पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December, 2014

तालिबानी हल्ल्यात १०० मुलं ठार 0

तालिबानी हल्ल्यात १०० मुलं ठार

taliban
पेशावर – दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला आज त्याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागली आहे. तालिबानी अतिरेक्यांनी पेशावरमधील सैनिकी शाळेवर चढवलेल्या आत्मघाती हल्ल्यात आतापर्यंत १२६ निष्पाप विद्यार्थी व शाळेच्या स्टाफला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या हल्ल्यात सुमारे ८० विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील ४२ विद्यार्थी चिंताजनक आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, पाच स्फोटांचा आवाज शाळेतून आला आहे.
स्फोटकांचा मोठा साठा घेऊन लष्कराच्या वेशात शाळेत घुसलेल्या दहशतवाद्यांनी सबंध पाकिस्तानलाच हादरवून टाकले आहे. गेल्या चार तासांपासून पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा आजवरच्या सर्वात बिकट संकटाचा मुकाबला करत आहे. शाळेत ५०० च्यावर मुलं व स्टाफला दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले असून मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला जात आहे. गोळीबारात आतापर्यंत १०० विद्यार्थी तसेच स्टाफ व पाक सैनिक मिळून १२६ जणांचा बळी गेला आहे. आमच्या शिक्षिकेला दहशतवाद्यांनी जिवंत जाळल्याचे एका जखमी विद्यर्थ्याने सांगितले. पाकिस्तानी लष्कराने ओलीस मुलांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर ऑपरेशन हाती घेतले असतानाच एका मानवी बॉम्बचा स्फोट तसेच आणखी चार स्फोट झाल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवाई हल्ल्यांचाही मार्ग अवलंबला असून आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. दोन दहशतवादी अजूनही शाळेत आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या दहशतवाद्यांनी हे भयंकर कृत्य केलंय ते १८ ते १९ वर्षांचे आहेत.

December 16, 2014 in देश-विदेश
लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी बेपत्ता 0

लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी बेपत्ता

baraat
औरंगाबाद – आठ महिन्यापूर्वी विवाह ठरला. साखरपुडाही पार पडला. ३ डिसेंबर रोजी विवाह करण्याचे निश्चित झाले. तरुणीकडील लोकांनी मंगल कार्यालय ठरविले. पाहुणे आले, नवरदेवाची, वऱ्हाडाची वाट पाहणे सुरू होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्याकडून लग्नाला येत नसल्याचे कळविण्यात आले. शहरातील २७ वर्षाच्या तरुणीसोबत हा दुर्देवी प्रकार घडला असून वधूपक्षाच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात नवऱ्या मुलासह कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा भागात राहणाऱ्या मनिषा (वय २७, नाव बदललेले आहे) या तरुणीला मुंबई येथील अश्विन उल्हास हासनाळे यांनी एप्रिल महिन्यात लग्नासाठी मागणी घातली होती. त्यावेळी त्याचे वडील उल्हास हासनाळे हे देखील उपस्थित होते. १५ जून रोजी त्यांचा औरंगाबादला साखरपुडाही पार पडला. ३ डिसेंबर रोजी गारखेडा भागातील एका मंगल कार्यालयात विवाहाचे आयोजन करण्यात आले. मनिषाच्या कुटुंबाने लग्नाची सर्व तयारी केली. लग्नपत्रिका छापून नातेवाईकांना वाटण्यात आल्या. २ डिसेंबर रोजी मनिषाच्या वडिलांनी उल्हास हासनाळे यांना लग्नासाठी औरंगाबादला निघाल्याबाबत विचारणा केली. यावेळी नवरा मुलगा अश्विनला बरे वाटत नसून तो हॉस्पिटलला गेल्याची थाप मारण्यात आली. वारंवार संपर्क करूनही हासनाळे कुटुंबियांनी टाळाटाळ केली. ३ डिसेंबरपर्यंत वाट पाहून, संपर्क करुनही हासनाळे कुटुंब लग्नासाठी न आल्याने हा विवाह सोहळा अखेर रद्द करावा लागला. विवाहासाठी लागलेला पाच ते सहा लाखाचा खर्च यावेळी व्यर्थ गेला. या प्रकरणी मनिषाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नवरा मुलगा अश्विन, त्याचे वडील उल्हास, आई पुष्पा, भाऊ हेमंत, बहीण क्रांती त्र्यंबके, क्रांतीचा पती, आत्या अलका शिंदे व अश्विनचे काका यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनचा यापूर्वी विवाह झालेला होता. ही बाब त्याने मनिषाच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली होती. त्यांना माहित झाल्यावर त्याने पहिल्या पत्नीचे चारित्र्य वाईट असून सारखे फीटस् येत असल्याने घटस्फोट घेतल्याची माहिती दिली.

December 16, 2014 in मुख्य पान
काळ्या पैशांच्या यादीत भारत तिसरा 0

काळ्या पैशांच्या यादीत भारत तिसरा

index
वॉशिंग्टन – देशात आणि देशाबाहेर सर्वाधिक काळा पैसा असलेला भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, असा निष्कर्ष ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्थेने (थिंक टॅंक) काढला आहे.
‘ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी’ने विविध देशांशी संबंधित काळ्या पैशांच्या संदर्भात एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, २००३ ते २०१२ या काळात भारतामधून सुमारे २८ लाख कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत. एकट्या २०१२मध्ये तब्बल ६ लाख कोटी रुपये विविध मार्गाने परदेशात पाठविण्यात आले आहेत.काळ्या पैशांच्या व्यवहारात चीन व रशिया हे दोन देश आघाडीवर आहेत. चीनचे २४९.५७ अब्ज डॉलर्स तर रशियाचे १२२.८६ अब्ज डॉलर्स काळ्या पैशांच्या रुपात जगाच्या बाजारात फिरत आहेत. करचुकवेगिरी, गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या मार्गाने परदेशात लपविण्यात आलेल्या काळ्या धनात भारताचा हिस्सा एकूण दहा टक्के इतका आहे. या काळ्या पैशाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे.

December 16, 2014 in देश-विदेश
कोळसा खाणवाटप घोटाळा : मनमोहन सिंग चौकशीच्या फेऱ्यात 0

कोळसा खाणवाटप घोटाळा : मनमोहन सिंग चौकशीच्या फेऱ्यात

imagesimages.jpeg00
नवी दिल्ली – कोळसा खाणवाटप घोटाळ्यात अखेर माजी पंतप्रधान आणि कोळसा मंत्री मनमोहन सिंग हेही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला कोळसा खाण बहाल केल्याप्रकरणी अधिक चौकशीची आवश्यकता अधोरेखित करताना कोर्टाने मनमोहन यांचा जबाब नोंदवण्याचे निर्देश सीबीआयला दिले.
विशेष न्यायालयाने हिंदाल्को प्रकरणात तपास संस्थेने दिलेला क्लोजर रिपोर्ट आज फेटाळून लावला. हिंडाल्कोप्रकरणी कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख व संबंधितांची आणखी खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे तसेच या खाणवाटपावेळी कोळसा मंत्री राहिलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही जाब नोंदवण्यात यावा, असे न्यायालयाने नमूद केले. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ जानेवारी रोजी होणार आहे. २००५ मध्ये बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला ओडिशात तालाबीरा दोन आणि तीन अशा दोन खाणींचे वितरण करण्यात आले. त्यावेळी कोळसा खात्याचा प्रभार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे होता. त्यामुळेच याप्रकरणात मनमोहन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, याआधी २५ नोव्हेंबर रोजी जेव्हा याप्रकरणी सुनावणी झाली होती तेव्हा मनमोहन यांची चौकशी का करण्यात आली नाही?, असा सवाल विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी सीबीआयला केला होता. कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात हिंदाल्को कंपनीच्या कुमार मंगलम बिर्ला यांच्या सहभागाबाबत स्पष्टीकरणाची मागणीदेखील विशेष न्यायालयाने केली होती.

December 16, 2014 in मुख्य पान
जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे 0

जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे

index
नागपूर, दि. १५ – आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आव्हाड यांनी शुक्रवारी नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत गोंधळ घातला होता, तसेच आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यानंतर आव्हाड यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सभात्याग केला होता तसेच राषट्रवादीने कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
आव्हाड यांनी नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर निवेदन केले. यावर आव्हाड पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करीत असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता मध्येच बोलायला उठले. अध्यक्षांनी त्यांना बसण्यास सूचना केली असता महेता अध्यक्षांनाच ‘तुम्ही थांबा’, असे म्हणाले. हा अध्यक्षांचा अवमान असल्याचा मुद्दा पुढे करीत आव्हाडांसह विरोधी सदस्यांनी नारेबाजी केली. या वेळी महेता व छगन भुजबळ यांच्यात खटके उडाले. या गोंधळात मुख्यमंत्री बोलत असताना आव्हाडांनी जागेवर बसून आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे त्यांना चालू अधिवेशन संपेर्पयत निलंबित करण्यात आले होते. मात्र आज अधिवेशन सुरू झाल्यानंतर आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

December 15, 2014 in मुख्य पान
मुंबई सेंट्रल येथील इमारतीला भीषण आग 0

मुंबई सेंट्रल येथील इमारतीला भीषण आग

2014-12-15~IMG-20141215-WA0000(1)_ns
मुंबई, दि. १५ –  मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग लागली आहे. रेल्वे कर्मचा-यांच्या वसाहतीतील १५ मजली इमारतीतील चौथ्या मजल्याला मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत अडकलेल्या ८ जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले असून बचावकार्य व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

December 15, 2014 in मुख्य पान
 पेट्रोल, डिझेल २ रुपयांनी स्वस्त 0

पेट्रोल, डिझेल २ रुपयांनी स्वस्त

images
मुंबई, दि. १५ – पेट्रोल व डिझेलचे भाव प्रति लिटर दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना मध्यरात्रीनंतर पेट्रोल व डिझेलसाठी प्रति लिटर दोन रुपये कमी मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या खनिज तेलाच्या भावांमुळे भारतातही पेट्रोलजन्य उत्पादने स्वस्त होत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी घेतलेल्या पंधरवड्याच्या हवाल्यामध्ये हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे भाव प्रति बॅरल ११० डॉलर्सवरून ६० डॉलर्स इतके घसरले आहेत, आणि येत्या काळातही हे भाव कमीच राहणार असल्याचा अंदाज आहे.

December 15, 2014 in मुख्य पान
पत्रकार शिवकुमार यांचे निधन 0

पत्रकार शिवकुमार यांचे निधन

shivkum
बेळगाव – टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार एन. डी. शिवकुमार (३९)यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी निधन झाले. शिवकुमार हे बंगलोरहून बेळगावला कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाचे वार्तांकन करण्यासाठी आले होते. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते सह संपादक म्हणून सेवा बजावत होते.
शनिवारी अधिवेशनाला सुट्टी असल्यामुळे शिवकुमार आपल्या मित्रासमवेत महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापूरहून परतले होते. रविवारी ते गोकाकचा धबधबा पाहण्यास गेले होते. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यांनी के एल ई हॉस्पिटलमध्ये जावून उपचार करून घेतले. उपचारासाठी दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरनी दिला पण त्यांनी त्याला नकार दिला. खोलीवर परतल्यावर काही वेळाने त्यांची तब्येत अधिक बिघडली. लगेच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. पण डॉक्टरनी ते मृत झाल्याचे घोषित केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक मंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये जावून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. एन. डी. शिवकुमार यांच्या पश्चात पत्नी जयलक्ष्मी आणि तीन वर्षाची मुलगी साहित्या असा परिवार आहे.

December 15, 2014 in मुख्य पान
 रुग्ण दगावल्याने जिल्हा रुग्णालयाची तोडफोड 0

रुग्ण दगावल्याने जिल्हा रुग्णालयाची तोडफोड

Picture 002
यवतमाळ, दि. १५ (रवी चरडे) – येथील कै.वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांनी  उपचारात हयगय केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या युवकांनी मदत व मार्गदर्शन केंद्राची तोडफोड केल्याची घटना सोमवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी घडली.
जिल्हा शासकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदन गृह परिसरात एक अनोळखी इसम अत्यवस्थ अवस्थेत पडून असल्याची माहीती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी थातूरमातूर तपासणीकरून सीटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. माहिती विचारण्यासाठी मदत व मार्गदर्शन केंद्रात गेलेल्या युवकांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले.अशातच रुग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या युवकांनी मदत केंद्राची तोडफोड केली.

December 15, 2014 in मुख्य पान
लाकूड चोरट्यांचा वनपथकावर हल्ला 0

लाकूड चोरट्यांचा वनपथकावर हल्ला

IMG-20141215-WA0001
यवतमाळ , दि. १५ (विशेष प्रतिनिधी)- झरी तालुक्यातील मुधाडी (गिट्टी) जंगलक्षेत्रात लाकूड चोरीचे प्रमाण गेल्या काहीमहिन्यापासून वाढले आहे. लाकूड चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वनरक्षकाच्या पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली.
किष्टन्ना पुल्लेनवार, सुभाष पिकनिकवार, दिनेश भोयर, महादेव सरोदे या जामणी रेंजच्या वनरक्षकांसह वनकामगार सोनू दडांजे जखमी झाले. लाकूड चोरटे मुधाडी जंगलक्षेत्रात लाकूड कटाई करीत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यावरून त्यांनी रविवारी रात्री ९ वाजतापासून सापळा   रचला होता. रात्री २ वाजताच्या सुमारास सहा जण सागवान चौपट डोक्यावर घेवून येताना दिसले. लाकूड चोरटे जवळ येताच वनपथकाने दोघांना पकडले. सागवान खाली टाकून वनपथकावरच हल्ला चढविला. कर्मचाºयांनी बॅटरीचा प्रकाश चोरट्यांच्या चेहºयावर टाकल्याने त्यांची ओळख पटल्याचे वनरक्षक सांगत आहे. चोरट्यांच्या हल्ल्यात वनरक्षक व कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी यशवंत नागुलवार यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी भीमराव आत्राम, सोनू टेकाम, कपलू टेकाम याच्यासह अन्य तिघांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

December 15, 2014 in मुख्य पान
लोणबेहळ शिवारात तीन बिबट  0

लोणबेहळ शिवारात तीन बिबट

IMG-20141215-WA0038
यवतमाळ, दि. १५ (प्रतिनिधी) – लोणबेहळ जंगलक्षेत्राला लागून असलेल्या शेत शिवारात रविवारच्या रात्री तीन बिबट शेतकºयांना आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या शेतात बिबट आढळले त्या भागाची पाहणी केली असता वनविभागाच्या पथकाला बिबटचे ठसे आढळून आले.
लोणबेहळ शिवारात सुभाष  येनेवार यांच्या शेतात काल रात्री तीन बिबट जागलीला जाणाºया शेतकºयांना दिसले. सहा महिन्यापूर्वी कोसदणी घाटात व लोणबेहळ जंगलातही बिबट आढळले होते. पण आता त्यांनी आपला मोर्चा शेत शिवाराकडे वळविल्याने शेतकºयात धास्ती पसरली आहे. जंगलात पिण्यास पाणी नसल्याने बिबट शेत शिवारात पिण्याच्या पाण्याकरिता येत असल्याचे सांगितल्या जाते. कोट्यवधीचा खर्च करून वन विभागात वनतळे, मातीबांध, बांधातील गाळकाढणे, सिमेंट बंधारे अशी कामे मागील दोन वर्षांपूर्वी झाली. मात्र त्याचा किंचीतही उपयोग झाल्याचे दिसत नाही.
प्रकाश वानखडे, शांतीलाल जयस्वाल यांच्या शेतातही या बिबट आढळून आल्याची माहिती आहे. लोणबेहळ वन परिक्षेत्राचे वनपाल सुभाष लंबे, वनरक्षक नीलेश सरोदे, सुहास कानडे यांनी या शेतात फिरून बिबटचे ठसे घेतले. आज रात्री पुन्हा ते कुठल्या शेत शिवारात आढळतात. त्या वरून उद्या त्या भागात पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्राने दिली. तीन बिबट आढळल्याने गावकºयासह शेतकरीही दहशतीत आहेत. शेतात चणा, गहू, ऊस असे पीक आहे. या पिकाकरिता शेतकरी जागलीला व रात्री पाणी देण्यास शेतात जावे लागतेबिबट आढळल्याने एकटा शेतकरी शेतात जाण्यास धजावताना दिसत नाही.

December 15, 2014 in मुख्य पान
कवीतेचा झरा काळजात जिवंत असावा - शंकर बडे 0

कवीतेचा झरा काळजात जिवंत असावा – शंकर बडे

IMG-20141215-WA0026
एक अधिक एक अकरा काव्य संग्राहाचे प्रकाशन
यवतमाळ, दि. १५ (प्रतिनिधी) – कविता ही शिकून येत नसत कवितेचा झरा हा काळजात जिवंत असावा लागतो. हे जसे खरे आहे. तसेच प्रत्येकात एक कवी असतो. मात्र त्याला जिवंत ठेवणारी संवेदनशिलता बोबट होऊ न देण्याची गरज असते. एक अधिक एक अकरा या काव्या संग्रहातील कवितेत हा जो जिवंतपणा आहेत. तो मला भावला असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी शंकर बडे यांनी केली. मनिष काळे लिखीत काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते.
राळेगाव पंचायत समिती सभागृतात हा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, श्रमिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पखाले, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष विलास भोयर, पंचायत समिती सभापती बेबीताई जवादे, तहसिलदार सुरेश कव्हळे, उपसभापती सुरेश मेश्राम, प्रा. सदानंद चौधरी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. वसंत पुरके म्हणाले की, काव्य संग्रहातील शेतकरी, खंत, जमान, बळी इत्यादी कवितावर मार्मिक भाष्य केले. सोबतच एक अधिक एक अकरा या शिर्षकाचे विश्लेशन केले. तर नितीन पखाले यांनी पत्रकारीता व साहित्यावर भाष्य केले. तहसिलदार सुरेश कव्हळे यांनी शेतकरी आत्महत्योबाबत चिंता मनोगतातून व्यक्त केली. यावेळी राजू रोहणकर, राजेश काळे यांनीही विचार मांडले. या सोहळ््याला डॉ. के. एस. वर्मा, महेश शेंडे, प्रा. पिंपरे, फिरोज लाखाणी, संजय दुरबुडे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले.

December 15, 2014 in मुख्य पान
तळेगाव(भारी) येथे शेतकºयांचा रस्तारोको, कृषीमूल्य आयोग रद्द करण्याची मागणी 0

तळेगाव(भारी) येथे शेतकºयांचा रस्तारोको, कृषीमूल्य आयोग रद्द करण्याची मागणी

11
यवतमाळ, दि. १५ (प्रतिनिधी) – शेतकºयांच्या मालाला हमीभाव देण्याबाबत सातत्याने उदासीनता बाळगणारा कृषीमूल्य आयोग रद्द करण्यात यावा, यामागणीसाठी तळेगाव (भारी) महामार्गावर शेतकºयांनी १ तास रस्तारोको आंदोलन केले. यामुळे यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
कृषीमूल्य आयोग आकस बुद्धीने शेतकºयांच्या मालाला हमीभाव देत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात २५ ते ३० गावातील शेतकरी सहभागी झाले होते. शेतकºयांना अशोक भुतडा, दत्ता चांदुरे, मोरेश्वर आदमणे, परशराम पारधी, सुभाष पातालबंशी यांनी मार्गदर्शन केले. कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात यावी, कापूस व सोयाबीनच्या भावात वाढ करावी, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. रस्तारोको आंदोलनात आनंदा नागपूरे, महिपाल प्रधान, अरुण यादव, संदीप गोधने, मोहन ढोरे, मूलराज सोमवंशी, गणपत काकडे, प्रदीप लांडगे, ब्रिजेश शुक्ला, मोतीराम गावंडे, रामकिसन काकाणी, सदाशिव देशपांडे, नितीन मोरघडे, गोविंद राठोड, सुरेश डुकरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुचित घटना घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

December 15, 2014 in मुख्य पान
यवतमाळात पावसाच्या सरी 0

यवतमाळात पावसाच्या सरी

5071392939735411476_Org
यवतमाळ , दि. १४ (प्रतिनिधी) – दोन दिवसाच्या ढगाळी वातावरणानंतर आज रविवारी सायंकाळी ८ वाजता दरम्यान शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पाऊस राज्याच्या विविध भागात हजेरी लावत आहे.अवकाळी पाऊस व काही ठिकाणी झालेल्या गारपीटीमुळे वातावरणात गारवा पसरला होता. ढगाळी वातावरणानंतर सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते.

December 14, 2014 in मुख्य पान
विद्यार्थ्यांच्या पैशावर शिक्षकांची मौजमस्ती, सहलीच्या नावावर विद्यार्थ्यांची पिळवणूक 0

विद्यार्थ्यांच्या पैशावर शिक्षकांची मौजमस्ती, सहलीच्या नावावर विद्यार्थ्यांची पिळवणूक

100_4241
यवतमाळ , दि. १४ (राहुल वासनिक )- शैक्षणिक सहल हा सहशालेय उपक्रमाचा महत्वपूर्ण भाग असून प्रत्येक शैक्षणिक वर्षात शैक्षणिक सहल आयोजित करणे गरजेचे आहे. हि शैक्षणिक सल नेतांना मामंडळाची बस, रक्त गट व शिक्षणाधिकाºयाचा परवाणा आवश्यक आहे.  असे असताना खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षाणाधिकाºयाचा परवाना न घेतना शैक्षणिक सहलीचे आयोजन करून चक्क खाजगी वाहनामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना कोंबून नेण्याचा प्रकार चालविला असून सहलीत विद्यार्थ्यांच्या पैशावर मजा मारणाºया मुख्याध्यापक व शिक्षकांवर करडी नरज ठेवावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
मागील शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण विभागातून एकाही सहलीची परवानगी घेतली नसून आयोजन केले नाही. परंतु जिल्हा परिषदच्या प्राथमिक विभागाकडून जवळपासचया स्थळांना खाजगी गाड्यांनी विद्यार्थी कोंबून नेऊन शैक्षणिक सहलीचा आनंद लुटल्या गेला आहे. माध्यमिक विभागात सहल परवाना मागच्या सत्रात १४ शाळांनी घेतला. परंतू जवळपास शंभर शाळांनी खाजगी वाहनांनी शैक्षणिक सहली आटोल्या. विद्यार्थ्यांच्या पैशावर शिक्षकांनी मौजमजा केली आहे. बºयाच सहलीच्या विद्यार्थ्यांयाी संपर्क साधल्यावर तीनशे े चारशे किमीचे अंतर असतांना अक्षरक्ष: कोंबुन वाहनातून प्रवास  करावा लागला. तर खाजगी होटलात थांबने, रात्रीच्यावेळी बिअरबार शोधने व असुरक्षित ठिकाणी ठेवणे असा प्रकारही झाल्याचे बोलल्या जात आहे.
गतवर्षी खाजगी गाड्याचे सहलीचे अपघात १६ झाले असून त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्राणही गमावले आहे. एक रायगड जिल्ह्यातील ही घटना तर अंगावर शहारे आणणारी होती. परंतू शासनाचा परवाणा नसल्याने त्याना कोणतीही सुरक्षा पुरविण्यात आली नाही. उलट मुख्याध्यापकांनीही हात वर केले. सध्या खाजगी गाड्याचा सिझन हा स्लॅक असून खाजगी वाहन चालकांनी भाड्यांसाठी शैक्षणिक सहलीचा नवा मार्ग अवलंबवीला आहे. तरी या प्रकारात पालक भरडल्या जात असून या खाजगी शैक्षणिक सहलीला आळा बसावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

December 14, 2014 in मुख्य पान
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये साडेसहा हजार प्रकरणांचा निपटारा 0

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये साडेसहा हजार प्रकरणांचा निपटारा

index.jpeg..
यवतमाळ, दि. १४ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विविध विभागाशी संबंधीत ६४३९ प्रकरणे निकाली निघाली.
सदर लोकअदालत जिल्हा न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कामगार व औद्यागिक न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतमध्ये एकूण २२,१६८ प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये आपसी समझोत्याने भुसंपादन प्रकरणे, नगर परिषदेची कर अपिलाची प्रकरणे निगोशिएबल इस्टयुमेंट अ‍ॅक्टच्या कलम १३८ नुसार असलेले प्रकरणे, मोटार अपघात वाहन कायद्याची प्रकरणे, वैवाहिक वादांची प्रकरणे, बँकाची प्रकरणे, कामगार विवाद प्रकरणे, ग्राहक तक्रारी व दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे.
या लोकअदालतीत अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी अनेक पक्षकारांनी उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता. सदर लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यासाधिश, न्यायालीन कर्मचारी, वकील, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकअदालतीच्या पॅनलवरील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. अग्रवाल यांनी दिली.

December 14, 2014 in मुख्य पान
टीईटी : नऊ हजार उमेदवारांनी दिली परीक्षा 0

टीईटी : नऊ हजार उमेदवारांनी दिली परीक्षा

02_12_2012-2nwd08-c-2.jpg00
यवतमाळ, दि. १४ (प्रतिनिधी)-प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकपदासाठी आवश्यक टीईटी पात्रता परीक्षा आज रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रावरून घेण्यात आली. यामध्ये नऊ हजार उमेदवारांनी ही परिक्षा दिली.
शिक्षण विभागात शिक्षकांची पदे रिक्त असून, यापुढे टीईटीच्या अग्निदिव्यातून जाणाºया उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी मागील वर्षी ही परीक्षा घेण्यात आली. त्यात अपेक्षेप्रमाणे खूप कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र रिक्त जागा भरण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी चक्क सहा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाही. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टसाठी प्रथम आणि दुसºया पेपरसाठी १०हजार १४३ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. पहिला-दुसरा पेपर रविवारी सकाळ आणि दुपार दोन सत्रात घेण्यात आला. सकाळच्या सत्रात ४६६ तर दुपारच्या सत्रात ३०१ उमेदवार गैरहजर होते. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाप्रशासनाने कडोकोड बंदोबस्त ठेवून भरारी पथक नियुक्त केले होते.

December 14, 2014 in विदर्भ
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार 0

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार

index.jpeg00
यवतमाळ, दि. १४ (प्रतिनिधी) – अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घाटंजी तालुक्यातील गांधीनगर फाटा  व बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथे घडली.
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सुरेश नैताम (३५) रा.   झटाळा असे मृतकाचे नाव आहे. तो एमएच२९ /ई ४४९१ क्रमांकाच्या दुचाकीने सासूरवाडीला गेला होता. अज्ञात वाहनाने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. सुरेशला उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरेश यवतमाळात गॅरेजमध्ये मेकॅमिकम्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत गजानन टेकाम गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मृत्यू झाला. या घटनेची तक्रार संजय राणे यांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून वाहनधारकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

December 14, 2014 in विदर्भ
नवजात बालकाला फेकले 0

नवजात बालकाला फेकले

images
यवतमाळ , दि. १४ (प्रतिनिधी)- नवजात बालकाला अज्ञात व्यक्तीने फेकून दिल्याची घटना सावरगड येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूला बाळ आढळल्याने अनैतिक संबधातील हे बाळ असल्याची शंका उपस्थित केल्या जात आहे.
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया सावरगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे नवजात बाळ पडून असल्याचे ग्रामस्थांना माहित झाले. याबाबतची माहिती चाईल्ड विभागाला देण्यात आल्यानंतर चाईल्डच्या कर्मचाºयांनी बाळ ताब्यात घेवून त्याला येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती केले. बाळ आठ दिवसाचे असून, त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे. प्राथमिक केंद्राच्या मागे आढळलेले बाळ अनैतिक संबधातील असल्याची चर्चा गावात आहे. अज्ञात आरोपीने बाळाला फे कून दिल्याबाबतची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन तपास सुरू केला आहे.

December 14, 2014 in विदर्भ
ड्रग्ज विरोधात मोदींचा एल्गार 0

ड्रग्ज विरोधात मोदींचा एल्गार

123349-narendra-modi
नवी दिल्ली दि. १४ (प्रतिनिधी)- अमलीपदार्थांची नशा (ड्रग्ज) ही चिंतेची बाब बनली असून भारतातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर याला बळी पडलेली पाहायला मिळते. मात्र तुमची ही नशा सैनिकांच्या जीवावर बेतते याचा विचार कधी केला आहे का?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना केला. ड्रग्जला आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदींनी जनतेला आकाशवाणीवरून आवाहन केलं.
ड्रग्ज ही भयंकर समस्या असून यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे आवश्यक आहे. नशेच्या आहारी गेलेल्या अनेकांना हे माहीत आहे का की, त्यांनी नशेसाठी खर्च केलेला पैसा हा दहशतवाद्यांकडे जातो. दहशतवादी संघटना यातून आपलं जाळं पसरवत आहेत आणि त्या पैशातून शस्त्रास्त्र जमवून हल्ले करतात. दहशतवाद्यांशी दोन हात करताना जेव्हा सैनिकांचा बळी जातो त्यामागे नशेबाजांचा पैसा असतो. तेव्हा नशेच्या आहारी जाऊन दहशतवाद्यांना मदत करू नका, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
ड्रग्जच्या आहारी जाण्यामागे ‘D-डिस्ट्रक्शन, डेवस्टेशन आणि डार्कनेस (3D) ‘ ही कारणे आहेत. मात्र या सगळ्यात पालकांची भूमिका महत्वाची आहे. तसेच पालकांनी आपल्या पाल्याविरोधात नाही तर त्याच्या सवयी विरोधात, ड्रग्ज विरोधात लढले पाहिजे. त्याला समजून घेतले पाहिजे आणि समजावून सांगितले पाहिजे. त्यांनी आपल्याला पाल्याला ध्येय दिले पाहिजे तर तो या मार्गाला वळणार नाही, असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारतर्फे आपण या संदर्भात एक हेल्पलाइन सुरू करण्याचा विचार करतो आहोत. जेणेकरून तरुणांना या व्यसनातून बाहेर येण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. ड्रग्ज मुक्त भारत करण्यासाठी सोशिअल मीडियावरील लोकांनाही त्यांनी आवाहन केले की, यासंदर्भात जागृतता पसरावी म्हणून ‘#drugfreeindia’ असा हॅश टॅग वापरावा. असे केल्यास तो एक लोकशिक्षणाचा भाग ठरेल, असेही मोदी म्हणाले. तसेच सेलिब्रेटी, सामाजिक कार्यकर्ते, नेते, धार्मिक-अध्यात्मिक क्षेत्रात मोठे कार्य करणाऱ्या व्यक्ती या साऱ्यांनी देखील आपल्या संवादातून ड्रग्जचे गंभीर परिणाम आणि त्याच्या विरोधात लढा देण्यासाठी शक्य तेव्हा विचार द्यावेत, असे आवाहन केले.

December 14, 2014 in मुख्य पान