पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2015

दिल्लीत पाच वाजेपर्यंत ६३ टक्के मतदान 0

दिल्लीत पाच वाजेपर्यंत ६३ टक्के मतदान

Voting in Delhi
नवी दिल्ली – नव्या सरकारच्या निवडीसाठी दिल्लीमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दिल्लीकर उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. मतदानासाठी विविध मतदान केंद्राबाहेर नागरीकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
संध्याकाळी पाचवाजेपर्यंत सरासरी ६३.४६ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत सहा मतदान यंत्रे बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६६.३७ टक्के मतदान झाले असून, दक्षिण दिल्लीत त्या तुलनेने कमी ६१.७ टक्के मतदान झाले आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. सकाळीच दिल्लीतील राजकीय नेत्यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, आम आदमी पक्षाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी सकाळी लवकर मतदानाचे कर्तव्य बजावले. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहनही केले.
नेत्यांचे मतदान
दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी एकूण ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज दिल्लीकर मतदानाद्वारे ठरवणार आहेत. उत्तर दिल्लीतील बुरारी मतदारसंघातून सर्वाधिक १८ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत तर दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर मतदारसंघातून सर्वात कमी चार उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यभरात एकूण १२ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ७१४ संवेदनशील मतदान केंद्रे असून त्यामधील १९१ ही अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
दिल्लीतील १.३३ कोटी मतदारांना आज मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये ७३ लाख ८९ हजार ०८९ पुरुष मतदार तर ५९ लाख १९ हजार १२७ महिला मतदार आहेत. यासोबतच ८६२ तृतीयपंथी मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या दोन लाख २७ हजार ३१६ इतकी आहे. तर ३११ मतदार हे १००हून अधिक वयाचे आहेत. दिल्लीतील मातिया महाल मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख ४७ हजार २४५ मतदार आहेत. तर चांदनी चौक येथे एक लाख १३ हजार ७७७ मतदार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चहावाला
संपूर्ण मतदाप्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६५ हजार पोलीस कर्मचा-यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तर मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने ९५ हजार निवडणूक अधिका-यांना कामाला लावले आहे.
१६ वर्षे दिल्लीतील सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपासमोर यंदाच्या निवडणुकीत आपचे भलेमोठे आव्हान आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील सदस्य राहिलेल्या किरण बेदी यांना भाजपाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे केजरीवाल विरुद्ध बेदी असे दिल्लीतील निवडणुकीचे चित्र आहे.

February 07, 2015 in मुख्य पान
बस-अ‍ॅटोमध्ये अपघात; ४ जण गंभीर 0

बस-अ‍ॅटोमध्ये अपघात; ४ जण गंभीर

IMG-20150207-WA0051_resized IMG-20150207-WA0049_resized
कळंब, दि. ७ – भरधाव अ‍ॅटो बसमध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान राळेगाव मार्गावर असलेल्या जिनिंगनजीक घडली.
सय्यद तनवीर खान (२५) रा. कात्री, दिनेश खंडाते (२०),बंटी अशोक तलमले(२५), विलास रमेश तेवतळे (२२) रा. कळंब अशी गंभीर जखमींची नावे आहे. यवतमाळमार्गे बस राळेगावकडे जात असताना अ‍ॅटोक्रमांक एम.एच. २९ व्ही/ ९५५८ बस क्रमांक एम.एच. ४० एन/ ८१७५ मध्ये शिरला. अ‍ॅटो चालक सय्यद तनवीर खान याने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सदर अपघात झाला. जखमींना तत्काळ यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

February 07, 2015 in विदर्भ
आयकरकडून दुसºया दिवशीही पुसदमध्ये सर्च 0

आयकरकडून दुसºया दिवशीही पुसदमध्ये सर्च

download (2)IMG-20150207-WA0039_resized
यवतमाळ, दि. ७ – पुसद शहरात आज दुसºया दिवशीही यवतमाळ व वर्धा येथील पथकाने सर्च मोहीम राबविली. यामध्ये ग्यानचंदाणी यांच्या दोन दुकानातून संशयास्पद असलेले कागदपत्र जप्त केले आहे. याकारवाईमुळे व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.
नागपूर उपआयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ व वर्धा येथील पंधरा अधिकारी व कर्मचाºयांचा फौजफाटा गुरुवारपासून पुसद शहरातील दाखल झाला होता. त्यांनी पुसद येथील सुभाष चौक येथील ओंकार कलेक्शनचे रवि ग्यानचंदाणी आणि डॉ. आंबेडकर चौकातील वंदना ड्रेसेसचे विजय ग्यानवचंदाणी यांच्याकडे सर्च करून बिले, कागदपत्राची तपासणी केली. पुसद येथील सुभाष चौक येथील ओंकार कलेक्शनचे रवि ग्यानचंदाणी आणि डॉ. आंबेडकर चौकातील वंदना ड्रेसेसचे विजय ग्यानवचंदाणी यांच्याकडे सर्च करून बिले, कागदपत्राची तपासणी केली. आज तीसºया दिवशीही या पथकाकडून सर्च मोहीम सुरूच होती. यामध्ये या दुकानातून संशयास्पद असलेले कागदपत्रे, बिल व अन्य साहित्य जप्त करून चौकशीसाठी नेले आहे. सायंकाळी हे पथक पुसद येथून परत गेल्यानंतर येथील व्यावसायीकांनी सुटकेचा श्वास सोडला.

 

February 07, 2015 in महाराष्ट्र

पार्डी सावळापूर येथील स्वयंसहायता समूहांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

कळंब- तालुक्यातील पार्डी (सावळापूर) येथील १५ महिला स्वयंसहायता सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोठा तर्फे बँक कर्ज मंजुरी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कळंब व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोठा यांच्या संयुक्त विद्यमानाने कोठा क्लस्टर मधील पार्डी (सावळापूर) या गावातील १५ स्वयंसहायता समूहांना १२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. महिलांना दिल्या गेलेल्या या कर्जामुळे त्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरु झालेली आहे, गावातील महिलांना आता गावातच रोजगार व उद्योगधंदे निर्माण करता येणार आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी आपल्या संसाराचा गाडा सुरळीतपणे हाकण्यासाठीचा यशस्वी प्रयन्त सुरु केलेला आहे. या अगोदर स्वयंसहायता समूहाला कर्ज मिळविण्यात खूप कष्ट सहन करावे लागत होते, परंतु आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कळंब येथील तालुका व्यवस्थापक उमेश शिंदे यांनी कर्जाचा योग्य विनियोग याबाबतचे शिबीर घेऊन त्यांना सक्षम करण्याचे चांगले काम केलेले आहे तसेच त्यांनी बँक व्यवस्थापक गोखले व वडनेरकर यांना वेळोवेळी समूहाच्या बैठकीला बोलावून महिलांच्या समूहातील कार्यप्रणालीची माहिती दिली त्यामुळे त्यांनी पार्डी येथील १५ स्वयंसहायता समूहांना १२ लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कळंब व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोठा यांच्या संयुक्त विद्यमानाने कोठा क्लस्टर मधील पार्डी (सावळापूर) या गावातील पंधरा स्वयंसहायता समूहांना बँक मेळावा घेऊन कर्जाचे वितरण करण्यात आले. मेळाव्याला अमोल देवलसी जिल्हा अभियान व्यवस्थापक, भूपेंद्र बाहेकर विस्तार अधिकारी व स्वयंसहायता समूहाच्या १५० महिला उपस्थित होत्या. या मेळाव्यासाठी उमेश शिंदे तालुका व्यवस्थापक, प्रतिभा बावनकर तालुका व्यवस्थापक, श्रीनिवास एसमपेल्ली पीआरपी, अर्चना भोयर, प्रीती कांबळे, लताताई गावंडे यांनी अभियानातर्फे व गोखले ,वडनेरकर यांनी बॅंकेतर्फे परिश्रम घेतले.

 

February 07, 2015 in विदर्भ
अश्रृंना जर पंख जरासे लावून घेता आले असते....! 0

अश्रृंना जर पंख जरासे लावून घेता आले असते….!

Shankar Bade
यवतमाळ – ग्रंथोत्सवाच्या आमराईत गेल्या गेल्या पाडाचा आंबा अलगद समोर पडावा अन् त्या आनंदानं हिरकलेल्या वाचकांचं रसिकत्व कंच्च मोहरून यावं अगदी तसीचं यवतमाळकरांच्या कायम आठवणीत रहावी अशी भेट ग्रंथोत्सवातील काव्योत्सवात चिंब भिजलेल्या शब्दांनी रसिकांना दिली.
वऱ्हाडी साहित्याचे भूषण कविवर्य शंकर बडे यांच्या नर्मविनोदी निवेदनाने रंगात आलेल्या आणि वऱ्हाडी साहित्याचे हेडमास्तर डॉ.विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवितेच्या दरबारात दोन पिढ्यांची कहानी सांगणारा हृदयस्पर्शी कवितांचा पाझर ओसंडून वाहिला. आयुष्यातील तरल नात्यांची मांडामांड करणाऱ्या शब्दांची मुक्त उधळण झाली. ‘माय’, ‘बाप’, ‘मुलगी’, ‘गुरुजी’, असे नात्यांचे पदरांना स्पर्श करीत जीवनातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या उबदार रचनांनी श्रोत्यांना अक्षरश: रिझवले. गजल, लावणी, विडंबन उपरोधाच्या श्रृंगाराने भारलेली काव्य मैफल अस्सल वऱ्हाडी मातीच्या सुगंधाचे वाण देणारी ठरली.
आभाय भलतं जोरात होतं
जल्माची माही तहान होती
कालचा दिसं कुवारा होता
कालची रातं जवान होती
तरुणाईच्या काळजाला हात घालणाऱ्या डॉ.विठ्ठल वाघ यांच्या या तारुण्यसुलभ अदाकारीने घायाळ प्रेक्षकांना शंकर बढेंच्या कारुण्याने ओथंबलेल्या ‘माय’ कवितेने भानावर आणले. डोळ्यात अश्रूंची गर्दी खेचणारी त्यांची ‘माय’ सर्वांनाच चटका लावून गेली. काळजात घर करून गेली-माय कायजात वस्ती करून माय असते कासरे धरून येसन कवा खेचली नाही पुराणी कवा टोचली नाही
तिचं तंतर तिचं जाणे
डोयात तिच्या आभायाचे गाणे !
‘माय’ ची थोरवीचे आभाय रिते होत असताना अश्रूंचे ओघळ पुसणारी गजल चांदूर बाजार येथील कवि नितिन देशमुख यांनी सादर केली. जगण्याचे वास्तव चिमटीत पकडणारे त्यांचे शब्द हृदयाला पाझर फोडणारे ठरले.
अश्रृंना जर पंख जरासे लावून घेता आले असते
या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते
मराठी गजलेतील नव्या पिढीचा श्वास असणाऱ्या नितिन देशमुखांनी माणुसकीला उंचीवर नेणाऱ्या रचनांची
बरसात केली. अश्रूंची फुले होत असतांना प्र.के.अत्रेच्या ‘झेंडूच्या फुलांची’ खमंग मेजवानी देणारा प्रत्यय माजलगांव (जि.बिड) चे दमदार कवी प्रभाकर साळेगावकर यांनी दिला. त्यांच्या विडंबन काव्याने राजकारणाचा ‘असली’ चेहरा चव्हाट्यावर मांडला. पिंजलेल्या जनतेच्या दु:खाची ‘गोम’ सांगणारे त्यांचे घडी-घडी सवईनं तुम्हा दिली महागाई
भरतीचा उघडला पिंजरा पोरापायी असेचं वाढो प्रेम आपुले, सुखात नांदो दलाल आम्हावर श्रेष्ठींची मर्जी बहाल!
आपल्या कवितेतून त्यांनी उपहासगर्भ चिंतन अचुकपणे प्रस्तुत केलं. तर ‘वाटोळा’ या शब्दाचा अर्थ
शाळेत शिकता आला असता तर ? हा मार्मिक प्रश्न नागठाणे (जि.सांगली) येथून आलेले कवी रमजान
मुल्ला यांनी उपस्थित केला.
लहाणपणी गुरुजी शिकवायचे
एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोळा
पैकी शिकविला नाही कधीचं गुरुजींनी
‘वाटोळा’ या शब्दाचा अन्वयार्थ !
रमजान मुल्ला यांनी पुढे शब्दांना सुरांचा बाज चढवित मैफलीत अनोखा रंग भरला. त्यांनी सादर केलेली ‘आई’, ‘मुलगी’ भावस्पर्शी नात्यांची वीण गुंफणारी होती. कवितेच्या खोलात जाऊन प्रभाकर साळेगावकरांनी परत शोषणाचा संदर्भ उलगडला.
‘मुळं भूगर्भातील रसाचं शोषण करतात
आपल्यातल्या शोषण या शब्दांचे संदर्भ बदलू
कारण त्यांना आभाळाला पाझर फोडायचा असतो
व मातीशी इमान राखायचं असतं
वऱ्हाडी मातीची महत्ती सांगणाऱ्या कसदार कवितांनी काव्य मैफलीला आगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. रसिकांच्या काळजात घर बांधणाऱ्या या मैफलीच्या निमित्ताने मात्र मिराताई ठाकरे यांच्या शब्दांची आठवण पुन्हा एकदा टवटवीत झाली असा वऱ्हाडी वऱ्हाडी वऱ्हाडी माणूस इया, कुदय, पावडं त्यांच्या जिन्गानीचा साज हेडमास्तर ‘वाघ’ आणि ‘मास्टर’ बढे यांची शाब्दीक जुगल बंदीचे दुधात साखर घालणारी होती. मातीशी इमान राखणारी ही काव्यमैफल कविवर्य शंकर बढे यांच्या संचलनाच्या तडक्याने विशेष उल्लेखनीय ठरली. यवतमाळ ग्रंथोत्सतव आयोजन समितीच्या परिश्रमाने कवि संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. उपस्थितांचे आभार ज्येष्ठ कवी योगानंद टेंभुर्णे यांनी मानले.

 

February 07, 2015 in विदर्भ
जलयुक्त शिवार योजनेत इतर विभागांचाही सहभाग महत्वाचा - संजय राठोड 0

जलयुक्त शिवार योजनेत इतर विभागांचाही सहभाग महत्वाचा – संजय राठोड

unnamed
यवतमाळ – जिल्ह्यातील 372 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. ही सर्व गावे विकासाच्या बाबतीत परिपुर्ण करण्याच्या दृष्टीने कामे करावयाची आहे. त्यामुळे या योजनेशी संबंधीत यंत्रणेसोबतच विविध विभागांनीही या गावांमध्ये विकासाची कामे राबवून आपला सहभाग देणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागांनी विकासाचा आराखडा तयार करावा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.
पालकमंत्र्यांनी दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामे, जलयुक्त शिवार योजना व तालुक्यातील तलाठी कार्यालयाचा बांधकामाचा आढावा दारव्हा येथील बचत भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य पंढरी सिंहे, संगिता इंगोले, पंचायत समिती सभापती उज्वला बनसोड, उपसभापती प्रा.सुषमा गावंडे, सदस्य चरण पवार, जयश्री मिराशे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये जलसंधारण, पाणलोटची कामे करून या गावांमधील पाणी टंचाई कायमस्वरूपी निकाली काढायची आहे. त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणा काम करीत आहे. परंतु येवढयावरच न थांबता ही गावे विकासाच्या दृष्टीने परिपुर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाणन रस्ते, पक्के रस्ते, इमारत बांधकाम, रुक्ष लागवड, विजेच्या समस्या, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यासह विविध प्रकारची कामेही करावयाची आहे. त्यामुळे निवडण्यात आलेल्या गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी प्रत्येक विभागाने आठ ‍दिवसात विकास आराखडा सादर करावा व कामे करावी, असे पालकमंत्र्यानी सांगितले. या कामांसाठी विभागाअंतर्गत असलेला विधीचा उपयोग करावा. निधी उपलब्ध नसल्यास मागणी करावी, असेही त्यांनी सांगितले. गावांमध्ये विकासाची कामे करत असतांना गावकऱ्यांना विश्वासात घ्या. जलशिवार योजनेअंतर्गत कामांचे मुल्यमापण होणार असल्याने काळजीपुर्वक कामे केले जावे, असेही त्यांनी सुचविले. जिल्ह्यातील या योजनेतील गावे राज्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशा पध्दतीने गावांमध्ये कामे करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. या योजनेअंतर्गत दारव्हा तालुक्यातील 46 गावांमध्ये कामे केली जात असून यावेळी या सर्व गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. या सर्व गावातील विकास आराखडे करण्याच्या सुचना त्यांनी संबंधीत सरपंचासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचा आढावाही त्यांनी घेतला. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित 46 गावाचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले.

 

February 07, 2015 in विदर्भ
बेदींविरोधात ‘आप’ची निवडणूक आयोगाकडे तक्रार 0

बेदींविरोधात ‘आप’ची निवडणूक आयोगाकडे तक्रार

images

नवी दिल्ली – आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
किरण बेदी यांनी कृष्णनगर मतदारसंघातून शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह पदयात्रा आणि बाईक रॅली काढली. यावेळी अनेक मतदारांची त्यांनी भेट घेतली. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याने बेदींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ‘आप’ने केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी दिल्लीकरांचा मोठा प्रतिसाद दिसून येत असून मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या आहेत.

 

February 07, 2015 in महाराष्ट्र
दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू 0

दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू

2015-02-07~voting1_ns
नवी दिल्ली, दि. ७ – दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानास सुरूवात झाली असून दिल्लीकर मोठ्या उत्साहाने मतदानास बाहेर पडत आहेत. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब राग लागलेल्या दिसत असून ९ वाजेपर्यंत ५.६४टक्के मतदान झाले आहे.
सकाळी ८ वाजता मतदानास सुरूवात झाली असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येईल. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन अखेर निकाल लागेल. काँग्रेस , आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये मुख्य लढत दिसत आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी तब्बल ५५ हजार पोलिस व निमलष्करी दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दिल्लीतील १ कोटी ३३ लाख मतदार विधानसभेच्या ७० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत. भाजपा, काँग्रेस, आम आदमी पक्ष व अन्य पक्षांचे मिळून ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १२ हजार ७७७ मतदान केंद्रावर मतदान पार पडणार असून ७१४ मतदाने केंद्र संवेदनशील व १९१ मतदान केंद्र अतिसंवदेनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, आप प्रमुख अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींसह अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला.

February 07, 2015 in मुख्य पान
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश 0

ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

2015-02-07~2-aatnarambhende_ns
पुणे, दि. ७ – ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे यांचे शनिवारी निधन झाले. ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आज बेळगावमध्ये उद्घाटन होत असतानाच भेंडे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने संमेलनावर दु:खाची छाया पसरली असून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ९३ वर्षीय आत्माराम भेंडे यांनी पुण्यातील रत्ना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा तिन्ही भूमिका सांभाळताना त्यांनी हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरही कामाचा ठसा उमटवला. झोपी गेलेला जागा झाला, तरूण तुर्क म्हातारे अर्क, पिलूचं लग्न, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळे, तुज आहे तुजपाशी, मन पाखरू पाखरू, प्रीती परी तुजवरी अशी अनेक नाटकं गाजली.
जाहिरात व चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील भूमिकाही खूप गाजली.

February 07, 2015 in मुख्य पान
यवतमाळचे जांबुवंतराव, सांगोल्याचे गणपतराव 0

यवतमाळचे जांबुवंतराव, सांगोल्याचे गणपतराव

DHOTE2 GANPATRAO
पन्नास वर्षापूर्वी तमाम विदर्भात या घोषणा घुमत होत्या. त्यावेळी आधुनिक साधने नव्हती. वृत्तपत्रांचे स्वरूप आजच्या एवढे रेखीव नव्हते. आजच्यासारखे ‘डिजिटल युग’ नव्हते. नेत्याकडे जे भांडवल होते, ते म्हणजे तो स्वत: नेता, त्याच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास आणि त्या नेत्याची गरिबांबद्दल असलेली तळमळ..
यवतमाळचे जांबुवंतराव
‘वारे शेर आया शेर..’
पन्नास वर्षापूर्वी तमाम विदर्भात या घोषणा घुमत होत्या. त्यावेळी आधुनिक साधने नव्हती. वृत्तपत्रांचे स्वरूप आजच्या एवढे रेखीव नव्हते. आजच्यासारखे ‘डिजिटल युग’ नव्हते. नेत्याकडे जे भांडवल होते, ते म्हणजे तो स्वत: नेता, त्याच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास आणि त्या नेत्याची गरिबांबद्दल असलेली तळमळ.. आज जांबुवंतराव धोटे फारसे प्रकाशात नाहीत. पण नेतृत्वाची, जनतेच्या विश्वासाची ही सगळी लक्षणे ज्याला लागू पडतील, असा किमान सलग तीस वर्षे लोकांमध्ये टिकून राहिलेला, लोकांनी डोक्यावर घेतलेला आणि स्वत:करिता काहीही न मिळवणारा म्हणजे जांबुवंतरावभाऊ.
१९६२, ६७ या दोन टर्मची ही दहा वर्षे विधानसभा गाजवलेले भाऊ १९७१च्या लोकसभा पोटनिवडणुकीत नागपूरमधून खासदार म्हणून निवडून आले. मग १९८४ पर्यंत ते खासदार होते. ते आमदार किती वेळा होते आणि खासदार किती वेळा होते, यापेक्षा सुद्धा हे जे जांबुवंतराव होते, ते सगळ्यांपेक्षा वेगळे होते. आज जांबुवंतरावांची आठवण येण्याचे कारण त्यांचाच अचानक फोन आला. किती तरी दिवसांनी ‘मी जांबू धोटे बोलतोय. मधुकर तू कसा आहेस?’ भाऊंनी विचारले. मी म्हटलं, ‘भाऊ, आठवण कशी केली?’ त्यांनी आणखी एक धक्का दिला. ते म्हणाले, ‘अरे, आज आचार्य अत्रेसाहेब आणि तुझी एकदम आठवण आली..’ मी म्हणालो, ‘भाऊ, कुठे अत्रेसाहेब आणि कुठे चिल्लर मी.’ एकदम मनात गलबल झाली. आणि मग जांबुवंतरावांची अनेक रूपे समोर आली. एकेकाळी महाराष्ट्राची विधानसभा आणि नागपूरमधले लोखंडी पुलाखालचे सगळे नागपूर, गदगदा हलवणारे जांबुवंतराव म्हणजे खरे हनुमानच होते. हनुमंताने पर्वत हातावर उचलून आणला. भाऊंनी एकटय़ाच्या ताकदीवर कोणालाही करता येणार नाही, एवढी प्रचंड आंदोलने डोंगरासारखी हातावर उचलून आणली आणि यशस्वी करून दाखवली. साधने नव्हती, वृत्तपत्रे नव्हती, फोन नव्हते, ना टीव्ही होते, ना मोबाईल होते, ना गाठीला पैसा होता. होती फक्त जिद्द, बजरंगबलीची ताकद आणि लोकांचा विश्वास. आदल्या दिवशी भाऊंनी लोकांना चार जिल्हय़ात चिठ्ठय़ा पाठवाव्यात.. ‘उद्या विधानसभेवर लाखाचा मोर्चा आहे,’ आणि दुस-या दिवशी लाख माणसे मोजून घ्यावीत. चोवीस तासाच्या निरोपावर लाख माणसे त्यांच्याकरिता धावत होती. ना गाड्या-घोडे, ना टॅम्पो, ना खिचडी, ना पैसे. चिटणीस पार्क असो, वा कस्तुरचंद पार्क असो, तिथून निघालेल्या लाखालाखाच्या मोर्चात शेवटपर्यंत चालणारा हा एकमेव नेता होता. नाही तर पुढारी काय करतात, मोर्चा विधान भवनजवळ अडवला गेला की गाडीने येतात, भाषण करतात. गाडीने निघून जातात. भाऊंजवळ ना गाडी, ना घोडा. एसटीने जाणार, एसटीने येणार. हातावर भाकरी खाणार. लांब सोगा असलेले स्वच्छ धोतर, ते स्वत: धुणार. त्यावर तेवढाच स्वच्छ कुर्ता, हातात कडं, केसाची जटा. वाढलेली दाढी आणि त्यांचा तो अन्यायाविरुद्ध संतप्त झालेला चेहरा. कोणत्याही अन्यायाला ठेचून काढू की त्याचा जबडा फाडू अशा आवेशात त्यांचे वावरणे आणि अशी त्यांची भाषणे. एकवेळ निखारा हातात धरता येईल. पण भाऊंचा अन्यायाविरुद्धचा संताप शांत करणे कठीण. धगधगत्या निखा-यापेक्षा अन्यायाविरुद्ध त्यांची चीड जास्त प्रखर. त्यांनी कधी कोणाशी तडजोड केली नाही. कोणाकडे लाचारीने कधी उभे राहिले नाहीत. ना पैसा मिळवण्याच्या मागे लागले. ‘लोकांचा, लोकांसाठी असलेला नेता’ म्हणजे जांबुवंतराव. ते कोणत्या पक्षाचे आहेत, हे महत्त्वाचे नव्हते. पक्ष तोंडी लावण्यापुरता. पण खरा पक्ष म्हणजे जांबुवंतरावच. जांबुवंतराव हेच पक्षाचे निशाण. तेच म्हणजे जाहीरनामा. ते म्हणतील त्याला तिकीट आणि ते देतील त्या उमेदवाराला लोकांनी निवडून आणायचे. भाऊंच्या विश्वासावर विदर्भातल्या जनतेने अठरा-वीस आमदारांना फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर निवडून आणले आहे. आणि निवडून आलेले अगदी साधे कार्यकर्ते. मग ते सुभाष कारेमोरे असतील, शंकरराव बोबडे असतील, हरीष मानधना, सुधाकर दुर्वे किंवा भाऊंचे उजवे हात नानाभाऊ एम्बडवार. भाऊंचा शब्द झेलायला ही हनुमानाची सेना हजर असायची. भगवंतराव गायकवाड, सुरेंद्र भुयार आणि नानाभाऊ यांना तर जांबुवंतरावांनी मंत्री केले. महाराष्ट्रात कोणताही पक्ष पाठीशी नसताना एक खांबी तंबू म्हणता येईल.. खांब कसला, लोखंडाची कांबच म्हणायला हवी. अशा पोलादी शरीराचे भाऊ किती वर्षे तुरुंगात राहिले हिशोब नाही. नागपुरातला विणकरांचा लढा, अकोला कृषीविद्यापीठाचा लढा, अमरावतीचे आंदोलन आयुष्यभर ते लढत राहिले. एक पाय तुरुंगात, एक पाय बाहेर. तुरुंगातसुद्धा त्यांना लादीवर झोपवले जात होते.
त्यांच्या संतापी स्वभावाने विधानसभेत त्यांनी एकदा अध्यक्षांच्या अंगावर पेपरवेट फेकला. बाळासाहेब भारदे यांना सुदैवाने तो लागला नाही; पण सभागृह भाऊंच्या विरोधात गेले. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव आला. सदस्यत्व रद्द झाले. दरम्यान भाऊंना तुरुंगवासही झाला. तुरुंगात असतानाच विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. १९६२ची निवडणूक त्यांनी तीन हजार मतांनी जिंकली होती. पेपरवेट फेकल्यामुळे सदस्यत्व रद्द झाल्यानंतरची पोटनिवडणूक भाऊंनी ८ हजार ८८८ मतांनी जिंकली. ज्यांचं सदस्यत्व सभागृहाने रद्द केलं होतं ते जांबुवंतराव रुबाबात पुन्हा विधानसभेत आले. निवडून आल्यावर पुन्हा शपथ घेण्यासाठी अध्यक्षांनी नाव पुकारले. विधानसभा सचिवाजवळ भाऊ आले. त्यांनी माईक हातात घेतला. ते म्हणाले, ‘ज्या जांबू धोटेचे सदस्यत्व पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही रद्द केलं होतं, तो जांबू धोटे मीच आहे आणि लोकांनी मला पुन्हा निवडून दिले आहे..’
काँग्रेसचे चंद्रपूरचे आमदार मा. दा. तुमपल्लीवार उभे राहिले. ते म्हणाले, ‘अध्यक्ष महाराज माझा हरकतीचा मुद्दा आहे. आमदारपदाची शपथ घेतल्याशिवाय सदस्याला भाषण करता येते का?’ त्यांचा मुद्दा तांत्रिक होता आणि तो बरोबर होता. पण भाऊंचा दरारा होता. ते तुमपल्लीवार यांच्या अंगावर ओरडले.. ‘चूऽऽऽप’ विधानसभेचे अध्यक्ष होते बाळासाहेब भारदे. ते एवढेच म्हणाले, ‘जांबुवंतरावांना बोलू द्या..’ आणि आमदारकीची शपथ घेण्याच्या अगोदर भाऊंनी भाषण केले. आणि सभागृहाच्या इतिवृत्ताचा ते भाषण भाग झाले. संसदीय इतिहासात हाही एक आगळावेगळा विक्रमच होता.
विधानसभेतील ती दहा वर्षे भाऊंची वर्षे होती. अधिकृतरीत्या ते विरोधी पक्षनेते नव्हते. पण दुस-या अर्थाने सभागृहात त्यांचा दरारा विरोधी पक्षनेत्याइतकाच सरस होता.
वर्षानुवर्षे प्रवाहाच्या विरुद्ध पोहत राहायचे ही सोपी गोष्ट नाही. मोर्चात, जाहीर सभेमध्ये, विधानसभेत अत्यंत संतापलेले भाऊ अनेकांनी पाहिले. पण एवढय़ा लढाऊ वृत्तीचा हा नेता मनाने एकदम हळवा आहे. निर्मळ आहे. वसंतराव नाईक यांच्याशी आयुष्यभर भाऊंचा वाद झाला; पण नाईकसाहेब गेल्यावर भाऊंच्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली. महाराष्ट्राला खरं वाटणार नाही; पण त्यांचा संगीताचा अभ्यास केवढा मोठा आहे. वनस्पतीशास्त्राचा, पानांचा, फुलांचा अभ्यास किती मोठा आहे आणि शेतीचा अभ्यासही खूप मोठा आहे.
भाऊ आता ८४ वर्षाचे. पण ना कधी वाढदिवस, ना कधी कटआऊट. गरिबांसाठी सगळे आयुष्य पणाला लावणारे त्यांचे ते समर्पण कुठच्याही शब्दांत आणि तागडीत तोलता येणार नाही. फाटक्या माणसाचा पन्नास वर्षापूर्वीचा सगळ्यात मोठा आधार हाच धडधाकट माणूस होता. काळाची गती थांबत नाही. पण कर्तृत्वाचे विस्मरण होता कामा नये.

सांगोल्याचे गणपतराव
महाराष्ट्र विधानसभेत ज्या काळात आक्रमक जांबुवंतराव धोटे होते त्याच काळात अतिशय शांत प्रवृत्तीचे पंरतु आपला मुद्दा अतिशय खंबीरपणे मांडणारे गणपतराव देशमुख हेही होते. महाराष्ट्र विधानसभेतले सगळ्यात ज्येष्ठ आमदार म्हणून आजही गणपतराव देशमुख हेच आहेत. अकरा वेळा निवडून येण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. आजच्या राजकारणात एक निवडणूक जिंकली तरी आपण केवढा पराक्रम केला असे निवडून येणा-याला वाटत असते. किंवा निवडून आल्यानंतर पाच वर्षे त्याला चिंता असते ती पुढच्या निवडणुकीची. तेरा निवडणुका लढवून अकरा निवडणुका जिंकणारे गणपतराव असा कोणताही ताणतणाव न घेता निवडणुकीला उभे राहतात आणि हसत हसत निवडून येतात. गेल्या तीन-चार निवडणुकीत तर प्रत्येक वेळी ते सांगत होते की ‘ही माझी शेवटची निवडणूक.’ असं म्हणत म्हणत अकरा निवडणुका झाल्या. कार्यकर्ते त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. आग्रह करतात आणि गणपतराव पुन्हा उभे राहतात. निवडून येतात. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्व पक्षांना आदर असलेला हा एक नेता आहे. गेली पन्नास वर्षे त्यांना पाहतो आहे. ते जसे होते, तसेच पन्नास वर्षे आहेत. वयाचा किंचित परिणाम चेह-यावर झाला. पण सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी विधानसभेत किंवा विधानसभेच्या बाहेर लढण्याची त्यांची जिद्द काही कमी झालेली नाही. नागपूरच्या एवढय़ा अधिवेशनाला सलग तीस वर्षे मी गेलो; पण नागपूरच्या थंडीत गणपतरावांनी कोट घातला, असे कधी पाहायला मिळाले नाही. त्यांची पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट या त्यांच्या पोषाखात ना कधी बदल झाला, ना गणपतरावांच्या स्वभावात कधी बदल झाला. विधानसभेत क्वचितच आवाज वाढवून ते बोलतात. त्यांचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासारखा नसतो. प्रश्नाचा अभ्यास करण्याची त्यांची एक हातोटी आहे आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा प्रभावीपणे राबवण्याचे ज्यांना ज्यांना श्रेय आहे, त्यात गणपतराव हेही प्रमुख आहेत. कृष्णराव धुळप, दि. बा. पाटील यांच्याप्रमाणेच रोजगार हमी हा गणपतरावांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. या रोजगार हमी योजनेवर पुरुष आणि महिला काम करतात. एका दुष्काळात तर सात-सात, आठ-आठ लाख लोक एकेका दिवशी कामावर होते, त्यात तीन-चार लाख भगिनी होत्या. पण या श्रम करणा-या महिलांना पुरुषांऐवढी समान मजुरी मिळत नव्हती. गणपतरावांनी हा विषय उचलला आणि थेट इंदिरा गांधींच्या समोरच हा विषय नेला. त्याचे असे झाले की, १९७४ साली श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सोलापूरला एका कार्यक्रमाला येणार होत्या. गणपतरावांचा जिल्हा सोलापूर. ते सांगोल्याचे. त्यांनी त्यांच्याच जिल्ह्यातल्या रोजगार हमीवर काम करणा-या पाच-पंचवीस हजार महिलांना जमवले आणि इंदिरा गांधींचे विमान उतरणार होते, त्यांच्यासमोरच या भगिनींचा डेरा लावला. इंदिरा गांधी विमानातून खाली उतरल्या, समोर बघतात तर हजारो भगिनी. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना इंदिराजींनी विचारले, ‘इनकी क्या माँग है..?’ इंदिराजी तडक निघाल्या आणि मोर्चासमोर आल्या. गणपतरावांनी विषय समजावून सांगितला. बायांनाही समान मजुरी हवी हे पटवून दिले. एका मिनिटात इंदिराजी म्हणाल्या, माँग सही है. आणि सोलापूरच्या सभेत इंदिराजींनी तशी घोषणा केली. महिलांना समान मजुरी मिळण्याचे श्रेय गणपतरावांचे.
गणपतरावांचे आणखी एक काम फार मोठे आहे. कापसाचा एक बोंडसुद्धा ज्या सांगोल्यात होत नाही, तिथे गणपतरावांनी उत्तम सहकारी सूत गिरणी चालवली. इचलकरंजीत कलप्पा आवडेंची सूतगिरणी. सोलापुरात शिवदारे यांची सूतगिरणी आणि सांगोल्यात गणपतरावांची. या तिन्ही गिरण्या कापूस न पिकणा-या भागात आहेत. पण उत्तम चालतात. आणि केंद्र सरकारची बक्षिसे मिळवतात. कापूस पिकणा-या विदर्भातल्या सूतगिरण्या बंद पडल्या.
गणपतराव १९७८ साली शरद पवारांच्या मंत्रिमडळात रोजगार हमीचे मंत्री होते. मंत्रालयासमोरच छोटा बंगला होता. चालत यायचे आणि चालत जायचे. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी मंत्री असताना मुंबईत कधीही आणले नाही. मी एकदा त्यांना विचारले की, तुम्ही कुटुंबीयांना का आणत नाही? ते सहज म्हणाले, ‘अहो आपल्या मंत्रीपदाचे काही खरे आहे का? शहराच्या सवयी लागल्या की मग खेड्यात राहायला अडचण होते.’ आमदार असतानाही वर्षानुवर्षे घरी बायकोला महिन्याला ५०० रुपये पाठवणारा हा आमदार. ‘लोकमत’मध्ये असताना मी त्यांचा फोटो टाकून लिहिले. ‘बायकोला महिन्याला पाचशे रुपये पाठवणारा आमदार’. त्या लेखाची चर्चा झाली. एकदा सांगोल्याला गेलो असताना गणपतरावांनी त्यांच्या सौभाग्यवतींची ओळख करून दिली. आपल्यावर ज्यांनी लिहिले होते ते हेच, असेही सांगितले. सौ. गणपतराव म्हणाल्या की, का हो खोटं लिहिलंत. मी म्हटलं, काय खोटं लिहिलं? मग गणपतरावांकडे बघून त्या म्हणाल्या, ‘कधी पाचशे रुपये पाठवलेत हो.. चारशे रुपये तर पाठवायचात.’ विधानसभेत प्रश्नाला लगेच प्रतिप्रश्न विचारणारे गणपतराव घराच्या प्रश्नाला मात्र क्षणात निरूत्तर झाले. असे हे साधे गणपतराव जसे आहेत तसे. ना ते बदलले ना एवढी वर्षे आमदार राहून त्यांचा सांगोला जिल्हा बदलला. तरी तिथल्या लोकांना आमदार हवे गणपतराव. असे तिथले मतदारही विलक्षण आणि आमचे गणपतरावही विलक्षण.
पन्नास वर्षापूवी व्यंकटेश माडगुळकरांनी ‘माणदेशी माणसं’ लिहिली. त्यातला धर्मा रामोशी हा सांगोल्याचा. त्या कथेत व्यंकटेशने दुष्काळी सांगोल्याचे चित्रण उभे केले. तो धर्मा आणि त्याची बया यांचे ते चित्रण मनाला भेदून जाणारे होते. आजही सांगोल्याच्या त्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. आता गणपतराव यांच्या अखेरच्या या आमदारकीच्या काळात हे चित्र बदलावं अशी अपेक्षा.
(साभार – दै. प्रहार)

आयकर विभागाचा पुसदमध्ये सर्च 0

आयकर विभागाचा पुसदमध्ये सर्च

download (2)
यवतमाळ, दि. ६ – जिल्ह्यात अनेक व्यावसायिक, सराफा व्यावसायिक, बिल्डराकडून आयकर वाचविण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या पथकाकडून सर्च मोहीम राबविण्यात येते. गुरुवार पासून पुसद येथे आयकर विभागाच्या पथकाने सर्च मोहीम सुरू केली असून कापड व्यावसायीकांसह सराफा व्यापाºयामध्ये खळबळ उडाली आहे.
कापड, सराफा, फर्निचर यासह विविध व्यावसायिकांद्वारे दैनंदिन व्यवसाय कमी दाखवून आयकर वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावर आयकर विभागाची करडी नजर असते. मात्र व्यावसायिक स्पर्धेतूनही बरेचदा तक्रारी केल्या जातात. बाजारपेठेत गर्दी असल्याची नेमकी संधी साधून आयकर विभागानेही कारवायांचा सपाटा लावला आहे. नागपूर येथील आयकर विभागाचे उपायुक्ताच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार आणि शुक्रवारी पुसद शहरातील अनेक दुकानामध्ये सर्च मोहीम राबविली. पुसद येथील सुभाष चौक आणि डॉ. आंबेडकर चौकातील दुकानामध्ये सर्च करून बिले, कागदपत्राची तपासणी केली. या सर्च मोहीमेमुळे शहरातील कापड , सराफासह इतर व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.

February 06, 2015 in मुख्य पान
ग्रंथोत्सवात विक्रमी 8 लाखांच्या पुस्तकांची विक्री 0

ग्रंथोत्सवात विक्रमी 8 लाखांच्या पुस्तकांची विक्री

_DSC0137
अमरावती विभागातील विक्रीचा उच्चांक ,ग्रंथागाराच्या पुस्तकांवर वाचकांच्या उड्या
यवतमाळ, दि ६ : येथील नगर भवन येथे आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाने पुस्तक विक्रीचा आतापर्यंतचा सर्व खप मागे टाकत संपुर्ण अमरावती विभागात विक्रीचा नवीन उच्चांक गाठला आहे. यावर्षी या तीन दिवसात तब्बल 8 लाखांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. शासकीय ग्रंथागाराच्यावतीने उपलब्ध्‍ा करून देण्यात आलेल्या पुस्तक विक्रीनेही यावर्षी संपुर्ण विदर्भात सर्वाधीक पुस्तके विक्रीचा जिल्हा माहिती कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक प्रदर्शन व विक्रीसह ग्रंथोत्सवादरम्यान तिनही दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने दिवसभर वाचक व रसिकांची ग्रंथोत्सवात रेलचेल होती. वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावी म्हणून ग्रंथाली, राजहंस, संस्कृती, मनोविकास ही पुणे येथील पुस्तक प्रकाशकांचे दालणे तसेच लोकवाड्मय गृह मुंबई, संदर्भ प्रकाशन औरंगाबाद, हेमा लॉ बुक धुळे, पॉप्युलर बुक सेंटर अमरावती, यासह नागपुर, चंद्रपुर, वाशिम व स्थानिक पुस्तक विक्रेत्यांची दालणे ठेवण्यात आली होती. ग्रंथोत्सवात पहिल्याच दिवसापासून वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने संपुर्ण तीन दिवसात 8 लाख रुपयांचा पुस्तकांची विक्री झाली. गेंल्यावर्षी झालेल्या यवतमाळ ग्रंथोत्सवात ही विक्री 6 लाख इतकी होती. विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये ग्रंथाली, राजहंस व पॉप्युलरची एकूण विक्री 1 लाख 43 हजार, संस्कृती प्रकाशन, पुणे 1 लाख 45 हजार तसचे मनोविकास प्रकाशन, मुंबई 50 हजार, मध्यम बुक सेंटर, चंद्रपुर 18 हजार, मंगेश प्रकाशन, नागपुर 25 हजार, गुरुप्रसाद, चंद्रपुर 18 हजार, संदर्भ प्रकाशन, औरंगाबाद 26 हजार, महेंद्र बुक, यवतमाळ 10 हजार, नवनीत प्रकाशन 15 हजार, सुधीर वर्धा 15 हजार, युवा बुक यवतमाळ 30 हजार, विद्याधन चंद्रपुर 30 हजार, लोकवाड्मय मुंबई 25 हजार, माय मराठी चंद्रपुर 38 हजार, गजानन बुक एजेंन्सी वाशिम 13 हजार, साईबाबा बुक सेलर चंद्रपुर 25 हजार, हेमा लॉ बुक धुळे 40 हजार, जेबी पुस्तक चंद्रपुर 15 हजार, शासकीय ग्रंथागार नागपुर 92 हजार व अन्य दोन विक्रेत्यांची प्रत्येकी 14 हजार याप्रमाणे 28 हजार अशी पुस्तकांची विक्री झाली.

 

February 06, 2015 in विदर्भ
माहिती संचालकपदी देवेंद्र भुजबळ यांची नियुक्ती 0

माहिती संचालकपदी देवेंद्र भुजबळ यांची नियुक्ती

cropRunTime
यवतमाळ, दि ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक, माहिती व प्रशासन या पदाचा पदभार देवेंद्र भुजबळ यांनी स्वीकारला. यापूर्वी ते नाशिक विभागाचे माहिती भुजबळ यांनी कोकण विभागाचे उपसंचालक, मंत्रालयात उपसंचालक (वृत्त), रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी या पदांवर काम केले आहे. महासंचालनालयात येण्यापूर्वी त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रात 6 वर्षे कार्यक्रम निर्मितीचे कामकाज पाहिले आहे. तत्पूर्वी 4 वर्षे ते पत्रकारितेतही होते. पुणे विद्यापीठ पत्रकारितेचा अभ्यासक्रम व पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमामध्ये त्यांना ‘प्रोफेसर एल.एम.गोखले फेलोशिप’ मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत मिळाली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ‘भावलेली व्यक्तिमत्व’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून त्यांनी विविध विषयावरही लेखन केले आहे.

February 06, 2015 in महाराष्ट्र
पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक - मुख्यमंत्री 0

पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

download (1)

ई माध्यमांनाही पुढे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

यवतमाळ, दि ६ : विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे. त्यादृष्टीकोनातून राज्य शासनाने पावले उचलली असून पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर पुढील वर्षासाठीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ई-माध्यमांसाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्य शासनाच्या लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, माहिती व जनसंपर्क सचिव मनिषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे वृत्त संचालक शिवाजी मानकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्याला ज्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो त्यामुळे त्या पुरस्काराची आणि पुरस्कारार्थीची उंची वाढत असते. लोकशाहीला सुदृढ करण्याचे काम माध्यमं करीत असल्याने लोकशाहीमध्ये माध्यमांचे महत्व अधोरेखीत होते. त्यामुळे जबाबदारीतही वाढ होते. हल्लीचा काळ हा बातमी मुल्याचा आहे. मात्र ते करीत असतांना पत्रकारीतेतील शाश्वत मुल्यांची जपणूक करणे महत्वाचे आहे. पत्रकार हा कधीच पुरस्कारासाठी काम करीत नसतो. आपल्याला मिळणारे पुरस्कार हे स्वमुल्यमापनासाठी असतात. आपण ज्या मार्गाने वाटचाल करीत आहोत तो मार्ग योग्य आहे हे मिळालेल्या पुरस्काराने शिक्कामोर्तब होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पत्रकारितेचे व्रत जोपासताना पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी महत्वाची आहे. त्यासाठी राज्य शासनाने पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत ज्येष्ठ पत्रकारांच्या सुचना विचारात घेऊन एक समग्र योजना तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले असून आता सोशल मिडीया आणि ई- माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या नविन माध्यमांनी लोकांपर्यंत पोहच वाढविली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ब्लॉग, वेबसाईट तसेच अन्य ई माध्यमांसाठी एक स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. 2014 या वर्षाचे पुरस्कार आम्ही याच वर्षी प्रदान करू आणि पुढील वर्षापासून पत्रकारिता पुरस्कारासाठी नामनिर्देशनाची सोय देखील करण्यात येईल. याद्वारे एखादा पत्रकार किंवा व्यक्ती अन्य दुसऱ्या पत्रकाराचे पुरस्कारासाठी नामनिर्देशन करु शकेल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर, सचिव मनिषा म्हैसकर यांचीही भाषणे झाली.प्रास्ताविक महासंचालक ओक यांनी केले. दीपप्रज्वलन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने समारंभास सुरूवात झाली. सोहळ्यास आमदार सुरेश खाडे, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, पुरस्कार निवड समितीचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच पुरस्कारार्थी पत्रकारांचे कुटुंबिय उपस्थित होते. संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले.

 

February 06, 2015 in मुख्य पान
शेतकरी आत्महत्या 0

शेतकरी आत्महत्या

Jpeg
फुलसावंगी, दि ६ – पाच एकरशेतात केवळ सहा क्विंटल कापसाचे उत्पादन झाल्याने कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या चिंताग्रस्त शेतकºयाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. ही घटना महागाव तालुक्यातील शिरमाळ येथे काल सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. ग्यानबा तुकाराम मोरे असे मृत शेतकºयाचे नाव आहे.
भांब येथील आनंद पंडागळे या शेतकºयाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडत नाही तोच दुसरी घटना उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ग्यानबा मोरे या शेतकºयाने पाच एकर कोरडवाहू शेतात कपाशीची लागवड केली होती. मात्र कमी पावसामुळे कपाशीने दगा दिला. बँक आणि खासगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सदर शेतकºयावर सेंट्रल बँक शाखा फुलसावंगीचे ४८ हजार २०० आणि खासगी सावकाराचे २५ हजार असे कर्ज होते. दराटी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना घटनास्थळी पोहोचायला सूर्यच उगवला. त्यामुळे शेतकरी आत्महत्येविषयी पोलीस प्रशासन कीती संवेदनशील आहे, हे दिसून येते. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत शेतकºयाच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. महागाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

 

February 06, 2015 in विदर्भ
जिनिंगला आग; ८० लाखाचे नुकसान 0

जिनिंगला आग; ८० लाखाचे नुकसान

DSC_2920
राळेगाव, ६ – येथील महाराष्टÑ जिनिंगला लागलेल्या आगीत ८० लाखाचा कापूस जळून खाक झाला. ही घटना आज दुपारी २.३० वाजता दरम्यान घडली.
मेटीखेडा रोडवर महाराष्टÑ जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी आहे. आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना उघडकीस येताच परिसरातील जनतेने घटनास्थळी धाव घेतली. मात्र आग विझविण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याने यवतमाळ, वणी, देवळी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. बघता-बघता आगिने रौद्ररुप धारण केले. यवतमाळच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा केला. मात्र आग आटोक्यात आणण्यात यश आले नव्हते. वणी येथील अग्निशमन दलाचे पथक पोहोचल्यानंतर त्यांच्याकडूनही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. या आगीत १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून सीसीआयचे ८० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राळेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोळंकी, पोलीस काँन्स्टेबल कुमरे, राजू करपते यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहने बाहेर काढली. घटनास्थळी तहसीलदार सुरेश कव्हळे, प्रफुल्ल मानकर यांनी भेट दिली. या आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

 

February 06, 2015 in महाराष्ट्र
केएम प्रकल्पाचे गोडाऊन फोडले ,२७ क्विंटल सोयाबीन जप्त 0

केएम प्रकल्पाचे गोडाऊन फोडले ,२७ क्विंटल सोयाबीन जप्त

11
नेर, दि. ६ – यवतमाळ रोडवरील केएम प्रकल्पाचे सोयाबीन असलेले गोडाऊन सब्बलीच्या सहाय्याने फोडून १ लाख ४८ हजार ४०० रुपयाचे सोयाबीन लंपास केले. ही घटना काल रात्री घडली होती. या प्रकरणाचा छडा अवघ्या तीन तासात लावण्यात पोलिसांना यश आले.
सोयाबीनचे पोते फाटल्याने चोरट्यांचे बिंग फुटले. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत २७ क्विंटल सोयाबीनसह एका महिलेस अटक करण्यात आली. कंपनीनेवारंवार सोयाबीन चोरीची आकडेवारी बदलल्याने सदर कंपनीचे काम संशयाच्या भोवºयात सापडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केएम प्रकल्पांतर्गत शासनाच्या वतीने सोयाबीन खरेदीचा कंत्राट अ‍ेडीएम कंपनी (अकोला) खरेदी करते. सदर कंपनीचे गोडाऊन बुलडाणा अर्बन सोसायटीच्या गोडाऊन जवळ आहे. बुलढाणा बँकेचे व सदर कंपनीची रखवालदारी एकच चौकीदार करते. सदर चौकीदारास कंपनीने दोन दिवसापूर्वी बंद केले. त्यामुळे सदर गोडाऊनमध्ये असलेले हजारो क्विंटल सोयाबीन रामभरोसे ठेवण्यात आले होते. मध्यरात्री संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन मालवाहू वाहनाने येऊन सब्बलीच्या सहाय्याने गोडाऊन फोडले व ५३ क्विंटल सोयाबीन चोरून नेले. सकाळी ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली. कंपनीच्या कर्मचाºयांनी सुरुवातीला सोयाबीनची पाहणी केली. यावेळी २० पोते व ५३ कट्टे सोयाबीन चोरी गेल्याची माहिती दिली. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तब्बल २ वाजता सदर चोरीची माहिती नेर पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक शाम सोनपराते, जमादार हरिचंद्र कार, राजेश चौधरी, प्रकाश धारगावे यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी सांडलेले सोयाबीन व वाहनाच्या टायरच्या मार्कवरून सदर पोलिसांनी छडा लावला. पोलीस यवतमाळ बाजार समितीत पोहोचले. त्यावेळी चोरीचे सोयाबीन येथे आढळून आले. २७ क्विंटल सोयाबीनसह महिला मीरा अशोक पवार (३५) वर्ष रा. अशोकनगर नेर या महिलेस ताब्यात घेतले. वृत्तलिहेस्तोवर याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता. वारंवार बदलवलेली सोयाबीन आकडेवारी व पोलिसांनी जप्त केलेला माल यामुळे कंपनीच संशयाच्या भोवºयात सापडली आहे.

 

February 06, 2015 in विदर्भ
मारहाण करणाºया आरोपीस सश्रम कारावास 0

मारहाण करणाºया आरोपीस सश्रम कारावास

download
यवतमाळ, दि. ३१ – क्षुल्लक कारणावरून इसमास मारहाण करणाºया आरोपीस तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वाय. एम. तीवारी यांनी ठोठावली. राजेश उर्फ राजू पांडूरंग धोटे (३८) रा. पिंपरी (बु.) असे आरोपीचे नाव आहे.
अकोला बाजार येथील विजय विठ्ठल ठाकरे हा २३ मार्च २०१३ रोजी प्रविण जयस्वाल यांच्या शेतात चणा काढण्यासाठी गेला होता. अशातच आरोपी राजेश उर्फ राजू पांडूरंग धोटे रा. पिंपरी हा तेथे दारू पिऊन आला. त्यानंतर वाद करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून विजयला जखमी केले होते. याप्रकरणी जखमीचा भाऊ गजानन विठ्ठल ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सहा.पोलीस निरीक्षक बाळीराम देऊळवर यांनी आरोपीस अटक करून तपास पूर्ण केल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वाय.एम. तीवारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये गजानन ठाकरे, राजेंद्र जाधव यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकूण आरोप सिद्घ झाल्याने राजेश धोटे यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरीक्त १५ दिवस शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने साहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रज्ञा हरणे यांनी काम पाहिले.

 

February 06, 2015 in विदर्भ
बॉम्बशोधक व श्वान पथककडून बाब कंम्बलपोष दर्गांची तपासणी 0

बॉम्बशोधक व श्वान पथककडून बाब कंम्बलपोष दर्गांची तपासणी

IMG-20150205-WA0017

आर्णी ,दि ५ – शहरात अरूणावती नदीच्या काठी बाबा कंबलपोष यांचा उर्स सुरू झाला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्या दुष्टीकोणातुन यवतमाळ येथील बॉम्बशोधक व श्वानपथक पथकाचे सात चमु दाखल झाले असून या परिसराची तपासणी केली.
आर्णी डिसेंबर महिण्यात अरूणावती नदीच्या पात्रात एका लोंखडी पेठीत बॉम्ब आणी जिवंत काडतुस सापडल्याची घटना उघडीस आली होती. त्यामुळे शहरासह तालुक्यात विविध चर्चेला उधान आले होते. मात्र काल पासुन आर्णीत बाबा कंबलपोष यांची यात्रा सुरू झाली. या यात्रेत जिल्ह्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून बॉम्बशोधक व श्वानपथकच्या चमुने दुपारी दरम्यान बाबा कंबलपोष दर्गा, यात्रेचा परिसर, बस स्थानक, आर्णी शहरातील महत्वाच्या जागी तपासणी केली. या दरम्यान काही आढळुन आले नसल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी लाखो नागरिक एकत्र येत असतात त्या ठिकाणी बॉम्बशोधक व श्वानपथकाचे चमु तपासणी करत असतात. आर्णीत डिसेंबर महिण्यात बॉम्ब व काडतुस सापडले असले तरी त्या घटने सोबत आज झालेल्या तपासणीचे काही संबंध नाही अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजकिरण मडावी यांनी दिली.

February 05, 2015 in विदर्भ
ट्रेलरमधील लोखंडी पत्रे अंगावर पडून दोन ठार , कोसदणी घाटातील घटना 0

ट्रेलरमधील लोखंडी पत्रे अंगावर पडून दोन ठार , कोसदणी घाटातील घटना

कोसदानी घटतील अपघात  (4) - Copyकोसदानी घटतील अपघात  (3) - Copy
आर्णी , दि. ५ – ट्रेलरमधील लोखंडी पत्रे पडून दुचाकीवर दोन जण जागीच ठार झाले. ही घटना आज सायंकाळी ५.३० वाजता कोसदणी घाटात घडली. ही घटना इतकी भयानक आहे की, यामध्ये त्याचे पायही छाटल्या गेले.
बाळा श्रीराम कडू (६०) रा. साखेडा ता. आर्णी, अनिल बालाजी चौधरी (३०) रा. लिंगी असे मृतकाचे नाव आहे. महागाव येथे सोयरीक सबंधासाठी ते आपल्या दुचकीने (एम.एच. २९ / ए.एच. ६११८)आज सकाळी गेले होते. तेथून परत येत असतांना कोसदणी घाटात छत्तीसगड येथून लातुरकडे जाणाºया ट्रेलरमध्ये (सी.जी. ०४/ ए.सी. ९३२५) लोंखडी पत्रे घेऊन जात होते. अशातच कोसदणी घाटातील वळणावर त्या ट्रेलरच्या पत्र्याला बांधून असलेल्या साखळ््या तुटल्या. त्याचवेळी दुचाकीवर लोखंडी पत्रे पडल्याने दोघेही खाली पडले. त्यामध्ये पत्रे अंगावर पडल्याने त्याचे पायही छाटल्या गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून ट्रेलरचा चालक व किनर पळून गेले. या घटनेची माहिती कळताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. हा अपघात इतका भयानक होता की घटनास्थळावर अनेकांचे अश्रु अनावर झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी ट्रेलर चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 

February 05, 2015 in विदर्भ