोेठावली. येथील जिल्हा न्यायाधिश वर्ग १ तथा अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश अनिल सुब्रमण्यम् यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
सखाराम सुभाष झोलांडे (२०) रा. घोन्सरा असे शिक्षा ठोेठावलेल्या नराधमाचे नाव आहे. २६ एप्रिल २०१२ रोजी घोन्सरा येथील अपंग युवतीचे आई-वडील लग्नाला गेले होते. त्यामुळे ती घरी एकटीच असल्याने अंगणात बाहेर खाटेवर झोपली होती. अशातच दुपारी एक वाजताच्या सुमारास सखारामने तेथे येऊन तु घरामागे चाल असे म्हटले. यावेळी नकार दिल्यानंतर नराधमाने तीला उचलुन मागे नेऊन कोठ्यात अतीप्रसंग केला.  पिडीत युवतीने ही बाब आपल्या कुटुंबीयाना सांगितली. त्यावरून पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवी कलम ३७६, ३६३,३६६,४५२अंतर्गत गुन्हा दाखल केला. तत्कालीन ठाणेदार  पि.आर. चव्हाण  यांनी  तपास करून आरोपी सखाराम यास अटक करून दोषारोपपत्र दाखल केले. येथील जिल्हा न्यायाधिश वर्ग १ तथा अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश अनिल सुब्रमण्यम्  यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने एकुण १० साक्षदार तपासण्यात आले. यामध्ये दोष सिद्घ झाल्याने आरोपी सखाराम झोलांडे यास भादंवि कलम ३६६ मध्ये पाच वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, भादंवि ४५२ अंतर्गत तीन वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, भादंवी ३७६ अंतर्गत सात वर्ष सक्तमजुरी व सात हजार दंडाची शिक्षा सुनावली.  सदर शिक्षा एकत्र भोगावयाच्या असून शासनातर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता सुधाकर राठोड यांनी काम पाहिले.

February 25, 2014 in महाराष्ट्र

उजोणा येथे युवकाचा खून

यवतमाळ – शेतीच्या हिस्सेवाटणीवरून तीन जणांनी कुºहाडीने वार करून एका युवकाचा खून केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उजोणा येथे उघडकीस आली. लाडखेड पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपी अटक केली असून एका विधी संषर्घग्रस्त बालकास ताब्यात घेतले.
रमेश गणेश पाटील (३०) रा. उजोणा असे मृतकाचे नाव आहे. बंडू चंपत पारिसे (३५), गोलु शंकर आमझरे (१८) रा. उजोणा अशी आरोपींची नावे आहे. काल सायंकाळी तो घरून निघून गेला होता. रात्री बराचवेळ होऊनही तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधमोहीम सुरु केली होती. मात्र त्याचा थागपत्ता न लागल्याने पत्नीने रमेशच्या मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी बंडूच्या कुटुंबातील सदस्याने मोबाईन उचलला होता. अशातच आज सकाळी गावालगत नाल्यात रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. ही वार्ता गावात पसरताच नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे ठाणेदार सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनवर यानी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. ठाणेदार पाटील यानी तपासचक्रे वेगाने फिरवून दोन आरोपी व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता शेतीच्या वादातून कुºहाडीने हल्ला चढवून रमेशचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी गणेश चंपत पारीसे (६०) रा. उजोणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, २०१ (ब), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

February 25, 2014 in महाराष्ट्र

प्रेमविवाह करून पत्नीचा छळ ,वकीलासह चौघांना अटक

यवतमाळ – शहरातील एका युवकाने नाशिकच्या युवतीसोबत प्रेमविवाह करून तीचा छळ करणाºया वकीलासह चार जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली.
संदिप लिलाधर जोशी, दिपक लिलाधर जोशी, उषा उपाध्याय, बाला त्रिवेदी सर्व रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी अशी आरोपींची नावे आहे. मुळ नाशिक येथील रुपाली ही २००९ मध्ये एका कामानिमित्त यवतमाळ येथे आली होती. त्यावेळी तिची ओळख वकील असलेल्या संदीप जोशी या युवकासोबत झाली होती. या ओळखीचे रुपांत प्रेमात झाल्यानंतर २० एप्रिल २००९ रोजी त्या दोघांनी अकोला येथे आंतरजातीय प्रेमविवाह केला. वर्षभर संसार सुरळीत असताना संदिपच्या वागण्यात बदल होऊन त्याने शारीरीक व मानसिक त्रास देणे सुरु केले. त्याचे अन्य मुलीबरोबर प्रेमप्रकरण सुरू असल्याचेही रुपालीच्या लक्षात आले. याबाबत जाब विचारला असता तीला मारझोड सुरू केली. अशातच २०१३ मध्ये तीला गर्भधारणा झाली. ही बाब संदीपच्या लक्षात येताच त्याने तिला औषध देवून गर्भपात केला. तसेच माहेरच्यांनी दिलेले ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले होते. सतत सुरु असलेल्या या त्रासातून रुपालीने कशीबशी सुटका करून आई-वडीलांकडे नाशिक येथे निघून गेली. काही दिवसानंतर तीने यवतमाळ येथे परत आली असता संदीप शहर सोडून गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी रुपालीने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता तू तुझे बघुन घे असे सांगण्यात आले. त्यामुळे रूपालीने वडगाव रोड ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून नाशिक येथील अंबाड पोलिस ठाण्यात वर्ग केला होता. दरम्यान दोन दिवसापासून तो यवतमाळात लोकेशन असल्याने अंबाड पोलिस ठाण्याच्या सहा. पोलीस निरीक्षक धनश्री पाटील आज शहरात दाखल झाल्या. त्यांनी वडगाव रोडचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक मसराम, पोलीस उपनिरीक्षक मंगला वाकोडे यांच्या मदतीने विदर्भ हाऊसिंगमध्ये धाड टाकून आरोपी संदिप,जोशी, उपाध्याय, त्रिवेदी याला अटक केली.

February 25, 2014 in महाराष्ट्र

युवकाचा मृतदेह आढळला , घातपाताची शक्यता

यवतमाळ – बाभुळगाव तालुक्यातील मादणी बोरगाव येथील एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. उकंडा जंगल शिवारात ही घटना घडली असून अनैतिक सबंधातून त्याचा खून केल्याची चर्चा आहे.
दशरथ मारोती मदने (२३) रा. मादणी (बोरगाव) असे मृतकाचे नाव आहे. दशरथ हा अ‍ॅपे चालवून आपली उपजिवीका भागवित होता. अ‍ॅपे घेऊन तो दररोज यवतमाळ येथे येत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो अ‍ॅपे घेऊन यवतमाळात आला होता. रात्री त्याने मद्यप्राशन केल्याने त्याच्या मित्राने अ‍ॅपे घरी नेऊन दिला. अशातच गावात रात्री २ वाजता कापूस गाडी भरत असलेल्या नागरिकांना तो गावात दिसला होता. अशातच आज सकाळी उकंडा शिवारात रोडवर त्याला मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच शहरचे प्रभारी ठाणेदार अमोल माळवे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळावर विषारी औषधीची बॉटल व शिखात महिलेसोबत शारीरीक सबंध करतांना सुरक्षेचा उपाय म्हणून वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. मृतकाच्या दंडावर जखमा व गळा आवळल्याच्या खुना दिसून आल्या. त्यामुळे या युवकाचा अनैतिक सबंधातून त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने विषारी औषधी पाजून खून केल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधान आले आहे. संतोष कोकरे रा. नेताजी नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.

February 25, 2014 in महाराष्ट्र

राज्याचा हंगामी अर्थसंकल्प सादर

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. निवडणूकीपूर्वीचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी कोणत्याही वाजवी घोषणा न करता जनतेला महागाईपासून दिलासा आणि आहे त्या सवलती, योजना पुढे चालू ठेवल्या आहेत. सर्वांसाठी वीज दरात २० टक्के सवलत दिली आहे. काही महत्त्वाच्या २५ मोठ्या प्रकल्पांसाठी नऊ हजार ७२५ कोटींची तरतूद केली आहे. जलस्वराज योजना देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात लागू करण्यात येत असून त्यासाठी एक हजार ८८४ कोटींची तरतूद करण्यात आलीा आहे. अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्टये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २०१४ विधानसभेत सादर, चार महिन्यांसाठी लेखानुदानास मंजूरी, अन्न सुरक्ष योजनेचा राज्यातील सात कोटी जनतेला फायदा, सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध होणार , रोजगार हमीसाठी २५० कोटींची तरतूद, १० वर्षात दरडोई ऊत्पन्नात वाढ, भाडवली कर्जासाठी दोन हजार २५३ कोटी, घरकूल योजनेसाठी ६७५ कोटींची तरतूद, ११ लाख ८३ हजार ९५३ घरकूल बांधली, ग्रामिण, शहरी भागासाठी रमाई घरकूल योजना, जलस्वराज योजना देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात लागू , जलस्वराज योजनेसाठी एक हजार ८८४ कोटींची तरतूद , शेततळ्यांसाठी २५६ कोटींची तरतूद
, वीजदर सवलतीसाठी नऊ हजार कोटींची तरतूद , स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात सुकन्या योजना राबवणार , लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी १५ कोटी १० लाख रुपयांची तरतूद , अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ , अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर एक लाख देण्याची तरतूद , आदिवासी विकासासाठी चार हजार ९९२ कोटींची तरतूद , नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आठ हजार ६८० कोटी रूपये , २५ मोठ्या प्रकल्पांसाठी नऊ हजार ७२५ कोटींची तरतूद , जीवनावश्यक वस्तूंवरील व्हॅटवरील सवलत कायम ,सर्वांसाठी वीज दरात २० टक्क्यांनी कपात , जलसंवर्धनासाठी आठ हजार २१५ कोटी रुपये खर्च करणार, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दोन हदार ३७८ कोटींची तरतूद , सोलापूर चादर आणि मनूका स्वस्त होणार, मौलाना आझाद मोफत शिक्षण योजना ,शेततळ्यांना २५ हजार रुपये अनुदान देणार , स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात सुकन्या योजना राबवणार , लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी १५ कोटी १० लाख रुपयांची तरतूद , अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ , अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर एक लाख देण्याची तरतूद ,व्याघ्र, पक्षी संवर्धनासाठी ३५ कोटींची तरतूद , मराठी भाषा विकासासाठी १५ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद , मीटर असलेल्या कृषी वीज पंप धारकांना सूट , राज्यात एक हजार ४५० जवाहर विहिरींची कामे पूर्ण
» शिष्यवृत्तीचा फायदा पाच लाख विद्यार्थ्यांना , घरकुल योजनेसाठी ३३३ कोटींची तरतूद , दीड लाखांपेक्षा जास्त रुग्णांना जीवनदायी योजनेचा लाभ , ग्रामीण विकासासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद , अनुसूचित जातीजमातींना शौचालय बांधण्यासाठी ६० कोटी देणार , मदरशातील शिक्षक, विद्यार्थ्यांना अनुदान देणार , ग्रामीण भागातील अल्पसंख्याकांना ४० कोटी रुपयांची तरतूद
» अल्पसंख्याकांना शिष्यवृत्तीसाठी ८१ कोटी रुपये देणार , अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रासाठी १३० कोटी , सुकन्या योजनेसाठी १०५ समुपदेशन केंद्र , महिला बालसुरक्षेसाठी १०५ समुपदेशन केंद्र , मनोधैर्य योजनेसाठी १५ कोटींची तरतूद , महिला, बालअत्याचार रोखण्यासाठी योजना, नऊ हजार कोटी रुपये वीज सवलतीसाठी तरतूद, क-हाड, अमरावती, सोलापूर, जळगाव येथे नवीन विमानतळ, पिंपरी-स्वारगेट मेट्रोसाठी दोन हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित, तंत्रशिक्षणासाठी १३० कोटी रुपयांची तरतूद, १२ मागास जिल्ह्यांसाठी ३९५ कोटींची तरतूद , माजी सैनिक महामंडळासाठी १० कोटी , पोलिसांची ६१ हजार ४९४ नवीन पदे भरती करणार आहे.

February 25, 2014 in अर्थ, मुख्य पान

विधानसभेच्या गैरव्यवहाराची लोकायुक्त चौकशी करणार

नवी दिल्ली – राज्य विधानसभेशी निगडीत सभागृहाबाहेर झालेल्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर, लोकायुक्त त्याची चौकशी करु शकतो असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
मध्यप्रदेश विधानसभेशी निगडीत एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्षांनी लोकायुक्ताला बजावलेली विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीसही रद्द केली.लोकायुक्ताने सभागृहाबाहेर झालेल्या कामाशी संबंधित काही फाईल्स मागितल्या म्हणून विधानसभा अध्यक्षांनी लोकायुक्ताला विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस बजावली होती.

February 25, 2014 in देश-विदेश