पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2015

भारतीयाला मारहाण करणा-या अमेरिकेच्या पोलिसाला अटक 0

भारतीयाला मारहाण करणा-या अमेरिकेच्या पोलिसाला अटक

b13
वॉशिंग्टन- अमेरिकेत पोलिसांच्या मारहाणीमध्ये सुरेश पटेल (५७) यांना अर्धांगवायु झाल्याच्या घटनेसंदर्भात पटेल यांना मारहाण करणा-या पोलीस अधिका-याला अटक करण्यात आली आहे. एरिक पार्कर असे या पोलीस अधिका-याचे नाव आहे.
पार्कर याने पटेल यांना मारहाण केल्याचे चित्रीकरण आणि वृत्त मिडीयात प्रसिद्ध झाल्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची स्थानिक प्रशासनातर्फे चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन अमेरिकेतर्फे देण्यात आले आहे.

February 13, 2015 in देश-विदेश
सेवकाचा सम्राट होताना सर्वांनीच बघितला - उद्धव ठाकरे 0

सेवकाचा सम्राट होताना सर्वांनीच बघितला – उद्धव ठाकरे

2014_9image_10_06_5439280002014_1image_13_26_122182000udhav-ll-ll
मुंबई, दि. १३ – राजकारणात प्रवेश करताना व निवडणूक लढवताना प्रत्येक जण जनतेचा सेवक असतो. पण सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कटाक्ष टाकला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने शिवसेनेच्या गोटात काहीसे आनंदाचे वातावरण असून राज्यातील मंत्रिमंडळात शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखात भाजपावर टीका केली. नरेंद्र मोदी हे स्वतःला प्रधान सेवक म्हणवून घेतात, आता केजरीवाल स्वतःचे काय बारसे करुन घेतात हे बघायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राजकारणात येताना व निवडणूक लढवताना प्रत्येक जण ‘सेवक’ असतो पण त्यानंतर तो सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे. त्यामुळे केजरीवाल दिल्लीत काय काम करतात याकडे लक्ष लागले आहे असा चिमटाही त्यांनी काढला.
ओबामा दिल्लीत आले तेव्हा नरेंद्र मोदींनी ३० – ३५ लाख रुपयांचा कोट घातल्याची चर्चा होती. आता अरविंद केजरीवाल यांचा मफलरही ब्रँडेड होऊ नये असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू, बुद्धदेव भट्टाचार्य आणि विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे साध्या राहणीमानासाठी कौतुक केले आहे. समाज अनुकरणवादी असून प्रत्येक ‘हिरो’ने जपून पाऊल टाकावे, सेवक तर सर्वच जण असून सेवकपणाचा अतिरेक करु नका. जनता हीच जनार्दन असून जनता पाठिशी आहे या अहंकारातून सर्वांनीच बाहेर पडावे असा उपदेशाचा डोसही उद्धव ठाकरेंनी भाजपा नेतृत्वाला पाजला आहे.

February 13, 2015 in मुख्य पान
बंगळुरु एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, १० ठार 0

बंगळुरु एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, १० ठार

2015-02-13~rail_ns
बंगळुरु, दि. १३ – बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरुन घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेस साडे सहाच्या सुमारास बंगळुरुहून एर्नाकुलमच्या दिशेने निघाली होती. सकाळी साडे सातच्या सुमारास कर्नाटक – तामिळनाडू सीमेवरील एनकेल येथे एक्सप्रेसचे इंजिनसह नऊ डबे रेल्वे रुळावरुन घसरले. अपघातात काही डबे एकमेकांवर चढल्याने प्रवाशांना बाहेर पडणेही अशक्य झाले होते. या अपघातात आत्तापर्यंत ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मदतकार्याला सुरुवात झाली असून १८ रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाला आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘सकाळी गाडीत बसल्यावर अनेक जण झोपी गेले होते. मात्र तासाभरानंतर आम्हाला जोरदार आवाज आला. आम्ही कसेबसे ट्रेनच्या बाहेर पडलो आणि नेमके काय झाले ते बघितले. डी ८ आणि डी ९ हे डबे एकमेकांवर चढले होते. या दोन डब्यांमध्येच जास्त प्रवासी अडकले असून सर्वाधिक नुकसान या दोन डब्यांचेच झाले आहे अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

February 13, 2015 in मुख्य पान
 खुनातील चार आरोपींना जन्मठेप, हातोला येथील खून प्रकरण 0

खुनातील चार आरोपींना जन्मठेप, हातोला येथील खून प्रकरण

images
यवतमाळ, दि. १२ – मुलाला का मारले याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा खून करणाºया हातोला येथील चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दारव्हा येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख यांनी आज गुरुवारी हा निकाल दिला.
संतोश बहिरट, पंडीत बहिरट, रवी बहिरट, शिवाजी बहिरट सर्व रा. हातोला अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये हातोला येथील मृतक विठ्ठल पंडीत खामकर यांचा मुलगा आशिष खामकर यास आरोपी संतोष, पंडीत याने मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी मृतक विठ्ठल खामकर गेले होते. यावेळी संतोष, पंडीत, रवी व शिवाजी या चौघांनीही चाकुने भोसकुन विठ्ठल याचा खून केला होता. याप्रकरणी दारव्हा पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला केला. त्यानंतर आरोपींना अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाच्या वतीने एकुण ११ साक्षीदार तपासले. यामध्ये आरोप सिद्घ झाल्याने चारही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम मृतकाची पत्नी सुनीता खामकर यांना देण्याचे आदेश दिले. तर सुभाष राठोड यास खोटी साक्ष दिल्याच्या कारणावरून नोटीस काढण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अविनाश शेटे यांनी काम पाहिले.

 

February 12, 2015 in मुख्य पान
घरफोडीतील दोन महिला अटकेत 0

घरफोडीतील दोन महिला अटकेत

IMG-20150212-WA0006
यवतमाळ, दि. १२ – येथील डेहनकर ले-आऊटमध्ये घरफोडी करणाºया दोन महिलांना डिवायएसपीच्या पथकाने आज गुरूवारी अटक केली. त्यांच्या कडून ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गीता अर्जून भोसले (३०) रा. परसोडी, हल्ली मुक्काम कळंब, अनिता माउली भोसले (२०) रा. वर्धा व दोन अल्पवयीन मुले असे अटकेतील चोरट्यांची नावे आहे.
ब्रिजलाल छोटेलाल यादव रा. डेहणकर ले-आऊट यांच्या घराचे दरवाजाचे कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा ६४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी वडगावरोड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद झाल्यानंतर पोलीस चोरट्यांचा शोध घेत होती. दरम्यान आज सकाळी चोरीतील कोºया नोटा दोन महिलांकडे असल्याची माहिती डीवायएसपीच्या पथकाला मिळाली. त्यांनी चौकशी केली असता, रोख रक्कम व चोरीतील मुद्देमाल महिलांकडे मिळाला. पथकाने दोन महिलांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना वडगावरोड पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. या महिलांनी वर्धा येथून अ‍ॅक्टीव्हा दुचाकी वाहनाची चोरी केल्याची कबूली सुद्घा पथकापुढे दिली असून, दुचाकी वर्धेत असल्याचे सांगितले. याबाबत वर्धा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे. हि कारवाई डिवायएसपी राहुल मदने, संतोष मडावी, प्रमोद मडावी, इकबाल शेख, रूतूराज मेढवे, विजय जाधव आदींनी केली.

February 12, 2015 in विदर्भ
नेर येथे व्यापाºयाकडे सापडले स्फोटके 0

नेर येथे व्यापाºयाकडे सापडले स्फोटके

download (6)
व्यापाºयास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यवतमाळ , दि. १२ – नेर शहरातील एका हार्डवेअर दुकानातून विना परवाना स्फोटके विकणाºया व्यापाºयास रंगेहात अटक केली. आज गुरूवारी यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मनोज टिकाचंद दर्डा (५०) रा. गांधी नगर नेर असे अटक केलेल्या व्यापाºयांचे नाव आहे. शहरात मिश्री मशिनरीज येथे अवैध स्फोटके विकल्या जात असल्याची गोपनीय माहीती यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून सापळा रचुन कॉरपेट विकत घेण्यासाठी बनावट ग्राहकाला पाठविण्यात आले. त्यावेळी दोन लोखंडी पत्राच्या पेटीमधून १२० किलो कारपेट स्फोटके आढळून आले असून ते जप्त करण्यात आले. त्यानंतर व्यापारी मनोज दर्डा यास पोलीसांनी अटक केली. आज येथील दिवाणी न्यायालयात सदर व्यापाºयास हजर करून एक दिवस पोलीस कोठडी मिळविली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून व्यापाºयाविरूद्घ गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, जमा. संजय दुबे, सचिन हुमने, आशिष चौबे, साजीद खान, सुरेंद्र वाकोडे यांनी केली.

February 12, 2015 in महाराष्ट्र
चोरट्यास दोन वर्ष सश्रम कारावास 0

चोरट्यास दोन वर्ष सश्रम कारावास

2014-10-15~court_ns
यवतमाळ, दि. १२ – घरासमोर उभी असलेले दुचाकी वाहन व अन्य साहित्य चोरून नेणाºया चोरट्यास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मुख्यन्यादंडाधिकारी आरती देशपांडे यांनी सुनावली.
अमित राजेंद्र केणे (२२) रा. यशोदा नगर बनोडा अमरावती असे आरोपीचे नाव आहे. शहरातील उत्कवर्ष सोसायटी राऊत नगरमधील रहिवासी निरू अरुण जाधव या महिलेच्या घरासमोरून दुचाकी, आतमधून मोबाईल व एक हजार ५०० रुपये नगदी असा एकुण ४० हजार रुपयाचा मुद्देमाल ३१ मे २०१४ रोजी रात्री चोरी गेला होता. या प्रकरणी जाधव यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्घ भादंवि कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अशातच अमरावती येथील फेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक सुखानंद इंगळे यांनी संशयास्पदरित्या फिरत असतांना अमित केणे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसुन चौकशी केली असता जाधव यांच्याकडे चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून अमरावती फैजरपुरा पोलिसांनी यवतमाळ शहर पोलिसांना पाचारण करून आरोपी व दुचाकी ताब्यात दिली. शहरचे जमादार अनिल डेरे यांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. मुख्य न्यायदंडाधिकारी आरती देशपांडे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये एकुण ९ साक्षदार तपासले. त्यामध्ये आरोप सिद्घ झाल्याने भादवि कलम ४५७ अंतर्गत दोन वर्ष सश्रम करावास व ५०० रुपये दंड ठोठावला. तर भादंवि कलम ३८० अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.आर. मोरे यांनी काम पाहिले.

 

February 12, 2015 in विदर्भ
आॅटो उलटल्याने चालक ठार 0

आॅटो उलटल्याने चालक ठार

IMG-20150125-WA0003
महागांव, दि. १२ – प्रवाशी घेऊन जाणारा आॅटो गतिरोधकावर उलटल्याने चालक ठार झाल्याची घटना आज गुरूवारी सकाळी ७ वाजता खडका फाटयावर घडली.
प्रमोद प्रकाश गायकवाड (२२) रा. खडका असे मृतकाचे नाव आहे. तो अ‍ॅटो चालवुन आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत होता. नेहमी प्रमाणे आज सकाळी ७ वाजता आॅटो घेवुन खडका फाट्यावर जात होता. अशातच पुसद-माहुर रस्त्यावर शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी नाली खोदण्यात आली. नाली बुजविण्यात आल्यानंतर तेथे गतिरोध प्रमाणे रस्ता झाल्याने अ‍ॅटो उलटला. यामध्ये जखमी झालेल्या गायकवाड यांना पुसद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली.

February 12, 2015 in विदर्भ
दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करा - कोर्ट 0

दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करा – कोर्ट

aib-knockout44-200x125
मुंबई, दि. १२ – अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून अल्पावधीतच लोकप्रीय व वादग्रस्त ठरलेल्या ‘एआयबी नॉक आऊट’ या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी कडक कारवाईचे आदेश दिले. अभिनेत्री दीपिका पदुकोण, चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यासह अन्य १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आभा सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
या कार्यक्रमात अतिशय अश्लिल आणि कमरेखालचे विनोद असून महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत घरात हा कार्यक्रम पाहिलाच जाऊ शकत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘एआयबी नॉकआऊट’ कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत हा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, अभिनेता आमीर खानने या कार्यक्रमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.

February 12, 2015 in मनोरंजन
स्वाइन फ्लू : हैदराबादमध्ये ६ जणांचा मृत्यू 0

स्वाइन फ्लू : हैदराबादमध्ये ६ जणांचा मृत्यू

download (1)
हैदराबाद, दि. १२ – स्वाइन फ्लू या संसर्ग आजारामुळे हैदराबादमध्ये एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अधूनमधून जाणवणा-या स्वाइन फ्लूने देशभरात चांगलेच डोके वर काढले असून मुंबई, पुणे, गुजरात, राजस्थान आणि हैदराबादमधील अनेकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू ओढावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गुरुवारचा दिवस ख-या अर्थाने स्वाइन फ्लू डे ठरला. गुरुवारी हैदराबादमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. हैदराबादमध्ये वर्षभरात स्वाइन फ्लूने बळी जाण्याची संख्या ५९ वर पोहाचली आहे. हैदराबादमधील गांधी हॉस्पिटलमध्ये चार जणांचा तर दोन जणांचा पालिका रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आज दुपारी जोधपूरमध्ये एका ७० वर्षीय स्वित्झर्लंड महिला पर्यटकाचा स्वाइन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू झाला.
देशाच्या अनेक भागात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मुंबईत एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून महाराष्ट्रात आत्तापर्यंत १०० जणांचा बळी गेला आहे. राजस्थानच्या ३३ जिल्हयात याची लागण झाली आहे. १४०४ लोकांना तपासणी केल्यानंतर लागण झाल्याचे निष्पन्न झाले. १ जानेवारीपर्यंत ११७ जणांचा बळी गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जयपूरमध्ये २१, अजमेर १९, बारमार ११, नागौर ०९, जोधपूर ०८, चितौडगड ०७, बानसवारा ०६, कोटा ०५, बिकानेर आणि टोंक प्रत्येकी ०४, सिकार आणि भिलवाडा प्रत्येकी ०३, डौसा, झूनझूनू, पाली, बुंदी आणि उदयपूर प्रत्येकी २, तर भारतपूर, चुरु, जैसलमेर, श्रीगंगांर, हनुमानगड, डुंगरपूर आणि अल्वर येथे प्रत्येकी एकचा बळी गेल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

February 12, 2015 in मुख्य पान
 अण्णा करणार मोदी सरकार विरोधात आंदोलन 0

अण्णा करणार मोदी सरकार विरोधात आंदोलन

modi211
पुणे – जमिन अधिग्रहण पूर्नवसन कायदा २०१३ मधील सुधारणांवरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकार विरोधात दंड थोपटले आहेत.
या कायद्यातील सुधारणांविरोधात अण्णा हजारे २४ फेब्रुवारीला दिल्लीत जंतर-मंतरवर होणा-या एका आंदोलनात सहभागी होणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टिका करणारे अण्णा हजारे प्रथमच मोदी सरकार विरोधातील आंदोलनात सहभागी होत आहेत.
त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये मोदी विरुध्द अण्णा असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. केंद्रातल्या तत्कालिन काँग्रेस प्रणीत संपुआ सरकारने २०१३ मध्ये शेतक-यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन जमिन अधिग्रहण पूर्नवसन कायदा मंजूर केला होता.
मात्र आताचे मोदी सरकार शेतक-यांऐवजी उद्योगपतींच्या हिताला पहिले प्राधान्य देऊन या कायद्यात उद्योगांना अनुकूल ठरणारे बदल करत आहे. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांचा या सुधारणांना विरोध आहे. येत्या २४ फेब्रुवारीला नवी दिल्लीमध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन हे आंदोलन आयोजित केले असून, यामध्ये समाजसेविक मेधा पाटकरही सहभागी होऊ शकतात.

 

February 12, 2015 in मुख्य पान

अाॅटोरिक्षा व टैक्सी ला जीपीएस बंधनकारक

 

मुंबई, (सतिष राठोड)

अाॅटोरिक्षा व टैक्सीच्या माध्यमातून दिवसेंदिवस घडणार्या महिलांवरील गुन्ह्ा थांबवण्यासाठी,परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक महत्वाचे निर्णय सोमवारी घेतले असुन,प्रवाशांच्या सोयीसाठी अाटोरिक्षा व टैक्सीमध्ये ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (जीपीएस) लावणे बंधनकारक राहील.जीपीएसमुळे कोणते वाहन कुठे अाहे हे समजण्यास महत्वाचे ठरेल.अाणि विधान भवन समोरील स्टैडवर जाउन रावते यांनी
सांगातले कि, शेयर टैक्सीच्या वाहन चालकाच्या बाजूची सीट महिलांसाठी राखीव ठेवण्याची योजना सुरु केली.या निर्णयाचे प्रवासी संघटनांनी स्वागत केले अाहे.

केडीएमसीच्या महापौर कल्याणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

कल्याण,ठाणे (प्रतिनिधी,सतिष राठोड)
कल्याण डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील यांच्यावर बाजार पेठपो.स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात अालेला अाहे. राष्ट्रवादी काग्रेसचे माजीपदाधिकारी रमेश हनुमंते यांना धमकावल्या प्रकरणी हे गुन्हा नोंदवण्यात अालाअसुन,हनुमंते यांना जीवे मारण्याची धमकी दिली असे नोंदवण्यात अालेले अाहे.
कल्याणी पाटील यांनी हे अारोप खोटे असल्याचे स्पष्टीकरणदिले अाहे,व रमेश हनुमंते यांनी बालवाडी मध्ये काम करणार्या काहीशिक्षिकांपासून पगारश्रेणी लागू करण्यासाठी पैसे घेतले असुन,रमेश हनुमंतेयांच्या विरुध्द काही शिक्षिकांनी
तक्रार केली होती,त्यांनी रमेश हनुमंते यांना शिक्षिकांच्या बाबतीत बोलले वघेतलेले पैसे परत करा असे सांगितले.त्यामुळे माझ्यावर लावलेला अारोप खोटेअाहे.

February 11, 2015 in महाराष्ट्र

नेर येथे २२० केव्हीच्या वीज उपकेंद्रास मंजुरी

 

दारव्हा-नेर २८ किमीचा थेट वीज मार्ग, पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांना यश

यवतमाळ – नेर शहरातील वीजेच्या समस्येचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून नेर शहराला उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यासाठी तब्बल २२० केव्हीच्या नवीन वीज उपकेंद्राच्या प्रस्तावास राज्य मंत्रीमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. गेल्या अनेक वर्षांपासून नेरवासीयांना ३३ केव्हीच्या उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा सुरू आहे. मात्र या वीजकेंद्रावर अतिरिक्त भार येत असल्याने शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. पालकमंत्री संजय राठोड हे आमदार असल्यापासून नेर येथील २२० केव्हीच्या उपकेंद्रासाठी पाठपुरावा करीत होते. आघाडीचे सरकार असताना त्यांनी यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून कपात सूचनाही मांडली होती.

युती सरकारमध्ये महसूल राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ना. संजय राठोड यांनी नेर येथील नवीन वीज उपकेंद्राचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. १० फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडून २२० केव्हीच्या या नवीन वीज उपकेंद्रास मान्यता मिळविली. लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून वीज उपकेंद्राच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

३३ केव्ही आणि २८ किमीच्या नेर-दारव्हा थेट वीज मार्गास मंजुरी

नेर शहराला सध्या ३३ केव्हीच्या उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र शहरात वीजेची मागणी लक्षणीय वाढल्याने या केंद्रावर दाब येत आहे. नेर येथे २२० केव्हीच्या नवीन वीजउपकेंद्रास मान्यता मिळाली असतानाच दारव्हा येथून नेरपर्यंत थेट वीज पुरवठा करण्यासाठी नवीन वीजमार्ग टाकण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. ४ कोटी ३३ लाख रूपये खर्चून दारव्हा ते नेर हा थेट २८ किलोमीटरचा, ३३ केव्हीचा नवीन वीज मार्ग टाकण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला मार्ग हा दारव्हा व्हाया लाडखेड असा फिरून येत असल्याने नेर येथे वीज पोहचेपर्यंत ती अनेक ठिकाणी वितरित होते. त्यामुळे दारव्हा येथून थेट नेर शहराला अखंडित वीज पुरवठा झाल्या विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्यासंदर्भात असलेल्या तक्रारी यापुढे राहणार नाहीत. तत्काळ प्रभावाने येत्या महिन्याभरात दारव्हा-नेर या विशेष वीजवाहक मार्गाचे काम सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

 

February 11, 2015 in विदर्भ
बिबटला विष पाजून मारले, दोन आरोपी अटकेत 0

बिबटला विष पाजून मारले, दोन आरोपी अटकेत

download (1)
यवतमाळ, दि. १० – यवतमाळ वनवृत्तातील वनक्षेत्रातील बिबट असूरक्षित असल्याचे गेल्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दारव्हा वनपरीक्षेत्रात एकाच महिन्यात दोन मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजीच असताना, आज मंगळवारी बोरजई शिवारात बिबटला विष पाजून मारण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे. मारोती अ‍ैईसकर , गणेश खडके असे अटकेतील आरोपींची नावे आहे.
वनसंपदनेने नटलेल्या जिल्हा जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळेच यवतमाळ, पुसद व पांढरकवडा अशा तीन वनवृत्ताची विभागणी करण्यात आली आहे. यवतमाळ वनवृत्तातील आठ वनपरीक्षेत्रापैकी, यवतमाळ, हिवरी, दारव्हा या रेंजमधिल राखीव वनात सागवान झाडे मोठ्या प्रमाणात आहे. सागवान वृक्षांसोबतच वन्यप्राण्यांचे देखील वनात वास्तव असून, बिबटची संख्या देखील लक्षनिय आहे. त्यामुळे या वनपरीक्षेत्रावर तस्करांचा नेहमीच डोळा असतो. यवतमाळ वनपरिक्षेत्रात मध्यतंरी बिबट मृत्यूची तीन घटना घडल्या होत्या. बिबटच्या मृत्यूचे गुढ वनविभाग उकलण्यात अपयशी ठरले असताना, गेल्या महिन्याभरात दारव्हा वनपरीक्षेत्रात बिबट मृत्यूची मालिका सुरू आहे. दोन बिबट मृत्यूची चौकशी सुरू असताना, आज मंगळवारी चाणी बिटमधिल बोरजई शिवारात बिबट मृतावस्थेत पडून असल्याची वनविभागाला माहिती मिळाली. महिन्याभरात बिबट मृत्यूची घटना घडल्याने उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय वनअधिकारी राहुल गवई, वनपरीक्षेत्र अधिकारी नाल्हे व क्षेत्रसाहाय्यक धोत्रे यांच्या चौकशी दरम्यान बिबटला विष पाजून मारण्यात आल्याची माहिती पुढे आली. यामध्ये मारोती अ‍ैईसकर , गणेश खडके या दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र यापूर्वी दोन घटनेतील बिबट मृत्यूचे गुढ वनअधिकाºयांनी उकलले नसून, वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बिबटच्या सुरक्षितेतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

February 10, 2015 in मुख्य पान
महिलेच्या खून प्रकरणात चार संशयित ताब्यात 0

महिलेच्या खून प्रकरणात चार संशयित ताब्यात

download (5)
यवतमाळ, दि. १० – यवतमाळ लगत असलेल्या किट्टा कापरा येथील वृद्घ महिलेच्या खून प्रकरणात चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीतून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र पोलिसांच्या हाती अद्याप पूरावा लागला नसून, बाळू घुडे, दिनेश राठोड, महादेव नेरकर, देवेंद्र घरकडे रा. सर्वजण किट्टाकापरा अशी चौकशी करण्यात आलेल्यांची नावे आहे.
यवतमाळ तालुक्यातील किट्टा कापरा येथे ८ फेबु्रवारीला किसनाबाई किसन देवकर (७२) या वृद्घ महिलेचा खून झाला होता. निराधार योजनेतून मिळणाºया पगारावर घराचा उदरनिर्वाह ती चालवित होती. गावातील काही गरजूना अडीअडचण आल्यास मदतही करीत होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने महिलेचा गळा आवळून हत्या केली. हत्येच्या दिवशी गावात शाळेमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला महिला देखील गेली होती. मात्र कार्यक्रम अर्धवट सोडून महिला घरी परतली. तेव्हा तिच्या घरी चोरटा चोरी करीत होता. त्याच चोरट्याने महिलेचा गळा आवळून खून केलाचा धागा घेऊन पोलीस तपास करीत आहे. आज गावातीलच चार युवकांना पोलिसांनी चौकशीसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनला आणले होते. चौकशीत पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याची माहिती असून, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

February 10, 2015 in विदर्भ
जादूटोण्याच्या संशयावरून युवकाची हत्या, दोन आरोपी अटकेत 0

जादूटोण्याच्या संशयावरून युवकाची हत्या, दोन आरोपी अटकेत

mh031
यवतमाळ, दि. १० – गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह काल सोमवारी कोपरी शिवारातील पुलाखाली अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. जादूटोण्याच्या कारणावरून हा खून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, आज मंगळवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नितीन धुर्वे रा. सावंगी पेटका, पवन एबंडवार रा. अंतरगाव असे अटकेतील आरोपींची नावे आहे.
राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका येथील गणेश मेश्राम गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या भावाने ६ फेब्रुवारीला भाऊ बेपत्ता असल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली होती. पोलीस व कुटूंबियाकडून गणेशचा शोध घेण्यात येत असताना, दरम्यान काल ९ फे बु्रवारीला कोपरी शिवारातील पुलाखाली मृतदेह काही लोकांना आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. चौकशी दरम्यान मृतदेह गणेशचाच असल्याची ओळख पटली. गणेशच्या खूनाचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हाण पोलिसांपुढे असताना, आज स्थानिक गुन्हे शाखेला गणेशचा खून जादूटोण्याच्या कारणातून झाल्याची माहिती मिळाली. हा धागा धरत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित नितीन धुर्वे, पवन एबंडवार याला अटक केली आहे. गळा आवळून खून केल्यानंतर पूरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून पुलाखाली फेकल्याची कबूली आरोपींनी दिली. हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे संजय पुजलवार, सुगत पुंडगे, संजय दुगवे, सचिन दुंगे, साजिद शेख, आशिष चौबे, योगेश डगवार, सतीश गजभिये आदींनी केली.

February 10, 2015 in विदर्भ
भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षांची चैन उडविली 0

भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षांची चैन उडविली

chain_snatching
धूम स्टाईलने चैन स्नॅचरचा धुमाकुळ
कल्याण,ठाणे (सतिष राठोड) दि. १० – गेल्या काही दिवसांपासून कल्याण,मुंबई,ठाणे व उप नगरीय शहरांमध्ये चैन स्नॅचरांचा धुम स्टाईलने धुमाकुळ घातला आहे. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारात कल्याण पूर्वेतील लोकग्राम,चिंचपाडा,विजय नगर परिसरात चक्क १५ मिनिटात ३ ठिकाणी चैन स्नॅचरांनी महिलांच्या अंगावरील ११.५ तोळे सोन्याचे दागिने बाईक वर धूम स्टाईलने चोरण्याचा पराक्रम केला आहे.
पहिल्या घटनेत भारतीय महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता पाटील हे आॅटो रिक्षातून उतरून रिक्षा चालकाला पैसै देण्यासाठी पर्समध्ये हात घातला. यावेळी एका बाईकवर हेल्मेट घातलेले २ चोरट्यांनी धूम स्टाईलने पाठलाग करून अंगावरील एक १० ग्रॅम व दुसरा ५० ग्रॅमचे असे २ मंगळसुत्रे हिसकाउन नेले. तर दुसºया घटनेमध्ये चिंचपाड्यात रिक्षामध्ये बसत असतांनाच वैशाली विचारे यांचा ५ तोळ्याचा मंगळसूत्र गळ्यातून हिसकाउन चोरटे पळून गेले. तर तिसरी घटनेत ही अशाच प्रकारे धूम स्टाईलने ३.५ तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरले.
या घटनेला पोलीसच कारणीभूत असल्याची प्रतिक्रीया भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षांनी दिली आहे. याप्रकरणी विजय नगर पोलीसांनी चोरट्याविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

February 10, 2015 in महाराष्ट्र
१४ फेबु्वारीला केजरीवाल घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ 0

१४ फेबु्वारीला केजरीवाल घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

AAP supporters celebrate
नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर बसण्यास सज्ज झाले आहेत.
वर्षभरापूर्वी दिल्लीकरांची माफी मागत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर वर्षभरानंतर केजरीवाल पुन्हा दिल्लीत सरकार स्थापन करणार आहेत. १४ फेब्रुवारीला रामलीला मैदानात शपथविधी सोहळा होणार असून यावेळी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
‘१४ फेब्रुवारीला रामलीला मैदानात अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील’ असे ‘आप’चे नेते आशुतोष यांनी सांगितले. या निवडणुकीत केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपाच्या नुपूर शर्मा यांचा तब्बल ३१ हजार ५८३ मतांनी पराभव केला.
२०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने काँग्रेसच्या पाठिंब्याच्या जोरावर दिल्लीत सत्ता स्थापन केली होती. २८ डिसेंबर रोजी रामलीला मैदानात केजरीवाल यांनी दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर ४९ दिवसांचे सरकार चालवल्यानंतर जनलोकपाल विधेयकाच्या मुद्याचे भांडवल करुन केजरीवाल सरकारने राजीनामा दिला होता.

February 10, 2015 in मुख्य पान
अरविंदला पैकीच्या पैकी गुण – किरण बेदी 0

अरविंदला पैकीच्या पैकी गुण – किरण बेदी

download
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या मुख्य स्पर्धक असणा-या किरण बेदी यांनी आपला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल टि्वटरवरुन अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.
अरविंद तुझे अभिनंदन. तुला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. आता दिल्लीला एका वेगळया उंचीवर घेऊन जा. दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवा असे बेदी यांनी टि्वट केले आहे.
किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली विधानसभेची निवडणूक लढणा-या भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. किरण बेदी यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारताना या निकालाला नरेंद्र मोदी सरकारच्या कारभाराशी जोडण्यास नकार दिला.
जेव्हा पक्ष जिंकतो तेव्हा तो सामूहिक विजय असतो. जेव्हा पराभव होतो तो एकटयाचा असतो. मी या संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारते. पोलिस सेवेत असतानाही मी अपयशाची जबाबदारी स्वीकारली आहे असे बेदी म्हणाल्या.
अरविंद केजरीवाल आणि माझ्यामध्ये सामना होता. आमच्या दोघांपैकी कोणी एक जिंकणार होता असे बेदी यांनी सांगितले. दिल्लीमध्ये भाजपाचा अत्यंत दारुण पराभव झाला असून, भाजपला दहाच्या आता जागा मिळतील अशी स्थिती आहे. स्वत:हा किरण बेदी भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणा-या क्रिष्णनगरमध्ये पहिल्या तीन फे-यांमध्ये पिछाडीवर होत्या.

 

February 10, 2015 in मुख्य पान
केजरीवालांनी याआधीची चूक पुन्हा करु नये - अण्णा हजारे 0

केजरीवालांनी याआधीची चूक पुन्हा करु नये – अण्णा हजारे

Anna Hazare addresses media
राळेगणसिद्धी- दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणा-या आम आदमी पक्ष आणि नेते अरविंद केजरीवाल यांचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी अभिनंदन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी यावेळी टीका केली.
दिल्लीत भाजपाला मिळालेले हे अपयश हा तर पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. मोदींनी दिल्लीतील नागरिकांची विश्वासार्हत गमावली. ते भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी ठरले, असे हजारे यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली निवडणुकीत आप ६०हून अधिक जागांवर आघाडीवर असल्याने आपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल केजरीवालांचे अभिनंदन. मात्र मुख्यमंत्री असो वा नसो, त्यांनी केलेले आंदोलन विसरता कामा नये. भ्रष्टाचारविरोधी चळवळीमुळेच केजरीवालांना नागरिकांचा विश्वास संपादन कऱण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे यापूर्वी केलेली चूक केजरीवाल यांनी पुन्हा करु नये, असे अण्णा म्हणाले.

February 10, 2015 in मुख्य पान