पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December, 2014

उसाच्या ट्रॉलीवर व्हॅन धडकून ५ ठार 0

उसाच्या ट्रॉलीवर व्हॅन धडकून ५ ठार

apghat1
नगर दि. १४ (प्रतिनिधी) – रस्त्याच्या कडेल्या उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला ओम्नी व्हॅन धडकून झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील पाच जण ठार झाले. हे सर्व जण नातेवाईकाच्या लग्नासाठी चाळीसगावला जात असताना रविवारी सकाळी ११ वाजता नगर-औरंगाबाद हायवेवर माळी चिंचोरा फाट्याजवळ (ता. नेवासा) हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले.
रमेश शंकर सोनार (६२), विमल रमेश सोनार (५०), रमेश एकनाथ सोनवणे (६२), शालिनी रमेश सोनवणे (५५), अजय दत्तात्रय घोडके (५०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अश्विनी अजय घोडके (५०) गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्वजण पुण्यातील हडपसर व पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत.

December 14, 2014 in मुख्य पान
गॅस टँकरच्या स्फोटात १० ठार 0

गॅस टँकरच्या स्फोटात १० ठार

2014-12-14~tankerblast_ns
जयपूर, दि. १४ (प्रतिनिधी) –  राजस्थानमध्ये जयपूरजवळ एका गॅस टँकरने पेट घेतल्याने झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून १२ जण ठार झाले आहेत. बीलपूर गावापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या महामार्गावर शनिवारी रात्री एका गॅसच्या टॅंकरने पेट घेतला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यावेळी महार्गावरून इतर वाहनेही जात होती. त्यातील काही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला तर १२ जण जखमी झाले आहेत.अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती, मात्र आता पूर्ववत झाली आहे.

December 14, 2014 in मुख्य पान
झारखंडमध्ये ६१ तर काश्मीरमध्ये ४९ टक्के मतदान 0

झारखंडमध्ये ६१ तर काश्मीरमध्ये ४९ टक्के मतदान

index
रांची/ श्रीनगर, दि. १४ – झारखंडमध्ये चौथ्या टप्प्यात ६१ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये ४९ टक्के मतदान झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी तर झारखंडमध्ये १५ जागांसाठी सकाळी सातपासून मदतान सुरू झाले.
काश्मीरमध्ये १८ जागांसाठी १८२ उमेदवार रिगणात होते ७.०५ लाख महिलांसह सुमारे १४ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीनगर, अनंतनाग, शोपियन व सांबा जिल्ह्यातील १ हजार ८९० मतदान केंद्रांवर  मतदान झाले. दहशतवादी हल्ला तसेच खराब वातावरण असतानाही मतदारांनी मोठ्या संख्यने मतदानाचा हक्क बजावला.झारखंडमध्ये १५ जागांसाठी २१७ उमेदवार असून सुमार ४३ लाख नागरिकांनी मतदान करून त्यांचे भविष्य मतपेटीत बंद केले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

December 14, 2014 in मुख्य पान
तांड्याला महसुली दर्जा देण्यासाठी प्रयत्न करु  - संजय राठोड 0

तांड्याला महसुली दर्जा देण्यासाठी प्रयत्न करु – संजय राठोड

VMK_5307 copy

यवतमाळ, दि. 13 : बंजारा समाजाचे अजूनही अनेक प्रश्न, समस्या आहे. त्या सोडविण्याला आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. दुर्गम भागात वसलेले तांडे विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना महसुली दर्जा द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
नागपूर शहर बंजारा समाजाच्यावतीने श्री. राठोड यांचा मॉरिश कॉलेजच्या सभागृहात आयोजित समारंभात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार मनोहर नाईक, आ. हरिभाऊ राठोड, माहिती संचालक मोहन राठोड, यवतमाळ जिल्हा परिषदचे सदस्य दिवाकर राठोड, ॲङ अमर चव्हाण, राजाराम जाधव आदी उपस्थित यावेळी सत्काराला उत्तर देतांना श्री. राठोड यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असून या पुढेही समाजसेवेचे काम आपल्याकडून सुरु राहणार असल्याचे सांगितले. समाजकारण करत असतांना राजकारणाचा विचार केला नाही. लोकांची कामे प्राणिकपणे केली. आताही सर्वसामान्यांचा आवाज शासन दरबारी बुलंद करण्याचे काम करत राहू.बंजारा समाजाचे आजही अनेक प्रश्न, व्यथा आहे. त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. बंजारा समाजाचे पारंपारिक तांडे या समाजाची खरी ओळख आहे. परंतु हे तांडे अद्यापही दुर्लक्षित आहे. तांड्यांमध्ये विकासाची कामे झाली पाहीजे. तांड्याला महसुली दर्जा मिळाला पाहीजे, यासाठी जातीने लक्ष घालणार आहे, असे श्री. राठोड पुढे बोलतांना म्हणाले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना माजी मंत्री आ. मनोहर नाईक यांनी संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या विकासासाठी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. समाजाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थाने काम करणारा कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. हरिभाऊ राठोड, प्रा. मोहन चव्हाण, ना.मा. जाधव यांचेही भाषणे झाली. यावेळी संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच मनोहर नाईक व हरिभाऊ राठोड यांचाही यावेळी सत्कार झाला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. लक्ष्मण राठोड यांनी केले तर आभार टी.एन. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी राजू चव्हाण, मनोज राठोड, निहाल राठोड, प्रवीण राठोड, प्रा. सुजित चव्हाण, कुंदन शेरे, दिनानाथ वाघमारे, मुंकुंद आडेवार, एकनाथ पवार, प्रा. वसंत पवार यांनी सहकार्य केले.

December 13, 2014 in मुख्य पान
 पत्नीने केला दारुड्या पतीचा खून 0

पत्नीने केला दारुड्या पतीचा खून

qnoxy
यवतमाळ,दि. १३ (प्रतिनिधी) – दारूने अनेककांचे संसार उद्घवस्त झाले आहे. दारू पिऊन येणाºया पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच कुºहाडीने खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री पार्डी येथे घडली. याप्रकरणी वडकी पोलिसांनी आरोपी महीलेला अटक करून तीन दिवस पोलीस कोठडी मिळविली आहे.
नानाजी मुनेश्वर असे मृतकाचे नाव आहे. तो दररोज दारू पिऊन पत्नी  बेबी मुनेश्वर (५५) हिला शारीरीक व मानसिक त्रास देत होता. दारूसाठी पैशाची मागणी करीत तिला मारहाण करीत असायचा, दारू पिऊन आल्यानंतर तिला वेठीस धरायचा. दररोजच्या त्रासाला बेबी कंटाळून गेली होती. अशातच काल रात्री दोघा पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी रागाच्या भरात बेबीने घरातील कुºहाड घेवून नाननाजीच्या डोक्यात सपासप वार केले. यामध्ये गंभिर जखमी झालेल्या नानाजीला नातेवाईकांनी सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यानी अपघातामध्ये नानाजी जखमी झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर रात्री सदर इसमाचा मृत्यू झाला. याबाबत संजय मुनेश्वर (३५) रा. पार्डी याने वडकी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला राळेगाव येथील न्यायालयात हजर करून १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळविली. अधिक तपास वडकीचे ठाणेदार अमोल माळवी करीत आहे.

December 13, 2014 in मुख्य पान
नथुराम गोडसे खुनीच -मुख्यमंत्री 0

नथुराम गोडसे खुनीच -मुख्यमंत्री

250px-Nathuram_godseindex.jpeg0
नागपूर : नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली आहे. तो खुनीच आहे. त्यामुळे गोडसेचा कुठल्याही प्रकारे गौरव करणो राज्य सरकार खपवून घेणार नाही. असे प्रयत्न करणा:यांवरही कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली.
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला होता. एका संघटनेने गोडसे याचा जन्मदिवस पनवेलमध्ये शौर्य दिवस म्हणून साजरा केला. भारतीय लोकशाहीने ज्या खुन्याला फाशी दिली त्याचा असा गौरव केला जात असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे ते म्हणाले.

December 13, 2014 in मुख्य पान
 आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आव्हाड निलंबित 0

आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आव्हाड निलंबित

images
नागपूर : विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना चालू अधिवेशन संपेर्पयत निलंबित करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडलेला निलंबनाचा प्रस्ताव  मंजूर करण्यात आला.
आव्हाड यांनी नाथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणा:यांवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी त्यावर निवेदन केले. यावर आव्हाड पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करीत असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता मध्येच बोलायला उठले. अध्यक्षांनी त्यांना बसण्यास सूचना केली असता महेता अध्यक्षांनाच ‘तुम्ही थांबा’, असे म्हणाले. हा अध्यक्षांचा अवमान असल्याचा मुद्दा पुढे करीत आव्हाडांसह विरोधी सदस्यांनी नारेबाजी केली. या वेळी महेता व छगन भुजबळ यांच्यात खटके उडाले. या गोंधळात मुख्यमंत्री बोलत असताना आव्हाडांनी जागेवर बसून आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे त्यांना निलंबित केले गेले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सभात्याग केला.

December 13, 2014 in मुख्य पान
अपघातात भय्यू महाराज जखमी 0

अपघातात भय्यू महाराज जखमी

2014-12-13~4-03_ns
बीड : राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या कारचे टायर फुटल्याने त्यांच्यासह इतर दोघे किरकोळ जखमी झाले. अंबाजोगाई- युसुफवडगाव रोडवरील कळंबनजीक शुक्रवारी रात्री सव्वानऊला हा अपघात झाला. परळी येथे गोपीनाथ गड स्मारकाचे भूमिपूजन आटोपून परतत असताना कळंबनजीक त्यांच्या कारसमोर एक गाय आली. तिला वाचविताना गाडीचे टायर फुटले. या अपघातात भय्यू महाराज यांच्या पायाला किरकोळ जखम झाली.

December 13, 2014 in मुख्य पान
भारत ४८ धावांनी पराभूत 0

भारत ४८ धावांनी पराभूत

index
अॅडलेड, दि. १३ – मुरली विजय (९९) व विराट कोहलीच्या (१४१) झुंजार खेळीनंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. तळाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्याने भारताचा डाव ३१५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या लिऑनने ७ बळी टिपत भारताचा डाव गुंडाळला.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी ३६४ धावांचे आव्हान ठेवले होते. धवन (९) व पुजारा (२१) पटापट बाद झाल्यानंतर मुरली विजय (९९) व विराट कोहली (१४१) यांची जोडी जमली. त्यांनी शानदार खेळ करत भारताला विजयाच्या समीप नेले. कर्णधार म्हणून पदार्पण करणा-या कोहलीने या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकली. मुरली विजयही शतकाच्या अगदी जवळ होता. मात्र ९९ धावावंर असताना लिऑनच्या चेंडूवर तो पायचीत झाला. नंतर आलेला रहाणे शून्यावर तर रोहित शर्मा ६ धावांवर बाद झाला. भारतीय फलंदाज एका पाठोपाठ तंबूत परतत असताना विराटने कर्णधाराला साजेसा खेळ करत भारताची बाजू सावरून धरली होती. मात्र तो १४१ धावांवर असताना बाद झाला व त्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. शमी (५), अॅरॉन शर्मा (१) व इशांत शर्मा( १) हे खेळाडू फक्त हजेरी लावून तंबूत परतले. भारताला विजयासाठी अवघ्या ४८ धावांची गरज असताना भारताचे सर्व फलंदाज बाद झाले व चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने खिशात टाकत १-० अशी आघाडी मिळवली.

मोदींनाही अटक करणार का? - ममता बॅनर्जी 0

मोदींनाही अटक करणार का? – ममता बॅनर्जी

mamt
कोलकाता- शारदा चिटफंड घोटाळ्यात सीबीआयने राज्याचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांना अटक केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच खवळल्या असून ‘सहाराप्रमुखांसोबत फोटो आहे म्हणून सीबीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अटक करणार का?’, असा थेट सवाल ममतांनी आज केला.
शारदा घोटाळ्यामुळे ममता विरूद्ध केंद्र सरकार असा उघड संघर्ष सुरू झाला आहे. ममतांनी आजपासून मित्रा यांच्या अटकेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी तसेच सीबीआयच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला केला. ‘सहारा’ घोटाळ्यात सुब्रतो रॉय यांना अटक झाल्यानंतर ‘सहारा’च्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या डायरीत अनेक बडी नावे आढळून आलीत. सहाराप्रमुखांसोबत पंतप्रधान मोदींचाही फोटो आहे. मग फोटो हा जर गुन्ह्याचा पुरावा ठरत असेल तर सहाराप्रमुखांसोबत फोटो आहे म्हणून पंतप्रधानांनाही अटक व्हायला हवी, अशी मागणी ममतांनी केली.
शारदा चिटफंडच्या एका कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजमुळे मित्रा अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर ममतांनी मोदींच्या फोटोचा मुद्दा छेडला. शारदा चिटफंडच्या प्रमुखासोबत सीपीएमच्याही अनेक नेत्यांचे फोटो आहेत. त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही, असा सवालही ममतांनी केला.
राजकारणाच्या आखाड्यात भाजप तृणमूलशी लढू शकत नाही त्यामुळेच सीबीआयला हाताशी धरून आम्हाला काऊंटर केलं जात आहे. भाजपच्या या राजकारणाविरोधात सामान्य जनताही आमच्यासोबत आहे, असे ममता म्हणाल्या. जे सत्तेत आहेत त्यांनी आपल्या मर्यादेत रहायला हवे, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला.
मित्रा मंत्रीपदी कायम!
मदन मित्रा यांना अटक करण्यात आली असली तरी ममतांच्या मंत्रिमंडळात मित्रांचं स्थान कायम राहणार आहे. मित्रा यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खात्याचा कार्यभार मी पाहणार आहे, असे ममतांनी सांगितले.

December 13, 2014 in मुख्य पान
लग्नांमुळेही शेतकरी कर्जबाजारी - केंद्रीय कृषिमंत्री 0

लग्नांमुळेही शेतकरी कर्जबाजारी – केंद्रीय कृषिमंत्री

radhamohan
नवी दिल्ली -‘देशातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे मुख्य कारण शेतीसाठी घेतले जाणारे कर्ज नाही, तर कृषिकर्जांसह विविध कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या सततच्या नुकसानीमुळे अपेक्षित उत्पादन न मिळणे, आरोग्य आणि लग्न समारंभासारख्या इतर बाबींवर होणार खर्च हे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे मुख्य कारण आहे,’ अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत बोलताना दिली.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना राधामोहनसिंह म्हणाले, ‘बीटी कॉटनसह विविध पिकांसाठी घेतले जाणारे कर्ज हे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे मुख्य कारण नाही. तसा एक गैरसमज आहे. या कर्जबाजारीपणासाठी आर्थिक, सामाजिक कारणेदेखील तितकीच महत्त्वाची आहेत.’ ‘महाराष्ट्रात बीटी कॉटनची शेती मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले नाहीत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी बीटी कॉटनची लागवड केली होती. एकूण क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रांवर बीटी कॉटनची लागवड केली जात आहे. कृषिमूल्य आणि उत्पादन आयोगाने (सीएसीपी) केलेल्या शिफारशीनंतर शेती उत्पादनाची किमान हमी भाव (एमआरपी) सरकार जाहीर करते. सरकार नैसर्गिक आपत्ती, रोगांचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठी शेती विमा योजना राबवित आहे,’ असेही एका प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री म्हणाले.

December 12, 2014 in मुख्य पान
पवार, भुजबळांची ‘एसीबी’ चौकशी 0

पवार, भुजबळांची ‘एसीबी’ चौकशी

abt
मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात रान पेटवणाऱ्या, त्यांचं नामकरणच ‘भ्रष्टाचारवादी’ असं करणाऱ्या भाजपनं आता घोटाळ्यांचे आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांभोवती फास आवळला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे या त्रिकुटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा भलताच गाजला होता. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर या घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावरून अजित पवार यांचं राजीनामानाट्यही रंगलं होतं. परंतु, या घोटाळ्याच्या चौकशीच्या फंदात आघाडी सरकार पडलं नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्षच केलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या ‘फायली’ आता निकाली काढल्यात.
सिंचन घोटाळाप्रकरणी पवार, तटकरेंची आणि दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’ बांधकामप्रकरणी छगन भुजबळ यांच्या खुल्या चौकशीची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं गृहखात्याकडे मागितली होती. त्याला गृहखात्यानं मंजुरी दिल्यानंतर दोन घोटाळ्यांच्या वेगळ्या फाइल्स ‘राजभवन’वर गेल्या होत्या. त्यावर निवडणूक निकालानंतर राज्यपालांनी स्वाक्षरी केली होती. आता मुख्यमंत्र्यांनीही या तीन मंत्र्यांच्या एसीबी चौकशीला हिरवा कंदील दिला आहे. राज्याचे महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी नागपूर हायकोर्टात याबाबत माहिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.अर्थात, कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया पवार, तटकरे, भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

December 12, 2014 in मुख्य पान
देशीदारूसह कार जप्त, एकास अटक 0

देशीदारूसह कार जप्त, एकास अटक

IMG-20141212-WA0059_resized
यवतमाळ , दि. १२ ( प्रतिनिधी)- कारमधून अवैधपने देशी दारुची वाहतुक करणाºया एका आरोपीस जोडमोहा येथे अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकाºयाच्या पथकाने ही कार्यवाही केली असून देशीदारू व कार जप्त केली.
हरिभाऊ तुळशिराम नक्षणे (३९) रा. रुंझा असे आरोपीचे नाव आहे. एम.एच. २९/ ९९६० क्रमांकाच्या कारमधून जोडमोहा येथून रुंझाकडे देशी दारू नेत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिक्षक राहुल मदने याच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचुन जोडमोहा येथे सदर वाहन अडवून पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारुच्या १२ पेट्या आढळल्या. पोलिसांनी नक्षणे याना अटक करून कार व देशी दारू असा एकुण १ लाख २४ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक वसंता मडावी,  जमादार राहुल मनवर, इकबाल शेख, संतोष मडावी, ऋतुराज मेंढवे यांनी केली.

December 12, 2014 in विदर्भ
बाभुळगावचे ठाणेदार बाविस्कर ‘एसीबी’च्या जाळ््यात, पीएसआयदेखील रडारवर 0

बाभुळगावचे ठाणेदार बाविस्कर ‘एसीबी’च्या जाळ््यात, पीएसआयदेखील रडारवर

Devsing  Bawiskarssss.jpg 0
यवतमाळ , दि. १२ (प्रतिनिधी)- चोरीला गेलेल्या ट्रकचा पंचनामा तयार करून त्याची प्रत देण्यासाठी वीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी करणाºया बाभुळगाव येथील ठाणेदारास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने आज अटक केली. देविसिंग बाविस्कर असे लाचेची मागणी करणाºया ठाणेदाराचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन सेलोकार एसीबीच्या रडारवर असून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
ठाणेदार देवसिंग बाविस्कर व पोलीस उपनिरीक्षक सचिन सेलोकार या दोघांनी चोरीला गेलेल्या ट्रकचा पंचनामा तयार करून त्याची प्रत देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावरून ठाणेदार बाविस्कर यांना आज चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तर पोलीस उपनिरीक्षक सेलोकर नागपूर येथे गेले असल्याने त्यांना ताब्यात घेता आले नाही. या घटनेमुळे पोलिस वतुर्ळात मोठी खळबळ उडाली. मो. जावेद, रा. अमरावती यांनी ट्रक चोरी गेल्याची तक्रार बाभूळगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पंचनाम्याची प्रत देण्यासाठी मो. जावेद यांनी बाभूळगाव ठाणेदाराशी संपर्क साधला होता. दरम्यान ही प्रत देण्यासाठी वीस हजार रूपयांची मागणी दोन्ही पोलीस अधिकाºयांनी मो. जावेदकडे केली होती. त्यानुसार मो. जावेद यांनी सदरचे संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवले होते. या बाबतची तक्रार त्यांनी लाचलुचपत विभागाकडे ५ नोव्हेंबर रोजी दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने पंचांसमक्ष चौकशी सुरू केली. त्यानंतर आज दुपारी १२.३० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर ताफ्यासह  बाभूळगाव पोलीस ठाण्यात धडकले. यावेळी पोलिस निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांना शासकीय निवास स्थानातून अटक करण्यात आली. ठाणेदाराच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली असून या वेळी मोठी रोकड सापडल्याची चर्चा पोलिस दलात चर्चील्या जात होती. पोलीस दलाचे दोन अधिकारी एकाच वेळी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकण्याची बाभूळगाव तालुक्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे कर्मचाºयात खळबळ उडाली आहे.

December 12, 2014 in मुख्य पान
शेतकरी विधवांना आर्थिक मदत करणार, राजूदास जाधव यांची माहिती 0

शेतकरी विधवांना आर्थिक मदत करणार, राजूदास जाधव यांची माहिती

5
यवतमाळ , दि. १२ ( प्रतिनिधी)- यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्षाला १७ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे. त्यानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना आर्थिक मदत करणार असल्याची माहीती पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
१७ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणीवेचा भाग म्हणून विधवांना पाच   हजार रुपये व साडी-चोळी देऊन मदतीचा हात देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. १७ डिसेंबर रोजी पंचायत समितीत प्रभारी सीईओ शरद कुळकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपन होणार आहे. १८ डिसेंबर रोजी पतसंस्था कर्मचाºयांचा गौरव करण्यात येणार आहे. १९ डिसेंबरला आर्णी तालुक्यातील उमरी पठाण येथील वृध्दाश्रमात वृध्दांना मदत करण्यात येणार आहे. २० डिसेंबर रोजी सहकार भवन वडगाव येथे हृदयरोग व मधूमेह तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. तसेच हास्यसम्राट टिव्ही स्टार डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा ‘मिर्झा एक्सप्रेस’ हा कार्यक्रम होणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी आ. मनोहर नाईक यांचे अध्यक्षतेखाली महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी आ. माणिकराव ठाकरे, आ. हरीभाऊ राठोड, आ. संदीप बाजोरीया, आ. मदन येरावार, आ. ख्वाजा बेग, आ. अशोक उईके, आ. राजू तोडसाम, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. राजेंद्र नजरधने, जि.प.अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांना निमंत्रित करण्यात आल्याचे राजूदास जाधव यांनी सांगितले. २२ डिसेंबर रोजी नेत्ररोग तपासणी शिबीर होणार आहे. २३ डिसेंबर रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप व सहकार मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, समाज कल्याण सभापती लता खांदवे, महीला व बालकल्याण  सभापती विमल चव्हाण उपस्थित राहणार आहे. याकार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजूदास जाधव यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष पवन आत्राम, सचिव राजेंद्र राऊत, राजेंद्र पिंपळशेंडे, शरद घारोड, संजय गावंडे, नंदेश चव्हाण उपस्थित होते.

December 12, 2014 in मुख्य पान
मनीष काळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन 0

मनीष काळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

News 2 ok pravin
यवतमाळ, दि. १२ ( प्रतिनिधी)- राळेगाव येथील मनीष काळे यांच्या एक अधिक एक अकरा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार १४ डिसेंबरला पंचायत समिती सभागृह राळेगाव येथे सकाळी ११ वाजता होत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला प्रकाशक म्हणून ज्येष्ठ कवी तथा विदर्भ साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा बॅरीस्टर गुलब्याकार शंकर बडे हे उपस्थित राहणार असून, माजी विधानसभा उपाध्यक्ष म. रा. प्रा. वसंत पुरके हे अध्यक्षस्थानी असतील. यवतमाळ श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन पखाले मार्गदर्शक तर गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष विलासराव भोयर, उपविभागीय अधिकारी मोहन जोशी, तहसीलदार सुरेश कव्हळे, प्रा. सदानंद चौधरी प्रमुख अतिथी असतील.
एक अधिक अकरा या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला साहित्य, कला क्षेत्रातील रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रचना प्रकाशन तथा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

December 12, 2014 in विदर्भ
महिलेवर सामूहिक शारीरिक अत्याचार 0

महिलेवर सामूहिक शारीरिक अत्याचार

5486_gangrape-58_copy
यवतमाळ , दि. १२ (प्रतिनिधी) -बसच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलेला नियोजित स्थळी सोडून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक शारीरिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी अशोक निळ (२८) व गोपाल सुक्ते (३८) या दोघांना अटक केली आहे.
काल रात्री ९ वाजता दरम्यान घाटंजी बसस्थानकावरून यवतमाळ जाण्यासाठी एक विवाहित महिला बसच्या प्रतिक्षेत उभी होती. महिला एकटी असल्याची संधी साधून ओमनी एमएच २२ एच २८८१ हे वाहन येऊन उभे राहिले. यवतमाळला जायचे आहे का अशी विचारणा करून वाहनात बसविले. त्यानंतर वाहन खापरीमार्गे यवतमाळला जायला निघाले असता रस्त्यातील कानोजा टेकडी जवळ सदर वाहन थांबवून त्या महिलेस धाक दाखवून वाहन चालक अशोक निळ (२८) व गोपाल सुक्ते (३८) या दोघांनी अत्याचार केला. त्यानंतर सदर वाहन यवतमाळ येथे नेऊन तेथेही त्या महिलेवर रात्रभर आळीपाळीने अत्याचार केला. पीडित महिलेला सकाळी यवतमाळ येथील बस स्थानकावर नेऊन सोडून दिले. नंतर सदर महिलेने घाटंजी गाठून घडलेल्या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांविरूध्द गुन्हा नोंद करून अशोक निळ व गोपाल सुक्ते यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत  ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

December 12, 2014 in मुख्य पान
ट्रेलरची टाटा मॅजिकला धडक, चौदा जखमी 0

ट्रेलरची टाटा मॅजिकला धडक, चौदा जखमी

IMG-20141212-WA0060_resized
यवतमाळ, दि. १२ (प्रतिनिधी)- पांढरकवड्यावरून यवतमाळकडे येणाºया ट्रेलरने टाटा मॅजिकला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये चार गंभिर तर दहा जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास नागपूर बायपासवर घडली.
मिथून आडे, मोहन राठोड, मोहन वारई, कुषक पवार, प्रनिता मोडदे, लता कोडापे, परमेश्वर रानडे, संजय फुलझले, रोशन इंगोले, भाग्यश्री पवार, आशा उईके अशी जखमींची नावे आहे. पाढंरकवडा येथून येत असलेल्या एम. एच. ३१ पीजी ४५०५ क्रमांकाच्या ट्रेलरने नागपूर बायपासनजिक यवतमाळवरून प्रवासी घेवून पांढकवड्याकडे जाणाºया टाटा मॅजिकला समोरासमोर धडक दिली. या धडकेत टाटामजिक मधिल चौदा प्रवासी जखमी झाले. यामध्ये चौघांना गंभिर दुखापत झाली असून, त्यांना सुरुवातीला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर नागपूर हलविण्यात आले आहे. दहा प्रवाशांवर येथीलच रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

December 12, 2014 in मुख्य पान
१५ ला शेतकºयांचा रास्तारोको 0

१५ ला शेतकºयांचा रास्तारोको

raj0411
यवतमाळ ,दि. १२ (प्रतिनिधी)- कृषी मुल्य आयोग रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी १५ डिसेंबरला रास्तारोको करण्यात येणार असल्याची माहिती आज शुक्रवारी नगरवाचनालय भवनात आयोजित पत्रकार परीषदेत अशोक भुतडा यांनी दिली. सत्तेत कोणीही असो, शेतकºयाला केवळ नागविण्याचे काम सुरू आहे. खताचे वारेमाप भाव असून, शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव दिल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून मुक्त होण्याऐवजी त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. परीणामी शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबित असून, शेतकºयांच्या हिताचे धोरण राबविण्यात येत नसल्याचा आरोप यावेळी भुतडा यांनी केला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी मुल्य आयोगच रद्द करण्याची गरज असून, कृषी मालाचे दर स्वामीनाथन समिती नुसार मिळावे यासाठी १५ तारखेला तळेगाव भारी येथे सकाळी शेतकरी रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे यावेळी अशोक भुतडा यांनी सांगितले. पत्र परिषदेला चंपालालजी लोणावत, ब्रिजेश शुक्ला महिपाल प्रधान, निरंजन देशपांडे, नितीन मोरघडे आदी शेतकरी उपस्थित होते.

December 12, 2014 in विदर्भ
शेतकऱ्यांना ७ हजार कोटीं पॅकेज 0

शेतकऱ्यांना ७ हजार कोटीं पॅकेज

images9453_farmer
नागपूर दि. ११  (विशेष प्रतिनिधी)- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७ हजार कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचवेळी ‘खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका, सरकार तुमच्या पाठिशी आहे’, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निकशानुसार मदत देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एकरी किमान ४ हजार ५०० रुपयांची मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पाच लाख शेतकऱ्यांची सावकारी कर्जाच्या पाशातून मुक्तता करण्याची तसेच मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना तीन महिन्यांची वीज बिल माफी देण्याची हमी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. कर्जमाफीने बँकांमधील कर्ज माफ झाले तरी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचे ओझे मात्र शेतकऱ्यांच्या डोक्यावर कायम राहत होते. त्या तणावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत होते. ही बाब लक्षात घेऊनच सरकारने पाच लाख शेतकऱ्यांचे सावकारांकडून घेतलेले कर्ज स्वत: फेडण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले. राज्यातील १९ हजार ५९ गावांमध्ये सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून केंद्राकडे यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. केंद्राचे पथक १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

December 11, 2014 in मुख्य पान