
नागपूर- भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी नागपूरमधील बोरखेटी टोलनाक्यावर बुधवारी टोलविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सकाळी आठ वाजल्यापासून नागपूर- हैदराबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील मनसर आणि बोरखेडीचे टोलनाके बंद करण्याची मागणी शोभाताईंनी केली आहे. या कंपनीने दोन ऐवजी चार ठिकाणी टोलनाके बसवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Archive for January, 2015
0
मुख्यमंत्र्यांच्या काकूचे टोलविरोधात आंदोलन
0
कापुस घेवुन जाणारा ट्राक्टर पलटी

आर्णी – बोरगांव येथिल शेतकरी बालकिशन पवार हे ट्राक्टर मध्ये कापुसभरून आर्णी येथे विकण्यासाठी घेवुन जात असतांना दाभडी जवळ राञी दोनच्या सुमारास भरलेल्या ट्राक्टर फलटी झाल्याची घटना घडली.हा अपघात रस्तावरिल खड्यांमुळे झाला असुन यात कोणतीही जिवित हानी किवा कोणीही जखमी झाले नाही.कापसाने भरलेला ट्राक्टर रस्ताच्या बाजूला फलटी झाला असुन ट्राक्टरच्या ट्रारलीचे मोठे नुकसान झाले आहे.बाधकाम विभागाने आर्णी ते बोरगांव या रस्ताचे काम जलद गतीने करण्याची मागणी जणतेतुन होत आहे.
0
शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती, सहकार व पणन विभागाचा आदेश

नागपूर- सन २०१४ मध्ये पडलेल्या अल्पपावसामुळे खरीप हंगामातील आणेवारी ५० पैसापेक्षा कमी निकाली. त्यामुळे सरकारने शेतकºयांना दुष्काळी पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पीक कर्जासाठी बँकांनी शेतकºयांकडे तकादा लावल्याने या संकटात भर पडली होती. अखेर सहकार व पणन विभागाने शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश काढले.
जिल्ह्यातील २०५० गावातील अंतिम आणेवारी ५० पैशापेक्षा कमी निघाल्याने यापूर्वीच टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात येऊन विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सहकार विभागाशी संबंधित निगडीत सहकार कर्जाचे रुपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगीती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये टंचाई परिस्थिती जाहीर केली आहे. त्या सर्व गावातील अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतरण व शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात येणार आहे. महाराष्टÑ राज्य सहकारी बँक लि.मुंबई व जिल्हा मध्यवर्ती बँकानी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
0
आयुष्याची सार्थकता-किशोर वैद्य

साहित्यांकाच्या भावविश्र्वात शहराविषीयीच्या विशिष्ठ संवेदना साकार झालेल्या असतांत. ते ज्या शहरात राहतात त्या शहराविषयी विलक्षण अस्मीता त्यांच्या मनात निर्माण झालेली असते. शहराविषीयी ज्या अपार आपुलकीने त्यांच्या मनाचा एक कोपरा सदैव काहीना काही करण्याची धडपड करीत असतो. अशाच सहित्यीकाच्या प्रवासातील एक नाव किशोर गंगाधर वैद्य बि.ए.बी.एड.सेवानिवृत्त प्राचार्य विकास हिंदी कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा त्यांच्या अमृत महोत्यव ७५ च्या पर्वावर त्यांच्या परिचय नव्याने व्हावा आणी त्यांना सर्वार्थान शुभेच्छांनी गौरविला जाव हा ह्या मागचा उद्देश प्राचार्य पदाची धुरा सांभाळता साभाळता आयुष्यातल्या हौसेच्या मोलाला ते विसरले नाही. अनेक खाचर वळग्यातुच जिवनाचा प्रवास सुरू केला. आयुष्यात काहि गमावल्या शिवाय कमावता येत नाही म्हणतात स्वत: च्या अनुभवला समोर जाताना काटे दुर करीत वाटचाल करीत राहिले मागे वळुन न पाहता आज त्यांच्या यशस्वी जिवनाचा आलेख इतका मोठा झाला आहे. उंचावत गेलाय की त्यांची मुले सुध्दा म्हणतात हेच आमचे बाबा आहेत आमच्यासाठी वंदनीय स्वत:ही घडवित असताना कुटुंबाची जबाबदारी त्यांनी कधी नाकारलीच नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी झटत राहीले मुलांना चांगल यशस्वी जिवन देवून मोठ्या जबाबदारीतुन मुक्त झाले. किशोर गंगाधर वैद्य व्यक्ती म्हणून मान्य आहेतच पण अनेक भुलावलेल्या पदांचा मानकरी आहे. नगर परिषद पांढरकवड्याचे शिक्षण सभापती नागपूर विद्यापिठाचे सीनेट सदस्य गो.क.ग न्यासचे विश्वस्त सचिव दत्त मंदिर न्यास दक्षता व शांतता कमिटी सदस्य समर्थ ब्रम्हचारी महाराज न्यास चिंचमंडळ स्वा.सावरकर प्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी होते. सन १९६४ आॅल इंडिया खो-खो व कबड्डी चॅपीयन शिप करता त्यांची ठाणे येथे निवड चालु होती. यवतमाळ जिल्हा न.प.प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचे निमंत्रावरुन दिल्ली येथेल सम्मेलन १९८९ मध्ये त्यांची उपस्थिती होती. देशासाठी आपण काही देणे लागतो ह्या प्रमाणे सन १९६७ गोवा येथे मुक्तीवर मोहन रानडे यांचे सोबत विदर्भात प्रवासही केला. सन १९७५ ते १९७७ आणी बाबीत १३ महीन्यांचा तुरुंगवासही त्यांनी भोगला. कधी कधी आपल्या जवळपास वावरणारी व्यक्ती इतकी मोठी असते हे लक्षात येत नाही. आणी म्हणूनच अशा लिखाणाची गरज असते. सहित्सीक म्हणून मी त्यांचा उल्लेख केला त्यांची स्वत:ची काही पुस्तके आहे.(१) भारतीय स्वातंत्र्याची गाथा असे झुंजले चिमुर २००२ (२) प्रवास मोक्षधामाचा ह्या पुस्तकातील मृत्युं नंतर घडणाºयां घडामोडीचा आलेखच त्यांनी मांडलाय सामाजिक न्याय मंत्री अॅड.शिवाजी मोघे ह्यांनी त्यांच्या मनोगतातुन मोक्षधामाची व्यथा अगदी मार्मीक शब्दात मांडुन किशोर वैद्यानां न्याय दिला आहे. ते म्हणतात कोणा एकाचा मृत्युं झाला हे वैद्यंना कळायचीच वेळ वैद्य जात पात पक्ष सर्व बाजुला ठेवून हजेरी लावयाचे एखाद्या अनुपस्थित दिसले तर त्यांचे गैरहजेरीची चर्चा होते. असे लोक म्हणत प्रारंभापासून ते श्रध्दांजलीपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत हजारो अत्येष्टी पार पाडण्यात प्रसंगी स्वत:चे पैसेही खर्च केले यापेक्षा मोठा दुसरा सामाजिक कार्य कोणते असु शकेल. व्यक्त करीत असताना किशोर वैद्यांना अलेले बरे वाईट अनुभव त्यांनी प्रवास मोक्षधामाचा ह्या पुस्तकात लिहिले आहे.प.पु माधव महाराज व माया चे छायाचित्र असलेले पाटणबारीचा पावन मठ हे पुस्तक लिहुन खाºया अर्थाचे जिवनाचे सार्थक करून घेतले असेही म्हणाला हरकत नाही. पत्रकारीतेच्या क्षेत्रातही ते मागे नाही दै.लोकमत, दै.लोकदूत, लोकसत्ता, सकाळ वरुन भारत, नवभारत, नागपूर पत्रिका आणी केळापूरचे वारे या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी म्हणून प्रदिर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. नागपूर व यवतमाळ आकाशवाणीवर साक्षरता अभियाना अंतर्गत मुलाखतीचे प्रसारण त्यांनी त्यांच्या वाटचालीत अनेक पुरस्कार हि ळिविले. त्यात प्रामुख्या तिन वेळा आदर्श शिक्षक, पौढ शिक्षण साधण व्यक्ती पुरस्कार, स्वतंत्र्य भारताच्या उभारणी दुर संचार विभागाचे योगदान, उपमुख्यामंत्री गोपीनाथ मुडे यांचे उपस्तितीत सन्मानपत्र, जेष्ठ पत्रकार सन्मानपत्र , यवतमाळ जिल्हा ब्राम्हण सभेचा समाजभूषण पुरस्कार त्यांचे नावावरआहे. मॉरीशस, अंदमान, श्रीलंका, लंडन, इंटली, फ्रान्स, आॅस्ट्रीया,वॅटीगनसिटी, स्विर्त्झलँड, हॉलंड, युरोप देशांचे यात्राचे भ्रमणही केले. त्यांच्या शिक्षण पेशासोळयात लेखक साहित्यीक पत्रकार सामाजिक कार्यकर्ता देशाप्रती जबाबदारी भावना जपणाºया ह्या हुरहुन्नरी कलावंताचा त्यांच्या असमान्य व्यक्तीमत्वाला त्यांच्या पुढील उज्वल भविष्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा! अमृत मोहोत्सवा निमित्य अभिष्ट चिंतन !
श्रीमती शुभदा मुंजे, यवतमाळ
0
शेतक-यांना मदत व पेट्रोल-डिझेल दरकपातीसाठी काँग्रेसची राज्यभरात तीव्र निदर्शने

मुंबई, दि. 21 – नैसर्गिक संकटांनी होरपळून निघालेल्या राज्यातील शेतक-यांना तातडीची भरीव मदत व आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरत्या किंमतींच्या प्रमाणात देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरकपात मागणी तसेच भू-संपादन कायद्यातील शेतकरी विरोधी दुरूस्त्यांना विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने दि. 21 जानेवारी 2015 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निदर्शने केली.
या तीनही मुद्यांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दि. 21 जानेवारीपासून दि. 25 जानेवारी पर्यंत जिल्हा आणि तालुकास्तरावर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राज्यात प्रामुख्याने जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील व राज्यातील सरकारविरूद्ध आंदोलन करण्यात आले.
दि. 21 जानेवारी 2015 रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, पुणे, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर आदी ठिकाणी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, अन्य शासकीय कार्यालये, पेट्रोल पंपांवर आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधले. दि. 22 जानेवारीपासून तालुका पातळीवर आंदोलन केले जाणार आहे.
0
तलाठी कार्यालयांना निवासस्थानासह स्वत:ची सुसज्ज ईमारत

सर्व तहसिल कार्यालयांमध्ये महिला सुविधा केंद्र
यवतमाळ, दि. 21 : ग्रामीण स्तरावरील तलाठी कार्यालये गावकऱ्यांशी निगडीत असलेली महत्वाची कार्यालये आहे. बहुतांश नागरिकांचा तलाठी कार्यालयाशी संबंध येतो. त्यामुळे जिल्ह्यात सदर कार्यालये निवासस्थानासह स्वत:ची सुसज्ज ईमारत असलेली बनविण्यात येणार असून पहिल्या टप्यात काही कार्यालये यावर्षीच हाती घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी गार्डन हॅाल येथे दुष्काळी मदत वाटप तसेच बांधकाम विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, बांधकामचे अधीक्षक अभियंता श्री.बनगीनवार, उपविभागीय अधिकारी दिपक सिंगला यांच्यासह महसूल, कृषी, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी सुरुवातीस तालुकानिहाय मदत वाटपाचा आढावा घेतला. जिल्ह्यास मदत वाटपासाठी 122 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी 1 लाख 28 हजार शेतकऱ्यांना 70 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित वाटप तातडीने करण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत संबंधीतांना केल्या. मदत वाटपात काही अडचण असल्यास याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी स्वतंत्र बैठक घेण्याबाबतही त्यांनी सुचविले. यावेळी बांधकाम विभागाचा आढावा घेतांना पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय तलाठी कार्यालये, बांधकामासाठी लागणारी जागा व निधीचा स्वतंत्र आढावा घेतला. पहिल्या टप्यात काही तलाठी कार्यालये यावर्षीच हाती घेण्यासाठी टाईप प्लॅन तयार करण्यासोबतच जमीन हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करण्याबाबत त्यांनी सांगितले. पुढील टप्यात जिल्ह्यातील सर्व तलाठी कार्यालये निवासस्थानासह सुसज्ज करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी तालुकानिहाय प्रशासकीय ईमारती, त्यासाठीचे अंदाजपत्र व जमीन उपलब्धतेबाबतही चर्चा केली. ज्याठिकाणी जागा नसेल तेथे जागेचे प्रस्ताव तातडीने पाठवून कार्यवाही करण्यास सांगितले. जिल्ह्यातील चालू, प्रलंबित व प्रस्तावित कामांचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला. तहसिलच्या ठिकाणी महिलांसाठी सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यात सर्व तहसिलच्या ठिकाणी महिला सुविधा केंद्राचा उपक्रम हाती घेण्याचा सुचना त्यांनी केल्या. या सुविधांच्याबाबतीत जिल्हा मॉडेल म्हणून ओळखल्या जावा या पध्दतीने हे काम केले जावे, असे ते म्हणाले. यासोबतच बेंबळा पर्यटन, यवतमाळ शहरातील उड्डाण पुल, धान्य गोदाम याबाबतही पालकमंत्र्यांनी संबंधीतांना सुचना केल्या. तिर्थक्षेत्रासाठी अनेक नवे प्रस्ताव वारंवार येत असतात. परंतु निकषात बसत असेल तरच तिर्थक्षेत्रांना मंजुरी द्या, असे पालकमंत्र्यांनी संबंधीतांना सुचविले. बांधकाम विभागात अनेक महत्वाची पदे रिक्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली होत असतांना नवीन अधिकारी येईपर्यंत जुन्या अधिकाऱ्यांना सोडू नका, असे ते म्हणाले. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत गावस्तरावर शेतकऱ्यांचा माल साठवणुकीसाठी अनुदानावर गोदाम बांधकामासाठी निधी उपलब्ध होते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातून
अधिकाधिक प्रस्ताव सादर केले जावे.जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदाराने किमान 5 नाविण्यपुर्ण उपक्रम राबविले पाहिजे. त्यासाठी निधी लागत असल्यास तो उपलब्ध करून देवू. तहसिलदारांनी बेधडकपणे संकल्पना मांडाव्या, त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करू, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यात वनहक्क पट्टे वाटपाला गती द्यावी, आवश्यकता भासल्यास ग्राम वनहक्क समित्यांच्या अध्यक्षांची बैठक घेवून या समित्यांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रसत्न करावे, असे सांगून कोतवाल, पोलीस पाटील भरती, तांडा वस्त्यांना महसूली दर्जा, वाळूबाबत हैदराबाबत पॅटर्न आदी विषयांचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.
0
वैद्य यांचा गुरूवारी अमृतमोहत्सव

यवतमाळ दि. २१ ( रवी चरडे ) – केळापूर तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक पटलावर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणारे किशोर गंगाधर वैद्य यांनी वयाचे ७५ वर्ष पूर्ण केले आहे. त्यानिमित्याने अमृतमहोत्सव समारंभाचे आयोजन २२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जिड्डेवार सांस्कृतीक भवन, पांढरकवडा येथे केले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री (भारत सरकार) हंसराज अहिर यांच्या हस्ते वैद्य दाम्पत्याचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर तर प्रमुख अतिथी म्हणून खा. भावना गवळी, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आ. मदन येरावार, आ. प्रा. राजू तोडसाम, आ. डॉ. अशोक उईके, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, शेतकरी नेते किशोर तिवारी उस्थित राहणार आहे. या कर्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गजानन किशोर वैद्य, आनंद किशोर वैद्य यांनी केले आहे.
0
बहुजन मुक्ती पार्टी : ‘इव्हीएम’ची अंत्ययात्रा

यवतमाळ, दि. २० – सुप्रिम कोर्टाने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी पेपर ट्रेल अनिवार्य केले होते. मात्र २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत इव्हीएम मशीनमध्ये पेपर ट्रेल लावण्यात आले नाही. त्यामुळे इव्हीएमच्या माध्यमातून घोटाळा करण्यात आला. असा आरोप करीत बहुजन मुक्मी पार्टीच्यावतीने आज शहरातून इव्हीएमची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर स्थानिक बसस्थानक चौकात त्याचे दहन करण्यात आले.
सुप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाला इव्हीएम मशीनमध्ये पेपरट्रेल अनिवार्य केले होते. त्यानुसार राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचा वापर होणे गरजेचे होते. व याबाबत भारत मुक्ती मोर्चाने इव्हीएमबद्दल राज्यभर जनजागरण केले होते. मात्र निवडणूक आयोगाने पेपरट्रेलचा वापर न करता निवडणूक प्रक्रीया पार पडली. त्या निषेधार्थ आज महात्मा फुले चौक, पाच कंदील चौक, हनुमान आखाडा चौक, तहसील चौक, आंबेडकर चौक, शारदा चौक, मार्इंदे चौक, वीर वामनराव चौक, दत्त चौक या मार्गाने भ्रमण करून बसस्थानक चौकात इव्हीएमचे दहन करण्यात आले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0
दारव्हा तालुक्यात बिबट्याचा मृत्यू

यवतमाळ,दि. २० (पवन लताड) – यवतमाळ वनवृत्तात बिबट मृत्यूची मालिकाच सुरू आहे. गत आठवड्यात दारव्हा वनपरीक्षेत्रात बिबटाचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना, हातणी-माळेगाव शिवारात आज मंगळवारी पाच वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाविरोधात वन्यप्रेमीतून संताप व्यक्त होत आहे.
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ वनवृत्तातील आठही वनपरीक्षेत्रात बिबटांचा वास्तव असल्याचे वनविभागाच्या प्राणी गणनेतून स्पष्ट झाले आहे. मात्र वन्य प्राण्यांचे जतन करण्याच्या दृष्टीने वनअधिकारी ठोस पाऊले उचलत नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यात यवतमाळसह अन्य वनपरीक्षेत्रात बिबटांचा मृत्यू झाला आहे. मात्र यातून अधिकाºयांनी बोध घेतला नसून उपाययोजना केल्या नसल्याने गत आठवड्यात दारव्हा वनपरीक्षेत्रातील ब्रम्हणाथ शिवारात बिबटाचा मृत्यू झाला. ही घटना ताजीच असताना, याच वनपरीक्षेत्रातील माळेगाव शिवारात आज मंगळवारी सकाळी एका गुराख्याला पाच वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वनअधिकारी गवई, वनपरीक्षेत्र अधिकारी नाल्हे, क्षेत्रसाहाय्यक धोतरे घटनास्थळी दाखल झाले. पाच दिवसापूर्वीच या बिबटचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. जंगलात बिबटचा वास्तव असल्याची साधी माहिती देखील वनपरीक्षेत्र अधिकाºयाकडे नसल्यामुळे आठवड्यात दोन बिबटचा मृत्यू झाल्याचा आरोप वन्यप्रमींनी केला आहे. यापूर्वी आढळलेल्या मृत बिबटाचे दोन दात व एक पंजा गायब असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले होते. आज आढळलेल्या बिबटाचे अवयव मात्र शाबूत दिसून आले. बिबटचा मृत्यू नेमका कशामूळे झाला याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र शवविच्छेदन अहवालच वनविभागाकडून दडपण्यात येतो. कारण यापूर्वी वनवृत्तात मृतावस्थेत आढळलेल्या एकाही बिबटच्या मृत्यूचे कारण अधिकारी सांगू शकलेले नाही.
0
आर्णीत शेतकºयांचा रास्ता रोको , कापूस खरेदी बंद ठेवल्याने उद्रेक

यवतमाळ , दि. २० – कापूस पणन महासंघाने कापूस खरेदी बंद ठेवल्याने शेतकºयांच्या संतापाचा उद्रेक झाला. कापूस खरेदी सुरू करा या मागणीसाठी संतप्त शेतकºयांनी आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डसमोर आर्णी-यवतमाळ मार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक खोळंबली होती.
कापूस पणन महासंघाने १ जानेवारीपासून संपूर्ण कापूस खरेदी बंद केली होती.दरम्यान सोमवार १९ जानेवारीपासून आर्णी येथील महालक्ष्मी जिनींगमध्ये कापूस खरेदी सुरु केली. पहिल्याच दिवशी ४०० शेतकºयांनी भाड्याने वाहन घेऊन कापूस विक्रीसाठी आणला होता. त्यापैकी १०० वाहनातील कापसाची खरेदी करण्यात आली. उर्वरीत वाहनाचे मोजनमाप न झाल्याने यार्डात उभी होती. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी कापूस खरेदी सुरू करावी या मागणी करीता बाजार समितीच्या यार्ड समोर आर्णी- यवतमाळ मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य प्रविण शिंदे, बाजार समितीचे सभापती जिवन जाधव यांनी केले. या मोर्चाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शेतकºयांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकºयांनी कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी केली. तसेच कापसाला ४ हजार ५० रुपये भाव जाहीर केल्यानंतर जीनींगने ३हजार ९५० रुपये भाव देण्यात आल्याने रोष व्यक्त केला. यावेळी शिंदे यांनी कापूस पणन महासंघाच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. त्यानंतर आर्णी येथील उर्वरीत तीन्ही जिनींग सुरू केले असून सर्व शेतकºयांच्या कापूस खरेदी करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाने आर्णी- यवतमाळ मार्गावरील वाहतुक एक तास ठप्प होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0
माझगाव डॉकमध्ये विविध पदांच्या 9 जागा

माझगाव डॉक मुंबई मध्ये मुख्य व्यवस्थापक (5 जागा), मुख्य व्यवस्थापक (सुरक्षा) (1 जागा), सहाय्यक कंपनी सेक्रटरी (1 जागा), वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (1 जागा),भाषांतरकार (रशियन) (1 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 10-16 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0
बँक ऑफ बडोदा बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथे शिपाई/सफाईवाला पदाच्या 86 जागा

बँक ऑफ बडोदा बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथील शाखा व कार्यालयात शिपाई/सफाईवाला (86 जागा) या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 16 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.bankofbaroda.com/recruitment_new_1.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0
केजरीवालांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली – भाजपाकडून पैसे घ्या आणि मत ‘आप’लाच द्या असे विधान करुन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या तीन दिवसांत केजरीवाल यांना दुस-यांदा नोटीस हजावण्यात आली आहे.
१८ जानेवारी रोजी उत्तम नगर येथील सभेत भाषणादरम्यान केजरीवाल यांनी निवडणुकीच्या काळात भाजपावाले तुम्हाला पैसे देऊ करतील. त्यासाठी नाही म्हणू नका ते पैसे घ्या आणि तुमचे मत मात्र ‘आप’लाच द्या असे विधान केले होते.
याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे केजरीवालांविरोधात विविध राजकीय पक्षांकडून तकारी आल्या आहेत. याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली असून गुरुवारी चार वाजेपर्यंत या नोटीशीवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
यापूर्वी १७ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकऱणी केजरीवालांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आजपर्यंत मुदत देण्यात आली होती.
0
भारतातील वाघांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून देशातील वाघांची संख्या रोडावत चालली आहे अशी ओरड सुरु असतानाच वन्यप्रेमी आणि व्याघ्रप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार वर्षात भारतात वाघांच्या संख्येत तब्बल तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१० नंतर भारतातील विविध अभयारण्यातील वाघांची संख्या सुमारे दोन हजार २२६ वर पोहोचली आहे.
२०१४मध्ये करण्यात आलेल्या वाघ्रगणनेचा अहवाल मंगळवारी सादर करण्यात आला. २०१०मध्ये भारतात वाघांची संख्या एक हजार ७०६ इतकी होती. तर २००६ मध्ये भारतात केवळ एक हजार ४११ वाघ होते. वाघांची घटती संख्या लक्षात घेता देशभरात गेल्या काही वर्षात वन्यजीव प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर वाघ वाचवा मोहीमा हाती घेतल्या होत्या. या मोहीमांना मोठे यश मिळाल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
‘जगात वाघांची संख्या कमी होत आहे मात्र भारतात ही संख्या वाढत आहे. ही खरंच आनंददायी बाब असल्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जवडेकर यांनी सांगितले. जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी तब्बल ७० टक्के वाघ भारतात आहे. जेव्हा वाघांची शेवटची गणना करण्यात आली होती त्यावेळी ही संख्या एक हजार ७०६ इतकी होती. नुकत्याच करण्यात आलेल्या वाघ्रगणनेनुसार ही संख्या दोन हजार २२६ पर्यंत पोहोचली आहे. याबाबत आपण अभिमान बाळगला पाहिजे. तब्बल तीस टक्क्यांनी वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही खरंच भारतासाठी मोठी आनंदाची बाब आहे, असे जावडेकर म्हणाले. कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये वाघांची संख्या वाढत आहे.
0
केजरीवालांचे बेदींना खुल्या चर्चेचे आव्हान

नवी दिल्ली – भाजपाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांचे नाव जाहीर होताच दिल्लीमध्ये भाजपा आणि आपमध्ये वाकयुध्दाला सुरुवात झाली आहे.
मंगळवारी सकाळी किरण बेदी यांचे मुख्य स्पर्धक अरविंद केजरीवाल यांनी टि्वटरवरुन बेदींना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीबद्दल शुभेच्छा दिल्या आणि लगेचच खुल्या चर्चेचे आव्हान दिले. मी किरण बेदींना खुल्या चर्चेचे आव्हान देतो. लोक धर्म-जात या आधारावर मतदान करतात. त्यांना मुद्यांची कल्पना नसते. जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर एक ते दोन तास वादविवाद झाला पाहिजे. यानिमित्ताने लोकशाहीमध्ये चांगला पायंडा पडेल असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवालांनी बेदींना टि्वटरवरील त्यांचे बंद केलेले खाते सुरु करण्याची विनंती केली. बेदींनी आपल्या टि्वटर अकाऊंटवरील केजरीवालांचे खाते ब्लॉक केले आहे. केजरीवालांचे टि्वटर अकाऊंट वातावरण दूषित करते. त्यांच्या संदेशातून नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे पंधरा महिन्यांपूर्वी मी माझ्या टि्वटर अकाऊंटवरील केजरीवालांचे खाते बंद केले असे बेदी म्हणाल्या.
बेदी यांनी केजरीवालांचे खुल्या चर्चेचे आव्हान स्विकारले असले तरी, ही चर्चा विधानसभेत होऊं द्या असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणूक काळातील खुल्या चर्चेचे आव्हान फेटाळून लावले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन यांनी केजरीवालांचे खुल्या चर्चेचे आव्हान स्विकारण्याची तयारी दाखवली. या निमित्ताने एक चांगाल पायंडा पडेल. परस्पर सहमतीने एखाद्या वृत्तवाहिनीची निवड करुन, त्यावर वादविवाद झाला पाहिजे. जेणेकरुन जनतेसमोर आपल्या योजना, विचार मांडता येतील असे माकन म्हणाले.
0
शपथविधीसाठी भाजपाने उधळले ९८.३३ लाख

मुंबई – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मोठे यश मिळाले. सत्तेत आलेल्या भाजपाचा ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भव्यदिव्य स्वरुपात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपाने तब्बल ९८.३३ लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली आहे.
एकीकडे राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळत होते. मात्र असे असतानाही भाजपाने सत्ता स्थापनेच्या सोहळ्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला. या रंगतदार सोहळ्यासाठी भाजपाकडून ९८.३३ लाख रुपये खर्च करण्यात आले.
माहिती अधिकार कायद्याचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वानखेडे स्टेडियमवर भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्यात किती खर्च झाला याची माहिती महाराष्ट्र सरकार आणि भाजपाच्या मुंबई विभागाकडे माहिती मागितली होती. यावेळी भाजपाच्या खर्चाची माहिती देण्यात आली. दरम्यान, या खर्चाबाबत भाजपाच्या मुंबई विभागाकडे विचारणा केली असता तेथून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे गलगली म्हणाले.
0
गोदान एक्स.ने ४ महिलांना उडवले

आसनगाव – ठाणे जिल्ह्यात आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या धडकेत चार जण ठार झाले. दुपारी अडीच वजेच्या दरम्यान ही घटना घडली. गोदान एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना हा अपघात घडला.
शहापूर येथील गुरुद्वारात एका कार्यक्रमासाठी आलेल्या चार महिला आसनगाव स्टेशनवर उतरल्या. चौघीजणी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन येथील ट्रॅकवरुन चालत असताना त्यांना गोदान एक्स्प्रेसची धडक बसली. यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला.
0
तिळगुळ घ्या व प्रत्येक घरात शौचालय बांधा – खा.भावना गवळी

यवतमाळ, दि. १९ : स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने गावागावात स्वच्छ भारत मकरसंक्रांत सप्ताह राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सावरगड येथे आयोजित
कार्यक्रमास खा.भावनाताई गवळी यांनी सहभागी होवून तिळगुळ घ्या व प्रत्येक घरात शौचालय बांधा अशा शब्दात गावकऱ्यांना शौचालय बांधण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी श्री.ईश्वरकर, सरपंच सुहाष सरगर, प्रा.मोहनिष सवाई, प्रा.ओमी चांडक आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे सावरगड येथे शिबीर सुरु असून त्या शिबीरात मकरसंक्रांतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात खा.गवळी सहभागी झाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्यावतीने मोठ्याप्रमाणावर शौचालय बांधकामाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्यावतीने यासाठी पात्र कुटुंबाना 12 हजार रुपये शौचालय बांधकामासाठी अनुदान दिल्या जाते. त्याचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा व अधिकाधिक शौचालय बांधावे, असे आवाहन खा.गवळी यांनी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.कलशेट्टी यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त करून संपुर्ण गाव निर्मल ग्राम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. प्रत्येकाने स्वच्छतेचा भ्यास घेतला पाहिजे. शासन यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचलन गजानन परसोडकर यांनी केले तर आभार प्रविण दळणे यांनी मानले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
महसूली गावात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहिर
यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यात सन 2014-15 या वर्षातील खरीप हंगामातील अंतीम पैसेवारी 50 पैसे वा त्यापेक्षा कमी असलेल्या 2050 महसूली गावात टंचाई सदृष्य परिस्थिती जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक गावे पुसद तालुक्यतील आहे. या गावांमध्ये नियमाप्रमाणे सवलती लागू करण्यात येणार आहे.
टंचाई सदृष्य जाहिर करण्यात आलेली तालुकानिहाय गावांची संख्या अशी आहे. यवतमाळ तालुक्यातील 136 गावे टंचाई सदृष्य आहे. कळंब तालुका 141, बाभुळगाव 127, आर्णी 106, दारव्हा 146, दिग्रस 181, नेर 121, पुसद 187, उमरखेड 136, महागाव 114, केळापूर 131, घाटंजी 107, राळेगाव 132, वणी 160, मारेगाव 108 तर झरी जामणी तालुक्यातील 117 गावांचा समावेश आहे. टंचाई सदृष्य घोषित गावांमध्ये 8 प्रकारच्या सुविधा शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात जमीण महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीत स्थगिती, विज बिलात 33.5 टक्के इतकी सूट, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामाच्या निकाषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची विज जोडणी खंडीत न करणे यासारख्या सवलतीचा समावेश असल्योच जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
0
लाचेची मागणी करणाºया मंडळ अधिकाºयास अटक

यवतमाळ , दि. १९ – शेत जमिनीचे कुळ आजीचे नावे करून फेरफार करण्यासाठी साडेतील लाखाची मागणी करणाºया अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर येथील मंडळ अधिकाºयास अटक केली. संजय कृष्णराव मांडवगणे (४८) असे लाच मागणाºया मंडळ अधिकाºयाचे नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव , दत्तापूर सर्कलमध्ये कार्यरत होते. दत्तरामपूर येथील गट क्रमांक ६७/१ मधील शेत जमीनीचे कुळ आजीचे नावे चढवून त्याचा फेरफार करून देतो. सध्या ह्यात असलेले वारसदारांची नावे सातबारावर चढवून देतो असे म्हणून ३ लाख ५० हजार लाचेची मागणी शेतकºयाकडे केली होती. त्यापैकी पहिला हप्ता २५ हजार रुपये २ जानेवारी रोजी स्विकारण्याचे मान्य केले होते. या बाबतची तक्रार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून येथील पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख व पथकाने दत्तरामपूर येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, अरूण गिरी, नरेंद्र इंगोले, प्रकाश शेंडे,शैलेश ढोणे, अमोल महल्ले, अमित जोशी, अनिल राजकुमार, नीलेश पखाले, गजानन राठोड, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, सुधाकर कोकेवार, विशाल धलवार यांनी केली.










