
बंगळुरू, दि. ११ (विशेष प्रतिनिधी)- कर्नाटकमध्ये भाजपाला पुन्हा एकदा आपल्या आमदारांमुळे मान खाली घालावी लागली आहे. बुधवारी विधानसभेत उसाच्या प्रश्नासंबंधी गंभीर चर्चा सुरू असताना भाजपाचे एक आमदार मात्र प्रियांका गांधी यांचा फोटो पाहताना पकडले गेले आहेत. एका स्थानिक वृत्तवाहिनीवर आमदारांच्या या कृत्याचा हा व्हिडीओ प्रसारित झाला आहे.
कर्नाटकमधील औराद भागातील भाजपाचे आमदार प्रभू चव्हाण बुधवारी आपल्या स्मार्टफोन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियांका गांधी-वड्रा यांचे फोटा पाहताना टीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. ज्यावेळी विधानसभेत उसाच्या दराच्या मुद्यावर गंभीर चर्चा सुरू होती तेव्हा चव्हाण यांचे लक्ष चर्चेकडे नव्हे तर त्यांच्या मोबाईलमध्ये होते. तर दुसरे एक आमदार यु. बी. बनकर हे मोबाईलवर कँडी क्रश हा गेम खेळण्यात व्यस्त होते. या व्हिडीओनंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. या संपूर्ण प्रकाराचा तपास करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. मात्र आपण फोटो बघत नव्हतो तर एक मेसेज वाचत होतो, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे. एक मेसेज वाचण्यासाटी मी माझा मोबाईल सुरू केला. त्यानंतर मी माझे कुटुंबिय, नरेंद्र मोदी व बाबा रामदेव यांचे फोटो बघत होतो. त्याचवेळी मला प्रियांका गांधी यांचा एक फोटो दिसला. त्याच्याखाली काहीतरी लिहीलेले दिसत होते, मात्र ते वाचता येत नसल्याने मी फोट झूम केला, सारवासरव चव्हाण यांनी केली.
Archive for December, 2014
0
विधानसभेत भाजपा आमदार बघत होते प्रियांका गांधींचा फोटो
0
नथुराम गोडसे हा देशभक्त, भाजप खासदाराची मुक्ताफळे

नवी दिल्ली , दि. ११ (विशेष प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी उधळताच संसदेत एकच गदारोळ झाला. कॉँग्रेसच्या खासदारांनी या विधानाला आक्षेप घेऊन त्यांच्यावर जोरदार टीका केली.
या विधानावर जोरदार आक्षेप घेताना कॉँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसैन दलवाई म्हणाले की, गोडसे यांना देशभक्त संबोधण्याचा प्रकार म्हणजे त्यांचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. त्यामुळे हे वक्तव्य करणा-या व्यक्तीस तात्काळ अटक झाली पाहिजे.
जगाला अहिंसेची शिकवण देणा-या राष्ट्रपिता गांधीजींची हत्या गोडसेने केली होती. अशी बेफाट वक्तव्ये करणा-या व्यक्तींच्या विरोधात सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. या प्रश्नावर सरकार गप्प का असा सवाल त्यांनी केला.
0
‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ कार्यक्रम रविवारी
यवतमाळ, दि ११ (प्रतिनिधी) – प्रयास-सेवांकुर संस्था अमरावती द्वारा संचालीत डॉ.अविनाश सावजी प्रेरीत आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना या कार्यक्रमाचे आयोजन स्थानीक नंदुरकर विद्यालय, श्री सत्यसाई क्रीडारंजन सभागृहामध्ये १४ डिसेंबर च रात्री ६.३० वाजता केला आहे. यावेळी मार्गदर्शन करण्याकरिता पंढरपूरच्या पालवीच्या संस्थापिका मंगल शाहला निमंत्रीत केले आहे.
२००३ पासुन सुरू झालेल्या या संस्थमध्ये फक्त २ मुले होती आता या संस्थेमध्ये १०० पेक्षाजास्त एचआयव्ही बाधित मुले आहे. येवढेच नव्हें तर या मुलांची वैद्यकीय आणि शिक्षणाची पूर्ण व्यवस्था या संस्थेने केली आहे. या मुलांना व्यवसायीक शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर कसे उभे रहावे ते शिकवले आहे. या संस्थेला पहले चार वर्ष कोणीच भाड्याने जागा दिली नाही. त्यानंतर त्यांच्या या प्रयत्नाला हळू-हळू आज या संस्थेला ३ एक्कर जमीन मिळाली आहे. जिथे या मुलांचे अधिकारे घर बनविले आहे. आता १०० मुलांची संस्थे मध्ये ५०० मुलांनाची जोपसना करून त्यांना शिक्षण देवून त्यांना पुढे आणण्याचे स्वप्न आहे. मंगलाचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाल्याने त्यांनी स्वत:ची संस्था आणि समाजसेवा जी त्यांच्या आई-वडीलांचे आणि मामा कडून मिळाली होती त्याचा उपयोग त्यांना लोकांकरिता केला. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी कुष्टरोगींच्या वसाहती मध्ये जावून त्यांच्या जखमेंवर मलम लावण्याचे व भोजन देण्याचे काम केले, बालक आश्रमांतील मुलांना हसविण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. आज त्यांच्या या उपक्रमाला त्यांची मुलगी, जावाई, मुलागा आणि सुन हे सुद्धा सक्रीय योगदान देवुन राहीले आहे.या कार्यक्रमाचे येथील नंदूरकर विद्यालय मध्ये १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून केली गेली आहे.
0
शेतकºयांनी केली वचननाम्याची होळी

यवतमाळ , दि ११ (प्रतिनिधी) -महाराष्ट्राच्या युती सरकारने व केंद्रात सत्ता प्राप्तीसाठी पिक कर्ज माफी व वाढीव हमी भाव देऊ असे वचननाम्यात जाहिर केले होते. केंद्रात भाजपाची व राज्यातही युतीची सत्ता असून शेतकºयांच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही. त्यामुळे नापिकीचे प्रती हेक्टरी अनुदान, संपुर्ण पीक कर्जमाफी व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला, सोयाबीनला, तुर व धानाला द्या या मागणीसाठी १४ शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या दहेली येथे आज गुरूवारी युतीच्या वचननाम्याची होळी करून शासनाचे लक्ष वेधले.
विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी याच्या नेतृत्वात शेतकरी नेते प्रेम चव्हाण, मारेश्वर वातीले, अंकित नैताम, शेखर जोशी, भीमराव नैताम, दहेलीचे जयकुमार चौधरी, सरपंच वासुदेव भोयर, नंदकिशोर मानकर, रामभाऊ एलादे, योगेश मानकर, अशोक बोंद्रे, संदीप चौधरी, बेबी मेश्राम, रेखा बोंद्रे, सुचिता ठाकरे, सतीश भोयर, अमर पांडे, दीपक येरावार यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात शामील झाले होते. यावेळी बोलतांना किशोर तिवारी म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकयार्ना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान, कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू केली नाही. सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू केली नाही. सर्व दुष्काळग्रस्त शेतकºयांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ द्यावे ह्या मागण्या यावेळी केली. मागील १२ वषार्पासून तेच अधिकारी पॅकेज तयार करीत असुन हजारो कोटी रुपये पाण्यात जात आहेत असे ते म्हणाले. कर्जावरील व्याजमाफी व कर्जाचे पुर्नवसन हे थोतांड असुन खाजगी सावकारांचे कर्जमाफी सरकार कोणत्या नोंदीवरून करणार कारण सध्या गावात कृषीकेंद्र मालक, शिक्षक, पोलिस व अन्ना कोणताही परवाना न घेता कर्ज देत आहे. हे सरकार जे करायेचे आहे ते करीत नसुन पॅकेज बाजार मांडून शेतकरी आत्महत्यांना आमंत्रण देत आहे असा आरोपही तिवारी यांनी केला. ज्योपर्यंत महाराष्ट्राच्या युती सरकारने केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्तीसाठी दिलेले वचन पुर्ण करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फार्मुल्याप्रमाणे लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला, सोयाबीनला, तुर व धानाला देणार शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. त्यामुळे सरकारने शेतकºयांना वाचविण्यासाठी आपले वचन पुर्ण करावे अशी मागणीही तिवारी यांनी यावेळी केली.
0
बसच्या धडकेत विद्यार्थीनीचा मृत्यू

यवतमाळ, दि. ११ (प्रतिनिधी) – शेंबाळपिंप्री उमरखेड रस्त्यावर तिवरंग फाट्याजवळ उमरखेड आगाराच्या बसची धडक लागल्याने शुभांगी जामदाडे (१५) रा. तिवरंग या विद्यार्थीनीची जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १२ वाजता दरम्यान घडली.
शेंबाळपिंप्री कडून उमरखेड कडे एम. एच २९ डी ७८२१ क्रमांकाची बस येत होते. रस्त्याला एका कडेला उभी असलेली शुभांगी शाळेची बॅग आणण्यासाठी रस्त्याच्या दुसºया कडेला जात असताना भरधाव बसने तिला धडक दिली. बसचा मागील चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी बस चालक भीमराव तोरकड याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला असून पुढील तपास जमादार सुरेश निचत करीत आहे.
0
लाच घेताना पोलीस नाईक अटकेत

यवतमाळ, दि. ११ (प्रतिनिधी) – गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी सहा हजार रुपयाची लाच घेणाºया पोलीस नाईकास अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारी कळंब पोलीस ठाण्यात ही कार्यवाही केली.
संदीप केशव तिजारे असे पोलीस नाईकाचे नाव असून कळंब पोलीस ठाण्यात नेमणुक आहे. कळंब पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक करणार नाही. लॉकअपमध्ये टाकत नाही तसेच गुन्ह्याची चार्जशिट लवकर दाखल करतो असे म्हणून तक्रारदाराकडून सहा हजार लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून पथकाने आज सापळा रचुन कळंब पोलीस ठाण्यातच लाच घेताना तिजारे याना रंगेहात पकडले. या कार्यवाहीने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
0
पतीनेच केला पत्नी व चिमुकलीचा खून , मायलेकीची आत्महत्या घातपात
यवतमाळ, दि. १० (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या भोसा येथे महिलेने आपल्या एक वर्षीय चिमुकलीसह आत्महत्या केल्याची घटना काल घडली. मात्र ही आत्महत्या नसून पतीनेच पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला अन् चिमुकलीलाही विहीरीत फेकुन दिल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी वडगावरोड पोलिसांनी आरोपी शांताराम राऊत यास ताब्यात घेवून खूनाचा गुन्हा नोंदविला आहे.
भोसा येथील अर्चना शांताराम राऊत (२८), निधी शांताराम राऊत (१) रा. भोसा या मायलेकीनी काल मंगळवारी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. वडगावरोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केल्यानंतर सुरूवातीपासूनच याप्रकरणात शांतारामवर पोलिसांचा संशय होता. अर्चनाचा मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविल्यानंतर रात्री वैद्यकीय सुत्रांनी अर्चनाचा गळा आवळून तर निधीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर संशयाप्रमाणे शांतारामनेच खून केल्याचे समोर आले. अकोला बाजार नजिक असलेल्या पहूरनरखेडे येथील शांताराम राऊत (३०) हा यवतमाळ येथे पंधरा वर्षापासून किरायाच्या खोलीत राहत होता. आठ दिवसापुर्वीच त्याने भोसा येथे किरायाने खोली घेतली होती. दरम्यान त्याचा अर्चनाशी सतत वाद सुरू होता. या वादातच त्याने अर्चनाचा दोरीने गळा आवळून खून करून तिचा मृतदेह व १ वर्षीय निधीला परीसरातीलच विहिरीत फेकून दिले. त्यानंतर बाहेरगावी असल्याचे दाखवित घरी आल्यानंतर पत्नी व मुलगी बेपत्ता झाली म्हणून शोधाशोध घेण्याचा बनाव केला. पोलीस तपासात हे उघड झाल्यानंतर पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेवून अटक केली आहे. मात्र शांतारामने अद्यापही पोलिसांपुढे गुन्ह्याची कबूली दिली नसल्याने पोलीस शांतारामचा पिसीआर मिळविण्यासाठी उद्या त्याला न्यायालयात हजर करणार आहे. त्याने खून का केला याचा अद्यापही उलगडा झाला नसला तरी त्याच्या या कृत्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.
0
आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही
नवी दिल्ली दि. १० ( प्रतिनिधी) – आत्महत्येच्या प्रयत्नाला गुन्ह्यांच्या श्रेणीतून लवकरच हटवण्यात येणार आहे. विधी आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार केंद्रातील मोदी सरकारने आयपीसी कलम ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयीपीसीच्या कलम ३०९ नुसार आतापर्यंत आत्महत्येच्या प्रयत्न हा गुन्हा ठरत असल्याने संबंधिताला एक वर्षाची शिक्षा आणि दंड आकारण्याची तरतूद आहे.
१८ राज्य आणि ४ केंद्र शासित प्रदेश कलम ३०९ रद्द करण्याच्या बाजूने आहेत. राज्यांनी दिलेल्या सहमतीमुळे केंद्र सरकराने कलम ३०९ आयपीसीतून हटवण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आत्महत्येच्या प्रयत्नाला मानवतेच्या दृष्टीकोनातून बघावं आणि गुन्ह्यांच्या श्रेणीतून ते हटवलं गेलं पाहिजे, अशी शिफारस विधी आयोगाने आपल्या अहवालातून सरकारला केली होती, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी ऑगस्टमध्येच लोकसभेत दिली होती.
0
३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

मुंबई, दि. १० ( प्रतिनिधी) – देशात स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढच होताना दिसत असून मुंबईतील माटुंगा येथे अवघ्या ३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. माटुंग्यातील कामगार वस्तीत राहणारी ही चिमुरडी काल घरात झोपली होती, तिची आी कामासाठी बाहेर गेली होती. याचाच फायदा घेून नराधम आरोपी तिच्या घरात घुसला व त्याने त्या बालिकेवर अत्याचार केला व तेथून पळून गेला. संध्याकाळी त्या मुलीची आई घरी परत आल्यावर तिला घडलेला प्रकार लक्षात आला व तिने पोलिसांत तक्रार केली. या चिमुरडीवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान याप्रकरणी शाहुनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्या नराधम आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
0
साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे निधन

मुंबई, दि. १० ( प्रतिनिधी) – संत – योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही ‘बिनधास्त’ लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. बिंब प्रतिबिंब, सन्याशाची सावली हे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित चरित्रसंग्रह, बिनधास्त, उभयान्वयी अव्यय या त्यांच्या कादंब-या गाजल्या होत्या.
मराठी साहित्याच्या चौकटीबाहेर जाऊन लिखाण करणारे चंद्रकांत खोत यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी भीमाशंकर येथे झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एमए झाल्यावर त्यांनी पीएचडी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसले तरी त्यांच्याच मुळगावातून येणा-या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएचडी करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती.
चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून आले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अन्वय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली. यानंतर दोन वर्षांनी ‘बिनधास्त’ आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘विषयांतर’ ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. ‘अबकडइ’ हे दिवाळी अंकानेही वाचकांवर गारुड घातले होते. बोल्ड विषयांवर कादंबरी लिहील्यानंतर खोत हे अध्यात्मिक साहित्याकडे वळले. गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबईतील सातरस्ता येथील साईबाबा मंदिरात राहत होते. बुधवारी पहाटे वृद्धापकाळामुळे खोत यांचे निधन झाले. खोत यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रातील बंडखोर लेखक हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.
0
गॅस सिलेंडर १५५ रुपयात

नवी दिल्ली, दि. १०( प्रतिनिधी) – गृहिणींना स्वयंपाकासाठी लागणारा घरगुती गॅस सिलेंडर आता अवघ्या १५५ रुपयात देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.
पाच किलो वजनाचा हा मिनी गॅस सिलेंडर घरगुती गॅस ग्राहकांना अवघ्या १५५ रुपयात देण्यात येईल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्य सभेत सांगितले. सध्या घरगुती गॅस ग्राहकांना वर्षाला १४.२ किलो वजनाचे १२ अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर मिळतात. एका सिलेंडरची दिल्लीतील किंमत ४१७ रुपये आहे. आता पाच किलो वजनाचा हा मिनी घरगुती गॅस सिलेंडर असून तो १५५ रुपयांना मिळणार आहे. तसेच वर्षाला ३४ मिनी घरगुती गॅस सिलेंडर अनुदानित देण्यात येणार आहेत. यामुळे गरीबांना गॅस सिलेंडर परवडतील, असे प्रधान म्हणाले.त्यानंतरही आवश्यकता भासल्यास हे विनाअनुदानित मिनी घरगुती गॅस सिलेंडर बाजारात ३५१ रुपयांना मिळणार आहे. तर १४.२ किलो वजनाचे विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर ७५२ रुपयांना मिळतात.
0
पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा – राज्यपाल सी.विद्यासागर राव

यवतमाळ , दि. १०(विशेष प्रतिनिधी)- पंचायत क्षेत्र विस्तार अधिनियम (पेसा) हा आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा अधिनियम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात या अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांना सिंचनाच्या सोई उपलब्ध करुन देण्यासाठी वनक्षेत्रात पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्यांचा उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी सांगितले. राज्यपालांनी येथील बचत भवनात पेसा व वनहक्क कायदा तसेच आदिवासींसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमल सिंह, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, मुख्य वनसंरक्षक श्री.गुरमे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुळकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पेसा अधिनियमाने आदिवासी क्षेत्रातील गावांना विकासासाठी बरेच अधिकार दिले आहे. या अधिकारान्वये या क्षेत्रातील गावांचे विकासाचे नियोजन, नैसर्गिक साधन संपत्तीवरील अधिकार, वनउपज आदींचे व्यवस्थापन संबंधीत गावांच्या ग्रामसभेला करावयाचे आहे. अशा ग्रामसभांमध्ये लाभार्थी निवडण्यासोबतच संपुर्ण गावाचे विकासाचे नियोजन करण्यासाठी यंत्रणेने पुर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, अशा सुचनाही राज्यपालांनी बैठकीत केल्या. वनहक्क कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वनहक्काचे वैयक्तिक तसेच गावाच्या विकासासाठी सामुहिक दावे जास्तीस जास्त प्रमाणात मंजुर होणे आवश्यक आहे. या कायद्याच्या जनजागृतीसोबतच अधिकाधिक दावे दाखल होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. आदिवासी विशेषत: पेसा क्षेत्रात आदिवासी विकासाच्या योजना चांगल्या पध्दतीने राबविल्या जाव्या. आदिवासी उपयोजनेअंतर्गत योजना राबवित असतांना लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेकडून झाली पाहिजे. वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड करून त्यांना योजनांचा लाभ मिळावा. वनक्षेत्रात सिंचानाच्या सोई उपलब्ध करण्यासाठी सिमेंट नाला बंधारे उभारणीला वनविभागाने प्राधान्य दिले पाहिजे. सिंचनाच्या सोई उपलब्ध झाल्यास आदिवासी क्षेत्रातील गावांना त्याचा फायदा होईल, असे राज्यपाल म्हणाले.
पेसा क्षेत्रातील विज जोडणीचा आढावा घेतांना या क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला विज जोडणी देणे आवश्यक आहे. विज जोडण्या शिल्लक असल्यास त्या तातडीने पुर्ण करण्याचा दृष्टीने नियोजन करावे, असे सांगत आदिवासी भागातील शौचालयाचे बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य आदींचीही माहिती राज्यपालांनी जाणून घेतली. यावेळी शेतकरी आत्महत्येमागील कारणे जाणून घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी समुपदेशनासारखे कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांचे आत्मबल वाढविण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करावे, अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या. राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच उपसचिव परिमल सिंह यांनी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीवर सर्व संबंधीत अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगून विविध सुचना केल्या. सुरुवातीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सादरीकरण केले. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी शिष्टमंडळांना भेटी देवून निवेदने स्विकारली व शिष्टमंडळांशी चर्चा केली. एकूण 10 शिष्टमंडळांनी निवदने सादर केली.
0
राज्यपालांनी साधला विद्यार्थी अन् ग्रामस्थांशी संवाद

यवतमाळ , दि. १०(विशेष प्रतिनिधी) – राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज दिनांक 10 डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्हयातील झरी (जामणी) व केळापूर या आदिवासी बहुल तालुक्यातील दुभाटी (पौड), शिबला आणि गोपाळपूर या गावांना भेटी देवुन आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद सर्वप्रथम राज्यपालांचे आगमन झरी (जामणी) तालुक्यातील दुभाटी (पोड) येथे झाले. यावेळी जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गोंडी नृत्य सादर करुन राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंगणवाडीची पाहणी करुन अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थी विद्यार्थ्यांबाबत व त्यांना मिळणा-या आहाराबाबत माहिती जाणून घेतली. राज्यपालांचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राजभवनाचे उपसचिव परीमलसिंग आ. संजीवरेडडी बोदकुरवार जिल्हाधिकारी, राहुल रंजन महिवाल, पोलिस अधीक्षक संजय दराडे, दुभाटी (पोड) सरपंच जानू धडांजे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
वनहक्क पटटयाचा लाभ मिळालेल्या काही लाभार्थ्यांशी राज्यपालांनी चर्चा केली. वन हक्काबाबत आपणास माहिती आहे काय असे राज्यपालांनी लाभार्थ्यांना विचारले असता आपण वनातून तेंदूपाने, मध, डिंक तसेच इतर गौण वनोपज गोळा करुन त्याच्या विक्रीतून आपला उदरनिर्वाह करीत
असल्याने लाभार्थ्यांनी राज्यपालांना सांगितले. शेतात कोणती पिके घेता आणि सिंचनाची सुविधा आहे काय असा प्रश्न राज्यपालांनी लाभार्थ्यांना केला असता आम्हाला जर सिंचनाची व विजेची सुविधा उपलब्ध झाली तर बारमाही पिके घेणे शक्य होईल असेही लाभार्थ्यांनी राज्यपालांना सांगितले. दुभाटी (पोड) हे गांव जंगल परिसरात असल्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्यातून आणि श्रमातून गावशेजारच्या परिसरात छोटया तलावांची निर्मिती करावी. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास व शेतीला सिंचनाची व्यवस्था करता येणे शक्य असून शासन आपणास योग्य ती मदत करणार आहे. असेही राज्यपालांनी लाभार्थ्यांना व ग्रामस्थांना सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणा-या ऑईल इंजिनचे वाटप पोतू लखमा आत्राम या लाभार्थ्याला करण्यात आले. दुभाटी (पोड) व परिसरातील ग्रामस्थांची बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थिती होती. शिबला येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिली. यावेळी राज्यपालांनी आश्रमशाळेतील संगणक कक्षाची पाहणी केली. इयत्ता 9 वीतील रोनीत तोडसाम या विद्यार्थ्यांने संगणक हाताळण्या बाबतची माहिती दिली. इयत्ता 12 वी (विज्ञान) मध्ये शिक्षण घेणा-या संतोषी चंदनकर या विद्याथींनीला शिक्षण घेऊन भविष्यात काय व्हायचे आहे असे राज्यपालांनी विचारले असता तीने केमिकल इंजिनिअर होणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिप प्रज्वलन केले. मुलींनी स्वागत गीत गाऊन आदिवासी यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमलसिंग, आ. राजू तोडसाम आ. संजीवरेडडी बोदकुरवार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रुमाले प्रामुख्याने उपस्थित होते.
0
मागास भागांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील – राज्यपाल

यवतमाळ , दि. १०(विशेष प्रतिनिधी) – राज्यातील मागास भाग हा विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे. मागास भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आपण दौ-यावर आलो असून, हया भागातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
आज 10 डिसेंबर रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यवतमाळ जिल्हयातील केळापूर तालुक्यातील आकोली (बु) येथील संत गाडगे महाराज मिशन मुंबईच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या संत गाडगे महाराज आदिवासी प्राथमिक शाळेला भेटीप्रसंगी विद्यार्थी संवाद कार्यक्रमातून राज्यपाल बोलत होते.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परीमलसिंग, आ.राजू तोडसाम, आ. संजीवरेडडी बोदकुरवार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, संत गाडगेबाबा मिशन मुंबईचे अध्यक्ष मधुसूदन मोहिते पाटील मंचावर उपस्थित होते. राज्यपाल पुढे म्हणाले, प्रत्येकाला भेटता यावे यासाठी मी इथे आलो आहे. स्वच्छ भारताचे काम संत गाडगेबाबांच्या प्रेरणेतून सुरु आहे. पूर्वीच्या आंध्रप्रदेश आणि नव्याने अस्थित्वात आलेल्या तेलंगणा राज्यात 100 वर्षापूर्वी रामजी गोंड या आदिवासीने इंग्रजांविरुध्द बंड पुकारुन आदिवासींचा जल, जंगल आणि जमीन यावरील हक्कांसाठी लढा दिला. आदिवासींचा जल, जंगल आणि जमीन यावर हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. केवळ आदिवासीच नव्हे तर ओबीसी, अनूसूचित जाती व इतर घटकांच्याही समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले. संत गाडगेबाबा यांच्या पुतळयाला राज्यपालांनी पुष्पहार अर्पण करुन आश्रमशाळा परिसरात बांधण्यात आलेल्या स्व राजारामबापू घोंगटे सभागृहाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
यावेळी संत गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष मधूसूदन मोहिते पाटील यांनी राज्यपालांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रास्ताविक मिशन चे सचिव सचिन घोंगटे यांनी तर रविद्र बायस्कर यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
0
मंगळावर पाणी सापडले!

वॉशिंग्टन , दि. ९ (प्रतिनिधी)- मंगळ ग्रहावर पाणी असल्याचा नवा पुरावा अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाला आढळून आला. भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांच्या पथकास मंगळ ग्रहावर जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेले वातावरण दृष्टीस पडले.
नासाच्या मार्स क्युरिऑसिटी या सुप्रसिद्ध अवकाश यानाने यासंदर्भातील छायाचित्रे व अन्य स्वरुपातील माहिती संकलित केली आहेत.मार्स क्युरिऑसिटीने मंगळावरील गेल क्रेटर येथे एकेकाळी तळ अथवा अनेक तळाच्या रुपाने नदी वाहत होती. अवकाशातून मंगळ भूमीवर कोणत्यातरी वस्तूने टक्कर दिल्याने मंगळावर निर्माण झालेला मोठ्या खड्ड्याला गेल क्रेटर असे नाव देण्यात आले आहे. क्युरऑसिटीने पाठवलेल्या नव्या छायाचित्रामुळे गेल क्रेटर परिसरात असे वातावरण होते की ज्यामुळे या लाल गृहावर जीवसृष्टी निर्माण होऊ शकेल. लाखो वर्षे एका मोठ्या तळाच्या भूगर्भात झालेल्या हलचालीतून मंगळावर माऊंट शार्प (पर्वत)ची निर्मिती झाल्याचे नासाने म्हटले आहे. जर माऊंट शार्प संदर्भातील आमचा अंदाज बरोबर असेल तर मंगळाच्या भुपृष्ठावर निर्माण होणारी उष्ण आणि थंड वातावण निर्मिती भूगर्भातूनच झाली असावी असे या मोहिमेत सहाय्यक शास्त्रज्ञ असलेले भारतीय वंशाचे संशोधक अश्विन वसावदा यांनी सांगितले.नासाला मिळालेल्या छायाचित्रावरून हे स्पष्ट होते की गेल क्रेटरच्या खोल १५४ किलो मीटरमध्ये लाखो वर्ष पाण्याचा साठा होता. तसेच तो सातत्याने अटत होता आणि पुन्हा भरत होता, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. मंगळावरील वातावणता असे काय बदल झाले ज्यामुळे तेथील वातावरण अति थंड झाले याचा शोधही घेतला जात आहे. माऊंट शार्पची निर्मिती कशी झाली याचा सध्या शोध घेतला जात आहे. या पर्वताची उंची पाच किलोमीटर इतकी आहे. तसेच त्याच्या खाली अनेक छोटी छोटी पर्वते आहेत.नासाने पाठवलेले मार्स क्युरिऑसिटी सध्या माऊंट शार्पच्या पायथ्याशी संशोधन करत आहे.
0
दुष्काळाच्या मुद्यावरुन विरोधकांनी धरले सरकारला धारेवर

नागपूर , दि. ९ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस दुष्काळाच्या प्रश्नावरुन वादळी ठरला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने पॅकेज जाहीर करण्याची मागणी लावून धरली.
विरोधकांनी विधानसभेत हा मुद्दा लावून धरला. यावरुन गदारोळ सुरु राहिल्याने विधानसभेच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल आहे. सरकारने आधी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करावी नंतर चर्चा करावी अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. विधान परिषदेच कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आल.
सकाळी विधानसभेच कामकाज सुरु होताच विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम ५७ अंतर्गत प्रश्नोत्तराचा तास निलंबित करुन, दुष्काळाच्या विषयावर चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र सभापती हरीभाऊ बागडे यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.
त्यावर संतापलेल्या विरोधकांनी मोकळया जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. पुन्हा कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाची सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी सभापतींनी घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करुन, सभागृहाचे प्रश्नोत्तराचा तास सुरु केला.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना विरोधी पक्षात असताना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने विरोधी पक्ष नेत्यांना नेहमीच बोलण्याची संधी दिली आहे याची आठवण करुन दिली.
0
काकासह दोन पुतण्यांना जलसमाधी

चाळीसगाव , दि. ९ (प्रतिनिधी) – धोकादायक वळणावर कारवरील ताबा सुटून जामदा डाव्या कालव्याजवळील पाण्यात कार उलटल्याने पाचोरा तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू झाला. हे तिघेही उच्चशिक्षित असून, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील यांच्या कुटुंबातील होते. या तिघांवर मंगळवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आंबे वडगाव येथील खासगी पशू चिकित्सक भूषण पाटील व त्यांचे पुतणे निखील पाटील (२९) व उमेश पाटील (२८) हे तिघे सोमवारी जळगाव येथे कामानिमित्त गेले होते. निखील व उमेश हे दोघे वडिलांचा ठेकेदारी व्यवसाय सांभाळतात. या दोघांचे जेसीबी धरणगाव येथे कामावर देण्यात आले होते. त्या जेसीबीसाठी लागणारे ऑइल देण्यासाठी धरणगाव येथे हे तिघे गेले होते. आपले काम आटोपून रात्री ११ च्या सुमारास पाचोऱ्याकडे येत असताना पारोळा-धरणगाव दरम्यान नालबंदी गावाजवळील वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट जवळून वाहणाऱ्या जामदा डाव्या कालव्यात जाऊन उलटली, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तिघांशी रात्री संपर्क न झाल्याने नातेवाईकांसह पोलिसांनी रस्त्याने शोध घेतला असता त्यांचा अपघात झाल्याचे लक्षात आले. या तिघांवर त्यांचे मूळ गाव असलेल्या वाडी शेवाळी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघे उच्च शिक्षित असून निखिलला ११ महिन्यांचा मुलगा आहे आणि उमेशला ६ महिन्यांची मुलगी आहे. पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील यांचे भूषण पाटील हे चुलत भाऊ तर निखील आणि उमेश हे पुतणे होते.
0
विवाहीतेची जुळ्या बाळांसह रेल्वेखाली झोकून आत्महत्त्या

जळगाव , दि. ९ (प्रतिनिधी) – जळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील माहेर असलेल्या व तरसोद येथील सासर असलेल्या एका २२ वर्षीय विवाहीतेने मंगळवारी दुपारी तरसोद येथील रेल्वेलाईनजवळ आपल्या पाच महिन्यांच्या जुळ्या बाळांसह रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे जिल्हा रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवासी असलेल्या दीपमाला धनराज सोनवणे ( वय २१) हीचा ७ जून २०१३ ला तरसोद येथील रेल्वेत नोकरीस असलेले धनराज सुधाकर सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. लग्न झाले तेव्हा दीपमालाच्या आजोबांनी लग्नासाठी ५० हजार रुपये व दोन तोळे सोने हुंडा म्हणून दिले होते. दरम्यान दीपमालाचा दीर आनंदा सोनवणे याला ठेका घ्यायचा असल्याने सातत्याने दीपमालाकडून तिचा नवरा धनराज, सासरा व सासू पैशांची मागणी करीत होते. दीपमालाची माहेरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने व तिचे वडील भंगार गोळा करण्याचे काम करीत असल्याने ती माहेरून पैसे आणू शकत नव्हती. त्यातच तिला दोन जुळी मुले झाली. दीपमालाला होणारा त्रास वाढत असल्याने तिने वडिलांकडे तक्रार केली होती. त्यावरून दीपमालाचे वडील मंगळवारी सकाळीच तरसोद येथे जाऊन तिच्या सासरच्या मंडळींची समजूत काढून आले होते. दरम्यान तिचे वडील तिच्या सासरहून निघाल्यानंतरही तिला त्रास सुरूच राहिल्याने दीपमालाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपली मुले श्रेयस आणि श्रावण यांना कडेवर घेऊन धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. रेल्वे तीच्या अंगावरून चालून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही बाळही रेल्वेचा फटका लागल्याने जागीच गतप्राण झाली.
ही घटना समजताच दीपमालाच्या नातेवाईकांनी तरसोदकडे धाव घेतली. यावेळी तिची सासू घराच्या शौचालयात लपून बसली होती, तर नवरा आणि दीर हे दोघे घरून पसार झाले होते. मातेसह दोघा चिमुकल्यांचे मृतदेह घेऊन नातेवाईक जिल्हा रूग्णालयात आल्यानंतर सासरा सुधाकर सोनवणे, दीर आनंदा सोनवणे सासू व जेठाणी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान दीपमालाचा दीर आनंदा याच्या पहिल्या पत्नीने देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे आत्महत्या केली होती. तर दुसऱ्या पत्नीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे उपस्थितांनी सांगितले.
0
डॉ. आंबेडकर ग्रंथ प्रकाशनासाठी ३ कोटींचा निधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे

नागपूर , दि. ९ (प्रतिनिधी) – उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रकाशनाचे काम सुरू झाले असून दहा ग्रंथ ‘रिप्रिंट’ साठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. याबाबत प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न विचारला होता.‘या कामासाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी २२ लाख खर्च करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १९ लाख रुपये खर्च झाले असून त्याद्वारे काम सुरू आहे असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत विरोधकांनी दुष्काळाच्या विषयावर गदारोळ सुरु केला असतानाच या गदारोळामध्ये प्रश्नोत्तरे पुकारण्यात आली, पण यावेळी गदारोळ सुरु राहिल्यामुळे प्रश्नोत्तराचा तास उरकला गेला, त्यानंतर तावडे यांनी सभागृह तहकूब झाल्यानंतर विधान परिषदेत पटलावर ठेवण्यात आलेल्या प्रश्नांसदर्भात पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी सांगितले की,काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात निधी असूनही तो पुरेसा वापरण्यात येत नव्हता.त्यावेळच्या समितीने यासाठी पाठपुरावा करायला हवा होता. मात्र माजी मंत्री राजेश टोपेंच्या नेतृत्वाखालील जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत, जनार्दन चांदूरकर यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. मात्र विरोधकांच्या खूर्चीवर बसण्याची वेळ आल्यानंतर मात्र त्यांनी हा निधी मिळत नसल्याची तक्रार केली, हा अजब प्रकार म्हणायला हवा, असा टोलाही तावडे यांनी विधान भवनाच्या दालनात पत्रकारांशी बोलताना मारला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रकाशन समितीचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणेदेखील सरकारच्या विचाराधिन आहे’, असे विनोद तावडे यांनी उत्तरात सांगितले.
अंजिठा लेण्याच्या संवर्धनात खंड पडणार नाही
औरंगाबादची जग प्रसिध्द अजिंठा लेण्याची पावसामुळे दुरावस्था हेात असली तरी केंद्र सरकारच्या वतीने व अमेरिकन कंपनीच्या मदतीने हानी टाळण्यासाठी उपायोजना केल्या जात असून संवर्धनात खंड पडणार नाही, अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत मंगळवारी दिली.
सुनील तटकरे, धनंजय मुंडे इत्यादींनी हा तारांकित प्रश्न उपसिथत केला होता. दुष्काळावरविरोधकांनी गोंधळ घातला असतानाही सभापतींनी प्रश्नोत्तरांच्या तासाची घोषणा केल्याने ते पटलावर आले. पावसाने अजिंठा लेण्याच्या डोंगरमाथ्याची माती भूसभूशीत होत आहे. मात्र दगडकाम मजबूत राहण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळ, आरंगाबाद यांच्याकडून लेण्यांचे संवर्धन केले जात आहे. यासाठी अमेरिकन कंपनीचीही मदत घेतली जाते. या कंपनीकडून दर तीन वर्षांनी लेण्यांची पाहणी करून त्यानुसार दुरूस्ती करण्यात येत आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.
व्यवस्थापनच्या प्रवेश प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणार
राज्यात असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्यामधून दिल्या जाणा-या प्रवेशात पारदर्शकता असली पाहिजे आणि गुणवत्तेच्या आधारावरच प्रवेश दिले गेले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी केले.
अभियात्रिकी महाविद्यालयात अल्पसंख्याक कोट्यातून होणा-या प्रवेशात गैरव्यवहार आणि अनियमितता होती.त्यामुळे या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अल्पसंख्याक कोटयातून भरल्या जाणा-या ५० टक्के जागा गुणवत्तेच्या आधारावरच भरल्या गेल्या पाहिजेत. नवी मुंबईतील फादर अँग्नेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या प्रवेश पध्दतीचा राज्यात अवलंब करण्याबाबचा प्रश्न नरेंद्र पाटील, धनंजय मुंडे, संदिप बाजोरिया आदी सदस्यांनी उपस्थित केला होता.
अकोला रूग्णालय शस्त्र क्रिया विभाग दुरूस्तीसाठी बंद
अकोला रूग्णालय शस्त्रिक्रया विभाग दुरूस्तीसाठी सध्या बंदं आहे. मात्र शस्त्रक्रिया बंद झालेल्या नाहीत. अस्थिव्यंग शस्त्रक्रियागृहात शल्यशस्त्र विभाग सुरू करण्यात आला असून तेथे शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.गोपी किशन बाजोरिया यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभाग बंद असून शस्र क्रियांसाठी दोन तीन महिन्यांच्या तारखा देण्यात येत असल्याचे बाजोरियांनी नमूद केले होते. मात्र मुख्य शस्र क्रियांसह किरकोळ शस्र क्रियांकडेदुर्लक्ष झालेले नाही. यामुळे संबंधितांवर कारवाईचा प्रश्नच येत नाही. इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच नेहमीप्रमाणे शस्त्र क्रिया विभाग सुरू होईल, असे तावडे यांनी सांगितले.
तालुका क्रीडा संकुलाचा विषय प्राधान्यावर
‘राज्यात ३८० तालुका क्रीडा संकुले उभारण्याचे काम २००३ पासून सुरू आहे. यापैकी ६५ क्रीडा संकुलांना मार्च २०१४ अखेर निधी वितरीत झाला आहे. तर १७ संकुलांच्या अंदाजपत्रक आराखड्यांना राज्य क्रीडा विकास समितीची मान्यता मिळाली आहे. ३३ संकुलांचे अंदाजपत्रक आराखडे संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित १०४ क्रीडा संकुलांसाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, अशी माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित व धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
0
लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक शोषण , प्रियकराविरूद्घ गुन्हा दाखल

यवतमाळ , दि. ९ (प्रतिनिधी) -एका युवतीला प्रेमाच्या जाळयात ओढून तीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष लैगिंक शोषण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री उजेडात आला. वडगाव रोड पोलिसांनी याप्रकरणी प्रियकर आरोपीस अमरावती येथून अटक केली.
सचिन कृष्णराव माऊले (२५) रा. हनुमान नगर अमरावती असे आरोपीचे नाव आहे. सन २०१२ मध्ये त्याने भ्रमणध्वनीवरून फोन लावला. सदर क्रमांक चुकल्याने फोन वणी तालुक्यातील चिखलगाव येथील २२ वर्षीय युवतीला लागला होता. त्यावेळी त्या दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. अशातच त्याच्यामध्ये संवाद वाढल्याने युवकाने सदर युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ््यात ओढळे. ती युवती शहरातील एका नर्सींग विद्यालयात प्रशिक्षण घेत असून जयभारत चौकातील महीलेच्या घरी भाड्याने राहत होती. याच ठिकाणी तो तीला भेटण्यासाठी येत होता. दरम्यान तीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक सबंध प्रस्तापित करून लैगिंक शोषण केले. दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असताना युवकाने लग्न करण्यास नकार दिला. तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे युवतीने वडगाव रोड पोलिस ठाणे गाठून सचिन माऊले याच्याविरूद्घ तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३७६, ३२३, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. वडगाव रोडचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पिदुरकर व पथकाने अमरावती येथे जाऊन आरोपी सचिनला अटक केली.












