पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2014

मिनी मंत्रालय संपर्क अभियान- मे २०१४- दोस्तहो ..

मिनी मंत्रालयाच्या संदर्भात विविध पक्ष आणि नेत्यांसोबत संपर्क झाला. महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, मंत्री व इतर मान्यवर अशी सुमारे १००० लोकांना पत्रे पाठवून मिनी मंत्रालयाला पाठींबा देण्याबाबत विनंती केली. अनेकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या . विदर्भात ठिकठिकाणी विविध सभा/कार्यक्रमातूनही ‘मिनी मंत्रालयाची’ भूमिका मांडण्यात आली.
मात्र आतापर्यंत हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या लोकांनीही विरोध केला नाही, हे आवर्जून सांगायला हवे. आणि ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला तो अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा होता.
तथापि ‘राज्यमंत्र्यांना अधिकार का म्हणून द्यायचे?’ अशी भाषा काहींच्या तोडून ऐकून मी तर थक्कच झालो. जणू काही राज्यमंत्र्यांना अधिकार दिले म्हणजे आपली वडिलोपार्जित संपत्तीच त्यांच्या नावाने करून देत आहोत, अश्या प्रकारचा आव हे लोक आणत होते.
राज्यमंत्री हे पद आणि त्याची अवस्था खरच दयनीय आहे. एवढा अपमान सहन करून हे लोक केवळ जनतेवर इम्प्रेशन मारण्यासाठी राज्यमंत्री पद मिळावे म्हणून काय वाट्टेल ते करतात ? एवढी चापलुसी करणारे लोक जनतेचे खरच भले करू शकतील का?
लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या की मे महिन्यात लगेच विदर्भाव्यापी संपर्क यात्रा सुरु करीत आहोत. सद्य त्याची आखणी सुरु आहे.
सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, नेते, विचारवंत, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॉक्टर,व्यापारी, उद्योगपती, स्वयंसेवी संस्था, अधिकारी, कर्मचारी आदि सर्व क्षेत्रातील लोकांचे सक्रिय सहकार्य आवश्यक आहे. आर्थिक मदत देखील आवश्यक आहे. जिल्हा, तालुका स्तरावर कार्कारिणी/समित्याही नियुक्त करायच्या आहेत.
कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.
समन्वयातून समतोल विकासासाठी आणि विदर्भावरील अन्याय दूर करण्यासाठी ‘मिनी मंत्रालय’ हे एक सकारात्मक आणि क्रांतिकारी पाऊल ठरेल यात संशय नाही.
(मिनी मंत्रालय संग्राम समितीचा वेगळ्या विदर्भाला विरोध नाही. पण .. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत नागपूरला ‘मिनी मंत्रालय’ देण्यात यावे, अशी आमची सरळ सरळ आणि वास्तववादी मागणी आहे, हे कृपया समजून घ्यावे)
सारे मिळून विदर्भावरील अन्याय दूर करू या !
ज्ञानेश वाकुडकर
संस्थापक अध्यक्ष, मिनी मंत्रालय संग्राम समिती

March 21, 2014 in मनोरंजन
आंबेडकरी साहित्यविचार 0

आंबेडकरी साहित्यविचार

unnamed
माणसाला संघर्षसन्मुख करणारा हा विद्रोह आत्मसन्मानासाठीची शिकवण देतो. माणसाच्या खदखदनाऱ्या मनात संघर्षाची ठिणगी टाकतो. चळवळीतील संघर्षाची दीक्षा देतो . मनुस्मृतीच्या देशात ज्या शुद्रातीशुद्राचा जन्म झाला त्यांच्याकडे बुद्ध – आंबेडकरांचा विचार हाच जालीम उपाय असल्याची भावना या विद्रोहामागे आहे. जगण्याच्या , मुलभूत प्रश्नांच्या संदर्भात विद्रोहाचा अविष्कार होतो.
विद्रोहाच्या मुळाशी स्वातंत्र्याची उर्मी आहे असेही प्रत्ययाला येते.धर्म , संस्कृती, दांभिकता या प्रवृत्तींना नकार देऊन त्याविरोधात विद्रोह पुकारून स्वातंत्र्य या मूल्याचा स्वीकार केला जातो. प्रस्थापित मुल्यव्युव्ह नाकारून मानवी मुल्यांचा स्वीकार हि विद्रोहाची सकारात्मक स्वीकृती आहे. दलित कवितेतील विद्रोहाने अमानुषपण नाकारले आहे आणि माणूसपणाचा स्वीकार केला आहे . बुद्धिप्रामाण्यावादी विचारप्रणाली आणि स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्याय या मुल्यांची स्वीकृती हि या विद्रोहाची विधायक बाजू होय. म्हणूनच ” माणसाने पहिल्या प्रथम स्वत:ला उध्वस्त करून घ्यावे ” अश्या विध्वंसक विचारातून या कवितेचा प्रवास मानवी मुल्याकडेच होतांना दिसतो.

डॉ. महेंद्र भवरे
( दलित कविता आणि प्रतिमा )

March 21, 2014 in मनोरंजन

कॅनव्हातील गाडीसमोर पोलिसाला ढकलले , मोंदीना भेटण्यासाठी खटाटोप

यवतमाळ – आर्णी मार्गावरील मांगुळ येथे बंदोबस्त करणाºया पोलिसाला गाडीसमोर ढकलुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजता मांगुळ येथे घडली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे वाहन अडवून त्याच्यासोबत चर्चा करण्यासाठी दोन भावंडानी हा प्रयत्न केल्याचे बोलल्या जात आहे.
आर्णी तालुक्यातील दाभडी (बोरगाव) येथे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम होता. त्यानिमित्य गुरुवारी सकाळपासून आर्णी रोडवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यवतमाळ शहरचे पोलिस शिपायी दर्शन दिकोंडवार (२५) हे मांगुळ येथे तैनात होते. अशातच आरोपी विजय मधुकर टोने (३५), राजू मधुकर टोने यानी मांगुळ येथे रस्त्यावर मोठमोठी दगड ठेवले. ना. मोदी यांचे वाहन येथे थांबावे व आपण त्याच्यासोबत चर्चा करावी असा त्याचा उद्देश होता. ही बाब निदर्शनास येताच पोलिस शिपायी दिकोंडवार दगड उचलले. त्यामुळे संतप्त झालेल्या टोने बंधुनी आर्णी कडून यवतमाळकडे येणाºया कॅनव्हातील गाडी समोर सदर पोलिसाला ढकलुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी दिकोंडावार यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी टोने बंधुविरुद्घ भादंवि कलम ३०७, ३५३, ५०६, २९४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली.

March 21, 2014 in विदर्भ
'आप'मध्येही तिकिटांची सौदेबाजी 0

‘आप’मध्येही तिकिटांची सौदेबाजी

aap-logo
नवी दिल्ली – आम आदमी पक्षातही तिकीटांची खरेदी-विक्री केली जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले असून तिकीटासाठी पैसे मागणाऱ्या दोन नेत्यांची पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पैशांसाठी तिकीट मागणाऱ्या अरुणा सिंह आणि अशोक यांची पक्षातून हकालपट्टी केली जात असल्याचे सांगितले. सिंह या ‘आप’च्या अवध विभागाच्या संयोजक आहेत तर अशोक हे हरदोईचे कोषाध्यक्ष आहेत. या दोघांविरुद्ध लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी पैसे मागितल्याची तक्रार पक्षाकडे करण्यात आली होती. पक्षाने केलेल्या चौकशीत दोघेही दोषी आढळल्याने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ‘असे प्रकार पुन्हा घडल्यास त्याची गय केली जाणार नाही. कोणाबाबत अशी तक्रार आल्यास त्या उमेदवाराचे तिकीट रद्द करण्यात येईल’, असे केजरीवाल म्हणाले.
राखी बिडलान यांच्यावरील आरोप निराधार
राखी बिडलान यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हे आरोप केजरीवाल यांनी फेटाळले. राखी यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही, असे केजरीवाल म्हणाले. अन्य आमदारांना लोकसभा उनेदवारी नाकारण्यात आली असताना राखी यांना पुन्हा का उमेदवारी देण्यात आली, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता चांगल्या उमेदवार असल्याने त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

March 21, 2014 in देश-विदेश
बबन घोलप यांना तीन वर्षांची शिक्षा 0

बबन घोलप यांना तीन वर्षांची शिक्षा

download
मुंबई- बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेचे शिर्डीतील लोकसभा उमेदवार बबनराव घोलप यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पदाचा गैरवापर करून अमाप संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून घोलप आणि त्यांची पत्नी शशिकला यांना तीन वर्षांचा सश्रम कारावास तसेच एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळामध्ये बबन घोलप हे समाजकल्याणमंत्री होते. १९९९ मध्ये युतीच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाल्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षांत त्यांच्या व पत्नीच्या नावे एकूण ५० लाख रुपये जमा असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) तपासात आढळून आले होते. मात्र त्यांचा निवडणूक खर्च ८० लाख रुपये एवढा झाला होता. या प्रकरणी लाच-लुचपत खात्याने घोलप यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती, हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

March 21, 2014 in महाराष्ट्र
चारही आरोपींना जन्मठेप-शक्ती मिल बलात्कार प्रकरण 0

चारही आरोपींना जन्मठेप-शक्ती मिल बलात्कार प्रकरण

SHAKTI-MILLS
मुंबई- मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने चारही आरोपींना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. तर छायाचित्र पत्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी २४ मार्चला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात दोन तरुणींवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी गुरुवारी सत्र न्यायालयाने विजय जाधव, मोहम्मद अन्सारी, कासिम शेख, सिराज खान आणि अश्फाक खान या पाच आरोपींना दोषी ठरवले होते. या आरोपींच्या शिक्षेवर शुक्रवारी न्यायालयात युक्तिवाद झाला. सर्व आरोपी हे घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने त्यांना कमी शिक्षा करावी असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.तर आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी सरकारी वकिल उज्वल निकम यांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यातील पाचवा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरोधात सध्या बालन्यायालयात खटला सुरु आहे. सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी अवघ्या सात महिन्यांत हा खटला निकाली काढला. या खटल्याचे सर्व कामकाज ‘इन-कॅमेरा’ चालवण्यात आले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महालक्ष्मीच्या शक्ती मिल परिसरात छायाचित्र पत्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. याच आरोपींनी जुलैमध्ये टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर बलात्कार केला होता. दोन्ही बलात्कार प्रकरणाचे खटले एकत्रित सुरू करण्यात आले. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीन आरोपी सारखेच आहेत. महिला छायाचित्रकारच्या खटल्यात ४४, तर टेलिफोन ऑपरेटरच्या खटल्यात ३१ साक्षीदार तपासण्यात आले. दोन सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरविले. त्यापैकी दोन्ही बलात्कारप्रकरणी विजय जाधव, मोहम्मद अन्सारी आणि कासिम शेख यांना दोषी ठरविले आहे. तर अश्फाक शेख याला टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील बलात्कार प्रकरणी, तर सिराज खान याला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी, अशा दोन वेगवेगळया गुन्हयांमध्ये दोषी ठरवले.या निकालाची प्रत शुक्रवारी पाहिल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याचे बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश सालसिंगीकर यांनी सांगितले.

March 21, 2014 in महाराष्ट्र
१५ उमेदवारी अर्ज दाखल 0

१५ उमेदवारी अर्ज दाखल

election-330x185यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज शुक्रवारी २१ मार्च रोजी ९ उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करणाºयांमध्ये सुरेश राजाराम मुखमाले (महाराष्टÑ विकास आघाडी १ अर्ज), बंडू गणपत मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्र्टी १ अर्ज), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष १अर्ज), इंदूवर काशीराम राठोड (बहुजन मुक्ती आघाडी २ अर्ज), प्रकाश रघुनाथ राऊत (अपक्ष २ अर्ज), महादेव हरीभाऊ ताटके (अपक्ष १ अर्ज), जांबुवंतराव बापुराव धोटे (अखील भारतीय फॉरवर्ड ब्लॉक २ अर्ज), उल्हास वसरामजी जाधव (अपक्ष २ अर्ज), प्रशांत पंढरीनाथ सुर्वे(अपक्ष ३ अर्ज) दाखल केले. आतापर्यंत १७ उमेदवारांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले. आज २३ उमेदवारांनी ६३ अर्ज नेले आहे. आजपर्यंत एकूण ११७ उमेदवारांनी ३०३ अर्ज नेले आहे.

March 21, 2014 in विदर्भ
झी गौरव पुरस्कार २०१४ चा दिमाखदार सोहळा 0

झी गौरव पुरस्कार २०१४ चा दिमाखदार सोहळा

DAS_0068 DAS_0171 DAS_0272
मनोरंजनाच्या दुनियेत यशाचे अनेक मापदंड प्रस्थापित करणारी मराठी माणसाची अत्यंत जिव्हाळ्याची वाहिनी झी मराठीचे यंदाचे सनसिल्क प्रस्तुत झी गौरवपुरस्कार अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. मराठी कलांगणात आपल्या तेजाने लखलखणा-या सनसिल्क प्रस्तुत झी गौरव या देदीप्यमानसोहळ्यात मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचे एक साक्षीदार असलेले, मराठी आणि हिंदी चित्रपटक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे बुजुर्ग लेखक ग. रा. कामत आणिमराठी चित्रपट, नाटक आणि दुरचित्रवाणीच्या क्षेत्रात अभिनयाची भारदस्त कारकीर्द घडवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानितकरण्यात आले. ग. रा. कामत यांना त्यांचे समकालीन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते तर मोघे यांना ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि नाट्य संमेलनाध्यक्ष अरूण काकडेयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सनसिल्क प्रस्तुत झी गौरव सोहळा मराठी तारांगणातील लखलखत्या ता-यांच्या विशेष उपस्थितीत सिने नाट्य रसिकांच्याअलोट गर्दीच वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे शानदाररित्या संपन्न झाला.
‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘बोलविता धनी’, ‘गृहदेवता’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘कन्यादान’, ‘शापित’ सारख्या मराठी आणि‘कालापानी’, ‘बम्बई का बाबू’, ‘मेरा साया’, ‘दो बदन’, ‘दो रास्ते’, ‘मेरा गाव मेरा देस’, ‘मै तुलसी तेरे आंगन की’, ‘बसेरा’ यासारख्या अनेक गाजलेल्याहिंदी चित्रपटांचे कथा-पटकथाकार ग. रा. कामत यांना याना यावर्षीच्या झी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग. रा. कामत यांच्या पत्नी ज्येष्ठअभिनेत्री रेखा कामत यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. “राजा परांजपे, ग. दि. मांडगुळकर यांच्याबरोबर चित्रपटलेखनाची कारकीर्द सुरू करणारे ग. रा. कामतयांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या गुरुंचा आणि त्यांच्या चित्रपटांवर प्रेम करणा-या रसिकांचाच हा सन्मान आहे” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आकाशवाणी, दुरचित्रवाणीबरोबरच ‘वा-यावरची वरात’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘बिकट वाट वहिवाट’, ‘गरुडझेप’, ‘बेबंदशाही’, ‘मृत्युंजय’ सारखी नाटकेकिंवा ‘प्रपंच’, ‘नंदिनी’, ‘निवृत्ती ज्ञानदेव’, ‘दैव जाणिले कुणी’,’ अंमलदार’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’, ‘दोन्ही घरचा पाहुणा’, ‘अश्वमेध’, ‘शेवटचामालुसरा’ यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे श्रीकांत मोघे झी गौरव पुरस्कार स्वीकारताना नुकतेच निर्वतलेले आपलेधाकटे बंधु कवी-गीतकार सुधीर मोघे यांच्या आठवणीने भावविवश झाले. “झी मराठीकडून मिळणारा हा सन्मान ही माझ्या कामाची खूप मोठी पावती आहे मात्र तोस्वीकारताना मराठी चित्रपटांच्या गीतक्षेत्रात भरीव काम करून ठेवलेल्या माझ्या भावाची उणीव मला प्रकर्षाने जाणवतेय”. हा गौरव आपल्या धाकट्या भावाला आपणअर्पण करत असल्याची कृतज्ञ भावना श्रीकांत मोघे यांनी यावेळी व्यक्त केली. तर बॉलीवुडमध्ये आपली ठसठशीत मोहर उमटवणा-या कलावंताला दरवर्षी ‘मराठी पाऊल पडते’ पुढे या पुरस्काराने झी गौरव सोहळ्यात गौरविण्यात येते. यावर्षीबॉलीवुडची गायिका शाल्मली खोलगडे हिला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सनसिल्क प्रस्तुत झी गौरव पुरस्कार २०१४ साठी यावर्षी ‘फॅन्ड्री’, ‘अस्तु’, ‘रेगे’, ‘दुनियादारी’ आणि ‘अवताराची गोष्ट’ या चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्यापुरस्कारासाठीची चुरस होती. यात ‘अवताराची गोष्ट’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. तर ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ यावर्षीचा विशेषलक्षवेधी चित्रपट ठरला. तसेच यावर्षीचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘दुनियादारी’ या चित्रपटाला गौरविल्या गेले. तर व्यावसायिक नाट्य विभागामध्ये ‘मि.अॅंड मिसेस’, ‘द डेथ ऑफ कॉंन्करर’, ‘थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक’, ‘एकदा पहावं न करून’ आणि ‘गेट वेल सून’ या नाटकांमध्ये रस्सीखेच होती. यात‘गेट वेल सून’ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान मिळवला. तर प्रायोगिक नाटकांमध्ये ‘दु आणि मी’, ‘प्राइस टॅग’, ‘लेझीम खेळणारी पोरं’, ‘क्रॉस रोड’ आणि ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ यांच्यात चांगलीच सुरस होती. यात ‘लेझीम खेळणारी मुलं’ या नाटकाने बाजी मारली.
मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर मोलाची कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणा-या सनसिल्क प्रस्तुत झीगौरव पुरस्कार २०१४ साठी जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१३ पर्यंतच्या कालावधीत सेंसॉरसंमत झालेले चित्रपट आणि नाटक यांचा विचार करण्यात आला होता. चित्रपट विभागासाठी नियुक्त केलेल्या परीक्षक मंडळात दिग्दर्शक कांचन नायक, लेखक गिरीश जोशी आणि संगितकार अमर मोहिले यांना काम पाहिले.व्यावसायिक नाट्य विभागासाठी रविंद्र दिवेकर, प्रदिप राणे आणि विजय केंकरे यांनी तर प्रायोगिक नाटकासाठी डॉ. अनिल बांदीवडेकर, संजय मोने आणिविवेक लागू यांनी काम पाहिले.
प्रेम ही संकल्पना असलेल्या या सोहळ्यात प्रेमाचे विविध आविष्कार घडविण्यात आले. अंकुश चौधरी आणि सई ताम्हणकर यांनी या रंगतदार सोहळ्याचेसुत्रसंचालन केले. तर रमेश भाटकर, संजय मोने, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, हृषिकेश जोशी, वैभव मांगले, आनंद इंगळे, सुनील तावडे, सुहास परांजपे, प्रियदर्शनजाधव, सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम यांच्यासारख्या हुकुमी विनोदविरांनी प्रेमाच्या या जत्रेत हास्याचे अनोखे रंग भरले. तर उमेश कामत, प्रिया बापट, सोनालीकुलकर्णी, मानसी नाईक, क्रांती रेडकर, दीप्ती केतकर, प्राजक्ता माळी आणि श्रुती मराठे यांनी नृत्यातुन प्रेमाच्या विविध छटा साकारल्या. हा देदीप्यमान सोहळायेत्या ३० मार्च रोजी सायंकाळी ७ वा. झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

 

March 21, 2014 in मनोरंजन

पुण्याजवळ अपघात चार जण ठार

पुणे – पुण्याजवळ वडगाव धायरी येथील बायपास पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. भरधाव वेगात असलेल्या कंटेनर ट्रकचा टायर पंक्चर झाल्यामुळे इतर वाहनांना धडकून हा अपघात झाला. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.

 

लोकसभेसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल 0

लोकसभेसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल

election-330x185

यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज गुरुवारी पाच उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले. तर १७ उमेदवारांनी ४६ अर्ज नेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाºयांमध्ये रमेश गोरसिंग पवार यांनी नया दौर पार्टी व भारतीय बहुजन आघाडी या पक्षांच्या नावे प्रत्येकी एक तर अपक्ष म्हणून एक असे तीन अर्ज दाखल केले. मनिष रामकृष्ण ढाले यांनी अपक्ष म्हणून दोन, मधुकर रंगलाल पवार यांनी भारतीय राष्टÑीय कॉंग्रेसच्या नावे दोन, रमेश विठोबा गुरनुले यांनी अपक्ष दोन, शेख जब्बार शेख युनुस यांनीही अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले. आतापर्यंत ८ उमेदवारांनी १४ उमेदवारी अर्ज दाखल केले. आज १७ उमेदवारांनी ४६ अर्ज नेले आहे. आजपर्यंत एकूण ९४ उमेदवारांनी २४० अर्ज नेले आहे.

March 20, 2014 in विदर्भ

शेतकºयाची आत्महत्या

उमरखेड – सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपनाला कंटाळून युवा शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना साखरा येथे बुधवारी घडली. किसन शेषराव वानखेडे (२२) रा. साखरा असे शेतकºयाचे नाव आहे. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. आता पुन्हा रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. वानखेडे याच्याकडे सात एकर शेती असून त्याने ग्रामीण क्षेत्री बँकेचे दिड लाख रुपये कर्ज घेतले होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तो राहत होता. फेबु्रवारी महिन्यात लग्न असलेल्या या युवा शेतकºयाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

March 20, 2014 in विदर्भ

आरोपी फरार

यवतमाळ – संचीत रजेवर गेलेला आरोपी काराहगृहात हजर न होता पसार झाल्याची घटना घडली. पांडुरंग बापुराव काकडे रा. बोरी अरब असे आरोपीचे नाव आहे. मध्यवर्ती कारागृह अमरावती येथून ६ आॅक्टोंबर २००५ रोजी तो संचीत रजेवर गेला होता. मात्र रजा संपल्या नंतरही तो कारागृहात हजर झाला नाही. शेवटी कारागृह प्रशासनाने त्याला फरार घोषित केले. या प्रकरणी अमरावती कारागृहाचे पोलीस शिपायी पांडुरंग दुमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाडखेड पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्हा दाखल केला.

March 20, 2014 in विदर्भ

कार झाडावर आदळली, एक ठार

यवतमाळ – भरधाव कार झाडावर आदळल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.४५ वाजता ढुमणापूर देवस्थानाजवळ घडली.
धनराज गणपत पालकर (२८) रा. वडगाव असे मृतकाचे नाव आहे. सागर अरविंद मदनकर (२९) रा. गणेश कॉलनी हा आपल्या कारने (एम.एच.४०/ एसी २३३२)नेरकडून यवतमाळकडे येत होता. अशातच त्याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार ढुमणापूर देवस्थानाजवळील वळणावरील झाडावर आदळली. यामध्ये पालकर हा जागीच ठार झाला असून अन्य दोन जण जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. आशिष अरविंद मदनकर (३३) रा. दोनाडकर ले आऊट पिंपळगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी चालक सागर याच्याविरुद्घ गुन्हा दाखल केला.

March 20, 2014 in विदर्भ
महिलेचे मंगळसूत्र उडविले 0

महिलेचे मंगळसूत्र उडविले

chain-sneture1

यवतमाळ – दाते कॉजेलचौकातून पायी जाणाºया महिलेच्या गळ््यातील मंगळसूत्र उडविल्याची घटना आज दुपारी १२.१५ वाजता घडली. यावेळी नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.
कशिश सुशिल कटीयारा (२७) रा. वैद्य नगर यांनी शाळेतून मुलीला घेऊन घराकडे जात होत्या. अशातच दाते कॉजेल चौकात समोरुन आलेल्या युवकाने या महिलेच्या गळ््यातील साडेबारा ग्रॅमचे मंगळसूत्र हिस्कावले. यावेळी सदर महिलेने आरडा ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी पाठलाग करुन मंगळसूत्र चोरट्यास पकडले. या बाबतची माहिती प्रा. मेहरे यांनी वाहतुक पोलीस सुरेंद्र वासनिक यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून चोरट्यास ताब्यात घेऊन वडगाव रोड पोलिसांच्या स्वाधिन केले. यावेळी घटनास्थळावर सहा ग्रॅम सोन्याचा तुकडा सापडला. याप्रकरणी कशिश कटीयारा यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी चोरट्याविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

March 20, 2014 in विदर्भ
बगदादमध्ये स्फोटात ४६ ठार 0

बगदादमध्ये स्फोटात ४६ ठार

Adam-Bomb-psd9887-300x243
बगदाद – इराकची राजधानी बगदादमध्ये एका कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४६ जण ठार झाले आहेत. काल, बुधवारी रात्री उशिरा हा आत्मघाती हल्ला झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॅफेमध्ये टीव्हीवर फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नेमका यावेळी एकाने आत्मघाती स्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात ४६ जण जागीच ठार झाले. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इराकमध्ये शिया व सुन्नी या दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याने या वादातूनच ही घटना घडली असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

March 20, 2014 in देश-विदेश
‘बसप’ ८० जागा लढवणार 0

‘बसप’ ८० जागा लढवणार

Mayawati's press conference
‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशमधील लोकसभेसाठीच्या ८० उमेदवारांची यादीही जाहीर केली.

March 20, 2014 in देश-विदेश
आनंद-कार्याकिन लढत बरोबरीत 0

आनंद-कार्याकिन लढत बरोबरीत

index.jpeg10
खँती मॅन्सिस्क – कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि रशियाचा सर्जी कार्याकिन यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. आनंदची ही सलग तिसरी बरोबरी आहे. बरोबरीचे शुक्लकाष्ठ सुटत नसले तरी सहाव्या फेरीअखेर चार गुणांसह त्याने अव्वल स्थान राखले आहे.
अन्य लढतीत बल्गेरियाचा व्हॅसेलिन टोपालोवने रशियाचा व्लादिमिर क्रॅमनिकला हरवले. पाचव्या फेरीत रशियाच्या पीटर स्विडलरविरुद्धच्या लढतीतून बोध घेत टोपालोवने प्रतिस्पध्र्याला वरचढ होण्याची तसेच नशीबवान ठरण्याची संधी दिली नाही.टोपालोवविरुद्ध नशीबाने विजय मिळवलेल्या स्विडलरचे अझरबैजानचा शखरियार मामेद्यारोवविरुद्ध काहीच चालले नाही. अव्वल सीडेड अर्मेनियाचा लेवॉन अरोनियन आणि रशियाचा दिमित्री आंद्रेकीन यांच्यातील लढतही बरोबरीत सुटली. यात अरोनियनने विजयाच्या अनेक संधी दवडल्या. सातव्या फेरीनंतर अरोनियनने (३.५ गुण) दुसरे स्थान मिळवले आहे. क्रॅमनिकसह टोपालोव, स्विडलर आणि मामेद्यारोवच्या खात्यात प्रत्येकी तीन गुण आहेत. कार्याकिन (२.५ गुण) आणि आंद्रेकीन शेवटच्या दोन स्थानांवर आहेत.

March 20, 2014 in क्रीडा
टी२० विश्वचषक- नेपाळचा अफगाणिस्तानवर विजय 0

टी२० विश्वचषक- नेपाळचा अफगाणिस्तानवर विजय

download1
चितगाव- आयसीसी टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यात नेपाळने अफगाणिस्तानवर नऊ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत नेपाळने अफगाणिस्तानपुढे विजयासाठी १४२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यांना २० षटकात आठ बाद १३२ धावा करता आल्या.
टी२० विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीतील नेपाळने अफगाणिस्तानसमोर १४२ धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या नेपाळने पाच गडी १४१ धावा केल्या.यापूर्वी अफगाणिस्ताननेे नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नेपाळच्या खाखुरेलने केलेल्या ५६ धावांच्या जोरावर नेपाळला १४१ धावांचा टप्पा गाठता आला. अफगाणिस्तानकडून शपूर झारदान याने दोन गडी बाद केले. नेपाळ आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी पात्रता फेरीतील दोन सामन्यांमध्ये एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.

March 20, 2014 in क्रीडा
‘आप’ची आठवी यादी जाहीर 0

‘आप’ची आठवी यादी जाहीर

aap-logo
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने बिहारच्या पटनासाहिबमधुन संयुक्त जनता दलाच्या माजी मंत्री परवीन अमानुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा थेट सामना बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी होणार आहे.
आपने बुधवारी रात्री आठवी यादी जाहीर केली. या यादीत सहा राज्यातील १९ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील लातूर आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. आपने बिहारमधुन पाच, झारखंडमधुन सात, मध्यप्रदेशमधुन एक, केरळ, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रामधुन प्रत्येकी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. आपने आतापर्यंत २८७ उमेदवार जाहीर केले आहेत.परवीन अमानुल्ला या नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सामाजिक कल्याण मंत्री होत्या. बिहारमधल्या प्रभावी मुस्लिम नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. यावर्षी फेब्रवारी महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्या जदयूमधुन बाहेर पडल्या होत्या.

March 20, 2014 in देश-विदेश
 शक्ती मिल बलात्कार प्रकरण- चारही आरोपी दोषी 0

शक्ती मिल बलात्कार प्रकरण- चारही आरोपी दोषी

SHAKTI-MILLS
मुंबई- शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी दोषी असल्याचे गुरुवारी न्यायालयाने सांगितले. शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी गुरुवारी ‘इन-कॅमेरा’ सुनावणी झाली. छायाचित्रकार असलेल्या तरुणीवर ३१ जुलै २०१३ रोजी सामूहिक बलात्कार झाला होता. त्यापूर्वी याच आरोपींनी एका टेलिफोन ऑपरेटरवरही सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले.
मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिल कंपाउंड येथे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या घटना घडल्या होत्या. आरोपींनी प्रथम ३१ जुलै रोजी २३ वर्षीय टेलिफोन ऑपरेटर असलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी त्यांनी एका छायाचित्रकार मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती शालिनी जोशी यांच्यासमोर शनिवारी सरकारी पक्षाचे अ‍ॅड. उज्ज्वल निकम आणि आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. गुरुवारी या प्रकरणाच्या निकालावर सुनावणी होणार असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या प्रकरणातील अशफाक शेख, कासिम शेख ऊर्फ कासिम बंगाली, सलिम अन्सारी आणि विजय जाधव हे चारही आरोपी दोषी असल्याचे गुरुवारी न्यायालयाने सांगितले. अल्पवयीन आरोपीवर बालगुन्हेगारीच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. अन्य आरोपींवरील खटला मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. आठ ऑक्टोबर २०१३ रोजी चार आरोपींवर ३६२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर अल्पवयीन आरोपीवर वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीसाठी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हे न्यायालयात उपस्थित होते. पिडीत तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळाल्याचे सांगत आर.आर.पाटील यांनी या निर्णयावार समाधान व्यक्त केले

 

March 20, 2014 in महाराष्ट्र