पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December, 2014

मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ 0

मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’

bharatratna-app.jpg000
नवी दिल्ली – भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. हिंदू महासभेचे नेते, काँग्रेसचे माजी अध्यक्ष व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली. येत्या २६ जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत वाजपेयी व मालवीय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सरकारचा हा निर्णय राष्ट्रपती मुखर्जी यांना कळविण्यात आला. त्यानंतर ‘मालवीय व वाजपेयी यांना भारतरत्न जाहीर करताना मला आनंद होत आहे’ असे ट्वीट राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मदनमोहन मालवीय यांना ‘भारतरत्न’ देण्याचे आश्वासन खुद्द नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान दिले होते. त्यामुळे हे नाव निश्चितच मानले जात होते. मालवीय यांच्यासोबत वाजपेयी यांनाही सर्वोच्च पुरस्काराने गौरविले जावे, अशी मागणी होती होती. बहुतांश राजकीय पक्षांनीही वाजपेयी यांच्या नावास पाठिंबा दर्शवला होता. त्याची योग्य दखल मोदी सरकारने घेतली.वाजपेयी व मालवीय या दोघांचाही उद्या, २५ डिसेंबर रोजी जन्मदिवस आहे. हा दिवस ‘गुड गव्हर्नन्स डे’ म्हणून साजरा करण्याची घोषणा सरकारने याआधीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘भारतरत्न’ची झालेली घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आजवर देशातील ४३ महनीय व्यक्तींना ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आले आहे. आता वाजपेयी व मालवीय यांचे नावही या मानकऱ्यांच्या यादीत जोडले गेले आहे.

 

December 24, 2014 in मुख्य पान
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-या सहा जणांना अटक 0

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-या सहा जणांना अटक

spy
नवी दिल्ली- पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी या वर्षभरात सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. या सहा जणांमध्ये पाच भारतीय आणि एका श्रीलंकन नागरिकाचा समावेश आहे.
२०१४ या वर्षात १७ डिसेंबरपर्यंत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या सहा जणांनकडून भारतासंदर्भात पाकिस्तानला देण्यासाठीची काही कागदपत्रे सापडली आहेत.
देशात होणारी हेरगिरी रोखण्यासाठी केंद्र सरकारमधील विविध यंत्रणा आणि सर्व राज्य सरकारमधील यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवला जात आहे. तसेच सीमाभागात होणा-या हलचालींवर देखील लक्ष ठेवले जात असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच हेरगिरी रोखण्यासाठी राज्य पोलिस दलातील अधिका-यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

December 23, 2014 in रोजगार
 विरोधकांमुळे केंद्र सरकार हतबल: अधिवेशन स्थगित 0

विरोधकांमुळे केंद्र सरकार हतबल: अधिवेशन स्थगित

images (1)
नवी दिल्ली- लोकसभेत बहुमत असूनही अनेक विधेयकांवर राज्यसभेत विरोधकांनी मोदी सरकारचे मनसुबे हाणून पाडल्याने अखेर सरकारला अनिश्चितकाळासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन स्थगित करावे लागले. मात्र विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा अध्‍यक्ष सुमित्रा महाजन यांनी हे अधिवेशन अनिश्चितकाळासाठी स्थगित केल्याचे संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी सांगितले.
या हिवाळी अधिवेशन काळात विरोधी पक्षाने देशहीत न पहाता, अदूरदर्शीपणा दाखवत राज्य सभेत प्रत्येक वेळी विरोध केल्याने सरकारला महत्त्वाची विधेयके मंजूर करता आली नाहीत, असा आरोप नायडू यांनी केला.
राज्यसभेत काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, जनता दल युनायटेड आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी विविध विधेयकांवरून मोदी सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. राज्यसभेच्या कामकाजाचा आढावा घेतला तर २४ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या हिवाळी अधिवेशनात कामकाजाच्या २२ दिवसातील १६ दिवस विरोधकांनी गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणल्याने कोणतेही कामकाज झाले नाही. तर लोकसभेतही पाच दिवस कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
लोकसभेत मागच्या अधिवेशन काळात १२ तर यावेळी १८ विधेयके मंजूर करण्यात आली. तर राज्य सभेत फक्त १२ विधेयकांनाच मंजूरी देण्यात आली. लोकसभेने मंजूर केलेली सहा विधेयके मात्र राज्यसभेत मंजूर झाली नाहीत, असे ते म्हणाले.
आमचे लोक सभेत बहुमत आहे. मात्र राज्य सभेत विरोधकांची संख्या जास्त आहे. यामुळे आम्ही ठोस निर्णय घेण्याचे ठरवले तरी त्याचे राजकारण करुन राज्य सभेत जाणीवपूर्वक विरोध केला जातो, असा आरोप नायडू यांनी केला आहे.

 

December 23, 2014 in मुख्य पान
२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद 0

२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद

Untitled-120
जळगाव – चलनात असलेल्या नोटांत संगती असावी आणि बनावट नोटांची तस्करी रोखण्यास मदत व्हावी या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने २००५ पूर्वी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर ३० जून २०१५ पासून अंमलबजावणी होणार असल्याने, त्यापूर्वी नागरिकांनी नोटा बदलून घेण्याचे आवाहन बँकांनी केले आहे.
३० जून २०१५ नंतर २००५ पूर्वीच्या १००, ५०० आणि १००० च्या नोटा कुठल्याही बँकेत परत करता येणार आहेत. नोट कोणत्या वर्षी छापली गेली आहे, त्याचा उल्लेख त्या नोटेच्या मागील बाजूस तळाशी केलेला असतो. ज्या बँकेत नागरिकांचे खाते आहे, त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही कागदपत्राशिवाय नवीन नोटा मिळत आहेत.
रिझर्व्ह बँकेतर्फे दरवर्षी ही मोहीम राबविली जाते. बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी चलनातील नोटा बदलून घेतल्या जातात. यापूर्वी ही मुदत एप्रिलपर्यंत होती. त्यात १० जानेवारी २०१५ पर्यंत ही वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा ३० जून २०१५ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांनी ही मुदत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी २००५ पूर्वीच्या नोटा कोणत्याही बँकेतून बदलून घ्याव्यात. – यु. के. शर्मा, स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक

December 23, 2014 in मुख्य पान
बौध्द धम्म संस्कार संमेलन जानेवारीत 0

बौध्द धम्म संस्कार संमेलन जानेवारीत

untitled012
यवतमाळ , दि. २३ – अखिल भारतीय भिक्खू संघ, बौध्द उपासक उपासिका संघ याच्या संयुक्त विद्यमाने २४,२५,२६ जानेवारी २०१५ रोजी बौध्द धम्म संस्कार संमेलनाचे आयोजन केले आहे.
विशाखा बुध्द विहार अंबिका नगर येथे पार पडणाºया तिन दिवशीय कार्यक्रमाची सुरूवात २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भदंत प्रियदर्शी यांच्या हस्ते धम्मध्वज वंदनेने होणार आहे. सकाळी ९.३० वाजता बुध्द पुजा त्रिरत्न वंदना, ध्यान साधना व धम्मदेसना होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत बुध्दघोष महास्थवीर तर प्रमुख पाहुणे म्हणून विनयबोधीप्रिय महास्थवीर, भदंत चंद्रमणी थेरो, भदंत सच्चक थेरो, भदंत सारीपुत्त, भदंत अश्वजीत, भदंत काश्यप उपस्थित राहणार आहे. दुपारी १ वाजता उद्घाटन समारंभ होणार असून उद्घाटक म्हणून भदंत सदानंद महाथेरो, अध्यक्ष धम्मानंद महाथेरो, प्रमुख अतिथी भदंत सुयोग, भदंत नागसेन, विशेष अतिथी भदंत करुणाबोधी, भदंत सारीपुत, प्राचार्य नरेंद्र शेंडे हे उपस्थित राहणार आहे. प्रास्ताविक राजा गणविर तर संचालन भदंत गुणानंद करणार असून आभार वंदना उरकुडे माननार आहे. दुपारच्या सत्रात बौध्दधम्मात शील, सदाचार, उपोसथव्रत व संस्कार विधीचे महत्व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत जाती विहीन बौध्द समाज निर्माण करण्यासाठी बौध्दांची जनगणना व बौध्दांना संगठीत करण्यासाठी उपाय योजना या विषयावर धम्मदेसना होणार आहे.
२५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सामुहिक बुद्घ पुजा वंदना, ध्यान साधना व धम्मदेसना, दुपारी १२ वाजता चार मार्ग फळ किंवा श्रावक संघातील चार युगल आणि पुरूष पुद्गल म्हणजे काय या विषयावर धम्मदेसना होणार आहे. तसेच बुध्द काळातील बौध्द उपासक-उपासिकांचे धम्मप्रचार-प्रसारामध्ये योदान व आजच या काळातील बौध्द उपासक-उपासिकांचे धम्मप्रचार-प्रसारामध्ये योगदान आणि बुध्द धम्मातील दहा पारामिता या विषयावरही भदंत धम्मदेसना देणार आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सामुहिक बुध्द पुजा वंदना, ध्यान साधना व धम्मदेसना आणि दुपारी १२ वाजता समारोप होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खु संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथेरो हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून भदंत सुमंगलबोधी थेरो, भदंत आनंद थेरो, भदंत उपाली, भदंत सारीपुत, भदंत नागरुप, भदंत धम्मपाल उपस्थित राहणार आहे. दुपारी २ वाजता स्मृतीचिन्हे व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक शंकर धनकुलवार, धिरज वाणी, संयोजिका मंगला गणविर, वंदना उरकुडे, मुख्य आयोजक अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष भदन्त विप्पसी महाथेरो, भदन्त राहुल, निमंत्रक राजा गणविर, स्वागताध्यक्ष अरुणा सुखदेवे यांनी केले आहे.

December 23, 2014 in मुख्य पान
दोन शेतकºयांनी संपविली जीवनयात्रा 0

दोन शेतकºयांनी संपविली जीवनयात्रा

download
यवतमाळ , दि. २३ – सततच्या नापिकीला कंटाळून जिल्ह्यातील बाभूळगाव व उमरखेड तालुक्यातील दोन शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी तांबा येथे घडली. सोमेश्वर पुंडलीक वडे (५०) रा. तांबा असे मृतकाचे नाव आहे. तांबा शिवारात त्याची दोन एकर शेती होती. मध्यवर्ती बँकेचे व खासगी सावकाराचे तीन लाख रुपये कर्ज त्याच्यावर होते. यावर्षी खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी सोमेश्वर याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे नापिकीला कंटाळून शेतकºयाने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज घडली. मारोती फकीरा राठोड (४०), असे मृत शेतकºयाचे नाव आहे. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यात सर्वाधिक आत्महत्या निंगनूर येथील शेतकरी करीत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तहसीलदार सचिन शेजाळ यांनी नुकतीच समुपदेशन समिती स्थापन केली. त्यानंतरही आत्महत्येचे सत्र थांबत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
मारोती राठोड याने आज दुपारी १२ वाजता दरम्यान विषारी औषध प्राशन केले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी उमरखेड येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. सदर शेतकºयाच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलं व बराच मोठा आप्त परिवार आहे. भारतीय स्टेट बँकेचे ६० हजाराचे कर्ज असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. बिटरगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 

December 23, 2014 in विदर्भ
युवतीवर अत्याचार 0

युवतीवर अत्याचार

images
यवतमाळ, दि़२३- वणी येथील पंचशील नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिघांनी लैंगीक अत्याचार केल्याची तक्रार वणी पोलीसात देण्यात आली़ यावरुन तीघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
येथील तरुणीला लग्नाचे अमीष दाखवून गत एक वर्षापासून मारेगांव येथील शेख गड्डू(लहान) शेख सत्तार, सुनेरा शेख सत्तार व शेख गूड्डू(मोठा) शेख सत्तार हे तीघे वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करीत होते़ यातून युवतीला गर्भधारणा झाली़ येथील खाजगी दवाखाण्यात गर्भपात करण्यात आला़ त्यानंतर तीने शारीरीक संबंधासाठी नकार दिल्यामुळे त्यांनी तीला जीवे मारण्याची धमकी दिली़ हतबल झालेल्या पिडीत तरुणीने वणी पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली़ यावरुन पोलीसांनी गुन्हे नोंद केले आहे़

December 23, 2014 in विदर्भ
आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकल्प कार्यालयावर धडक 0

आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकल्प कार्यालयावर धडक

IMG_20141223_163441
यवतमाळ, दि. २३ – वणी येथील आदिवासी मुलाच्या शासकीय वसतिगृहात अनेक समस्या भेडसावत असून त्याना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पांढरकवडा येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
वणी येथील आदिवासी मुलांचे वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना खोलीत कोंबुन राहावे लागत आहे. पिण्यासाठी शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विकत पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वसतिगृहाची स्वतंत्र्य इमारत उभारावी, ग्रंथालयाची इमारत सुसज्ज व्हावी, संगाकाची व्यवस्था करावी, चौकीदराची नियुक्ती करावी, खेळाचे साहित्य मिळावे, निर्वाह भत्ता नियमित मिळावा यासह विविध मागण्यासाठी १२ सप्टेबर रोजी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पेढेकर यानी लेखीस्वरुपात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन महिन्यानंतरही समस्या जैसे थे असल्याने विद्यार्थ्यांनी पांढरकवडा येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धडक देऊन समस्याचा पाढा वाचला. वसतिगृहातील समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

December 23, 2014 in विदर्भ
दिग्रसच्या माणूसमाºया पुलाने घेतला ३१ वा बळी 0

दिग्रसच्या माणूसमाºया पुलाने घेतला ३१ वा बळी

DSC08848
यवतमाळ, दि. २३ – मागील सात दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह आज सकाळच्या सुमारास नदीत तरंगताना दिसून आल्याने खळबळ उडाली. हर्षाली अंबादास ढेंगाळे (१८), असे मृत युवतीचे नाव असून, माणूसमाºया पुलाने घेतलेला ३१ वा बळी आहे.
हर्षाली ही सात दिवसापासून बेपत्ता होती. या प्रकरणाची तक्रार तिच्या आईने दिग्रस पोलीस ठाण्यात नोंदविली होती. आज धावंडा व मोरणा नदीच्या संगमस्थळी एका युवतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत काही नागरिकांच्या दृष्टीपथास पडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळ धाव घेतली होती. हर्षालीचे नातेवाईक संभाजीनगर येथून मृतदेह बघण्यासाठी आले. त्यांनी मृतदेह हर्षालीचा असल्याचे सांगितले. मागील महिन्यात संभाजीनगर येथील इश्वर चौधरी या युवकाचा मृतदेह याच ठिकाणी तरंगत असताना आढळून आला होता. नदीपात्रात शेवाळ व जलपर्णी वाढल्याने मृतदेह उशीरापर्यंत कुजलेल्या अवस्थेत पडून राहत आहे. मृत युवतीने आत्महत्या केली की घातपात आहे, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळू शकेल, असे पोलीस सूत्राने सांगितले. शनिमंदीर ते मल्लिकार्जुन मंदीराला जोडणाºया पुलाखाली आतापर्यंत ३१ जणांचे मृतदेह आढळून आल्याने या पुलाचे नामकरण आता माणूसमाºया पूल असे झाले आहे.

 

December 23, 2014 in मुख्य पान
बस पलटली; १७ प्रवासी जखमी 0

बस पलटली; १७ प्रवासी जखमी

IMG-20141223-WA0025_resized
यवतमाळ, दि. २३ – अकोला बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर बस पलटून झालेल्या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले. यवतमाळ आगाराची बस क्र. एम.एच. ४०/ ९८६५ अकोला बाजार कडून यवतमाळकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाजवळ असलेल्या नालीत बसचे चाक फसले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. यावेळी बसमध्ये २६ प्रवासी होती. यातील १७ प्रवासी जखमी असल्याचे वृत्त आहे. भगवान हनुमंते रा. सालोड (कृष्णापुर) हा गंभीर जखमी आहे. जखमींवर अकोला बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करन यवतमाळला पाठविण्यात आले. बस पलटल्याचे लक्षात येताच गावकºयानी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याकरिता सहकार्य केले.

December 23, 2014 in विदर्भ
बोगस बियाण्याची विक्री करणाºया औरंगाबादच्या मॅनेजरवर गुन्हा 0

बोगस बियाण्याची विक्री करणाºया औरंगाबादच्या मॅनेजरवर गुन्हा

2014-06-11~10ngp-19lakh_ns
यवतमाळ, दि. २३ – औरंगाबाद येथील सिड्स कंपनीने शेतकºयाला बोगस बियाणे विक्री केल्याचा प्रकार दिग्रस तालुक्यात नुकताच उघडकीस आला असताना, दारव्हा तालुक्यातील शेतकºयाला बोगस बियाणे देवून फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी जनरल मॅनेजर विष्णू जोशीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, शेकडो शेतकºयांची फसवणूक करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बियाण्याची निर्मिती केल्यानंतर त्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाला पाठवावे लागते. मात्र औरंगाबादच्या कंपनीने जिल्ह्यात विक्री केलेल्या कापूस बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यात आले नसल्याचे दारव्हा व दिग्रस तालुक्यात बियाणे न उगवल्याच्या प्रकारावरून समोर आले आहे. दिग्रस तालुक्यातील शेतकºयाने बियाण्याची पेरणी केल्यानंतर ते उगवलेच नसल्याची तक्रार केली होती. याप्रकरणात बियाणे दोषपूर्ण असल्याचे सिध्द झाल्यानंतर जनरल मॅनेजरविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान दारव्हा तालुक्यातील शेतकºयानेही बियाणे उगवले नसल्याची तक्रार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कार्यालयाकडे केली होती. तपासणीनंतर बियाणे बोगस असल्याचे उघड झाले असून, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष उलेमाले यांच्या तक्रारीवरुन दारव्हा पोलिसांनी याप्रकरणी ३ लाख ७ हजार २७० रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा नोंद केला आहे. जिल्ह्यात २०१२ मध्ये या कंपनीने शेकडो शेतकºयांना बोगस बियाणे देवून फसवणूक केल्याचे बोलले जात असून, याप्रकाराची चौकशी करून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 

December 23, 2014 in मुख्य पान
स्व. उत्तमराव पाटील याना सामुहिक श्रध्दांजली गुरूवारी 0

स्व. उत्तमराव पाटील याना सामुहिक श्रध्दांजली गुरूवारी

uttamra_Patil_Feta
यवतमाळ , दि. २३ – माजी खासदार स्व.उत्तमराव देवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्याने २५ डिसेंबर रोजी श्रध्दास्थळ फार्म हाऊस लोणी येथे सामुहिक श्र ध्दांजली सभेचे आयोजन केले आहे.
या निमित्याने नि:शुल्क नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम, उद्योजकता काळाची गरज, उद्योग संधी, कर्ज प्रकरणख् योजना प्रकल्प अहवाल आणि नाबार्डच्या योजना व वित्त सहाय्य या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन मनिष पाटील मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आ. मनोहर नाईक हे अध्यक्षस्थानी राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून महसुल राज्यमंत्री संजय राठोड, ना. रणजीत पाटील, खा. भावना गवळी, आ. माणिकराव ठाकरे, आ. संदिप बाजोरीया,आ. ख्वाजा बेग, आ. संजय बोदकुरवार, आ. राजू तोडसाम, माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जिवन देवराव पाटील, राजेंद्र उत्तमराव पाटील, मनिष उत्तमराव पाटील व परिवारातर्फे करण्यात आले आहे.

December 23, 2014 in विदर्भ
पेट्रोल टाकून जीप जाळली 0

पेट्रोल टाकून जीप जाळली

download (2)
यवतमाळ, दि. २३ – लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया कामठवाडा येथे पेट्रोल टाकून जीप पेटवून दिल्याची घटना घडली. शिवशंकर मधुकर ठोकळ (४०) व अन्य चार रा. चाणी अशी आरोपींची नावे आहे. शिवशंकर ठोकळ याने संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमवून एम. एच. २९ एच ३१५७ क्रमांकाची जीप पेट्रोल टाकून जाळली व फिर्यादीचे नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

December 23, 2014 in मुख्य पान
ट्रक चोरट्यांना भोपाळमध्ये अटक 0

ट्रक चोरट्यांना भोपाळमध्ये अटक

54295ff9a2242
यवतमाळ, दि. २३ – बाभुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातुन सोयाबीन भरलेला ट्रक घुग्गुस फॅक्टरीत न पोहचविता घेवून पसार झालेल्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळमध्ये अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाभूळगाव बाजार समितीतून १२ डिसेंबर रोजी १६ हजार २०० क्विंटल सोयाबीन ट्रकमध्ये घुग्गुस येथे पाठविण्यात आले होते. मात्र मोहम्मद निसार इस्ताक शेख रा. तळेगाव, अकील हैदर मुस्ताक अली मोबीनपूरा नागपूर, सरबरजितसिंग सुरेखरसिंग रा. बºहाणपूर या तिघांनी संगणमत करून सोयाबीनचा ट्रक लंपास केला. व्यापारी अनिल जवेरीलाल खिवसरा यांना माल पोहचला नसल्याचा फोन आल्यानंतर त्यांनी बाभुळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांना या प्रकरणाचा सुगावा न लागल्याने प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पथकाने तपास सुरू केल्यानंतर आरोपी भोपाळ व नागपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक भोपाळला रवाना झाले होते. तेथून पोलिसांनी आरोपींना अटक करून सोयाबीन ट्रक, बनावट कागदपत्रे व बनावट नंबर प्लेट जप्त केली आहे. आज आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

December 23, 2014 in विदर्भ
 चिमुरडा खेळतो हिंस्त्र प्राण्यांशी 0

चिमुरडा खेळतो हिंस्त्र प्राण्यांशी

Ranthambor005
व्हिएन्ना : वाघ, सिंह अथवा हत्ती यासारखे जंगली प्राणी दूरवरून पाहिले तरी आपला भीतीने थरकाप उडतो; पण केवळ तीन वर्षांचा थिओडोर हा कधी झोपलेल्या चित्त्यावर बसून मस्ती करतो. तर कधी हत्तीच्या सोंडेशी खेळ करतो. तर कधी पाणगेंड्याशीही गट्टी करतो.निश्चितपणे तुम्हाला प्रश्न पडला असणार की, तीन वर्षांचा चिमुरडा अत्यंत खतरनाक प्राण्यांशी कसा काय खेळू-बागडू शकतो; पण यासाठी आणखी भुवया उंचावण्याची गरज नाही. ही आहे फोटोशॉपची कमाल. ऑस्ट्नियातील व्हिएन्नामध्ये राहणाऱ्या डॅनिएल बेबिकने फोटोग्राफीत अनेक एक्स्पेरिमेंट करताना असे काही भन्नाट फोटो तयार केले आहेत की, ते पाहून नक्कीच तोंडात बोटे घालण्यास भाग पडते. एक दिवस डॅनिएलला काही तरी वेगळे करण्याची इच्छा झाली. तिने प्राणीसंग्रहालयात काढलेले फोटो घेतले. त्यानंतर तिने फोटोशॉपच्या मदतीने हिंस्त्र प्राण्याच्या फोटोत आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा फोटो मिक्स केला. या कल्पनेतून तयार झालेले फोटो आश्चर्यचकित करणारे ठरले. असे प्रयोग तिने वेगवेगळ्या प्राण्यांच्या फोटोंच्या बाबतीत केले.

 

December 23, 2014 in मुख्य पान
 अल्पवयीन मुलीवर अत्याचार 0

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

images
मुंबई – मुंबईत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबईतील वडाळा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारच्या रहिवाशाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी आरोपी नाजीर मुल्ला आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. १९ डिसेंबर रोजी पिडीत मुलीच्या घरी कोणी नाही हे पाहून हे तीघेही आरोपी तिच्या घरात घुसले आणि तिच्यावर अत्याचार केला. पिडीत मुलीवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पुन्हा एकदा मुंबईतील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

December 23, 2014 in मुख्य पान
भाजपला सत्तेवर आणण्याचे परिणाम सोसा- पतंगराव कदम 0

भाजपला सत्तेवर आणण्याचे परिणाम सोसा- पतंगराव कदम

4975777276426658793_Org
सांगली – ‘तुम्ही भाजपचे सरकार सत्तेवर आणले, आता त्याचे परिमाण सोसा,’ असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांनी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आगपाखड केली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दिलेल्या पहिल्या उचलीत मोठा फरक आहे. हा अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यासाठी काही शेतकरी कदम यांच्याकडे गेले होते. यावेळी कदम यांनी संबधित शेतकऱ्यांना असे सुनावले.
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १९०० रुपये प्रतीटन या प्रमाणे पहिला हप्ता देण्याची तयारी दर्शविली असताना कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मात्र २५०० रुपयावर दर जाहीर केला आहे. दोन दिवसांत एफआरपीप्रमाणे दर दिला तर ठीक, अन्यथा आम्ही ऊस तोडी बंद करू, असा इशारा देणारे निवेदन भिलवडी भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कदम यांना दिले.
सांगली जिल्ह्यातील साखर उतारा आणि ऊसाची प्रत कोल्हापूरपेक्षा चांगली आहे. असे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सांगलीपेक्षा अधिक ६०० ते ७०० रुपये इतका ऊस दर देत आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
केंद्राच्या एफआरपीकायद्याप्रमाणे यंदा ९.५ टक्के साखर ऊताऱ्यासाठी प्रतिटन २२०० रुपये एफआरपी आहे. त्यानंतरच्या प्रत्येक १ टक्का उताऱ्याला २२० रुपये द्यावे लागणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांची एफआरपी २३५० रुपयांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यातील सरासरी एपआरपी २८८० रुपये आहे. त्यामुळे याप्रमाणे दर द्यावाच लागणार आहे.
दरम्यान, ऊस गाळपानंतर १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’ कायद्यानुसार पहिली उचल न दिलेल्या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठविला असल्याचे सांगण्यात येते.

December 23, 2014 in मुख्य पान
दुष्काळाने मरण स्वस्त, नेते मात्र भोजनावळीत मस्त 0

दुष्काळाने मरण स्वस्त, नेते मात्र भोजनावळीत मस्त

images (3)
यवतमाळ – यावर्षी दुष्काळामुळे शेतकर्‍यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत.एकीकडे सरकार हजारो कोटीचे पैकेज व पैकेज देत आहे तर दुसरीकडे उपासमारीला तोंड देत असलेले दररोज दोन दुष्काळग्रस्त शेतकरी चालु अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यात आपली जीवन यात्रा आत्महत्या करून संपविली आहे अशा ४० शेतकऱ्यांची नावे विदर्भ जनांदोलन समितीने दिली असुन आज पर्यंत सत्ताधारी वा विरोधकांचा एकही नेता यांच्या दारावर गेला नसुन मात्र हे सारे नेते या दरम्यान विदर्भ दर्शन व भोजनावळीत मग्न असल्याचा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे .
विदर्भात दररोज दोन मराठवाड्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असताना दिल्लीचे सरकार मात्र महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या कमी झाल्या असा दावा करीत आहे हा प्रकार तर शेतकऱ्यांना अधिक निराश करणारा आहे एकीकडे सरकारने कर्ज वसुली रोखली असल्याचा दावा केला आहे तर याउलट बँकांचे कर्मचारी गावांगावात मध्ये नोटीस घेऊन फिरत आहे. कर्मचार्‍यांनाही शेतकर्‍यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. परंतु त्यांचाही नाईलाज आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
शेतकर्‍यांना दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. सुरूवातीला अतवृदष्टी. गारपिट आणि नंतर यावर्षीखरिपात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात काहीच लागले नाही. त्यातच जे पीक आले त्यांना भावच मिळत नाही. दुबार-तिबार पेरणी करूनही अपुरा पाऊस आल्याने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. गतवर्षी ज्यांना १०० पोते सोयाबीन झाले त्यांना यंदा दोन क्विंटलही सोयाबीन झाले नाही. महागडे बियाणे, निंदण, खुरपण करून पीक शेतात बहरले होते. मात्र किडी आणि दुष्काळी परिस्थितीने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आहे. आता या शेतकर्‍यांना बँका त्रस्त करून सोडत आहे. अनेकांनी पेरणीसाठी पीक कर्ज घेतले होते. काहींनी ट्रॅक्टर तर काहींनी मोटरसायकलसाठी कर्ज घेतले होते. परंतु दुष्काळी परिस्थितीने कर्ज फेडू शकले नाही. बँकांनी आता वसुली मोहीम सुरू केली आहे.

December 22, 2014 in मुख्य पान
पत्रकार विवेक राऊत याचे निधन 0

पत्रकार विवेक राऊत याचे निधन

43
राळेगाव, दि. २२ – येथील पत्रकार विवेक अशोक राऊत याचे २२ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता यवतमाळ येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ते ४१ वर्षाचे होते. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. यावेळी अत्ययात्रेदरम्यान माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रविण देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील याच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नातेवाईकांनी श्रध्दांजली अर्पण केली.

December 22, 2014 in विदर्भ
कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ््यात 0

कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ््यात

images

यवतमाळ, दि. २२ – गणवेश अनूदानाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागणारा कनिष्ठ साहाय्यक लिपीक एसीबीच्या जाळ््यात अडकल्याची घटना आज सोमवारी आर्णी पंचायत समितीमध्ये घडली. राजेश मधूकर बुटले (४४) रा. आर्णी असे लाचखोराचे नाव आहे.
आर्णी पंचायत समितीमध्ये कनिष्ठ साहाय्यक वर्ग ३ पदावर कार्यरत असलेल्या राजेश बुटले या लोकसेवकाने तक्रारकर्त्याला गणवेश अनूदानाचे बिल मंजूर करण्यासाठी ६०० रुपयांची लाच मागितली होती. बिल मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. कागदपत्रामध्ये कुठलिही त्रुटी नसताना, कनिष्ठ साहाय्यक बिल मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी करीत होता. लोकसेवकाच्या या प्रकाराची तक्रार त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार आज एसीबीच्या पथकाने सापळा रचून राजेश बुटले यास ६०० रुपयांची लाख स्विकारताना पंचायत समितीच्या चहा कॅटीनमध्ये रंगेहात पकडले. ही कारवाई उपअधिक्षक सतिष देशमूख, पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात पथकाने केली. या कारवाईमुळे कर्मचाºयात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

December 22, 2014 in विदर्भ