पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2015

वारंगणा वस्तीत आग, महिलेसह बालकाचा मृत्यू 0

वारंगणा वस्तीत आग, महिलेसह बालकाचा मृत्यू

IMG-20150209-WA0019_resized
वणी (यवतमाळ), दि़ ९ – वणी येथील दिपक टॉकिज परिसरातील प्रेमनगर नावाने परिचित असलेल्या वारांगणा वस्तीत ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत पाच घरे भस्मसात झाली. यामध्ये ५० वर्षीय महिलेसोबतच ५ वर्षीय बालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून लाखो रुपयाच्या रोख रकमेसह साहित्य जळून खाक झाले़
येथील वारांगणा वस्तीमध्ये ४० कच्या स्वरुपाचे घरे आहेत़ मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये देहविक्रिचा व्यवसाय केल्या जातो़ परप्रांतातून येथे मुलींना आणून मालक अथवा मालकीन त्यांच्याकडून व्यवसाय करवून घेतात़ मध्यरात्रीनंतर होणाºया त्रासामुळे त्यांना आत कोंडून दाराला बाहेरुन कुलूप लावण्यात येते़ ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अचानक त्या घराला आग लागली़ यामुळे चंदा लोणारे हिने घरातूनच आरडाओरड केला़ आगीने रौद्ररुप धारण केले तीच्या किंचाळीने बाजूच्या घरात राहणाºया वारांगणांनी दार तोडून पळ काढला़ परंतू चंदा लोणारेच्या घराला बाहेरुन कूलूप लावून असल्याने तीला बाहेर पडता आले नाही़ यावेळी तीने दत्तक घेतलेला ५ वर्षीय अजय पेंन्दोर हा मुलगा होता या दोघांचा घटनास्थळीच जळून मृत्यू झाला़
लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण करत त्या घराला लागून असलेल्या ५ ते ६ घरांना विळखा घातला़ त्यातच लगत असणाºया घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग पुन्हा भडकली़ आगीच्या तांडवामध्ये तेथे वास्तव्यास असलेल्या वारांगणांचे रुपये, सोने, मौल्यवान वस्तू, घरातील पंखे, फ्रिज व महत्वपूर्ण साहित्य जळून खाक झाले़ यावेळी प्रत्यक्षदर्शीना विचारणा केली असता लाखो रुपयाचे साहित्य जळाल्याचे त्यांनी सांगीतले़ लागलेल्या आगीची सुचना स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली़ घटनास्थळावर ठाणेदारासह पोलीस कर्मचारी पोहचले़ अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले़ रात्री उशीरा पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले़ परंतू या आगीमध्ये १० ते १५ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे़ वारांगणा वस्तीतील लागलेल्या आगीची बातमी समजताच आ़संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घटनास्थळी धाव घेतली़ मात्र महसुल प्रशासनाच्या अधिकाºयांना आगीबाबतची माहिती आमदारांना सांगावी लागली़ त्यानंतर तहसिलदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले़ महसुल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला परंतू या आगीमध्ये सर्वस्व हीरावल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न वारंगणापुढे उभा ठाकला आहे़

February 09, 2015 in मुख्य पान
लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ््यात 0

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ््यात

images (2)
यवतमाळ, दि. ९ – विहिर नसल्याचा दाखला देण्यासाठी शेतकºयाला साडेतीन हजार रुपयांची लाच मागणारा तलाठी आज सोमवारी एसीबीच्या जाळ््यात अडकला. हि घटना केळापूर तहसील कार्यालयात घडली असून, संतोष सुखदेव मराठे (४०) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
केळापूर तहसील कार्यालयाअंतर्गत येणाºया किन्हाळा येथे संतोष मराठे तलाठी म्हणून कार्यरत होता. शेतकरी महिलेने शेतात विहिर नसल्याचा दाखला व सातबारा मिळण्याबाबत तलाठ्याकडे अर्ज केला होता. महिलेला दाखला व सातबारा देण्याची गरज असताना, तलाठी महिलेला त्रास देत होता. दरम्यान त्याने दाखला व सातबारा देण्यासाठी महिलेकडे ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी महिलेने तालाठ्याला धडा शिकविण्यासाठी लाच देण्यास होकार देऊन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे कायालय गाठले व तलाठी लाच मागत असल्याबाबतची तक्रार केली. ठरल्यानुसार लाचेची रक्कम देण्यासाठी आज सोमवारी महिला केळापूर येथे आली. तलाठी लाच स्विकारत असताना, सापळा रचून बसलेल्या एसीबीने त्याला रंगेहात पकडले. हि कारवाई पोलीस उपअधिक्षक सतिष देशमूख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, गजानन राठोड, अनिल राजकुमार, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, निलेश पखाले, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, भारत चिरडे, किरण खेडकर, अरूण गिरी आदींनी केली.

February 09, 2015 in विदर्भ
एकतर्फी प्रेमातून महिला तहसीलदार अपहरण 0

एकतर्फी प्रेमातून महिला तहसीलदार अपहरण

download (1)
दापोली : एकतर्फी प्रेमातून तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार कल्पना गोडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करीत त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी प्रफुल्ल युवराज वीर (२७) याला पोलिसांनी रविवारी अटक केली. शनिवारी घडलेल्या या प्रकरणाबाबत तहसीलदार गोडे यांनीच फिर्याद दिली आहे.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात प्रफुल्ल युवराज वीर (मुळचा पुण्याचा) हा तहसील कार्यालयात आला आणि त्याने थेट तहसीलदार गोडे यांचे दालन गाठले. त्या ठिकाणी गोडे व प्रफुल्ल यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आक्रमक होऊन प्रफुल्लने गोडे यांच्या टेबलावरील साहित्याची फेकाफेक करीत त्यांना शिवीगाळ व मारहाणही केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवून तो घेऊन गेला.
तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी तत्काळ ही घटना पोलिसांना कळविली. महिला तहसीलदाराचे अपहरण झाल्याचे समजताच नाकाबंदी करण्यात आली. ही गाडी पोलिसांनी वाटेतच अडविली. मात्र, त्यावेळी गोडे यांनीच आपला हा खासगी प्रश्न असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी न करता गाडी सोडून दिली. नंतर गोडे यांनी रविवारी कोथरूड (जि. पुणे) पोलीस ठाण्यात या घटनेबाबत फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा दापोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

February 09, 2015 in देश-विदेश
मुख्यालयी न राहणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांवर कार्यवाही 0

मुख्यालयी न राहणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांवर कार्यवाही

unnamed
वैद्यकीय महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालयांना सीसीटीव्ही, आरोग्य सेवेच्या प्रश्नांवर 12 फेब्रुवारीला मुंबईत बैठक
यवतमाळ, दि.9 : आरोग्य सुविधा सर्वसामान्यांशी निगडीत अशी बाब आहे. परंतु अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी तथा आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा रुग्णांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. मुख्यालयी उपस्थितीबाबत ग्रामपंचायतींचे अभिप्राय मागितले जातील. अभिप्रायात अनुपस्थिती दर्शविण्यात आली असल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल,असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, कृषी तसेच पशु, मत्स्य व दुग्ध व्यवसाय विभागाचा स्वतंत्र आणि सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यासह आरोग्य, कृषी संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित डॉक्टर्स रुग्णालयांमध्ये उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांची मुख्यालयातील उपस्थिती तपासण्याचे काम तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात यावे. यासोबतच ग्रामपंचायतीकडून अभिप्राय मागविल्या जातील, असे पालकमंत्री म्हणाले. पीएचसी व ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीच्या सुविधा उपलब्ध असतांना सरसकट वैद्यकीय महाविद्यालयात असे पेशंट रेफर केले जातात. त्यामुळे महाविद्यालयातील रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने जिल्हा रुग्णालयावर ताण येत आहे. वास्तविक पाहता स्थानिक स्तरावरच प्रसुती होणे अपेक्षीत असतांना व आवश्यकता नसतांना पेशंट रेफर करणाऱ्या डॉक्टरांवर कार्यवाही करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. जिल्हा रुग्णालयात अशाप्रकारे रेफर करण्यात आलेल्या रुग्णांची स्वतंत्र नोंदणी करण्याबाबतही त्यांनी सुचविले.
आरोग्य व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अतिशय चांगले माध्यम आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयास जिल्हा वार्षीक
योजनेतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी तसेच महाविद्यालयाच्या व्याख्यान कक्षेसाठी 44 लाख रुपये लवकरच उपलब्ध करून देवू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या नियमित उपस्थितीसह जिल्ह्यातील एकूणच आरोग्य व्यवस्थेचा चेहरा-मोहरा एका महिन्यात बदलविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. वैद्यकीय महाविद्यालयातील 150 प्रवेश क्षमतेप्रमाणे बांधकामासाठी 112 कोटी, पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजनेअंतर्गत 150 कोटींचा आराखडा, ब्लड कॉम्पोनंट युनिट, रुग्णालयांचे विस्तारीकरण, महिला व शिशु रूग्णालयाचे बांधकाम, ब्लड सेफ्टी व ट्रामा केअर युनिट याबाबी तातडीने मार्गी लावण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेवून निर्णय घेतले जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयातील परिसरातील मैदानाचा विकास करण्यासोबतच रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिसरात असलेली धर्मशाळा चांगल्या संस्थेला चालवायला देण्याबाबत त्यांनी सांगितले. दारव्हा येथील रुग्णालय 100 खाटांचे करण्यासोबतच दिग्रसच्या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी कृषी विभागाच्यावतीने येत्या 5 वर्षात राबविण्यात येणारा आराखडा तसेच उत्पादकता वाढविण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. पशु, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागाचा आढावा घेतला असून याबाबत पुन्हा स्वतंत्र आढावा बैठक घेण्याबाबत त्यांनी सुचविले.

February 09, 2015 in विदर्भ
गणगांव येथे मतिमंद मुलीवर बलात्कार 0

गणगांव येथे मतिमंद मुलीवर बलात्कार

i00000mages
आर्णी दि,9- तालुक्यातील गणगांव येथे सोमवारच्या दुपारी 4:30 वाजता दरम्यान स्वच्छविधीला गेलेल्या 35 वर्षीय अविवाहीत मतिमंद मुलीवर गांवातीलच आरोपीने बलात्कार केल्याची घटना घडली.संजय अंनदराव खैरे वय 45 वर्ष रा,गणगांव असे बलात्कार करणार्या आरोपीचे नांव असुन गांवातीलच मतिमंद असलेल्या अविवाहित मुलीवर याने गावा बाहेर स्वच्छविधीला गेल्याचा फायदा घेवुन बलात्कार केला.पिडीत मुलगी ही मतिमंद असल्याने ति अविवाहित आहे.सोमवार ला दुपारी 4:30 वाजता दरम्यान एकटी गावाच्या बाहेर स्वच्छविधी ला गेली होती.त्याचा फायदा घेत आरोपी नामे संजय खैरे यांनी तिच्यावर बलात्कार केला असे पिडीतची आईने आर्णी पोलीसात फिर्यादीत नमुद केले असुन आरोपी विरोधात कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला आहे.यातील आरोपीला पोलीसांनी अटक सुध्दा केली आहे.

February 09, 2015 in विदर्भ
काँग्रेसचा रास्तारोको, एक तास वाहतूक ठप्प 0

काँग्रेसचा रास्तारोको, एक तास वाहतूक ठप्प

IMG-20150209-WA0057

यवतमाळ, दि. ९ – शेतकरी दुष्काळाच्या दुष्ट चक्रात होरपळत आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत आज सोमवारी जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने पांढरकवडा बायपासवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी नारेबाजी करीत काँग्रेसने तब्बल एक तास वाहतूक रोखून धरत संताप व्यक्त केला.
यंदा पावसाने अवकृपा दाखविल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे. दुबार, तिबार पेरणीमूळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. पीकाचा उतारा कमी आल्याने कर्ज कसे फेडायचे याची चिंता शेतकºयांना सतावत असून, या विवंचनेत शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशा स्थितीत शेतकºयांना धीर देण्याची गरज असताना, सत्ताधारी सरकार शेतकºयांना नागविण्याचे काम करीत आहे. शेतकºयांना मदत जाहिर करण्यात आली आहे, मात्र ती तोकडी व शेतकºयांची थट्टा करणारी आहे. दोन हेक्टरची मर्यादा घालून ४० टक्के शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. भू-संपादनाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, शेतकºयांच्या जमिनीची दर शासन ठरविणार असल्याने शेतकºयांचे नुकसान होणार आहे. शासन शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत आज जिल्हा काँग्रेस कमेटीने पांढरकवडा मार्गावर रास्तारोको केला. यावेळी चारही मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती. सरकारविरोधी नारेबाजी करीत शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष वामन कासावार, माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी राज्यमंत्री संजय देशमूख, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, देवानंद पवार, विजया धोटे, तातू देशमूख, अशोक धवड, दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थानबद्घ केले.

February 09, 2015 in विदर्भ
अफझलची फाशी चूकच: थरूर 0

अफझलची फाशी चूकच: थरूर

shashitharoor1

नवी दिल्ली – ‘संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूला फाशी देणे चुकीचे होते, हे प्रकरण तेव्हा चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आले’, असे धक्कादायक विधान करत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या निर्णयाला लक्ष्य केले आहे.
दहशतवादी अफझल गुरूच्या फाशीला आजच दोन वर्षे पूर्ण होत असताना थरूर यांनी आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला घरचा आहेर दिला आहे. गुरूला फाशी देण्याचा निर्णय यूपीए सरकारने घेतला तेव्हा गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होते. गुरूच्या फाशीवरून तेव्हा काश्मिरमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता दोन वर्षांनंतर या फाशीप्रकरणावरील खपले पुन्हा एकदा काढण्यात आली आहेत.
काश्मीरमधील पाच काँग्रेस आमदारांनी अफझल गुरूला दिलेली फाशी ही चूक होती, असे निवेदन जारी केल्यानंतर पाठोपाठच शशी थरूर यांनी या निवदेनाची री ओढून नव्या वादाला फोडणी दिली आहे. ‘माझ्या मते दोन वर्षांपूर्वी अफझलच्या बाबतीत जे घडले ते चुकीचे होते आणि चुकीच्या पद्धतीने त्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. फाशी देण्याआधी त्याच्या कुटुंबाला कल्पना द्यायला हवी होती, शेवटची भेट घेण्याची संधी मिळायला हवी होती आणि त्याचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन व्हायला हवे होते, पण यापैकी काहीच झाले नाही’, असे ट्विट थरूर यांनी केले आहे.

February 09, 2015 in मुख्य पान
 फुटबॉल सामन्यावेळी संघर्षात ३० जण ठार 0

फुटबॉल सामन्यावेळी संघर्षात ३० जण ठार

images (1)
कैरो – फुटबॉलसाठी टोकाचे वेड असलेल्या इजिप्तमध्ये इजिप्शियन प्रीमिअर लीगमधील एका फुटबॉल सामन्यावेळी पोलिस आणि फुटबॉलप्रेमींमध्ये झालेल्या संघर्षात ३० जण मृ्त्युमुखी पडले तर, अनेक जण जखमी झाले. स्टेडिअममध्ये घुसू पाहणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी अटकाव केल्याने हा संघर्ष झाला.
कैरोतील एअर डिफेन्स स्टेडिअममध्ये ‘झामालेक’ आणि ‘ईएनपीपीआय’ या क्लबमध्ये सामना होता. ‘सामना सुरू होण्यास काही वेळ बाकी असताना ‘झामालेक’चे समर्थक असलेल्या ‘अल्ट्राज व्हाइट नाइट्‍स’ या ग्रुपचे सुमारे १० हजार कार्यकर्ते विनातिकीट स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यानंतर फुटबॉलप्रेमी आणि पोलिसांत संघर्ष झाला. फुटबॉलप्रेमींनी रस्ता रोखला; तसेच पोलिसांचे एक वाहन पेटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या’ असे इजिप्तच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे. अश्रुधुरामुळे गुदमरल्याने अनेकांचा मृत्यू झाला, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या सामन्यानंतर स्पर्धा तातडीने अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आली आहे. ही स्पर्धा या पुढे होण्याची शक्यता अंधुकच आहे. दंगलीप्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली आहे.

February 09, 2015 in क्रीडा
... तर केजरीवालांना गोळी घालू - स्वामी ओम 0

… तर केजरीवालांना गोळी घालू – स्वामी ओम

download 2015-02-09~1-01_ns
नवी दिल्ली, दि. ९ – अरविंद केजरीवाल यांनी देशविरोधी काम करणे थांबविले नाही तर त्यांना आम्ही गोळया घालू असे वादग्रस्त वक्तव्य हिंदु महासभेचे नेते स्वामी ओम यांनी केले आहे. विशेष म्हणजे स्वामी ओम यांनी केजरीवाल यांच्याविरुध्द दिल्लीत निवडणूक लढविली असून या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे.
स्वत:ला हिंदु महासभेचे नेते म्हणवून घेणा-या स्वामी ओम यांची मुलाखत असलेला एक व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या, हिंदू महासभा आमची पार्टी असून नथूराम गोडसे हे आमच्याच पार्टीतील होते. महात्मा गांधी यांनी देशाचे तुकडे पाडण्याचे काम केले त्यामुळे त्यांच्यावर गोळया झाडल्या. आगामी काळात जो कोणी देशविरोधी कारवाया करेल त्यांना आधी प्रेमाने समजवण्यात येईल नंतर मात्र त्यांना गोळया घालू असे स्वामी म्हणाले. केजरीवाल यांना याआधी प्रेमाने समजावून सांगितले आहे आता जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांना थेट गोळी घालू. विधानसभा निवडणुकीत आपण उभे राहिलो याचे कारण सांगताना स्वामी म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्या मतांची विभागणी होवून भाजपाची उमेदवार नूपुर शर्मा यांना त्याचा थेट फायदा व्हावा हा उद्देश होता. आपल्यासोबत आसाराम बापू आणि हिंदू महासभेचे कार्यकर्ते यांच्यासह १८ लाख लोकांचे समर्थन असल्याचा दावा करतानाच भाजपा ही आपलीच पार्टी असून २००४ ते २०१४ या काळात आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी काम केल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे. (साभार- दै. लोकमत आॅनलाईन आवृत्ती)

February 09, 2015 in मुख्य पान
यवतमाळात १६ फेब्रुवारीपासून छत्रपती महोत्सव 0

यवतमाळात १६ फेब्रुवारीपासून छत्रपती महोत्सव

Shivaji-Maharaj-Flash
यवतमाळ, दि.८ – सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिनिमित्त यवतमाळात १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या माध्यमातून विचारवंताचे विचार ऐकण्याची संधी यवतमाळकरांना मिळणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विविध स्पर्धा, व्याख्यान, पुरस्कार, किर्तन असे कार्यक्रमाचे स्वरूप असून हा महोत्सव आझाद मैदानात पार पडणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खा. भावना गवळी, आ. मदन येरावार, नगराध्यक्ष सुभाष राय उपस्थित राहणार आहे. यावेळी छत्रपती संभाजी राजे युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. १७ ला दुपारी दुपारी २ वाजता विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, ‘मजबूत लोकशाहीसाठी मतदानाकरिता ईव्हीएम मशीन योग्य की अयोग्य’ हा विषय ठेवण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजता पहिले व्याख्यान होईल. विचारंवत इंजि. चंद्रशेखर शिखरे मार्गदर्शन करतील. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पुरस्काराचे वितरण केल्या जाणार आहे. १८ ला सायंकाळी ६ वाजता वेशभूषा स्पर्धा पार पडल्यानंतर अड. गणेश हलकारे यांचे व्याख्यान होणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर’ या विषयावर मार्गदर्शन करतील. १९ फेब्रुवारीला सकाळी ‘रन फॉर शिवाजी’ शिव मेरॉथॉन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शिव चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर दुपारी २ ते ६ या वेळात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी विविध स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात येईल. ‘व्यक्तीमत्त्व विकासाचे महास्त्रोत छत्रपती शिवराय’ या विषयावर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले विचार व्यक्त करणार आहे. यासह २०, २१, २२, २३ फेब्रुवारीला विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. दिलीप महाले यांनी दिली. पत्रकार परिषदेला अंकुश वाकडे, प्रवीण भोयर, सतीश काळे, डॉ. प्रदीप राऊत, योगेश धानोरकर, प्रशांत ठाकरे, प्रशांत कदम, सुदर्शन बेले, प्रकाश ठाकरे आदी उपस्थित होते.

 

February 08, 2015 in विदर्भ
भारत सराव सामन्यातही पराभूत 0

भारत सराव सामन्यातही पराभूत

2015-02-08~crick1_ns
अॅडिलेड, दि. ८ – ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून विश्वचषकापूर्वीच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने दिलेले ३७२ धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.
विश्वचषकापूर्वी रविवारी अॅडिलेडमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सराव सामना रंगला. या सामन्याला अधिकृत दर्जा नसला तरी भारताच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा होता. कसोटी मालिका व त्यानंतरच्या तिरंग मालिकेतील कटू आठवणी विसरुन विश्वचषकापूर्वी विजय मिळवून मनोबल वाढवण्याची संधी भारतीय संघाकडे होती. मात्र या सामन्यात भारताचे गोलंदाज आणि फलंदाज दोघेही सपशेल अपयशी ठरले. गोलंदाजांच्या निष्प्रभ मा-यामुळे ऑस्ट्रेलियाने ४८.२ षटकांत सर्व गडी गमावत ३७१ धावांचा डोंगर उभा केला होता. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेले भारतीय फलंदाजही निराशाजनक कामगिरी करुन माघारी परतले.सलामीवीर रोहित शर्मा आणि तिस-या क्रमांकावर आलेला विराट कोहली अनुक्रमे ८ आणि १८ धावांवर बाद होऊन माघारी परतले. यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने शतकी भागीदारी करत भारताला १५० टप्पा ओलांडून दिला. भारताच्या १५७ धावा झाल्या असताना रहाणे (६६ धावा) बाद झाला. त्यानंतर १७२ धावांवर असताना धवन ५९ धावांवर बाद झाला. यानंतर भारतीय फलंदाजांनी बेजबाबदार फटकेबाजी करत विकेट गमावल्या. रैना ९ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात रनआऊट झाला. तर महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. धोनीला भोपळाही फोडता आला नाही. स्टुअर्ट बिन्नीही ५ धावांवर बाद झाला. अंबाटी रायडू (५३धावा) आणि रविंद्र जडेजा (२० धावा) या जोडीने भारताला २५० धावांचा टप्पा गाठून दिला. अक्षर पटेव व आर. अश्विनही स्वस्तात बाद झाले.

 

February 08, 2015 in क्रीडा
पैशासाठी महिलेचा खून 0

पैशासाठी महिलेचा खून

download (5)
यवतमाळ , दि. ८ – वृद्घ महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना किट्टा कापरा येथे आज रविवारी सकाळी उघडकीस आली. पैशाच्या वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून, अज्ञात मारेकºयाला शोधण्याचे आव्हाण ग्रामीण पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
यवतमाळ तालुक्यातील किट्टा कापरा येथील किसनाबाई किसन देवकर (७२) हि वृद्घ महिला निराधार योजनेतून मिळणाºया पगारावर घराचा उदरनिर्वाह चालवित होती. गावातील काही गरजूना अडीअडचण आल्यास मदतही करीत होती. दरम्यान काल शनिवारी मध्यरात्री ती घरी झोपून असताना, अज्ञात व्यक्तीने महिलेचा गळा दाबून हत्या केली. आज पहाटे गुलाब बळीराम पितरे याला त्याची मामी मृतावस्थेत आढळून आल्यानंतर गावात खून झाल्याची वार्ता पसरली. याबाबतची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पैशाच्या वादातून महिलेची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी फिर्याद नोंदविण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

February 08, 2015 in विदर्भ
एमएसजीला सेन्सॉर बोर्डाची परवानगी 0

एमएसजीला सेन्सॉर बोर्डाची परवानगी

msg
नवी दिल्ली – अनेक वादविवादानंतर डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांच्या ‘एमएसजी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारीला प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे.
स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राम रहीम यांनी ट्विटवरुन शनिवारी रात्री ही माहिती दिली. मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली आहे. चित्रपटाचे नवे नाव एमएसजी : द मेसेंजर आहे.
यापूर्वी या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देण्यावरुन अनेक वाद झाले होते. राम रहिम यांनी सिनेमात स्वत:ला देव म्हणून सादर केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप नोंदवत परवानगी नाकारली होती. मात्र एफसीएटीकडून या चित्रपटाला परस्पर मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सेन्सॉर मंडळाच्या अध्यक्ष लीला सॅमसन तसेच अन्य सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.
यासोबतच पंजाब आणि हरयाणामधील अनेक संघटनांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. मात्र पंजाब आणि हरयाणा न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यास नकार दिला होता.

February 08, 2015 in मनोरंजन
यवतमाळ-लोहारा 4 किमीचा रस्ता पथदिव्यांनी उजळला 0

यवतमाळ-लोहारा 4 किमीचा रस्ता पथदिव्यांनी उजळला

DSC_1186
यवतमाळ – यवतमाळ बसस्थानकावरून लोहाराकडे जाणारा रस्ता हा यवतमाळ शहरातील सर्वाधिक महत्वाचा आणि वर्दळ असलेला रस्ता आहे. परंतु या संपुर्ण 4 किमीच्या रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्यावेळी वाहतूकीस अडचणीचे होत होते. विशेष निधीतून नुकतेच या रस्त्यावर संपुर्ण पथदिवे लावण्यात आहे. 4 किमीच्या हा रस्ता प्रकाशाने उजळून निघाला असून शहराच्या सौंदर्यात यामुळे भर पडली आहे.
काही दिवसांपुर्वी केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या सहकार्याने या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्याच्या भव्यतेत वाढ होण्यासोबतच शहराला एक नवीन चेहरा या रस्त्यामुळे प्राप्त झाला. वाहतूकीसोबतच सर्वसामान्य यवतमाळकरांना हा रस्ता मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारा ठरला आहे. मात्र या संपुर्ण रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीच्यावेळी काही ठरावीक ठिकाणे वगळल्यास संपुर्ण रस्त्यावर अंधार राहायचा. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहतूकीस अडचणी निर्माण होत होत्या.
तत्कालीन आमदारांच्या प्रयत्नाने यवतमाळ शहराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीतून या संपुर्ण रस्त्यावर पथदिवे बसविण्याचे काम घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाने हे काम युध्दपातळीवर हाती घेतले. मे.न्युटेक, नागपुर या कंपनीला पथदिवे उभारण्याचे काम देण्यात आले होते. या संपुर्ण 4 किमीच्या रस्त्यावर मे.के.लाईट या चेन्नई येथील नामांकित कंपनीच्या बनावटीचे डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईट असून संपुर्ण विदर्भात पहिल्यांदाच अशाप्रकाराचे पोल यवतमाळ शहरात लावण्यात आले आहे.
या पोलवर 250 वॅट मेटल हॅलाईड लॅम्पचा उपयोग करण्यात आला आहे. या लॅम्पमुळे रस्त्यावर पडणाऱ्या रुपेरी प्रकाशाच्या झोतामुळे एखाद्या मेट्रोपॉलीटन सिटीमध्ये असल्याचा भास रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून फिरतांना होतो. या संपुर्ण रस्त्यावर एकूण 160 पोल बसविण्यात आले असून प्रत्येक पोलवर दोन दिवे याप्रमाणे 320 पथदिवे लावण्यात आले आहे. सदर पथदिवे बसविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अभियंता दिनेश खोंडे, कार्यकारी अभियंता अरूण आतराम, उपअभियंता प्रदिप तंबाके, सहाय्यक अभियंता निता बोकडे व कंत्राटदार प्रदिप देशमुख, प्रफुल्ल मोहोड, राजा भोयर यांनी पुर्ण केले. या रस्त्यावर लागलेल्या दिव्यांमुळे यवतमाळ शहराच्या भव्यतेत भर पडली आहे.

 

February 08, 2015 in विदर्भ
दिल्लीचा कौल ‘आप’ला- एक्झिट पोल 0

दिल्लीचा कौल ‘आप’ला- एक्झिट पोल

2015-02-08~3-03_ns
नवी दिल्ली : उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या चुरशीच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत शनिवारी राजधानीतील ६७.१४ टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदानाचा कौल आम आदमी पार्टी (आप)च्या बाजूने गेल्याचे भाकीत विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी ‘एक्झिट पोल’ (मतदानोत्तर चाचणी)च्या आधारे वर्तविले.
७० सदस्यीय विधानसभेसाठी ‘आप’ला मिळणाऱ्या संभाव्य जागांच्या आकड्यात तफावत असली, तरी भाजपाला सत्ता मिळणार नाही आणि ‘आप’ला निर्विवाद बहुमत मिळेल, हेच सर्वच्या सर्व एक्झिट पोलमधून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपाची विजयी वाटचाल रोखण्याचे काम राजधानीतील मतदारांनी केल्याचे चित्र निकालापूर्वीच तयार झाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे भाकीत करणाऱ्या एक्झिट पोलपैकी एका चाचणीत ‘आप’ला सर्वाधिक ५३ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. वृत्तवाहिन्यांनी शनिवारी दिवसभर दाखविलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजपा हा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कुठल्याही चाचणीत काँग्रेसला पाचच्या वर जागा दाखविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी निकालानंतर पराभवाचे खापर भाजपात कोणाच्या माथी फोडले जाणार, तसेच अपश्रेयाचा धनी ठरविण्यावरून भाजपात होणाऱ्या संभाव्य सुंदोपसुंदीबद्दलची उत्कंठा वाढली आहे.
कडक बंदोबस्तात मतदान;१० फेब्रुवारीला निकाल
सकाळी ८ वाजता संथगतीने मतदानास प्रारंभ झाला होता. परंतु जसजसा सूर्य डोक्यावर येत गेला तसतसा मतदारांमधील उत्साह सुद्धा वाढताना दिसला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. २०१३च्या निवडणुकीत सरासरी ६६ टक्के मतदान झाले होते. २००८ सालच्या ५७.५८ टक्क्यांच्या तुलनेत ते ९ टक्के अधिक होते. या निवडणुकीत सरासरी ६७.१४ टक्के मतदान झाले.

February 08, 2015 in मुख्य पान
तर काँग्रेसचे आमदार फोडेन - दानवे 0

तर काँग्रेसचे आमदार फोडेन – दानवे

download
नाशिक – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या काँग्रेसमध्ये येण्यासंदर्भातील आरोपांना दानवे यांनी नाशिकमध्ये सडेतोड उत्तर दिले. काँग्रेस हे डुबते जहाज असून, डुबत्या जहाजात कोण बसणार असा सवाल करत ठाकरेंनी एकतर भाजपचे आमदार फोडून दाखवावेत अन्यथा मीच काँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असे प्रतिआव्हान दानवेंनी माणिकराव ठाकरेंना दिले आहे.
भाजप सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांची भाजप कार्यालयात पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी दानवे एकवीस आमदार घेवून काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट करणा-या माणिकराव ठाकरेंना प्रतिआव्हान दिले.

February 08, 2015 in महाराष्ट्र
रावसाहेब दानवे काँग्रेसमध्ये येणार होते! माणिकराव ठाकरे 0

रावसाहेब दानवे काँग्रेसमध्ये येणार होते! माणिकराव ठाकरे

images (1)
– नागपूर : रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधानभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ अशा आशयाची टीकात्मक पुस्तिका प्रसिद्ध करून सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका केली. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त, राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार आदी उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विरोधात असताना आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे आता कुणावर गुन्हा दाखल करणार, सरकारच्या संवेदना संपल्या आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.
नागपूर : रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नागपूर : रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधानभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ अशा आशयाची टीकात्मक पुस्तिका प्रसिद्ध करून सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका केली. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त, राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार आदी उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विरोधात असताना आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे आता कुणावर गुन्हा दाखल करणार, सरकारच्या संवेदना संपल्या आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.यांनी विधानभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ अशा आशयाची टीकात्मक पुस्तिका प्रसिद्ध करून सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका केली. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त, राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार आदी उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विरोधात असताना आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे आता कुणावर गुन्हा दाखल करणार, सरकारच्या संवेदना संपल्या आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

 

February 08, 2015 in महाराष्ट्र
पहिल्या दिवशी ‘शामिताभ’ची साडेतीन कोटींची कमाई 0

पहिल्या दिवशी ‘शामिताभ’ची साडेतीन कोटींची कमाई

shamitabh
मुंबई – मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘शामिताभ’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मुंबईत या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मिळून ६० लाख रुपयांची कमाई केली. तर पूर्व पंजाबने या चित्रपटाने ३० लाख आणि म्हैसूरमध्ये या चित्रपटाने ३५ लाख रुपयांची कमाई केली आहे. आठवड्याभरात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवेल असे सांगण्यात येत आहे.
बिग बी अमिताभ बच्चन, तामिळ सुपरस्टार धनुष आणि कमल हसन यांची कन्या अक्षरा यांचा ‘शामिताभ’ हा चित्रपट सहा फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक आर.बल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

February 08, 2015 in मनोरंजन
नितीश कुमार होणार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री 0

नितीश कुमार होणार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री

images
पाटणा – बिहारचे बंडखोर मुख्यमंत्री जीवनराम मांझी यांना दूर करत बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा नितीश कुमार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय जदयूच्या (सं.) विधिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
नितीश कुमार यांची जदयूच्या (सं.) विधिमंडळ पक्ष नेतेपदी शनिवारी निवड झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मांझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री जीवनराम मांझी आणि नितीश कुमार यांच्यात तडजोडीचे प्रयत्न फसले. त्यानंतर बिहारमध्ये शनिवारी मोठय़ा प्रमाणावर राजकीय हालचाली झाल्या. या घटनेनंतर जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी पक्षाची तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. आमदार पाठीशी नसल्याने मांझी यांचे बंड आपोआप थंड झाले.
मुख्यमंत्री जीवनराम मांझी यांना पदावरून दूर करण्याचे पक्षाने ठरवले. त्यानंतर मुख्यमंत्री मांझी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. त्यात त्यांनी बिहार विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत त्याला नितीश कुमार यांच्या २१ समर्थक मंत्र्यांनी कडाडून विरोध केला.
दरम्यान, नितीश कुमार हे लवकरच राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. कुमार यांच्याकडे बहुमत असून गरज असल्यास आमदारांची ओळख परेड करण्यात येईल, असे अर्थमंत्री बीजेंद्र यादव यांनी सांगितले.
आमदारांना संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले की, भाजपाच्याघाणेरडय़ा राजकारणाचे आव्हान मी स्वीकारले आहे. आम्ही आघाडीवर राहून भाजपाचा मुकाबला करणार आहोत. सध्या लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेला पक्ष लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवताना दिसत आहे. आमदारांनी पाटण्यात उपस्थित राहून त्यांच्या विरोधातील खोटय़ा आरोपांचा समर्थपणे तोंड द्यावे, असेही ते म्हणाले.

February 08, 2015 in मुख्य पान
नाटय संमेलनाच्या उद्घाटनाला गोंधळाचे गालबोट 0

नाटय संमेलनाच्या उद्घाटनाला गोंधळाचे गालबोट

2015-02-07~2-09_ns
बेळगाव, दि. ७ – महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आल्याने ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला गोंधळाचे गालबोट लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, निपाणी कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे अशा घोषणा दिल्याने काही काळ गोंधळाच वातावरण निर्माण झाले. त्यामुळे संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोंशीनी व्यासपीठावरून खाली उतरून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तोपर्यंत उद्घाटन सोहळ्याला गालबोट लागलेच
‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळी शरद पवार यांनी भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केले. प्रांतवादानंतरही बेळगावच्या जनतेची मराठीशी नाळ जुळलेली आहे, असेही ते म्हणाले.

February 07, 2015 in मुख्य पान