दिल्ली – प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कचरा आणि त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी ही एक गंभीर समस्या आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे केवळ कच-यामध्येच ढिगारे तयार होत नाहीत तर समुद्रातही प्लॅस्टिकचा कचरा तरंगत असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत असते. तरंगणा-या प्लॅस्टिकचे तुकडे खाल्ल्यामुळे अनेक जलचर मृत्युमुखी पडत असतात. मात्र, भारतीय वंशाच्या एका शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनामुळे प्लॅस्टिकचा हा घातक कचरा उपयुक्त होणार आहे. या टाकाऊ प्लॅस्टिकपासून डिझेल, नैसर्गिक वायू आणि इतर उपयुक्त पेट्रोलियम उत्पादने तयार करण्याचे तंत्रज्ञान एका भारतीय वंशाच्या संशोधकाने अमेरिकेत विकसित केले आहे.
या पिशव्यांपासून नैसर्गिक वायू, नॅप्था, पेट्रोल, मेण, वंगणे व हायड्रोलिक तेल मिळू शकते. पायरोलिसिस म्हणून ओळखल्या जाणा-या प्रक्रियेअंतर्गत या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना ऑक्सिजनविरहित चेंबरमध्ये तापवल्यास यातून अनेक फायदेशीर घटक मिळू शकतात, असे इलिनॉइस सस्टेनेबल टेक्नॉलॉजी सेंटरमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ ब्रजेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितले.
कच्च्या तेलाचे शुद्धीकरण केल्यास त्यापासून ५० ते ५५ टक्के इंधन मिळते. मात्र, हे प्लॅस्टिक पेट्रोलियमपासून तयार केलेले असल्यामुळे या प्लॅस्टिकपासून ८० टक्के इंधन मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. जगात प्लॅस्टिकने थैमान घातले असून त्यातून वन्यजीव आणि सागरी जीवांना धोका निर्माण झाला आहे. उत्तर व दक्षिण ध्रुवावरही प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळल्या आहेत. मासे, पक्ष्यांच्या पोटात प्लॅस्टिकचे तुकडे आढळले, असे संशोधकांनी सांगितले. शर्मा यांच्या पथकाने कच्च्या खनिज तेलाचे रूपांतर विविध पेट्रोलियम पदार्थामध्ये करण्याचा प्रयोग केला. यातून निर्माण झालेले डिझेल हे अमेरिकेतील इंधन निकषावर उतरणारे आहे. तसेच प्लॅस्टिकपासून निर्माण झालेले ३० टक्के डिझेल हे नैसर्गिक डिझेलमध्ये मिसळले जाऊ शकते. या इंधनामुळे कोणतेही अन्य दुष्परिणाम जाणवत नाहीत. हे संशोधन ‘फ्यूएल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
Archive for February, 2014
प्लॅस्टिक पिशव्यांपासून मिळणार डिझेल
राज्यातील ८६ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या , राकेश मारिया मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी
मुंबई: राज्य पोलिस दलातील अपर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलिस अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या ८६ वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) विजय कांबळे यांची तर नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी के. एल. प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंजुरीनंतर या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
दरम्यान ,अहमद जावेद यांची पदोन्नतीने महासंचालक गृहरक्षक दल आणि संचालक नागरी संरक्षण या पदावर नियुक्तके.पी. रघुवंशी यांची पदोन्नतीने महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली.
ज्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामध्ये
अपर पोलिस महासंचालक
विजय कांबळे- पोलिस आयुक्त, ठाणे
राकेश मारिया- पोलिस आयुक्त, मुंबई,
के.एल.प्रसाद-पोलिस आयुक्त, नवी मुंबई,
ए.के.शर्मा- नियुक्तीच्या प्रतीक्षेत
के. एल. बिष्णोई- अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था),
संजय बर्वे- अपर पोलिस महासंचालक (प्रशासन) (पदोन्नतीने),
एस.एन.पांडे-अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) (पदोन्नतीने)
डी.कनकरत्नम- अपर पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,मुंबई (पद श्रेणी वाढ करुन)
हेमंत नगराळे- अपर पोलिस महासंचालक (नियोजन व समन्वय) (पदोन्नतीने)
टी.ए.चव्हाण- अपर पोलिस महासंचालक,महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, (पदोन्नतीने)
हिमांशू रॉय- विशेष पोलिस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, मुंबई
परमबीरसिंग- विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल,
श्रीमती रश्मी शुक्ला- आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (अतिरिक्त कारभार),
विशेष पोलिस महानिरीक्षक
संदीप बिश्नोई- विशेष पोलिस महानिरीक्षक व मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई,
जगन नाथ- विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र,
राजेंद्रसिंग- पोलिस आयुक्त, औरंगाबाद,
संजयकुमार- सह पोलिस आयुक्त, पुणे,
आर.जी.कदम- विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र (पदोन्नतीने),
डॉ. के. व्यंकटेशम- विशेष पोलिस महानिरीक्षक (विशेष सुरक्षा व सागरी सुरक्षा),
सदानंद दाते- सह पोलिस आयुक्त (गुन्हे), मुंबई शहर,
ए.एम.कुलकर्णी- विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना),
श्री. विवेक फणसाळकर- सह पोलिस आयुक्त (प्रशासन) मुंबई,
डॉ. बी.के. उपाध्याय- सह पोलिस आयुक्त (वाहतूक) मुंबई,
जयजितसिंग- विशेष पोलिस महानिरीक्षक व्ही.आय.पी.सुरक्षा,
बी.के.सिंग- विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह ,
व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण- सह पोलिस आयुक्त ठाणे शहर,
धनंजय कमलाकर- सह पोलिस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) मुंबई
रितेशकुमार- विशेष पोलिस महानिरीक्षक,कोल्हापूर परिक्षेत्र,
संजीवकुमार सिंघल- संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी पुणे,
नवल बजाज- संचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक (पदोन्नतीने),
प्रवीण साळुंखे- विशेष पोलिस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र
संजय पांडे- विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य मानवी हक्क आयोग (पदोन्नतीने),
ए.डी.शिंदे- विशेष पोलिस महानिरीक्षक, सीआयडी पुणे (पदोन्नतीने),
बी.एस.शिंदे- नियंत्रक, वैधमापन शास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई,
निकेत कौशिक- नियुक्तीच्या प्रतीक्षेत
अमितेश कुमार- विशेष पोलिस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र (पदोन्नतीने),
पोलिस उपमहानिरीक्षक
डॉ. सुरेश मेकला- पोलिस आयुक्त, अमरावती शहर,
अजित पाटील- पोलिस उपमहानिरीक्षक,-सीआयडी पुणे,
प्रकाश मुत्याळ- अपर पोलिस आयुक्त,पुणे शहर,
दीपक पांडे- अपर पोलिस आयुक्त नागपूर शहर (पदोन्नतीने),
व्ही.एन.जाधव- संचालक प्रशासन/पोलीस उपमहानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, (पदोन्नतीने)
रवींद्र सिंघल- अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) ठाणे शहर,
एस.आर.शेलार- अपर पोलिस आयुक्त, ठाणे शहर (पदोन्नतीने),
के.आर.शेलार- अपर पोलिस आयुक्त संरक्षण व सुरक्षा,मुंबई (पदोन्नतीने),
मधुकर पांडे- अपर पोलिस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग,मुंबई
कैसर खालिद- अपर पोलिस आयुक्त (वाहतूक) मुंबई,
सी.एच.वाकडे- अपर पोलिस आयुक्त (विशेष शाखा)मुंबई,
व्ही.एम.जाधव- पोलिस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल (पदोन्नतीने),
विश्वास नांगरे पाटील- पोलिस उपमहानिरीक्षक, एसीबी मुंबई,
मिलिंद भारंबे- अपर पोलिस आयुक्त, पश्चिम विभाग मुंबई,
पी.एस.पाटणकर- अपर पोलिस आयुक्त ठाणे शहर (पदोन्नतीने),
एस.आर.पारसकर- पोलिस उपमहानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण, मुंबई,
ब्रिजेश सिंग- अपर पोलिस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई,
निरंजन वायंगणकर- उपसंचालक महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक (पदोन्नतीने).
पोलीस अधीक्षक, पोलिस उपायुक्त/अपर पोलिस अधीक्षक
एम.एम.रानडे- पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण,
राजेश प्रधान-पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण,
पी.व्ही. देशपांडे-पोलिस उपायुक्त, पुणे,
मनोजकुमार शर्मा- पोलिस अधीक्षक, कोल्हापूर,
अभिनाशकुमार- पोलिस उपायुक्त, नागपूर शहर,
एस.व्ही.मोहिते- पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण,
आर.एल.पोकळे- पोलिस उपायुक्त, नागपूर शहर,
कैलास कणसे- पोलिस अधीक्षक, भंडारा,
श्रीमती आरती सिंग- पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण,
व्ही.पी.पानसरे-पोलिस अधीक्षक, रेल्वे पुणे,
के.एम.एम.प्रसन्ना- पोलिस उपायुक्त, मुंबई शहर,
पी.पी.शेवाळे- पीसीआर,ठाणे
परमजितसिंग दहिया-पोलिस अधीक्षक, नांदेड,
अखिलेश कुमार सिंग- पोलिस अधीक्षक, धुळे,
श्रीमती ज्योतीप्रिया सिंग- पोलिस अधीक्षक, जालना,
एस.बी.पाठारे-समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ११ नवी मुंबई,
सुधीर हिरेमठ- समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १ पुणे,
श्री. एम. के. भोसले- समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ८,
एस.एच.पाटील- उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई,
अभिनव देशमुख- पोलिस अधीक्षक, सातारा,
ए.एस.पारसकर- पोलिस अधीक्षक, वर्धा,
श्रीमती निर्मलादेवी- पोलिस अधीक्षक, वाशिम,
डॉ. संजय शिंदे- पोलिस अधीक्षक, रत्नागिरी,
पी.व्ही.होळकर- पोलिस उपायुक्त, मुंबई शहर,
श्री. एम. रामकुमार- पोलिस अधीक्षक, नंदूरबार,
श्री. संजय अपरांती- नियुक्तीच्या प्रतीक्षेत
प्रवीण पडवळ- पोलिस उपायुक्त, ठाणे शहर,
एन.डी. रेड्डी- पोलिस अधीक्षक, बीड,
डी.वाय. मंडलिक- पोलिस उपायुक्त मुंबई शहर,
श्रीमती मोक्षदा पाटील- सहायक पोलिस अधीक्षक
प्रेमप्रकरणातून पोलीस शिपायाची आत्महत्या
‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेयसीच्या घरी घेतले विष
यवतमाळ – सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होत असताना येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाने प्रेयसीच्या घरी जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. राळेगाव तालुक्यातील झिल्ला येथे आज दुपारी दोन वाजता ही घटना घडली. राहुल वामन खरतडे (४५) रा. सुवर्णनगर वाघापूर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव असून तो शहर ठाण्यात कार्यरत होता. तीन दिवस तो रजेवर गेला होता. आज ‘व्हॅलेंटाईन डे’ असल्याने आपल्या दुचाकीने राळेगाव तालुक्यातील झील्ला येथे गेला. तेथील एका युवतीच्या घरी जाऊन त्याने विषारी औषधी प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळताच वडकीचे ठाणेदार एम.एस. राजपूत यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. यावेळी त्याच्या शिखात किटकनाशक खरेदी केल्याचे बिल आढळले असून ते राळेगाव येथील कृषी केंद्रातून खरेदी केले. खरतडे हा विवाहीत असून त्याचे यवतमाळ येथील एका महाविद्यालयात बी.ए. भाग दोनला असलेल्या युवतीवर प्रेम करीत होता.आज ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त प्रेयसीला भेटण्याठी तिच्या गावी गेला. अशातच त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दिवटे हल्ला प्रकरणी दोन अटकेत
यवतमाळ- माजी नगरसेवक प्रविण दिवटे याच्यावर प्राणघातक हल्ला करणाºया दोन आरोपीला टोळी विरोधी पथकाने आज दुपारी अटक केली. बबई उर्फ सुशिल गणेशप्रसाद दुबे रा. शारदा चौक, नितीन निगोट रा. विसावा सोसायटी पिंपळगाव अशी आरोपींची नावे आहे. तीन महिन्यापूर्वी मिलींद सोसायटीमध्ये गोळीबार करून प्रवीण दिवटे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी फरार होते. या घटनेला तीन महिने होऊन ही आरोपी फरार असून त्याना त्वरीत अटक करा अशी मागणी दिवटेच्या पत्नीने पोलीस अधिक्षकांकडे केली होती. त्यावरून पोलीस अधीक्षकांनी आरोपींना अटक करण्याची सुचना पथकाला दिली होती. दरम्यान आज टोळी विरोधी पथकाने शारदा चौक परिसरात बबई आणि नितीन या दोन आरोपीला अटक केली. उर्वरीत पाच आरोपी अजुनही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. ही कारवाई टोळी विरोधी पथकाचे निलेश ब्राम्हणे, सहा. पोलीस उपनिरीक्षक वसंत मडावी, सैय्यद साजीद , विकास खडसे, सुनील खंडागडे, शेखर वांढरे, बबलु चव्हाण, बबलु चंदन यांनी केली.
शाळेतून विद्यार्थी बेपत्ता
यवतमाळ-दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडा येथील विद्यार्थी चार दिवसापासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. गणेश मधुकर रामकर (१३) रा. चाणी कामठवाडा हा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. १० फेबु्रवारी रोजी तो सकाळी शाळेत गेला मात्र सायकाळ होऊनही घरी परत आला नाही. या प्रकरणाची तक्रार लाडखेड पोलिसात दिली. पोलीस व नातेवाईकांनी गणेशची शोधमोहीम सुरू केली असून अजुनही थागपत्ता लागला नाही. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
यवतमाळ -अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री जोडमोहा येथे घडली. दिनेश रमेश मानकर (३०) रा. नांझा असे मृतकाचे नाव आहे. तर राजू वालदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतक व जखमी दोघे एकाच दुचाकीने जोडमोहा येथे जात होते. अशातच सायंकाळी ६. ३० वाजता जोडमोहा येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दिनेश हा ठार तर राजू हा जखमी झाला. याप्रकरणी रमेश बापूराव मानकर (६०) रा. नांझा यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.
माहुरात गुप्तधन सापडल्याची चर्चा
माहुर – शहरातील गणेश नगरस्थित एका प्लॉटमध्ये गुप्तधन सापडल्याची चर्चा आहे. याप्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक खडसे यांनी केली आहे.
शहरात पुरातन गणेश मंदिराच्या पायथ्याशी प्रभाग क्र. चार मध्ये मधुसुदन भारती यांंचे नावे प्लॉट असून त्यावर मुन्ना नामक व्यक्तीचा ताबा आहे. १२ फेबु्रवारी रोजी सायंकाळी अनमाळ येथील पायाळू व्यक्ती, विदर्भातील एक मौलवी याच्या मध्यतीने येथील सोनेरी टोळीने सदर प्लॉटमध्ये खोदकाम केले. त्यामध्ये दोन सोन्याने भरलेले हंडे सापडले असून टोळी घेऊन पसार झाल्याची चर्चा आहे. ही वार्ता शहरात पसरताच गणेश मंदिराजवळ बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यापूर्वी शहरातील रामगड किल्ला, सोनापिर दर्गा, पुरातन वास्तुतुन गुप्तधन काढण्याचे प्रकार तचेस त्यासाठी नरबळी दिल्याच्या घटनांची पोलीस दप्तरी नोंद आहे. परिसरात नव्याने सोनेरी टोळी सक्रीय झाली असून गुप्तधन शोधण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक खडसे यांनी केली आहे.
सामाजिक न्यायमंत्री ना. शिवीजीराव मोघेंचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
यवतमाळ – सामाजिक न्यायमंत्री ना. शिवीजीराव मोघे यांनी आदिवासी आश्रम शाळा व मराठी डी.एड. कॉलेजला शासनाकडून मान्यता मिळवून देण्यासाठी ४२ लाख रुपये घेतल्याचा आरोप कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण तातडीने निकाली काढण्याची विनंती ना. मोघे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे केली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.
आदिवासी आश्रम शाळ ा व मराठी डी.एड. कॉलेजला शासनाकडू मान्यता मिळवून देण्यासाठी ना. शिवाजीराव मोघे यांनी ४२ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार वडगाव रोड पोलिस ठाण्यात कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यानी केली होती. मंत्र्याच्या विरोधात ही तक्रार असल्याने पोलिसांनी कार्यवाही केली नाही. शेवटी सोलंकी यांनी येथील जेएमएफसी कोर्टात फौजदारी स्वरूपाची तक्रार दिली. त्यामध्ये ना. मोघे, पुतण्या विजय माघे, जि.प. सदस्य देवानंद पवार यांच्याविरूद्घ गुन्हे दाखल करण्याची विनंती केली होती. या प्रकरणात न्यायालयाने तात्काळ गुन्हे दाखल करून ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश वडगाव रोड पोलिसांना दिले होते. तवरून पोलिसांनी २४ जुलै २०११ रोजी भादंवि कलम ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. मोघे मंत्री असल्याने या प्रकरणात हस्ताक्षर तंज्ञाच्या अहवालासह भक्कम पुरावे असताना कोणताही सबळ पुरावा आढळला नाही असे कारण समोर करून ब समरी फायनल न्यायालयात पाठविला. मात्र सोलंकी यांनी अॅड. राजेश साबळे यांच्या मार्फत आक्षेप नोंदवून इश्यु प्रोसस करण्याची विनंती केली. न्यायालयाने २३ आॅगस्ट २०१२ रोजी इश्यु प्रोससचे आदेश देऊन तीघांनाही समन्स बजावण्याचे आदेश दिले. त्यानंतर ना. मोघे यांनी यवतमाळ न्यायालयात खटला रद्द करावा म्हणून उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला. या प्रकरणात उच्च न्यायालयाने कार्यवाहीला स्थगिती दिली. दरम्यान १ फेबु्रवारी रोजी पुन्हा मोघे, पवार याच्या विरूद्घ पारवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मोघे यांनी उच्च न्यायालयात मंगळवारी अर्ज दाखल करून फौजदारी अर्ज तातडीने निकाली काढण्याची विनंती केली होती. मात्र उच्च न्यायालयाने सदर अर्ज फेटाळला.
ट्रक अपघातात एक ठार, तीन गंभीर

नेर – तालुक्यातील वटफळी येथे दोन ट्रकच्या धडकेत एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. हा अपघात एवढा भयानक होता की दोन्ही ट्रकच्या कॅबीन चकनाचूर झाल्या असून मृतदेह काढण्यासाठी तब्बल सहा तासाचा वेळ लागला.
अमरावती वरून तुर घेऊन ट्रक (एम.एच. २०/ ए ए ८१९९) यवतमाळ मार्ग आदिलाबाद येथे जात होता. तर यवतमाळकडून दगडी कोळसा घेऊन औरंगाबाद येथे जाणाºया ट्रकची (टि.एन. ७७ / बि ८२३१) वटफळी या गावाजवळ जोरदार धडक झाली. यामध्ये गोविंद पुनास्वामी (४०) रा भरकसरा तामिळनाडू यांचा जागीच मृत्यू झाला. तर सारवनाथ कुमार (३१) रा. शेद्राभट्टी तामीळनाडू, अनिल रामसिंग सोनवाल (२१) रा. औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले असून अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघाताची माहिती मिळताच जमादार श्रीकृष्ण गुल्हाणे, अरविंद जाधव, प्रतापसिंग ठाकुर यांनी घटनास्थळ गाठून जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. हा अपघात एवढा भयानक होता की, दोन्ही ट्रकच्या कॅबीन चकनाचुर झाल्या असून मृतदेह बाहेरकाढण्यासाठी तब्बल सहा तास लागले. या प्रकरणी नेर पोलिसांनी ेट्रक चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.
‘त्या’पित्यावर खूनाचा गुन्हा
यवतमाळ – सायतखर्डा येथे मुलीला गळफास लाऊन ठार मारल्याप्रकरणी पारवा पोलिसांनी पित्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला. अजय तुकाराम ढवळे (३५) रा. नाचनगाव जि. वर्धा याने अनुष्का (५) या मुलीचा गळा आवळून तीला ठार मारले होते. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वी सायतखर्डा येथे घडली होती. याप्रकरणी पारवा पोलिसांनी अजय ढवळे याच्याविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आर्यरुप टुरिझमचा २४ लाखाचा घोटाळा ९० लाखावर
सिआयडी मुख्यसुत्रधाराच्या मागावर
यवतमाळ – आर्यरुप टुरिझम कंपनीचा २४ लाखाचा घोटाळा आता ९० लाखावर पोहचला असून पोलिसांनी राज्यात ४३ गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा तपास सिआयडी करीत असून कंपनीच्या फरार चार मुख्य संचालकांचा मागावर आहे.
१ जानेवारी २००९ रोजी आर्यरुप टुरिझम कंपनीची स्थापना सातारा जिल्हयातील खटावा येथील रविंद्र शिवाजीराव देशमुख, त्याच्या पत्नी वसुधा उर्फ वैशाली देशमुख व उदयसिंग नारायण घोरफडे रा. कोरेगाव (बाहुली) जि. सातारा, भाटी यांनी स्थापन केली होती. मुंबई येथे या कंपनीचे मुख्य कार्यलय असून नेट बँकीगद्वारे संपूर्ण व्यवहार सुरु होते. या कंपनीच्या एजंटनी ग्रामीण भागातील नागरिकांना हेरून कंपनीत जमा केलेल्या रक्कमेची दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले. या अमिषाला बडी पडून अनेक व्यक्ती, व्यापारी, व्यावसायीकांनी लाखो रुपये गंतवणूक केली. निर्धारीत कालावधीत ग्राहकांनी नेटवर अकांऊटवरील रक्कम पाहिले असता तेथे दामदुप्पट रक्क्मेची नोंद दिसायची. मात्र बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यामध्ये रक्कम जमा केली नसल्याचे उघड होत होते. याप्रकरणी पंजाबराव देशमुख (खडकेकर) यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात या कंपनीच्या विरोधात तक्रार दिली होती. यावेळी २४ लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे चारही संचालक, मुंबईचे लेखापाल नितीन गुप्ते, एजंट विनायक गणपत बोन्सले रा. विडूळ ह.मु. वसंत नगर उमरखेड यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी प्रथम पुसद शहर पोलिसांनी तपास केला. मात्र या गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर असल्याने तपास सिआयडीकडे देण्यात आला. राज्यात या कंपनीविरूद्घ ४३ गुन्हे दाखल झाले असून ग्राहकांची ९० लाख रुपयाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लेखापाल गुप्ते याला अटक केली असून मुख्यसुत्रधार देशमुख दाम्पत्य, घोरफडे, भाटी व एजंट बोन्सले हा तेव्हापासून फरार होता. सिआयडीचे पथक त्याच्या मागावर असून कसुन शोध घेत आहे. या पथकाने यापूर्वीच कंपनीचे कार्यालय, शेती, मालमत्ता सिल केले असून बँकेचे खातेही गोठविल्याची माहिती सिआयडीचे पोलीस उपअधिक्षक सुरेश इंगळे यांनी दिली. सिआयडी पथकाने काल एजंट विनायक गणपत बोन्सलेला अटक केली व न्यायालयात हजर करून १५ फेबु्रवारी पर्यत सिआयडी कोठडी मिळविली.
मंगळावर पाण्याचा प्रवाह
वॉशिंग्टन , वृत्तसंस्था – मंगळावर द्रव स्वरूपातील पाणी अस्तित्वात असल्याचे पुरावे टेहळणी यान आणि ओडिसी यानाने पाठवले असल्याचा दावा अमेरिकी अवकाशसंस्था ‘नासा’ने केला आहे.
अवकाशयानाला मंगळ ग्रहावर गडद, बोटाच्या आकाराच्या खुणा दिसल्या आहेत. तापमान वाढले, की त्या उतारावरून खाली येताना दिसतात. याबरोबरच ग्रहावरील हवामानाच्या बदलांनुसार लोहखनिजांमध्येही बदल होताना दिसत असल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. फेरिक सल्फेटसारखे लोहखनिजयुक्त खारे पाणी गोठत नसल्यामुळे ते हवामानबदलानुसार ग्रहावरून वाहत असावे, असे स्पष्टीकरण यासंदर्भात देता येते. संशोधकांनी या गडद प्रवाहांना ‘रिकरिंग स्लोप लाइन’ (आरएसएल) असे नाव दिले आहे. आतापर्यंत तेरा ‘आरएसएल’ मिळाल्याचे अवकाशसंस्थेने सांगितले आहे. ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर’ आणि ‘इकारस’ या जर्नलमधील दोन अहवालांचे प्रमुख लेखक लुजेंद्र ओझा म्हणाले, ”आरएसएल’मध्ये पाणी असल्याचे आम्ही अद्यापतरी ठामपणे म्हणू शकत नाही. पण, पाण्याशिवाय हा प्रवाह वाहू शकेल, असे आम्हाला वाटत नाही. ‘आरएसएल’ची शक्ती उष्ण हवामानात अधिक असते, तर थंड हवामानात ती कमी असते.’ काही वर्षांपूर्वीच्या प्रतिमांची तुलना या वेळी घेतलेल्या छायाचित्रांशी संशोधक करत आहेत. काही वर्षांपूर्वी ‘आरएसएल’ मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होते, असे संशोधनात दिसून आले आहे.
मेधा पाटकर लोकसभा लढविणार
मुंबई – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज, गुरूवारी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. मात्र अद्याप कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे स्पष्ट केले नाही. येत्या चार ते पाच दिवसांत पक्ष व मतदारसंघाचे नाव सांगणार असल्याचे म्हटले आहे.मेधा पाटकर यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता. पाटकर यांनी यापूर्वी केजरीवालांसोबत अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सहभाग घेतला होता. विविध संघटनांचा समूह असलेल्या जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या मेधा पाटकर या नेत्या आहेत.
सुरक्षारक्षकाचा प्राचार्यांवर कु-हाडीने हल्ला, दोन प्राध्यापकांचा मृत्यू
नाशिक – नाशिकच्या सटाणा महाविद्यालयामध्ये गुरुवारी सकाळी नेपाळी सुरक्षारक्षकाने कु-हाडीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे.
बालबहादूर सिंह असे या हल्लेखोर सुरक्षारक्षकांचे नाव आहे. सकाळी महाविद्यालयाच्या आवारातच त्याने प्राचार्य दिलीप शिंदे, प्राध्यापक सुनील सागर, प्राध्यापक प्रफुल्ल ठाकरे आणि शिपाई दीपक मगरे यांच्यावर हल्ला केला. सर्व जखमींना उपचारांसाठी डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे .हल्लेखोर बालबहादूर सिंहला विद्यार्थ्यांनी आवारातच पकडून चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. नोकरीत कायम करण्याबरोबर पगार वाढवून द्यावा अशी या हल्लेखोराची मागणी होती.मात्र महाविद्यालय व्यवस्थापनाने त्याची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे संतापलेल्या बालबहाद्दूर सिंहने प्राचार्यांवरच हल्ला केला. गेल्या सात वर्षांपासून तो या महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाचे काम करत आहे.
आंध्रतील १८ खासदार निलंबित
नवी दिल्ली- स्वतंत्र तेलंगण राज्याला मान्यता देणारे विधेयक गुरुवारी लोकसभेत सादर होताच लोकसभेला अक्षरश: युध्दभूमीचे स्वरुप आले. तेलंगण विधेयकावरुन जोरदार गदारोळ सुरु असतानाच, तेलंगण समर्थक आणि विरोधक खासदार एकमेकांना भिडले. दरम्यान लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी गोंधळ घालणा-या आंध्रप्रदेशच्या १८ खासदारांना नियम ३७४ अंतर्गत निलंबित केले आहे.
मिरचीपूड फेकणारे खासदार एल राजगोपाल यांच्यासह ध्वनीक्षेपक तोडणारे टीडीपीचे खासदार एम. वेणूगोपाल रेड्डी यांना निलंबित केले आहे. यांच्यासह सब्बम हरी, अनंथा व्यंकटरामी रेड्डी, रायपती संबासिवा राव, एसपीवाय रेड्डी, एम श्रीनिवासुलु रेड्डी, व्ही अरुण कुमार, ए साई प्रताप, सुरेश कुमार शेतकर, केआरजी रेड्डी, बापी राजू कनुमुरी आणि सुखेंदर रेड्डी (सर्व काँग्रेस) तसेच निरामली सिवाप्रसाद, निम्माला क्रिस्तप्पा, के. नारायणा राव (सर्व टीडीपी) आणि वाय एस जगनमोहन रेड्डी, एम राजामोहन रेड्डी (वायएसआर काँग्रेस) या खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे.
लोकसभा अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत या खासदारांमध्ये मारामारी झाली. या दरम्यान विजयवाडाचे निलंबित खासदार एल. राजगोपाल यांनी संसदेत मिरचीपूडचा स्प्रे फवारल्याने काही खासदारांची तब्येत बिघडली. त्यामुळे संसदेत रुग्णवाहिका बोलवून या खासदारांना रुग्णालयात नेण्यात आले. स्प्रे फवारणा-या राजगोपाल यांना अन्य खासदारांनी मारहाण सुरु केल्यानंतर संसदेतील कर्मचा-यांनी मध्ये पडून त्यांची सुटका केली. हा गोंधळ सुरु असताना टीडीपीचे खासदार के. नारायण राव चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगनमोहन रेड्डी यांनी तेलंगण विधेयकाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. हे विधेयक संसदेत मांडण्यात आल्याने सीमांध्र भागातील तीन काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आहेत. लोकसभेत स्वतंत्र तेलंगणचे विधेयक येताच विरोधक खासादारांनी हे विधेयक हिसकावून फाडून टाकण्याचाही प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुक, उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख
कोलकाता- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या वैयक्तिक निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख रुपयांवर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यापूर्वी उमेदवारांना २५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा होती.
पश्चिम बंगालचे सह मुख्य निवडणूक अधिकारी सायबल बर्मन यांनी ही माहिती दिली. २०११ मध्ये याबाबतचा निर्णय झाला होता. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी होणार आहे.नवीन निर्णयावर अनेक पक्ष नाखूश असून त्यांनी ही मर्यादा पुन्हा वाढवण्याची मागणी केली आहे, असे निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्चविषयक स्पेशल ड्युटी ऑफिसर अमित रॉय चौधरी यांनी सांगितले.उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने अधिक कठोर पावले उचलली आहेत. निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीसाठी भरारी पथक, सांख्यिकी भरारी पथक, व्हिडीओ भरारी पथक तैनात करण्यात येणार आहे. ही सर्व पथके खर्च निरीक्षकांच्या अखत्यारित काम करतील, असे रॉयचौधरी यांनी सांगितले.
दोन पोलीसांवर गुन्हे दाखल
यवतमाळ – पांढरकवडा येथून दुचाकीने यवतमाळकडे येणाºया वकीलासोबत वाद करून वाहन ढकलुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी न्यायालयाने दोन पोलीस कर्मचाºयांविरूद्घ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून दोन पोलीसांवर शहर ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल केले.
अॅड. गाझी इबादुल्ला सनाउल्ला खान (३० ) रा. मंगलपुर्ती ले आऊट पांढरकवडा हे ११ मार्च २०११ रोजी आपल्या गावावरून एम.एच. २९ / एस ४८८६ क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळकडे येत होते. अशातच सकाळी ९.३० वाजता पांढरकवडा मार्गावरील चौपाल सागर जवळ वाहतुक पोलीस शिपायी निवृत्ती तुळशीराम कुळसंगे (३८) व त्याचा अन्य एक साथीदाराने सदर वकीलाची दुचाकी अडवून त्याचेशी धक्काबुक्की करून जीवे मारण्याच्या उद्देशाने ढकलून दिले होते. यात तो जखमी झाला होता. याप्रकरणी तक्रार देऊनही पोलिसावर गुन्हा दाखल केला नव्हता. शेवटी खान याने न्यायालयात तक्रार दिली होती. अखेर या प्रकरणात न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले. त्यावरून कुळसंगे व त्याच्या साथीदारवर भादंवि ३०७, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
आता डिझेलवरील आॅटोनाही मिळणार परवानगी
पेट्रोलवरील रिक्षा चालवण्याची अट शिथिल
यवतमाळ – पूर्वी पेट्रोलवरील रिक्षांनाच परवाना मिळत होता, मात्र परिवहन विभागाने ही अट शिथील केली आहे. त्यामुळे आता डिझेलवर धावणाºया आॅटोंनाही परवानगी मिळणार असून चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पेट्रोल व डिझेलवरील आॅटोचे भाडे सारखेच राहणार असल्याने प्रवाशांसाठी आॅटोचालकांत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यवतमाळ जिल्ह्यात १९७० मध्ये आॅटो व्यवसाय सुरु झाला. परिवहन विभागाकडून फक्त पेट्रोलवर धावणाºया आॅटोंनाच परवानगी मिळत होती. आजमितीस जिल्ह्यात हजारो आॅटो असून भाड्याचे दर पेट्रोलच्या किमतीवरून ठरविण्यात आले आहे. नविन रिक्षा परवान्यांवर डिझेल आणि एलपीजी रिक्षाही चालवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी अनेक आॅटोरिक्षा युनियनने परिवहन आयुक्ताकडे केली होती. या पार्श्वभूमिवर गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा आणि परिवहन सचिवाची बैठक पार पडली. या मध्ये नविन आॅटोरिक्षा परवान्यांवर फक्त पेट्रोलवरील रिक्षा चालवण्याची अट राज्य शासनाने शिथिल केली.त्यामुळे आता डिझेल वरील आॅटोंनाही परवाना मिळणार आहे. त्यामुळे आॅटो चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र दोन्ही आॅटोच्या भाड्याचे दर हे सारखे राहणार आहे. पेट्रोलवर आॅटो चालविणाºया चालक-मालकाला परवडणार नसून डिझेलवरील आॅटो चालविणाºयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे प्रवाशी नेण्यावरून चालक-मालकामध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रीया आॅटो युनियनचे उपाध्यक्ष भारमल स्वामी यांनी दिली.
राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची
प्रवेश परीक्षा जून मध्ये
यवतमाळ – राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय डेहराडून (उत्तरांचल) येथे प्रवेश घेवू इच्छिणाºया महाराष्ट्रातील मुलांसाठी १ व २ जून रोजी पुणे येथ प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ३१ मार्च पर्यंत विहित नमुना अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रासह सादर करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे येथील आयुक्त शिवाजी पांढरे यांनी केले.
या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय १ जानेवारी २०१५ रोजी सोड अकरा वर्षापेक्षा कमी व १३ वर्षापेक्षा अधिक नसावे म्हणजेच त्या विद्यार्थ्यांचा जन्म २ जानेवारी २००२ ते १ जुलै २००३ या कालावधीतील असावा. तसेच तो विद्यार्थी १ जानेवारी २०१५ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ७ वी त शिकत असावा किंवा ७ वी पास असावा.
सदर परीक्षेसाठी आवेदन पत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात येत आहे. अनुसूचित जाती/जमातीसाठी ४०५ रुपयाचा तर सवर्साधारण संवर्गातील विद्यार्थ्यांनी ४५० रुपयाचा स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेचाच ड्राफ्ट कमांडंट, आर.आय.एम.सी.डेहराडून यांचे नांवे काढून ड्राफ्टवर पेअबलट डेहराडून (तेलभवन बँक कोड नं ०१५७६) अशी नोंद करावी. अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्याच्या प्रती सोबत सादर करणे आवश्यक आहे. ड्राफ्ट मिळाल्यानंतर आवेदन पत्र, माहितीपत्र व पाच वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचा संच, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून स्पीड पोस्टने पाठविण्यात येईल. किंवा विद्यार्थी राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज डेहराडून, उत्तरांचल २४८००३ यांचेकडून सुध्दा आवेदन पत्र प्राप्त करुन घेऊ शकतात.
विद्यार्थ्यानी वर नमुद केल्याप्रमाणे डिमांड ड्राफ्ट काढून आवेदन पत्र मागवावे व परिपूर्ण भरलेले आवेदन पत्र ३१मार्च पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद १७ डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४११००१ या पत्यावर पाठवावित. मुदतीनंतर प्राप्त होणारी आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार नाही. आवेदन पत्रासोबत जन्मतारखेचा दाखलची (अनुसूचित जाती/जमातीसाठी) जातीच्या दाखल्याची छांयाकित प्रत व्दिप्रतीत तसेच बोनाफाईड सर्टीफिकेट सादर करणे आवश्यक आहे.
परिक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान या तीन विषयाचे लेखी पेपर आहेत. परिक्षर्थींना गणित व सामान्य ज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल. या विषयाच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदीमध्ये उपलब्ध होतील. लेखी परिक्षेत उत्तिर्ण होणºयां विद्यार्थ्यांच्या मुलाखती ९ आॅक्टोंबर रोजी घेण्यात येतील.
उन्हाळी हंगामासाठी अरुणावती प्रकल्पाचे सिंचन नियोजन
यवतमाळ – अरुणावती प्रकल्प विभाग दिग्रस यांच्यावतीने अरुणावती प्रकल्पाच्या उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील तसेच अडाण प्रकल्प कालव्याच्या १५ कि.मी. क्षेत्रातील लाभार्थी शेतकºयाच्या उन्हाळी हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अरुणावती प्रकल्पातंर्गत दिग्रस, आर्णी, दारव्हा व वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील लाभार्थीसाठी ३ हजार हेक्टर तर अडाण प्रकल्पाअंतर्गत १ हजार हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचे पाणी देण्याचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे.
उन्हाळी हंगामासाठी प्रामुख्याने भूईमुंग व इतर उन्हाळी पिकांचा समावेश आहे. तरी उपलब्ध पाणी योग्य प्रकारे वापरण्यासाठी शेतकºयांनी पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन कायर्कारी अभियंता रा.अ.काटपल्लीवार, यांनी केले आहे. ज्या लाभार्थी शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकबाकी शिल्लक आहे. त्यांनी पाणीपट्टी थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्याशिवाय त्यांना उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार नाही याची नोंद घ्यावी. लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पाणी व्यर्थ वाया जाणार नाही यासाठी पाटचाºयांची साफसफाई करुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे.
उन्हाळी हंगामाचे पाणी वाटपाचे वेळापत्रक तयार करण्याची कायर्वाही सुरु असून पाण्याची पहिली पाळी १ एप्रिल २०१४ रोजी सुरु होईल तर शेवटची पाळी ३० जून अशी राहील. या बाबतचा सविस्तर कार्यक्रम ग्रामपंचायत व पाणी वाटप संस्थांना कळविण्यात येणार आहे, असे कायर्कारी अभियंता, अरुणावती प्रकल्प विभाग दिग्रस यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.









