पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2015

तृणमूल खासदार श्रीन्जॉय बोस यांचा राजीनामा 0

तृणमूल खासदार श्रीन्जॉय बोस यांचा राजीनामा

TMC MP Srinjay Bose appears before CBI
नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसचे खासदार श्रीन्जॉय बोस यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला.
पश्चिम बंगालमधी कोट्यावधींच्या शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी बोस यांना सीबीआयच्या विशेष गुन्हे पथकाने गेल्या वर्षी २१ नोव्हेंबरमध्ये अटक केली होती.
बुधवारीच अलीपोर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बोस यांची जामीनावर सुटका केली. त्यानंतर दुस-याच दिवशी बोस यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

February 05, 2015 in मुख्य पान
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार 0

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार

delhi-assembly-election-2015
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापलेले आहे. सगळ्यांच पक्षांकडूनच आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक द्वंद सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धडाडणा-या या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे.
निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांतील मोठे नेते जोरदार प्रचार करत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जेजे कॉलनी येथे प्रचारसभा होणार आहे तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल मदनापूर खादर आणि सदार बझार येथे सभा घेणार आहेत. तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा रोडशोही होणार आहे.
२०१३ मध्ये ४९ दिवसांचे सरकार चालवल्यानंतर आम आदमी पक्ष पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. तर लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवणारा भाजपा विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीने तयारीत आहे. दिल्लीची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसनेही जोरदार तयारी केली आहे.
येत्या सात फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत आहे. तर १० फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

February 05, 2015 in मुख्य पान
यावर्षी १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका 0

यावर्षी १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका

MNAIMAGE53664elevoting
मुंबई – यंदाच्या वर्षात संपूर्ण राज्यातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी दिली.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसोबत या वर्षात नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका, आठ नगर परिषदांच्या निवडणुका, १३९ नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि १५ पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत तसेच ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूकही होणार आहे.
राज्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या ५० हून अधिक टक्के निवडणुका एक दिवसात होणार असतील तर त्या तालुक्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येतील असेही सहारिया यांनी यावेळी सांगितले.

February 05, 2015 in मुख्य पान
कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अटक 0

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अटक

trupti-malvi
कोल्हापूर – कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक कऱण्यात आली.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एसीबीने त्यांना अटक केली.
३० जानेवारी रोजी माळवी यांना १६ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. शिवाजी पेठेत राहणा-या संतोष पाटील यांची जमीन महापालिकेने ताब्यात घेतली होती. या जागेचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी संबंधित कागदपत्रावर महापौरांची स्वाक्षरी आवश्यक होती.
या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी माळवी यांनी स्वीय सहायकअश्विन गडकरी यांच्या मार्फत चाळीस हजारांची लाच मागितली. अखेर संतोष पाटील सोळा हजार रुपये देण्यास तयार झाले.या प्रकरणी पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता विभागाने सापळा रचून माळवी आणि त्यांचे पीए अश्विन गडकरी यांना ताब्यात घेतले होते.
त्यानंतर दुस-याच दिवशी प्रकृतीच्या कारणास्तव माळवी यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर एसीबीने त्यांना अटक केली.

 

February 05, 2015 in महाराष्ट्र
दिल्लीतून ३२ लाखांची रोकड तर ३४ हजार दारुच्या बाटल्या जप्त 0

दिल्लीतून ३२ लाखांची रोकड तर ३४ हजार दारुच्या बाटल्या जप्त

index1

नवी दिल्ली – दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसा तसेच दारुचा महापूर दिल्लीत आला आहे. निवडणूक आयोगाच्या शोध पथकाने केलेल्या कारवाईत दिल्लीतून ३२ लाख रुपयांची रोकड आणि ३४ हजार दारुच्या बाटल्या जप्त केल्या.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकाने राज्यातून आतापर्यंत ३२ लाख २० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे तर विविध ठिकाणांहून तब्बल ३४ हजार ३२३ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

निवडणुकीदरम्यान होणा-या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकात निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभाग, सेवा कर, पोलीस आणि उत्पादक शुल्क विभागांतील अधिका-यांची नेमणूक केली आहे.

येत्या सात फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभेसाठी मतदान होत आहे. तर १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

 

तैवानमध्ये विमान नदीत कोसळले, २२ ठार 0

तैवानमध्ये विमान नदीत कोसळले, २२ ठार

taiwan-plane-acident

तैपेई– ५३ प्रवाशांना घेऊन जाणारे ट्रान्स एशियाचे प्रवासी विमान बुधवारी सकाळी तैवानची राजधानी तैपेईमधील कीलुंग नदीत कोसळले. या अपघातात २२ जण ठार झाल्याची माहिती तैवानच्या प्रसार माध्यमांनी दिली आहे. तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अद्याप २१ प्रवासी बेपत्ता आहेत.

तैपेईच्या संघसन विमानतळावरुन ट्रान्स एशियाचे एटीआर ७२ हे विमान किनमेन बेटाच्या दिशेने निघाले होते. यावेळी विमान पुलाला धडकले आणि कीलुंग नदीत कोसळले. या दुर्घटनेतील १५ लोकांना आतापर्यंत सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. मात्र इतर २१ प्रवासी तसेच क्रू मेंबर्सबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही, अशी माहिती तैवानच्या सेंट्रल न्यूज एजेन्सीने दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे.

महिन्याभरापूर्वी तैवानच्या ट्रान्स एशिया एटीआर ७२ या विमानालाच अपघात झाला होता. यामध्ये ४८ जण ठार झाले होते तर १० जण जखमी झाले होते.

 

February 04, 2015 in मुख्य पान

अल-कायद्याच्या दोन जिहादींना जॉर्डनमध्ये फाशी

अम्मन, जॉर्डन – जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळल्याचा व्हिडीओ इसिसने प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी अल-कायद्याच्या दोन जिहादी कैद्यांना फाशी दिल्याची माहिती जॉर्डनच्या सरकारी प्रवक्त्यांनी दिली आहे.

जॉर्डनच्या ताब्यात असलेल्या साजिदा –अल-रिश्वी आणि झैद-अल-कर्बोली या दोन जिहादींना बुधवारी सकाळी फाशी देण्यात आल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले. २००५ मध्ये झालेल्या अम्मन येथील तीन हॉटेल्समध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी रिश्वीला जॉर्डन सरकारने ताब्यात घेतले होते.

गेल्या वर्षी २६ डिसेंबरमध्ये जॉर्डनचा वैमानिक मोएथ-अल-कसाबेहच्या विमानाला पूर्व सिरियाच्या भागात अपघात झाला होता. त्यानंतर इसिसने मोएथला बंदी बनवले होते. या वैमानिकाला पिंज-यात ठेवून जिवंत जाळण्यात आल्याचा व्हिडीओ मंगळवारी इसिसकडून प्रसारित करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये वैमानिक केशरी रंगाचे कपडे घालून पिंज-यात बंद असलेला दिसत आहे आणि पिंज-याच्या चारही बाजूंनी आग लावण्यात आली आहे. २२ मिनिटांचा हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून प्रसारित कऱण्यात आला आहे.

इसिसने वैमानिकाची निघृणपणे हत्या केल्यानंतर जॉर्डन सरकारने अल-कायद्याच्या दोन जिहादींना फासावर लटकवले आहे. इसिसचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर काही तासांमध्येच जॉर्डनने इसिसच्या दोन जिहादींना फाशी देत इसिसला जशास तसे उत्तर दिले आहे.

 

 भरधाव बस झाडावर आदळली, ११ प्रवासी जखमी 0

भरधाव बस झाडावर आदळली, ११ प्रवासी जखमी

IMG-20150203-WA0058
दिग्रस , दि. ३  – भरधाव बस बाभळीच्या झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाल्याची घटना २ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० वाजता दरम्यान हरसूल फाट्यानजीक घडली.
लातूर डेपोची बस एम.एच २०/ बिएल २९५३ नागपूरकडून परळीकडे जात असतांना दिग्रस तालुक्यातील हरसुल फाट्याजवळ अपघात झाला.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नागमोडी वळण असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. बसमधील ११ प्रवाशी जखमी झाले त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये सोमसिंग उमला पवार रा. सिंगद (४५), युनुस महमद गोंडील रा.दिग्रस (५५), विजय अंबादास इंगळे रा.पुसद, अ.रहेमान शे.इब्राहीम दिग्रस चाँदनगर (५५), सूरज सोपानराव दराडे रा. परळी वैजनाथ (३२), गणेश अविनाश तंवर रा.हिवळणी (३०), अमर देवराव वरारकर रा.पालम (३८), कोमल प्रताप चव्हाण रा.कळसा (४५), सुधाकर श्रीराम कांबळे रा.धुंदी उमरखेड (५४), राजेश क्रिष्णा राठोड रा.धुंदी (४३), उदल स्वरूपचंद पडवाळ रा. सेवानगर (४५) यांचा समावेश आहे. जखमींना उपचाराकरीता दिग्रस ग्रामिण रूग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले होते प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांची जिल्हा रूग्णालयात रवानगी केली. या प्रकरणी दिग्रस पोलीसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

February 03, 2015 in विदर्भ
फेसबुकवर धार्मिक भावना भडकवणारे लिखाण, आर्णी कडकडीत बंद 0

फेसबुकवर धार्मिक भावना भडकवणारे लिखाण, आर्णी कडकडीत बंद

20150203_113348IMG_20150203_111031
आर्णी, दि. ३  – सोशल नेटवर्कवर धार्मिक भावना भडकवणारे लिखाण केल्याची घटना रात्री उघडकीस आल्यानंतर आर्णी कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको करण्यासाठी नागपूर-तुळजापूर महामार्गावर टायर जाळले.
सागर रवींद्र आक्केवार (२३) रा.आर्णी मित्राच्या मोबाईलवर फेसबुक अकाऊंट ओपन केले असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सागर आक्केवार याने आर्णी पोलीसात तक्रार दिली. त्यावरून हसमेन आलम याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. आज सकाळी या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण शहर कडकडीत बंद करण्यात आले. आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी निलेश गांवडे, अश्विन बोमंपिलेवार, प्रमोद कांगे, तुफान जाधव, भारत चांदेकर, उध्दव वानखडे, पवन येरावार, निलेश इंगोले यादी कार्यकर्ते उपस्थित होते. एसटी बस स्थानकासमोर टायर जाळून पाच मिनिट रास्ता रोको केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आर्णी वासीयांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार गायकवाड यांनी केले.

February 03, 2015 in विदर्भ
वाचन मेंदुची भुख भागविण्याचे काम करते - आ.मदन येरावार 0

वाचन मेंदुची भुख भागविण्याचे काम करते – आ.मदन येरावार

Granth Utsav logo
तीन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचा समारोप
यवतमाळ, दि.3 : मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी साहित्य दुरपर्यंत पोहोचले आहे. हे साहित्य   संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच मानवाच्या मेंदुची भुख भागविण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन आ.मदन येरावार यांनी केले.
नगर भवन येथे आयोजित तीन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर्णी येथील जेष्ठ साहित्यिक कवी प्रा.कलीम खान, जेष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्रा.डॉ.आशा देशमुख, कवी योगानंद टेंभुर्णे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने उपस्थित होते. वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाचकांना वाचनाची सवय लावण्यासोबतच त्यांना चांगले आणि दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवासारखे कार्यक्रम उपयोगी ठरणार आहे. ग्रंथ माणसाची दृष्टी व्यापक करते. मानवी मेंदुची भुख भागविण्यासोबतच ग्रंथ गुरुची भुमिका निभावत असते. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथ वाचनाची सवय लावावी, असे आ.येरावार यांनी सांगितले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा.कलीम खान यांनी ग्रंथ माणसाच्या जिवनातील आवश्यक बाब असल्याचे सांगितले. पुर्वी इलेक्ट्रानिक प्रसिध्दी माध्यमांचा भडीमार झाल्याने वर्तमानपत्र बंद होतील, अशी भाकीते केली जात होती. उलट वर्तमानपत्रे वाढीस लागली. त्याचप्रमाणे संगणकाच्या युगात कोणतीही माहिती तातडीने उपलब्ध होवू शकत असली तरी पुस्तकांचेही महत्व कधीही कमी होणारे नाही, असे कलीम खान म्हणाले. यावेळी शिक्षणाधिकारी वंजारी व कवी योगानंद टेंभुर्णे यांच्यासह अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास कवी, साहित्यिक, लेखक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

February 03, 2015 in विदर्भ
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचा दिल्लीत गौरव 0

जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचा दिल्लीत गौरव

Maharashtra Group (1)
यवतमाळ, दि.3 : मागेल त्याला हक्काने काम देणा-या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना केंद्र शासनाच्यावतीने गौरविण्यात आले. नरेगाचा दहावा वर्धापन दिन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात साजरा करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना अमरावती येथे केलेल्या कामासाठी त्यांच्या सहकाराऱ्यांसह पुरस्कार देऊन सन्मानित केल्या गेले.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री बिरेंद्र सिंग, राज्यमंत्री सुदर्शन भगत, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव, पंचायतराज राज्यमंत्री निहालचंद या केंद्रीय मंत्र्यांसह देशातील विविध राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील ग्रामविकास मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सभापती, सरपंच, मनरेगामध्ये काम करणारे मजूर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राज्यातून 80 प्रतिनिधी सहभागी झाले होते. अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहूल चिखलदरा तालुक्यात जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी उत्तमप्रकारे मनरेगा योजना राबविली होती. त्यांच्या कल्पतेनेच हजारे आदिवासी बांधवांपर्यत योजना पोहोचविण्यासोबतच त्यांना योजनेचा लाभ घेता आला. अमरावती जिल्ह्यात सिचंन क्षेत्र कमी आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. हे थांबविण्याकरिता श्री.महिवाल यांनी अमरावती जिल्ह्यात त्रिस्तरीय योजना राबविली होती. गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला. यामुळे मनरेगाच्या कामांना गती मिळाली. फलोत्पादन, जलसंधारण, वृक्षारोपण या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यात प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून अमरावती जिल्ह्याच्या गेल्या दोन वर्षात मानव विकास निर्देशांकही वाढला आहे. तसेच स्थलांतर मोठया प्रमाणात कमी झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्यासह योजनेच्या लाभाची रक्कम पारदर्शीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे शाखा पोस्ट मास्टर गोकुल शंकर अलोकार यांनाही केंद्रीय सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी महिवाल यांच्या कौतूक होत आहे.

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त 0

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त

download
नवी दिल्ली दि. ३ –  पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी झाले आहेत. पेट्रोल प्रतिलिटर २.४२ रुपये आणि डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाल्याचा फायदा सत्ताधारी भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, असं बोललं जातंय.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ४५ अमेरिकी डॉलरने घसरलेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी कपात होईल, असा अंदाज आधीच लावण्यात आला होता. गेल्या जूनपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरूच आहे.

अरुण गवळीच्या भेटीमुळे अर्जुन रामपालला समन्स 0

अरुण गवळीच्या भेटीमुळे अर्जुन रामपालला समन्स

daddy
मुंबइ, दि. ३ – परवानगीशिवाय अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची भेट घेतल्यामुळे अभिनेता अर्जुन रामपाल अडचणीत सापडला असून याप्रकरणी पोलिसांनी त्याला समन्स बजावला आहे. एका चित्रपटात अरूण गवीची भूमिका करणा-या अर्जुनने मागच्या महिन्यात जे. जे. रुग्णालयात गवळीची भेट घेतली होती. सुमारे तासभर तो गवळीसोबत होता.  मात्र या भेटीसाठी त्याने पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती.
नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून रुटीन चेकअपसाठी त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते, तेवहा अर्जुन रामपालने त्याची भेट घेतली. दरम्यान गवळीला रुग्णालयात घेऊन जाणा-या पोलिस पथकाचीही अतंर्गत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

बाटलीबंद पाण्यामुळे कॅन्सरचा धोका 0

बाटलीबंद पाण्यामुळे कॅन्सरचा धोका

mineral-water-330x185
मुंबई दि. ३ – तुम्ही ‘मिनरल वॉटर’ पीत असाल तर सावधान! कारण जे पाणी तुम्ही ‘आरोग्यवर्धक’ समजता, त्याच पाण्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती ‘भाभा रिसर्च सेंटर’ने नुकत्याच केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.
परिणामी हे पाणी ‘पाणी न ठरता विष’ ठरणार असल्याने या पाण्यावर बंदी आणावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी केली आहे. मुंबईकरांसह सर्वानाच आता या पाण्याची सवय लागल्याने १० ते १५ रुपये अशा चढय़ा दरात हे पाणी विकले जात आहे. हे पाणी बाटलीबंद करून विकले जात असल्याने या पाण्यात प्लास्टिकमधील ब्रोनेट, क्लोराइड इत्यादी रसायनांचा अंश असतो.
या रसायनांमुळे कॅन्सरसारखा आजार उद्भवू शकतो. याशिवाय किडनीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता ‘भाभा रिसर्च सेंटर’ने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. त्यामुळे या पाण्यावर बंदी आणावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भमरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
दरम्यान, बाटलीबंद पाणी प्यायल्यानंतर या बाटल्या कुठेही फेकल्या जातात. प्लास्टिक नष्ट होत नसल्यामुळे घातक कचरा तयार होतो. प्लास्टिकच्या बाटल्या नष्ट होण्यास ७०० वर्षापेक्षाही अधिक काळ लागत असल्याचेही ‘भाभा रिसर्च सेंटर’च्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या विक्रीवर मुंबईत कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी परमिंदर भमरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापौरांकडे केली आहे. याबाबत राज्य सरकारकडूनही योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केला जावा, असे त्यांनी म्हटले आहे.
बाटलीबंद पाणी महिलांसाठी अतिशय घातक!
बाटलीबंद पाणी महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे. गर्भाशयाजवळ होणारी फायब्रॉईडची गाठ अशाच पाण्याच्या सेवनामुळे होत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांचे मत आहे. ८० ते ९० टक्के महिला फायब्रॉईडच्या गाठीमुळे त्रस्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 धानोरा (खु.)दहा लाखाची धाडसी चोरी 0

धानोरा (खु.)दहा लाखाची धाडसी चोरी

images
दिग्रस, दि. २ – घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दहा लाखाची धाडसी चोरी केल्याची घटना तालुक्यातील धानोरा (खु) येथे घडली. शेषराव रामचंद्र राठोड यांच्या घरी ही चोरी झाली. भरदुपारी १२ वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दुपारदरम्यान शेषराव राठोड यांच्या घरी कुणीही नव्हते. नेमकी हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून अंदाजे तीन ते चार लाखाची रोकड, सोने, चांदीचा ऐवज असा एकूण दहा लाखाचा मुद्देमाल लंपास केला. दुपारी १२.३० वाजता राठोड शेतातून घरी आले असता घरी चोरी झाल्याची घटना त्यांच्या लक्षात आली. यामुळे त्यांचे अवसानच गळून पडले. या घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्तलिहेस्तोवर याप्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता. ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

February 02, 2015 in विदर्भ
 पॉकीटमार महिलांची टोळी गजाआड 0

पॉकीटमार महिलांची टोळी गजाआड

images (1)
नेर, दि. २ – बसस्थानकावरील प्रवाशांचे पॉकीट उडविणाºया घटनांमध्ये वाढ झाली आहे. येथील बसस्थानकावर चोरी करण्याच्या बेतात असलेल्या पाकीटमार टोळीतील पाच महिलांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.
पद्मा राहुल हांडे (४०), सुनीता सुनील लोंडे (३०), सुनीता कन्ना नाडे (४०), चंदा प्रविण हातागडे (२३), शिला अनील हातागडे (२२) सर्व रा. झोपडपट्टी नागपूर अशी आरोपी महिलांची नावे आहे. नेरसह यवतमाळ येथील बस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊ न प्रवाशी महिलेचे पर्समधून दागिणे व रोख लंपास केल्याच्या घटना घडल्या आहे. तसेच पुरुषांच्या खिशातील पॉकीट उडविले आहे. दोन दिवसापूर्वी यवतमाळ येथून नेर येथे बसमध्ये प्रवास करणाºया प्रतिभा गणेश जयसिंगपूर (३०) या महिलेचे १० ग्रॅम सोने व पाचशे रुपये रोख उडविले होते. याप्रकरणी यवतमाळ येथील वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आज जयसिंगपूरे ही महिला बसस्थानावर गेल्या होत्या. अशातच बसमध्ये लक्ष ठेऊन असलेल्या काही महिला दिसताच त्याच्यावर लक्ष ठेवले. त्यानंतर त्या चोरी करण्याच्या प्रयत्नात असतानाच पाचही महिला चोरट्यास पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यानंतर नेर पोलिसांनी पाचही महिला आरोपींना वडगाव रोड पोलिसांना पाचारण करून त्याच्या ताब्यात दिले. या महिलांकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

 

February 02, 2015 in विदर्भ
सरकारकडून शेतकºयांची फसवणूक - अ‍ॅड. शिवाजीराव मोघे 0

सरकारकडून शेतकºयांची फसवणूक – अ‍ॅड. शिवाजीराव मोघे

download

यवतमाळ, दि. २ – दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकºयांची सरकार फसवणूक करीत असल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आज सोमवारी विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुष्काळी मदतीवर लादण्यात आलेल्या अटी व नियम अन्यायकारक असून, शेतकºयांना हेक्टरी सरसकट मदत द्यावी अशी मागणी यावेळी मोघे यांनी केली.
यंदा पावसाने दगा दिल्याने व गेल्या दोनवर्षात निसर्गाचा प्रकोप झाल्याने शेतकरी मरणासन्न झाला आहे. शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबित असताना, भाजप – शिवसेना युती सरकारने जाहीर केलेले पॅकेज ४० टक्के शेतकºयांवर अन्याय करणारे आहे. मदत वाटपाला दोन हेक्टरची मर्यादा घालण्यात आली असून, दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकºयाला एक हेक्टरचीच मदत देण्यात येत आहे. त्यामुळे याचा लाभ ६० टक्केच शेतकºयांना होत असून ४० टक्के शेतकरी मदतीला मुकल्या गेले आहे. नवीन भुसंपादनाचा कायदा देखील जाचक असून, काँग्रेसच्या काळात शेतकºयाच्या संमतीनंतरच जमीन संपादीत केली जात होती. तसेच बाजारभावापेक्षा चारपट दर रक्कम शेतकºयाला दिली जात होती. त्यानंतर अपीलमध्ये जाण्याचीही शेतकºयाला मुभा होती. मात्र सत्ताधारी सरकारने हे नियम रद्द केले असून, जमीनीचे दर शासनच ठरविणार असल्याने शेतकºयांचे नुकसान होणार असल्याचे अ‍ॅड . मोघे यांनी सांगितले. विदर्भात सिंचनाचा मोठ्या प्रमाणात असून, सध्या विदर्भाचे मुख्यमंत्री असल्याने हा अनूशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. जिल्’ातील शेतकºयांना आत्महत्येच्या खायीतून बाहेर काढण्यासाठी यवतमाळ जिल्हा विकास मंच मिशनची स्थापना करण्यात आली आहे. शेतीला पुरक जोडधंदा आवश्यक असून, त्यासाठी शेतकºयांमध्ये जनजागृती व मार्गदर्शनाचे काम विकास मंच करणार असल्याचे मोघे यांनी सांगितले.

February 02, 2015 in विदर्भ
...अन् ४० वर्षानंतर मिळाले वडीलांचे नाव, अखेर मुरलीधरचा झाला ‘विकास’ 0

…अन् ४० वर्षानंतर मिळाले वडीलांचे नाव, अखेर मुरलीधरचा झाला ‘विकास’

2014-09-21~courtorder_ns
दिग्रस,दि. २ (किशोर कांबळे ) – खेळण्याबागळण्याच्या दिवसात आईने दुसरे लग्न केल्यानंतर आपल्या मुलाला सोबत घेऊन जाते. आईसोबतच मुलाचे नावही तेथे बदलविण्यात येते. तब्बल ३९ वर्ष झाल्यानंतर त्याला एक दिवस आपल्या खºया वडीलाचे नाव माहित झाले. त्यानंतर आपल्या नावासमोर वडीलांचे नाव लागावे म्हणून दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायालयाने सदर व्यक्तीला त्याच्या खºया वडीलाचे नाव द्यावे असा निर्वाळा दिल्याने अखेर मुरलीचा ‘विकास’ होऊन त्याला ४० वर्षाने वडीलाचे नाव मिळाले. मुरलीधर थावरा पवार रा. सेवानगर या इसमाला आता वडील नरसिंग चव्हाण यांचे नाव मिळाले.
मुरलीधरची आई कौसल्याबाई या महिलेचे दोन विवाह झाले होते. पहिल्या पतीचे नाव नरसिंग मोहनसिंग चव्हाण तर थावरा पवार असे दुसºया पतीचे नाव आहे. या महिलेचे थावरा पवार याच्यासोबत वास्तव्य करीत आहे. मुरलीधर हा एक वर्षाचा असताना त्याच्या आईने दुसरे लग्न करून त्यालाही सोबत नेले होते. दरम्यान शाळेत नाव टाकतांना मुरलीधरचे वडील म्हणून थावरा पवार यांच्या नावाची नोंद करण्यात आली. दरम्यान १४ जानेवारी २०१४ रोजी तिळसंक्रांतीच्या दिवशी क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने थावरा याने तू माझा मुलगा नसल्याचे मुरलीधरला म्हटले. त्यावर मग माझा बाप कोण या बाबतच विचारणा केली असता नरसिंग मोहनसिंग चव्हाण रा. रोहडा ता. पुसद हा असल्याचे सांगितले. त्यावरून मुरलीधर पवार याने दिग्रस येथील दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल करून माझे खरे वडील नरसिंग चव्हाण यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. दिवाणी न्यायाधिश (कनिष्ट स्तर) एन.के. वाळके यांच्या न्यायालयात याप्रकरणातील दोन्ही पक्षाची बाजू ऐकूण घेतली. यामध्ये मुरलीधर हा नरसिंग चव्हाण व कौसल्याबाई यांचा मुलगा असून त्याचे जन्मनाव विकास असल्याचे उघड झाले. त्यावरून न्यायालयाने मुरलीधर याचे नाव विकास नरसिंग चव्हाण असल्याचे जाहिर केले. या निकालाने मुरलीधर (विकास) याला ४० वर्षानंतर खºया वडीलाचे नाव मिळाले आहे. मुरलीधरच्या बाजूने अ‍ॅड. गिरीष दळवी यांनी काम पाहिले. (साभार दै. पुण्य नगरी)

February 02, 2015 in मुख्य पान
 मावस बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न 0

मावस बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न

download (1)
औरंगाबाद -एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला दारू पाजवून मावसभावाने बलात्काराचा प्रयत्न केला. बीडबायपास परिसरातील निर्जन ठिकाणाहून या मुलीने प्रसंगावधान राखत त्याच्या डोळ्यात माती फेकून पळ काढला. या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या तिच्या सख्या भावाला मारहाण करण्यात आली. मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर पालकांनी मुलीसह गुन्हे शाखेत धाव घेतल्यानंतर मावसभाऊ, त्याची पत्नी व आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुंदवाडी परिसरातील एक सोळा वर्षांची मुलगी लहान असल्यापासून मावशीकडे राहते. मावसभाऊ राम सूर्यभान काळे (वय ३२) याने गुरुवारी रात्री तिला हॉटेलातून भाजी आणण्याचा बहाणा करून दुचाकीवरून घराबाहेर नेले. एका ठिकाणाहून दारूच्या दोन बाटल्या खरेदी करून तिला बीडबायपासवरील निर्जन कलर फॅक्टरीत नेले. येथे स्वतः दारू पिली, तिलाही दारू पिण्याची बळजबरी केली. तिने नकार दिल्यानंतर बलात्काराचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रसंगावधान राखत त्याच्या डोळ्यात माती फेकून पळ काढला. तिने मुकुंदवाडीतील आईच्या घरी येऊन घडलेली घटना सांगितली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या भावाला राम काळे, त्याची पत्नी राधा व आई पद्माबाई यांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

February 02, 2015 in महाराष्ट्र
बेदींच्या कारभाराला कंटाळून प्रचारप्रमुखाचा राजीनामा 0

बेदींच्या कारभाराला कंटाळून प्रचारप्रमुखाचा राजीनामा

default
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या पाच दिवसांवर आली असताना, दिल्ली भाजपामधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. दिल्लीच्या भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कारभाराला कंटाळून त्यांचे प्रचार प्रमुख नरेंद्र टंडन यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला.
किरण बेदी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीशी आपण जुळवून घेऊ शकत नाही. बेदी आणि त्यांचे सहकारी आपला अपमान करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे कठिण आहे असे नरेंद्र टंडन यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
नरेंद्र टंडन हे अनिल जैन यांच्या अध्यक्षतेखालील प्रचारसमितीमध्ये होते. बेदी यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांच्या प्रचाराच्या व्यवस्थापनाची अतिरिक्त जबाबदारी टंडन यांच्याकडे सोपवण्यात आली होती असे भाजपामधील सूत्रांनी सांगितले.
टंडन यांच्या राजीनाम्याचा पक्षाच्या निवडणूक तयारीवर कुठलाही परिणाम होणार नाही तसेच त्यांची कामगिरी फारशी प्रभावी नव्हती अशी सारवासारव भाजपाने केली आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा भाजपामधील अंतर्गत अस्वस्थता समोर आली आहे. किरण बेदी यांच्या भाजपा प्रवेशानंतर चार दिवसातच त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवल्याने भाजपामध्ये आधीपासूनच नाराजी आहे.

 

February 02, 2015 in मुख्य पान